मी काढलेले काही मॅक्रो, साधे फोटो शेअर करतोय, बर्या-वाईट प्रतिक्रिया अवश्य कळवाव्या -
- इस रंग बदलती दुनियाँमे...
- फूल ही फूल खिल उठें...
- जियों मेरे लाल!
- उमलता निळसर आनंद...;)
- तजेलदार हिरवा...
अजून काय आणि कशा सुधारणा करता येतील?
ता.क. :- मूळ फोटोवर क्लिक केल्यास मोठा फोटो बघता येईल, तो मोठा फोटो वॉलपेपर म्हणून वापरता येईल!
प्रतिक्रिया
12 Sep 2008 - 12:16 pm | जैनाचं कार्ट (not verified)
जबरदस्त !!!
सर्व फोटो मध्ये रंगसंगति व्यवस्थीत आली आहे... निळे फुल तर.. वा !!!
जरा साईज मोठा करा.. आमच्या संगणक पडद्याची शोभा वाढेल !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
12 Sep 2008 - 12:36 pm | मनिष
इथून घेता येतील -
http://www.flickr.com/photos/manishh/sets/72157594285089873/
12 Sep 2008 - 12:16 pm | नंदन
फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
12 Sep 2008 - 10:12 pm | धनंजय
रंगसंगती (आणि पहिल्या चित्रात संगती जवळजवळ कृष्णधवल ठेवणेही) उत्तम आहे.
पहिल्या फोटोतला उजवीकडचा रिकामा भाग अर्धा कातरावा असे वाटते.
12 Sep 2008 - 12:20 pm | स्वाती दिनेश
फोटो आणि कॅप्शन्स - दोन्ही आवडले. चित्रांचा क्रमही (कमी रंगांपासून ते उठावदार रंगांपर्यंत) मस्त आहे.
नंदनसारखेच म्हणते.
स्वाती
12 Sep 2008 - 12:24 pm | प्रभाकर पेठकर
व्वा सुंदर आहेत फोटो. पहिल्या फोटोतला 'जिवंतपणा' उठावदार आहे तर बाकीच्या फोटोतले 'रंग' तजेलदार आहेत.
12 Sep 2008 - 12:25 pm | मिंटी
मस्त फोटोग्राफस..........
खुप मस्त टिपले आहेत तुम्ही सगळे फोटो....
अजुन असतील तर ते पण शेअर करा..... :)
12 Sep 2008 - 12:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मनिष, मस्त आहेत फोटो! मला फ्लूरोसंट हिरवा रंगतर फार्फार्फार्फार आवडला; आणि "फूल ही फूल खिल उठें..."पण! बाकीचेही झकास आहेत, पण हे दोन सगळ्यात जास्त.
अदिती
अवांतरः कुठे गेला तुझा स्वतःचा कॅमेरा, फोटो काढण्याचा आणि इतरांना दाखवण्याचा उत्साह?
12 Sep 2008 - 12:41 pm | मनिष
नसत्या व्यापांमुळे वैतागलो/त्रासलो आहे! :(
दिल था एक शोला मगर बीत गयें दिन वो कतिल,
अब कुरेदो न इसे, राख में क्या रख्खा है!
12 Sep 2008 - 12:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ते अवांतर मला स्वतःलाच होतं. पण तुमच्या डोक्याचा ताप लवकर जावो अशी शुभकामना.
(शुभचिंतक) अदिती
12 Sep 2008 - 12:38 pm | मनिष
अजून एक फोटो, खास तात्यांसाठी! :)
12 Sep 2008 - 1:08 pm | विसोबा खेचर
अजून एक फोटो, खास तात्यांसाठी!
क्या बात है! "डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी..." हे सुंदर गाणं आठवलं!
तात्या.
12 Sep 2008 - 1:12 pm | मनिष
मोठ्या फोटोत त्याचे कॅप्शन पाहा (सोनेरी सुर्यास्तासाठी),--
http://farm4.static.flickr.com/3103/2850503648_4c953deba0_b.jpg
त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी! :)
12 Sep 2008 - 1:21 pm | विसोबा खेचर
त्या अर्थाने म्हटले की हा खास तात्यांसाठी!
अरे वो तो हैईच! :)
खरं सांगायचं तर मी हा फोटू पाहिला तेव्हा सर्वात प्रथम माझ्यासमोर ते लखलखतं, सोनेरी द्रव्यच आलं! पण म्हटलं सध्या अनंत चतुर्दर्शी पर्यंत गणेशोत्सवाचे वातावरण आहे तेव्हा उगाच लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आपण उगाच हा विषय काढू नये! ;)
ग्लेफिडिचच्या खालोखाल आठवण झाली ती 'डोळ्यात सांजवेळी.. 'या गाण्याची! म्हणून मग प्रतिसादात त्या गाण्याचाच उल्लेख केला! :)
असो, मोठ्या चित्रात कॅप्शन वाचले परंतु ते वाचण्याआधीच छोटा फोटू पाहिला तेव्हाच ते कॅप्शन माझ्या मनात आले होते! :)
स्वगत : छ्या! मंडळी माझ्या मनातली कॅप्शन्स इतकी एक्झॅक्ट कशी ओळखतात कुणास ठाऊक? साला, पब्लिक मला पक्का बेवडा समजतं की काय?!
असो...!
आपला,
(सिंगलमाल्ट स्कॉचवर निखळ, निर्व्याज प्रेम असणारा) तात्या.
12 Sep 2008 - 12:47 pm | सहज
सर्व फोटो आवडले.
जमेल तसे अजुन टाकत जा अधून मधून.
12 Sep 2008 - 1:06 pm | विसोबा खेचर
सर्वच फोटू क्लास! परंतु पहिलं आणि शेवटच चित्र सर्वात छान!
पहिल्या चित्रातला सरडा तर केवळ देखणा अन् सुरेख आहे! आपण तर साला त्याच्या प्रेमातच पडलो आहोत...:)
तात्या.
12 Sep 2008 - 3:02 pm | ऋषिकेश
दुसरा सोडून सगळे फोटू आवडले :) दुसर्यात प्रकाश कमी पडला असे वाटले.
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
12 Sep 2008 - 10:17 pm | यशोधरा
सुरेख फोटो. खूप आवडले.
12 Sep 2008 - 11:26 pm | चतुरंग
सरडा केवळ खिळवून ठेवतोय. (उजवीकडचा अर्धा कातर - धनंजयशी सहमत).
लाल, निळा आणि हिरवा सगळेच रंग एकदम अफलातून आलेत. (फुलं आणि झाडं कोणती आहेत तेही देऊ शकशील का?)
चतुरंग
12 Sep 2008 - 11:42 pm | प्राजु
जबरा आहे तुझी फोटोग्राफी...
एकदम सह्ही सह्ही रंगसंगती आहे... हॅट्स ओफ टू यू..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
12 Sep 2008 - 11:48 pm | वर्षा
सर्वच फोटो सुरेख आलेत. आणि कॅप्शन्सही! चपखल कॅप्शन्स देणं हीसुद्धा एक कलाच वाटते मला
यातील काही फोटो सेव्ह करुन घेतले तर चालेल का?
-वर्षा
13 Sep 2008 - 4:01 am | मदनबाण
सुरेख फोटो,,,मला उमलता निळसर आनंद... फार आवडला... :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
13 Sep 2008 - 4:10 am | मुक्तसुनीत
क्याप्शन्स एकदम सुरेख ! फोटोबद्दल आम्ही पाम्रे काय बोलणार :-) सुंदरच आहेत.
13 Sep 2008 - 7:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच फोटो सुरेख आहेत, पण सरड्याच्या फोटो लैच झकास आला राव.