ऑफिस आणि फॉर्मल कपडे

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in काथ्याकूट
17 Apr 2013 - 9:18 pm
गाभा: 

णमस्कार्स मिपाकर्स,

बरेच मिपाकर या ना त्या ऑफिसात काम करतात. आयटीपासून कोअरपर्यंत, प्रोग्रॅमर-अशिष्टंट इंजिनिअर-क्लार्क पासून सीनिअर मॅनेजरपर्यंत, तसेच गल्ली-दिल्ली-आम्रविकेपर्यंत मिपाकर जगभरात अनेक प्रकारच्या नोकरी-धंद्यांत असलेले आढळून येतील. काहींचा तर स्वतःचा व्यवसायदेखील आहे.

या व्यामिश्र समूहाला काही साधे प्रश्न आहेत. बर्‍याच दिवसांपासून मनात घोळत आहेत.

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?

२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?

ही बातमी यासंबंधात रोचक ठरावी. आय आय एम अहमदाबाद इथे होणार्‍या प्लेसमेंट इंटरव्ह्यूंसाठी आता साडी नेसणे ग्राह्य समजले जाणार आहे. जर साडी ग्राह्य ठरणार असेल तर माझ्या मते कुर्ता-पँट हेही ग्राह्य ठरण्यास अडचण नसावी. या मुद्द्यावर स्त्री-पुरुषांचे मत जाणण्यास आवडेल.

बुटांचा अस्थानी आग्रह आणि स्त्री-पुरुष यांच्यातील 'फॉर्मल' भेदभाव हे मला तरी ऑड आणि चूक वाटते. मिपाकरांना याबद्दल काय वाटते हे जाणून घेण्यास उत्सुक आहे. एक एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर म्हणून आपल्या मतांत काही अंतर असेल का, हेही जाणण्यास आवडेल.

धण्यवाद इण अ‍ॅडव्हान्स :)

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2013 - 9:34 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या काही वर्षांत स्वतःला न अवघडवणारे अन शक्यतो आजूबाजूच्यांचे लक्ष विचलीत न होणारे कपडे कामाच्या ठिकाणी घालून जायचा प्रघात आहे (या गुणधर्मांच्या व्याख्या सापेक्ष आहेत). मा.त. मध्ये काम करणार्‍या बहुतांश कंपन्यांमध्ये पुरोषांनी सोमवार ते गुरूवार फॉर्मल शर्ट पँट (भडकपणा नसलेले) व शुक्रवारी इन्फॉर्मल / कॅज्युअल कपडे जीन्स टी शर्ट (कॉलरवाले) परिधान करावे असा नियम + मुभा असतो / असते. सोमवार ते गुरूवार चामड्याचे जोडे व शुक्रवारी खेळात वापरले जाणारे जोडे घालावे असाही उपनियम असतो. कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य झालाय असे आजकाल म्हणतात.

बाकी या नियमांना न पाळण्याच्या प्रवृत्तींबद्दल मी येथे लिहिले होते.

बाकी अमेरिकेत इशान्येकडल्या राज्यांमध्ये सुटाबुटाचे फारच महत्व असते असे ऐकले आहे. कामानिमित्त तिकडे कधीच न गेल्याने काही निश्चित ठाऊक नाही.

धन्यवाद. कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतो (वैयक्तिक मत) . आयटीतील तुम्ही म्हणता तो नियम व उपनियम मला माहिती आहे, पण स्त्रियांसाठी ही कल्पना खूप धूसर आहे. त्याबद्दल काय मत आहे?

कमेंट वाचली, त्यात काही अंशी उत्तर मिळाले.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2013 - 9:47 pm | श्रीरंग_जोशी

स्त्रियांच्या फॉर्मल पोषाखाबद्दल एवढेच म्हणता येईल पाश्चात्य फॉर्मल परिधानाखेरीज स्थानिक परिधान (भडक दिसत नसणारे) बहुतांश ठिकाणी चालतात.

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 9:49 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

कंठलंगोट हा प्रकार कालबाह्य झालाय असे आजकाल म्हणतात.

तुम्हाला मा. तं कंपन्यांची काही माहितीच नाही. ("हाय कंबख्त, तूने पी ही नही" च्या चालीवर वाचावे.)

धन्याशेठ ते माझे विधान नाही हो. अर्थात आमच्या कुंपिणीत मीपण टायवाले कधी फार पाहिले नाहीत हा भाग वेगळा. तसेही आमचा करिअरमधील अणुभव फ्याशन टीव्हीवरच्या एकूण कपड्यांइतका तोकडाच म्हणा, त्यामुळे मा.तं. बद्दल आम्हाला माहिती नाही हेही बरोबरच आहे. :)

तसेही आमचा करिअरमधील अणुभव फ्याशन टीव्हीवरच्या एकूण कपड्यांइतका तोकडाच म्हणा

निबंध लिहा: फ्याशन टीव्हीवरचे कपडे फॉर्मल म्हणून मान्यता पावले तर.

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 6:53 pm | बॅटमॅन

या निबंधप्रस्तावाच्या उडतवाचनानेच आमचा ऊर्ध्व लागोन निर्वाण पावलो आहोत. "अगर फिर्दौस बर्रुएं जमी अस्त, हमीनस्तो, हमीनस्तो, हमीनस्त" याचे प्रत्यंतर याचि देही याचि डोळा येईल ;)

शिल्पा ब's picture

20 Apr 2013 - 6:08 am | शिल्पा ब

मा. तं. कंपन्या म्हणजे काय ?

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2013 - 6:28 am | श्रीरंग_जोशी

मा. तं. कंपन्या म्हणजे माहिती तंत्रज्ञान कंपन्या.

शिल्पा ब's picture

20 Apr 2013 - 6:30 am | शिल्पा ब

ठ्यांकु.

पैसा's picture

17 Apr 2013 - 9:56 pm | पैसा

आमच्या हापिसच्या लोकांची जेव्हा कधी दारूची पार्टी असायची तेव्हा काही टारगट मंडळी सगळ्यांनी टाय लावून या असे सांगत. कशाला तर म्हणे जर कोणी दारू पिऊन झिंगला तर टायला धरून ओढत न्यायला बरे!

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 8:05 pm | जेनी...

=)) =))

इरसाल's picture

18 Apr 2013 - 11:55 am | इरसाल

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील. १०/१२ किलोचे बाड बाळगुन भर उन्हातान्हात फिरत असतात. आणी बर्‍यापैकी कंपनीतुन त्यांना नकारच मिळतो. कारण कंपन्यांचे आधीच व्हेंडर फिक्स असतात त्यात नवीन कोणाला ते सामावु इच्छित नाहीत.

सध्याच्या कुंपणीमधे ड्रेसकोड आहे पण आठवड्याचा एक दिवस रंगीबेरंगी बनायला मुभा आहे पण तेही काही नीतीनियम पाळुनच.

इरसाल's picture

18 Apr 2013 - 12:02 pm | इरसाल

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील. १०/१२ किलोचे बाड बाळगुन भर उन्हातान्हात फिरत असतात. आणी बर्‍यापैकी कंपनीतुन त्यांना नकारच मिळतो. कारण कंपन्यांचे आधीच व्हेंडर फिक्स असतात त्यात नवीन कोणाला ते सामावु इच्छित नाहीत.

सध्याच्या कुंपणीमधे ड्रेसकोड आहे पण आठवड्याचा एक दिवस रंगीबेरंगी बनायला मुभा आहे पण तेही काही नीतीनियम पाळुनच.

धन्या's picture

18 Apr 2013 - 6:02 pm | धन्या

कंठलंगोट हा प्रकार मेडिकल रिप्रेझेंटीव्ह किंवा मग प्रयोगशाळांना रसायने/काचभांडी विकणारे हेच काय ते वापरत असतील.

भारतात आय टी म्हटलं की जे नांव समोर येतं, तिकडे आजही सोमवारी आणि मंगळवारी कंठलंगोट घालावा लागतो. नाही घातला तर सुरक्षारक्षक नोंदवहीत कर्मचार्‍याच्या कर्मचारी क्रमांकाची नोंद करतात. महिना अखेरीला तीनशे रुपयाला बांबू !!!

कंठलंगोट हा तसाही हास्यास्पद प्रकार असतो

आहो पण तो गळ्याभोवती असतांना थोडी मनाची आणी थोडी जनाची लाज वाटुन आमच्या सारखे लोक ऑफिसची कामे देखिल करायची पण आता विना कंठलंगोट पुन्हा पहिले पाढे पंचावन...

राजेश घासकडवी's picture

20 Apr 2013 - 10:30 pm | राजेश घासकडवी

अमेरिकेत इशान्येकडल्या राज्यांमध्ये सुटाबुटाचे फारच महत्व असते असे ऐकले आहे.

मी ईशान्येमध्येच काम करतो. हे आमचं फॉर्मल वेअर.
http://www.timesunion.com/business/article/Nothing-nano-about-job-fair-4...

साडी हे सगळ्यात उत्तम फॉर्मल परिधान आहे. ग्राह्य समजले जाणार म्हणजे? इतके दिवस नव्हते की काय?

बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय बातमीवरून तरी. किमानपक्षी आय आय एम अहमदाबाद इथल्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूपुरते बोलायचे झाले तर.

असे पहिल्यांदाच ऐकले. सर्व स्तरांवर काम करणार्‍या स्त्रिया फॉर्मल परिधान म्हणून साडी नेसताना पाहिल्या आहेत. असो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2013 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व स्तरांवर काम करणार्‍या स्त्रिया फॉर्मल परिधान म्हणून साडी नेसताना पाहिल्या आहेत.

बाकी, चर्चेला चांगला विषय. धन्स.

-दिलीप बिरुटे

रमेश आठवले's picture

18 Apr 2013 - 9:34 am | रमेश आठवले

पेप्सी च्या ceo इंदिरा (इंद्रा) नुयी यांनी अमेरिकेत म्यानेजमेंट ची डिग्री घेतल्यानंतर दिलेल्या पहिल्या नोकरीच्या interview मध्ये अमेरिकन पद्धतीचा फॉर्मल सूट घातला होता. त्यांची तेंह्वा निवड होऊ शकली नाही. त्यांच्या दुसर्या interview साठी त्यांच्या प्रोफेसर ने त्यांना साडी नेसायचा सल्ला दिला . या खेपेस त्यांची निवड झाली.
आधार -अन्नपूर्णा यांनी लिहिलेले नुयी यांचे चरित्र.

बरेच दिवस नव्हते असेच दिसतेय बातमीवरून तरी. किमानपक्षी आय आय एम अहमदाबाद इथल्या प्लेसमेंट इंटरव्ह्यूपुरते बोलायचे झाले तर.

ही बातमी बरीच दिशाभूल करणारी आहे असे वाटते.माझ्या माहितीत तरी साडीला आय.आय.एम अहमदाबादमध्ये आडकाठी कधीच नव्हती. मी तिथे २००९ ची आमची समर प्लेसमेन्ट,२०१० ची आमच्या सिनिअर बॅचची फायनल प्लेसमेन्ट, २०१० ची आमच्या ज्युनिअर बॅचची समर प्लेसमेन्ट आणि २०११ ची आमची फायनल प्लेसमेन्ट हे चार प्लेसमेन्ट सिझन बघितले आहेत.तिथे अगदी एकही मुलगी साडीत नव्हती.पण त्याचे कारण संस्थेची साडीला बंदी होती हे अजिबात नाही.पण इन जनरल नव्या पिढीतल्या मुलींना साडी आवडायचे प्रमाण कमी आहे असे वाटते.आणि कोणती मुलगी साडी नेसून तिथे आली असती तरी त्या कारणाने तिला परत नक्कीच पाठविले नसते.मला वाटते की साडी हा पण प्रोफेशनल वेशभूषेचा भाग आहे/असू शकतो याची आठवण करून द्यायला संस्थेने असे जाहिर केले असावे असे वाटते.

प्रत्यक्षदर्शी माहितीबद्दल धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

20 Apr 2013 - 3:44 pm | श्रावण मोडक

बातमी दिशाभूल करते आहे का? तुमचे मत काय?

बॅटमॅन's picture

20 Apr 2013 - 8:14 pm | बॅटमॅन

क्लिंटन आणि अन्य लोकांनी दिलेल्या माहितीवरून चित्र स्पष्ट झाले. बातमी पूर्ण संदर्भ किंवा भूतकाळ नीट कथन करत नसल्याने मला तसे वाटले होते.

पैसा's picture

20 Apr 2013 - 8:53 pm | पैसा

लोकांना उगीच काथ्या कुटायच्या कामाला बसवलंस तर! =))

बॅटमॅन's picture

20 Apr 2013 - 9:28 pm | बॅटमॅन

हांव हांव =)) =))

श्रावण मोडक's picture

20 Apr 2013 - 10:51 pm | श्रावण मोडक

काय सांगता? पटवून घ्यावंच लागेल मला, तुम्ही म्हणताय म्हटल्यावर. शिवाय खाली

लोकांना उगीच काथ्या कुटायच्या कामाला बसवलंस तर!

या प्रतिसादावर तुम्ही

हांव हांव

म्हटल्यानं तर मान्य करावंच लागेल. पण... (आता अख्खी बातमीच जणू इथं पेस्ट करावी लागतीया)

The Indian ethnic wear has been recognised as a formal wear for business interviews held on the campus after a long hiatus, thanks to the efforts of the institute's first woman cultural representative in 52 years — Priyanshi Mathur.

हे वाक्यकाही वेगळंच सुचवतं का हो? विशेषतः मी आत्ता ठळक केलेले शब्द?

Mathur asked the placement committee to recognise sari as formalwear and got the nod.

हे आणखी एक वाक्य. ठळक शब्द माझेच हं...

While Mathur wasn't available for a comment, a student from her batch said, "Business suits were not compulsory for women in the last few years, but recommended by the institute to have a uniform dress code. Suits also met global trends. But I am not sure how many will wear it for interviews."

हेही वाक्य बातमीतलंच. ठळक आणि तिरपे ठसे माझेच हं... पण असोच. तुम्ही म्हणताय म्हणजे बातमी पूर्ण खरी नाहीच.

Professor Kirti Sharda, chairperson of the placements committee said, "We ask students to come in business formals for interviews. What they consider formal is up to them."

पुन्हा शब्द बातमीतलेच. जाड ठसा माझा.

Nayan Parikh, president of IIM-A Alumni Association, Ahmedabad chapter, believes the sari is the best way of showing global companies that these are Indian women managers.

ओह्ह... हेही वाक्य बातमीतलंच. ठळक शब्द माझा. जो आत्तापर्यंत मला कळलेला नव्हता. ग्लोबल ट्रेंड्स वगैरे इंडियन झाले की राव... मीच विसरलो.

Beena Handa, an IIM-A alumnus of the 1974 batch and vice-president, Claris Lifesciences, feels that appropriateness matters over dressing Indian or western. "Almost 40 years ago, the typical image of a professional woman manager was a plain sari with a thick border. Over time, both the sari and the business suit have gained acceptance for women. A sari gives a woman grace and adds maturity to her persona. But we need to have a flexible view of the dress code now, keeping the job profile and culture of the organisation in mind," Handa said.

आमची नजरच वाईट. नको तेच पाहते... चालायचंच.
आयआयएम, आयआयटी वगैरे आयआय असलेले शब्द... झेपतच नाहीत हो...
मी आणखी एक काम केलं. या बातमीचा काही इन्कार आयआयएम (बरोबर ना?) अहमदाबादनं केलाय का हे पाहिलं. तो तर दिसला नाही. प्लीssssssज, कोणी तरी मला दाखवा तो... म्हणजे या आयआय मधल्या एका तरी आयवर मला नीट विश्वास ठेवण्यासाठी एक (एकमेव नव्हे) आधार मिळेल... प्लीssssssज...

ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले. चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच. त्यात परत अजून नवीन माहिती कळाली तर अपडेटही करेन. विशेष ते काय? हांव हांव वगैरे मजेत म्हणालो होतो.

क्लिंटन's picture

20 Apr 2013 - 11:47 pm | क्लिंटन

प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे. बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले. चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.

जाऊ दे रे.एक तर मिडियावाले आय.आय.एम विषयीची बातमी अगदी चवीने छापतात मग ती बरोबर आहे की नाही वगैरे विचार करायची गरज त्यांना वाटत नाही.आमच्या बॅचमध्ये डॉएश बँकेने एका विद्यार्थ्याला दीड कोटीचे पॅकेज दिल्याची बातमी अशीच मीठ मसाला लावून या मिडियावाल्यांनी छापली होती.आणि दुसरे इथले काही लोक त्यावर उगीचच चर्वितचर्वण करत असतात. असल्यांना आय.आय.एम वर विश्वास असला काय आणि नसला काय त्याचा *ट कोणाला फरक पडत नाही.आणि असल्यांकडून सर्टिफिकिटे घ्यायची किंवा त्यांच्या मताची दखल घ्यायचीही मलातरी कसलीही गरज वाटत नाही.

बाकी माझ्या संस्थेचे नाव या चर्चेत आले आणि बॅटमॅन उगीचच मॅलिशिअस हेतूने ते देणार नाही याची खात्री आहे म्हणून मी तिथे बघितलेली परिस्थिती सांगितली. बाकी माझ्यावर, माझ्या संस्थेवर, तिथल्या प्राध्यापकांवर इतर कोणीही काहीही बरळले तरी त्याची दखल घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.किंबहुना असले लोक असले आणि नसले तरी व्यक्तिशः माझ्यात काहीही फरक पडत नाही.तेव्हा माझ्यासाठी हा विषय संपला आहे.

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 11:56 pm | प्यारे१

सब्बी वड्डे लोगोंको सलामालेकुम!

काय्कु झगडा कर रहेले? जाना देव.
सालों हो गए 'उस' किस्से को यारो!
वोहीच डाली पकडके बैठोगे तो आगे का डाली कैसे पकडोगे?
उधरीच रुकके झिंदगी चल्ती क्या मियां?
मिट्टी डाल देव ना!

श्रावण मोडक's picture

21 Apr 2013 - 12:05 am | श्रावण मोडक

झा की शा?

श्रावण मोडक's picture

20 Apr 2013 - 11:54 pm | श्रावण मोडक

ओक्के. प्रतिसाद मला उद्देशून असला तरी मी याचे उत्तर देण्यास असमर्थ आहे.

हे बरं नाही राव... तुम्ही बातमीचा दुवा दिलात. तो मी वाचला, चर्चा वाचली. मग प्रश्न केले. आता तुम्ही असमर्थ म्हणजे...
असो...

बातमीला मी प्रमाण मानले, तर बाकीच्यांनी त्यात काही चुका आहेत असे दाखवले.

कुणी, कुणी? मला तर वर कुठंही दिसलं नाही राव. जरा दुवे द्या, आणि दिल्याबद्दल दुवाही घ्या...

चुका दाखवणारे प्रत्यक्षदर्शी असल्याने मी त्यांना दुजोरा देणार हेही साहजिकच.

नक्की? २०१२, २०११, २०१० ते पुन्हा २०१२. आत्ता आपण २०१३ मध्ये आहोत.

त्यात परत अजून नवीन माहिती कळाली तर अपडेटही करेन. विशेष ते काय? हांव हांव वगैरे मजेत म्हणालो होतो.

ह्यात्तेरीकी... मी म्हटलं ना, मला कळतच नाही...
पण चालायचंच.... आयआयएम... काण्ट हेल्प...

श्रावण मोडक's picture

21 Apr 2013 - 12:04 am | श्रावण मोडक

वर पहिल्या मुद्द्यावरच्या कमेंटमध्ये शेवटी 'असो...' असा शब्द आहे, त्याचा अर्थ आयआयएम प्रश्नांची उत्तरे देत नसते, असा घ्यावा. बॅटमन उत्तरं देताहेत का हे पाहू...

बॅट्या काय आयआयएम चा संचालक ए का उत्तरं द्यायला? तुम्हीपण ना !

श्रावण मोडक's picture

21 Apr 2013 - 12:16 am | श्रावण मोडक

तेच म्हणतोय मी...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2013 - 9:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

"फॉर्मल ड्रेस" ही संकल्पना आपण पाश्चात्यांकडून उचललेली आहे. पश्चिम युरोपात ट्रेडीशनल कपड्यांना फॉर्मल समजलं जातं. टीशर्ट, जीन्स हे आणि असे आधुनिक कपडे इनफॉर्मल. (या हिशोबाने स्त्रियांनी ट्राऊजर्स* घालणंही इनफॉर्मल होतं. पण तिथे वेगळी परिमाणं वापरावी लागतात. त्याबद्दल अन्यत्र, कधी जमल्यास लिहेन.) अमेरिका हे एकूणच आधुनिक कडबोडं असल्यामुळे तिथल्या पारंपरिक म्हणवल्या जाणार्‍या कल्पना, संकल्पना या आधुनिकच म्हणाव्या लागतात; पण आपल्याकडे अमेरिका करते ते प्रमाण मग त्याची नक्कल किंवा त्याला विरोध हे योग्य असं मानणार्‍यांची बहुसंख्या दिसते.

भारताच्या संदर्भात हीच व्याख्या वापरली तर स्त्रियांसाठी साडी, पंजाबी ड्रेस, हाफ सारी इ. सगळ्या गोष्टी फॉर्मल होतात. मराठी स्त्रियांनी नऊवारीच नेसावी का पंजाबी ड्रेसही मराठी मुलींसाठी फॉर्मल समजावा इतपत बारकाव्यांचा विचार मी केलेला नाही. करण्याची वेळ आलेली नाही.
त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर, सुरवार, झब्बा (कुडता हा शब्द, साडी या शब्दाप्रमाणे मराठीत हिंदीतून आयात केलेला असावा), कोल्हापुरी वहाणा वगैरे फॉर्मल समजता याव्यात.

पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या, बहुसंख्य समाजाला मान्य असणार्‍या समजापोटी, पुरुषांचे फॉर्मल कपडे म्हणजे पाश्चात्यांचे ट्रेडीशनल कपडे असा समज भारतात बोकाळलेला असू शकतो.

आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मुळात फॉर्मल, पोशाखीपणाचीच चीड असल्यामुळे मला त्यात फार रसही नाही.

त्याच हिशोबात पुरुषांनी धोतर, सुरवार, झब्बा (कुडता हा शब्द, साडी या शब्दाप्रमाणे मराठीत हिंदीतून आयात केलेला असावा), कोल्हापुरी वहाणा वगैरे फॉर्मल समजता याव्यात.

पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या, बहुसंख्य समाजाला मान्य असणार्‍या समजापोटी, पुरुषांचे फॉर्मल कपडे म्हणजे पाश्चात्यांचे ट्रेडीशनल कपडे असा समज भारतात बोकाळलेला असू शकतो.

आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मुळात फॉर्मल, पोशाखीपणाचीच चीड असल्यामुळे मला त्यात फार रसही नाही.

पूर्ण सहमत. धन्यवाद.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

17 Apr 2013 - 9:52 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

वरचा प्रतिसाद अश्लील (vulgar) वाटू शकतो याची कल्पना आहे.

vulgar [vuhl-ger] adjective
1. characterized by ignorance of or lack of good breeding or taste: vulgar ostentation.

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 9:54 pm | बॅटमॅन

णॉट टु मी अ‍ॅट लीष्ट.

अन्या दातार's picture

17 Apr 2013 - 9:54 pm | अन्या दातार

पण स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं अशा अर्थाचे वेगवेगळे पदर असणार्‍या

प्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे.
आता हे ग्राह्य का अग्राह्य हे ठरवण्याचा अधिकार माझ्याकडे नाहीच नाही; पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही.

अन्या

अन्या दातार's picture

17 Apr 2013 - 10:06 pm | अन्या दातार

उद्धृत विधान अश्लील आहे असे कुठेही म्हणालो नाहीये, फक्त त्याची गरज नव्हती इतकेच सांगण्याचा प्रतिसादाचा उद्देश होता.

स्पष्ट करण्याची इच्छा आहे, वेळ होईल तसं लिहेन.

धागा हायजॅक व्हायची दाट शक्यता असल्याने न लिहिल्यास उत्तम! बाकी आपली मर्जी.

क्लिंटन's picture

20 Apr 2013 - 11:24 am | क्लिंटन

प्रस्तुत विषयासंदर्भात वरील शब्दरचना टाळता आली असती असे माझे मत आहे.

+१.

पण मुळात वडाला पिंपळाची साल लावायच्या सवयीचीच चीड असल्याने मला त्यात फार रसही नाही.

+१. या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Apr 2013 - 3:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या चर्चाप्रस्तावात ऑफिसमधील फॉर्मल कपड्यांविषयीचा उल्लेख आहे तेव्हा त्यात भारतीय संस्कृती आणि "स्त्री-मुक्ती" हे उल्लेख अस्थानी वाटले.

-१०००००००००००
सदर विषय हा विश्व व्यापून दशांगुळे उरला आहे याची तुम्हाला कल्पना नसावी... सदर विषयावरील बायबल* वाचा म्हणजे डोळे उघडतील.

* चाणाक्ष वाचकांना या पुस्तकाचे नाव माहित असेलच. इतरांनी व्यनि करावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2013 - 10:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> स्त्रियांनी काय ती (भारतीय) संस्कृती जपावी आणि पुरुषांनी काहीही शेण खाल्लं तरी चालतं

प्रतिसादात स्त्री- पुरुष, संस्कृती, भेदभाव नक्कीच असेल अशी कल्पना केलीच होती. प्रतिसाद वाचून खात्री आणि हहपुवा झाली. =)) =)) =))

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

18 Apr 2013 - 11:49 am | मदनबाण

प्रतिसादात स्त्री- पुरुष, संस्कृती, भेदभाव नक्कीच असेल अशी कल्पना केलीच होती. प्रतिसाद वाचून खात्री आणि हहपुवा झाली.
हॅहॅहॅ... ;)

प्यारे१'s picture

18 Apr 2013 - 1:56 pm | प्यारे१

मोबाईलवरुन बर्‍याच प्रतिक्रिया दिसल्या होत्या!

इकडे दिसत नाहीत (डेस्क्टापावरुन)
असं काय झालं नेमकं? ;)

भीडस्त's picture

18 Apr 2013 - 6:33 pm | भीडस्त

प्यारेभाव
सत्त्या पल्डा नं काय ह्ये मपलायबी.
रातच्याल्या मोबायलात,डोळ्यावं झापाड येत आसतानिच वाच्ल्या व्हत्या.
म्हंगालं रामाच्या पार्‍ही उजूक बईजवार वाचीन समदं..
पर आज तं समदं डव्हात बुल्डं नं काय ह्ये.

लॉरी टांगटूंगकर's picture

17 Apr 2013 - 9:59 pm | लॉरी टांगटूंगकर

जिथे टेम्परवारी आहे तिथं लुंगी गुंडाळून गेलो तरी चालतंय. पुढे जिथं जायचंय तिकडे ड्रेस कोड सोडा राव, युनिफॉर्म आहे. श्या !!!!!!

जिथं कस्टमरशी डायरेक्ट संबंध येत नाही मंजे बॅंका वगैरे मधले जॉब सोडले तर इतर ठिकाणी ड्रेस कोडची काही गरज नाही वाटतं. दोस्ताच्या हापिसात थ्री फोर्थ घालून आलं तरी चालायचं. लोकं स्लीपर ( :) ) वगैरेवर यायला लागल्यानंतर त्यांनी बिझनेस कॅज्युअलच्या नवा खाली काय चालतं याची यादी दिली म्हणे..

केदार-मिसळपाव's picture

18 Apr 2013 - 1:20 pm | केदार-मिसळपाव

लै भारी...

साडी, पंजाबी कपडे, शर्ट पँट (स्त्रीयांनी) यापैकी काहीही चालावे असे वाटते. जिला जे सोयिस्कर असेल, परवडत असेल, आवडत असेल ते! तसेच पुरुषांनाही शर्ट पॅंट, कुर्ता सलवार (किंवा जे काय म्हणत असतील ते) घालावयास हरकत नसावी. आता साडी म्हटल्यावर उगीच भरजरी नेसू नये तसेच पुरुषांनीही कुर्ता चालतोय म्हणून मणी, खडे लावलेले (लग्नातल्यसारखे) घालू नये. याशिवाय नको त्या भागाचे प्रदर्शन मांडणारे कपडे नकोत (हापिसात म्हणतीये, बाहेर काय करायचे ते करा).
१. वेस्टर्न कपडे जर भारतात सर्रास वापरले जातात (मान्य केले जातात्)तर त्याचा प्रभाव आहे असे म्हणावे लागेल पण चांगल्या अर्थी. (आम्हीही स्पघेटी टॉप घातलेल्या मुली नेहमी बघतो किंवा मिनीज घालून मुली नेहमी दिसतात ही विधाने येथे ग्राह्य धरलेली नाही, हापिसबद्दल बोलणे चालले आहे म्हणून).
२.माझ्यामते फॉर्मल कपडे हे अंग झाकणारे (उगीच जीव घुसमटवणारे नकोत्)असावेत (दोघांसाठीही). कामाच्या स्वरूपावर कपडे घालण्याची पद्धत बदलत जावी तशी ऋतूमानानुसार व देशानुसारही. कंपनीच्या महत्वाच्या बैठका, ज्यात बाहेरदेशातील व्यक्ती सामील आहेत अश्यावेळी त्याप्रकारचे कपडे, तर इतर वेळी सोमवार ते गुरुवारचा पेहराव व शुक्रवारचा पेहराव यातील फरक याबद्दल श्रीरंगपंत जे म्हणतायत ते बरेचदा असते. ते त्रासदायक नाही वाटत.
बायकांचा फॉर्मल ड्रेस हापिसात शर्ट व पँट असावयास (तसेच भारतात पंजाबी कपडे) हरकत नसावी व शुक्रवारी आवडत असल्यास साडी किंवा अंग झाकणारे हवे ते कपडे.
खरा वैताग तेंव्हा येतो जेंव्हा बाहेरदेशातील लोक हापिसात बैठकीस आल्यावर स्वागत म्हणून साडी नेसलेल्या बायकांनी ओवाळणे टाईप करतात तेंव्हा.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2013 - 10:16 pm | श्रीरंग_जोशी

खरा वैताग तेंव्हा येतो जेंव्हा बाहेरदेशातील लोक हापिसात बैठकीस आल्यावर स्वागत म्हणून साडी नेसलेल्या बायकांनी ओवाळणे टाईप करतात तेंव्हा.

यास सहमत व यावरून आठवले.

माझ्या पहिल्या कंपनीच्या एका कस्टमरचे लोक भेट द्यायला म्हणून आले होते तेव्हा संध्याकाळी पौडरोडवरच्या गार्डन कोर्ट नामक रिसॉर्टवर जंगी पार्टी होती (मी नेमका त्या अकौंटसाठी काम करत नव्हतो म्हणून प्रत्यक्ष उपस्थित). तर कस्टमरच्या काही मंडळींना तिथे उंट व घोड्यावरून मिरवत आणले गेले होते (त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती म्हणे).

त्या कंपनीत कुठलिही कस्टमर व्हिजीट असली की सर्वच कर्मचार्‍यांना व्यवस्थित कपडे घालून या. डेस्कला नीट नेटके आवरून ठेवा, उगाच नेट ब्राउझिंग करत बसू नका, सकाळी आठच्या आत हापिसात पोचा असल्या सूचना असायच्या.

त्याखेरीज काही वर्षांपूर्वी एक ढकलपत्र फिरत होते. त्यात भारताच्या सर्वात मोठ्या मा.त्. कंपनीचा एक व्यवस्थापक मुंबईत भाड्याने काही तासांसाठी हत्ती कुठे मिळेल या माहितीची काकुळतेने याचना करत होता. कारण तेच कस्टमर व्हिजिट.

रेवती's picture

17 Apr 2013 - 10:18 pm | रेवती

मुंबईत भाड्याने काही तासांसाठी हत्ती कुठे मिळेल या माहितीची काकुळतेने याचना करत होता.
काय रे बाबा! कठीण आहे!

कवितानागेश's picture

17 Apr 2013 - 10:05 pm | कवितानागेश

बूट घालणे बोअर होते ज्याम. भारतात तरी चपला वापरता यायला हव्यात.
बाकी हापिसात कुठलेही कपडे घातले तरी त्यानी काय फरक पडतो हे मला आजपर्यन्त कळले नाहीये.

रेवती's picture

17 Apr 2013 - 10:10 pm | रेवती

'लक्ष विचलीत होणे' हा फरक पडतो. ;)

कवितानागेश's picture

17 Apr 2013 - 11:20 pm | कवितानागेश

लक्ष विचलित होणारच!
सगळ्यांचच एकमेकांच्या कपड्यांकडे लक्ष असतं.
समज आपण दोघी एकाच हापिसात आहोत आणि मी उद्या नवीन साडी नेसून आले, तर तू काम सोडून माझ्याजवळ येउन विचारशीलच ना, 'माहेरुन कोणी आले का गं? नवीन साडी?' इ.इ. =))

रेवती's picture

18 Apr 2013 - 1:21 am | रेवती

हो हो , नक्कीच! :) मी येऊन विचारणारच "अय्या कित्ती छान, कुठली साडी आहे म्हणायची?" टाईप. ;)

अभ्या..'s picture

17 Apr 2013 - 10:08 pm | अभ्या..

आमच्यात तसलं काय नसतंय रे बॅट्या. ;)

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?

फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही!

आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.

२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?

"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते!

--
थोडं अवांतरः
या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्‍याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.)

पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली!

आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं.

त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

20 Apr 2013 - 1:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुख

हा हा हा हा हा.....!! एकचं नंबर... एच.आर. मॅनेजर ह्या अत्यंत तापदायक व्यक्तीला मस्त शब्द वापरलाय. (सगळे नसतात तापदायक, उगीच इथला एखादा निघायचा एच.आर.मॅनेजर आणि "नेहेमीच्या सवयीनी" यायचा शिंग रोखुन ;). )

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 10:17 pm | बॅटमॅन

@अदिती: सहमत आहे. कारण काय असेल ही उत्सुकता आहे.

@रेवती: संतुलित प्रतिसाद.

@लीमाउजेटः प्रचंड सहमत.

@अभ्या: भाग्यवान आहेस लेका. :)

चावटमेला's picture

17 Apr 2013 - 10:17 pm | चावटमेला

अंगावर न येणारे कपडे अंगावर घालून ऑफिसला जावे :)

अंगावर न येणारे कपडे अंगावर घालून ऑफिसला जावे

नक्कीच.

मला स्वतःला बोल्ड (उठून दिसणारे अथवा एक फॅशन स्टेटमेंट करणारे) दागीने अतिशय आवडतात पण तारतम्य राखून मी सोबर कपड्यांवर एखादा बोल्ड पीस व उठून दिसणार्‍या कपड्यांवर नाजूक मोती वगैरे असे कॉम्बिनेशन करते. तसेच डोळे व ओठ दोन्ही जर उठावदार केले तर अति होते. वन शूड प्ले डाऊन वन ऑफ देम. डोळे जर उथावदार केले तर न्यूड्/लाईट लिप्स्टीक व जर ओठ उठावदार केले तर डोळे कमी उठावदार असा काहीसा बॅलन्स (संतुलन) करावे लागते.
बाकी कितीही सोबर पेहराव करुन तुम्ही खिदळत, मुरकत बोलाल तर ते मूर्खासारखेच दिसेल. म्हणायचा मुद्दा हा की अतिशय सोबर व "नो नोन्सेन्स" ऑरा परीधान करणेही तितकेच महत्वाचे.

१. फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का?

फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे. आमच्या हपीसात कंठलंगोट सक्तीचा होता. शुक्रवारी क्लायंटांना भेटायचं नसेल तर कॉलरवाला टीशर्ट आणि कॉटनची विजार चालायची. पण जीन्स नाही म्हंजे नाही!

आमची कुंपणी जागतिक असल्याने यावर कोणाचाच इलाज चालायचा नाही.

२. फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही?

"स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस" म्हणजे नक्की काय - यावर आमच्या कुंपणीच्या "मानव संसाधन पोथी"त चांगला पानभर मजकूर होता. (मर्दांच्या फॉर्मल ड्रेसवर मात्र दोनच परिच्छेद!) त्यात पाश्चात्य वेषाबरोबर पंजाबी ड्रेस आणि साडी सुद्धा गणली जायची. हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता. (नाकातली आभूषणं वापरायला सक्त मनाई होती!) स्कर्टाची लांबी वगैरे उल्लेख सुद्धा होते!

थोडं अवांतरः
या **पणाचा मला भयंकर तिटकारा येतो. त्यावरची माझी मतं मी बर्‍याचदा जाहीर (आणि मोठ्या आवाजात) व्यक्त करायचो म्हणून लोकांनी मला "युनियन लीडर" असं टोपणनाव दिलं होतं. एका वाढदिवसाला सगळ्यांनी मिळून मला लाल रंगाचा टाय भेट दिला होता. (बॉक्सवर "लाल सलाम" असं लिहिलं होतं.)

पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली!

आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं.

त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.

पोथीनिष्ठ मानव संसाधन्यांच्या ससेमिरातून सुटण्यासाठी मी बर्‍याच लटपटी करून पाहिल्या. उदा. कोटाऐवजी नेहरू जाकीट वापरणे वगैरे. पण एकदा मानव संसाधन्यांच्या टोळीप्रमुखाचं प्रेमपत्र आल्यावर कामगार चळवळ बंद पडली!

हे असले पोथीनिष्ठ मूर्खागमनी ज्यामच डोक्यात जातात. आणि **पुढे आपला इलाजही नसतो :(

आयकर अपीलीय अधिकरणाने कायद्यात रीतसर पोशाखसंहिता लिहिली आहे. ती कटाक्षाने पाळली जाते. एकदा कोर्टाशी बोलताना मी कोट घातला नव्हता (आणला होता, पण उकडत होतं म्हणून खुर्चीच्या पाठीला लावला होता) म्हणून मला चांगलंच झाडलं होतं.

त्या पोशाखसंहितेत धोतर-बंद गळ्याचा कोट असाही वेष चालतो. पण मी तरी आजपर्यंत असा वेष केलेला इसम अधिकरणात पाहिला नाही.

म्हंजे कुठल्या कोर्टात म्हणे? आणि धोतर चालत असेल तर कटाक्षाने तसेच जाऊन एकदा खोड मोडायला चांगली मजा येईल.

फॉर्मल ड्रेस हा खुळच्याटपणाचा कळस आहे.

या सारांशाशी बर्‍याच अंशी सहमत!!!

पैसा's picture

17 Apr 2013 - 10:33 pm | पैसा

माझे आजोबा वकील होते. ते नेहमी धोतरच नेसायचे. आणि ट्रॅडिशनल ड्रेस म्हटलञ ना? मग तू पण बिनधास्त जा आणि वाद घाल की!

ओक्के. तसा कधी वादाचा प्रसंग आला नाही, पण आल्यास नक्की वाद घालेन.

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात एक वृद्धसे वकील धोतर नेसून येत हे बर्‍याचदा पाहिले होते. जुनी गोष्ट आहे अर्थात.

हातातली, कानातली, गळ्यातली आभूषणं कशी नसावीत यावर बराच उहापोह होता.
हे माझ्या नवर्याच्या कंपनीत आहे पण ते 'सजावट म्हणून नको' असे नसून लॅबमध्ये विद्युतप्रवाहाशी कामे असतात म्हणून (सुरक्षिततेच्या कारणास्तव). त्याने गळ्यातील साखळी, अंगठी घरीच ठेवली नंतर नंतर मग घालायची सवयच मोडली. एकदा दिवाळीनंतर चुकून ब्रेसलेट तसेच राहिले तेंव्हा सहकार्‍याने आठवण करून दिली.
मी पोहायला शिकताना इंस्ट्रक्टरने मंगळसूत्र, पायातील जोडवी सुरक्षिततेच्या कारणास्तव काढायला सांगितली. नंतर मग माझीच सवय मोडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2013 - 10:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझ्या महाविद्यालयात आम्हाला ड्रेसची सक्ती नाही. पण, टीशर्ट आणि शॉर्ट शर्टला तशी अलिखित बंदी आहे. शुज आवश्यकच आहेत असं नाही. चप्पलही चालून जाते. जीन्स पँट चालते. महिला प्राध्यापिका बहुतांशी साडी परिधान करुन येतात. काही पंजाबी मधे असतात पण कधी असं तर कधी तसं. बाकी, ड्रेसकोड बद्दलचा अतिआग्रह मला मान्य नाही. व्यवस्थितपणा असावा, फार वेगळेपणा वाटू नये इतपत ड्रेस असावेत असे वाटते.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 10:36 pm | बॅटमॅन

बाकी, ड्रेसकोड बद्दलचा अतिआग्रह मला मान्य नाही. व्यवस्थितपणा असावा, फार वेगळेपणा वाटू नये इतपत ड्रेस असावेत असे वाटते.

पूर्ण सहमत.

चित्रगुप्त's picture

17 Apr 2013 - 10:38 pm | चित्रगुप्त

हापिसात घालण्यासाठी खालील प्रमाणे वस्त्रे असावीत, असे सुचवितो:

a b

d f

वरच्या दोन जोड्या विशेष रोचक आहेत.

अभ्या..'s picture

17 Apr 2013 - 10:47 pm | अभ्या..

च्यामारी ते तलवारवाल्याचा ड्रेस भारीय. डोक्यावरच्या तुर्‍याने मॉनिटर न कीबोर्ड साफ करता येईल. ;)
बाकी भुताननरेशासारखे कपडे शिवायला दोन वर्शाचे प्याकेज खर्च होईल एकदम. (मिशेस सहीत म्हनलं तर ५ वर्शाचे)

कपिलमुनी's picture

18 Apr 2013 - 8:36 am | कपिलमुनी

डोक्यावरच्या तुर्‍याने मॉनिटर न कीबोर्ड साफ करता येईल.

लै भारी रे

जेनी...'s picture

18 Apr 2013 - 8:11 pm | जेनी...

=)) =))

पैसा's picture

17 Apr 2013 - 10:46 pm | पैसा

शब्दन शब्द बरोबर असेल असे नाही पण http://en.wikipedia.org/wiki/Formal_wear

यांच्या म्हणण्याप्रमाणे सुरुवातीला फुल्ल ड्रेस हा शब्दप्रयोग वापरात होता, त्याचा नंतर फॉर्मल ड्रेस झाला. भारतात धोती (दक्षिणेत लुंगी) आणि साडी हे फॉर्मल ड्रेस आहेत. शीखांना सगळीकडे पगडी घालण्याचा विशेष अधिकार आहेच.

धन्यवाद माहितीकरिता. पण विविध हपिसांच्या संहितांमध्ये धोतर-लुंगीचा समावेश आहे का? आमच्या हपीसचं आता विसरलो काय आहे ते.

बंगलोरात असताना पाहिले होते की सणावारांना आमच्या ब्रिटीश कंपनीत पुरुषांना लुंगी नेसून व उपरणे घेऊन येण्यास मान्यता होती.

हे पुण्यात माझ्या कंपनीतही होतं-पण सणावारी नव्हे तर ट्रॅडिशनल डे ला वैग्रे. पण जणरल सणवार सोडून नेहमीची काय स्थिती आहे? मुळात कटाक्षाने पारंपरिक कपड्यांचा आग्रह धरणारेच कमी म्हणूनही नियम जाचत नसण्याची शक्यता जास्त.

मी मद्रासेत कामाला गेले आणि तिथे जर बरेचजण लुंगी नेसत असले तर काही बोलता येणार नाही पण बदलत्या काळानुसार कोणत्याही राज्यात आपण नोकरी करतो. निदान मला तरी लुंगी हा प्रकार किळसवाणा वाटतो. नेहमी भीती असते की या बुवाची लुंगी सुटली बिटली तर काय करायचे. अशीच भीती आजकालच्या जीन्सबद्दल वाटते. भारतात बहुतेक नसाव्यात पण हामेरिकेत आता निसटेल की मग निसटेल अश्या घालतात. एवढे पारंपारीक/फ्याशनेबल नसल्यास चालेल, निदान हापिसात तरी! काही नियम हे उगीच जाचक नसले तर रेटून न्यावे लागतील. उदा. शर्ट पँट किंवा त्यासदृश कपडे. त्यात कुर्ता पायजमा/सलवार आलेच.

लुंगी हा किळसवाणा प्रकार नाही बरं! बाकी सहमत.

निदान मला तरी लुंगी हा प्रकार किळसवाणा वाटतो. नेहमी भीती असते की या बुवाची लुंगी सुटली बिटली तर काय करायचे.
हॅहॅहॅ ! आज्जे तू पण ना ! काय करायचे ते बुवा बघेल ना !;)
बाकी कंपनीचे नियम म्हंटल्यावर ते फॉलो करावेच लागतात त्याला पर्याय नाही.पावसाळ्याच सुद्धा यांना लेदरचेच शुज लागतात ! पावसाळ्यात मी एक जोड हापिसातच ठेवुन जातो...काय करणार मजबुरी का नाम *** ** !
बाकी आठवड्यातुन एकदाच का होईना मनासारखे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य (यालाही काही बंधन आहेच.) मिळते हेही नसे थोडके !बाकी पाखरांच्या बद्धल काय बोलणार ? म्हणजे बोलावे तितके कमीच... च्यामारी यांच्या केस बांधण्याच्या"बो" मधेच इतकी व्हरायटी असते तर कपड्यांची काय विचारणा करावी !मुळात "व्हरायटी" हा शब्दच पाखरांमुळे जन्माला आला असावा असे वाटते ! ;) ड्रेसिंग बाबत आयटी,कॉल सेंटर्,बीपीओ, या ठिकाणी जास्त व्हरायटी आणि ट्रेंड्स पहायला मिळतात.कॉल सेंटर मधील मुल अगदी छपरी टाईप पोशाखात तर मुलीची विचाराल तर सगळं काम हलेडुले !

प्रमाणाच्या बाहेर काहीच्या काही अवांतर :---
A black baby is given a pair of
wings by God.
He smiles asks
"Does dis mean I'm an Angel ?"
God laughed
Are nai re Kaalu...Batman Banaya Tereko. ;)
माझ्या WhatsApp ढकल संदेशातुन... हलकं घे रे वटवाघुळ मानवा ! ;)

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 1:07 pm | स्पंदना
प्रसाद गोडबोले's picture

20 Apr 2013 - 3:44 pm | प्रसाद गोडबोले

अचाट हसतोय ...कसला व्हिडीयो आहे हा =))

लुंगी च्या ऐवजी पॅन्ट घातलेली असती तर काय हालत झाली असती

लुंगी जय हो !!

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 12:00 am | यशोधरा

नेहमी सहसा शर्ट प्यांट घालतानाच पाहिले पण पुण्यातलाच एक अनुभव सांगते. एका इंजिनियरिंग कंपनीत असताना, सेल्स मॅनेजरला (तामिळ) एक काही धार्मिक ritual पार पाडायचे होते, आणि त्यात बरीच बंधने असतात (म्हणे) तर १ महिना तो गृहस्थ ऑफिसमध्ये अनवाणी, लुंगी नेसून, वर साधा शर्ट - उपरणे व दाढी करायची नाही म्हणून तीही वाढवून येत होता. हीसुद्धा युरोपिअन कंपनीच होती.

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 4:02 am | स्पंदना

अय्यप्पा वारी साठी जायचा असावा किंवा साधारण ते लोक आपण जसा श्रावण पाळतो तसा तो एक महिना अय्यप्पाच्या कारणाने पाळतात. हे तुला जास्त प्रमाणात मलेशियात दिसुन येइल.

अय्यप्पावाले काळा पोशाख करतात ना?

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 5:47 am | स्पंदना

हो! काळा पोषाख असतो त्यांचा. पण वारीला न जाणारे काय घालतात माहित नाही, दाढी मात्र करत नाहीत.

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 10:06 am | यशोधरा

हो अयप्पाच. बरोबर. आठवत नव्हते.

अय्यो अम्मा, त्ये शबरीमला हाय की वो! शबरीमला आनि अय्यप्पा येकच काय? आमाला मायती इल्लल्ला!
पन काळं कापड व्युथ दाढी यान्ड नो खेटरं इज शबरीमला फॉर शुव्वर्र!

यशोधरा's picture

19 Apr 2013 - 11:20 am | यशोधरा

इकडून तिकडून एकच द्येव. सर्वांभूती वगैरे.

मैत्र's picture

19 Apr 2013 - 1:11 pm | मैत्र

अवांतर होतंय पण असो..
शबरीमला हे जागेचे नाव आहे (मला - डोंगर),
अय्यप्पा हे देवाचे नाव आहे - हा किशोर / कुमार रुपातला कार्तिकेय मानला जातो.
पण हे काळे कपडे / काळी लुंगी, एक काळे उपरणे, दाढी न करणे, पायात चप्पल / बूट न घालणे हे सगळं शबरीमलाचंच..
संक्रांत हा मुख्य दिवस त्याच्या आधी ४० दिवस हे व्रतासारखं करतात आणि संक्रांतीच्या दिवशी किंवा सोयीनुसार थोडे आधी तिथे जाऊन दर्शन घेतात.
शक्यतो पंपा इथून ३०-४० किमी चालत जातात .. किमान डोंगर तरी आहे त्या कच्च्या पक्क्या वाटेने चढावाच लागतो.

श्रीरंग_जोशी's picture

17 Apr 2013 - 10:57 pm | श्रीरंग_जोशी

वर्षातून दोन तीनदा संणांनिमित्त जसे गुढी पाडवा, दसरा भारतीय पारंपारिक पोशाख घालण्यास काही मा.त. कंपन्यांमध्ये विशेष सुट दिली जाते. काही वेळा त्याची स्पर्धाही ठेवली .

एकदा मी माझ्या टीमसाठी कापडी पगड्या भाड्याने आणल्या होत्या.

प्रसाद गोडबोले's picture

17 Apr 2013 - 11:04 pm | प्रसाद गोडबोले

छान विषय . फार पुर्वी ह्यावर एक चिंतन केले होते ते ह्या प्रमाणे

१)एकुणच फॉरमल हा एक खुप मोठ्ठा घोळ आहे . युरोपात सहसा थंड वातावरण असते म्हणुन ब्लेझर ची श्टाईल आसावी . उथे मुंबैत आम्हाला अगदी घामाच्या धारा लागत असतील तरीही ब्लेझर घालावा लागतो ...अन त्यातुन साऊथ मुंबैतील मीटींग निघाली की मग तर काय पंचाग्नी तपस्या करत असल्याचा फील येतो. थोडक्यात पाश्चात्यांचं हे असलं अंधानुकरण टार गाढवपणा आहे ...( पण सध्या आम्ही ओझीवाहु गाढवच असल्याने विद्रोह करण्याचा **त दम नाही . पुढे मागे स्वतःची कंपनी टाकली तर नॅचरॅलीस्ट कल्चर एब्रेस करायचा विचार आहे कंपनीत ;) )

२) फॉर्मल ड्रेसकोद पुरुष अन स्त्री असमानता : डिसेंट साधी साडी / पॉवर सुट / वन पीस हा आमच्या कंपनीत लेदीज फॉर्मल मानला जातो . ह्यात एक ऑब्झरवेशन असे की ... स्त्रीयांचे फॉरमल कपडे ( आणि एकुणच सर्वच कपडे ) हे त्यांच्या स्त्रीत्वाच्या खुणा ठळक करुन दाखवतील असे असतात (उदाहरणे देवु का ?) अन पुरुषांच्या बाबतीत अगदीच विरुध म्हणजे जितक्या काही विशेष पुरुषत्वाच्या खुणा आहेत त्या दडपायच्या रफ टफ स्कीन नको म्हणुन मग फुल शर्ट फुलपॅन्ट , दाढी नको म्हणुन गुळगुळीत करणे , छातीवरचे केस दिसु नयेत म्हणुन मग गळ्याचे बटन लावुन वरुन टाय सुध्दा .
हा म्हणजे फारच असमानता झाली राव ( पण एच आर नको बुवा सांगायला ... चुकुनमाकुन त्यांना पटलं तर पेन्सिल्हील्स+मिनी स्कर्ट जायचे अन बुरखे यायचे ;) अवांतर : आमची एच आर काय दिसती राव मिनिस्कर्टात ६ इंच चे हील्स घालती ...कसे जमतं बुवा देव जाणे )

सरते शेवटी कंफर्टेबल ते फॉरमल असा नियम असावा असे राहुन राहुन वाटते . तसे झाले तर पायात कोल्हापुरी , वर पांढरे शुभ्र धोतर वर काळा कोट अन वर कडक काळी टोपी असा पेहराव करुन ऑफीसला जायला फार आवडेल ..

अवांतर : हा धागा पुरुष विभागात का नै काढला ? जरा अजुन स्पष्ट बोलता आले असते ;)

ते पुरुषी खुणा दडपण्याबद्दल पूर्ण सहमत बघा!!!!!!! अन अंधानुकरणाबद्दलही :)

धागा पुरुष विभागात काढला असता खरा. लक्षातच आलं नाही :)

खटपट्या's picture

18 Apr 2013 - 12:13 am | खटपट्या

ज्या दिवशी मीटीन्ग कीवा क्लायन्ट वीझीट असेल तेव्हा फॉर्मल आणी बाकी वेळेस जीन्स टी-शर्ट, स्पोर्ट्स शूज असा पेहेराव असण्यास हरकत नसावी.

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2013 - 12:18 am | मुक्तसुनीत

रोचक धागा व चर्चा.

>>>> फॉर्मल ड्रेस या कल्पनेबद्दल आपल्याला काय वाटते? ऑफिसात येड्यागत काहीतरी घालून येऊ नये हे मान्य पण सूट-बूट यांचा सरसकट आग्रह कितपत ग्राह्य? वेस्टर्न संकल्पनेचा गरजेपेक्षा जास्त प्रभाव आहे असे वाटते का? <<<<<

"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे. काही नोकर्‍यांमधे गणवेष असतो. त्या नोकर्‍यांच्या संदर्भात घालावयाच्या कपड्यांचे अधिक कडक नियम असतात. हा शेवटी तुम्ही स्वीकारलेल्या अटींचा भाग आहे असं मला वाटतं. शहरी भागातल्या नोकर्‍यांमधे किमान शर्ट पँट घालण्याचा रीतीरिवाज ही भारतीय संदर्भातली गेल्या पन्नासेक वर्षांमधली घटना आहे. तर मग याला पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असं कितपत म्हणता येईल ?

>> फॉर्मल ड्रेसची पुरुषांवरच सक्ती का? स्त्रियांचा फॉर्मल ड्रेस म्हंजे नक्की काय याची कोणी व्याख्या केली आहे का? असल्यास लिंक इ. द्यावी अशी विनंती. नसल्यास का नाही? <<<

"फॉर्मल ड्रेस"ची सक्ती केवळ पुरुषांवरच असते असं वाटत नाही. निरनिराळ्या संदर्भात ती वेगवगळी , वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या शैथिल्याची असू शकते. परंतु काही लिखित-अलिखित नियम हे सर्व नोकरदारांसाठी असतात. स्त्रियांसाठी असले नियमच नसतात किंवा ते नीटसे लिहिलेले किंवा पुरेसे स्पष्ट नसतात असं मला वाटत नाही. तसं तुम्हाला वाटत असेल तर असं प्रतिपादन करणारे या नात्याने ते दाखवून देण्याची जबाबदारी तुमची :)

"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे. काही नोकर्‍यांमधे गणवेष असतो. त्या नोकर्‍यांच्या संदर्भात घालावयाच्या कपड्यांचे अधिक कडक नियम असतात. हा शेवटी तुम्ही स्वीकारलेल्या अटींचा भाग आहे असं मला वाटतं. शहरी भागातल्या नोकर्‍यांमधे किमान शर्ट पँट घालण्याचा रीतीरिवाज ही भारतीय संदर्भातली गेल्या पन्नासेक वर्षांमधली घटना आहे. तर मग याला पाश्चात्य विचारसरणीचा प्रभाव असं कितपत म्हणता येईल ?

नोकरदाराला काय वाटतं हे तादृश महत्वाचं कदाचित नसेलही- पण मला तरी वाटतं की ते महत्वाचं आहे. शिवाय त्या अटी न स्वीकारून सांगतोय कुणाला? जिथे अगदी जिवावर बेतू शकेल म्हणून काही नियम असतात ते सोडून बाकी केसेसबद्दल म्हणतोय. आणि शर्ट पँट बद्दल म्हणायचे तर पाश्चात्य रीतिरिवाज खोलवर भिनल्यामुळेच त्यांचा वेष स्वीकारला, नपेक्षा दुसरे कारण काय होते? शर्टप्यांट हे धोतर-सदर्‍यापेक्षा जास्त कम्फर्टेबल असतात असे काही मला वाटत नाही. तंग सुरवार हा प्रकारही अगदीच अनहर्ड ऑफ नव्हता. पण रोजबरोज प्यँट घालणे हा अनुकरणातूनच आलेला प्रकार आहे.

"फॉर्मल ड्रेस"ची सक्ती केवळ पुरुषांवरच असते असं वाटत नाही. निरनिराळ्या संदर्भात ती वेगवगळी , वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या शैथिल्याची असू शकते. परंतु काही लिखित-अलिखित नियम हे सर्व नोकरदारांसाठी असतात. स्त्रियांसाठी असले नियमच नसतात किंवा ते नीटसे लिहिलेले किंवा पुरेसे स्पष्ट नसतात असं मला वाटत नाही. तसं तुम्हाला वाटत असेल तर असं प्रतिपादन करणारे या नात्याने ते दाखवून देण्याची जबाबदारी तुमची

चर्चाप्रस्ताव अजून नेमकेपणे लिहायला पाहिजे होता बहुतेक :) असो. स्त्रियांसाठीचे नियम पुरेसे स्पष्ट असतात हे वर काही प्रतिसादांतून दिसतंच आहे. पण पुरुषांना फॉर्मलच्या नावाखाली ऑप्शन्स बैकांच्या तुलनेत लै कमी अलाउड आहेत ही मुख्य रड/तक्रार आहे.

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2013 - 1:14 am | मुक्तसुनीत

>> तंग सुरवार हा प्रकारही अगदीच अनहर्ड ऑफ नव्हता. पण रोजबरोज प्यँट घालणे हा अनुकरणातूनच आलेला प्रकार आहे. <<<

याबद्दल दुमत नाही. परंतु, ही घटना आजची नसेल, अनेक दशकांपासूनची असेल तर तुमची या संदर्भातली तक्रार काय ते मला नीटसं समजलेलं नाही असं म्हणतो. पाश्चात्यांच्या जीवनशैलीचं किंवा विचारसरणीचं अनुकरण करण्याचा मुद्दा अधिक विस्तृत स्वरूपाचा आहे आणि प्रस्तुत धाग्याच्या विषयाशी (म्हणजे मला जो प्रमुख विषय वाटतो आहे त्याच्याशी) ताळमेळ राखणारा वाटत नाही.

>>>पुरुषांना फॉर्मलच्या नावाखाली ऑप्शन्स बैकांच्या तुलनेत लै कमी अलाउड आहेत ही मुख्य रड/तक्रार आहे. <<<
एका भारतीय पुरुषाला भारतीय स्त्रियांना अन्य अगणित संदर्भात उपलब्ध असलेल्या "ऑप्शन्स"च्या तुलनेत ही रड कितपत महत्त्वाची ठरू शकेल ? :)

मुद्दा साधा आहे. शर्ट/कोट अन प्यांट ही जोडी इंग्रजांमुळेच भारतात रूढ झाली आणि फॉर्मल ड्रेस म्हणून हे काँबिनेशन रूढ झाले. बर्‍याचदा गरज नसताना, उकडतबिकडत असतानाही हे पोषाख घालण्याचा आग्रह अस्थानी आहे आणि सबब अजून ऑप्शन्स हवेत. बायकांनी साडी नेसली म्हणून कोणी बोंब मारत नाही. पण तसेच पुरुषांनी धोतर किंवा तत्सम वेष केल्यास ओरड होते. आदूबाळ यांचा प्रतिसाद या दृष्टीने बोलका आहे. तस्मात पुरुषांना फॉर्मल्स मध्ये दिलेले ऑप्शन्स नुस्त थिओरेटिकल नसावेत किंवा दिलेले तरी असावेत. कैक ठिकाणी असे काही नसते. हे चूक आहे, इतकेच सांगणे.

बाकी स्त्रियांना जास्त ऑप्शन्स आणि आम्हाला कमी वगैरे छापाची ही रड नाहीच. स्त्रियांना नटायची हौस जास्त, सबब त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स ज्स्त हे ओघाने आलेच. त्यात काही विशेष नाही. पण जेवढे ऑप्शन्स अगोदरपासून उपलब्ध आहेत, तेवढे वापरायची मुभा तरी दिली जावी. :)

यशोधरा's picture

18 Apr 2013 - 8:37 am | यशोधरा

बाकी स्त्रियांना जास्त ऑप्शन्स आणि आम्हाला कमी वगैरे छापाची ही रड नाहीच. स्त्रियांना नटायची हौस जास्त, सबब त्यांच्यासाठीचे ऑप्शन्स ज्स्त हे ओघाने आलेच. त्यात काही विशेष नाही. पण जेवढे ऑप्शन्स अगोदरपासून उपलब्ध आहेत, तेवढे वापरायची मुभा तरी दिली जावी

हे फारसे पटले नाही. कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये. साडी, सलवार- कमीज, ट्राऊझर्स, फॉर्मल स्कर्ट असे ऑप्शन्स असतात. पुरुषांनी भारतीय वेषभूषा करावी ना. तुमच्या नोकरीत एचारकडे तुम्ही विचारणा केली अहे का? त्यांना पटवून दिले आहे का? आणि नटण्याचे म्हणाल, तर चेन, कानात, ब्रेसलेट, इत्यादि जामानिमा बर्‍यापैकी पुरुष सहकार्‍यांचा पाहिला आहे. बर्‍यापैकी केस वाढवून पोनीटेल घालणारे सहकारी आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 12:06 pm | प्रसाद गोडबोले

कामाच्या ठिकाणी कोणी स्त्रिया नटून थटून येताना सहसा पाहिले नाहीये.

नटणे थटणे हे बहुधा लिंगसापेक्ष असावे

अर्थात

स्त्रीया

फेशीयल
ब्लीच
व्यॅक्सिंग
हेयर कर्लिंग / आयर्निंग
थ्रेडनिंग
टोनिंग
स्क्रबिंग
मॉइश्चरायझिंह

हे झाल्या नंतर

लिप्स्टिक
लिप्ग्लॉस
लिप्लायनर
बॉडी टोनर
बॉडीलोशन
आय शॅडो
आय मस्करा
फांडेशन
फेसपावडर
रिंग्स
ब्रेसलेट
नेकलेस
नेलपेन्ट
चकचकीत वनपीस
हाय हील्स
मॅचिंग इयररिंग
(२ दिवसांच्या प्रवासाचे सामान मावेल येवढी)पर्स
त्यात किमान एक परफुम
एक आरसा
एक डिओ
आणि बर्‍याच अज्ञात गोश्टी घेवुन तयार झाल्या की म्हणतात
" आज वेळच नाही मिळाला आवरायला ... तशीच गडबडीत निघुन आले "

=)) =)) =))

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 5:37 pm | प्यारे१

तुम्ही नक्की 'काय' आहात????????? ;)

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 1:07 pm | बॅटमॅन

स्त्रिया गरज नसताना उगीच नट्टापट्टा करतात वगैरे माझे मत आजिबात नाही. त्यांचे शरीर, त्यांची इच्छा, मला काय त्याचे?
मुद्दा इतकाच आहे की स्त्रियांच्या वेषभूषेत (फॉर्मल ऑर नॉन फॉर्मल) पुरुषांपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध आहेत. हे का आहेत त्याचे कारण माझ्या मते म्हंजे स्त्रिया पुरुषांपेक्षा स्वतःच्या दिसण्याबद्दल जास्त जागरूक असतात असे असावे.

बाकी आमच्या नोकरीत असला त्रास अजूनतरी नाही, सबब विचारणा करण्याचा प्रसंग आला नाही. आला प्रसंग तर अवश्य विचारेन.

सस्नेह's picture

18 Apr 2013 - 1:58 pm | सस्नेह

वेगवेगळे पर्याय असले तरी भारतात साडीला जी प्रतिष्ठा आहे ती पंजाबी किंवा जीन्स-कुर्त्याला नाही.
साडी घातली की लोक्स भलतेच आदबशीर वागतात असा अनुभव आहे...

बाकी आमची कंपनी फारच लिबरल आहे असे म्हणतात..

गुपचुप गुपचुप चित्रपटातला प्रो. धोंड जेव्हा त्याच्या कालेजात धोतर,पगडी वगैरे जामानिमा घालून जातो आणि त्याची कशी कानउघाडणी होते तो सिन आठवला.

दादा कोंडके's picture

18 Apr 2013 - 12:25 am | दादा कोंडके

बंगरुळात एका छोट्या कंपनीत पांढरी शुभ्र लुंगी, पांढरा पारदर्शक शर्ट,उपरणं आणि उभा गंध असा गणवेश आहे.
बाकी सर्विस बेस्ड कंपन्यात फ्वार्मलची सक्ती जास्तच असते. त्यामानाने बाकीच्या कंपन्यात एव्हडी सक्ती नसते. परवाच एका टेलेक्वानवर एकाने भारतातलं तापमान ऐकल्यावर मग तिकडे तुम्ही श्वार्ट वगैरे घालून आलात का असा निरागस प्रश्न विचारला.

थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने चड्डीत रहावं. :)

थोडक्यात सर्वीसबेस्ड कंपनीने चड्डीत रहावं.

क्या बात!!

दादा कोंडके's picture

18 Apr 2013 - 1:21 pm | दादा कोंडके

हॅ हॅ. आपलं काय हो पंत, सायेब म्हणाला कोट घालून या, आलो. उद्या सायेब म्हणाला तसच या, तसच येइन.

- दादा भिंगार्डे

धागा वाचून एकदम आठवलं, गेल्या पाच-सहा वर्षांपासून फ्वार्मल प्यांटच घेतली आणि घातली नाहीये. मध्यंतरी मुलाखतीला देखिल जिन्सवर जात होतो. :D

गेल्या पाच-सहा वर्षांपासून फ्वार्मल प्यांटच घेतली आणि घातली नाहीये. मध्यंतरी मुलाखतीला देखिल जिन्सवर जात होतो.

नशीब थोर आहे तुमचं दादानुं...

दादा कोंडके's picture

18 Apr 2013 - 7:56 pm | दादा कोंडके

कै नशीब थोर नै.

फ्वार्मल ड्रेस घालणं परवडत सुद्धा नै हो. उत्पादन विभागात काम करत असल्यामुळे जिन्स बरी पडती. कष्टमर (कष्ट करायला लाउन मारणारा) मिटींग असली तर ट-सदर्‍या ऐवजी फ्वार्मल शर्ट घालतो, झालं. बाकी बायका जास्त नैत. खूप ठिकाणी जाळीचे जिने असल्यामुळे त्या साडी, स्कर्ट वैग्रे घालून येत नाहीत. (म्हणजे दुसरं कैतरी घालतात)

सूड's picture

18 Apr 2013 - 12:30 am | सूड

पुण्यासारख्या शहरात एखादा भिकबाळी घालून हापिसात जात असेल तरी लोक 'अजि म्या ब्रह्म पाहिले' असा चेहरा करतात. कान त्याचा, टोचून घेणारा तो, खर्च करणारा तो आणि यांना नसत्या पंचायती.

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 12:36 am | कवितानागेश

अरेरे! :)

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 12:51 am | प्रसाद गोडबोले

सेम अनुभव मलाही आला होता ...

उलट पुण्यातच मी बरेचसे लोक भिकबाळी घालताना पाहिले आहेत. सांगली-मिरजेत असताना लहानपणापासून एखादाही भिकबाळीवाला पाहिल्याचे आठवत नाही.

अभ्या..'s picture

18 Apr 2013 - 1:09 am | अभ्या..

अगदी सहमत रे.
बालीवाले (कुंडल) मात्र सर्रास.
निष्कर्ष सांग की लगेच याचा. ;)
फास्टेस्ट फीफ्टी तर झालीच हाय. दबल चेंचुली पन व्हईल.

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 1:15 am | बॅटमॅन

दबल चेंचुली

दाबून चेचल्यागत वाटायलंय =)) चो च्वीट इ.इ., यू नो द ड्रिल =))

स्पंदना's picture

18 Apr 2013 - 4:08 am | स्पंदना

एक अरब सोडले तर बाकी सार्‍यांनी ब्रिटीशबुवांना प्रमाण मानुन फॉर्मल वेअर ठरवलेले दिसते.
साडी छान दिसते, पण ती नेसुन जेंव्हा तुम्ही गर्दीच्या ठिकाणांहुन प्रवास करता तेंव्हा ती फारशी व्यवस्थीत टिकणे अशक्य. अर्थात हे मी मुंबईच्या लोकल प्रवासाच्या, बसच्या अनुभवाने बोलते आहे. अन नोकरीचे ठिकाण जर असे दुर प्रवासाचे असेल तर तिथवर पोहोचेपर्यंत शेप मध्ये रहातील असे कपडे सर्वांनीच वापरलेले ठिक. म्हणजे जो साडीचा प्रॉब्लेम आहे तो धोतराचा पण होउ शकतो आणि तुम्ही ऑफीसमध्ये गबाळे पोहोचु शकता.
बाकी लेखात बरेच संस्कृत शब्द असताना एकदम फॉर्मल हा शब्द थोडा (अगदी थोडा) खटकला.

मान्य. जण्रल तुमचे म्हण्णे पटलेच. फक्त सक्ती होऊ नये इतकंच मागणंय. :)

अन फॉर्मल हा शब्द वापरायचे कारण म्हंजे त्याला शिंपीनिर्मित प्रतिशब्द माहिती नसणे हे होय ;)

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 3:37 pm | प्रसाद गोडबोले

Formal = औपचारिक ?

हम्म....औपचारिक म्हंजे वरवरचा असल्याचा एक भास होतो त्यातून. पण तो सोडल्यास अन्य शब्दही सुचत नाहीये. कार्यालयीन हा शब्द इथे जरा अप्रस्तुत ठरावा काय?

आतिवास's picture

18 Apr 2013 - 3:52 pm | आतिवास

"मान्यताप्राप्त कार्यालयीन परिवेष??" (पण इथं कार्यालय मान्यताप्राप्त असावं असं वाटतंय) :-)

किंवा मग "कार्यालयीन मान्यताप्राप्त परिवेष?"

बॅटमॅन's picture

18 Apr 2013 - 4:21 pm | बॅटमॅन

हम्म तसंच काहीतरी बहुतेक :)

धमाल मुलगा's picture

18 Apr 2013 - 6:26 am | धमाल मुलगा

खुळेपणाचा कळस आहे आपल्याकडे.
तरी बरं, लेखात अन प्रतिसादात दिलेली बहुतांश उदाहरणं ही आयटी कंपन्यांमधली आहेत. मला सर्वात जास्त दया येते ती मार्केटिंगवाल्या पोरांची. :( भर उन्हाळ्यात ३८-३९ डिग्रीमध्ये वणवण करत हिंडत असतात अन बहुतेक जणांना ते टाय आवळण्याची जबरदस्ती असते हापिसातून. अरे काय बिनडोकपणा आहे हा? नियम अन पॉलिसी करणारे फोकलीचे बसणार गारेगार हापिसात अन ह्या वरावरा हिंडणार्‍या पोरांच्या नरड्याला कशाला तो फास? काय घोंगड्या गोधड्या पांघरायच्या त्या एसी हापिसात पांघरुन बसावं की चिप.

आयटीच्या हापिसातल्या तर्‍हा जरा जास्तच. क्लायंट आला की म्यानेजरं वगैरे बेंदरादिवशी झूल चढवल्यागत कोट, गळ्याभोवती टाय..(आणि दिवसातून शंभरदा बंद असलेल्या कॉलरमधून बोटं फिरवून आत हवा जाऊ देण्याचा प्रयत्न). बरं, हे एकवेळ ठीक...पण लोकांनी फक्त इंग्रजीतच बोलायचं! अरे? हे काय तिच्यायला? त्या क्लायंटशी बोलताना लोकं त्याला कळेल असंच बोलतायत ना? आपापसातही कशाला ते?

वर आमचे मुसुशेठ म्हणतात,

"फॉर्मल ड्रेस"बद्दल एखाद्या नोकरदाराला काय वाटते ते कितपत महत्त्वाचं आहे ? एखादी नोकरी स्वीकारल्यानंतर त्या नोकरीच्या नियमांनुसार कपडे घालणं आवश्यक ठरतं. शेवटी अनेकानेक इतर गोष्टींप्रमाणे वेषभूषेबद्दलचे नियम म्हणजे नोकरीच्या वेळी स्वीकारलेल्या लिखित-अलिखित नियमांचा एक भाग आहे........

मान्य! पर्याय नाहीच. गरजवंताला अक्कल नसते. 'रेडा दूध देतो का रे? तर 'होय सायेब...चांगला चार शेर दूध देतो' हे आलंच. पण मला असं वाटतं, की मुळात हवामानाशी जुळवून न घेता येण्याजोग्या पोषाखाच्या अट्टाहासाची गरज नाही.
शर्ट-प्यांटबद्दल आपलं काही म्हणणं नाही..धोतर,सदरा, सुरवार, झब्बा ह्यापेक्षा सुटसुटीत अन वापरायला सोपा प्रकार असल्यानं त्याविरोधात मत नाही. अहो, भर गर्दीत रस्ता ओलांडताना किंवा हापिसात एका हातात जेवणाचं ताट अन दुसर्‍या हातात पाण्याची बाटली/ग्लास घेऊन टेबलापर्यंत जाताना अचानक सोगा सुटला तर किती पंचाईत? त्यापेक्षा प्यांट उत्तम. होल्डऑल आवळल्यासारखी पट्ट्यानं आवळून बांधता तरी येते :) तसंच शर्टाचं! एकदा तो प्यांटमध्ये खोचला की संपला विषय. झब्बा झालं, सदरा झालं, अंमळ घोळदार खाली फिरत असतो, अन अचानक मूड आला..मस्तपैकी कलकत्ता साधं किंवा एकसो-बीस-तीनसो असं दणदणीत पान खाऊन ब्रम्हानंदी लागली असताना पिचकारी मारल्यावर तीचे शिंतोडे जर (जर कसले? शिंचे शंभरातल्या सत्तरदा तरी नक्कीच) आपल्याच सदर्‍यावर/ झब्ब्यावर उडले तर कितक्याला पडलं ते? तेव्हा प्र्याक्टिकली विचार करता शर्टप्यांट हे प्रकरण विरोध करण्यासारखं नाही. हां, त्यापुढचे प्रकार म्हणजे नरड्याला फास, ती लोकरीची झूल, चामड्याचे बंद बुट ह्या भानगडी मात्र गाढवपणाच्या आहेत.

बाकी, कुणी काही म्हणो, दिडशे वर्षांच्या गुलामीनंतर देश स्वतंत्र झाला...पण अजून आमची मानसिक गुलामगिरी गेली नाही हेच खरं!

काय? कस्काय धमिटल्या! झाला का येळ हिकडं फिरकायला?
प्रतिसाद आवडला हे सांगायला आले.

मुक्तसुनीत's picture

18 Apr 2013 - 7:44 am | मुक्तसुनीत

माझ्या लिखाणाला उधृत केलेलं आहे आणि त्याच्याशी (बिनशर्त !) सहमती आहे असं दिसतं आहे. बहुत काय लिहिणें. :)

पूर्ण प्रतिसादाशी बिनशर्त सहमती!!!!!!!!!!!! मार्केटिंगवाल्यांचे हाल तर कुत्रा खात नाही. :( आणि मानसिक गुलामगिरी अजूनही गेली नाही ते बाकी एकदमच खरं!!!!

सुमीत भातखंडे's picture

18 Apr 2013 - 9:26 am | सुमीत भातखंडे

कधी-कधी हे नियम जाचक वाटू शकतात हे खरं असलं तरी असे नियम असावेत असं वाटतं. हे नियम असतानाही ते हवे तसे वाकवून वाट्टेल ते कपडे घालणारे लोक पहिलेत. नियमच काढून टाकले तर काय होईल?

बाकी कंठलंगोट हा भयंकर त्रासाचा प्रकार आहे याबाबत सहमत.

(हापिसात कंठलंगोट घालणारा)सुमीत

इंटरव्यू घेतानाच बॉस म्हणाला .

"you will have to wear formals.. at least 4 days in the week.. not my rules . . even i hate it..
on the rest of the days.. you can wear anything you want.. just make sure you don't come half naked"

मी म्हणालो . . thats ok sir.. but.. I wont be wearing any tie.. I dont' think you want your employee to suffocate while talking to your clients.."

हसला मस्त. .

हा पण . .हापिसात जी मुलगी आहे . ती अक्षरशः काहीही घालून येते. .

हि चीटिंग आहे

मृत्युन्जय's picture

18 Apr 2013 - 10:54 am | मृत्युन्जय

कार्यालयीन वेशभूषा हा एक अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे.

मध्यंतरी आमच्या कुंपणीतही कंठलंगोटची टुम निघाली होती. एका शनिवारी गोर्‍या वकिलाबरोबर मीटिंगा होत्या त्यामुळे आम्ही सगळे कंठलंगोट, कोट पाटलूण घालुन गेलो तर हा पट्ठ्या चक्क जीन्स टी शर्ट वर आला होता. स्याटर्डे आहे तर कशाला हा सगळा बोझा असा त्याचा सूज्ञ विचार. आमचे चेहरे बहुधा पाहण्यासारखे असावेत. त्यानंतर ही टुम जशी अचानक आली होती तशी अचानल मेली आणि आम्ही आमच्या रोजच्या कपड्यांवर आलो. त्यानंतर एका मे महिन्यात अजुन एक गोरा आमच्या मुंबैच्या हापिसात सगळा जामानिमा करुन आला. उकाड्याने पार हैराण होउन (तरी बरे वातानुकुलित गाडीतुन आणला होता त्याला). आम्हाला साध्या शर्ट प्यांट वर बघुन गडी लैच खुष झाला. दुसर्‍या दिवसापासुन त्यानेही कोट आणी कंठलंगोट त्याजले. मुंबैच्या वातावरणाला हा पोशाख साजेसाच नाही हे पण त्याने मान्य केले. थोडक्यात इंग्रजाचे अंधानुकरण करण्याची गरज नाही. त्याच्या वातावरणाला कोट, ऑव्हरकॉट, कंठलंगोट सगळे हवे, थंडीपासुन बचाव म्हणुन. इथे घाम घाम होत असताना साधे लंगोट नको वाटते तर हे झेंगट कोणी सांभाळावे.

बाकी शर्ट प्यांट सुटसुटीत वाटते. आणी त्याची सवयही झाली आहे. त्यामुळे त्याचा काही त्रास नाही. पारंपारिक झब्बा पायजमा घातला की श्रीखंड पुरी आणी भजी हादडुन वर एक मसाला मघई लावुन ताणुन द्यावी किंवा मित्रपरिवाराबरोबर पत्ते कुटायला बसाबे असे वाटायला लागते.

एरवी अमुकच प्रकारचा पोशाख हवा अश्या अट्टाहासाशी मीदेखील असहमत आहे. परंतु हपिसात शिस्त असावी याचा तो एक भाग आहे. सैन्यदलांमध्ये प्रत्येक प्रसंगासाठी आणी कार्यासाठी पोशाख ठरलेला असतो. तो या शिस्तीचाच एक भाग आहे. एक सामान्य नागरिक म्हणुन एवढ्या कडक शिस्तीचा पोशाख कर्मचार्‍यांना आवश्यक नाही. पण अगदीचे सूट दिली की पोरी नितकोर चड्ड्या आणि पोरे पार्श्वभागावरुन खाली घसरणार्‍या जीन्स किंवा केशरी पोपटी रंगाच्या बर्म्युडा घालुन हापिसात येतात. त्यामुळे सुवर्णमध्य म्हणुन फॉर्मल ड्रेस नावाचा पर्याय असण्यास काही हरकत नसावी.

पारंपारिक झब्बा पायजमा घातला की श्रीखंड पुरी आणी भजी हादडुन वर एक मसाला मघई लावुन ताणुन द्यावी किंवा मित्रपरिवाराबरोबर पत्ते कुटायला बसाबे असे वाटायला लागते.

हाहाहा
अतिशय पटलेलं आहे हे :D

आमच्या ऑफिसमध्ये देखिल ड्रेसकोड बाबत अगदी जाचक अटी आणि नियम आहेत. सोम-गुरु ला फॉर्मल्स (लांब बाह्याचा शर्ट, ट्राऊजर व चामड्याचे बुट) आणि शुक्र ला जिन्स-टिशर्ट (जिन्स फेडेड, कातरलेली, मळकी, ई नसावी व फक्त कॉलर असलेले टिशर्ट). पण हे फक्त पुरुषांसाठीच; बायकांना काहीही घालण्याचि मोकळीक आहे.
वरील ड्रेसकोड जर पुरुष कर्मचार्यांनी पाळला नाही तर त्यांना कंपनीचे सिक्युरिटी आत येण्यास मज्जाव करतात (मला देखील एकदा हा अनुभव आलेला आहे :( )
मला एक कळ्त नाही की कंपनीला कर्मचारी महत्वाचा की त्याचे कपडे? टिशर्टला कॉलर असली काय नसली काय, काय फरक पडतो?

भारताल्या कडाक्याच्या उन्हात गळ्यात कुत्र्यासारखा पट्टा आडकुन आणी त्यावर जाड कोटाची फर पांघरुन या लोकांना कस काय राहता येत, देवाक ठावुक! आपण तर आपल्या ओपीडीत जिन्स- टी शर्ट पासुन पुर्ण खादीपर्यंत काय वाटेल ते घालतो.हा फक्त दवाखाना सोडुन जर एखाद्या जागेच्या व्यवहाराची मिटींग असेल तर मात्र पुर्णपणे खादीच वापरतो....

नितिन थत्ते's picture

18 Apr 2013 - 12:10 pm | नितिन थत्ते

Formal Dress
हा घालून ते ब्रिटनमध्ये गेले होते.

मृत्युन्जय's picture

18 Apr 2013 - 12:20 pm | मृत्युन्जय

ही गोष्ट केल्यामुळे मला गांधीजींबद्दल प्रचंड आदर आहे. गोर्‍या साहेबाला भेटायला जायचे म्हणुन उगा आपल्या नेहमीच्या पोषाखाला काडी नाही लावली. आहे हे असे आहे. नंगा फकीर म्हणा किंवा अजुन काही म्हणा. मला शष्प फरक पडत नाही. तुमचंच जळतय. हा अ‍ॅटिट्युड लैच आवडतो आपल्याला.

प्रसाद गोडबोले's picture

18 Apr 2013 - 12:27 pm | प्रसाद गोडबोले

+१

+१११११११११११११११११११११११.

तंतोतंत!! महात्मा फुल्यांनीही आपला साधाच वेष केला होता अशाच काहीशा प्रसंगी.

प्रकाश घाटपांडे's picture

18 Apr 2013 - 12:31 pm | प्रकाश घाटपांडे

कपड्यांविषयी बरेच प्रश्न दिसताहेत. असो
आपण आपले स्वतःचे उन थंडी वारा पाउस इ पासून संरक्षण व इतरांचे लज्जारक्षण एवढ्याच हेतुने कपडे घालतो.

मालोजीराव's picture

18 Apr 2013 - 2:39 pm | मालोजीराव

कॉलेज संपल्या संपल्याच आयटीत गेल्याने आणि तिथले ड्रेस कोड बाबतचे स्ट्रीक्ट रुल्स पाहून फॉर्मल ड्रेस हि संकल्पना अत्यंत भिकार आणि दळभद्री आहे असा ठाम समज झाला.

  • शूज च्या ऐवजी बूट घातले म्हणून
  • पँट चे पौकेट साईड नसून फ्रंट आहेत म्हणून
  • फॉर्मल शूज ब्राऊन आणि थोडा काऊबॉय स्टाईल घातला म्हणून
  • पावसाळ्याच्या काळात कपडे न वाळल्याचे कारण देऊन जीन्स घातली म्हणून
  • सॉक्स वाळले नाहीत सो फ्लोटर्स घातले म्हणून
  • माझ्या फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या असतात म्हणून
  • जेव्हा फुल शर्ट च्या बाह्या दुमडलेल्या नसतील तेव्हा कफ-लिंक वापरतो म्हणून
  • शुक्रवारी (casual day) असताना कॉलरवाल्या टीशर्ट ऐवजी फुटबॉल ची जर्सी घातली म्हणून
  • शुक्रवारी स्पोर्ट शूज रेकमेंडेड असताना मोजडी घालून येतो म्हणून
  • रिस्टब्यांड वापरतो म्हणून
  • केस जास्त वाढलेत म्हणून (अन-प्रोफेशनल वाटत म्हणे)

हापिसनी मला तोंडी व लेखी नोटीसा बजावल्या आहेत. त्यामुळे फॉर्मल ड्रेस चा जाहीर निषेध !!! लाल सलाम

लाल सलाम कॉ. मालोजी!!! इतक्या हगर्‍या-पादर्‍या कारणास्तव नोटिसा बजावल्या असतील तर मग हाईट आहे.

मालोजीराव's picture

18 Apr 2013 - 3:14 pm | मालोजीराव

+१११११११११११११११११११११११

अगदी अगदी…ह्या एचआर वाल्यांना काय इंसेंटीव्ह मिळतो का काय कोण जाणे एव्हड बारीक लक्ष ठेऊन…च्यायला तिच्यावर मी बारीक लक्ष ठेवल तर लाईन मारतो म्हणतात

एच आर वाली बघण्यालायक असेल तर मग कोणी काही म्हणोत, टेन्शन नै ;)

बघण्यालायक नसेल तर म्हणावे तिच्यावर लाईन मारावी अशी ती नाही म्हणून ;)

आयदर वे, टेन्शन इल्ले =))

बाळ सप्रे's picture

18 Apr 2013 - 3:36 pm | बाळ सप्रे

तुमच्या सबबी नक्कीच "अन-प्रोफेशनल" आहेत..

मालोजीराव's picture

18 Apr 2013 - 5:25 pm | मालोजीराव

तुमच्या सबबी नक्कीच "अन-प्रोफेशनल" आहेत..

तुमच्याशी सहमत आहे,

पण या क्षेत्रातल्या बर्याच कंपन्यांमध्ये ड्रेस कोड कंपल्सरी नाही,नजरखेचक वाटणार नाहीत असे कुठलेही कपडे घालून आलात तरी चालत.ऐन तारुण्यात जिथे बंधनं नकोशी वाटतात आणि 'वाढीव' गोष्टी कराव्याश्या वाटतात तिथे हे ड्रेस कोडचं बंधन पण जाचक वाटायला लागलं

बाळ सप्रे's picture

18 Apr 2013 - 5:48 pm | बाळ सप्रे

काही वेळा कंपन्यांची कर्मचारीसंख्या अति असल्यामुळेही कडक नियम करावे लागतात.. अन्यथा कंट्रोल करणे सहज शक्य होत नाही..

गणामास्तर's picture

18 Apr 2013 - 4:56 pm | गणामास्तर

आयला, तरी तुमची परिस्थिती फारचं चांगलीये की हो राजे आमच्या सारख्या हमालां समोर.
आम्हाला फॉर्मल ड्रेस सोबत शिरस्त्राण,वाटीवाले पादत्राणे,सेफ्टी गॉगल आणि एयर प्लग येवढा जामानिमा
मिरवावा लागतो..शुक्रवारी त्यातल्या फॉर्मल ड्रेस मधून सवलत मिळते हीच पर्वणी समजायची.
अशा अवतारात फिरत असताना येच्चार वाले पकडून दाढी वाढलीये म्हणून तोंडी,लेखी नोटीसा देतात
त्या वेगळ्या.