...आता एक घाव दोन तुकडे केल्यावर,
आपापल्या वाट्याचा रक्तबंबाळ तुकडा
जगापासुन लपवणे आलेच !
सोबत ठिबकणाऱ्या आठवांचा ओला हुंदका
आतल्याआत पोसणे आलेच..
य़ापेक्षा
जपली असतीस नात्याची अडखळती धडधड,
दिले असतेस थोडे श्वास ,
फुंकला असतास थोडा प्राण !
अगदिच वटवृक्ष झाला नसता,
खुरटेच ऱाहिले असते झाड ...तरिही ,ते फक्त तुझे नि माझे !
... आता
य़ा कलेवऱाचे दरक्षणी श्राद्ध करणे आलेच...!
डॉ. सुनील अहिरऱाव
प्रतिक्रिया
7 Jul 2013 - 1:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टरसाहेब, छान कविता. आशय भावला.
-दिलीप बिरुटे
7 Jul 2013 - 1:45 pm | स्पंदना
कवितेतल्या भावाशी सहमत!
7 Jul 2013 - 3:28 pm | संजय क्षीरसागर
लिहीत राहा.
7 Jul 2013 - 3:58 pm | अत्रुप्त आत्मा
+१
8 Jul 2013 - 8:04 pm | निनाव
waah! khoopach chhaan! avadali kavita.
8 Jul 2013 - 10:41 pm | इन्दुसुता
डॉक्टरसाहेब, छान कविता. आशय भावला.
अगदी सहमत.
9 Jul 2013 - 12:31 pm | drsunilahirrao
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे,अपर्णा अक्षय ,संजय क्षीरसागर,अतृप्त आत्मा, निनाव, इंदुसुता
मनापासून आभार !
9 Jul 2013 - 12:51 pm | गंगाधर मुटे
आशयघन कविता. :)