मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

राजघराणं's picture
राजघराणं in जे न देखे रवी...
27 Apr 2013 - 8:23 am

१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त तमाम मराठि बंधु भगिनी आणि मातांसाठी खास घरचा आहेर :-

मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

a

मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

खरतर लिहायची होती एक रटरटुन उकळती कविता
ज्यात असतील गरुड , ज्वालामुखी आणि भवानी तलवार
छातीचा कोट , दर्यादिली आणि पोलादी मनगटे उचलती भार
उत्तुंग ध्येयांची हंड्या झुंबरं - सह्याद्री , समुद्र आणि शिवराय

कारण माय मराठीचे अभिजात शब्दवैभव
नक्कीच ओघळेल तुमच्या लवलवत्या जिभांतुन
पेलवेल शुपकर्णांना कोटि शब्दांचा बोजड भडिमार
आणि आशाळभूत डोळ्यांनाही दिसेल दिल्लीचे तख्त वारंवार

पण छाताडात मावायचे नाही कोणतेच स्वप्न महान
तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

अरे धूत , मराठि वाघ आहोत आम्ही वाघ
ग्यानबाला तुक्यासकट जातीच्या चिखलात बुडवला
शिवाजीचा राजकीय स्टंट करून टाकला
बाकी लोकांबद्दल विचारूच नका -
आमच्या भावना दुखावतात तात्काळ
हा - पण गांधी बाबाला आम्हीच ठोकला

१ ० ५ वेळा थडग्यावर कोकलू माझे राष्ट्र महान
तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

आम्ही देशभरात रोवू शकतो बीज प्रांतियतेचे
धर्मांधतेचे , जातीयतेचे आणि टग्या झुंडशाहिचे

पण शिवाजीच्या डोळ्यांनी आम्ही पाहू शकत नाही
स्वप्न उत्तुंग राष्ट्रियतेचे, परिश्रमाचे , उद्योगाचे
चौकाचौकात तंबाकू मळत आम्ही संघटना बांधु
किंवा बिहार्यांना शिव्या देऊ , काचा फोडू , बदडून काढु

आणि १ ० ५ वेळा थडग्यावर कोकलू - दार उघड बये दार उघड
तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

एके दिवशी नियती नावाची बाया खरोखर दार ठोठाविल
तुमच्या छातीवर लावायला तिने सृजनातले नोबेल आणलेत
तेंव्हा तुमच्या गुलाबी छात्या आजच साफसूफ करून ठेवा

पण तोपर्यंत - मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

अधिक वाचनासाठी लिंक पहा

http://drabhiram.blogspot.in/2013/04/blog-post_26.html

संगीत

प्रतिक्रिया

अविनाशकुलकर्णी's picture

27 Apr 2013 - 9:45 am | अविनाशकुलकर्णी

कविता आवडली दिक्षित..लगे रहो

अग्निकोल्हा's picture

27 Apr 2013 - 10:01 am | अग्निकोल्हा

पण छाताडात मावायचे नाही कोणतेच स्वप्न महान
तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा

_/\_

अमोल केळकर's picture

27 Apr 2013 - 10:07 am | अमोल केळकर

अरेरे.... :(

अमोल केळकर

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Apr 2013 - 10:44 am | विश्वनाथ मेहेंदळे

"तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला गुमान पडुन रहा" हे वाक्य "तेंव्हा मराठी कबुतरांनो वचळणिला पडुन रहा गुमान" असे केले तर यमक जुळेल.

बाकी पहिले चित्र आवडले. कविता पण चांगली आहे.

प्यारे१'s picture

27 Apr 2013 - 2:02 pm | प्यारे१

विमेशी बा डी स.

अभ्या..'s picture

27 Apr 2013 - 3:35 pm | अभ्या..

आम्ही इतके दिवस वळचणीला पडून राहणे असे म्हणत होतो :(
ते अ‍ॅक्चुली वचळण असते आज कळले. :)