सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
16 Sep 2008 - 9:19 pm | अभिज्ञ
थोडे चित्र मोठे करता येइल का?
बहुतेक पु.ल. व भीमसेनजी आहेत.
अजून काहि माहिती दिलीत तर बरे होइल.
अभिज्ञ.
16 Sep 2008 - 10:14 pm | विसोबा खेचर
चित्र नीट दिसत नाही...
उजवीकडचे अण्णा आहेत का?
16 Sep 2008 - 10:16 pm | यशोधरा
हो, पु. ल. आणि पंडितजीच दिसत आहेत, मोठे चित्र अजून छान वाटले असते बघायला..
16 Sep 2008 - 11:07 pm | चतुरंग
भाईकाका आणि आण्णाच आहेत! (नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का? तुमची मौल्यवान भेट असे म्हणता आहात तर तुम्ही हा काढलेला आहे का? मीनाताई, त्याबद्दलही जरा टिप्पणी असली तर बरे होईल!)
चतुरंग
16 Sep 2008 - 11:54 pm | विसोबा खेचर
धन्यवाद रे रंगा, आता हा फोटू छान दिसतो आहे! :)
(नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का?
सांगतो, सांगतो....! :)
भाईकाकांच्या अमृतमहोत्सवी वर्षी सवाईगंधर्व महोत्सवात अण्णांच्या हस्ते भाईकाकांचा सत्कार झाला त्यावेळचा हा फोटू आहे. मला त्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचं भाग्य लाभलं आहे!
भाईकाका हे सवाईगंधर्व महोत्सवाच्या अगदी सुरवातीपसूनचे साक्षिदार. अण्णांनी १९५२ साली जेव्हा हा महोत्सव सुरू केला तेव्हा त्यात भाईकाकांचा मोलाचा वाटा अन् पुढाकार होता.
सत्कारसमारंभाला उत्तर देतांनाच्या भाषणादरम्यान भाईकाकांनी सांगितलेली आठवण.. (त्यांचे शब्द आता अचूक आठवत नाहीत,)
भाईकाका म्हणाले होते,
"सवाईगंधर्व महोत्सव जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यात जवळजवळ अर्धा डझन देशापांडे होते. वसंतराव देशपांडे, पु ल देशपांडे, दत्तोपंत देशपांडे इत्यादी! तेव्हा काही खवचट पुणेकर म्हणाले होते की या देशपांडे मंडळींनी स्वत:ला पुढे पुढे करायला मिळावं म्हणून केवळ हा उत्सव सुरू केला आहे झालं! दुसरं काही नाही!"
पण रसिकहो, आज हा महोत्सव इतका मोठा झाला आहे की आम्ही केवळ पुढे पुढे करण्याकरता ह्या महोत्सवाची सुरवात केली नव्हती हे आतातरी पुणेकरांनी लक्षात घ्यावं!" :)
भाईकाकांच्या सत्काराआधी तिथे नुकतंच अश्विनी भिडे-देशपांडेचं गाणं झालं होतं. तोच धागा पकडून भाईकाका पुढे म्हणाले,
आत्ताच आपण सर्वांनी अश्विनीचं गाणं ऐकलं. किती छान गायली अश्विनी! हे पुन्हा ती केवळ एक 'देशपांडे' आहे म्हणून मी म्हणत नाहीये बरं का! :)
असं म्हणून भाईकाकांनी आपल्या नेहमीच्या थाटात हशे-टाळ्या घेतल्या.. :)
आपला,
(सवाईगंधर्व महोत्सवाच्या खूप आठवणी बाळगून असणारा!) तात्या.
17 Sep 2008 - 9:26 pm | mina
चतुर॑गजी आपण बरोबर म्हणालात..नुसता फोटो डकवण्यापेक्षा, हा कोणत्या सवाई गंधर्वच्या वेळचा आहे? ह्या फोटोचा काही वेगळा इतिहास आहे का? हे माहीत असणे गरजेच॑ असत.जे मी दिले नाही,चुकच झाली. हा फोटो मला २००७ मधील सवाई गंधर्वच्या छायाचित्र प्रदशनात मिळाला आहे. ४ फेब्रुवारी २००८ रोजी अण्णा॑ना जन्मदिनाच्या शुभेच्छा द्यायला गेले,तेव्हा मला साक्षात स्वराधिराजा॑चा (अण्णा॑चा) आशि॑वाद मिळाला.माझे सौभाग्य की मला साक्षात स्वराधिराजा॑चे चरण स्पश॑ करता आले. अण्णा॑ची कोणती ही आठव ण माझेसाठी माझी मौल्यवान भेट राहील. ८ डिसे॑बर २००७ ला 'रस के भरे तोरे नैन' ही ठुमरी सादर केली..तेव्हाचे छायाचित्र खास आपल्यासाठी.हा फोटो मी काढला नाही.
17 Sep 2008 - 9:30 pm | चतुरंग
तुम्हाला आण्णांचे आशीर्वाद मिळालेले वाचून आनंद झाला!
चतुरंग
16 Sep 2008 - 11:56 pm | यशोधरा
खुसखुशीत आठवण! :)
17 Sep 2008 - 12:25 am | केशवराव
तात्या, मी पण या प्रसंगाचा साक्षीदार आहे. अशी दिग्गज व्यक्तीमत्वें एकाच व्यासपिठावर पहायचे दिवस गेले. फक्त आठवणींच रहातात. अश्वीनी त्यावेळी बागेश्री गायली होती. 'सवाई गंधर्व ' चा वारकरी -- केशवराव.
17 Sep 2008 - 12:36 am | विसोबा खेचर
अशी दिग्गज व्यक्तीमत्वें एकाच व्यासपिठावर पहायचे दिवस गेले. फक्त आठवणींच रहातात.
खरं आहे....
अश्वीनी त्यावेळी बागेश्री गायली होती.
करेक्ट..!
अवांतर - अश्विनी तशी गुणी आहे. तयारी चांगली आहे, आवाज छान आहे, गाण्यात भाव आहेत. परंतु तरीही तिचं गाणं कॅल्क्युलेटेड वाटतं. तिनं थोडी क्रिसच्या पुढे येऊन बॅटिंग केली पाहिजे. अजून मजा येईल...
तात्या.