मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

राजस्थानी घीवर विथ मँगो रबडि

दिपक.कुवेत · · पाककृती
णमस्कार लोक्स, सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्‍या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा. घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले. तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात. सानिकेने दिलेल्या ह्या पाकॄ प्रमाणे मी प्लेन रबडि बनवुन घेतली आणि फक्त एक छोटि अ‍ॅडिशन केली ती अशी अजुन आंब्याचा मौसम असल्यामुळे थंड रबडित ताजा मँगो पल्प अ‍ॅड केला.....झाली तयार मँगो रबडि.....अरे हाय काय नाय काय! नुसते घीवरः Ghevar मँगो रबडि: Mango Rabdi आणि फायनली घीवर विथ मँगो रबडि: Ghevar with Mango Rabdi साहित्यः १. मैदा - ५ मोठे चमचे २. तुप - २.५ चमचे ३. तळण्यासाठि तेल किंवा तुप ४. खायचा आवडता रंग (एच्छिक) ५. साखर (पाकापुरती) ६. थंड दुध आणि पाणी - आवश्यकतेनुसार ७. सजावटि साठि ड्राय फ्रुट्स / सुका मेवा / चांदिचा वर्ख ई. कॄती: १. साखरेचा पाक करुन घ्यावा (अगदि घट्ट नको. गुलाबजामचा असतो त्या प्रमाणे) २. मंद आचेवर एका कढईत/भांडयात तेल तापत ठेवावे. भांडयाचा आकार घीवर काय साईज मधे हवे आहेत त्या नुसार ठरवावे. कारण भांडे/कढई जेवढि पसरट तेवढं घिवर पसरट/पातळ लेयरच होतं. ह्या शिवाय भांडे/कढई खोलगट घ्या जेणेकरुन मिश्रण गरम तेलात घातल्यावर अंगावर उडणार नाहि. ३. आता एका भांड्यात मैदा आणि तुप एकत्र करुन हळुवार फेटा. आता खायचा रंग आणि आवश्यकतेनुसार दुध/पाणी घालुन हळुवार फेटत रहा. मिश्रणात एकहि गुठळि राहता कामा नये तसेच मिश्रण एकदम घट्ट अथवा खुप पातळ नको. साधारण फ्लोईंग कन्सीस्टन्सीचं हव म्हणजे डावेने/भांडयाने ते सोडल्यावर त्याची संततधार पडली पाहिजे. हे मिश्रण जेवढं जास्त फेटाल तेव्हढे घिवर हलके, जाळिदार आणि क्रिस्पी होतात. ४. आता खरं कसरितचं काम आहे.....पण घाबरु नका. जर मला जमलय तर तुम्हाला नक्किच जमेल हा आत्मविश्वास ठेवा :D ५. आता हे मिश्रण थोडया अंतरावरुन (तुमचा भांड धरलेला हात हा तुमच्या डोळ्याच्या रेषेत येईल ह्या अंतराने नाहितर मिश्रण घातल्यावर गरम तेलाच्या वाफेने हात पोळेल) संततधारेने गरम तेलाच्या बरोबर मधोमध सोडा. मिश्रण घातल्यावर लगेच ते तळाशी जाउन त्याचे छोटे छोटे भाग होतील व ते अलगद तरंगुन वर येऊन भांड्याच्या कडेने जमा होतील. धिवर जेवढा जाड हवा असेल त्या प्रमाणात भांडयाने/डावेने मिश्रण घाला पण दोन मिश्रणांमधे एक २-३ मिनटाचा गॅप ठेवा जेणेकरुन पहिल्या डावेने घातलेलं मिश्रण सेट होईल ६. घीवरच्या मधोमध जागा नसेल तर निमुळतं उलथणं घालुन जागा करा (डोनट असतात त्या प्रमाणे) ७. मंद आचेवर हलका ब्राऊन रंग येईस्तो घीवर तळुन घ्या. घीवर तयार झाल्यावर कडेने आपोआप सुटेल ८. तयार घीवर एका ताटलीत काढुन घ्या व ताटली थोडि तिरकि करा जेणेकरुन अतिरिक्त तेल/तुप खाली जमा होईल किंवा टिश्यु पेपेरवर काढा म्हणजे अतिरिक्त तेल/तुप शोषलं जाईल ९. घीवर पुर्ण थंड झाले कि वरुन साखरेचा पाक हलके शींपडा. ताटली परत थोडि तिरकि करा म्हणजे अतिरिक्त पाक निथळुन जाईल. साखरेचा पाक ह्या प्रमाणात शींपडा कि शेवटि रबडि घातल्यावर अती गोड होणार नाहि १०. आता हे लगेच खाउ शकता किंवा एका हवाबंद डब्यात भरुन नंतर वापरु शकता ११. वरील घीवर थोडेच नमुन्यादाखल केल्यामुळे मी त्यावर मँगो रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन फस्त केले :D

वाचन 21463 प्रतिक्रिया 0