ऑफिस आणि फॉर्मल कपडे

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in काथ्याकूट
17 Apr 2013 - 9:18 pm
गाभा: 

णमस्कार्स मिपाकर्स,

बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.

या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?

२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?

ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्‍या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.

बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.

धण्यवाद इण अ‍ॅडव्हान्स :)

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

18 Apr 2013 - 4:57 pm | गणामास्तर

ईयर प्लग असे वाचावे..

गणामास्तर's picture

18 Apr 2013 - 4:58 pm | गणामास्तर

ईयर प्लग असे वाचावे..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2013 - 1:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

थर्म्याक्स वाले काहो तुम्ही ;)?

(कपडे आणि सेफ्टी गिअर च्या ओझ्याखालचा वळु) अनिरुद्ध ;)

मैत्र's picture

18 Apr 2013 - 4:05 pm | मैत्र

मॄत्युंजय यांचा सर्वच प्रतिसाद सगळ्यात पटला..

एरवी अमुकच प्रकारचा पोशाख हवा अश्या अट्टाहासाशी मीदेखील असहमत आहे. परंतु हपिसात शिस्त असावी याचा तो एक भाग आहे. सैन्यदलांमध्ये प्रत्येक प्रसंगासाठी आणी कार्यासाठी पोशाख ठरलेला असतो. तो या शिस्तीचाच एक भाग आहे. एक सामान्य नागरिक म्हणुन एवढ्या कडक शिस्तीचा पोशाख कर्मचार्‍यांना आवश्यक नाही. पण अगदीचे सूट दिली की पोरी नितकोर चड्ड्या आणि पोरे पार्श्वभागावरुन खाली घसरणार्‍या जीन्स किंवा केशरी पोपटी रंगाच्या बर्म्युडा घालुन हापिसात येतात. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणुन फॉर्मल ड्रेस नावाचा पर्याय असण्यास काही हरकत नसावी.

हे सगळ्यात योग्य वाटले. मूळ अडचण ही आहे की तारतम्य ठेवले जात नाही.
कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नको हे म्हणण्याला काही अर्थ नाही.. कारण अगदी ताळतंत्र सोडला जातो.
घरात रात्री घालण्याच्या बर्म्युडा किंवा तत्सम शॉर्ट्स घालून मुलं आणि टँक टॉप्स, स्पॅगेटी, थोडे खांदे झाकणारे ट्युब्स घालून मुली आंतरराष्ट्रीय कचेरीत कामावर आल्याचं पाहिलं आहे आणि मग एच आर ला कॅज्युअल मध्ये काय चालणार नाही याची यादी बनवावी लागली होती.
इन्फोसिस मध्ये कित्येक वर्षे सोमवार आणि मंगळवार कंठलंगोट सक्तीचा आहे. पण उन्हाळ्याचे तीन महिने त्यात सूट असते (१५ मार्च ते १५ जून). काही वेळा उन्हाळा रेंगाळला तर ही सूटही वाढवून देण्यात आली होती.
अर्थात यातही चेन्नई सारख्या ठिकाणी इतर महिन्यातही हा कंठलंगोट घालून शहराबाहेर असलेल्या कचेरीत तास दीड तास प्रवास करून जाणं हा केवळ छळ आहे.

या फॉर्मल्स चे मूळ स्थान ब्रिटनमध्येही कारण नसताना कोणी सगळा जामानिमा करून येत नाहीत.
संचालक दर्जाचे क्लायंट्स त्यांच्या हापिसात लक्ख पांढरा शर्ट आणि डार्क रंगाची पँट घालून येत होते. तसे कारण असले की जय्यत तयारी पण उगाच बळंच रोज टाय सूट नाही. आणि आमच्याकडचे परंपरावादी लोक हे न समजून त्याच क्लायंटस च्या हापिसात रोज पूर्ण सूट आणि रोज तोच सूट आणि तोच टाय मूर्खासारखा घालत होते.
नेहमी व्यावसायिक कार्यशाळेच्या वेळी पूर्ण फॉर्मल्स असायचे. एकदा कार्यशाळा फ्रांकफुर्टात ऐन उन्हाळ्यात होती तर क्लायंटने स्वतःच जाहीर केलं की फॉर्मल नाही जे समंजसपणाचं लक्षण होतं. पण सवलत मिळाल्यावर आग्नेय आशियाई भगिनी जे काही घालुन आल्या ते पाहून भल्याभल्यांचे डोळे फिरले.

टिशर्ट ला कॉलर नसल्याने काय फरक पडतो. खरंतर काही नाही. काही अतिमूर्ख किंवा अतिशहाणे सवलत दिली की वाट्टेल ते घालतात आणि अत्यंत सैलपणे वागतात. ते होऊ नये म्हणून आणि सर्वांना सारखे नियम असावेत म्हणून नियम करावे लागतात. त्याला काही तरी सीमा ठरवावी लागते. ती रेषा मनुष्यबळ विभागातले लोक आणि एकूण संघटन काय पद्धतीने आणि किती समंजस पद्धतीने काम करते यावर ठरते.

अर्थात स्त्रियांना भारतात तरी साडी, पंजाबी ड्रेस, पाश्चात्य पद्धतीचा पोशाख (ट्राउसर, शर्ट्स, ब्लाउझेस, सूट वगैरे), किंवा इतर कॅज्युअल न वाटणारे अनेक प्रकार वापरता येतात फॉर्मल म्हणून. आणि साडीमध्ये एक भारदस्त लूक येतो. म्हणून साडीच नेसली पाहिजे असं नाही.
बरेचदा स्वतःला कंठलंगोट नाही म्हणून दंड होत असताना काही तरी वेगळा पोषाख करूनही पळवाटा काढणार्‍या स्त्री सहकर्मचार्‍यांकडे पाहून पुरुषांचा संताप होतो.
यात पुरुषांना सगळीकडे सवलत, वरचष्मा वगैरे काही नाही.

  • पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
  • सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून

यात कंपनीचे काय चुकले? - नियम होता फॉर्मलचा तो पाळला नाही. सरळ हिशोब आहे.
पण इतर उदाहरणे पाहून कोणी तरी अति उत्साही किंवा बळंच शिस्तवादी एच आर असावा.

शिस्त नसताना लोक काय वाट्टेल ते घालून किंवा किती अजागळपणे येतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यामुळे फॉर्मल अगदी नकोच असं नक्कीच म्हणणार नाही.

सहमत आहे. फॉर्मल्स अगदी नकोच असे नाही पण तारतम्य पाहिजे इतकेच म्हण्णे.

टिशर्ट ला कॉलर नसल्याने काय फरक पडतो. खरंतर काही नाही. काही अतिमूर्ख किंवा अतिशहाणे सवलत दिली की वाट्टेल ते घालतात आणि अत्यंत सैलपणे वागतात.

पण हे सगळे नियम स्त्री कर्मचारी ह्यांना देखील लागु होतात की नाही कि फक्त पुरुष कर्मचार्‍यांनीच शिस्तीचे पालन करावे. आमच्या कार्यालयात तर मुली शुक्रवारी असे काही कपडे घालुन येतात की "आमच्या टिशर्ट ला कॉलरचा चिंधीएवढा कपडा नसल्याने काय फरक पडतो" असा प्रश्न नेहमी डोक्यात येत राहतो. असो.

शिस्त नसताना लोक काय वाट्टेल ते घालून किंवा किती अजागळपणे येतात हे प्रत्यक्ष पाहिलं आहे त्यामुळे फॉर्मल अगदी नकोच असं नक्कीच म्हणणार नाही.

+११११११ पण नियम सगळ्यांना समसमान असावे हाच फक्त आग्रह. :)

बाळ सप्रे's picture

18 Apr 2013 - 4:43 pm | बाळ सप्रे

जसा कॉमन सेन्स कॉमन नसतो तसा ड्रेसिंग सेन्सदेखिल कॉमन नसतो .. त्यामुळे नियम करावे लागतात. आणि नियम पाळण्यापेक्षा पळवाटा शोधण्यात जास्त रस असला की नियमावर बोट ठेवून कारवाई करावी लागते..

श्रीरंग_जोशी's picture

18 Apr 2013 - 7:02 pm | श्रीरंग_जोशी

हे माझे निरिक्षण आहे. हे असेच असते असा माझा दावा नाही.

मी करियरच्या सुरूवातीला काही वर्षे पूण्यातील मा.त. कंपन्यांमध्ये काम केले आहे व त्याच्यापेक्षाही अधिक वर्षांपासून अमेरिकेत काम करतोय. येथील चार वेगवेगळ्या राज्यांत काम केले आहे.

पण भारतात शुक्रवारी काही स्त्री कर्मचार्‍यांचा पोशाख पाहून जसे संकोचल्याची भावना होते तशी भावना अमेरिकेत काम करताना कधिच झाली नाही (सोबत काम करणार्‍या इतर स्त्री सहकार्‍यांचीही अशीच भावना व्हायची नियमांच्या पळवाटा शोधणार्‍यांमूळे). हे निरिक्षण अमेरिकेत येण्यापूर्वी चित्रपट पाहून बनलेल्या समजूतीला छेद देणारे होते.

नियमांतून पळवाट शोधणारा एखादा अपवाद असेलही पण भारतातील अपवादांच्या संख्येपूढे त्यांची संख्या नगण्याच.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2013 - 3:59 pm | विश्वनाथ मेहेंदळे

पण भारतात शुक्रवारी काही स्त्री कर्मचार्‍यांचा पोशाख पाहून जसे संकोचल्याची भावना होते तशी भावना अमेरिकेत काम करताना कधिच झाली नाही. हे निरिक्षण अमेरिकेत येण्यापूर्वी चित्रपट पाहून बनलेल्या समजूतीला छेद देणारे होते.

तुम्ही आणि मी एकाच अमेरिकेत गेलो होतो ना !!!!!

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 7:13 pm | श्रीरंग_जोशी

साहेब, प्रतिसादातले पहिले अन शेवटचे वाक्य पण ध्यानात घ्या की.

कदाचित परिधानाना जोडून बॉडी लँग्वेज हा घटक देखील असू शकतो. त्याखेरीज भोवतालचे वातावरण हा पण.

फ्लोरिडामध्ये काम करत असताना त्या क्लायंटकडे अचानक सर्वच दिवस कॅजुअल कपडे चालतील अशी घोषणा झाली. फार सुखी काळ होता तो. इस्त्रीला अनेक महिने सुटी मिळाली होती.

काही स्थानिक बाप्प्ये तर शुक्रवारी फारच मोकाट सुटत. चौकड्याची रंगीबेरंगी बर्मुडा व हवाईयन मनिला वगैरे घालून येत असत.

तुमचा अभिषेक's picture

18 Apr 2013 - 8:20 pm | तुमचा अभिषेक

चर्चा सवडीने वाचेनच, विषय जवळचा आहे.

ड्रेसकोड आजवर कुठल्याच कंपनीत न पाळल्याने कमी अधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणी वाद झाले आहेत... अर्थात एकतर्फीच..

सध्या फाईव्ह डे वीक पैकी फ्रायडेला मस्त जीन्स किंवा सिक्स पॉकेट खालच्या अंगाला झाकायला अन वरती टी-शर्ट किंवा एखादे इनफॉर्मल शर्ट हाताच्या बाह्या वर करून घालायला मिळते हे ही नसे थोडके... :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Apr 2013 - 11:01 am | ज्ञानोबाचे पैजार

या बाबतीत आमच्या कारखान्याचे धोरण मस्त आहे. दर वर्षी ३ सदरे आणि ३ विजारी देतात. मग तेच कपडे घालुन कामावर यावे अशी त्यांची अपेक्षा चुकीची वाटत नाही. कापडाचा दर्जा उत्तम असतो. एक गणवेश कमीत कमी ३ वर्ष तरी टिकतो. परत कामावर जाताना काय घालु हा प्रश्र्ण नसतो.

एक गंमत :- आमच्या कारखान्याच्या दारातच एका चतुर इस्त्रीवाल्याने दुकान थाटले आहे. काही अविवाहीत कर्मचारी त्याच्या दुकानातच कपडे बदलतात. बदललेले कपडे त्याला लगेच धुवायला देतात आणि गणवेश घालुन कामावर हजर होतात. संध्याकाळ पर्यंत तो त्यांचे कपडे धुवुन इस्त्री करुन ठेवतो.संध्याकाळी जाताना गणवेश धुवायला द्यायचा. तो सकाळपर्यंत गणवेश तयार ठेवतो. हि सेवा कोणतेही अधिक शुल्क न आकारता त्यांना दिली जाते.

संध्याकाळ पर्यंत तो त्यांचे कपडे धुवुन इस्त्री करुन ठेवतो.संध्याकाळी जाताना गणवेश धुवायला द्यायचा
हे भारीये राव!

बॅटमॅन's picture

22 Apr 2013 - 3:18 am | बॅटमॅन

+११११११११११११११११.

बेस्ट सोल्यूशन पॉसिबल. सगळेच सुखी!

रमेश आठवले's picture

19 Apr 2013 - 11:47 am | रमेश आठवले

मला वाटते की एखाद्या व्यक्तीने घातलेला पोशाख हा फॉर्मल आहे की नाही हे त्या व्यक्तीच्या सेल्फ एस्टीम आणि लोक्मान्यते वरून ठरते.
उदाहरणे :
१. कॉंग्रेसचे मोठे पुढारी कामराज हे लुंगी नेसून सर्वत्र वावरत असत. त्यांना कोणी टोकल्याचे ऐकिवात नाही.
२.पी. चिदम्बरम लुंगी नेसून दिल्लीत वावरतात. मी त्यांना लुंगी नेसून टेनिस खेळताना पाहिले आहे.
३. नेहरूंनी नेकटाय आणि सुटाच्या जागी बंदगला व जोधपुर trousers ना राष्ट्रीय पोशाख म्हणून वापरायचे ठरविले आणि ते सर्वमान्य झाले.
४. महात्मा गांधी एकदा इंग्लंड मध्ये गोलमेज परिषदेसाठी गेले असताना त्यांची आणि इंग्लंड च्या राजाची भेट ठरली. भेटी आधी कोणीतरी त्यांना विचारले की तुम्ही अशा अर्धनग्न अवस्थेत राजाला भेटायला कसे जाणार ? त्यावर गांधी म्हणाले की त्याला काहीच हरकत नसावी कारण राजाने आम्हा दोघांना पुरून उरतील एवढे कपडे घातलेले असतील.

अन्या दातार's picture

19 Apr 2013 - 2:29 pm | अन्या दातार

ऑफिसमध्ये सेल्फ एस्टीम व लोकमान्यता (इथे बॉसमान्यता म्हणावे काय?) कशी ठरवावी?

अन्याशेठशी सहमत. वर दिलेली उदाहरणे एकदम क्वचित आढळणारी आहेत. जणसामाण्य लोकाण्णा त्याचा उपयोग णाही.

(ण-वी बाजू ध्याणात घेणे ही इणंती करणारा) बॅटमॅण.

आपण ब्वा सोमवारी फक्त तुमच फ़ोर्मल का काय म्हणतात ते घालतो इतर दिवशी जीन्स आणि टी शर्टच घालतो
जुन्या कंपनी मध्ये आमचा मुकादम एकदा मला आणि माझ्या मित्राला म्हणाला होता फ़ोर्मल घालून या नाहीतर हॉरिबल रेसोर्स म्यानेजर कडे पाठविन त्यला म्हंटले तू सुद्धा शिफ्ट मध्ये येतोस, त्या हॉरिबल रेसोर्स म्यानेजरने तुला कधी बघितले तरी आहे काय तू काळा कि गोरा आहेस ते जॉईन झाल्यापासून ?
आताच्या कंपनी मध्ये कोणी विचारत नाही काय घातलंय कि नाही ते, साला दिलंय ते काम करा आणि बाकी काही पण का** करा.
अगदी कधीपण या दिलंय ते काम करा मग तिकडे काय पण करा कोणी विचारात नाही …. माज्जानु लायीफ ……
च्यामारी इथे टाईम कुणाकडे आहे, दुसर्याकडे बघयला. मस्त पैकी रोजच जीन्स आणि टी शर्ट घालतो.
इथे आमचा प्रोजेक्ट डिरेक्टर तेव्हढा येतो रोज फ़ोर्मल मध्ये… :-)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2013 - 10:06 am | प्रकाश घाटपांडे

मान्स कापड कंची घालत्यात त्यावरुन मानूस कसा हाये ते ल्वॉक ठरिवत्यात. आमी माग येक प्रयोग केला . पुन्यात हित यकदा मिपावर्ली मंडळी राजारामपुलाच्या जवळच्या बन्यन ट्री हाटेलात आल्ती सहभोजना करिता. आमी भेटायला गेल्तो. तिथे मनोबा भेटले. आमी लेंगा सदरा व गांदी टोपी घालून आल्तो. गावाकड आमी हीच कापड घालीत असू.मनोबाशी गप्पा मारायचा प्रयत्न केला.मनोबांनी नाईलाजानी आमच्याशी चार शब्द बोल्ले.आमी आजून गप्पा मारायचा प्रयत्न केला मग मनोबांच्या चेहर्‍यावर आमाला वैताग दिसला 'हा कोन पावटा ड्वॉक खातुय वळख ना पाळख' मनोबान कल्टी मारली. या प्रसंगाच्या आदुगर काही दिवस मनोबा आमच्या घरी येउन गप्पा मारुन गेल्ते. नंतर आमी शशिकांत ओकांच्याकडे गेलो त्यांनी बी गप्पा मारल्या पन आमाला वळखल नायी. मंग आमीच वळख सांगितली. मंग वळाखल. ते म्हन्ले यकदम ड्रेस कोड बदल्ला म्हनून वळखलच नाय. आदुगर जवा जवा भेटलो तवा शर्ट प्यांट व्हती ना म्हनून वळकल नायी..आमच बी असच व्हतय. पिच्चर मदली बाइ जरा वायली कापड घालून आली आमाला ती वायलीच वाटतीया.आमाला त्या पिच्चरमदल्या बाया सम्द्या सारक्याच वाटतात.अहो बायकुनी जरा वायली कापड घातली तरी बी आमी भंजाळतोय.
आमी ही गोष्ट आजुन बी मनोबाला सांगितली नाई. त्यानंतर आमी सोत्री परा सारख्यामंडलींबरुबर दुसरीकं जाउन शास्त्रापुरता असात्विक श्रमपरिहार केला. तर मंडळी आस हाय हे कापडाच म्हत्व.काप्डांवरुन मान्स ठरिवत्यात. म्हात्मा फुल्यांनी न्हेमीची कापड घालून इंग्लंडात गेल्ते तवा त्यांन्ला बी वींग्रज सरकार्नी आडिवल व्हत अस म्हंत्यात. जरा विंग्रजीतुन वळख सांगितल्यावर मंग सोल्डं अस आम्चे देव गुर्जींनी सांगितल व्हत. त्यांन यकदा सांगितल व्हत कि मंबईत काही मान्स परवडत नस्तानाबी सुटाबुटाची कापड घालून बसमदी विंग्रजी पेपर वाचीत बसत्यात पन त्यांनी तो उल्टा धरलेला आसतुय.निस्ती शायनींग मारत्यात. त्वांड उघल्ड्यावर वरिजनल झाकतय व्हयं. कुठ तरी ऐकलय
आधीं होता वाघ्या । दैवयोंगे झाला पाग्या ॥१॥
त्याचे येळकोट राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥२॥

आधी होता ग्रामजोशी । राज्यपद आलें त्यासी ॥३॥
त्याचें पंचांग राहीना । मूळ स्वभाव जाईना ॥४॥

आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥५॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥६॥

त्याचें भजन राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥८

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 2:57 pm | प्यारे१

पकाकाका,

त्या दिशी तुमी 'निळा सपारी' आन गांदी टोपी घाटल्याली. गंडवू नगासा. म्हनं लेंगा सदरा. आमी का बगिटलं नाय का काय? :)

प्रकाश घाटपांडे's picture

20 Apr 2013 - 5:37 pm | प्रकाश घाटपांडे

अतृप्त आत्म्याच्या फोटुत हाये ना आमी त्यांन्ला ईचार हवतर. निळा जीनचा शर्ट व्हता आन पायजमा व्हता ना

सदरा नि निळा जीन्स शर्ट एकच???
सदरा लेंगा म्हन्जे साधारण सेम कलरचा असतो.
असो.

आम्हाला ओक काकांशी बोलायला अवघड गेलं. पुन्हा असोच. :)

सदर प्रतिसाद हा थट्टा/चेष्टा/म्हणून घ्यायचा आहे का?
मिश्किल भाव त्यातून अपेक्षित आहे का?
की (वरवर कपड्यांबद्दल वाटलं तरी प्रत्यक्षात)मनोबांबद्दल काही एक विधान त्यातून करायचय का?
घटना तुम्ही सांगताय तशीच घडलेली आहे का? की काही तिखट मीठ लावण्यात येतय?
घटना तशीच जरी असेल तरी त्याचं दुसरं काही कारण्/इंटार्प्रिटॅशन्/पर्स्पेक्टिव्ह असू शकेल का?
तसे असण्याची शक्यता नाहिच ह्याची खात्री आहे का?(तुमच्या सारख्या प्रगल्भ माणसाला "आपल्या तुम्हाला वेशभूषेबद्दल न्यूनगंड होता, म्हणून वेशभूषेशी असंबद्ध गोष्टही तुम्हाला तशीच/ त्याच चष्म्यातून जाणवली" असे म्हणण्याचे धार्ष्ट्य मी करु शकत नाही. म्हणून वरील शंका मला आहेत.)
.
.
.
माझं मतः- एकदा व्यक्तिमत्व दिलखुलास्/प्रभावी असलं तर कपड्यांचा इतका काही फरक पडेल; तेही मैत्रीपूर्ण्/कट्ट्याच्या वातावरणात हे पटत नाही(मी स्वतः काही मिपाकरांना बालगंधर्व जवळ शिवशक्ती वगैरे मध्ये भेटायला जाताना बर्म्युडा/थ्री फोर्थ वगैरे वगैरेवर गेलो आहे. तसा गेलो ह्यात फार काही विशेष भूषणास्पद नाही; विचित्र/लज्जास्पदही नाही. just things as it is असा भाव त्यात आहे.). फार फार मागे २००८च्या असपास शांग्रिला कट्ट्यातही तुम्ही काही भारी वेशभूषा वगैरे केली होतीत असे नाही. पण कट्ट्यात "घरात नाही आटा आणि म्हणे चोट्याला उटणं वाटा" ह्या म्हणी, इतर ग्रामीण्/अस्सल व्यावहारिक जीवनची झलक, त्यावरील गप्पा ह्यामुळे तुम्ही, बासरी वादनामुळे विजूभाउ आणी गायनगप्पांबद्दल तात्या त्या कट्ट्याचे "सेलिब्रिटी/उत्सवमूर्ती" ठरला होतात. त्यात कुणाचीही वेशभूषा फार थोर होती असे नव्हे. इतरही बरच लिहावं वाटातय पण प्रतिसादाचा रोख कळल्याशिवाय ते नकोच इथे.
.
.
.
कन्फ्युज्ड आणि थोडासा चकित

प्रकाश घाटपांडे's picture

21 Apr 2013 - 11:44 am | प्रकाश घाटपांडे

यात मनोबांनी मला प्रत्यक्षात ओळखल होत की नव्हते हा मुद्दा आलाच नाही. ते गुलदस्त्यातच आहे. अशी गंमत अधुन मधून मी करत असतो. सगळ्याच प्रतिक्रिया/ गोष्टी गांभीर्याने किंवा विवेकाने चिरफाड करुन घ्याव्यात असे नसते. मला स्वतःला एखादी व्यक्ति वेगळे कपडे घालून आले कि ओळखता येत नाही.नावे नाती या स्मृतींबाबत माझा गोंधळ होतो. मेंदुत असलेल्या प्रतिमेपेक्षा वेगळे दृष्य दिसले कि संभ्रमात पडतो.अर्थात हे इतर ही अनेकांचे तसे होते.
मला मुख्य मुद्दा अधोरेखित करायचा आहे कि व्यक्तिमत्व व पेहराव यातील संबंधांचा. त्यामागील मानसिकतेचा. काही लोक साधी रहाणी उच्च विचारश्रेणी चे असतात काही उच्च रहाणी उच्च विचारश्रेणी असे असतात. यात इतरही काँबिनेशन करता येतील.
प्रतिसादाचा रोख अर्थातच गमतीचा आहे. प्रतिसादाच्या मूड वरुन तुमचा मूड हलका फुलका आहे कि गांभीर्याचा आहे याचा अंदाज आपल्याला टंकबोली वरुन बर्‍याचदा येतो. त्या त्या वेळच्या लिखाणात तुमची त्यावेळची मनस्थिती डोकावत असते. एखादा गंभीर मूड मधे आहे पण दुसरा मात्र हलक्या फुलक्या मुड मधे आहे त्यावेळी परसेप्शनमधे नॉईज वा अननोन फॅक्टर येतो.
असो मनोबा जास्त गंभीत होउ नका!

मन१'s picture

21 Apr 2013 - 12:06 pm | मन१

पका काकांणा कटावण्याचे संभाव्य कारण:-
म्हातार्‍या पका काकांशी वैचारिक गप्पा हाणण्यापेक्षा मोक्याची जागा पटाकावून चालती बोलती प्रेक्षणीय स्थळे विनातिकिट
पहावीत असा सूज्ञ विचार तरुण तुर्क मनोबांनी केला असावा.
(काकांऐवजी तशाच जीन्स आणि वरती खादीचे टॉप असा वेष असलेली कुणी असती तर मनोबांची प्रतिक्रिया वेगळी असू शकली असती. वेष "कोणता" महत्वाचे नाही "कुणाचा" हे महत्वाचे ;) )

रमेश आठवले's picture

20 Apr 2013 - 12:26 pm | रमेश आठवले

"The apparel oft proclaims the man--in Hamlet

क्लिंटन's picture

20 Apr 2013 - 1:21 pm | क्लिंटन

मला तर फॉर्मल कपडे आणि त्यातूनही टाय भलताच आवडतो.तसेच मी एसीत बसून काम करतो आणि बाहेरच्या उन्हाचा त्रास निदान ऑफिसात असताना तरी होत नाही.त्यामुळे मला तर ऑफिसात टायची सक्ती अजिबात त्रासदायक वाटत नाही उलट आवडतेच :)

ऑफिशीअल फॉर्मल्स मध्ये जीन्स पँट चा समावेश करण्यात यावा. डेनीम कापड हे शरीर आणि पर्यावरणाला पोषक आहे. काही इंजिनीयरींग कॉलेजेस मध्ये जीन्सचा समावेश गणवेशात केला आहे ही फारच स्वागतार्ह गोष्ट आहे.
(आता ऑफिसात डिझाईन केलेली जीन्स, वेगवेगळे पॉकेटेड जीन्स न वापरणे हा तारतम्याचा भाग होतो. त्याबद्दल चर्चा नको.)

यावरून माझाच एक जुना धागा आठवला:
http://www.misalpav.com/node/9951

तसेच युनायटेड नेशन्स एन्व्हारमेंट प्रोग्राम ने (United Nation Environment Program= UNEP) तर यावर एक अ‍ॅड्व्हर्टाईज पण तयार केली आहे.

अप्पा जोगळेकर's picture

21 Apr 2013 - 1:30 pm | अप्पा जोगळेकर

एखाद्या कंपनीत कोणत्या प्रकारचे कपडे घालू यावेत हे कंपनीचे मालक ठरवणार. एखाद्याला पटत नसेल तर त्याने दुसरी नोकरी बघावी.

अभ्या..'s picture

21 Apr 2013 - 2:28 pm | अभ्या..

हे एकदम पटले. लै भारी आप्पा.
आमच्या हापीसात पोरे कसलेही टॉलीवूड स्टाइल कपडे घालून येतात. गोंदवलेकर पण आहेत एकदोघे.(मी पण ;) ) हेअरस्टाइल पण भारी क्रीयेटीव्ह असतेत. घटस्थापना ते आश्विनी पौर्णिमेपर्यंत जवळपास सगळं हापीस चप्पल पाळतं. म्हणजे अनवाणी येतं. खुर्चीवर पाय घेऊन सुधा काम करणारे बरेच जण आहेत. बॅट्या मला भाग्यवान म्हणलाच आहे ते अगदी खरे आहे. :)