ओझर्डे धबधबा

स्वानंद मारुलकर's picture
स्वानंद मारुलकर in कलादालन
11 Aug 2010 - 3:58 pm

कोयनानगरहून 'नवजा'ला जाताना कोयनानगरपासून ९ किमी अंतरावर ओझर्ड्याचा मोठा धबधबा आहे. १ ऑगस्टला इथे गेलो होतो.

इथे जाताना अजून दोन मोठ्ठे धबधबे लागतात. पण यांच्या मोहात फार न पडलेलंच बरे... कारण खरे आकर्षण तर पुढे आहे.

(धबधबा क्र. १)

(धबधबा क्र. 2)

उजव्या बाजूला पसरलेला 'शिवाजी सागर'...

वळणावळणाचा रस्ता मागे टाकत आपण मुख्य धबधब्याला पोचतो. याला 'पंचधारा' असेही म्हणतात. का ते खालच्या फोटोवरून समजेल. :)

धबधब्याच्या डाव्याबाजूने एक वाट जाते, ती थेट त्याच्या तळाशी, जिथे वरून जोरदार पाणी पडत असते तिथे घेउन जाते.

वाटेवरून दिसणरे फेसाळते पाणी

पंधरा-वीस मिनीटे चालल्यावर आपण धबधब्याच्या तळाशी पोचतो. इथं पोचल्यावर जे काही वाटते त्याचे काय वर्णन करावे...पूर्ण वेळ धबधब्याचे पाणी वरून पडत असते, तुषार तर इतके असतात की वरून पडणारे पाणी पाहाताना डोळे उघडेच राहात नाहीत.

कितीही काळजी घेतली तरी सोबत आणलेले सगळे काही इथे भिजते... तेव्हा काळजी सोडावी आणि मनसोक्त भिजावे. :)

टीपः मिपावर पहिल्यांदाच लिहतो आहे. सांभाळून घ्या.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

अमोल केळकर's picture

11 Aug 2010 - 4:03 pm | अमोल केळकर

नवीन जागेची मस्त माहिती
धन्यवाद

अमोल केळकर

भिरभिरा's picture

11 Aug 2010 - 5:01 pm | भिरभिरा

कलादालन माझा आवडता विभाग .सर्वच फोटो खुप छान.
मीपावरील चांगल्या सुरुवातिबद्दल आपले अभिनंदन.
असेच येउन जाउदे..

जिप्सी's picture

11 Aug 2010 - 5:37 pm | जिप्सी

पैल्याच दणक्यात १००,जबर्‍या . आम्हाला पण सांगा राव असल्या मस्त जागा !

सुहास..'s picture

12 Aug 2010 - 8:51 am | सुहास..

हे लाव्हारसाचे कठीण कातळ
त्यावर नाजुक हिरवाई....
गहाण पडलंय काळीज आपलं
सह्यकड्यांच्या पायाशी! >>>>

अगग !!

पदापर्णातच शतक !! मस्त रे कांबळे !!

..जंगली जयगडहून नवजा,कोयनानगर, हेळवाकमार्गे भैरवगडला जातांना हा ओझर्डा ओझरत्या पाण्याचा दिसलेला. आमच्यातल्या एकाने वाटाड्याला विचारलं 'हा धबधबा १२ महिने नसतो?' ..त्यावर वाटाड्या- ' धबधबा १२ महिने असतो पण त्याला पाणी फक्त ५ महिने असतं..!'?????????? :) :-) :smile:

बहुगुणी's picture

11 Aug 2010 - 8:43 pm | बहुगुणी

आणखी येउ द्यात!

बेसनलाडू's picture

11 Aug 2010 - 8:45 pm | बेसनलाडू

लागलीच या ठिकाणी भेट द्यावी असे वाटू लागले आहे.
(भटक्या)बेसनलाडू

ऋषिकेश's picture

11 Aug 2010 - 11:50 pm | ऋषिकेश

अहाहा! काय जागा आहे यार!
मस्त!
येऊदेत अश्या जागांची माहिती

हेच म्हणतो, जबरा जागा आहे, येउद्या अजुन.

मदनबाण's picture

12 Aug 2010 - 4:53 am | मदनबाण

झकास्स्स्स्स... :)

jaypal's picture

12 Aug 2010 - 9:53 am | jaypal

चिंब भिजलो

जागु's picture

12 Aug 2010 - 12:01 pm | जागु

सुंदर.

स्पंदना's picture

13 Aug 2010 - 1:42 pm | स्पंदना

किती वेळ गेला एखादी सुरेख उपमा शोधण्यात, पण एक ही नाही मिळाली , जी; या सुन्दर फोटोंच, तितकच सुन्दर वर्णन करु शकेल.
सांगु? तुषार इथवर आले.
शब्दातित फोटो. विलोभनिय, ते तुषार उडुन वातावरणात तयार झालेले ढग तर अगदी तिथ्थ घेवुन गेले.
आप डालते रहो हमे भी सफर हो जायेगी ।

स्वानंद मारुलकर's picture

13 Aug 2010 - 9:57 pm | स्वानंद मारुलकर

छान छान प्रतिक्रीयांसाठी सर्वांचे आभार..

बाकी सारी निसर्गाची किमया. :)

कपिलमुनी's picture

25 Jun 2013 - 4:14 pm | कपिलमुनी

यंदा पावसाळ्यात जाण्यासारखी जागा आहे

garava's picture

25 Jun 2013 - 7:15 pm | garava

फोटो मस्तच..