दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
- चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
- चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे."
आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये?
१९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून.
फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला.
आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील?
आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक??
आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का?
(चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल
फोटो गूगल कडून साभार
प्रतिक्रिया
26 Apr 2013 - 4:40 pm | प्रसाद१९७१
चीन्यांनी येउन भारत च ताब्यात घ्यावा अश्या मताचा मी झालो आहे हल्ली.
नाहीतरी दिवसेंदिवस नरक च होत चालला आहे भारताचा
26 Apr 2013 - 6:53 pm | पिलीयन रायडर
चीन ने येऊन भारतावर राज्य करयची वाट पहाण्यापेक्षा तुम्हीच का नाही चीन मध्ये जात..??
कशाला ह्या नरकात रहाता? उगीच लोकशाही वगैरे... मस्त पैकी चीनमध्ये जायचं न गप बसुन राहायच.. (बोलायची सोय नाही म्हणे तिथे..)
26 Apr 2013 - 6:56 pm | शुचि
अगं त्यांनी उपरोधाने, वैतागाने म्हटले आहे. अर्थात त्यांची बाजू नाही घ्यायची. एका प्रतिसादावर त्यांनी मला "मूर्ख" म्हणून झालेले आहे. तेव्हा मला काही फार सहानुभूती नाही ;) पण वेल ..... त्रागा असावा असे नीरीक्षण मांडू इच्छिते.
26 Apr 2013 - 7:03 pm | पिलीयन रायडर
उपरोधाने.. असेल बाई..
पण त्यांच्या १-२ ठिकाणी त्यांचे प्रतिसाद वाचुन मला असं वाटलं की भारत खरच नरक वाटत असेल त्यांना..
27 Apr 2013 - 11:54 pm | जेनी...
अगं ते गिरिजा प्रसाद काका आहेत बहुतेक ..
लक्ष नै द्याचं ... बाकि पिलु तैशी एक्दम समत ..
28 Apr 2013 - 11:58 am | अग्निकोल्हा
कै च्याल्लेय अंटी ? आपल्या पिलु तैशी मी पन समत.
29 Apr 2013 - 4:14 am | जेनी...
:-/
हे काय गिल्फुकाका :-/
असं नै बै चिड्वाचं :-/
29 Apr 2013 - 12:19 pm | प्रसाद१९७१
तुमचे बरोबर आहे. माझा त्रागाच आहे, ह्या देशात काही चांगले होणार नाही ह्यातुन आलेला
26 Apr 2013 - 10:21 pm | खादाड_बोका
एका नरकातुन दुसर्यात जाण्यात काय अर्थ आहे? पण खरी गोष्ट अशी आहे की आपण सुध्धा चीनला धमकावले पाहीजे. नाहीतर हे दिवसेंदिवस वाढतच जाईल. पण आपल्या देशातील नपूंसक पुढार्यांकडुन हे अपेक्शीत नाही. आणी.... जर धमकावले व चीन ने आक्रमण केले, व अमेरीका आपल्या मदतीला नाही आला तर, आपला बँड वाजायला जास्त वेळ लागणार नाही. पण त्यानंतर.....कमीत कमी पुन्हा एक नवीन सुरवात तर करता येईल.
29 Apr 2013 - 12:18 pm | प्रसाद१९७१
तुम्हाला कोणी सांगितले की भारतात खरे ते बोलता येते.
माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का?
अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का?
त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.
26 Apr 2013 - 6:39 pm | पैसा
हेलिकॉप्टर्स ३०० किमी आत येऊन कोणाला कळले नाही?
26 Apr 2013 - 7:14 pm | कोमल
आणि आजच अजून एक बातमी वाचनात आली..
26 Apr 2013 - 7:09 pm | अमोल खरे
असल्या बातम्या वाचुन डोक्याला शॉट लागतो. काय होणार काय माहिती. देश कसा काय चालतो असा प्रश्न मला अनेकदा पडतो. चीन समोर आपण काहीच नाही हे सत्य आहे, पण अमेरिका वगैरेला मधे आणुन काही करता आलं तर बरं.
26 Apr 2013 - 7:28 pm | कोमल
अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र आहे.. अमेरिका चायना (साय्नो-अमेरिकन)संबंध पण multi-faced आहेत असे म्हणतात..
26 Apr 2013 - 7:42 pm | मदनबाण
अमेरिका अगदी बेभरवशाचा मित्र आहे
अमेरिका हे आपले शत्रुराष्ट्र आहे.
जर पाकिस्तान आपला शत्रु आहे,आणि त्याला हरप्रकारे अमेरिका मदत करतो,मग शत्रुचा मित्र आपला मित्र कसा असु शकतो ? हिंदीत याच्या उलट एक म्हण आहे,दुष्मन का दुष्मन अपना दोस्त होता है !
3 May 2013 - 10:01 am | पिवळा डांबिस
फनी!
:)
3 May 2013 - 10:14 am | शिल्पा ब
अमेरीका फक्त स्वत:चा स्वार्थ पाहते. हा देश कोणाचाही "मित्र" नाही.
3 May 2013 - 10:40 am | पिवळा डांबिस
अमेरिका हा ब्रिटनचा, इस्त्रायलचा, जपानचा, तैवानचा मित्र आहे.
उद्या या देशांवर जर कुणी दुसर्या देशाने हल्ला केला तर अमेरिका नि:संशय आपले सैन्य तिथे उतरवेल...
वरील लिस्टमध्ये भारताचा समावेश नाही याचं दु:ख्ख जरूर आहे, पण तो देश कुणाचाही मित्र नाही हे विधान पटण्यास कठीण आहे.
रच्याकने: भारत वर दिलेल्या कसोटीवर कुठल्या दुसर्या देशाचा मित्र आहे?
3 May 2013 - 11:05 am | मदनबाण
मूळ विषया पासुन विषयांतर होत आहे तरी सुद्धा इथे एक संदर्भ देतो :-
ndian frigate INS Khukri was sunk by the PNS Hangor (S131), while INS Kirpan (1959) was damaged on the west coast. In the Bay of Bengal, the aircraft carrier INS Vikrant (R11) was deployed to successfully enforce the naval blockade on East Pakistan. Sea Hawk and the Alizés aircraft from INS Vikrant sank numerous gunboats and Pakistani merchant marine ships.[25] To demonstrate its solidarity as an ally of Pakistan, the United States of America sent Task Force 74 centred around the aircraft carrier USS Enterprise into the Bay of Bengal.
संदर्भ :-Indian Navy
जो देश एखाद्या युद्धात पाकिस्तानच्या बाजुने आपले युद्ध पोत हिंदुस्थानाच्या विरोधात पाठवतो,तो हिंदुस्थाना शत्रु नाही का ?
3 May 2013 - 11:17 am | सुबोध खरे
राजकारणात आणी देश्कारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. उद्या पाकिस्तानने जर आपल्या काश्मीर वरील हक्क सोडून दिला, दहशतवाद्यांना आधार देणे सोडले आणी आपल्याशी व्यापार वाढवला तर त्यांचा फार मोठा फायदा होईल. असे झाल्यास त्यांच्याशी शत्रुत्व ठेवण्याचे आपल्या कारणच राहणार नाही. ( शक्यता >० .१ %)
3 May 2013 - 11:38 am | पिवळा डांबिस
निक्सनने एन्टरप्राईझ बंगालच्या उपसागरात पाठवायचं ते पाउल भारताच्या विरोधातच मानलं गेलेलं होतं. पण त्याला फक्त भारतविरोधी शतृत्व हा एकच रंग नव्हता. ती आंतरराष्ट्रिय राजकारणातली एक खेळी होती.
अमेरिकेला त्यावेळी चीनशी संवाद प्रस्थापित करायचा होता आणि त्यात पाकिस्तान हा सहाय्यक होत होता. भारताच्या बांगला युद्धाने ते राजकारण बिघडत होतं. म्हणून ते तसं करण्यात आलं,
उलट जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा हे एक नविन लोकशाही राष्ट्र आपलं (एका लोकशाही राष्ट्राचं)मित्र होईल अशीच अमेरिकन राज्यकर्त्यांची कल्पना होती. पण भारताच्या तत्कालीन राज्यकर्त्यांना तेंव्हा समाजवादाचे डोहाळे लागलेले होते. आणि साम्यवादी/समाजवादी युएसेसार त्यावेळेस अमेरिकेचा हाडवैरी होता.
याचा फायदा पाकिस्तानने अचूक उचलला आणि स्वतःला अमेरिकेचा मित्र बनवलं. पुढे स्तालिनने आपल्या करणीने आपल्या समाजवादी राज्यकर्त्यांचे डोळे खाडकन उघडले, ते सोडा...
एक सांगतो, भारत-पाकिस्तानच्या रिलेशनमध्ये जेंव्हा भारत किंवा पाकिस्तान काही करतात तेंव्हा ते त्याच संदर्भात करतात. जेंव्हा तिसरा देश काही अॅक्शन घेतो (मग ते अमेरिकेचं एन्टरप्राईझ असो की अग्नी मिसाईलच्या चाचणीनंतर ऑस्ट्रेलियाने केलेला आपला निषेध असो), त्याला आंतरराष्ट्रिय रंग असतात.
प्लीज डोन्ट गेट फिक्सेटेड लोकली, ट्राय टू सी द होल बोर्ड!
3 May 2013 - 10:27 pm | मदनबाण
अमेरिकेने पीएल४८० {पब्लीक लॉ ४८०) च्या अंतर्गत अगदी निष्कॄष्ठ दर्जाचा गहु (तिथे जनावर पण या गव्हाला तोंड लावायचे नाहीत म्हणे !) भारतात धाडला होता,१९६५ च्या पाकिस्तान बरोबरच्या युद्धात आपली सरशी झाली तेव्हा आपली बाजु घेण्या ऐवजी अमेरिकेने पाकिस्तानचीच बाजु उचलुन धरली आणि आपल्या व्हिक्टरी मार्चला थांबण्यास सांगितले,त्यावेळी देशात धान्याची कमी होती,मग अमेरिकेने हाच निष्कॄष्ठ दर्जाचा गहु पीएल४८० गहु तुम्हाला देणार नाही असा दबाव शास्त्रीजींवर आणला,शास्त्रीजींनी धडाक्यात सांगितले आम्हाला तुमचा गहु नको. आपल्याला "जय जवान जय किसान" ही घोषणा ठावुक असेलच... ती शास्त्रीजींनीच दिली.त्यावेळी देशात अन्नाची कमी आहे तेव्हा दर सोमवारी उपास करा असे शास्त्रीजींनी आपल्या देशातल्या लोकांना आवाहन केले,आणि लोकांनी ते आचरणात देखील आणले.
अशी अनेक आणि असंख्य उदाहरणे देता येतील... असो सध्या चीन कडेच पाहुया.
6 Sep 2013 - 2:17 pm | मदनबाण
पिडां काकांचा वरचा प्रतिसाद परत वाचला, हा लेख वर आला आणि त्यांच्या प्रतिसादातल्या रिचर्ड निक्सन यांचा उल्लेख वाचला...आज चीन विषक लेख शोधताना निक्सन देखील सापडले.
भारत पर हमला करने की फिराक में था अमेरिका, वजह था पाकिस्तान!
असो...हल्ली रशिया आणि चीनची मैत्री फार घट्ट झालेली दिसते आहे !तेल करार आणि इतर वेगवेगळे करार. बरं तो प्रिझम चे भांडाफोड करणारा स्नोडेन हॉकाँग मधुन सरळ रशियात गेला तेव्ह्या या दोघांच्या गहन मैत्रीची कल्पना आली.
जाता जाता :- पाकड्यांना भारता विरुद्ध लढाईत Patton टँक देणारी अमेरिकाच होती. धन्य तो अब्दुल हमीद ज्याने खेमकरण मधे या टॅंकची कबरच बांधुन टाकली.
26 Apr 2013 - 7:11 pm | मराठे
जाऊ द्या हो. चिनही एके काळी भारताचाच भाग होता (अगदी जपान सुद्धा) इतक्यात विसरलात काय?
रच्याकने: एक संवाद
भारतः ए चिन, का रे दादा आलास?
चिनः काय नाय सहज फिरत फिरत आलो, कोणी दिसेना इथं, म्हटलं बघू कुठे गेलायस तू.
भारतः ए असं नाय करायचं हा! मी कट्टी करीन.
चिनः कशी कट्टी करशील? मी तर क्रिकेटपण खेळत नाही. पण तुझ्या क्रिकेटच्या ब्याटी मीच बनवतो!
भारतः ए अमेरीका.. बघ ना कसा हा दादा! चिडवायचा हाच ह्याचा धंदा!
26 Apr 2013 - 7:22 pm | कोमल
अगदी बरोब्बर संवाद.. नाहीतरी कट्टी म्हणुन आपण काय करु शकतो?? क्रिकेटच खेळत नाही न फारफार.. :))
26 Apr 2013 - 7:39 pm | मदनबाण
२०१० पासुन चीनने आपल्या देशात ६०० पेक्षा जास्तवेळा घुसखोरी केलेली आहे.चीनची वॄत्ती दुरगामी विचार करण्याची आहे.माझ्या मता नुसार चीन या घुसखोरीतुन हिंदुस्थानच्या सर्व बाबींचा अभ्यास करत असावा,म्हणजे घुसखोरी झाल्यावर आपल्या देशातुन पहिली प्रतिक्रिया काय उमटते,राजकिय हालचालींना केव्हा आणि कितपत वेग येतो,तसेच आपल्या सैंन्यांची हालचाल नेमक्या कोणत्या प्रकारे केली जाते. याचा एक पॅटर्न तयार होतो ज्याचा चीन अभ्यास करत असावा.मागच्या वेळी मिपावर जपान मधल्या अमेरिकी तळांबद्धल मी एक प्रतिसाद दिला होता,त्यावेळी चीन जपानशी आगळीक करेल असा अंदाज होता,आता तसे घडले आहे हे जगजाहिर आहे.हीच गोष्ट ग्वादार बंदराला देखील लागु होते.
येत्या काही काळात चीन चे एक मोठ्ठे एअरक्राफ्ट कॅरिअर समुद्रात उतरवले जाईल ज्याची बांधणी सध्या चालु आहे,सध्या त्यांच्याकडे रशियन बनावटीचे एकच एअरक्राफ्ट कॅरिअर आहे.चीन आणि जपान यांचे संबंध तणावाचे असतानाच चीन आपल्या देशात आपल्याच जमिनीवर येउन बसला आहे आणि मागे हटण्यास तयार दिसत नाही.
आपल्या देशाचे प्रंतप्रधान त्यांच्या मौना बद्धल प्रसिद्ध आहेत्,या घटने बद्धल त्यांचे मत अजुन तरी माझ्या वाचनात आलेले नाही,पण जपानचे प्रंतप्रधान चीनला काय सांगतात ते इथे वाचता येईल.
आपल्या दॄष्टीने विचार करायचा झाला तर चीनची खरी ताकद ही त्यांच्या निर्यातीत आहे,त्यावर अंकुष आणायला हवा,म्हणजे आपल्या देशाशी होणार्या व्यापारामुळे त्यांना जो फायदा होतो आहे त्यावर अंकुष लावणे आपल्या हातात आहे,तसेच जपान आणि चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे.
बाकी सध्याची आपली परिस्तिती पाहता सर्व लक्ष आर्मी चिफ विक्रम सिंग यांच्यावरच आहे...
26 Apr 2013 - 7:44 pm | मदनबाण
चीनच्या इतर राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे.
हे चीनच्या जवळ असणार्या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे असे हवे आहे.
26 Apr 2013 - 8:03 pm | कोमल
जपान सारखे राष्ट्र एवढेसे* असुनही चिन्यांना टक्कर देतंय, आणि आपली चिन्यांनी खोडी काढली की आप्ल्याला फक्त चर्चाच कराव्याश्या वाटतात...
*एवढेसे हे म्हणणे क्षेत्रफळाच्या बाबतीत आहे टेक्नॉलॉजी बाबत नव्हे..
31 May 2013 - 2:38 am | डॉ सुहास म्हात्रे
नुसती टक्कर नाही. दुसर्या महायुद्धाअगोदर जपानने चीनचा बराच भाग काबीज केला होता. जर दुसर्या महायुद्धात जपानचा पराभव झाला नसता तर कदाचित आजचा चीन आस्तित्वातच नसता.
(नकाशा आंतरजालाच्या सौजन्याने)
31 May 2013 - 2:43 am | डॉ सुहास म्हात्रे
वरच्या नकाशातला तांबड्या रंगात दाखविलेला चीनचा भाग जपानने काबीज केला होता. देशाचे कर्तृत्व त्याच्या क्षेत्रफळाच्या मोठेपणापेक्षा त्याच्या नेतृत्वात किती धमक आहे यावर अवलंबून असते... नाहीतर ब्रिटन सारख्या छोट्या बेटाचे जगभर (कधीच सूर्य न मावळण्याएवढे मोठे) साम्राज्य झाले नसते !
31 May 2013 - 9:50 am | कोमल
सहमत
आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का??
31 May 2013 - 11:36 am | श्रीगुरुजी
>>> आणि हिच धमक भारताच्या नेतृत्वात प्रभावी नाहिये असं म्हणावं लागेल का??
भारताचे वर्तमान नेतृत्व अत्यंत दुर्बल आहे ही वस्तुस्थिती आहे.
30 May 2013 - 3:38 pm | मदनबाण
तसेच जपान आणि चीनच्या जवळ असणार्या राष्ट्रांशी उत्तम घनिष्ठ संबंध स्थापन करणे.
चला मनमोहन सिंग यांना लव्ह इन टोकियोझाले तर...
26 Apr 2013 - 8:31 pm | धर्मराजमुटके
कॉलींग सुधीर काळे !
26 Apr 2013 - 9:12 pm | मदनबाण
घ्या,आत्ता पर्यंत १० किमी सांगत होते आता १९ किमी सांगत आहेत !
Chinese troops have entered 19 km inside Indian territory; what is govt doing?
26 Apr 2013 - 11:33 pm | शिल्पा ब
इतकं होउनसुद्धा पुन्हा काँग्रेसच येणार निवडुन !
बाकी चीनने तिबेट घेतला, अरुणाचलवर हक्क सांगताहेत अन आता फौजा आत घुसायला लागल्यात तरी आपले सरकार गप्पच...अन लोकांना पडली क्रिकेटची चिंता.
उत्तम.
26 Apr 2013 - 11:38 pm | आशु जोग
सध्या मी म्हन्तो संरक्षण मंत्री कोण आहे ?
फार पूर्वी एक होते संरक्षण मंत्री
ते बारामतीतून पाकिस्तानला सज्जड दम देत असत.
पाकिस्तानी कुरापती खपवून घेतल्या जाणार नाहीत. वगैरे
आता असा दम देणारी माणसे राहिली नाहीत.
त्यामुळे शेजार्यांचं फावतय.
26 Apr 2013 - 11:45 pm | आशु जोग
१९६२ च्या चीनबरोबरच्या युद्धात खरे म्हणजे भारतीयांची सरशी होत होती.
एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी पडत होता पण त्यांची संख्याच अफाट, आपण टिकाव धरू शकलो नाही..
एक भारतीय सैनिक पाच चीनी सैनिकांना भारी इ इ अशा थापा यावेळी मारू नयेत ही विनंती.
27 Apr 2013 - 12:27 am | विनोद१८
वरील सर्वान्शी सहमत....!!
याचा पत्ता भारतीय नागरिकाना लागण्यास ३ वर्षे लागली याला काय म्हणावे ??? ज्याना याची जाणीव होती ते यावर कसली उपाययोजना करत होते ?? याचे उत्तर मिळेल काय ?? आम्ही नेहमीच इतके गाफिल का असतो ?? विषेशता शत्रुरास्।ट्रा इतिहास आम्हाला अवगत असताना व पूर्वानुभव असताना ?? हे असे किती दिवस होत राहणार व कधी थाबणार ?? शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चेने' हा प्रश्ण सुटेल का ?? यावर कोणी जाणकार मिपाकर जरा प्रकाश टाकतील का ??
'इन्दिराबाई असताना चीनने असे कधी केल्याचे ऐकिवात नाही..' आज बाईन्ची आठवण प्रकर्षाने येते अशावेळी, कारण त्यान्ची कारकीर्द पाहिली आहे, असा खम्बीर पन्तप्रधान या देशाला दुर्दैवाने पुन्हा लाभला नाही, निदान अशा प्रसन्गी कणखर भूमिका घेणारी व देशाला आधारभूत वाटणारी दुसरी व्यक्ती आज तरी दुर्दैवाने आजच्या आमच्या भारतीय राजकार्णात दिसत नाही.
जर हे प्रकरण चिघळले तर ते आजच्या परिस्थितीत आप्ल्याला ( जनतेलाच फक्त = आजचा सरकारी आम आदमी ) केव्हढ्याला पढेल ?? हासुद्धा एक गम्भीर प्रश्णच आहे.
विनोद१८
27 Apr 2013 - 9:17 am | अविनाशकुलकर्णी
म्हाराष्त्रातल्या टग्याला पाठवा त्या बाजुला सारे चिनि पाय लावुन पळुन जातिल.
27 Apr 2013 - 9:24 am | अविनाशकुलकर्णी
China has moved new advanced longer range CSS-5 missiles close to the borders with India and developed contingency plans to shift airborne forces at short notice to the region, according to Pentagon.
Despite increased political and economic relationship between India and China, the Pentagon in a report to the US Congress said, tensions remain along the Sino-India borders with rising instances of border violation and aggressive border patrolling by Chinese soldiers.
27 Apr 2013 - 10:26 am | वेताळ
ही परिस्थिती आली आहे.शेजारी लायक असेल तर त्याच्याबरोबर शांतीपुर्ण संबध ठेवा. अन्यथा नाठाळाच्या माथी काठी.....
आपण जर चीनच्या त्या सैनिकाना भारतिय हद्दीत प्रवेश करुन चौकी उभी केल्याच्या आरोपाखाली अटक केली तरच ह्या ठिकाणी आपण बाजी मारु अन्यथा ती चौकी वास्तविक नियत्रंण रेषा बनेल.
27 Apr 2013 - 11:03 am | आशु जोग
२ वर्षांपूर्वी अण्णा हजारे यांचे आंदोलन सुरू होते.
त्यावेळी सी बी आय चे लोक अण्णांनी जिथे बालपण घालवले त्या नगर, भिंगार या भागात हिंडत होते
तरुणपणी अण्णांकडून काही वावगे घडले आहे का याचा शोध घेण्यासाठी.
पण ते सापडले नाही. मग हे लोक अगदी लहानपणी शाळेत असताना एखाद्या मुलीबरोबर अण्णंची मैत्री होती का याचा शोध घेऊ लागले.
फार नाही पण पाटीवरच्या पेन्सिलीची देवाण घेवाण करीत असतील तर शोधावे आणि प्रसिद्ध करून टाकावे
म्हणजे भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची धार कमी होइल असा मनिमोहन यांचा अंदाज होता.
यात अण्णांच्या संस्थेला इन्कम टॅक्स खात्याची खोटी नोटीस आणि मग माफी.
हेही प्रकार झाले. (ही माफी सध्याचे मुख्यंत्री यांनी मागितली)
या भंपकांनी(मनिमोहन, दिग्गी, चिदंबरम) एवढे डोके सरहद्दींच्या रक्षणासाठी लावले असते तर बरे झाले असते.
27 Apr 2013 - 11:12 am | मदनबाण
यावेळची स्थिती जराशी वेगळी वाटत आहे,कारण आत्ता पर्यंत जितके वेळा चीनने घुसखोरी केली तितके वेळा ते परत देखील गेले,जाताना सिगरेटची पाकिटे टाकुन जाणे,दगडांवर लाल रंगाने खुणा करणे इत्यादी उद्योग चीनी सैन्याने केले.पण आता मात्र ते जागेवरुन हलण्यास तयार नाहीत.काही जणांचे म्हणणे आहे,की सरकारने कठोर निर्णय घेतला नाही तर कारगिल सदॄष्य परिस्थिती सुद्धा उद्भवु शकते.
आपल्या लष्कराच्या दौलत बेग ओल्डी मधे हालचाली सुरु झाल्याच्या बातम्या आहेत...भारतीय वायुसेना Mi-17-V5 या चॉपर हॅलिकॉप्टरसा वापर करुन सामुग्री पोहचवण्याचे काम करत आहे.
खालच्या दुव्यात तुम्हाला सध्या ज्या क्षेत्रात जिथे या घडामोडी चालु आहेत त्याची सॅटलाईट पोझिशन कळुन येईल.(थॅक्स टू विकिमॅपिया)
यात दैलत बेग ओल्डी येथील अॅडवान्स लँन्डींग ग्राउंड तसेच depsang plains पहायला मिळेल.(डाविकडे वरती)
सॅटेलाईट व्ह्यू :- http://is.gd/l26qGv
27 Apr 2013 - 11:54 am | कोमल
हे आपल्या सारख्याला पटतयं आणि भारताच्या "संयमी" धोरणाने काय धोका उद्भवू शकतो हे ही आपण ओळखू शकतो..
अजून किती दिवस आपण मनमोहन मोड वर राहणार आहोत सरकारलाच ठाउक..
27 Apr 2013 - 11:21 am | मदनबाण
27 Apr 2013 - 1:05 pm | दादा कोंडके
वरचा भारताच्या नकाशाचा भाग म्हणजेच विनोद आहे.
27 Apr 2013 - 2:17 pm | श्रीगुरुजी
चीनने वेळ अगदी अचूक साधली आहे. एक अत्यंत निष्क्रीय व्यक्ती (यशवंत सिन्हांच्या भाषेत 'निकम्मा') पंतप्रधानपदावर कळसूत्री बाहुलीसारखी बसविलेली आहे. त्या व्यक्तीच्य आडून वेगळ्याच व्यक्ती कारभार चालवितात. या व्यक्तीची व सरकारची गेली ९ वर्षे देशाला लुटण्यात गेली. कोळसा घोटाळा, २जी घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा, आदर्श घोटाळा, हेलिकॉप्टर घोटाळा, वड्राच्या भानगडी . . . मोजदाद करता येणे अशक्य आहे. हे सरकार सर्व बाजूंनी भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आहे. एक घोटाळा निस्तरायच्या पुढचा घोटाळा बाहेर येतो. पंतप्रधान आपल्या घोटाळेखोर मंत्र्यांना वाचविण्यात गर्क आहेत. हे सर्व सुरू असताना देश खड्ड्यात चालला आहे याचे कोणालाही भान नाही. निर्णयशक्तीचा संपूर्ण अभाव असलेले निष्क्रीय पंतप्रधान, लूटमार करून देशाची संपत्ती ओरपण्यात मग्न असलेले सरकार, याच लोकांना पुन्हापुन्हा निवडून देणारी जनता व भ्रष्टाचार्यांना संरक्षण देण्यात मग्न असलेली नोकरशाही या सर्वांचा पुरेपूर फायदा उठवून चीनने १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताचा भूभाग बळकावला आहे. भारताचे नेतृत्व अत्यंत दुर्बल असून देशापेक्षा स्वत:ची तुंबडी भरण्यातच ते गर्क आहेत, आपल्याला कणभरही प्रतिकार होणार नाही व केवळ तोंडी निषेधाची वाफ दवडली जाईल हे ओळखण्याइतका चीन धूर्त आहे.
१९६२ मध्ये चीनने बळकावलेला भूभाग आजतगायत परत मिळविता आलेला नाही. चीनने आज बळकावलेला भूभाग परत मिळविणे अत्यंत अवघड आहे. १९६२ नंतर पुन्हा एकदा भारताला एक अत्यंत दुर्बल पंतप्रधान मिळाला हे भारताचे दुर्दैव आहे.
6 May 2013 - 12:20 am | आजानुकर्ण
पूर्णपणे सहमत. मी म्हणतो मिपाकरांना ज्या गोष्टी सहजपणे कळतात त्या गोष्टी सरकारमध्ये बसलेल्या दुढ्ढाचार्यांना कशा कळत नाहीत. इतके मूर्ख सरकार यापूर्वी कधीही मिळाले नव्हते.
काँग्रेस पक्षाने चीन सरकारबरोबर संगनमत करुन त्यांना कर्नाटक मतदान होईपर्यंत तात्पुरती माघार घ्यायला लावलेली दिसते आहे. एकदा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका झाल्या की पुन्हा एकदा चीनला मोकळे रान द्यायला काँग्रेजी नेते मोकळे होतील.
6 May 2013 - 12:22 am | आजानुकर्ण
कदाचित लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळून मोदी पंतप्रधान व्हायची शक्यता असल्याची कुणकुण चीनला लागली असावी व त्यांनी घाबरुन माघार घेतली असावी असाही एक कयास करता येईल.
27 Apr 2013 - 11:51 pm | कोमल
भारताच्या पं.प्र.च्या मते चीनचा मुद्दा फार गंभीर नाही...
काय बरं म्हणावं याला?? माझी शब्द्संपदा (मिपाच्या धोरणांना विचारात घेता) संपली ओ...
28 Apr 2013 - 9:45 am | शिल्पा ब
अहो त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या मते ! बोलविता धनी कोण हे लक्षात घेतलं नै तुम्ही.
28 Apr 2013 - 11:26 am | मदनबाण
त्यांच्या मते म्हणजे मैडमच्या मते !
(चित्र जालावरुन)
बाकी आता देशाचा प्रतंप्रधान सुद्धा जपान मधुन इंपोर्ट करावा म्हणतो ! बाकी सरकारची सर्व परिस्थीती येणार्या काही निकालां नंतर युपीए-२ चे दिवस भरले असे समजुन येईल.
बाकी देशातली राजकिय तसेच सामाजिक अस्थिरता, लयाला गेलीली अंतर्गत सुरक्षा व्यवस्था,चीनची घुसखोरी आणि सबजितल सिंगला पाकिस्तानात झालेली जिवघेणी मारहाण याचात मला एकसुत्रता दिसु लागली आहे.
जाता जाता :--- स्वकीयच जर राष्ट्राची लुट करण्यात मग्न असतील,तर परकियांनी अतिक्रमण केले याचे नवल का वाटावे ?
15 Apr 2014 - 3:45 pm | मदनबाण
या काही दिवसात २ पुस्तके प्रकाशित केली गेली,एक संजय बारू यांचे आणि दुसरे पी सी पारख यांचे. या दोघांनीही मौनी मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावर तोफ डागली आहे,या विषयालाच अनुसरुन असणारे वरती दिलेले व्यंगचित्र परत एकदा आठवले.
28 Apr 2013 - 12:31 pm | श्रीगुरुजी
>>> भारताच्या पं.प्र.च्या मते चीनचा मुद्दा फार गंभीर नाही...
गांधी घराण्याची चमचेगिरी हे एकच काम ते गंभीरतेने करतात. बाकी सर्व म्हणजे देश, जनता, देशाची सुरक्षा, दुष्काळ इ. किरकोळ गोष्टींना ते फार महत्त्व देत नाहीत. शेवटी काही झालं तरी ते थोर अर्थतज्ज्ञ, निधर्मी, हाडाचे राजकारणी नसलेले, सभ्य, सुसंस्कृत वगैरे आहेत. त्यामुळे त्यांच्या इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करायला हरकत नाही. कालचे ते सांगत होते की सर्व जग भारताला हसत आहे. वयोमानानुसार त्यांच्या हे लक्षात आलेले नाही की जग भारताला हसत नसून त्यांच्यासारख्या कठपुतळ्यांना व त्यांच्या महाभ्रष्टाचारी व निष्क्रीय सरकारला हसत आहे.
28 Apr 2013 - 10:15 am | श्री गावसेना प्रमुख
दादु मनमोहन च्यां मते ही समस्या स्थानीक आहे,टेंशन नै लेनेका
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19760729.cms
28 Apr 2013 - 12:04 pm | अप्पा जोगळेकर
आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.
28 Apr 2013 - 12:36 pm | अग्निकोल्हा
हा हा हा एक लंबर.
खरं तर आता जनतेनेच तिथे आंदोलनाला गेले पाहिजे. हे राजकारणी काही हलचाल करणार नाहितच.
28 Apr 2013 - 12:51 pm | श्रीगुरुजी
>>> आजच सुशील शिंदेचे विधान आहे की ती नो मॅस लॅन्ड आहे. मनमोहन म्हणतो की हा स्थानिक मुद्दा आहे. काही कळेनासे झाले आहे.
१९६२ मध्ये चीनने लडाखमध्ये घुसखोरी केली होती तेव्हा नेहरू असे म्हणाले होते की "तिथे गवताचे पातेही उगवत नाही" (म्हणजे तो भाग महत्त्वाचा नाही). वाचाळवीर शिंदे अगदी त्याच अर्थाचे बोलले आहेत. १९६२ ची पुनरावृत्ती होताना दिसते आहे. तेव्हा नेहरूंसारखे भोंगळ पंतप्रधान होते, आज त्यांचीच दुसरी आवृत्ती पंतप्रधानपदावर आहे.
मनमोहन सिंगांना या घुसखोरीचे काहीच महत्त्व वाटत नाही. साहजिकच आहे. ते आपल्याला व आपल्या सहकार्यांना कोळसा घोटाळा व २जी घोटाळ्यातून वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चीनची घुसखोरी अशा किरकोळ मुद्द्यांकडे लक्ष द्यायला त्यांना सवड नाही. एकदा त्यांनी 'Clean Chit' मिळविली की ते ताठ मानेने वावरायला लागतील. पण जनतेच्या मनात मात्र त्यांची 'Clean Cheat' अशीच प्रतिमा कायम राहील.
28 Apr 2013 - 11:48 pm | कोमल
बापरे..
29 Apr 2013 - 10:35 am | मदनबाण
उठा,शिका आणि शाहणे व्हा !
ड्रॅगनचे फुत्कार
29 Apr 2013 - 10:57 am | कोमल
सत्ताधार्यांना कुणी तरी इतिहासाचे पुस्तक आणून द्यायला पाहीजे आणि त्यांची नंतर परिक्षा पण घ्यायला पाहीजे. केंद्रातील कुणालाच देशाची फिकीर नाहीये. काय होणार आहे भारतात देव जाणे. किंवा मैडम जाणे..
29 Apr 2013 - 11:10 am | मदनबाण
स्थानिक मुद्दा ? अहो मनमोहन सिंग तुम्ही याच देशाचे पंतप्रधान आहात ना ? मग हा स्थानिक मुद्दा कसा होउ शकतो ? चीन ने असे उद्गार काढले असते तर आम्ही समजु शकलो असतो कारण चीन चे धोरण समजणे तसेही कठीण्,पण या देशाचा भागावर अतिक्रमण झाल्यावर तो राष्ट्रीय मुद्दा झाला त्याला तुम्ही स्थानिक मुद्दा म्हणण्याची गोडचुक कशी करु शकता ?शिंदेच्या बेताल वक्तव्यांचा मक्ता आता तुम्ही घेतलात काय ?आपल्या देशाच्या आत चीन घुसखोरी करुन तंबु ठोकुन बसला हे आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले सरळ सरळ आव्हान असताना मनमोहन सिंग तुम्ही याला स्थानिक मुद्दा म्हणता ? याचा अर्थ तो भाग आपल्या देशाचा नाही असे तुम्ही जनतेला आडुन सुचवु इच्छिता काय ? सरकारकडुन कठोर वक्तव्याची अपेक्षा असताना हे भलतेच वक्तव्य तुम्ही कसे काय करु शकता ?
प्रतंप्रधानांच्या या वक्तव्याचा एक हिंदुस्थानी नागरिक म्हणुन मी निषेध करतो !
Chinese incursion: 'India should be ready for the worst'
29 Apr 2013 - 11:14 am | शिल्पा ब
तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच.
29 Apr 2013 - 11:25 am | मदनबाण
तुमच्या निषेधाने काय फरक पडणार आहे? बाकी कशानेच काय फरक पडणार आहे हा सुद्धा एक मुद्दा आहेच.
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नावर आपल्या प्रतंप्रधानांनी इतके बेताल विधान करावे हे अपेक्षित नाही,इतरवेळी आघाडीचे सरकार आहे अशी हतबलता हे मनमोहन सिंग सातत्याने बोलुन दाखवत आले आहे,पण देशाच्या सुरक्षतेत सुद्धा आम्ही हतबल आहोत असा संदेश एका प्रकारे त्यांनी आपल्या राष्ट्राला दिला आहे याची चीड मला आली आणि मी निषेध नोंदवला.
एका निषेधाने सरकारला काही फरक पडणार नाही, परंतु या देशाचा नागरिक म्हणुन प्रत्येकाने जिथे जमेल तिथे तो योग्य वेळीच नोंदवलाच पाहिजे.
29 Apr 2013 - 11:59 am | मदनबाण
29 Apr 2013 - 12:18 pm | प्रसाद१९७१
माझ्या इथला ( आणि तुमच्या इथला पण ) नगरसेवक, आमदार खोर्यानी पैसा खातो आहे. पण हे सत्य जर मी सार्वजनिक रित्या बोललो तर माझे हात पाय एक दिवस पण जागेवर रहाणार नाहीत. ह्याला तुम्ही लोकशाही म्हणता का?
अल्पवयिन मुली वर ( ५ वर्षाच्या ) बलात्कार केला म्हणुन तक्रार करायला गेलेल्या बापाला पोलिस २००० रुपये घे आणि गप्प बस असे सांगतात. ह्याला तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था आहे असे म्हणता का?
त्या पेक्षा चीन काय वाईट. कष्ट केले तर नीट जगता तरी येते.
8 Sep 2013 - 8:15 am | टवाळ कार्टा
चीन मध्ये यापेक्शा वाइट आहे...मी ३ महिने होतो तिथे ....तिथल्याच लोकांकडुन ऐकले आहे
8 Sep 2013 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे
पुढे जायचे असेल तर दुसर्याचे गुण घ्यावे आणि त्याच्या दुर्गुणांपासून धडा घेऊन त्यांचा उपयोग आपण ते टाळण्यासाठी करावा. दुसर्याच्या दुर्गुणामुळे आपले दुर्गुण झाकून जात नाहीत आणि सद्गुणही बनत नाहीत.
चीनमधील राजकिय परिस्थिती फार चांगली आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय कम्युनिझमपेक्षा लोकशाही ही केव्हाही जास्त चांगली राजकिय व्यवस्था आहे. तेथले लोक, विशेषतः तरूण, सरकारबद्दल नाराज आहेत आणि तसे उघडपणे बोलूनही दाखवतात.
पण, चीनमध्ये जी काही मूलभूत विकासाची कामे केली गेली आहेत (रस्ते, रेल्वे, विमानसेवा, स्वच्छता, शिक्षण, वैद्यकीय सेवा, उद्योगधंदे, इ.) याबाबतीत भारत त्यांच्या पासंगालाही पुरत नाही हे ढळढळीत सत्य तेथल्या काही दिवसातच दिसते. अर्थात हे सगळे चीनसारख्या आवाढव्य देशात सगळिकडे आहे असे मला म्हणायचे नाही, पण निदान २०-३० टक्के (चीनच्या नागरी विभागांत) तरी नक्की आहे.
त्यामानाने आपल्या येथील सार्वजनीक क्षेत्राची कामगिरी (नागरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत) कशी आहे हे सांगायला पाहिजे काकाय? विकास कामांवर कागदोपत्री खर्च भरपूर आहे पण पावसाच्या दोन थेंबांनी विरघळणारे रस्ते बनवण्याच्या पेटंटावर सर्व जगात केवळ आपलाच पहिला हक्क आहे !
थोडक्यात, भ्रष्टाचार दोन्हीकडेही आहे, पण भारत त्याबाबतीत दर क्षेत्रात आघाडी राखून आहे... ही आजचीच ताजी बातमी "CAG unearths Rs 17,000 crore scam in railways".
29 Apr 2013 - 12:23 pm | प्रसाद१९७१
बिचार्या भारतीय सैनिकांनी का आपले जीवन धोक्यात घालावे ह्या खा खा खाणार्या पुढार्यांसाठी आणि IPL बघणार्या जनते साठी.
आता निवड्णुक आली की राजकारणी लोकांना युद्धज्वर चढेल, तेंव्हा भारतीय सैन्यानी हात वर करावेत. सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांची मुले , भाचे , पुतणे जर सैन्यात जाउन सीमेवर लढणार असतील तर च लढावे.
1 May 2013 - 12:44 am | कोमल
29 Apr 2013 - 12:43 pm | खबो जाप
जे काही चीन सध्या करत आहे ते फक्त नाटक आहे, आपल्या सरकारला इकडे अडकवून दुसर्या भागात ( अरुणाचल किव्हा पी वो के मध्ये ) भयंकर काहीतरी करत आसवे किव्हा तयारी करत आसवे असे वाटते आहे.
शिवराज साहेब म्हणा प्रतिभा बाई म्हणा किव्हा सुशीलकुमार साहेब म्हणा आपल्या महाराष्ट्रीय नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारण किव्हा पद भूषवायची लायकीच नाही आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते आहे.
29 Apr 2013 - 1:54 pm | मालोजीराव
भारतात मिलिटरी सर्व्हिस कंपल्सरी व्हावी अशी तीव्र इच्छा आहे (किमान १२ महिन्यांसाठी तरी)
2 May 2013 - 12:12 pm | मन१
+१०००
सिरियसली सहमत.
मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी करत नाहित तर मग निदान ऐच्छिक तरी करा म्हणावं.
"मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका.
(सध्या नाकारल्या जाणार्या उमेदवारांचे प्रमाण खूपच अधिक आहे, काटेकोर नियमांमुळे.)
ह्याचा फायदा फक्त लष्करी संख्याबळ वाढण्यात होइल असे नाही तर नागरी/सिव्हिलियन जीवनातही एक शिस्त्,निष्ठा आणि एक प्रकारची जबाबदारीची जाणीव्/जाण निर्माण होइल अशी आशा करतो.
3 May 2013 - 10:23 am | सुबोध खरे
मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी किन्वा"मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका.
हि वाक्ये व्यासपीठावरून बोलायला छान आहेत. एकदा लष्करी भरती च्या छावणी मध्ये जाऊन पहा बाराशे लोकांची भरति असेल तर तेथे पन्नास हजाराचा जमाव असतो यातील फक्त दोन हजार केवळ दहावी/ बारावी झालेले कच्चे लोक निवडून काढून त्यांना दोन वर्षे प्रशिक्षण देऊन पोलादी हृदयाचा सैनिक बनवणे हे सोपे काम नाही. मुळात दर वर्षी होणार्या भरती साठी सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाच ठेवावा लागतो त्यात जे लोक नापास होतात ते भ्रष्टाचाराचे आरोप करून दंगल करतात हा प्रकार थांबवणेच इतके कठीण आहे कि एकशे विस कोटी लोकसंख्येच्या दहा टक्के म्हणजे बारा कोटी तरुणांना एक वर्ष लष्करी शिक्षण कोण देणार आणि त्यांच्या एक वर्षाच्या खाण्या पिण्याचा खर्च कोण करणार?
मुळात बारा लाख लष्करापैकी दीड लाख हे लष्कराच्याच प्रशिक्षणात आणि आधुनिकीकरणात गुंतलेले आहेत. त्यांना तेथून बाहेर काढून बारा कोटी लोकांना एक वर्ष प्रशिक्षण देणे हे शक्य आहे का?
अवांतर चालू द्या
5 May 2013 - 5:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अगदी अगदी... लष्करातील नोकरी आणि खिरापत यात मनोबांचा अंमल घोळ झाला आहे.
7 May 2013 - 12:41 pm | मन१
विमे, खिरापत कसली?
कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का?
खरे ह्यांनी सांगितलेल्या व्यावहारिक अडचणी मान्य आहेत. पण त्यावरही काही उपाय काढता येतो का हे पहायला हवं.
अधिक संख्येनं खडं लष्कर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही मला आवश्यक वाटतं. निदान अंतर्गत सुरक्षितता ठेवण्यास लष्कर मिळेल. व बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल. त्याहून महत्वाचे म्हणजे एक मोठा reserve force तयार होइल. (अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्या म्हायुद्धात बरीच मदत झाली होती.)
.
नागरी जीवनात शिस्त का आवश्यक आहे, हे मी वेगळे सांगायची गरज आहे का? शेकडो हजारो मुद्दे देता येतील. सध्या एकच उदाहरण सांगतो. १९६५ आणी १९७१ च्या युद्धाच्या वेळी मुंबैसारखा शहरांत रात्री युद्धजन्य आणीबाणी घोषित केली होती. रात्री दिवे लावू नयेत अशा सूचना होत्या.(दिवे लावल्यास शत्रू विमानांना शहरे अचूकतेने ओळखता येतील असे भय होते.) इतके असूनही भारतीय फार मोठ्या संख्येने ह्या सूचनेचे उल्लंघन करीत होते. ह्याबद्दल ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जिम्मेदारी आहे(जे थेट सीमेवर लढत नाहियेत) अशा त्यावेळच्या कित्येक लष्करी अधिकार्यांनी नापसंती नि चिंता व्यक्त केली होती. पण सवयीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केले गेले. नशीब हेच की इतके असूनही आपल्या शहरांवर खरोखर हल्ल झाला नाही.
बाकी विषयांतर होतय हे मान्य.
7 May 2013 - 12:57 pm | बॅटमॅन
अबे बाकी ठीके, पण आर्थिक मुद्दा बघ ना. जास्त लष्कर म्हंजे हौ जास्त इज इनफ अॅण्ड हौ मच फर्दर इज अ बर्डन? आपली लोकसंख्याच तेच्यायला इतकी आहे की हे सांभाळणं लै कठीण होईल. अनझेपेबल होण्याच्या एकमेव कारणामुळे मला हे नको वाट्टेय.
8 May 2013 - 2:30 am | विश्वनाथ मेहेंदळे
लष्करी प्रशिक्षण की लष्करात नोकरी?? दोन्हीत फरक असेल असा माझा अंदाज आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच.
शिवाय त्या देशांची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यात प्रचंड फरक आहे. भारतात हे कठीण आणि मुख्य म्हणजे अनावश्यक आहे.
असे वाटत नाही. रेल्वेत सैनिकांना अनावश्यक दादागिरी करताना पाहिले आहे. (सैन्यातील अधिकारी आणि इतर सैनिक यांच्यात किती आणि कसा फरक असतो हे नीटसे माहित नाही). बेशिस्त हा आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे हे मान्य, पण हा उपाय कितपत जमेल ते माहित नाही.
रशियन सैन्याची संभावना बाजारबुणग्यांचे सैन्य असे होत असे असे ऐकून आहे.
8 May 2013 - 12:21 am | अर्धवटराव
शिस्त, धैर्य वगैरे सद्गुण बाणवायला सैनीक भरती कंपल्सरी करण्याची काहि आवश्यकता नाहि. मैदानी खेळ, सामाजीक उपक्रम (अगदी नदी सफाई पासुन ते बालवाडी शिक्षण वगैरे) यांचा शैक्षणीक जीवनात व्यवस्थीत समावेश झाला तरी काम भागेल. महिन्यातुन एकदा जरी गाव खराटा घेऊन उभं राहिलं तरी रोगराई खलास होईल. मुंबई शहराने अगदी ठरवुन पावसाळ्यापुर्वी दोन रविवार आपले मनोरंजन कार्यक्रम बंद ठेऊन नाले साफसफाई केली तर रस्ते तुंबण्याची शक्यता शुण्य होईल... (पण हे होण्याची शक्यता देखील शुण्य आहे ;) )
अर्धवटराव
8 May 2013 - 2:21 am | प्यारे१
आत्ता असं नाहीये म्हणता?
एन एस एस च्या नावाखाली १० १० दिवसांचे कँप होतात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. फोटो येतात पेप्रात, आहात कुठं? व्हेअर आर यु? ह्या कॅंपांमध्ये नेमकं काय चालतं नि कसं चालतं हा संशोधनाचा विषय आहे म्हणा.
संघाचे वर्ग, एन सी सी कँप असं बरंच बरंच आहे. पण अवाढव्य लोकसंख्येला पुरेसं होत नाही. :(
30 Apr 2013 - 7:57 pm | मदनबाण
चिनी सैनिक घालतायेत घिरट्या....
India to take ‘every step’ to deal with Chinese incursion
जाता जाता :---
"This is the most serious incursion by the Chinese in over a quarter of a century," Brahma Chellaney, {professor of strategic studies}
30 Apr 2013 - 10:02 pm | sagarparadkar
ते काँग्रेसप्रेमी चाचा कुठे गेले .... अशा विषयांवर ते बरोब्बर गप्प कसे बसतात ....
1 May 2013 - 2:45 pm | नितिन थत्ते
असो.
हा धागा वाचून मागे मिपावर असाच एक मॅरॅथॉन धागा आपण इंचाइंचाने काश्मीर घालवतो आहोत म्हणून निघाला होता त्याची आठवण झाली.
शेकडो प्रतिसादानंतर काश्मीरात आपण माघार घेत नसून प्रगती करत आहोत असे धागाकर्त्यांनीच येऊन सांगितले.
शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
2 May 2013 - 8:04 am | श्री गावसेना प्रमुख
2 May 2013 - 11:55 am | श्रीगुरुजी
>>> शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
मनमोहन सिंगांनी मिपाकरांचा सल्ला घ्यावा किंवा अजून कोणाचाही घ्यावा. अगदी प्रियांकाच्या बाळांचा सल्ला घेतला तरी हरकत नाही. पण नुसता सल्ला घेऊन डोळे मिटून चेहर्यावर दीन, पतित, अन्यायी, केविलवाणे भाव आणून स्वस्थ बसून राहू नका. निष्क्रीयता सोडा, दुर्बलता सोडा, कोळसा घोटाळा/२जी घोटाळा/राष्ट्रकुल घोटाळा इ. अगणित घोटाळ्यातील भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणे सोडा, चौकशी अहवाल बदलून खोटे अहवाल तयार करणे सोडा, सोनिया किंवा राहुल कडून आदेशांची वाट बघू नका. योग्य ती लष्करी कारवाई करून भारतीय भूमीत घुसलेल्या चिन्यांना हाकलून लावा. अर्थात तुमच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे चंद्र मागण्यासारखे आहे. पण काय करणार, राहवत नाही म्हणून लिहितो.
2 May 2013 - 1:11 pm | मदनबाण
शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
हॅहॅहॅ... चच्चांकडुन अपेक्षित असलेलीच प्रतिक्रिया ! मनमोहन सिंग यांना सध्या कोणा-कोणाचा सल्ला घ्यावा हाच प्रश्न पडलेला असावा.बाकी चच्चा तुमच्या आवड्या कॉग्रेस बद्धल हा लेख सुद्धा वाचा जरा...
सारवासारवीतली सक्रियता
जाता जाता :--- आपल्या लष्कराचे दुर्दैव असे की आपल्या वायझेड राजकारण्यांमुळे त्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे,मग कारगील योद्द्यांना अमानुषपणे ठार करणे असो,वा सैनिकांची मुंडकी तोडुन नेणे असो...आमचं सरकार फक्त "शाब्दिक" निषेध नोंदवण्यापलीकडे काहीच करत नाही,आणि हेच आता चीन बाबत घडताना आपण सर्व हतबलतेने पाहत आहोत. चीनने आपल्या देशात तंबु ठोकुन आज बहुतेक १८ दिवस पूर्ण झाले आहेत आणि लष्करी तत्परतेचा (कारगिल प्रमाणेच यावेळी देखील आपल्या लष्कराचे इंटलिजन्स फेल्युअर झाले.) आणि राजकिय धोरणाचा पार चुरळा झाला आहे. :( जग आपल्याकडे पाहुन हसतय ! हे हिंदुस्थानी म्हणे महासत्ता होण्याच्या बाता मारतात,जे साध्या ४० सैनिकांना त्यांच्याच देशातुन हुसकवुन लावु शकत नाही...
Chinese troops may never leave Ladakh: Intelligence officials
30 Apr 2013 - 10:08 pm | श्रीरंग_जोशी
चिनी सैन्यतुकडीची घुसखेरी चिंतेची बाब आहे.
मला अशी आशा वाटत आहे की, भारतीय लष्कर प्रत्यूत्तराची पूर्वतयारी करत आहे.
अन चिन्यांना गाफील ठेवण्याचा डावपेच म्हणून सरकार एकदम संयमीत प्रतिक्रिया देत आहे.
याप्रकारची रणनिती बांग्लादेश मुक्तीसंग्रामात यशस्वीरित्या वापरली गेली होती
30 Apr 2013 - 10:43 pm | कोमल
त्यावेळी पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं, त्यांनी नाही म्हटलं तरी भारतासाठी बरचं काम केलं होतं. आत्ताची परिस्थिती याच्या पूर्ण उलट आहे. आता ममो खेळणं पंतप्रधान आहे. जर तुम्ही म्हणलात तसा सरकारचा डाव(???) असेल तर "जिओ युपिए२". पण हे कल्पनातीतच वाटतं..
30 Apr 2013 - 10:48 pm | श्रीरंग_जोशी
सध्या केवळ अंदाजच बांधल्या जाऊ शकतो.
चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाही. बारीक सारीक कुरापती काढत राहणे हे नेहमीचेच आहे. काही दिवसांनी / आठवड्यांनी हे घुसखोर परत जातील अर्थात भारताकडून काही अटींची पूर्तता करून.
30 Apr 2013 - 11:53 pm | कोमल
नक्की कसल्या अटी याचे अंदाज नाही बांधले का तुम्ही अजुन??
तुम्ची दुखावण्याची व्याख्या मला कळू शकेल का?? भारताच्या हद्दीच्या आत तंबू ठोकले आहेत त्यांनी.. अजून काय करायला पाहीजे त्यांनी म्हणजे "आपण" दुखावले जाऊ??
1 May 2013 - 12:06 am | श्रीरंग_जोशी
वॄत्तपत्रांतील बातम्यांमध्ये याबाबत लिहून आले आहे. भारत सीमाभागात लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. टेळहणी साठी युद्धसज्ज तुकड्या तैनात करत आहेत. या सर्व गोष्टींची तीव्रता कमी व्हावी यासाठी दबावाची खेळी खेळली जात आहे.
जोवर हल्ला व लष्करी चकमकी होत नाही तोवर तरी आपण अधिकॄतरित्या दुखावले जाऊ असे दिसत नाहीये.
लष्करी प्रत्युत्तर हि अधिकृतरित्या दुखावले जाण्याची खूण समजावी.
फार पूर्वी जे एन दिक्षित यांचा लेख वाचला होता तेव्हा वाटाघाटी करताना चिनी केवढे संयमी चिवट असतात अन भारतीय बाजू घाई गडबड करून स्वतःच्या अडचणी वाढवते याबाबत लिहिले होते.
1 May 2013 - 12:32 am | कोमल
मराठी मधील एका अग्रणी वृत्तपत्रातील बातमी विरोधी पक्ष काय बोलत आहेत किंवा का बोलत आहेत हा वादाचा मुद्दा आहे.. पण वृत्तपत्र तरी हेच दाखवत आहेत.. याला काय म्हणावे?? आणि या बातमी खालीच असलेली बातमी, पंप्र निवडणुकीच्या प्रसारात मग्न आहेत.
तुम्ही म्हणत आहात तशी ही जर दबावाची खेळी असेल तर उत्तमच,
पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का??
वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का??
जाता जाता- वाटाघाटीची वेळ नेहमीच का हो येते आपल्यावर??
1 May 2013 - 12:42 am | श्रीरंग_जोशी
दुवा पाहिला. विरोधी पक्ष आपले काम करत आहेत.
माझ्या निरिक्षणानुसार भारत सरकार (कुठल्याही पक्षाचे / आघाडीचे असो) व भारतीय लष्कर माध्यमांद्वारे आक्रमकता न दाखवता प्रत्यक्ष कारवाईवर भर देतात.
मागे एका चर्चेत याचे एक उदाहरण दिले होते.
वाटाघाटी द्विपक्षीय असतात. ती वेळ सर्वांवरच येते.
1 May 2013 - 8:09 pm | कोमल
चर्चा वाचली आणि तुमचा लेखही वाचला. लेख खुप आवडला.
पण ती चर्चा ज्या वर आहे ती परिस्थिती (कंदहार अपहरण) आणि सद्द परिस्थिती(चीनची) यांची तुलना होऊच शकत नाही. त्यावेळी वाटाघाटी केल्या होत्या कारण कैक लोक प्रत्यक्ष ओलिस होते. आणि त्वरीत निर्णय घेणे गरजेचे होते.
आताच्या मुद्याबद्दल विचार केला तर १० दिवस झाले आहेत चिन्यांना भारतात तंबू ठोकून, त्यांनी (अजूनतरी) अपहरण करणे, ओलिस ठेवणे या गोष्टींना सुरवात केली नाहीये, पण म्हणून सरकारने काहीच ठोस पावले न उचलता भारतीय जनतेला आणि पर्यायाने जगाला काही वेगळा संदेश दिला आहे अस नाही वाटत का?? चीनने सुद्धा अशा गोष्टींना सुरवात करावी का, जेणे करून वाटाघाटीची वेळ येइल आणि चीन अजून आपल्या देशाचा काही हिस्सा खिशात घालेल, (कदाचीत) परत जाइल आणि पुन्हा काही दिवसांनी परत येइल..
तुम्ही
याबद्द्ल काहीच मत नाही मांडलेलं..
2 May 2013 - 4:13 am | श्रीरंग_जोशी
मी वर जो दुवा दिला होता तो ज्या प्रतिसादाचा होता त्यात हे उदाहरण लिहिले होते.
या घटनेचा अजिबात गाजावाजा होऊ दिला गेला नाही. असे काही घडलेच नाही या प्रकारचीच उत्तरे माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय लष्कराच्या अधिकार्यांकडून मिळत होती.
सदर प्रकरणात पहिली आगळीक भारताकडून घडावी याची व्युहरचना चीनने केलेली असावी असा अंदाज आहे.
हेच जर याविरुद्ध घडले असते तर चीनची प्रतिक्रिया काय राहिली असती यावर मी काही बोलू शकत नाही कारण त्या विषयाचा माझा अभ्यास नाही.
मला एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक देशाची एक प्रकृती असते त्याविरुद्ध वागायला गेले की फसगत होऊ शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची विश्वासहर्ता चीनपेक्षा केव्हाही अधिक आहे.
बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.
2 May 2013 - 6:06 pm | कोमल
नक्कीच काही तरी गैरसमज होतोय.
१)पाक विरोधी केलेली ही कारवाई स्तुत्यच आहे, पण हे घडलं भाजप सत्तेवर असतांना, सध्या सत्ता काँग्रेस कडे आहे. (मी भाजप ची समर्थक नाही, हं पण काँग्रेस विरोधक नक्की आहे)
२)भारत-पाक संबंध आणि भारत- चीन संबंध खूप वेगळे आहेत. जे पाक सोबत घडवून आणलं ते चीन सोबत शक्य वाटत नाही. भारताचे पाक बद्द्लचे धोरण आणि चीन बद्दलचे धोरण यांत प्रचंड तफावत आहे, दोन्ही देश भारताचे कट्टर शत्रु असले तरी. त्यामुळे पाक वर केलेल्या कारवाईचा मुद्दा चीन प्रकरणी तुलनात्मक नाही ठरु शकत.
३)अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे.
शिवाय यात सध्या चीन ने धुसखोरी केलेला प्रदेश दौलत बेग ओल्डी दिसत आहे. आणि हा प्रदेश चीनचा नाही हे कुणीही सांगु शकेल.
आणि राहीली गोष्ट "चिनी सरकार हातावर हात ठेऊन बसलं असेल" असे चीनी जनतेला वाटत असण्याची तर ती शक्यता नसावीच कारण तेथील सरकारने तेथील जनतेलाच खूप हवालदील केले आहे.
असो, माझे म्हणणे एवढेच आहे की चीन बाबत एकदा तोंड पोळलं आहे, पाकविरूद्ध केलेल्या काही यशस्वी कारवायांमुळे सरकारकडून युद्धनीतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.
2 May 2013 - 6:43 pm | श्रीरंग_जोशी
हे प्रकरण असो वा इतर कुठले, माझे विचार असेच आहेत की जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो व परराष्ट्र धोरणांचा विषय असतो तेव्हा कुठल्याही पक्षाचे आघाडीचे सरकार असो सरकारचे धोरण व लष्कराचे धोरण फारसे वेगळे नसते. अन या बाबतीत आपली सरकारी व्यवस्था बेजबाबदार असते असे मी मानत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या डावपेचांत कधी आपले शत्रू वरचढ ठरू शकतात तर कधी आपण.
उठसूठ स्वतःच्या देशाच्या धोरणकर्त्यांवर अविश्वास दाखवणे मला पटत नाही. नोव्हे २०१२ मध्ये कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी सफाईने करण्यात आली याबाबत संबंधितांचे अभिनंदन करणारे स्टेटस मी माझ्या चेपूवर टाकले तर लगेच कुणीतरी जालावर फिरत असलेले १० प्रश्न त्यावर प्रतिक्रिया म्हणून टाकले त्यापैकी काही तर अक्षरशः कॉमन सेन्सने उत्तर देण्यासारखे होते. त्यावर मी उत्तर दिले कसलेही ठोस कारण नसताना मी माझ्या देशाच्या व्यवस्थेबद्दल उगाचच संशय निर्माण करण्यात सहभागी होणार नाही. अनेकांच्या चेपूवर इतर देशांचे नागरिक मित्र असतात. काय प्रतिमा बनत असेल आपल्या देशाची?
प्रत्येक सरकार निवडून देण्यात आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटा असतोच. ५ वर्षांसाठी त्यांच्यावर कामगिरी सोपवली आहे ना मग प्रत्येक कृतीवर अविश्वास दाखवण्याची घाई करणे बरोबर नाही.
सतत अविश्वास दाखवणे खूप नुकसानदायी असते, मग तो मैत्रीत, नात्यात असो वा स्वतःच्या सरकारविषयी.
2 May 2013 - 11:17 pm | कोमल
विषयांतर होत आहे आता.. तुमच्या विचारांनुसार चर्चा वाढवली तर बरेच फाटे फुटतील.
एकच छोटीशी कथा सांगते,
"एक आटपाट नगर होते. बाकीच्या नगरांसारखेच. एके दिवशी त्या नगरीत एक माणूस येतो अन नगरीतील लोकांच्या सोबतीने राहु लागतो. काही दिवसांनी तो त्या नगरीत दंगे-धोपे सुरु करतो. लोक त्याला समजावतात. तो समजतो. अजून काही दिवसांनी तो चोरी मारी करू लागतो. लोक त्याला प्रचंड दम भरतात. तो काही दिवस दबून वावरू लागतो. पुन्हा थोड्या दिवसांनी सक्रिय होतो आणि प्रमाणापेक्षा जास्त वाइट धंदे सुरु करतो. लोक त्याला गावातून हाकलू लागतात, तो खूप गयावया करतो, माफी मागतो, पण लोकांचा त्याच्यावरील विश्वास उडालेला असतो."
तुम्ही जर त्या नगरीतील एक नागरिक असले असता तर तुम्ही काय बरं केलं असतं??
विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व..
2 May 2013 - 11:26 pm | श्रीरंग_जोशी
पण मी ज्या नगरीत लहानाचा मोठा झालो त्या नगरीत एवढेच होत नाही.
मी सरकारी अनुदानाच्या शाळा कॉलेजात शिकलो. सरकारी धोरणांमुळे उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्माण झाले. त्यातून निर्माण झालेल्या रोजगारामुळे माझ्या घरात चूल पेटते. सरकारी अनुदानाचं इंधन मी वापरतो. सरकारच्या सौजन्याने विकसित झालेल्या पायाभूत सुविधांचा मी पुरेपूर वापर करतो.
अतिरेकी नकारात्मकतेमुळे विशेषकरून गेल्या तीन वर्षांत देशाचे बरेच नुकसान झाले आहे.
विषयांतराबद्दल क्षमस्व!!
3 May 2013 - 11:47 am | ऋषिकेश
'बळकावलेला' वर काहिसा असहमत / साशंक. यावर इथे वेगळा धागा उघडला होता
1 May 2013 - 12:00 am | विकास
"In international diplomacy there are no permanent friends or permanent enemies, only permanent interests." - Prince von Otto Eduard Leopold Bismark
थोडक्यात, जर का आपण आपला (म्हणजे देशाचा) स्वार्थ सांभाळत नसलो तर इतर कुठल्या शत्रूची गरज नाही, आणि पाळत असलो तर इतर आपोआप मैत्रीसाठी हात मागतील.
1 May 2013 - 12:28 pm | मदनबाण
खरयं...
आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही,आणि लष्करालाही घेउ देत नाही.
सारखं यांच तुणतुण वाजवण चालु आहे की चीनला दुखवणे योग्य नाही,पण चीन आपल्या खोड्या काढतोय आणि जागा बळकवुन बसला आहे...जे सरकार त्यांच्या निर्णय पंगुत्वासाठी प्रसिद्ध पावलं आहे,ते कुटनितीचा वापर करण्याची गोष्ट करतो आहे.चीन हळुहळ्य या भागात तंबुंची संख्या आणि सैनिकांची संख्या लवकरच वाढवेल अशी शक्यता मला वाटते.
ज्या हिंदुस्थानी सैंन्याने १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबरचे युद्ध फक्त १३ दिवसात संपवले,तेच हिंदुस्थानी सैन्य या साध्या तंबुंच्या विरोधात साधे पाउलही उचली शकत नाही,हे फक्त आपल्या सरकारच्या दुबळ्या नितीमुळे होत आहे.
जर ते आपल्या सिमेत येउन घुसुन तंबु गाडुन बसतात,तर आपल्या सैन्याने देखील त्यांच्या सिमेत घुसायला हवे,मग बघा चीनची प्रतिक्रिया काय होईल...
जाता जाता :- चीन जरी लष्करी दॄष्ट्या आपल्या पेक्षा वरचढ असेल तरी सुद्धा आपल्या सैन्याचा युद्ध अभ्यास / अनुभव हा त्यांचा पेक्षा जास्त आहे.त्यांना फक्त सरकारने मोकळीक द्यायची गरज आहे...
2 May 2013 - 5:00 pm | प्रसाद१९७१
त्यांच्या स्वार्थाचे निर्णय अगदी घाईघाईनी घेतय सरकार. २जी, कोळसा, साखर कारखाने - लगेच ताबडतोब निर्णय.
2 May 2013 - 10:11 am | मदनबाण
लडाखमधील लष्करी ठाणी मोडीत काढा
2 May 2013 - 10:40 am | मदनबाण
India misreads Chinese incursion, ties itself in knots
Chinese incursion 19km, but 750 sq km at stake for India
3 May 2013 - 4:27 am | श्रीरंग_जोशी
http://www.nytimes.com/2013/05/03/world/asia/where-china-meets-india-pus...
या बातमीमधले शेवटचे वाक्य रोचक आहे.
The latest spat between India and China is bound to resolve itself this year, one way or another. In six months, snow and bitterly cold weather will make the Chinese encampment very difficult, if not impossible, to maintain.
5 May 2013 - 8:24 pm | कोमल
निसर्ग तरी मदतीस आहे आपल्या म्हणायचं.
पण ती चिनी माणसं आहेत. काय काय तयारी करून आले असतील सांगता येत नाही
3 May 2013 - 10:17 am | इरसाल
"घेंतला थोडा भाग, घुसलें थोडे मधे तर त्यांची नाकं थोडीच बाणेदार होणार आहेत भारतीयांसारखी, ती तशीच रहातील चपटी-चपटी".
बाकी जागेचे थोडे शिंतोडे पाकिस्तान्कडे उडवा बाकीचे चीनकडे, जमल्यास बांग्लादेशालाही द्या अर्ध्य.
4 May 2013 - 1:00 pm | आशु जोग
चीन बाबत आमचे नेहमीच दुर्लक्ष होते.
यासाठी हे पहावे
5 May 2013 - 8:19 pm | कोमल
खरोखरच दुर्लक्ष होतं आपलं..
आता पाहिलं पाहीजे खुर्शिद साहेब काय बातमी घेऊन येत आहेत ते..
5 May 2013 - 9:27 pm | मदनबाण
ताज्या बातमी नुसार आज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळे नुसार चीनी सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे.
आपले ITBP {Indo-Tibetan Border Police} चे लोक उद्या सकाळ पर्यंत दैलत बेग ओल्डी मधेच थांबुन राहणार आहेत आणि चीनी सैन्याची माघात निश्चित झाल्यावर माघारी परतणार आहेत.
दुवा:-
Indo-China border incursion row ends,withdraw troops from Ladakh
5 May 2013 - 9:29 pm | मदनबाण
भारतीय प्रमाण वेळे नुसार
संध्याकाळी ७:३० वाजल्या पासुन.
5 May 2013 - 9:58 pm | मदनबाण
चीनची ही खुसखोरी तर आपल्याला कळलेलीच आहे,पण मागच्या महिन्यात त्यांनी वेगळ्याच प्रकारे घुसखोरी केली होती त्याची बातमी सुद्धा याच धाग्यावर सांगणे महत्वाचे आहे. मागच्या काही काळात चीन ने सायबर अॅटॅक करण्याचे सत्र आरंभले होते आणि त्यात लक्ष होते DRDO{Defence Research and Development Organisation}
जास्त माहिती खालील दुव्यांवर मिळेल :---
INDIA's biggest Hack ever DRDO system's data hacked and uploaded in China
DNA Exclusive: India's secrets are in Guangdong
India’s secrets in China: Chinese hack DRDO security systems
5 May 2013 - 10:23 pm | चिरोटा
ईकडे दिलेली माहिती चांगली आहे.
The informal border separating China and India is known as the Line of Actual Control. While it has never been formally demarcated, the countries have signed two accords to maintain peace in frontier areas.
Both countries have sought to keep the row low-key, keen not to disrupt their booming bilateral trade
http://www.scmp.com/news/china/article/1230083/india-foreign-minister-ma...
भांडण मिटलेले दिस्तेय. सूप प्यायला हरकत नाही.!
5 May 2013 - 10:37 pm | कोमल
दिलेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद मबा. तरीही धोका टळलेला नाहीच. असो. पुन्हा अशा गोष्टींकडे भारताने वेळीच लक्ष पुरवले पाहिजे. योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. आपमतलबी चीन कधीच कुरपती काढणं थांबवणार नाही.
6 May 2013 - 12:16 am | आजानुकर्ण
मिपावरील संरक्षण तज्ज्ञांचे अत्यंत आभार. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे भारत सरकारला चिन्यांच्या कुरापतींची जाणीव झाली व मिपाकरांच्या रेट्यामुळे व सल्ल्यामुळे हा प्रश्न योग्यप्रकारे तडीस नेणे सरकारला भाग पडले. अन्यथा येथेही आपले सरकार तोंडघशी पडले असते.
6 May 2013 - 2:22 pm | श्रीगुरुजी
इथेही भारताचा पराभवच झाला. चीनने म्हणे १९ किमी आत येऊन ठोकलेले तंबू काढून टाकले आहेत, पण चीन परत १९ किमी मागे जाणार का थोडेच अंतर मागे जाणार हे अजून नक्की नाही. आणि तंबू काढून टाकण्याच्या बदल्यात चीनने भारताचे नियंत्रण रेषेच्या आतील भारतीय भूभागातील सैन्य मागे घ्यायला लावले आहे. म्हणजे चीनने भारताला स्वतःच्याच भूमीतून सैन्य मागे घ्यायला लावले.
आपले सैन्य आपल्याच भूमीतून मागे घ्यायला लागले तरी चीनला भारताच्या हद्दीत घातलेले तंबू काढावे लागले हा भारताचा दैदिप्यमान विजय आहे. अत्यंत मुत्सद्दी रीतीने व शांततेच्या मार्गाने जरब दाखवून चीनला नमवून आपण महासत्ता असल्याची जगाची पुन्हा एकदा खात्री पटविल्याबद्दल युपीए सरकारचे त्रिवार अभिनंदन! आपण राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवू असे आपले पंतप्रधान म्हणताच चीनला धडकी भरली व लगेच भारताला स्वतःच्याच भूमीतून मागे जायला लावण्याच्या किरकोळ अटीवर चीनने आपले तंबू गुंडाळले. आपल्या सर्वाच्या पूर्वपुण्याईनेच इतके खंबीर व कणखर पंतप्रधान व सरकार आपल्याला लाभले आहे. जय हो!
7 May 2013 - 12:26 pm | श्रीगुरुजी
चीनची भारतीय क्षेत्रातून माघार. युपीए सरकारच्या कणखरतेची व समर्थ परराष्ट धोरणाची पुन्हा एकदा प्रचीती.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19926783.cms
8 May 2013 - 2:04 am | विश्वनाथ मेहेंदळे
हेच लिहायला आलो होतो. आता थत्तेचाचा आणि आजानुकर्ण काका काय म्हणतात ते पाहू.
8 May 2013 - 9:46 pm | आजानुकर्ण
थत्तेचाचांचे माहिती नाही, पण निदान मी तरी संरक्षणसिद्थतेच्या बाबतीत पूर्णपणे मिपावर अवलंबून आहे. सरकारला काडीचीही अक्कल नसल्याने मिपाकरांवर विश्वास ठेवणे भाग पडते. मिपावरील संरक्षणतज्ज्ञांनी या संपूर्ण प्रकारात भारताने चीनविरोधात शेपूट घातले आहे याची प्रखर जाणीव सरकारला करुन दिली की हे पाऊलही सरकार मागे घेईल येत शंका वाटत नाही. तेवढे नकाशे वगैरे तयार झाले की मिपाकरांतर्फे सरकारला निवेदन जाईलच याची खात्री आहे.
8 May 2013 - 10:00 pm | श्रावण मोडक
मी गेले काही दिवस हा धागा सातत्यानं पाहतोय. इतरही धागे पाहतोय. चीनच्या त्या संरक्षणविषयक 'व्हाईट पेपर'वर अजून इथं काहीच कसं मतप्रदर्शन नाही झालं तज्ज्ञांचं, असा प्रश्न पडलाय... एवढा ऑनलाईन उपलब्ध असलेला व्हाईटपेपर आणि तरीही इथं मौन? काही तरी गौडबंगाल आहे.
9 May 2013 - 12:37 am | विश्वनाथ मेहेंदळे
उपरोध सोडा, मुद्द्याचे बोला.
मुद्दे नसले की हे उपरोध वगैरे वापरून वेळ मारून न्यायची, नै ??
8 May 2013 - 12:35 pm | श्रीगुरुजी
इथले काँग्रेस समर्थक एकदम बेपत्ता झालेले दिसताहेत. मला वाटलं की भारताने चीनवर मिळविलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल इथे अभिनंदनाच्या प्रतिसादांचा पूर येईल. पण इथे तर शुकशुकाट दिसतोय. बाकी कोणी नसलं तरी निदान मी तरी या विजयाबद्दल सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. मी काँग्रेसचा कट्टर समर्थक नसलो तरी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.
8 May 2013 - 12:52 pm | पिंपातला उंदीर
ते तुम्हाला करावे लागेलच हो. पण कारगिल मध्ये आपण जो भू भाग गमावला त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहात आपण.
8 May 2013 - 2:38 pm | कोमल
पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? ;)
8 May 2013 - 8:32 pm | श्रीगुरुजी
>>> पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना??
छे छे! अशी वेळ जवळपास रोजच येत असते. काँग्रेसची कामगिरीच अशी आहे की काँग्रेसचं रोज कौतुक करावं लागतं. आता आजचंच बघा. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा काँग्रेसचं कौतुक केलंय. मग आपण कशाला मागे रहायचं!
8 May 2013 - 9:48 pm | आजानुकर्ण
येथे सरकारचे अभिनंदन करण्याचा प्रश्नच नाही. अभिनंदन त्या मिपाकरांचे की ज्यांनी सरकारला या प्रश्नाची प्रखर जाणीव करुन दिली. त्यामुळे काँग्रेस समर्थक इथे आले नसावेत असे वाटते.
8 May 2013 - 12:52 pm | पिंपातला उंदीर
बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन. आणि निवडणुकी मध्ये ३ क्रमांक वर गेल्या बद्दल सहानुभूती
8 May 2013 - 8:29 pm | श्रीगुरुजी
>>> बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन.
काँग्रेसची बरोबरी कशी होणार हो? भ्रष्टाचारामध्ये काँग्रेसची पीएचडी आहे तर भाजप अजून लोअर केजीतच गटांगळ्या खातोय. किंवा असं समजा की भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.
8 May 2013 - 10:47 pm | कोमल
पण शेवटी सगळे एकाच माळेचे मणी की हो गुर्जी..
याचं थोडं कमी, त्याचं थोडं जास्त..
8 May 2013 - 9:15 pm | पिंपातला उंदीर
भाजप लोवर केजी मध्ये आहे हे तरी मान्य केलेत. हे ही नसे थोडके.
27 May 2013 - 10:24 am | कोमल
भारतात रस्ता पण बांधला राव यांनी, आता फक्त पायघड्या टाकून स्वागत करायचे बाकी आहे.
वेलकम चायना
27 May 2013 - 8:08 pm | श्रीगुरुजी
जेव्हा संपूर्ण सरकार भ्रष्टाचार आणि लूटमार करण्यात गर्क असतं आणि नेतृत्व अत्यंत दुर्बल, निष्क्रीय, निर्विकार, हतबल आणि निर्णयक्षमताहीन असतं, तेव्हा शत्रूराष्ट्रे फायदा उठवणारच. १९४८ आणि १९६२ मध्ये अगदी असंच घडलं होतं. या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने!
27 May 2013 - 8:52 pm | नितिन थत्ते
>>या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने!
ऐला !! १०-११ महिन्यांनी काय होणार आहे? भलतेच आशावादी ब्वॉ तुम्ही.
28 May 2013 - 11:54 am | श्रीगुरुजी
१०-११ महिन्यांनी काय होणार आहे? भलतेच निराशावादी ब्वॉ तुम्ही!
6 Sep 2013 - 9:39 am | मदनबाण
चीन ने Depsang, Chumar and Pangong Tso. या तीन भागात जवळपास 640 sq kms भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आहे.
काही दुवे :-
China army not letting Indian troops patrol LaC
Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report
China 'gobbles’ up 640 sq km of Indian land in Ladakh
6 Sep 2013 - 10:05 am | कोमल
चिनी त्यांचा स्वभाव सोडणार नाही आणि भारत आपला..
उद्या सकाळी उठून दारात मटा ऐवजी चायना डेली आणि चितळें ऐवजी सान् लू दिसू नये म्हणजे मिळवली..
9 Jun 2020 - 5:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपण भारतीय सध्या कोरोनाने परेशान असतांना चीन्यांनी पुन्हा लडाखकडील काही भागात घुसखोरी केली आहे, असे वाचनात आले नव्या या वादाबद्दल कोणी माहिती देऊन तो सर्व सीमेचा वाद समजावून सांगेल काय ?
-दिलीप बिरुटे
9 Jun 2020 - 5:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दोनहजार तेरामधलेच वाक्य आताही कालपरवा टीव्हीवर ऐकलं. एकदा या चिन्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, सारखा आपला काही ना काही भाग भुभाग कोरत असतात.
-दिलीप बिरुटे
9 Jun 2020 - 7:46 pm | मदनबाण
या वादाबद्दल कोणी माहिती देऊन तो सर्व सीमेचा वाद समजावून सांगेल काय ?
हा खालचा व्हिडियो पहा :-
इतर :-
अवांतर :-
गुलाल चित्रपटातील माझं आवडत गाण एका वेगळ्या फॉरमॅट मध्ये :-
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Sooni Sooni... :- Cheeni Kum
10 Jun 2020 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लडाखमधून अडीच किलोमिटर चीनी सैनिक मागे फिरल्याच्या बातम्या येत आहेत व अजूनही आज त्या स्तरावर चर्चा होणार आहे. चला काहीतरी आशादायक घडत आहे.
चीनला भीती ही मार्केटचीच आहे, त्याच्यामुळेही थोडा बॅक आला असावा असे वाटते. किती जागेवर ते पुढे आले होते आणि ते किती मागे फिरले यावर अधिकृत काहीही माहिती कुठे दिसत नाही.
-दिलीप बिरुटे
11 Jun 2020 - 12:22 pm | मदनबाण
The aggression – and the fact that Indian Prime Minister Narendra Modi didn’t see it coming – shows just how miserably his China policy has failed.
मोदी सरकारच्या चीन रणनीतीचा मोठा पराभव आणि त्याची देशाला चुकवावी लागणारी किंमत !
विरोधाभास :-
Amidst ‘Boycott China’, Government of India Creates Official ‘TikTok’ Account
‘Modi’s Aatma Nirbhar Bharat?’ Twitter in Shock After Government of India Creates Official TikTok Account
इन्फोवॉर ? :-
Old Reports Of RBI Granting Licence To Bank Of China Shared As Recent
Amid anti-China feelings, Modi government permits Chinese bank to start operations in India
Bank of China Obtains License to Operate in India
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
11 Jun 2020 - 12:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे आपल्या बळकावलेल्या जागांचं आहे का काही या लिंकांमधे ? लिंका आणि व्हीडीयोवर लै फोकस तुमचा. :)
सारांश पण सांगतीला मग बरं पडतं.....
-दिलीप बिरुटे
11 Jun 2020 - 4:33 pm | मदनबाण
अरे आपल्या बळकावलेल्या जागांचं आहे का काही या लिंकांमधे ?
एकंदर ६० किलोमीटर चीन ने त्यांच्या ताब्यात घेतली आहे.
संदर्भ :-
China has captured 60 sq km of Indian land!
भारत की 60 वर्ग किमी ज़मीन चीन के कब्जे में, मोदी सरकार चुप, बीजेपी चुप
५६ इंच छाती ६० किलोमीटर जाई पर्यंत काय करत होती बरं ? मोदीं चा निषेध !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
11 Jun 2020 - 9:35 pm | मदनबाण
चीन ने त्यांची तैनाती आणि वेपनरी वाढवली असुन आपल्या बाजुने देखील आर्टीलरी आणि सैन्याची डिप्लॉयमेंट वाढवली गेली आहे आणि वाढवली जात आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
11 Jun 2020 - 10:04 pm | मदनबाण
India deploys main battle tanks closer to Chinese border – Defence News of India
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- There's absolutely no evidence that PLA is willing to roll back its encroachments.
12 Jun 2020 - 1:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चीनी सैन्य साठ किलोमिटर आत घुसलेय आणि आपण त्यांना मागे अडीच किलोमिटर मागे ढकलले यात आपण खुश दिसत आहोत. गलवान खो-यावर त्यांनी आपला दावा केला आहे.
सरकार इतक्या मोठमोठ्या गोष्टी करत असते पण या विषयावर काही कुठे बातम्या दिसत नाही. चीनची ताठर भूमिका गलवान खोरे आपलाच असल्याचा दावा.
-दिलीप बिरुटे
12 Jun 2020 - 3:09 pm | अर्जुन
चीनने साठ चौरस किलोमीटर भाग ताब्यात घेतला आहे. साठ किलोमीटर आत आलेला नाही. अडिच किलोमीटर मागे गेला, म्हणजे किती भूभाग सोडला हे नक्की सांगता येणे कठिण आहे.
14 Jun 2020 - 2:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
साठ चौरस किमि म्हटलं तरी त्यांनी त्यांनी २४ बाय २.५० कि.मि. भाग बळकावला असेल असे समजू म्हणजे, तरी ते पंचवीस एक किलोमिटर आत घुसलेच आहेत ना ? लांबी रुंदीचा हिशेब लागत नसल्यामुळे नेमका किती भागात घुसखोरी केली आणि अडीच किमी म्हणजे फ़ारच थोडा भाग परत मिळालाय ना ?
सरकार इतक्या गप्पा करीत असतं, पण इथे मात बॅकफूटवरच गेलोय हे स्पष्ट आहे, थोडं थोंड करुन पार लडाख पर्यंत येऊ द्या. :(
-दिलीप बिरुटे