णमस्कार लोक्स,
सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा.
घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले.
तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात. सानिकेने दिलेल्या ह्या पाकॄ प्रमाणे मी प्लेन रबडि बनवुन घेतली आणि फक्त एक छोटि अॅडिशन केली ती अशी अजुन आंब्याचा मौसम असल्यामुळे थंड रबडित ताजा मँगो पल्प अॅड केला.....झाली तयार मँगो रबडि.....अरे हाय काय नाय काय!
नुसते घीवरः
मँगो रबडि:
आणि फायनली घीवर विथ मँगो रबडि:
साहित्यः
१. मैदा - ५ मोठे चमचे
२. तुप - २.५ चमचे
३. तळण्यासाठि तेल किंवा तुप
४. खायचा आवडता रंग (एच्छिक)
५. साखर (पाकापुरती)
६. थंड दुध आणि पाणी - आवश्यकतेनुसार
७. सजावटि साठि ड्राय फ्रुट्स / सुका मेवा / चांदिचा वर्ख ई.
कॄती:
१. साखरेचा पाक करुन घ्यावा (अगदि घट्ट नको. गुलाबजामचा असतो त्या प्रमाणे)
२. मंद आचेवर एका कढईत/भांडयात तेल तापत ठेवावे. भांडयाचा आकार घीवर काय साईज मधे हवे आहेत त्या नुसार ठरवावे. कारण भांडे/कढई जेवढि पसरट तेवढं घिवर पसरट/पातळ लेयरच होतं. ह्या शिवाय भांडे/कढई खोलगट घ्या जेणेकरुन मिश्रण गरम तेलात घातल्यावर अंगावर उडणार नाहि.
३. आता एका भांड्यात मैदा आणि तुप एकत्र करुन हळुवार फेटा. आता खायचा रंग आणि आवश्यकतेनुसार दुध/पाणी घालुन हळुवार फेटत रहा. मिश्रणात एकहि गुठळि राहता कामा नये तसेच मिश्रण एकदम घट्ट अथवा खुप पातळ नको. साधारण फ्लोईंग कन्सीस्टन्सीचं हव म्हणजे डावेने/भांडयाने ते सोडल्यावर त्याची संततधार पडली पाहिजे. हे मिश्रण जेवढं जास्त फेटाल तेव्हढे घिवर हलके, जाळिदार आणि क्रिस्पी होतात.
४. आता खरं कसरितचं काम आहे.....पण घाबरु नका. जर मला जमलय तर तुम्हाला नक्किच जमेल हा आत्मविश्वास ठेवा :D
५. आता हे मिश्रण थोडया अंतरावरुन (तुमचा भांड धरलेला हात हा तुमच्या डोळ्याच्या रेषेत येईल ह्या अंतराने नाहितर मिश्रण घातल्यावर गरम तेलाच्या वाफेने हात पोळेल) संततधारेने गरम तेलाच्या बरोबर मधोमध सोडा. मिश्रण घातल्यावर लगेच ते तळाशी जाउन त्याचे छोटे छोटे भाग होतील व ते अलगद तरंगुन वर येऊन भांड्याच्या कडेने जमा होतील. धिवर जेवढा जाड हवा असेल त्या प्रमाणात भांडयाने/डावेने मिश्रण घाला पण दोन मिश्रणांमधे एक २-३ मिनटाचा गॅप ठेवा जेणेकरुन पहिल्या डावेने घातलेलं मिश्रण सेट होईल
६. घीवरच्या मधोमध जागा नसेल तर निमुळतं उलथणं घालुन जागा करा (डोनट असतात त्या प्रमाणे)
७. मंद आचेवर हलका ब्राऊन रंग येईस्तो घीवर तळुन घ्या. घीवर तयार झाल्यावर कडेने आपोआप सुटेल
८. तयार घीवर एका ताटलीत काढुन घ्या व ताटली थोडि तिरकि करा जेणेकरुन अतिरिक्त तेल/तुप खाली जमा होईल किंवा टिश्यु पेपेरवर काढा म्हणजे अतिरिक्त तेल/तुप शोषलं जाईल
९. घीवर पुर्ण थंड झाले कि वरुन साखरेचा पाक हलके शींपडा. ताटली परत थोडि तिरकि करा म्हणजे अतिरिक्त पाक निथळुन जाईल. साखरेचा पाक ह्या प्रमाणात शींपडा कि शेवटि रबडि घातल्यावर अती गोड होणार नाहि
१०. आता हे लगेच खाउ शकता किंवा एका हवाबंद डब्यात भरुन नंतर वापरु शकता
११. वरील घीवर थोडेच नमुन्यादाखल केल्यामुळे मी त्यावर मँगो रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन फस्त केले :D
प्रतिक्रिया
15 Jun 2013 - 4:49 pm | धनुअमिता
छान दिसते आहे घीवर विथ मँगो रबडी. तों.पा.सु
नक्की ट्राय करणार.
15 Jun 2013 - 4:53 pm | लॉरी टांगटूंगकर
काय फोटू आहेत ते ... गोड म्हणजे जीव कि प्राण !!!! त्यात असला खतरनाक कोम्बो म्हणजे लिट्रली वारलो !!!
इकडे आला कि किडन्याप झालासच.
15 Jun 2013 - 4:55 pm | पैसा
काय भन्नाट पाकृ आणि फोटो आहेत! शिवाय हा मिपाचा धागा क्र. २५०००. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन आणि इतकी सुंदर पाकृ देणार्या दिपकला धन्यवाद!
21 Jun 2013 - 6:21 pm | मुक्त विहारि
+१
15 Jun 2013 - 4:58 pm | Mrunalini
वाव.............. अप्रतिम दिसतायत घीवर... मस्तच... मानल बुवा तुम्हाला. :)
15 Jun 2013 - 5:10 pm | nishant
प्रंचंड आवडली..
15 Jun 2013 - 5:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच जीवघेणा फोटो आला राव.
-दिलीप बिरुटे
15 Jun 2013 - 6:25 pm | रेवती
Great!
15 Jun 2013 - 6:33 pm | स्मिता चावरे
नुसता घीवर सुद्धा खायला छानच लागतो... त्याबर रबडी - ती सुद्धा आंबा घालून-- अहाहा... कल्पनेनेच तोंपासू .
15 Jun 2013 - 6:39 pm | स्मिता चावरे
फोटो जीवघेणे आहेत, हे वर सगळ्यांनी म्हटलय.. तरी मला पण तसंच वाटलं हे वरच्या प्रतिसादात लिहायच राहिलच की..
15 Jun 2013 - 7:56 pm | अत्रुप्त आत्मा
रब डी ने, बढा दी गोडी ।

फोटूत घुसून खावी,थोडी थोडी॥
22 Jun 2013 - 11:09 am | सुहास झेले
अगदी अगदी.... :) :)
15 Jun 2013 - 9:02 pm | इरसाल
जबर्दस्त.
बादवे : सध्या टारझणचे धागे वाचत आहात काय ?
15 Jun 2013 - 9:57 pm | कवितानागेश
काय खतरनाक दिसतोय हा पदार्थ. एकदम भारी. :)
16 Jun 2013 - 3:08 am | सानिकास्वप्निल
जबरदस्त रबडी व घेवर दोन्ही ही :)
16 Jun 2013 - 1:40 pm | प्यारे१
कुवेत चा व्हिसा मिळण्यासाठी काय करावे लागते?
16 Jun 2013 - 5:14 pm | स्मिता शितूत
ओ दिपकजी.....वन रिक्वेश्ट..... तुमच्या रेसिपीज खूप छानच असतात पण प्राब्लेम हा आहे की आमच्या सारख्या नवशिक्याना जरा समजून घ्याल का त्या सनिकाताईं सारख एक एक स्टेप दाखवाल का प्लीज.....................
17 Jun 2013 - 6:14 am | स्पंदना
आत्ताच्या आत्ता हवेत मला घिवर :(
मैदा जर ५ मोठे चमचे तर तूप त्याच्या निम्म्याने घ्यायच का?
18 Jun 2013 - 4:30 pm | दिपक.कुवेत
स्मिता: स्टेप बाय स्टेप फोटोसकट पाकॄ दाखवायचा प्रयत्न केला जाईल
अपर्णा: होय तूप मैद्याच्या निम्मे घायचे :)
18 Jun 2013 - 4:31 pm | दिपक.कुवेत
झाली बाबा एकदाची कमेंट पोस्ट :D
18 Jun 2013 - 4:34 pm | अक्षया
मस्त रेसीपी आणि फोटोज :)
19 Jun 2013 - 11:39 pm | आश
एकदम अप्रतिम. मी हा प्रकार कधी पाहीला किंवा खाला नाही, पण आता करावेच लागेल :-)
20 Jun 2013 - 3:51 am | मोदक
तोंपासु!!
20 Jun 2013 - 9:17 pm | कंजूस
धागा क्र २५००० आणि 'आंबेरबडीतलेघिवर' फोटोसकट २५०००+ .रबडीतला मोतिचूर ,मलाई बर्फि खाल्ली आहे छान लागते .हे पण झकास असणार .देवा मला पाव बटर नको रबडी घिवर हवे .लंडन नको कुवेत चालेल .
21 Jun 2013 - 6:22 pm | मुक्त विहारि
झक्कास..
21 Jun 2013 - 6:40 pm | पिलीयन रायडर
म्हणलं वीकांताला करुन पहावा.. म्हणुन या वेळेस फक्त फोटो पाहुन बंद न करता पा.क्रु वाचली सुद्धा..
अर्ध्यातच नैराश्य आले...
तुम्हाला दंडवत घालुन ही मी निघाले हिमालयात...
21 Jun 2013 - 6:45 pm | स्वाती२
अप्रतिम!
21 Jun 2013 - 7:04 pm | बॅटमॅन
दृष्ट्वैव सर्वानपि मिष्टघीवरान् ;
स्वर्गीयमेतं रबडीद्रवं च |
लालाप्रवाहा: हि मुखे स्रवन्ति
जिह्वाऽपि उत्तेजिता सा अकस्मात् ||
स्वर्गो स्यात् यदि लोकेऽस्मिन् अत्रैव स्यान्न संशयः |
जीवनार्थे नास्ति खाद्यं खाद्यार्थे जीवनं खलु ||
21 Jun 2013 - 10:06 pm | निवेदिता-ताई
:)
21 Jun 2013 - 10:38 pm | चेरी
खूप मस्त रेसिपी.. फोटो तर जबरी आहेत.
22 Jun 2013 - 9:57 pm | सस्नेह
तुमच्या रेसिपीचे फोटो लैच द्देखाने असतात हो दिपकभौ ! डोळ्याना मेजवानी !
16 Jul 2013 - 12:12 pm | किसन शिंदे
ह्या स्नेहातैशी बाडिस!!
@प्यारे : कुवेतचा विसा मिळवण्याऐवजी ह्या दिपकचेच अपहरण करू;)? ;)
16 Jul 2013 - 1:33 pm | दिपक.कुवेत
अरे कसलं काय? कधीतरी एखादि पाकॄ जमून जाते, फोटो चांगले येतात एवढचं!
22 Jun 2013 - 10:01 pm | पाषाणभेद
व्हाट इज धीवर? आय थिंक इट्स अ बर्ड फ्रोम इंडीया? इज धिस नॉनवेज डिश? देन आय विल हॅव इट.
23 Jun 2013 - 10:28 am | garava
मस्त रेसिपी आणि फोटो.
23 Jun 2013 - 11:24 am | नेहरिन
एकदम मस्त रेसिपी .
मी... शेफ कुणाल कपूरने दाखवलेलि "ट्रोपिकल फ्रुट घिवर " हि रेसिपी केली होती. मुलिच्या वाढ दिवसाला . तीन लेअरच्या केक सारखे केले होते. पण त्याचा फोटो नाहि काढला त्यामुळे येथे टाकता नाहि येणार..मस्त लागतो हा प्रकार .क्रिम त्यावर फळान्चा थर आणि घिवर.
16 Jul 2013 - 4:18 am | दीपा माने
अगदी अप्रतिम! दिपक, तुप म्हणजे साजूक तुप कां?
16 Jul 2013 - 1:36 pm | दिपक.कुवेत
साजूक तुप घ्यायचं. खुप छान लागतात हे घिवर विथ रबडि....एकदा नक्कि करुन बघ!
16 Jul 2013 - 1:42 pm | मी_देव
Jabardast
16 Jul 2013 - 1:42 pm | मी_देव
Jabardast
16 Jul 2013 - 1:45 pm | गणपा
भारीच हो दिकपराव.
शेवटचा फोटू म्हणजे अगदी क ह र आहे.
16 Jul 2013 - 2:14 pm | प्रभाकर पेठकर
अहाहा..! घीवर म्हणजे नुसते 'घी वर'च नाही तर वर, खाली, आजूबाजूला भरून आहे. घीवर ब्येष्टं त्यानंतर मँगो रबडी अत्युत्तम आणि शेवटी कहर म्हणजे घीवर वुईथ मँगो रबडी म्हणजे पार देहान्त शासनच.
16 Jul 2013 - 2:21 pm | मी_आहे_ना
जबरी
16 Jul 2013 - 2:24 pm | दिपक.कुवेत
असाच लोभ ठेवा.
28 Aug 2013 - 2:34 pm | जयवी
एकदम खतरा फोटू यार....... तू म्हणजे कमाल आहेस दीपक !!
11 Nov 2013 - 2:12 pm | सुहास्य
ए अरे दीपक ...अस नुस्त पाहुन नाही चालणार .......क्लास काढ आम्ही येतो सगळ्या जणी ....भारी आहे तु ...
11 Nov 2013 - 3:14 pm | अमेय६३७७
सुंदरच दिसतायत घीवर. अप्रतिम कृती.
11 Nov 2013 - 3:46 pm | त्रिवेणी
http://www.misalpav.com/sites/all/modules/smiley/packs/kolobok/cray2.gif