अधिक देखणे तरी निरंतर पाहणे
योगिराज विनवणें मन आले ॐ मयी । (श्री ज्ञानेश्वर महाराज)
फक्त समोर पाहण्यानं तुम्ही मनाच्या चकव्यातनं बाहेर पडू शकता!
____________________________________
ज्ञानेश्वर महाराजांच्या चित्तदशेशी एकात्मता साधून, अत्यंत शांतपणे; त्यांनी वर्णन केलेली ही काव्यात्मक प्रक्रिया समजावून घेऊ.
मनाची तीन प्रमुख अंग आहेत : दृक, वाक आणि श्राव्य.
या अभंगात महाराज दृक प्रक्रियेविषयी सांगतायत. ही एक प्रक्रिया साधल्यावर, मनाच्या इतर दोन प्रक्रिया तुमच्या काह्यात येतात... 'मन आले ॐ मयी' हा तुमचा अनुभव होतो... महाराजांच्या चित्तदशेशी आपण समरूप होतो.
______________________________
पाहणं आपल्या जाणिवेचा जवळजवळ ऐंशी ते पंचाऐंशी प्रतिशत भाग व्यापून आहे. नजर आपल्या आकलनाचं सर्वात प्रमुख साधन आहे. त्यामुळे मेंदूचा अत्यंत मोठा प्रभाग दृक स्मृतींनी व्यापला आहे.
आपल्याला वाटतं पाहतो तर आपण सदैव आहोतच, 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यानं विशेष काय साधणार आहे? पण मजा म्हणजे आपण 'फक्त पाहत' नाही, पाहताना विचार करतो... आपण सक्रिय झालेल्या मनानं पाहतो.
त्यामुळे :
चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला
तैसा म्यां देखिला निराकार ॐ मयी ।
हा आपला अनुभव होत नाही.
आपली नजर सतत प्रकट जगावर राहते, व्यक्त गोष्टींवर राहते, आकार पाहते; सर्वव्यापी 'निराकार ' आपल्याला दिसत नाही.
_______________________
ट्राय टू अंडरस्टँड धिस,
एखाद्या निवांत वेळी पाहण्याच्या प्रक्रियेचं आकलन करून घेण्याचा प्रयत्न करा. समोरची वस्तू दिसते, मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं. तो आकार आणि नांव स्मृतीत मॅच झालं की आपल्याला कळतं, 'सफरचंद'. पण गाडी तिथे थांबत नाही, कारण स्मृती सक्रिय झालेली असते. मग सफरचंदावरनं अॅडम, इव्ह किंवा न्यूटन> गुरुत्वाकर्षण> बाग > मग सखी बरोबर आपण गेलो होतो ती बाग डोळ्यासमोर तरळते > मग तिच्या समवेत हनीमून >त्यानंतर झालेले वादंग स्मरतात.. आणि असं होताहोता समोरचं सफरचंद दिसेनासं होतं.
थोडक्यात आपण 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' असं पाहत नाही. आपलं पाहणं आणि विचार करणं सायमल्टेनिअसली चालू असतं. आणि हे एकदा-दोनदा नाही तर नेहमी, सतत, निरंतर चालू असतं. जागेपणी आपण त्याला विचार म्हणतो आणि निद्रेत स्वप्नं, इतकाच काय तो फरक!
________________________
झेन संप्रदायात झाझेन (Zazen ) नांवाची ध्यानप्रणाली आहे. भिंती समोर साधारण दोन फूट अंतरावर बसायचं आणि शांतपणे समोरच्या रिकाम्या भिंतीकडे पाहत राहायचं. तुमच्या लक्षात येईल मनाचा प्रोजेक्टर भिंतीवर विविध प्रतिमा प्रोजेक्ट करायला लागतो आणि आतमध्ये संवाद सुरू होतो.
साधना मजेशीर आहे. दहा मिनिटं जर आपण बसलो तर केवळ काही सेकंद समोरची भिंत दिसते आणि आजूबाजूला काय चाललंय ते ऐकू येतं. त्या काही सेकंदभरापुरते आपण मनाच्या चकव्यातून बाहेर पडलेलो असतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' म्हणजे समोरची भिंत अधिकाधिक वेळ दिसणं आणि त्या वेळी आजूबाजूला चाललेलं स्पष्टपणे ऐकू येणं.
असे निर्विकल्प क्षण जितके दीर्घकालीन होतील तितकी तुमच्या जीवनात शांतता येईल. पुढेपुढे ती शांतता भिंत समोर नसताना देखिल तुम्ही अनुभवाल. कारण प्रश्न भिंतीचा नाही, मनाची अविरत प्रक्रिया थांबण्याचा आहे.
_________________________________
देहबळी देऊनी साधिली म्यां साधनी
तेणे समाधान मज जोडले ॐ मयी ।
त्या निर्वेध क्षणात तुम्हाला कळेल की पाहणारा देहापेक्षा वेगळा आहे. देह बसलाय आणि आपल्याला कळतंय. मग दैहिक विवंचनांतून तुम्ही हळूहळू मोकळे व्हायला लागाल. वय, वजन, व्याधी, वार्धक्य शरीराला आहे, आपल्याला नाही, हा उलगडा तुम्हाला होईल. त्या समाधानातून मनाची प्रक्रिया आणखी शांत व्हायला लागेल.
___________________________
अनंगपण फिटले मायाछंदा साठविले
सकळ देखिले आत्मस्वरूप ॐ मयी ।
असा निवांतपणा सघन होत गेल्यावर एक दिवस अचानक तुम्हाला, भिंत आणि शरीरामध्ये असलेलं 'अंतर' दिसेल. तुमची नजर केवळ भिंत न पाहता, शरीर आणि भिंत यातली स्पेस पाहू लागेल. त्या स्पेसवर, निराकारावर, नजर स्थिर होईल.
ज्या क्षणी तुम्हाला निराकार दिसेल त्या क्षणी समोर पाहणार्या नजरेचं रिवर्सल होईल. तुमची नजर दुहेरी होईल. भिंत आणि शरीर या दोन्ही गोष्टी ती एकावेळी पाहू लागेल.
तुम्ही समरसतेनं प्रक्रिया केली तर तुमच्या लक्षात येईल की हा निराकार फक्त समोर नाही. तो आत-बाहेर, इथे-तिथे, सर्व व्यापून आहे; सकळ आहे. प्रत्येक आकार अंतर-बाह्य व्यापून आहे. तो सकळांचं आत्मस्वरुप आहे.
तुम्हाला बुद्धाची अलौकिक बुद्धिमत्ता कळेल... 'कुणाच्याही आत कुणीही नाही'.
जग माया आहे म्हणजे `ते नाही' असं नाही. तो भास नाही. स्वच्छंद आहे. तुमचं जगणं उत्स्फूर्त होईल, आनंदाच होईल.
__________________________
पुरे पुरे आता प्रपंच पाहणे
निजानंदी राहणे स्वरुपी ॐ मयी ।
हा निराकार दिसणं तुम्हाला तरल करेल. त्या तरलतेला निजानंद म्हटलंय. तुम्ही प्रपंच कराल पण त्याचं ओझं राहणार नाही.
________________________________
ऐसा ज्ञानसागरु रखुमादेविवरु
विठ्ठलु निर्धारु म्यां देखिला ॐ मयी ।
हा निराकार सर्व ज्ञानाचा स्रोत आहे.
ओशो म्हणतात : ज्ञानी सर्वज्ञ होता है इसका मतलब ये नही की वो पंक्चर निकाल लेगा या बिना सिखे हवाई जहाज उडा लेगा. ज्ञानी जाननेकी क्षमताको उपलब्ध होता है. जिस चिज़मे वह रस लेगा उसे समग्रतासे जान लेगा (अष्टावक्र महागीता)
असा हा निराकार निर्धारानं, सदासर्वकाळ, तुमच्या समोर उभा आहे. त्याला कोणत्याही आधाराची गरज नाही. तुम्ही फक्त 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' इतकंच करायचंय.
तो आकार नाही, स्थिती आहे. आणि तुम्ही त्यापासून वेगळे नाही. तुम्ही आणि तो एकरूप आहात. केवळ मनाच्या अविरत प्रक्रियेनं तुम्हाला त्याचं दर्शन दुर्लभ झालंय.
__________________________
या काव्यपंक्ती प्रक्रिया आणि परिणाम दोन्ही सांगतात. 'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' ही प्रक्रिया आहे आणि 'मन आले ॐ मयी' हा मनाच्या 'वाक' भागावर तिचा होणारा परिणाम आहे.
'मन आले ॐ मयी' ही तितकीच रम्य स्थिती आहे. वैखरी>मध्यमा>परा>पश्यंती या प्रक्रियेतनं आपण ध्वनिशास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. स्वरमाधुर्य कशानं निर्माण होतं याचा वेध घेणार आहोत . त्या प्रक्रियेनं आपण वैश्विक शांतीशी एकरूप होतो.
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे' यावरचे प्रतिसाद आणि अनुभव तुम्ही लिहीलेत, की त्याविषयी पुन्हा केव्हा तरी.
प्रतिक्रिया
14 Aug 2013 - 12:32 am | लंबूटांग
पण म्हटले इतरांना उपदेश करणारे संक्षी स्वतः सगळे नीट लक्ष देऊन वाचत असतीलच. म्हणून नाही दिल्या.
तिथेच विनंतीवजा सूचना केली होती तुम्ही एक टेबलच बनवा ना की मन म्हणजे CPU, मेंदू अथवा अजून काय जे स्मृती जतन करत असेल ते हार्ड-ड्राईव्ह.
संक्षींनीच ह्या मालिकेतील पहिल्याच धाग्यावरील एका प्रतिसादात लिहीले होते की जिथले प्रतिसाद मी तिथेच क्लिअर करत जाईन. ‘लेफ्ट ओवर’ पुन्हा नवी मानसिक प्रश्नावली सक्रिय करतो. . माझ्याबाबतीत तरी असे काही घडले नाही ब्वॉ.
बरं मोदकराव तुम्हाला नवीन धागा काढायचा असल्यास माझा प्रतिसाद तिथे उध्रुत करा बिन्धास्त. HTMLहवे असेल तर ते व्यनी/ इमेल करेन.
14 Aug 2013 - 12:25 am | संजय क्षीरसागर
आहो, तुम्ही स्वतःचे प्रतिसाद सुद्धा वाचत नाही असं दिसतंय!
तुम्ही लिहीलंय :
आणि त्याला उत्तर म्हणून मी लिहीलंय >पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद वाचला तरी कुणाही मंदमतीला अर्थ कळेल!
याचा अर्थ पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद.
असो, बाकी तुम्ही पहिल्या पोस्टवर जे दिव्य प्रतिसाद दिलेत ते वाचा. त्याबद्दल प्रथम तुम्हाला दिलगीरी व्यक्त करावी लागेल. नाही तर तुमचे प्रश्न आणि तुम्ही गोंधळ घाला.
14 Aug 2013 - 12:31 am | धन्या
कोणता प्रतिसाद
स्वतःचे प्रतिसाद
संपूर्ण प्रतिसाद
पहिल्या पोस्टवरचा पहिला प्रतिसाद
पहिल्या पोस्टवरचा त्याचा पहिला प्रतिसाद
दिव्य प्रतिसाद
14 Aug 2013 - 12:36 am | लंबूटांग
तुम्ही संदिग्ध लिहीले आहे. पहिल्या पोस्ट्वरचा पहिला प्रतिसाद आणि पहिल्या पोस्ट्वरचा त्याचा पहिला प्रतिसाद यात प्रचंड फरक आहे.
आणि दिलगीरी कशाबद्दल मी व्यक्त करावी ब्वॉ? माझ्या त्या प्रतिसादाची लिंक खाली दिलेली आहे. तुमचा स्मृतीसंबंधीचा जो सिद्धांत होता त्यातील त्रुटी मी उदाहरणासहित दाखवली. आता ती चूक असेल तर तुम्ही दाखवा तसे. मी कशाबद्दल दिलगीरी व्यक्त करायची?
14 Aug 2013 - 1:41 am | मोदक
थांबा राव. आणखी कन्फ्युजन नको..
ते म्हणतहेत तो स्पा चा पहिला प्रतिसाद हा आहे.
संक्षी - थोडा शांतपणे विचार करा - तुम्हालाच सगळेजण का टारगेट करत आहेत..?? काहीही चुकत नसावे का तुमचे? तुमचा अभ्यास आहे.. तुमचे ज्ञान.. सर्व गोष्टी मान्य. परंतु फक्त तुम्हीच सर्वज्ञ आहात या थाटात लेखन करून तुम्ही तुमच्या ज्ञानाची चेष्टा मांडत नाहीये का..?
थोडा तरी विचार करा राव.
(चेष्टा करण्यात आणि टर उडवण्यात माझा सहभाग आहे हे मी बिनशर्त मान्य करत आहे परंतु वरचा प्रश्न कळकळीने विचारला आहे - बाकीच्या प्रश्नांप्रमाणे याही प्रश्नाला फाट्यावर मारणार असलात तरी मला फरक पडणार नाही)
14 Aug 2013 - 1:46 am | प्रभाकर पेठकर
अच्छा! त्याला ज्ञान आणि अभ्यास म्हणतात का? बॉरं....
14 Aug 2013 - 1:54 am | मोदक
समजा हा क्ष आहे अशा गृहीतकावर आपण अनेक गणिते सोडवतो. तो क्ष प्रत्यक्षात नसतो पण त्याच्या आधाराने आपण प्रश्नापासून उत्तरापर्यंत पोहोचतो.
त्याचप्रमाणे हे गृहीतक त्यांना विचार करण्यास भाग पाडणार असेल तर "गृहीत धरायला" काय हरकत आहे..?
त्यांचा अभ्यास असेल / नसेल ती त्यांची वैयक्तीक गोष्ट आहे.
14 Aug 2013 - 2:07 am | धन्या
वपुंची आठवण आली.
14 Aug 2013 - 2:18 am | मोदक
एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना त्याच्या अस्तित्वाविषयी गृहीतक मांडतो. त्या गृहीतकामध्ये अतर्क्य गोष्टी तार्किकरीत्या योजलेल्या असतात. ते गृहीतक आपण मांडतो कारण आपण एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधत असतो.
उत्तरही सापडते. पण ते आपल्याला हवे असलेले उत्तर असते.
खरे उत्तर..? ते हवे असेल तर पुन्हा एखादे गृहीतक मांडावे लागेल. नवी समज आली की; नवीन धारणेसह!
***********
हे कसे वाटते आहे..?? :-D
14 Aug 2013 - 2:17 am | प्रभाकर पेठकर
आज पर्यंतच्या अनेक धाग्यांवरील अनेक प्रतिसादकांनी अनंत प्रयत्न करूनही कोणी उत्तरापर्यंत पोहोचलेले दिसत नाही.
तुम्ही ते गृहीत धरा किंवा नका धरू त्याने काय फरक पडणार आहे? त्यांनी सुरुवातीपासूनच ते गृहीत धरलेले आहे. तसेच, तुमचाच कांही अभ्यास नाही, तुम्हालाच कांही ज्ञान नाही हेही त्यांनीच गृहीत धरलेले आहे.
14 Aug 2013 - 7:42 pm | मोदक
साक्षात्कार झाला!! :-D
13 Aug 2013 - 8:06 pm | लंबूटांग
इतका इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स?
हा निष्कर्ष कशावरून काढलात?
14 Aug 2013 - 12:11 am | धन्या
पूर्वी कंटाळा आला की मी काही विशिष्ट ब्लॉग्ज वाचत असे.
हल्ली मी संजय सरांच्या लेखांवरील प्रतिसाद वाचतो. संजय सरांचा लेख कळो न कळो परंतू त्यांच्या लेखावरील प्रतिसाद म्हणजे करमणूकीची हमी.
14 Aug 2013 - 12:14 am | मोदक
तुम्ही जितकं स्पष्टीकरण द्याल तितकी तुमची मानसिकता उघड होत जाईल याचं भान ठेवून लिहा!
14 Aug 2013 - 12:22 am | धन्या
दुनिया काय म्हणेल याचं भान रुणझुणू रुणझुणू असे गुणगुणत फीरणारे भ्रमर ठेवत नाहीत.
14 Aug 2013 - 12:38 am | लंबूटांग
ही मालिका अगदी योग्य वेळी सुरू केली आहे. अजून महिनाभर हापिसात काही काम नाही आहे. ह्या धाग्यामुळे चांगली करमणूक होतेय.
13 Aug 2013 - 3:56 pm | धर्मराजमुटके
लेख आवडला !
13 Aug 2013 - 4:15 pm | संजय क्षीरसागर
पूर्वग्रह नसल्यानं तुम्हाला तो कळू शकला इतकंच. प्रक्रिया निश्चित करून पाहा, उपयोग होईल.
14 Aug 2013 - 2:12 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काही सुज्ञ, बुद्ध किंवा अबुद्ध, बालिश, टप्पर लोकांना याचा उपयोग होऊ शकतो:
Psychology's answer to trolling and online abuse
संक्षी, लेख बराच फिरतोय. हसायलाही आलं, काय विनोदी वाटलं हे सांगत नाही, तुम्हाला महित्येच.
14 Aug 2013 - 7:30 am | भडकमकर मास्तर
Ayya hi tar gadya sharadini
14 Aug 2013 - 1:34 pm | संजय क्षीरसागर
सदस्यांना ज्ञान याचा अर्थ सच्चिदानंद बाबांची गोष्ट वाटते. अशा लेखनात काही त्रुटी दिसत नाहीत कारण त्यात समाजमान्य धारणांच दळण फक्त नव्या शब्दात काढलेलं असतं.
लेखक, सोयिस्करपणे बाळ सप्रे आणि माझ्या प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो. आणि सदस्यांना इतकी उघड गोष्ट उचलून धरता येत नाही.
नाऊ सी, हा लेख देखिल त्याच ज्ञानेश्वर महाराजांवर आहे पण दोन ठिकाणी आलेल्या प्रतिसादात कमालीची तफावत आहे. याचा अर्थ तुमच्या मते, मी सर्वांना कमी लेखतो असा आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे :
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
अप्रकाशित लेख सुद्धा योग्य ठिकाणी पोहोचतो याचं आश्चर्य आहे!
आता इथे एक साधी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. विडंबनाचा रोख नेहमी व्यक्तिगत असतो. माझ्यावर इतकी विडंबनं झालीयेत की बोलता सोय नाही. मधे मिपा बंद होतं तेव्हा सहज दुसर्या संकेतस्थळावर चक्कर टाकली तर माझ्यावरचं विडंबन तिथे प्रकाशित करून लोक मजा घेत होते! कॅन यू इमॅजिन? जिथे मी कधीही प्रतिसाद देण्याची शक्यता नाही तिथे माझ्यावर चिखलफेक! धिस इज दि हायेस्ट ऑनलाईन अब्युज. शुद्ध मराठीत याला भ्याडपणा म्हणतात.
आता माझ्या विडंबनाला `फारच व्यक्तिगत रोख आहे' म्हणणं, आणि इतरांच्या माझ्यावर केलेल्या विडंबनाला `इट इज ओके, इतपत चालायचंच' म्हणणं याला काय अर्थ आहे? हे म्हणजे `एकाचा बलात्कार सौम्य आणि दुसर्याचा फोर्सफुल, तस्मात पहिला कायदेशीर आणि दुसरा बेकायदा' असा न्याय लावणं आहे .
14 Aug 2013 - 1:49 pm | मोदक
`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं आहे. आणि तसं (अप्रत्यक्षपणे) सांगणारे लेखक तुम्हाला ज्ञानी वाटतायंत. आता याला मी काही करू शकत नाही.
"`टू रेज अप अ डेड' हेच तुम्हाला हवं" आहे हा निष्कर्ष कशावरून काढलात..??
तुम्ही हे जे अध्यात्म सांगताय, त्याची एका वाक्यातली सुटसुटीत व्याख्या "आत्म्याचे परमात्म्याशी मिलन" ही होवू शकते का..?
14 Aug 2013 - 2:32 pm | विटेकर
अगदी अगदी !
आत्म्याचे परमात्म्याशी मिलन
इतकं अध्यात्म सोप्प आहे. माझा संक्षींवर आक्षेप आहे तो हा की , इतका सोप्पा विषय ते प्रचंड शब्दबंबाळ करून आडमार्गाला नेतात. आधीच अध्यात्माबद्द्ल प्रचंड गैरसमज आहेत त्यातून तुम्ही तत्वज्ञानाचा क्लास काढा ..मग लोक आणखी लांब जातात... नाहीतर फुका ट्पल्या मारून गंम्म्त बघत बसतात ! ( मी पण त्यातलाच , करतो कधी कधी गम्मत ,,.. काय करणार वो, अति झालं आणि हसू आलं )
दोन्ही प्रकारात अध्यात्माचेच नुकसान !
संक्षी - एक अनाहूत सल्ला -
नका लिहू अध्यात्मावर ! एरव्ही तुम्ही चांगले लिहू शकता. मागे एक परिक्रमेवर विडंबनात्मक लिहले होते, मजा आली होती वाचताना .. तस्ल कायतरी लिहा हो. लोकांचे मरू दे, ते होतील तेव्हा शहाणे होतील नायं तर नाय होतील. आपण आपल्या पावलांपुरते पहावे !!
14 Aug 2013 - 2:44 pm | प्रभाकर पेठकर
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती...
बालका, आपल्या पाऊलांपुरते तर सामान्यजन पाहतात.
14 Aug 2013 - 2:33 pm | बॅटमॅन
व्यक्तिगत रोख, तुच्छता आणि चिखलफेकीबद्दल तुम्ही काही बोलणे म्हंजे ओसामाने "हल्ली जगात साला टेररिझम फार वाढलाय बॉ!" म्हणण्यापैकी आहे.
14 Aug 2013 - 2:41 pm | धन्या
आम्ही "ईलाईट" क्लासमधले नसल्यामुळे काल दुपारी बारा वाजल्यापासून आज पहाटे सहा वाजेपर्यंत कार्यालयात कळफलक बडवत होतो.
जरा सबुरीनं घ्या. असे हातघाईवर येऊ नका. वेळ मिळाला की सार्या प्रश्नांची उत्तरे देईन.
14 Aug 2013 - 3:12 pm | अवतार
आपले ते सत्य आणि इतरांच्या त्या धारणा
हे समीकरण आधीच पक्के जुळवले की मग चर्चा ही निव्वळ औपचारिकता उरते.
14 Aug 2013 - 4:47 pm | लंबूटांग
कैच्या कै लिहू नका. विडंबने लेखाची त्या लेखकाच्या विशीष्ट शैलीची होतात. त्याने व्यक्तिगत आयुष्यात काय केले आहे व किती संस्थळे काढली आहेत व त्यावर किती लोक येतात वगैरे असंबद्ध गोष्टी त्यात नसतात. मी काही विडंबन एक्स्पर्ट नाही पण मी मिपावर जे काही थोडे बहुत लेखन केले आहे ते बहुतांश विडंबन या प्रकारात केलेले आहे. विडंबन तुमच्या वर केलेले नसून तुमच्या लेखावर केलेले असेल तर ते ज्या लेखनावरून स्फुरलेले आहे त्याची लिंक दिली तरी पुरे असावे.
विडंबन म्हणजे चिखलफेक? आणि तुम्ही प्रतिसाद द्यावा म्हणून विडंबन करतात असे तुम्ही कोणाला सांगितले? बरं तुम्ही तिथे प्रतिसाद देत नाहीत तिथे तर मग तिथल्या काही सदस्यांना तुम्ही कोण हे माहितही नसेल. विषय संपला.
देअर यू गो अगेन. आक्रस्ताळेपणा. अब्युज काय आणि भ्याडपणा काय.
दोन विडंबनांमधे जमीन अस्मानाचा फरक आहे. तुमच्या लेखनशैलीवरील विडंबना मधे तुम्ही वैयक्तिक जीवनात काय काम करता/ किती साईट्वर लिखाणकरता वा तत्सम उल्लेख नाही आहेत. जे तुमच्या विडंबनामधे होते. म्हणून ते उडाले असावे.
नोटः
14 Aug 2013 - 3:31 pm | जयंत कुलकर्णी
ज्या प्रमाणे एखाद्या सर्वशक्तिमान पहिलवानाने उठसूट लोकांची गचांडी पकडू नये हा सामाजिक संकेत आहे त्या प्रमाणे बुद्धिमान माणसानेही उठसूट जनतेची गचांडी पकडू नये असा सामाजिक संकेत आहे. दोघांनी हे केल्यास त्यांच्या शक्तींची अवहेलना व हसे होते.....व त्यांच्या शक्तीचा दुरुपयोग होऊन ती वाया जाते.....आणि शक्तीचा स्त्रोत आटू शकतो......
14 Aug 2013 - 4:27 pm | संजय क्षीरसागर
इतकी उघड गोष्ट आहे. लेखकच पुरावे देतोय :
आणि प्रतिसाद तर एकसोएक आहेत :
१) वा! धनाजीराव वा! छान लिहिलेय.
२) आवडलं.
३) मस्त. भिंतीचं अप्रूप मलाही आहे
४) मस्त! आपुले मरण पाहिले म्या डोळां..
५) आमच्या अण्णांना हा लेख वाचून दाखवतो आणि आलेला अनुभव तुला सांगतो
६) लेख आवडला. धन्स हो धन्याशेठ.
काय निष्कर्श निघतो यावरनं?
_________________________
आणि माझा प्रश्न फार साधा आहे: `इफ वन कॅन रेज अ डेड, वाय टू सर्च फॉर द अनडाइंग ?
किमान बुद्धी सुद्धा साधा तर्क करू शकते, जर मृत्यूवर विजय मिळवला तर अध्यात्माची गरज काय?
भारतीय मानसिकता किती बालीश आहे. आपण कुणाही पाश्चिमात्यासमोर ज्ञानेश्वरी ठेवली आणि त्याला सांगितलं की `धिस इज वन ऑफ दि हायेस्ट ट्रिटाइज ऑन द ग्रेट भगवद्गीता, अँड यू नो? इट इज रिटन बाय अ डेड हू वॉज रेज्ड अलाइव टू राईट इट!
तर तो सरळ म्हणेल, `मॅन, फर्गेट अबाऊट द ट्रिटाइज, वेअर इज दि फॉर्म्युला?'
तुमच्या साधी गोष्ट लक्षात येत नाही. या भंपकपणानं तुम्ही ज्ञानेश्वरीचं मूल्य कमी करतायं. असो, साक्षात लेखक तिथे प्रतिसाद देणार आहेत, तेव्हा बघू.
_____________________________
नाही. माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'
अर्थात, यावर तुम्ही पुन्हा उपहास सुरू करण्याची आणि हे वाक्य विपर्यस्त करून जागोजागी वापरण्याची शक्यता आहेच. पण तसं करणं फक्त एकच गोष्ट दर्शवेल, मी माझ्या लेखनाशी प्रामाणिक राहून तुमच्यावर विश्वास टाकला आणि तुम्ही मात्र, मला समजावून न घेता, पुन्हा बेईमानी केली! अँड दॅटस द होल थिंग, `तुम्ही स्वतः सत्य आहात', हे पुन्हा तुम्ही नाकारलं. आता यानं मला काय फरक पडतो? मी तर निश्चिंत आहे, तुमचं अस्वास्थ्य कायम राहिलं.
14 Aug 2013 - 4:57 pm | मोदक
काय निष्कर्श निघतो यावरनं?
तो लेख आणि तेथे मिळालेले प्रतिसाद येथे उल्लेखून तुम्हाला "इन्फिरिऑरिटी काँप्लेक्स" आला असावा - हा मी माझ्यापुरता निष्कर्ष काढला आहे.
माझ्या अध्यात्माची व्याख्या इतकीच आहे `आपण व्यक्ती नसून स्थिती आहोत, सत्य आहोत'
ओके. माझी व्याख्या किती % चुकीची / बरोबर आहे..?
वरच्या प्रतिसादातील मधल्या भागावर मला विचार करण्यास वेळ मिळाला नाहीये - १९ ऑगस्टपर्यंत मिळणार नाहीये - तस्मात तो भाग सध्या बाजूला ठेवत आहे.
वरच्या प्रतिसादातील शेवटचा भाग वैयक्तीक वाटल्याने त्याला फाट्यावर मारण्यात आले आहे.
_____________________
सुटसुटीत तेच लिहीतो
14 Aug 2013 - 6:24 pm | संजय क्षीरसागर
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.
१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.
14 Aug 2013 - 7:11 pm | मोदक
इतक्या भंपक कल्पना असलेल्या लेखावर आलेल्या प्रतिसादांनी मला काँप्लेक्स येऊ शकेल, इतकी महान बुद्धीमत्ता दर्शवल्यावर, पुढे काहीही लिहीण्यात अर्थ नाही.
आलेला नाहीये का..?? तुमच्या प्रतिसादांचा टोन पहा.
१९ ऑगस्टपर्यंत काय, तुम्ही माझ्या लेखनावर किंवा प्रतिसादांवर विचार करणं कायमच बंद करा, ते तुमच्या आकलना पलिकडे आहे.
धन्यवाद! तुम्हाला आलेले काही प्रतिसाद "मनापासून" लिहिलेले आहेत हे तुम्ही ज्या क्षणी कबूल केलेत त्याच क्षणी तुमची आकलनक्षमता कळाली.
असो. देव तुमचे भले करो.
14 Aug 2013 - 5:09 pm | धन्या
आता हसावं की रडावं हेच मला कळत नाही.
14 Aug 2013 - 6:32 pm | संजय क्षीरसागर
तुमचा सर्व लेख या विधानाला दुजोरा देणारा आहे आणि तिथे बाळ सप्रे आणि मी दिलेल्या प्रतिसादांना उत्तर देण्याची जवाबदारी तुम्ही स्विकारली आहे.
तुम्हाला सोयीचं वाटेल ते करा, आता तो तुमचा प्रश्न आहे.
14 Aug 2013 - 11:44 pm | धन्या
मी प्रतिसादात काहीही लिहिलं तरी तुमच्यावर त्याचा शष्प परिणाम होणार नाही हे मला माहिती आहे. तरीही या प्रतिसादाच्या निमित्ताने माझी प्रतिवाद करण्याची हौस भागवून घेतो.
माझा चमत्कारांवर विश्वास नाही. त्यामुळे ज्ञानदेवांबद्दल नितांत आदर असूनही मला त्यांच्या नावावर सांगितले जाणारे सारे चमत्कार हे दंतकथा वाटतात. अगदी त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी भगवदगीतेवर नऊ हजार ओव्यांची टीका लिहिणं हा सुद्धा माझ्या दॄष्टीने चमत्कार नाही. तो त्यांच्या प्रगल्भ बुद्धीमत्तेचा, त्यांच्या आई-वडीलांच्या त्यांच्यावरील संस्कारांचा आविष्कार होता.
मग मी ती सच्चिदानंद बाबांची गोष्ट का लिहिली?
माझ्या वाचनाची रेंज खुप मोठी आहे. अध्यात्म, मानसशास्त्र आणि सजीवांची उत्क्रांती हे त्यातले प्रमुख विषय आणि त्या अनुषंगानं देव, धर्म, पुनर्जन्म, फलज्योतिष असं खुप काही मी वाचत असतो. नुकताच मृत्यूसमीप अनुभव (नियर डेथ एक्स्पेरियन्स) या विषयावर वाचन झालं. मृत्यूसमीप अनुभव ही गोष्ट सर्वसामान्यांना जरी चमत्कार किंवा अतिंद्रीय वाटली किंवा तो स्वर्ग, नरक वगैरे बाबींचा पुरावा वाटली तरी विज्ञानाने या अनुभवांची उकल केली आहे. मानवी शरीरात काही विशिष्ट संप्रेरके टोचून कृतिमरीत्या असा अनुभव देण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले आहेत.
मी या दोन बाबींची म्हणजेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट आणि मृत्यूसमीप अनुभव संगती लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि असे असले तरीही त्या लेखात मी कसलाच दावा केलेला नाही. तुम्ही "कोट" केलेली वाक्ये ही मला माहिती असलेल्या किंवा मी येथे लिहिलेल्या सच्चिदानंद बाबांच्या गोष्टीमधील आहेत. ती वाक्ये म्हणजे माझे मत नाही. तसेच सच्चिदानंद बाबांची गोष्ट हा नियर डेथ एक्स्पेरियन्स होता असंही माझं मत नाही. तसं काही असू शकेल असा माझा फक्त अंदाज आहे.
विश्वाच्या अफाट पसार्याचं पुर्णतः आकलन होणं हे मानवी बुद्धीच्या कुवतीच्या पलिकडचं आहे. मला सर्व समजलंय असं कुणी म्हणत असेल तर तो त्या व्यक्तीचा भ्रम आहे.
15 Aug 2013 - 2:00 am | संजय क्षीरसागर
प्रतिसाद दिला आहे
14 Aug 2013 - 7:30 pm | प्रभाकर पेठकर
परदेशी परिपक्व मानसिकतेचे दर्शन झोम्बी, ओमेन, नॉन्स्ट्रडॅमस, एक्झॉर्सिस्ट वगैरे वगैरे अनेक चित्रपटांमधून, त्यांच्या सिक्वल्स मधून, कादंबर्यांमधून अनेकदा झाले आहे. येशूच्या कथेतही अशी कांही उदाहरणे असणारच. मी बायबल वाचलेले नाही त्यामुळे त्यावर अधिकारवाणीने भाष्य करू शकत नाही. पण मला खात्री आहे. जिथे भूतखेतांच्या कथा चविने वाचल्या-पाहिल्या जातात तिथे देवादिकांचे चमत्कार अस्तित्वात नाहीत असे म्हणणे भाबडेपणाचे ठरावे.
14 Aug 2013 - 5:30 pm | मोदक
संक्षी - एक अनाहूत सल्ला देतो. तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात बराचसा डिसकनेक्ट जाणवतो आहे. आक्रस्ताळेपणा, बालीशपणा, मुद्दे सोडून भरकटणे, कै च्या कै तर्क मांडणे वगैरे वगैरे.
अंतर्जालावर येवून तुम्हाला यावर उत्तर मिळणार नाही उलट तुमचे प्रश्न वाढत जातील प्रश्न वाढले नाहीत तर तुमचे मनस्वास्थ्य नक्की हरवेल.
या सर्व प्रश्नांवर एखाद्या तज्ञाची मदत घ्या.
अहो हा समाज कीर्तनाने सुधारणार नाहीये आणि तमाशाने बिघडणार नाहीये - मग तुम्ही तुमची विचारसरणी रेटून काय फरक पडणार आहे..?? बर्र.. तुम्ही हे जे काही विचार रेटताय त्यात तुमचे स्वतःचे सातत्य नाहीये. तुमचे जे कोणी अनुयायी असतील / होतील त्यांच्याकडून सातत्याची अपेक्षा ठेवणे जरा जास्ती होत नाही का..??
ट्रायल बॅलन्समध्ये घोळ असताना बॅलन्सशीट टॅली होईल का..??
तुम्ही सत्य आहात - नो वन इस डडिनाईंग दॅट बट अॅट द सेम टाईम हॅव करेज टू फेस, अॅक्सेप्ट अँड डायजेस्ट एनी निगेटिविटी बिकॉज ऑफ यूअरसेल्फ!!
प्लीज विचार करा. सल्ला वैयक्तीक वाटल्यास मी काही करू शकत नाही. घेणे न घेणे तुमच्या हातात आहे.
धन्यवाद.
14 Aug 2013 - 6:14 pm | संजय क्षीरसागर
माझ्या वरच्या प्रतिसादात सगळं आलं आहेच, आता पुन्हा तुमच्यासाठी वेळ व्यर्थ घालवत नाही.
14 Aug 2013 - 6:38 pm | प्रसाद गोडबोले
मस्त बॅटींग चाललीये ...
14 Aug 2013 - 7:12 pm | मोदक
:-))
यूअर टर्न नाऊ!! :))
14 Aug 2013 - 11:04 pm | प्रसाद गोडबोले
आम्ही बॉल टाकलेला ... हे पहा ...http://www.misalpav.com/comment/502398#comment-502398
पण बहुतेक त्यांना तो बाऊंन्सर गेला असावा किंवा त्यांनी लेफ्ट ओव्हर केला असावा ... किंवा ते बोल्ड झाले असावेत
असो ... नेक्स्ट टाईम ;) =))
14 Aug 2013 - 8:18 pm | उन्मेष दिक्षीत
सर, अगदी पहिल्या लेखामधला (१. अध्यात्म : पूर्वभूमिका ) डिस्क्लेमर (?)
हा मेन भाग आहे
इथे आधी टाकायला हवा होता असं वाटुन गेलं. तरीही गोंधळ कमी झाला असता कि नाही हि श़ंकाच आहे !
बाय द वे , मी वाचतो आहेच.
जसं पोहण्यात काय मजा आहे हे आधी पाण्यात उडी मारुन तरंगायला शिकल्याशिवाय कळत नाही तसं लेखांमधल्या गोष्टी पेशन्स ठेवुन करुन पाहील्याशीवाय , जे लिहिलंय ते अॅट लीस्ट पडताळुन पाहील्याशीवाय ( इच्छा/इंटरेस्ट असेल तर ) त्यातुन नेमका काय फायदा होईल किंवा खरोखरच फायदा होइल की नाही हे समजणार नाही.
धन्यवाद आणि आभार
उन्मेष
14 Aug 2013 - 9:17 pm | प्रभाकर पेठकर
जे लिहिलय ते आधी कळले तर पाहिजे नं!
दुसर्याला कमी न लेखता, त्याची मानसिकता, आकलनशक्ती, त्याचा नुसत्या पाठांतरावर आधारीत व्यवसाय आदी गोष्टींवर नकारात्मक आणि अपमानकारक शेरेबाजी आणि शब्दप्रयोग टाळून आपल्याला जे म्हणायचे आहे ते स्वच्छ आणि सोप्या भाषेत मुद्देसुदपणे मांडले, शंका विचारणार्यांना शब्दांच्या घोळात न भरकटवता जर त्यांना समजेल अशा मोजक्या शब्दांत त्यांचे शंका निरसन केल्यास, आपला वरील मुद्दा विचारार्ह ठरू शकतो.
आदर हा मागुन मिळत नसतो तो कृतीतून मिळवावा लागतो. मीच सर्वज्ञ आणि मीच दिपस्तंभ ही भूमिका सोडून वाचकाच्या पातळीवरून खेळीमेळीच्या वातावरणात, किमान दुसर्याला कमी न लेखता कांही बोधामृत पाजले तर त्याचा स्विकार नक्कीच होऊ शकतो.
मिपावर ज्ञानामृताचे कण वेचता येतील असे अनेक धागे येतात. लोकं वाचतात सहमत/असहमत होतात पण ह्या 'भ्रमरा' इतके घाऊक पातळीवर नाकारले जात नाहीत. त्या चांगल्या लेखांचा अभ्यास करून नंतर सोप्या भाषेत आपले विचार मांडले तर मिपा सदस्य नक्कीच त्या विचारांकडे आदरयुक्त नजरेने पाहतील.
14 Aug 2013 - 9:33 pm | लंबूटांग
@उन्मेष दिक्षीत:
तुमची तुलना जरा चुकते आहे.
एक म्हणजे इथे काही लोकांना तरंगता येते आहे आणि बहुधा त्यांना तेवढेच हवे आहे पण संक्षी त्यांना तुम्ही सरळ नं पोहता बटरफ्लाय स्ट्रोकच मारून पोहा असे सांगतायत. इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत.
दुसरे म्हणजे असेही काही लोक आहेत ज्यांना पोहायची गरजच वाटत नाहीये. पण संक्षींच्या लेखनाचा सूर असा आहे की सर्वांनाच पोहायचे आहे आणि त्यांनी बटरफ्लाय स्ट्रोक मारूनच पोहले पाहिजे. बरं ज्यांनी विचारले की तुम्ही म्हणताय बटरफ्लाय स्ट्रोक मारून असे होते आणि तसे होते पण मग आमच्या पद्धतीनेही तर तेच होतेय तर त्यांना परत हीन लेखले जातेय. किंवा जर एखाद्याला वाटत असेल की ह्या पद्धतीने त्यांचे सुरळित चाललेले तरंगणे डळमळीत होईल तर त्यांना खात्री नं देता अजूनच शब्दांच्या जाळ्यात अड्कवणे सुरू आहे.
अथवा माझ्यासारखे काही जे त्यांना ह्या बटरफ्लायच्या तंत्रात काही गड्बड आहे असे विचारतायत त्याकडे ते सोयीस्कर पणे दुर्लक्ष करतात.
त्यामुळे लोक पडताळण्याच्या फंदातच पडत नाहीत.
14 Aug 2013 - 8:36 pm | रामपुरी
"मला चढलेली नाही" हे पुनः पुनः सांगणार्या माणसालाच सर्वात जास्त चढलेली असते. तसंच "मी निश्चिंत आहे" हे पुनः पुनः सांगणाराच सर्वात जास्त अस्वस्थ असतो. तो स्वतःच्या मनालाच हे बजावत असतो "निश्चिंत रहा, अस्वथ होऊ नकोस" =))
14 Aug 2013 - 10:28 pm | तत्सत
आणि निखळ मनोरंजनाचा हा ठेवा वाचनखुणेत साठवला.
एकिकडे शब्दांच्या नवनव्या व्याख्या काय, कोलांट्या काय, लोकांना (स्व)अध्यात्मसाक्षर करून सोडायचेच यासाठी चाललेले भगिरथ प्रयत्न तर दुसरीकडे मूढ, अजाण जनसामान्य. काय होणार या जगाचे? इथे एक माणुस जबरीने आपला अनुभवामृत जबरीने गळी उतरवत आहेत, आणि इथे सगळे नाहीऽऽऽ,नकोऽ म्हणताहेत! का? का? का?
14 Aug 2013 - 11:15 pm | दशानन
छे!
या मिपाकरांना एवढे मोठे गिफ्ट दिले.. पण छे.. करंटेच हे त्यांना काही अप्रुपच नाही ;)
15 Aug 2013 - 1:11 am | उन्मेष दिक्षीत
मला वेगळंच सांगायचं होतं ..
मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत ! मला स्वत:ला त्यांचा वैयक्तिक गायडन्स मिळाला आहे ! माझ्या लेखांशी रिलेटेड असलेल्या अगदी साध्या प्रश्नांपासुन पर्स्नल प्रॉब्लेम साठी ही त्यांचा गायडन्स मला आजही आहे !
मी जेव्हा गोंधळ म्हणालो, तेव्हा मला धाग्यावरचे प्रतिसाद आणि बाकीचं कन्फयुजन म्हणायचं होतं.
मला स्व्तःला फायदा झालाय .. अगदी पहील्या लेखांपासुन ची वाक्य अन वाक्य माझ्यासाठी मोलाची आहेत !
काय फायदा झाला, कशा पद्धतीनं झाला, या करुन बघण्याच्या आणि अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. ते असं नाही सांगता येणार.
म्हणुनच मला हा पार्ट महत्वाचा वाटतोय.
@संजय सर,
थँक्स. मला माहीत नाही हे मी लिहायला हवं होतं की नाही तुमच्या परवानगीशीवाय, पण मला गरजेचं वाटलं आणि लिहीलं
धन्यवाद,
उन्मेष
15 Aug 2013 - 3:57 am | लंबूटांग
मीही त्यांचे लेख वाचतो. आणि ज्या काही शंका असतील त्या विचारतो. त्यांना ते उत्तरे देत नाहीत.
तुम्हाला फायदा झाला, तुमच्यासाठी ही वाक्य मोलाची आहेत, मान्य.
मी वर लिहील्याप्रमाणे संक्षींच्या पद्धतींचा/ अनुभवाचा/ गायडन्सचा फायदा होणारच नाही असा दावा कुठेच केलेला नाही. तुम्हाला बहुधा त्या वेळेस/ अजूनही त्याची गरज होती/ आहे इतर पद्धती तुमच्यासाठी उपयोगी पडत नव्हत्या/ नाहीयेत म्हणून तुम्ही अनुभवण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांन गरज नसेल तर/ त्यांच्यासाठी इतर पद्धती उपयोगी पडत असतील तर माझीच पद्धत श्रेष्ठ हा दावा का? किंवा एखाद्याने जर त्याच्या पद्धतीचे उदाहरण दिले तर त्याला मूर्खात काढायची गरज काय?
एक विचारतो, तुम्हाला तुम्ही सत्य आहात हे कळले आहे तर मग आजही त्यांचा गायडन्स कशाला लागतो? लेखावरून तर असे वाटते की एकदा तुम्ही सत्य आहात हे कळले की सर्व प्रॉब्लेम्स संपतात आणि आयुष्याची मजा येते.
15 Aug 2013 - 8:48 am | कवितानागेश
मी स्वतः २०१० पासुन सरांचे सगळे लेख वाचलेत >
सेम पिंच. त्यांचे मनोगतावरचे सगळे ६०-६५ लेख मीदेखिल वाचलेत.पण गम्मत अशी आहे की त्यांचे इतर संस्थळांवरचे देखिल वाचलेत. शिवाय त्यांच्या सगळ्या प्रतिक्रियादेखिल वाचल्या आहेत. तुमचा अभ्यास कमी पडतोय की काय अशी शंका आहे.
त्यांच्या लेखांशिवाय इतर पुष्कळ ओरिजिनल वाचन केलेले आणि आयुष्याचा खोलवर अनुभव घेतलेले अनेक आयडी इथे आहेत. पण ते असं प्रत्येक गोष्टीला तुच्छ लेखण्याचे प्रकार करत नाहीत. आपला अनुभव मांडून मोकळे होतात.
आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला.
एक सुचवणी: तुम्हीच का लिहित नाही लेख तुमच्या अनुभवावर? तुमचा लिहिण्याचा टोन फार सभ्य आहे. बरं वाटतय वाचायला.
15 Aug 2013 - 11:18 pm | उन्मेष दिक्षीत
@लंबूटांग
>> मी मला सत्य समजलंय असा दावा केलेला नाही.
@लीमाउजेट
थँक्स फॉर धीस :) -
>> मला काही लिहिता आलं असतं तर लीहिलं असतं आत्तापर्यंत. आणि मला काय अनुभव आलेत किंवा नाही हे मला क्लेम नाही करायचंय इथं.
माझा उद्देश हे सांगणं होता ,
मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील.
जर मला अगदी पुर्णच नाही कळाला किंवा पटला आणि लेख हा जर लेखकाचा अनुभव आहे पण मला याच्याबद्दल डाउट आहे तरीही मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा ?
बर, माझ्या पद्धती या लेखातल्या पेक्षा वेगळ्या असतील (टेक फॉर इन्स्टन्स नामस्मरण) आणि माझ्यासाठी जर ती वर्क होत असेल तर वेल अँड गुड. इन दॅट केस आय डोन्ट नीड टु डिफेंड एनीथींग हीअर. माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही. मी मग लेखातल्या पद्धती एक तर काहीतरी नवीन आहे म्हणून ट्राय करुन वेरिफाय करू शकतो, किंवा मी माझ्या सध्याच्या पद्धतीने कधीही कंटीन्यु करुच शकतो, इथं कुणाला काय कंपल्शन आहे ? प्रत्येक जण ठरवू शकतोच की काय करायच काय नाही.
पण जर माझ्याकडे नुसती माहीती आहे दोन्ही पद्धतींबद्दल आणि दोन्हीही मी करून नाहीत बघीतल्या (भलेही कुणीही सांगीतल्या असल्या तरीही )तर मग मी कसं ठरवु शकतो कि ही पद्धत चांगली कि ती ?
अशावेळी लेख पटणं किंवा न पटणं याचासुद्धा प्रश्न रहात नाही. मग मला काय पर्याय उरतो ?
16 Aug 2013 - 1:42 am | रामपुरी
आता याचा विचार करून पहा.
"मला एखादा लेख जर कळाला, पटला, (अगदी संपुर्ण नाही तरी) तर लेखाच्या अनुशंगाने मला प्रश्न विचारता येतील."
जर लेखक प्रत्येक प्रश्नाला सरळ उत्तर न देता तुमच्या आकलनक्षमतेविषयी शंका उपस्थित करत असेल मीच किती मोठा हे दाखविण्याचा प्रयत्न करत असेल आणि अडचणीचे प्रश्न सरळ कबुली न देता टाळत असेल तर?
"मी लेख / लेखकावर टीका करुन माझं दुसरं मत अगदी हीरिरीने मांडलं तरीही कुणाला काय उपयोग त्याचा "
हाच न्याय लेखाला लावला तर लेख लिहिण्याचे प्रयोजनही उरत नाही हे पटतं काय?
"माझी पद्धत तुच्छ लेखली गेली आहे असं मला वाटायचा प्रश्नच येणार नाही"
प्रत्येक वेळी आपली रेषा मोठी आहे असं भासविण्यासाठी दुसरी लहान आहे हे पुनःपुनः ठळकपणे सांगण्याची गरज असते का?
"इथं कुणाला काय कंपल्शन आहे "
प्रत्येक वेळी लेखकाकडून अशी जबरदस्तीचीच भूमिका घेतली जात असेल तर? (उदा. तुम्ही नामस्मरण करता मग तुम्ही वेळ व्यर्थ घालवत आहात)
याचे पुरावे लेखकाच्या सगळ्या प्रतिसादात आढळतील. ते शोधून दुवे देण्यात वेळ घालवणे शक्य नाही. असो...
माझ्या समजुतीप्रमाणे इथे लेखाला किंवा लेखातील विचारांना विरोध होण्यापेक्षा त्याचा मांडणीला जास्त विरोध होत आहे. लेखक लेखात आणि प्रतिसादात जी भाषा वापरतो त्याला विरोध आहे. "मी काहीही लिहीन कुणालाही काहीही बोलेन पण कुणीही प्रतिवाद करायचा नाही की विरोधी शब्द काढायचा नाही. सगळे माझ्यासमोर तुच्छ आहेत" या वॄत्तीला विरोध आहे. बघा पटतंय का...
16 Aug 2013 - 12:56 am | Nile
कोणते प्रतिसाद सर्वात जास्त करमणूकीय आहेत याची यादी द्यारे कोणीतरी. साला इतक्या प्रतिसादात शोधायचं म्हणजे अवघड आहे!
16 Aug 2013 - 3:27 am | बॅटमॅन
धागाकर्त्याचे प्रतिसाद सर्वांत जास्त विनोदी आहेत. कुठलेही असोत मग.
16 Aug 2013 - 1:41 am | संजय क्षीरसागर
सार्या आंतरजालीय दुनियेत मला प्रत्यक्ष (आणि ते सुद्धा फक्त एकदाच) भेटलेला, केवळ एक माणूस आहे - उन्मेष दिक्षीत!
अँड आय एम रियली थ्रील्ड! वॉट अ ट्रान्सफॉर्मेशन! इतक्या प्रत्यक्ष पुराव्याची मी कधी कल्पना देखील केली नव्हती.
बाय द वे, उन्मेष; इथे माझ्यावर मुख्य आरोप इतरांना तुच्छ लेखणं असा आहे. इंटरनेट असं माध्यम आहे की जिथे सगळं तारीख, वार आणि घटनाक्रमानं उपलब्ध असतं. मी फक्त तीन उदाहरणं देतो म्हणजे नक्की काय प्रकार आहे ते तुझ्या लक्षात येईल.
पहिले सदगृहस्थ (इतकेच नाही तर तरंगणे कसे मूर्खपणाचे आहे हे अतिशय हीन पद्धतीने सांगतायत) वाले, किती विनम्रपणे वागतात हे पहिल्या लेखावरच्या, त्यांच्या पहिल्याच प्रतिसादात बघण्यासारखं आहे :
दुसर्या मॅम (आक्षेप घेतला जातो लिहिण्याचा टोन आणि केलेले दावे याला) म्हणणार्या, किती सुरेख टोनमधे गर्भित अर्थ विचारतात हे देखिल वाचनीय आहे : निराकार ही जाणीवेचीच स्थिर अवस्था आहे >... म्हणजे कोमा का?
तिसरे सर का कावलेत ते तुला, माझा पैसा हा लेख वाचला की लगेच लक्षात येईल.
प्रश्न माझ्या लेखनाचा किंवा प्रतिसादांचा नाही कारण कोणताही व्यक्तिगत, किंवा एखाद्या सदस्याला तुच्छ लेखणारा प्रतिसाद इथे प्रकाशितच होऊ शकत नाही. त्यामुळे त्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. शिवाय इंटरनेटवर कुणीकुणाचं ऐकून घेत नाही.
लोकांच्या धारणा फार लवचिक आहेत आणि लेखन त्या प्रश्नांकित करतं, ही वस्तुस्थिती आहे.
16 Aug 2013 - 2:06 am | लंबूटांग
मग एक वेगळा लेखच लिहावा लागेल.
उदाहरणादाखल खालील प्रतिसाद पहा.
तुम्ही वर ज्या प्रतिसादाची लिंक दिलीये त्यालाच तुमचा प्रतिसाद
हे सर्व तुमचे प्रतिसाद फक्त पहिल्या धाग्यावरच्या प्रतिसादातून वेचून काढले आहेत. बाकीचे ३ धागे शोधलेत तर एक लेख नक्कीच होईल.
16 Aug 2013 - 1:05 pm | संजय क्षीरसागर
ही वस्तुस्थिती आहे आणि त्यात व्यक्तिगत रोख (खरं तर, तुमच्यावर) नाही. तस्मात, उदाहरण रद्द.
हे तुमच्या उपहासाला उत्तर आहे.
यात खरं तर तुमचा काहीही सबंध नाही. पण जे लिहीलंय ते मुद्देसूद आहे.
इथेही तुमचा संबंध नाही पण सोयिस्करपणे, ज्या प्रतिसादाला ते उत्तर आहे त्यातला उपहास तुम्ही वगळला आहे. (त्यांचे स्वतःचे विपश्यनेवरचे लेख इथे प्रकाशित आहेत, त्यामुळे त्यांना अध्यात्मिक टर्म्सची पुरेशी कल्पना आहे. त्या स्वतः संपादिका आहेत त्यामुळे `गर्भित अर्थ' त्या बरोब्बर नियमात बसवतात. या गोष्टी लक्षात घेऊन ते प्रतिसाद वाचले तर नेमका अर्थ कळेल.)
मला वाटतं `आता सुरूवात कोण करतं' हे एकदम स्वच्छ आहे. त्याविषयावर परत चर्चा करण्यात अर्थ नाही.
16 Aug 2013 - 4:02 pm | लंबूटांग
तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन म्हणावेसे वाटते मोठे व्हा.
हे सुरूवात कोण करते आणि शेवट कोण करते वगैरे मी लहानपणी करायचो चुलत मामे बहिणींच्या तक्रारी करताना.
पहिली गोष्ट म्हणजे ही पब्लिक फोरम आहे. तुम्ही लेख सर्वांसाठी लिहीलेत. प्रतिसादही सर्वच वाचतात. ओपन फोरमवर प्रश्न विचारण्याचा आणि प्रतिसाद देण्याचा मुद्दाच हा असतो की पब्लिक ला उपयोग व्हावा. त्यामुळे मला प्रतिसाद दिलेत का अजून कोणाला हा मुद्दा नाही.
मी वर केवळ उदाहरणादाखल काही प्रतिसाद उद्धृत केले. तुम्ही तर मला प्रतिसादच देणे बंद केले आहेत. मधेच एकदा येऊन मला दिलगीरी वगैरेही व्यक्त करायला लावली आहेत. कशाबद्दल ते मलाच माहिती नाही. मनःपूर्वक विचारले तर तुम्ही उत्तरही दिले नाही. त्यामुळे मलाच दिलेले प्रतिसाद कसे लिहीणार.
मुद्दा तुम्ही मला कोणते प्रतिसाद दिले आणि का दिलेत हा नाही, तुम्ही जे सो कॉल्ड प्रूफ दिलेत ना, तर तसेच प्रूफ तुमच्या स्वतःच्या प्रतिसादांत अनेक ठिकाणी आहेत ते दाखवून दिले. इतकेच.
मला तेवढे खोद्काम करत बसायला वेळ नव्हता काल. हापिसात ह्याप्पी अवर असल्याने फुकटचे अॅपटायझर्स आणि बीअर ढोसायला पळायचे होते नाहीतर इतरही ठिकाणचे प्रूफ शोधून दिले असते. पण एकंदरीत आयडीया आली असेल. ते आमचे हापिसवाले स्वच्छंद जगतच नाहीत हो. फक्त ४:३० ते ६:३० या वेळातच या सांगतात. (शेवटची २ वाक्ये ही उपहासात्मक आहेत. कृपया उपहासाचे उदाहरण देण्याशिवाय इतर कसलाही प्रूफ म्हणून कुठेही quote करू नयेत.)
तुमचे जे दावे आहेत ना, की असे वैयक्तिक रोख असलेले प्रतिसाद प्रदर्शितच होऊ शकणार नाहीत, ते मनोगतावर बरोबर आहेत. तिथे प्रदर्शित होण्याआधी फिल्टर केले जातात माझ्या माहितीप्रमाणे. सद्ध्या बदल झाला असल्यास माहिती नाही. पण मिपावर तरी सर्व काही प्रकाशित होते आणि नंतर संपादक फिल्टर करतात. तसे तुमचे कैक प्रतिसाद आणि लेखही उडालेही आहेत. तुम्ही जो मला inferiority complex आहे असा लिहीलेला प्रतिसाद देखील उडाला आहे बहुतेक.
असो. आता माझ्या लिंकवलेल्या प्रतिसादाबद्दल २ गोष्टी.
बादवे. हा आणि इतर सर्व प्रतिसाद म्हणजे त्या पहिल्या लेखातच लिहील्याप्रमाणे सध्या हातात प्रचंड मोकळा वेळ आहे ह्याचा प्रूफ समजावा.
अवांतर: तुमची दुसर्या कोमा वाल्या प्रतिसादाची लिंक चुकली आहे. माझ्याच प्रतिसादाला जातेय.
18 Aug 2013 - 11:02 am | lakhu risbud
आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्म्ना I
आत्मैव आत्मनो बंधू आत्मैव रिपुरात्म्ना I
आध्यात्माच्या क्षेत्रात पाऊल टाकताना पहिला धडा असतो
Let it go.
ज्याला ज्ञान मिळविण्याची आस आहे तो योग्यते प्रमाणे गुरु शोधतो
गुरु शिष्याला शोधून हे ज्ञान घे, हेच ज्ञान घे असे नाही सांगत.
18 Aug 2013 - 12:57 pm | भ ट क्या खे ड वा ला
विपश्यना हा साधना प्रकार सुध्द्दा असाच काहिसा आहे
16 Feb 2016 - 7:11 pm | होबासराव
____/\____