समीर हा जानकिबाई व रामभाऊ जोश्यांचा एकुलता एक लेक.
घरची परिस्थिती बेताची.. रामभाऊ औरंगाबाद मध्ये नगर पालिकेत लिपिक होते.
वडलोपार्जित २ खोल्यांत संसार थाटलेला ..समीर एकुलता एक मुलगा
पण समीर खूप हुशार व बुद्धिमान होता १२ वीला टॉपर लिस्ट मध्ये आला अन पुण्याच्या ईंजीनीरिंग च्या कॉलेज मधे त्याला प्रवेश मिळाला...
खरं तर कॉलेज चा खर्च राम भाऊंना तसा जडच होता पण त्यांनी तो पार पाडला.
समीर ने पण अभ्यास करून खर्चाचे चीज केले ..व अव्वल दर्ज्यात पास झाला अन एका
मल्टी नॅशनल आय टी कंपनीत त्याला नोकरी लागली ..
अन सुखाचे दिवस आले भरपूर पगार.. विदेश यात्रा..व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर तो १-२ वर्षात उच्च पदावर पोहोचला...
प्रिया मराठे हि पण बुद्धिमान व सुंदर मुलगी त्याच कंपनीत कामाला होती..
तिचे व समीर चे मधुर प्रेम संबंध जुळले..व पुढची तयारी म्हणून ३ बेडरूम चा प्रशस्त फ्लॅट काही सेव्हिंग व काही लोन करून घेतला..
त्याच सुमाराला समीर चे बाबा पण रिटायर्ड झाले व आई व बाबा समीर कडे राहायला आले.
मुलाची प्रगती व वैभव पाहून जानकी बाई धन्य झाल्या.
समीर ने प्रियांची ओळख आई बाबांना करून दिली व संमतीने ते विवाह बंधनात बांधले गेले.
लग्ना नंतर काही दिवस ठीक गेले पण कॉर्पोरेट सेक्टर मध्ये जगले जाणारे मुक्त जीवानं पार्ट्या..घरी येणारे समीर व तिचे मित्र मैत्रिणी यामुळे जुन्या वळण्याचा जानकी बाई व सुनेत कलहाची ठिणगी पडू लागली.
जानकी सोशिक व मुख दुर्बळ असल्याने प्रिया तिचा पदोपदी पाण उतारा करू लागली..जानकी बाईंची अवस्था सहन होईना व बोलवेना अशी झाली..
एकदा प्रसंग हाताबाहेर गेला..प्रियाने घरावर माझा हि हक्क आहे.मी मिळवती आहे..तुम्हाला पोसते असे वाद घातले...
आई बाबा समंजस होते आपली अडचण त्यांना संसारात होत आहे.. त्यांना त्यांच्या पडतीने जीवन जगू द्यावे हा विचार केला अन आई बाबा नी परत औरंगाबादला जाण्याचे ठरवले.
राम व जानकी परत औरंगाबादला आले पण झालेला पाण उतारा व अपमान दोघांनाही जिव्हारी लागला होता..मुलाची फरफट त्यांना समजत होती पण एकीकडे मुलाने पण आपल्या बाजूने बोलावयास हवे होते असे वाटत होते...
काळ पुढे सरकत होता अन प्रियाला दिवस गेल्याची गोड बातमी जानकी च्या कानी आली..
प्रसुतिसमय आला अन बाई व बाबा सारे विसरून पुन्हा समीर च्या घरी गेले..प्रियाला आई नसल्याने बाळंत पण सासरीच होणार होते.
बाळंतपण सुखरूप झाले व मुलगा झाला ..
आईला वाटले होते... पण प्रियाच्या वागण्यात तसूभर हि बदल झाला नव्हता..
बाळाचे नामकरण झाले अन बाळाचे तेजस नाव ठेवले...
दुस~या दिवशी जानकी बाईने प्रिया जवळ् विषय् काढला..
बाळ् जरा मान् धरू लागले रो पर्यंत् २-३ महिने प्रिया जवळ् राहण्याचा त्यांचा मानसं त्यांनी प्रिया जवळ् व्यक्त् केला..तसेच् समीर् ची बाळलेणी चंदीच्या वाक्या.पायातले छुमछुम् सोन्याचे लॉकेट् पण् औरंगा बादला त्या विसरून् आल्या होत्या त्या तेजस् ला देण्याचा मानस् हि बोलून् दाखवला.
त्यावर् प्रिया उखडली व् म्हणाली थांबायची काही गरज् नाही मी बाळाची काळजी घेण्यास् समर्थ् आहे..स्वयंपाकाला बाई आहेच् बाळ् सांभाळण्यासाठी पण् बाई शोधली आहे..असे म्हणून् तिने जानकी बाईचे तोंड् बंद् केले...
नातवाच्या नावाखाली इथे ठिय्या मारू नका आम्हाला आमचा संसार् करू द्या..असे म्हणाल्यावर् जानकी बाई काहीच् बोलल्या नाही..
समीर् घरी आल्यावर् रामभाऊ नी समीर् जवळ् विषय् काढला व् उद्याच्या गाडीने गावाला जाणार् असे सांगितले.
बाबा काही दिवस् अजून् राहिले असता तर् आम्हाला बरे वाटले असते..असे समीर् म्हणाला
त्या वर् आई म्हणाली नको असू दे घर् पण् कुलूप् लावून् आलो आहोत्..आम्ही जातो..
पण् आई बाबा अधून् मधून् येत् जा व् हो तेजस् च्या पहिल्या वाढदिवसाला नक्की आलेच् पाहिजे..
तेजस् चे नाव् निघताच् आईचा चेहरा खुलला व् तेजसला मांडीवर् घेत् म्हणाल्या" अरे ह्या लबाडाला आम्ही कसे विसरू कुठेही असलो तरी नक्की येणारच्..अन् हो त्याच्या साठी तुझी बाळलेणी व् किल्लीची पमपम् पण् आणणार् आहे ह्या लबाडाला..तेजस् चा मुका घेत् आई म्हणाल्या ..
आई बाबाने समीर् व् प्रियांचा निरोप् घेतला व् बाळाची काळजी घ्या असे म्हणत् घर् सोडले.
घरी आल्यावर् मात्र् आईच्या डोळ्याची धार् थांबेना..प्रियाने केलेला अपमान् आई बाबांच्या हृदयाचे तुकडे करून् गेला होता..
बाबांना सारे समजत् होते पण् आपलेच् दात् व् आपलेच् ओठ् अशी अवस्था होती..
आईने मात्र् अंथरूण् धरले
अपेक्षा भांगांच्या दुःखाने त्या व्याकुळ् झाल्या..विचारांचे ओझे असह्य् झाले अन् त्याचा ताण् मनावर् व् हृदयावर् आला अन् छातीत् दुखायला लागले..
"अहो मला कसेसेच् होत् आहे श्वास् घ्यायला त्रास् होतो आहे" आई बाबांना म्हणाली शेजारी पाजारी आले अन् धावाधाव् झाली आईला हॉस्पिटल् मध्ये नेण्यात् आले ..
पण् हॉस्पिटल् गाठेपर्यंत् आईची प्राणज्योत् मालवली होती...
हृदय् विकाराचा त्रिव्र् झटका असे निदान् झाले..
बाबाच्या हातपायातले बळ् गेले सावली सारखी साथ् देणारी पत्नी आता ह्या जगात् नव्हती..
समीर् ला फोन् लावला पण् तो नेमका अमेरिकेत् होता..
नाईलाजाने पुढले अंतिम् संस्कार् उरकले गेले.
पत्नी वियोग् असह्य् होऊन् काही दिवसात् बाबा पण् जगाचा निरोप् घेऊन् देवाघरी गेले..
समीर् ने सारे अंत्य् संस्कार् उरकले व् घराला कुलूप् लावून् तो पुण्याला परतला.
काळ् पुढे सरकत् होता...
आज् तेजस् चा पहिला वाढदिवस् ..
प्रियाच्या मनात् तो थाटात् साजरा करायचा विचार् होता पण् आईबाबाच् अस झाल्याने वाढदिवस् साधेपणाने करायचे ठरले....
मोजकेच् घरचे लोक् बोलावायचे ठरले.
समीर् ला आई बाबा ची आठवण् येत् होती.
...........
सायंकाळी ५-५.३० च्या सुमारास् एक् वृद्ध् जोडपे एस् टी स्टॅंड् वर् उरतले..व् रिक्षावाल्या जवळ् गेले.
कुठे जायचे आहे आजोबा? त्याने विचारले..
"बाणेर् ला जायचे आहे..हे बघ् हा पत्ता व् हे आमच्या मुलाच्या नावाच् कार्ड्..अरे आज् आमच्या नातवाचा पहिला वाढदिवस् आहे बाबा.." तो वृद्ध् म्हणाला..असे म्हणत् आजोबानी कार्ड् व् पत्त्याचा कागद् रिक्षावाल्याच्या ताब्यात् दिला.
लांबच् भाडं मिळाले म्हणून् रिक्षावाला पण् खूश् झाला व् म्हणाला "बसा आजोबा"
"आजोबा रिक्शाचा आरसा काल् फुटला आहे म्हणून् रिक्शा हळू चालवावी लागेल् " पण् काळजी नको तुम्हास्नी टायमात् पोहोचवतो...असे म्हणत् त्याने रिक्षा चालू केली.
रिक्शांत् बसल्यावर् त्या जोडप्याच्या गप्पा सुरू झाल्या..
तेजस् आता मोठा झाला असेल् नाही? आजोबा म्हणाले..
हो ना अगदी समीर् वर् गेला आहे..आजी म्हणाल्या..
त्याला किल्लीची मोटार् आवडेल् ना? आजी म्हणाली..त्यावर् "तू पण् ना अग् तो लहान् आहे थोडा मोठा झाला की खेळेल्..अन् हो बाळलेण्याचा डबा घेतला ना? का मागच्या सारखा विसरला घरी.."आजोबा म्हणाले.
छे हो घेतला ना."आजी म्हणाली..
त्यांच्या रिक्शांत् गप्पा चालू होत्या..
सोसायटी आली..
"आजोबा थांबा मी चौकशी करतो" असे म्हणत् रिक्षावाला वॉचमन् च्या दिशेने गेला.
पत्ता योग्य् होता.
रिक्षावाला रिक्षेकडे आला तर् आत् कुणीच् नव्हते..
मात्र् सिट् वर् एक् पिशवी होती..
त्याने वॉचमनला बोलावले अन् म्हटले " रिक्शांतले आजी आजोबा कुठे गेले ते पाहिले का?
"नाय् बा मी नाय् पायल्" वॉचमन् म्हणाला..बहुतेक् समीर् साहेबा कडे गेले असतील्"
आर् माझ् भाडं घ्यायच् राहिल् ..अन् हि पिशवी पण् आजोबा विसरले" रिक्षावाला म्हणाला..
तो पत्ता शोधत् समीर् च्या फ्लॅट् वर् पोहोचला..
बेल् वाजवली दार् उघडल्यावर् त्याने विचारले "समीर् जोशी इथे राहतात् का?"
"हो मी च् समीर्.."
तुमच्या आई बाबांना मी अत्ताच् रिक्शांतून् इथे आणले ते वर् आलेत् का? त्यांची हि पिशवी पण् खाली राहिली होती अन् भाडे पण् घ्यायचे होते..रिक्शावाला म्हणाला...
काय्? आश्र्चर्याने समीर् ओरडला आहो आई बाबा काही माहित्यांपूर्वीच् देवाघरी गेले आहेत्..
म्हणजे मी काय् खोट् बोलतो? हे कार्ड् तुमचच् आहे ना? आन् हि पिशवी? मला काही माहीत् नाही भाड्याचे पैसे टाका..रिक्षावाला म्हणाला...
घरात् पाहुणे आले होते तमाशा नको म्हणून् त्याने पैसे रिक्षावाल्याला दिले
रिक्षावाला गेल्यावर् त्याने पिशवीत् हात् घातला आत् एक् पितळी डबा होता उघडला तर् त्यात् लहान् बाळाचे दागिने होते व् एक् आई बाबा अन् त्याचा लहान् पणाचा फोटो..
दुसरा बॉक्स् उघडला तर् त्यात् एक् किल्लीची लहान् मुलांची खेळण्यातली मोटर् होती..
हे पाहिल्यावर् समीर् चे डोळे भरून् आले आईबाबाने आपले वचन् पाळले होते..
तेजस् च्या वाढदिवसाला ते आले होते..
समीर् ला आई बाबांची खूप् आठवण् आली व् आपल्या वागण्याचा खेद् झाला पण् वेळ् निघून् गेली होती..
जिवंत् असो वा नसो आई बाबांचे मुलावरचे प्रेम् कधीच् कमी होत् नाही मग् मुलगा कसाही वागो.
अविनाश
प्रतिक्रिया
18 May 2013 - 1:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वास्तवातील कथा मस्त रंगवली आहे. नाट्य लिहिलं आहे, म्हणून नाट्यरुपांतर आवडलं. बाकी, विषयाच्या मध्यंतरात मतमतांतरे असू शकतील. असं उत्तमोत्तम लेखन येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
18 May 2013 - 1:22 pm | तुमचा अभिषेक
असं उत्तमोत्तम लेखन येऊ द्या, असेच म्हणतो अविकाका..
18 May 2013 - 2:09 pm | ५० फक्त
विश्वासच बसत नाही हे अविकाकांनी लिहिलंय यावर.
18 May 2013 - 3:33 pm | प्यारे१
+१११११११११११११११
18 May 2013 - 3:52 pm | बॅटमॅन
+२२२२२२२२२२२२२२२२.
18 May 2013 - 4:15 pm | अत्रुप्त आत्मा
+3333333333333333333
आज अकुंना आपला सलाम! :)
31 May 2016 - 3:32 pm | नाखु
अकु असंही काही लिहायचे हे कळावे म्हणून आठवण....
स्मरणशील नाखु
18 May 2013 - 10:29 pm | पक पक पक
मस्त आहे.. :)
18 May 2013 - 11:20 pm | संजय क्षीरसागर
तिचा डब्बाच गुल होईल.
आणि रिक्षावाल्यानं वाटेत मागे बघितलं नाही ते एक बरं झालं... पण वरून खाली आलेले आई-बाबा परत वर कसे गेले? हा प्रश्न मात्र सतावत राहणार.
20 May 2013 - 7:34 am | स्पंदना
छान वाटल वाचुन अविनाश कुलकर्णी साहेब.
भाबड प्रेम.
20 May 2013 - 7:50 pm | पिंगू
ही कथा आवडली...
23 May 2013 - 12:00 am | सूनिल
facebook var vachli ahe hi katha ...