वाळूचे वादळ हा खरंच भयानक प्रकार असतो. अगदी पुळणीसारख्या बारीक ते गोट्यांएवढ्या मोठ्या वालुकणांचा (गारांसारखा) सपाटून मारा चालू असतो. असल्या मोठ्या वादळात चारचाकी अडकली म्हणजे तिचे केवळ भंगारात रुपांतर होते. गाड्या पाईल-अप होतात त्याचे कमी दिसणे हे जेवढे कारण असते तेवढेच (किंवा किंचीत जास्तच) पुळणीसारखी अतीबारीक कोरडी वाळू रस्त्यावर पसरणे हेही असते... ही वाळू अगदी चिकणमातीच्या चिखलाइतकी निसरडी असते.
जबरदस्त.
'मिशन इम्पॉसिबल - घॉस्ट प्रोटोकॉल' मध्ये असे वादळ पाहिले आहे. इतके भयानक वाळूचे वादळ प्रत्यक्षात असूच शकत नाही असे वाटले होते पण आज हे वादळाचे फोटो पाहून अचंबित झालोय.
हो=लुप्त झालेल्या भाषेतील शब्द (भाषेचे नावही लुप्तच आहे.) अर्थः- -च्या पलीकडचा/वरचा.
इमहोटेप पृथ्वीवर पहिल्यांदा तुर्कीमध्ये उतरला. नंतर ग्रीसमध्ये गेला आणि नावेतून इजिप्तला आला. मग तू कोण? असे विचारल्यावर त्याने सरमिसळ भाषेत उत्तर दिले की मी पर्वताच्याही वरचा आहे. म्हंजे एलियनच.
जबरदस्त प्रकार दिसतो आहे हा. याविषयी आणखी माहिती, ही वादळे कशी निर्माण होतात, याची पूर्व-सूचना मिळते का, वर्षातून कितीवेळा येतात, याचे काय काय परिणाम होतात, वगैरे?
वातावरण धुसर करण्या इतकी वाळू हवेत पसरवून देण्याएवढी मोठी वादळे सतत होत असतात... वर्षातून १५-२० वेळा तरी. चित्रातल्या प्रमाणे मोठे वादळ वर्षा दोन वर्षातून एकाद्या किंवा कमी वेळा होते. वादळाची काहिशी पूर्वसूचना सॅटेलाईट पिक्चरवरून मिळू शकते पण त्याच्या ताकदीचा अंदाज घेणे कठीण असते. वादळाचा परिणाम म्हणजे वातावरणाचे प्रदुषण वाढते आणि श्वसनाचे विकार असणार्या लोकांना फार काळजी घ्यावी लागते... शक्यतो बाहेर जाणे टाळणे अथवा जरूर असल्यास मास्क घालून जाणे वगैरे. पण एक बरे आहे की वार्याचा वेग कमी झाला की वाळू पटकन खाली बसते... मात्र हे कधी कधी दिवस दोन दिवस होत नाही.
वाळवंटातल्या तापलेल्या वाळूमुळे गरम झालेली हवा वर जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे समुद्रावरची त्यामानाने थंड असलेली हवा त्या पट्ट्यात वेगाने घुसते आणि तिच्या प्रबळ प्रवाहाबरोबर वाळवंटातली वाळू उडू लागते. हे या वादळांचे मुख्य कारण.
श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर? तर त्याचे नशीब फार खराब असे हे नक्की ! अश्या माणसाने गाडीच्या काचा घट्ट बंद करून बसावे आणि मास्क व आपली औषधे बरोबर घेऊनच नेहमी प्रवास करावा हे उत्तम.
प्रतिक्रिया
25 Jun 2013 - 11:31 am | गवि
हे राम... भयंकरच प्रकार आहे हा...
ते अॅक्सिडेंटस द्रुतगती मार्गावर समोरचे न दिसल्यामुळे सीरियल टक्कर झाल्याने घडलेले दिसताहेत.
25 Jun 2013 - 11:43 am | डॉ सुहास म्हात्रे
वाळूचे वादळ हा खरंच भयानक प्रकार असतो. अगदी पुळणीसारख्या बारीक ते गोट्यांएवढ्या मोठ्या वालुकणांचा (गारांसारखा) सपाटून मारा चालू असतो. असल्या मोठ्या वादळात चारचाकी अडकली म्हणजे तिचे केवळ भंगारात रुपांतर होते. गाड्या पाईल-अप होतात त्याचे कमी दिसणे हे जेवढे कारण असते तेवढेच (किंवा किंचीत जास्तच) पुळणीसारखी अतीबारीक कोरडी वाळू रस्त्यावर पसरणे हेही असते... ही वाळू अगदी चिकणमातीच्या चिखलाइतकी निसरडी असते.
25 Jun 2013 - 11:34 am | बॅटमॅन
खत्रा वादळ आहे एकदम!!!!!
अन शेवटच्या फटूमधला सिन्दबाद कोण आहे बरे ;)
25 Jun 2013 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे
तो आहे एक अनामिक सिंदबाद... जो वाळूच्या वादळाला "तोंड" द्यायला आणि मग त्या तोंडाचे लोकांना फोटो काढून द्यायला घाबरला नव्हता !
25 Jun 2013 - 11:52 am | सौंदाळा
बापरे..
ऐकले होते या वादळांबद्दल पण फोटो पहिल्यांदाच पाहिले.
तुम्ही कुठुन काढले हे फोटो?
हवामानखाते आधी काही सुचना देते का या वादळांची?
25 Jun 2013 - 11:54 am | तुमचा अभिषेक
शारजाला सचिनच्या अविस्मरणीय खेळीच्या वेळी हेच आलेले ना... सौम्य स्वरुपात !
25 Jun 2013 - 11:56 am | उदय के'सागर
बाप रे असही काही होतं! कमाल आहे निसर्गाची :-|
25 Jun 2013 - 12:01 pm | सुधीर
अल्केमिस्ट मध्ये वाचलेलं simum ते हेच काय? भारी आहे.
25 Jun 2013 - 12:01 pm | सुधीर
अल्केमिस्ट मध्ये वाचलेलं simum ते हेच काय? भारी आहे.
25 Jun 2013 - 12:33 pm | प्रचेतस
जबरदस्त.
'मिशन इम्पॉसिबल - घॉस्ट प्रोटोकॉल' मध्ये असे वादळ पाहिले आहे. इतके भयानक वाळूचे वादळ प्रत्यक्षात असूच शकत नाही असे वाटले होते पण आज हे वादळाचे फोटो पाहून अचंबित झालोय.
25 Jun 2013 - 1:42 pm | कवितानागेश
सिनेमात बघूनच शिकतो आपण बर्याच गोष्टी! ;)
25 Jun 2013 - 1:51 pm | अभ्या..
ममी मध्ये पण होते की. तो टकला पुरोहीत अनक्सनामुन सोबतचा, तयार करत नस्तो का असली वादळे. त्यात त्याचा चेहरा दिसत असतो
25 Jun 2013 - 2:12 pm | बॅटमॅन
+१०००००००००००००.
इम्होटेप! इम्होटेप!! इम्होटेप!!!
5 Sep 2013 - 5:46 pm | मालोजीराव
इम्होटेप एलियन होता काय?
5 Sep 2013 - 6:36 pm | बॅटमॅन
हो नैतर काय. इमहोटेप= इमे हो तेपे.
इमे=मी आहे (ग्रीकमध्ये).
तेपे=पर्वत (तुर्कीमध्ये).
हो=लुप्त झालेल्या भाषेतील शब्द (भाषेचे नावही लुप्तच आहे.) अर्थः- -च्या पलीकडचा/वरचा.
इमहोटेप पृथ्वीवर पहिल्यांदा तुर्कीमध्ये उतरला. नंतर ग्रीसमध्ये गेला आणि नावेतून इजिप्तला आला. मग तू कोण? असे विचारल्यावर त्याने सरमिसळ भाषेत उत्तर दिले की मी पर्वताच्याही वरचा आहे. म्हंजे एलियनच.
5 Sep 2013 - 6:03 pm | सूड
+१
25 Jun 2013 - 12:34 pm | चित्रगुप्त
जबरदस्त प्रकार दिसतो आहे हा. याविषयी आणखी माहिती, ही वादळे कशी निर्माण होतात, याची पूर्व-सूचना मिळते का, वर्षातून कितीवेळा येतात, याचे काय काय परिणाम होतात, वगैरे?
25 Jun 2013 - 9:38 pm | डॉ सुहास म्हात्रे
वातावरण धुसर करण्या इतकी वाळू हवेत पसरवून देण्याएवढी मोठी वादळे सतत होत असतात... वर्षातून १५-२० वेळा तरी. चित्रातल्या प्रमाणे मोठे वादळ वर्षा दोन वर्षातून एकाद्या किंवा कमी वेळा होते. वादळाची काहिशी पूर्वसूचना सॅटेलाईट पिक्चरवरून मिळू शकते पण त्याच्या ताकदीचा अंदाज घेणे कठीण असते. वादळाचा परिणाम म्हणजे वातावरणाचे प्रदुषण वाढते आणि श्वसनाचे विकार असणार्या लोकांना फार काळजी घ्यावी लागते... शक्यतो बाहेर जाणे टाळणे अथवा जरूर असल्यास मास्क घालून जाणे वगैरे. पण एक बरे आहे की वार्याचा वेग कमी झाला की वाळू पटकन खाली बसते... मात्र हे कधी कधी दिवस दोन दिवस होत नाही.
25 Jun 2013 - 9:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
वाळवंटातल्या तापलेल्या वाळूमुळे गरम झालेली हवा वर जाते आणि तेथे कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे समुद्रावरची त्यामानाने थंड असलेली हवा त्या पट्ट्यात वेगाने घुसते आणि तिच्या प्रबळ प्रवाहाबरोबर वाळवंटातली वाळू उडू लागते. हे या वादळांचे मुख्य कारण.
25 Jun 2013 - 1:01 pm | मदनबाण
बापरे !
25 Jun 2013 - 1:47 pm | स्पा
वादळाचा पहिला फोटो भयंकर आहे
पण कला दालनात अपघातांचे आणि वादळाचे फोटो टाकण्याचे प्रयोजन समजले नाही.. असो
25 Jun 2013 - 2:32 pm | गणपा
सुरवातीचे ३ फोटो एखाद्या हॉलीवूड चित्रपटातील प्रसंग शोभतील असे आहेत.
वाळुची वादेळे पाहिलीत पण असल्या डेंसिटीची नाही.
26 Jun 2013 - 11:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
दुसर्या फोटोतली त्रिकोणी भोकवाली इमारत ३०२ मिटर उंच आहे... यावरून त्या उडालेल्या वाळूच्या ऊंचीचा आणि वादळाच्या आवाक्याचा अंदाज बांधता येईल !
25 Jun 2013 - 7:23 pm | garava
भयंकर.
25 Jun 2013 - 7:32 pm | पैसा
भयानक प्रकार आहे. श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर? :(
25 Jun 2013 - 9:50 pm | डॉ सुहास म्हात्रे
श्वसनाचा त्रास असलेला किंवा धुळीची अॅलर्जी असलेला एखादा अशा वादळात सापडला तर?
तर त्याचे नशीब फार खराब असे हे नक्की ! अश्या माणसाने गाडीच्या काचा घट्ट बंद करून बसावे आणि मास्क व आपली औषधे बरोबर घेऊनच नेहमी प्रवास करावा हे उत्तम.25 Jun 2013 - 10:40 pm | मोदक
भयंकर..!!!
26 Jun 2013 - 12:30 am | प्यारे१
वाईट्ट प्रकार दिसतोय!
27 Jun 2013 - 12:11 am | रेवती
याबद्दल ऐकले होते पण फोटू बघून भीती वाटली .
30 Jun 2013 - 6:16 pm | स्वाती दिनेश
ह्या वादळाची वर्णने वाचली,ऐकली होती.. फोटो पाहून रौद्रता समजते आहे,
स्वाती
30 Jun 2013 - 7:10 pm | पाषाणभेद
यावर एक मराठी चित्रपटही आला होता. ही त्याची लिंक.
http://en.wikipedia.org/wiki/Valu_(film)
1 Jul 2013 - 9:08 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि वाचकांचे धन्यवाद !
30 Aug 2013 - 5:08 pm | जयवी
चित्रं दिसत नाहीयेत :(
30 Aug 2013 - 6:50 pm | सुहासदवन
मला देखिल चित्रे दिसत नाहीयेत
5 Sep 2013 - 6:10 pm | मी मनमौजी
उत्तम लिहले
5 Sep 2013 - 7:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
च्यायला, पयीलाच फटू बघून सटारली ना भौ!!! :-|
5 Sep 2013 - 7:40 pm | मुक्त विहारि
सुदैवाने अशा वादळात कधी सापडलो नाही..
6 Sep 2013 - 9:50 am | अत्रुप्त आत्मा
या.....बाबौ...! भ्या वाटायलय!