स॑ण आणि संस्कृती.

तुमचा अभिषेक's picture
तुमचा अभिषेक in काथ्याकूट
25 Apr 2013 - 5:35 pm
गाभा: 

काल रात्री ठिक बारा वाजता जेव्हा घड्याळाचे दोन काटे एकमेकाना भिडले अन तिसर्‍याने त्यांच्यापासून दूर पळायला सुरुवात केली तेव्हा अचानक मे भयानक कानठळ्या बसवणारे आवाज अंगाखांद्यावर कोसळू लागले अन मी पुरता बावचळून गेली की काय हे, मुंबई आयपीएल मध्ये एक मॅच काय जिंकली तर फटाक्यांच्या लडीच्या जागी कानफाडी करणारा कसला हा गोंधळ...

आवाजाचा धमाका इतका जोरदार होता की तब्बल सत्तावीस सेकंद उलटून गेल्यावर मी भानावर आलो आणि आणखी सतरा सेकंदांनी म्हणजे एकूण चव्वेचाळीसाव्या सेकंदाला मी ओळखले की हा आवाज एका भल्यामोठ्या स्पीकरमधून येत होता ज्याचा "बास" इतका जबरदस्त होता की "आता बास" म्हणावेसे वाटत होते अन "ट्रबल" तर जणू एखाद्या शांतताप्रिय माणसाला ट्रबलमध्ये टाकणारा होता.

पुढची काही सेकंदेच नव्हे तर मिनिटेच्या मिनिटे मी या खोलीतून त्या खोलीत पळापळ करत एकेक खिडक्या बंद करत होतो. जेव्हा शेवटची खिडकी बंद केली तेव्हा अचानक आवाज बंद झाला. मी एक दीर्घ श्वास घेतला. पण दुसरा श्वास घेतो न घेतो तोच दुसरे गाणे सुरू. या दोन गाण्यांच्या मधल्या काळात माझ्या आईने मला माहिती पुरवली की "अरे बाळा, उद्या हनुमान जयंती नाही का, त्याचीच असावीत ही गाणी....

शक्य आहे की नाही यावर आम्ही चर्चा करत होतो अन दोन्ही गाण्यांचे मिळून आतापर्यंत जे भक्तीपर शब्द कानावर पडले होते त्यावरून एका निष्कर्शाला पोहोचणारच होतो इतक्यात आमच्या त्या हनुमानाच्या जयंतीच्या अनुमानाची शकले उडवणारे तिसरे गाणे सुरू झाले... वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ.. वान्ना बी माय छम्मकछल्लो.. ओ ओह ओ..

बस्स पुढे काय ते विचारू नका.. चादर फक्त डोक्यावरून, पंखा फुल्ल स्पीडला, कानात कापसाचे बोळे, अन मुखी तोडकीमोडकी रामरक्षा म्हणत मी झोपी गेलो.

सर्व मिपाकरांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा.!

सण हे सणासारखे साजरे करा, सांस्कृतिक मुल्ये जपता येत नसल्यास किमान उपद्रवमूल्यांचा त्याग करा हिच विनंती. !

- Tumcha ABHISHEK

प्रतिक्रिया

उपद्रवमूल्य टाळणे कुणाच्या कधी डोक्शात तरी शिरणारे की नाही काय माहिती :( लै पिडतात लोक. वर टीका केली की संस्कृतिद्वेष्टे ठरवतात ते आणि वेगळंच.

अप्रतिम's picture

25 Apr 2013 - 5:56 pm | अप्रतिम

तुम्ही हिंदूद्वेष्टे आहात.मुस्लिमांचे नमाज दिसत नाहित काय?

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 8:59 pm | तुमचा अभिषेक

आजवर मला तरी त्यांच्या नमाजचा त्रास झाला नाही. अन्यथा नक्कीच त्यावर देखील बोललो असतो. बाकी वर्षातून दोनचार वेळा त्यांचा जुलूस निघतो तेव्हा संध्याकाळी ट्राफिक जाम होते खरे, पण हा आपल्या धर्मीयांचा सण नाही असा विचार करून त्याचा त्रास जे करून घेतात त्यांनाच त्रास होतो, अन्यथा त्यातही त्रासदायक असे काही नसते.

असो,
लेखात नुसते १२ वाजता स्पीकर लावला याचा उल्लेख नसून "छम्मकछल्लो" हे बॉलीवूड गाणे रात्रीच्या वेळी लाऊन काय सण साजरा केला हा मुद्दाही आहे. त्यावर देखील भाष्य कराल अशी अपेक्षा आहे.

अप्रतिम's picture

25 Apr 2013 - 11:08 pm | अप्रतिम

उपरोधाने म्हटले आहे.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 11:20 pm | तुमचा अभिषेक

हो ते जाणवले नंतर.. पोस्ट केल्यावर.. की यात उपरोधही असू शकतो... पण पोस्ट अशी काही चिडून वगैरे नव्हती लिहिली त्यामुळे मग राहू दिली तशीच.. :)

अर्धवटराव's picture

25 Apr 2013 - 9:06 pm | अर्धवटराव

असल्यास उपरोध छान जमलाय...

अर्धवटराव

सरळ पोलिसांत तक्रार का नाही केलीस गड्या?
माझा या बाबतीत अनुभव चांगला होता. शेजारच्या गल्लीत कुणाचं तरी लगीन वाजत होतं. संध्याकाळी ६ला चालू झालेला धिंगाणा ११:३० झाले तरी कमी व्हायचं नाव घेईना. सरळ जवळच्या चौकीत फोन लावून तक्रार केली. दहाव्या मिंटाला सगळे आवाज बंद झाले. :)

कुणाचं तरी लगीन वाजत होतं. संध्याकाळी ६ला चालू झालेला धिंगाणा

एक तर चूक करणार वर चू़कीचा गाजावाजा करणार? ये कुछ हजम नही हुआ!! =))

पिलीयन रायडर's picture

25 Apr 2013 - 6:29 pm | पिलीयन रायडर

हा माझा खुप आवडता उपाय आहे.. (छंदच म्हणा ना..)
आणि तो चक्क लागु पण पडतो...!!

ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या नातेवाईकाचे असते तर त्यांना तंबी मिळाली असती का हा प्रश्न आहे.;)
आजकाल तर दहीहंडी, गणपती उत्सव, संकष्टी, प्रदोश, हनुमान जयंती, गांधी जयंती, १५ आगष्ट, सौवीस जाणेवारी, नगरशेवकाचा वाड्डीवस, रामजन्म, अशा सगळ्या गोष्टींसाठी गाणी वाजत असतात आमच्या घराजवळ. फोन केला तर आपले बोलणे पलिकडे तर त्यांचे आपल्याला ऐकू येत नाही. शिवाय घराघरातून मुलांचे पहिले वाढदिवस, जन्मदीन टाईप गोष्टींसाठी जवळच्या देवळात पैसे दिले जातात. त्यमुळे तिथे पुन्हा गाणी सुरु करून बराच प्रसाद शिजवून येणार्‍याजाणार्‍यांच्या हातात कोंबला जातो. माझ्या हातात भाजी, इस्त्रीचे कपडे, ब्रेड, अंडी असताना प्रसादाचा मोठा द्रोण कोंबला होता एकदा. यालाच द्रोण हल्ला म्हणतात वाटते. ;)

बॅटमॅन's picture

25 Apr 2013 - 7:01 pm | बॅटमॅन

मंत्री आणि द्रोण हल्ला याबद्दल एकदम सहमत!!! आणि मंत्रीच कशाला, फालतू कॉर्पोरेटर असला तरी दादागिरी बघण्यासारखी असते.

यालाच द्रोण हल्ला म्हणतात वाटते.

हाहाहा सही!!
मध्यंतरी देवळात गेले असता कोणीतरी विजयालक्ष्मीची पोथी अन प्रसाद कोंबला हातात अन चेहर्‍यावर तूपाळ सात्विक भाव तर इतके की जणू ती पोथी देऊन जागचे कल्याण करताहेत. आता ती पोथी केरातही टाकायचे जीवावर येते. फुक्कटची रद्दी. यांनी उद्यापने करायची व भार आम्ही वहायचा :(

हो. माझ्या वडीलांनी बरेच दिवस देवांची चित्रे असलेली क्यालेंडरे "टाकायची कशी?" म्हणून ठेवली. शेवटी त्याला किडे झाले आणि किड्यांनी ती क्यालेंडरे खाऊन टाकली. काही दिवसांनी बघायला गेले तर फक्त बारीक मेट्यालिक पट्ट्या शिल्लक होत्या. म्हटले "चला, काम झाले." ;)

कोमल's picture

25 Apr 2013 - 7:42 pm | कोमल

ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या नातेवाईकाचे असते तर त्यांना तंबी मिळाली असती का हा प्रश्न आहे

माझ्या बाबतीत तर हा अनूभव निगेटीव्ह आला होता.. ऐन परिक्षेच्या काळात कोणत्या तरी संत्र्याच्या नातेवाईकाला लग्न करायची हूक्की आली.. संध्याकाळ पासून सुरु झालेला धिंगाणा १२:३० वाजले तरी थांबेना. पोलीसांना फोन लावला तर ते कारवाई करतो म्हणाले. अर्ध्या तासाने आम्ही पून्हा फोन लावला तर म्हणे साहेबांवर कशी कारवाई करणार.. आणि यावर कहर म्ह्णून कि काय त्यांनी आम्च्यावरच प्रश्नांची सरबत्ती केली, "तुम्हाला सकाळी अभ्यास करता येत नाही का?? रात्री कसला अभ्यास करायचा असतो??" वगैरे वगैरे.. :))

"तुम्हाला सकाळी अभ्यास करता येत नाही का??
हा हा हा.

ते लग्न एखाद्या मंत्र्याच्या नातेवाईकाचे असते तर त्यांना तंबी मिळाली असती का हा प्रश्न आहे.

मंत्र्याच्या नाही पण नगरसेवकाच्या घरचं होतं ते लग्न. :) आम्हालाही खात्री नव्हती, सुखद आश्चर्याचा धक्काच बसला होता आवाज बंद झाल्यावर.

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 9:11 pm | तुमचा अभिषेक

नगरसेवकाला लोकल मतदारांना नाराज करायचे नसावे ...

बाळ सप्रे's picture

26 Apr 2013 - 11:53 am | बाळ सप्रे

पोलिसात तक्रार करुन खरच फायदा होतो.. १०-१५ मिनिटात स्पीकर बंद झाल्याचा अनुभव बर्‍याच वेळा घेतला आहे .
पण एकदा लग्नाचा "गोंधळ" चालू होता म्हणून ११:०० ला फोन केला बराच वेळ झाला तरी बंद होण्याची चिन्हं दिसेनात. म्हणून परत फोन केला.. तर "लाउडस्पीकर"ला बंदी आहे, पारंपारीक वादयांना नाही या पळवाटेमुळे पोलिस काही करु शकले नाहीत असं समजलं!! :-(

अगदी अगदी. मी तर मोबाईल की पॉलिसी काहीतरी हरवल्याच्या दाखल्यासाठी पो.स्टे. मधे वाट पाहात असताना माझ्या समोरच स्टेशनमधल्या पोलीसाने कंप्लेंट आल्याबरोबर लगेच बीट मार्शलला फोन लावून "अमुक स्कूल ग्राउंडवरच्या समारंभात जा आणि स्पीकर बंद करुन टाक" असा आदेश दिला होता.

असो...

आनंद आहे...

हिंदू धर्मावर प्रेम करणार्‍यात अजून एकाची भर..

धर्मराजमुटके's picture

25 Apr 2013 - 7:21 pm | धर्मराजमुटके

व्हेअर आर यु सर ? हिच तर आपली खरी संस्कृती आहे.
उदा.
खेळसंस्कृती म्हणाल तर फ्क्त क्रिकेट.
गायनसंस्कृती म्हणाल तर फक्त बॉलीवूडी गाणी
नर्तनसंस्कृती म्हणाल तर फक्त बॉलीवूडी आयटेम साँग्स
वाचनसंस्कृती म्हणाल तर फक्त वर्तमानपत्रवाचन.

नर्तनसंस्कृती म्हणाल तर फक्त बॉलीवूडी आयटेम साँग्स
इथं हामेरिकेत अनेक ठिकाणी बॉलिवूड डान्स शिकवले जातात. एका लहान मुलीचा पार्ट्नर मुलगा आजारी पडल्याने तिची आई माझ्या मुलाला विचारत होती की तो तानियाचा डान्स पार्टनर बनेल का? अर्थातच तसे नंतर झाले नाही. ;)
अनेक ठिकाणी बॉलिवुडी नाचांना इंडीयन डान्स म्हटलेले ऐकले आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Apr 2013 - 7:31 pm | अविनाशकुलकर्णी

रोज नमाजाच्या भसाड्या आवाजात गर्जना होतात..त्या निमुटपणे ऐकुन घेता तसे हे पण घ्या हाच त्या वर उपाय

मराठी_माणूस's picture

25 Apr 2013 - 8:13 pm | मराठी_माणूस

तो आवाज खुप सुसह्य आहे असे नाही पण अजून तरी तो आवाज नाक्या नाक्या वर , चौका चौकात , गल्ली बोळात तासंतास ऐकलेला नाही

मुक्त विहारि's picture

25 Apr 2013 - 8:59 pm | मुक्त विहारि

ती पण वेळ येवू घातली आहे..

मराठी_माणूस's picture

25 Apr 2013 - 8:13 pm | मराठी_माणूस

तो आवाज खुप सुसह्य आहे असे नाही पण अजून तरी तो आवाज नाक्या नाक्या वर , चौका चौकात , गल्ली बोळात तासंतास ऐकलेला नाही

अविनाशकुलकर्णी's picture

25 Apr 2013 - 8:16 pm | अविनाशकुलकर्णी

अहो हनुमान जयंति वर्शातुन एकदाच येते..हे भसाडे आवाज लाऊद स्पिकर वरुन दिवसातुन ५ वेळा गल्ली बोळातल्या मशिदितुन ३६५ दिवस येत असतात.

उपास's picture

25 Apr 2013 - 8:49 pm | उपास

मूळात असे सार्वजनिक आवाज चुकीचे आहेत हे वाटण्याऐवजी, त्याने आवाज केला म्हणून मी ही करणार, असा प्रतिवाद करणे हास्यास्पद आहे!
लाऊडस्पीकरवरुन मोठमोठ्याने आरत्या करणं, गरबा हे तितकच अस्पृहणीय आहे जितकं की नमाजाचे भोंगे किंवा कानठळ्याबसवणारी गाणी.
रुग्णांचा, मुलांच्या अभ्यासाचा विचार कोणी आपणहून करत नाही हे वाईट आहेच पण दहा नंतर सार्वजनिक ठिकाणी आवाज बंद हे नियमही पाळले जात नाहीत म्हणून (महान संस्कृती असलेला) भारत पुढे काय करतो बघायचे!!
- (पुनश्च हतबल) उपास

क्लिंटन's picture

26 Apr 2013 - 8:14 am | क्लिंटन

अहो हनुमान जयंति वर्शातुन एकदाच येते.

हो तशी राम नवमी, दत्त जयंती, कालाष्टमी, गजानन महाराजांचा प्रकटदिन, आंबेडकर जयंती, शिवजयंती इत्यादी सुध्दा वर्षातून एकदाच येतात.हा आता म्हणावा तर गणपती हा अपवाद आहे.तो आला वर्षातून एकदाच तरी १०-११ दिवस असतो हो.बाय द वे, दहिहंडीच्या दिवशी एकदा माझ्या ऑफिसच्या भागात---परळमध्ये येऊन बघा.अक्षरशः अवर्णनीय धिंगाणा चालू असतो तिथे.इतका वेळ उतू चाललेले इतके रिकामटेकडे लोक या जगात असतात हेच मला पूर्वी माहित नव्हते.गणपती विसर्जनाच्या वेळी पुण्यात लक्ष्मी रोड, कुमठेकर रोड या परिसरातील हार्ट पेशंटनी तिथून दूर जावे हेच उत्तम.नाहीतर वेळ आली तर रूग्णवाहिकाही तिथे पोहोचू शकणार नाहीत.

बाकी मशिदीवरील भोंग्यांचा मला काहीच अनुभव नाही.मी आजपर्यंत राहिलो आहे तिथे मशीद इतक्या जवळ नव्हतीच मुळी.पण असे धिंगाणे त्या भोंग्यांवरूनही चालत असतील तर त्यालाही तितकाच विरोध आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

25 Apr 2013 - 9:07 pm | अविनाशकुलकर्णी

मशिदिचे भोंगे वाजतात यावर बोलणार नाहि..पण हनुमान जयंति आली कि बोलणार..धन्य आहे स्युडोसेकुयुलर पणाची

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 9:15 pm | तुमचा अभिषेक

काका, लेखात नुसते १२ वाजता स्पीकर लावला याचा उल्लेख नसून "छम्मकछल्लो" हे बॉलीवूड गाणे रात्रीच्या वेळी लाऊन काय सण साजरा केला हा मुद्दाही आहे. त्यावर देखील भाष्य कराल अशी अपेक्षा आहे.

आणि हो, मनाचे नाही लिहिलेय हे.. खरेच ते गाणे लागले.. सुरू झाले आणि मी व बायको विचारात पडलो की देवाचे रीमिक्स गाणे आहे की काय.. पण नाही..

गंमत बघा.. हनुमान रामाचा भक्त.. यांनी यांनी गाणे रावण चे लावले. ;)

मुक्त विहारि's picture

25 Apr 2013 - 9:23 pm | मुक्त विहारि

पण तुम्ही त्याच वेळी आम्हाला मशिदीच्या भोंग्याचा पण त्रास होतो ... हे लिहिले असते तर जास्त बरे झाले असते..

आणि अजून एक गोष्ट आहे..

तुम्ही मग हाच मुद्दा आधी घालायला हवा होता...

माझा गैरसमज झाला.. मी माफी मागतो..

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 11:31 pm | तुमचा अभिषेक

माफी कशाला ओ..
मशिदीच्या भोंग्याचा आमच्याइथे त्रास नाही तर मुद्दाम तसे लिहिणे चूकच ना..
इथे ही स्पीकरच्या आवाजाने होणारा त्रास हा मुद्दा आहेच.. पण तेच गाणे जर देवाचे असते तर त्रास सुसह्य झालाही असता, किंवा एखाद्याच्या श्रद्धेला मान देऊन सहन केलेही असते असे समजा..

देवाचे रीमिक्स गाणे आहे की काय
असे गाणे (त्याला उत्तरप्रदेशी भजन म्हणतात) एका मित्राने ऐकवले होते.
देवी के पिछे क्या हे, देवी के पिछे....देवीपर दिल है आया, मातामे मन है लगाया.... असे काहीसे गात होते म्हणे! ही चेष्टा नव्हे, खरे आहे.

हसावे की रडावे तेच कळत नाहीये :(

तुमचा अभिषेक's picture

25 Apr 2013 - 11:24 pm | तुमचा अभिषेक

हो अशी गाणी सर्रास लागतात.. आणि कोणताही देव यातून सुटला नसावा..

कवितानागेश's picture

26 Apr 2013 - 12:18 am | कवितानागेश

मी मागे 'खोया खोया चांद' च्या चालीवर 'बोलो साईराम' ऐकलय! :(

तुम्ही कृष्णजन्माष्टमी दिवशी "राधा ही बावरी" ऐकलंय कधी..?

मी ऐकलंय!

(बाकी तुमच्या उदाहरणापेक्षा हे बरेच सुसह्य आहे)

एका दिवाळीदिवशी रेडीओवर (टिव्ही नसण्याच्या काळी)हरियाली और रास्ता मधलं 'लाखो तारे आसमान में, एक मगर ढुंढे न मिला, देखके दुनिया की दिवाली दिल मेरा चुपचाप जला' हे गाणं लावलं होतं.

:-))

बरोबर आहे की.. "दिवाली" शब्द आला की नाही इतकेच बघणार रेडीओवाले! :-D

"दिपावली मनाएं सुहानी.. मेरे साई के हातोंमें जादू का पानी" हे गाणे वर्षानुवर्षे फक्त दिवाळीच्या दिवशीच ऐकले आहे.

बाळ सप्रे's picture

26 Apr 2013 - 9:54 am | बाळ सप्रे

आणखी एक आमच्या जवळपासच्याच गल्लीत ऐकलेले..
धूम मचा ले गणपतीबाप्पा ssss

चिगो's picture

26 Apr 2013 - 6:52 pm | चिगो

अहो गणपती बाप्पावर 'वक्का वक्का'चं रिमीक्स ऎकलंय, आज्जे.. पार विंग्रजीत गेलीय भक्तीगीतं(?) आता.;-)

अर्धवटराव's picture

25 Apr 2013 - 9:12 pm | अर्धवटराव

अख्ख्या रावणी सेनेने केला नसेल तेव्हढा उच्छाद आपल्या हॅप्पी बड्डेला दरवर्षी होताना बघणं हेच नशिबी उरलं मारुतीरायाच्या.

अर्धवटराव

कवितानागेश's picture

26 Apr 2013 - 12:16 am | कवितानागेश

शिवाजी महाराजांच्या सुद्धा नशीबात तेच आहे.
टिळकांना मात्र फक्त दरवर्षी शेन्गा आणि टरफलांची गोष्ट!

गणामास्तर's picture

26 Apr 2013 - 11:29 am | गणामास्तर

अरा, अहो अजून बरचं काही बघावं लागतं मारुतीरायाला दरवर्षी. गेल्या वर्षीचा एक नमुना देतो बघा..

a

या वर्षी सुरेखा बाई आल्या होत्या..संधी मिळताचं डकवतो तो पण ब्याणर. :)

गणपा's picture

26 Apr 2013 - 2:20 pm | गणपा

वरील फ्लेक्स पाहुन पवनपुत्राने पुन्हा 'हे राम!' म्हटले असेल.

अमोल केळकर's picture

26 Apr 2013 - 3:19 pm | अमोल केळकर

हा हा हा . हसुन हसुन पुरेवाट ! :)

अमोल केळकर

चिगो's picture

26 Apr 2013 - 7:03 pm | चिगो

अबाबो.. =)) =)) काय हे? हे बघुन माझीच 'हनुमंताची व्यथा' आठवली..

चिगो's picture

26 Apr 2013 - 7:09 pm | चिगो

अबाबो.. =)) =)) काय हे? हे बघुन माझीच 'हनुमंताची व्यथा' आठवली..

अर्धवटराव's picture

26 Apr 2013 - 10:18 pm | अर्धवटराव

हणमंता... अरे आणखी काय काय बघावं लागणार आहे तुला.

अवांतरः आज हिंदुंची, आणि एकंदरच भारताची जी अवस्था आहे... वी डीसर्व्ह इट.

अर्धवटराव

उत्सवप्रियता हा आपल्या संस्कृतीचा चांगलाच गुण आहे पण इतरांना नुइसन्स होणार नाही याची काळजी घेतली पाहीजे खरी.
बाकी इथे ना उत्सव ना सण .... बोअर होते.

नीलकांत's picture

26 Apr 2013 - 12:00 am | नीलकांत

महाराष्ट्रात सर्वात जास्त जी देऊळं आहेत ती हनुमानाची. गाव तेथे हनुमानाचे देऊळ आहे असं दिसतं. काही गावं उठून गेली मात्र मारोतीराया तेथेच राहीलेला आहे.

केवळ हनुमान जयंतीच नाही तर अन्य सर्वच सार्वजनिक उत्सवात मोठ्या आवाजाचं वेड लागलेलं दिसतं. प्रसंग काहीही असो हिंदी सिनेमाची गाणी कुठेही चालतात.

पुण्यात शुक्रवार पेठेत चिंचेच्या तालीमीचा गणपती बसायचा तेव्हा संध्याकाळी ६ ते १० आम्ही रूम सोडून अन्यत्र गेलेलो असायचो. कारण एवढा आवाज असायचा की खिडकीच्या काचा थरथरायच्या. हाच प्रकार दहीहंडीच्यावेळीसुध्दा. तसेच देवीच्या नवरात्रात कुणी तरी गल्लीचा दादा पुण्यात ती माळ का काय ते अर्पण करायला जायचा आणि ही... स्पिकरची भिंत उभी करून काळजाचे ठोकेचुकवत जायचा. खरं तर अश्या प्रकाराने चिड येते. जरा सुध्दा सामाजिक भान नसलेली पोरं जमली पाहिजेत म्हणून नगरसेवक किंवा गल्लीदादा अश्या प्रकारांना प्रायोजीत करतो.

याच वेळी जेव्हा लक्ष्मी रस्त्यावर मानाच्या गणपतींची मिरवणुक निघते तेव्हा मन कसं थिरकतं काय सांगावं. काय तो कैफ आणि काय ती मजा. ठोल, ताशे, भगवा झेंडा आणि मागे गणपती..... काही विचारू नका. पुण्यातील या मिरवणुकांचा अनुभव असमान्यच. त्यासाठी लागणारी मेहनत सुध्दा खुप आहे हे माहिती आहे. नदीपात्रात महिण्यांपुर्वी सराव सुरू झालेला असतो. आणि तो झेंडा आणि त्याचा ध्वजदंड हे सर्व पेलायचं आणि बेफाम होईन नाचायचं... खरं तर याला म्हणतात मस्ती... एवढे ढोल एका तालात एका गजरात वाजताहेत. आणि हो मुलींसुध्दा त्याच अधिकाराने सहभागी होतात आहे. हे चित्र काही औरच आहे.

डिजे आणि स्पिकरच्या भिंती त्यांनी लावोत किंवा आम्ही ते चुकीचंच आहे. कमी कष्टाच्या शार्टकटाचा अभिमान तो कशाला?

प्यारे१'s picture

26 Apr 2013 - 12:56 am | प्यारे१

>>>कमी कष्टाच्या शार्टकटाचा अभिमान तो कशाला?

सुभानल्लाह!

कोमल's picture

26 Apr 2013 - 9:59 am | कोमल

पुण्यातील या मिरवणुकांचा अनुभव असामान्यच

+१
अतिशय रोमांचकारी अनूभव असतो हा..

कमी कष्टाच्या शार्टकटाचा अभिमान तो कशाला?

नाद्खुळा...

आशु जोग's picture

26 Apr 2013 - 11:44 am | आशु जोग

"आजवर मला तरी त्यांच्या नमाजचा त्रास झाला नाही
त्यांचे तत्त्वज्ञान शांततेवर आधारलेले आहे त्यामुळे असेल.

बा द वे
वर्षभर संपूर्ण देशात दिवाळीचे फटाके फोडणार्‍या लोकांबद्दल काय वाटते आपल्याला ...
हैद्राबाद, जर्मन बेकरी पुणे, मुंबईचा जव्हेरी बाजार इ. इ.

बाळ सप्रे's picture

26 Apr 2013 - 12:30 pm | बाळ सप्रे

बा द वे
आजकाल चोर्‍या घरफोड्या खूप वाढल्या त्याबाबत काय वाटते आपल्याला ?

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2013 - 2:03 pm | तुमचा अभिषेक

बा द वे
वर्षभर संपूर्ण देशात दिवाळीचे फटाके फोडणार्‍या लोकांबद्दल काय वाटते आपल्याला ...
हैद्राबाद, जर्मन बेकरी पुणे, मुंबईचा जव्हेरी बाजार इ. इ.

आपणच सांगा मला काय वाटत असेल? प्रेम, माया, ममता, ललिता... यापैकी मला काही वाटत असेल असे आपणास वाटते का?

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2013 - 11:45 am | पिलीयन रायडर

मी जेव्हा ७-८ महिन्याची गरोदर होते तेव्हा अगदी खाली पार्किंग मध्ये काचा थरथरतील एवढ्या जोरात गाणी लावली होती.. ८ ला रात्री.. कारणः - लग्नाचे वर्‍हाड येणार होते रात्रि ११ ला..
मी एक तास ऐकलं.. मग मला अस्वस्थ व्हायाला लागलं..बाळाही थोडं अस्वस्थ होतय असं मला वाटलं.. मग मात्र मी बिथरले.. आणि पोलीसांना फोन करेन अशी १० ला धमकी दिली.. त्यावर "कोण पोलीस काय करतो बघु.." अशी तिथल्या "समाजसेविकेने" धमकी दिली.. पण घाबरुन गाणी बंद पण केली म्हणा..
माझ्या घरासमोर एक स्पीकर चे दुकान आहे.. म्हणजे तिथे नेहमी मोठ्या स्पीकरची टेस्टींग चालते. तिथे दुपारि २ ला गाणी लावलि.. मी जाऊन परत पोलीसाम्ची धमकी देऊन आले.. गाणी बंद...!!

विशेष म्हणजे.. मी हे सगळं करते म्हणुन सोसायटी वाल्यांनी नवर्‍याला बोलावलं आणि "तुम्ही दोघंच अस्ता.. तुम्हाला फॅमीली आहे.. ते काय्..सडाफटिंग लोक.. जीवाला काही करतिल.. उद्या जाऊन त्या नगर सेविकेला सॉरी म्हणुन या.." असा सल्ल दिला.. आता हेच १५ लोक मी बोलताना आले असते तर मुळातच झाला असता का आम्हला त्रास? पण हे सगळे सहन करत बसले आणि आम्हालाच शांत रहा असा सल्ला दिला.. अर्थात मी त्या "शांततापुर्ण" चर्चेत जाऊन "माझं काय ते मी निस्तरेन.. माझ्या नवर्‍याला कुणी टच जर केला तर मी त्यांच घर्दार जिवंत ठेवीन का?" असा डायलॉग मारु "मी पण लय डेंजर हाय" असा लूक देऊन आले!!

आशु जोग's picture

26 Apr 2013 - 12:21 pm | आशु जोग

या लोकांना कुणी आजारी आहे, लहान मुले झोपलेली असतात
मुलांच्या परीक्षा असतात याची पर्वा नसते.

बरेचदा
पुढाकार घ्यायला कुणी तयार नसते.
कधी कधी आवाज करणार्‍यांपेक्षा घाबरट शेजार्‍यांचा अधिक राग येतो.

मागे एका अमराठी मित्राने प्रश्न विचारला होता.
"तुमच्याकडे गणपतीमधे गणपतीची गाणी का लावत नाहीत ? मुन्नी बदनाम हुई, बघतोय रीक्षावाला, हात धरलया अशी गाणी का वाजवतात ?"

"तुमच्याकडे गणपतीमधे गणपतीची गाणी का लावत नाहीत ? मुन्नी बदनाम हुई, बघतोय रीक्षावाला, हात धरलया अशी गाणी का वाजवतात ?"

छे हो.. तो अमराठी मित्र नीट ऐकत नाही. मुन्नी बदनाम हुईच्या चालीवर गणपतीची गाणीच असतात.

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2013 - 12:23 pm | तुमचा अभिषेक

माझ्या नवर्‍याला कुणी टच जर केला तर मी त्यांच घर्दार जिवंत ठेवीन का?" असा डायलॉग मारु "मी पण लय डेंजर हाय" असा लूक देऊन आले!!

लूकचं काय बोलता.. डायलॉगच डेंजर मारून आलात..

पिलीयन रायडर's picture

26 Apr 2013 - 12:38 pm | पिलीयन रायडर

माझ्या मनात खरच प्रचंड राग आहे हो "मोठ्या आवाजाचा".. माझे आजोबा कॅन्सर पेशंट होते. कुण्या साई भक्ताने पलही आणुन ३ दिवस रोज जोरात गाणी लावली होती. ते रडायचे की आवाज बंड करा म्हणुन. आम्ही लहान होतो.. आई -बाबा ऑफिसात. जाऊन त्यांना कएविलवाणे म्हणायचो .." काका, बंद करा ना.. माझे आजोबा आजारी आहेत.." पण कुणी ऐकलं नाही. आम्ही कुणीच काही करु शकलो नाही. तो माणुस तिथला (आजही) डॉन असल्या सार्खा फिरतो.
मग मी ८ वीत असताना असाच प्रकार रात्रि घडला.. मोठा आवाज.. गाणी.. मग मात्र सगळा दाबलेला राग उसळुन आला.. तेव्हा पासुन "पोलीस"..
आमच्या बिल्डीम्गमध्ये ४-५ लहान पोरं आहेत हो.. आया बेल वाजु नये ह्याची पण काळजी घेतात.. आणि हे साले ह**** लोक.. २ ला दुपारि गाणी लावतात.. १० - १२ वीच्या परीक्षा असताना गाणी लावतात... ती पण सगळी "शीला आणि मुन्नी" ची...

मी गोळ्या पण घालु शकते ह्या लोकांना ... कारण जेव्हा अशी गाणी वाजतात तेव्हा मला माझे पहाडा सारखे आजोबा रडताना दिसतात..

बॅटमॅन's picture

26 Apr 2013 - 12:47 pm | बॅटमॅन

अवघड आहे :(

बाकी ते प्रचंड रागाबद्दल सहमत एकदम.

क्लिंटन's picture

26 Apr 2013 - 1:24 pm | क्लिंटन

माझ्या मनात खरच प्रचंड राग आहे हो "मोठ्या आवाजाचा"

मलाही.आणि या कारणासाठी गणपतीमध्ये किंवा अन्य कधीही लाऊडस्पीकरवर कायमची कायद्याने बंदी आणण्यात यावी असे मला वाटते.जर कोणाला देवभक्तीची किंवा धर्माची इतकीच खाज असेल तर त्याने स्वतःच्या घरी गणपती आणून दहा दिवस काय दहा जन्मे ठेवावेत.जोपर्यंत इतरांना त्रास होत नाही तोपर्यंत त्याविषयी इतरांना आक्षेप असायचे कारण नाही.माझा स्वतःचा तर गणपती उत्सव या प्रकाराला भयंकर विरोध आहे.एक तर लहान असताना मुंज झाल्यावर घरच्या गणपतीची पूजा करायची सक्ती झाल्यापासून या प्रकाराविरूध्द प्रचंड संताप निर्माण झाला.त्यातून ठाण्याला मी जिथे राहत होतो ते ठिकाण मासुंदा तलावाच्या जवळच होते.त्यामुळे सगळ्या विसर्जन मिरवणुका आमच्याच बिल्डिंगवरून जात. आणि आमच्याच घराजवळ एक गणेशोत्सव मंडळ होते--हिंदू जागृती गणेशोत्सव मंडळ.त्यांनी इतका म्हणून उच्छाद मांडला होता की विचारू नका.अनंत चतुर्दशीच्या रात्री इतर सगळ्या गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर म्हणजे दोन-अडीचच्या सुमारास यांची मिरवणुक निघे.आणि लाऊडस्पीकरवरून "जागो रे जागो हिंदू जागो रे" असे कर्णकर्कश कोकलणे ही त्यांची खासियत होती.मी शाळेत असताना भिडे गुरूजींटाइप विचारांनी प्रभावित झालेलो असतानाही असे बोंबलून खरोखर झोपलेल्या हिंदूंची झोपमोड करण्याव्यतिरिक्त हे मंडळवाले नक्की काय मिळविणार आहेत असा प्रश्न नेहमी पडायचा.

बाकी अशा कोणत्याही कारणामुळे मोठमोठ्याने बोंबलून इतरांवर ते बोंबलणे सहन करायची वेळ आणणारे लोक आणि त्याविरूध्द काही बोलले तर धार्मिक अस्मितेच्या नावावर बोट दाखविणारे लोक माझ्या प्रचंड डोक्यात हे वेगळे सांगायला नको.अशांना गोळ्या घालणे या उपायाबाबत सहमती नसली तरी यांना जबरदस्त वचक बसेल असे काहीतरी नक्कीच करायला हवे असे वाटते.

आई गं पिलियन :( तू म्हणतेस ते खरंच आहे पण. मीही सांगून येते आमच्या इथे कोणी असं केलं तर. घाबरायचं कशाला? लोक घाबरतात म्हणून तर ह्यांच फावतं.

मीही एकेकाळी असा स्पीकर-भांडकुदळ म्हणून एरियात प्रसिद्ध होतो. पण...आता नाही

गणपतीच्या दिवसांमधे प्रत्येक वेळी असं जाऊन भांडून येण्याने निर्भीड असल्याचं नैतिक समाधान / विजय मिळत असला आणि कधीमधी आवाज कमी करण्यात यश मिळत असलं तरी हे पर्मनंट नसतं. संधी साधून आवाज वाढवला जातोच.

अशा प्रत्येक वेळी भांडायला जाऊन या वादावादीत आणि सवालजवाब-धमक्या यांमधे वाढणारा रक्तदाब आणि मनस्ताप हा मूळ आवाजाने होणार्‍या मनस्तापापेक्षा जास्त होतो असा अनुभव आहे.

जेव्हा शक्य असेल तेव्हा, गणपतीच्या / अन्य सणांच्या सुटीत सहलीची शांत ठिकाणं, रिसॉर्ट्स ओस पडलेले असतात आणि ऑफसीझन दरात मिळतात त्याचा लाभ घ्यावा. कधीतरी ट्रिप प्लॅन करायची ती तेव्हा करावी.

ज्यांना असं बाहेर जाणं शक्य नसेल त्यांनी मनःशांती ठेवावी. वृद्ध आणि लहान मुलं यांना त्रास होतो हे खरंय पण "त्रास होतो" याचा सेकंडरी त्रास त्यात अ‍ॅड झाला की फारच त्रास होतो. अशा वेळी गाणी एंजॉय करावीत. कानात कापूस घालावा. कान बंद करणारं हेडफोनसारखं उपकरणही मिळतं.

ज्या एरियात बारामाही सण आणि मंडप पडलेले असतात त्यांनी भांडत बसण्यापेक्षा पॅकिंग मटेरियलच्या दुकानात मिळणारं चिवट फोम कम थर्मोकोलसारखं दिसणारं शीट (EPE FOAM) आणून त्याच्या पट्ट्यांचं पॅकिंग दारांच्या अन खिडक्यांच्या बॉर्डरला करुन घेतलं तर अत्यंत स्वस्तात साउंडप्रूफिंग (निदान ५०% आवाज निश्चित कमी) होतं.

A

बाळ सप्रे's picture

26 Apr 2013 - 2:13 pm | बाळ सप्रे

संधी साधून आवाज वाढवला जातोच

या वादावादीत आणि सवालजवाब-धमक्या यांमधे वाढणारा रक्तदाब आणि मनस्ताप हा मूळ आवाजाने होणार्‍या मनस्तापापेक्षा जास्त होतो

अगदी अगदी..

त्यामुळे त्या दिवसात शक्यतो बाहेरगावी हाच उत्तम उपाय.. वर्गण्यांचाही ससेमिरा टळतो :-)

मन१'s picture

26 Apr 2013 - 1:54 pm | मन१

संताप यथार्थ मांडलात.
आमचेही टाळके सटकते. कधी दोन ठेउन देतो. कधी दोन खाउनही येतो.
बळी तो कान पिळी ह्याचा अनुभव घेतलाय ह्या प्रकारांत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Apr 2013 - 3:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अर्थात मी त्या "शांततापुर्ण" चर्चेत जाऊन "माझं काय ते मी निस्तरेन.. माझ्या नवर्‍याला कुणी टच जर केला तर मी त्यांच घर्दार जिवंत ठेवीन का?" असा डायलॉग मारु "मी पण लय डेंजर हाय" असा लूक देऊन आले!!

लय म्हणजे लईच डेंजर... केवळ थ्रकाप !! :)

अद्द्या's picture

26 Apr 2013 - 12:53 pm | अद्द्या

असंच आमच्या कडे बरोब्बर १ ५ मार्च ला पारायण सुरु होतं .
पहाटे ४ पासून रात्री १२ पर्यंत भसाड्या आवाजात गोंगाट चालू असतो .

शाळा कॉलेज सगळ्यांच्या परीक्षा असतात डोक्यावर .
या वेळी पहिल्या २ दिवसात मी आणि माझे २ मीन जाउन सांगून आलो होतो . आवाज इतका हि नका वाढवू कि त्याचा त्रास होईल परीक्षा आहे मुलांच्या .

त्या मंडळाने या विनंती ला मानही दिला . आवाज अगदी कमी होता .
(आणि काही खूप चांगली भजनी मंडळे पण होती . त्यामुळे ऐकायला मजा येत होती )

पण दुसऱ्या दिवशी यांचा "चेरमन " आला . आणि म्हणे देवाची भक्तीच करतोय . परीक्षा

काय येत जात असतात .
हवं तर तुम्ही लोक पण येउन बसा इथे . मार्क चांगले पडतील .

. .

आम्हाला रात्री जागरणाची सवय .
आणि पारायण एका देवळाच्या आवारात चालतं .
रात्री जाउन देवळावर लावलेले स्पीकरच्या वायरी कापून यायचो .
:D

मुक्त विहारि's picture

26 Apr 2013 - 1:52 pm | मुक्त विहारि

पण मग ते देवूळवाले काही बोलले नाहीत?

नाहीच बोलणार म्हणा..

बोलले असते तरच नवल.

आशु जोग's picture

26 Apr 2013 - 6:29 pm | आशु जोग

ना. विलासराव देशमुख यांच्या काळात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यापैकी एक
म्हणजे माहिती अधिकार कायदा

दुसरी म्हणजे ध्वनिवर्धकावर वेळेची मर्यादा.
पण या निर्बंधामुळे २००५ ला पुणे पेटले होते गणपतीच्या काळात.

जी गोष्ट स्पिकरची तिच गोष्ट फटाक्यांची.. माझी आजी शेवटच्या आजारात हॉस्पिटल मधे असताना समोरच्या रस्त्यावर कोणी आमदार येणार म्हणून दहा हजारांची फटाक्यांची माळ लावली होती. आजी अक्षरशः थरथरत होती. तिथे जाऊन बोलावं तर पोलिस तिथेच उभे होते त्या आमदारच्या सुरक्षेसाठी !

उपप्र॑श्नः ती वडारवस्ती तिथे आधीपासूनच होती. हॉस्पिटल नंतर आलं. अशावेळी हॉस्पिटलांना परवानगी देण्यापूर्वी नगरपालिकेकडे काही नियम असतात की नाही?

तुमचा अभिषेक's picture

26 Apr 2013 - 10:05 pm | तुमचा अभिषेक

दुर्दैवी प्रकार आहे... नियम असावेत.. सायलेन्स झोन, नो हॉर्न झोन सुद्धा असतो.. नक्की नियम गूगाळावे लागतील.. कोणी जाणकार असेल तर जाणून घेण्यास उत्सुक.

तुमचे आक्षेप वडारवस्तीत हॉस्पिटल उभे करु नये असा आहे? की आमदारांनी गाजत-वाजत हॉस्पिटलच्या आवारात येऊ नये असा आहे? - कळलं नाही.

वेल्लाभट's picture

26 Apr 2013 - 7:32 pm | वेल्लाभट

हेहे. असंच होतं बाबा!

साँड लय भारी आला पाय्जे तरच सगळ्यांना कळेल ना आपला पन 'सन' आय! (कुठेतरी ऐकलेलं वाक्य) (व्याकरण मुद्दाम जसंच्या तसं लिहीलंय.)