कळाहीन केसांत माळते रंग उतरली फुले बेगडी
स्वत:च्याच बिंबावर भाळुन हसत रहाते कुणी बापडी
बागेमधल्या नळाखालती निवांत करते मुखप्रक्षालन
स्वस्थपणाने बाकावर मग चालतसे सौंदर्यप्रसाधन
जुनाट, विटक्या बटव्यामधली दातमोडकी फणी काढते
पारा उडल्या काचेच्या तुकड्यात पाहुनी केस बांधते
निळी असावी कधी ओढणी, जरी दिसतसे कळकटलेली
ओढुन घेते मुखावरुन ती, जशी परिणिता कुणि नटलेली
हळूच हसते, जरा लाजते, नजर झुकविते करून तिरकी
गुणगुणते तंद्रीतच आणिक स्वतःभोवती घेते गिरकी
कोण, कुणाची, असेल कुठली, फिरे कशी होऊन उन्मनी?
दैव, भोग की अतर्क्य नियती, असे कुणाची ही मनमानी?
तिला मात्र ना ध्यान, भान वा चिंता, वार्ता, जाणहि नाही
'काल' विसरली, 'आज' जगे अन् 'उद्या'पासुनी अलिप्त राही !
प्रतिक्रिया
5 Feb 2013 - 12:50 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
:(
5 Feb 2013 - 1:03 pm | स्पा
__/\__
:(
हा शेर अप्रतिम जमलाय .
5 Feb 2013 - 3:14 pm | अत्रुप्त आत्मा
स्पांडूशी पूर्ण सहमत... __/\__/\__/\__
5 Feb 2013 - 4:02 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम... !!
5 Feb 2013 - 7:14 pm | शुचि
अशा स्त्रिया - मुली/पुरंध्री/वयस्कर स्त्रिया पाहील्या आहेत. पण तुमच्या कविदृष्टीतून काही वेगळ्याच भासल्या. तुम्ही कवि लोक अनोख्या दृष्टीने आम्हाला जग पहायला शिकवता.
अप्रतिम शेर आहे.
5 Feb 2013 - 7:32 pm | पैसा
अगदी प्रत्ययकारी वर्णन.
5 Feb 2013 - 10:53 pm | चेतन
अप्रतिम लिहलय क्रांतीताई
अवांतरः मला कवितेतलं कळत नाही पण "कळाहीन केसांत माळते रंग उतरली फुले बेगडी" थोदसं अडखळायला होतयं
5 Feb 2013 - 11:18 pm | अभ्या..
अप्रतिम शब्दचित्र क्रांतीतै. केवळ अप्रतिम.
टोटल व्हिजुअलाइझ झालं डोळ्यासमोर.
5 Feb 2013 - 11:33 pm | दीपा माने
सुंदर सुंदर आणि निखळ सुंदरच काव्य जे वाचताना अंगावर रोमांच आले.
6 Feb 2013 - 12:31 am | सूड
शेवटापर्यंत येताना चर्रर्र झालं मनात. :(
6 Feb 2013 - 2:05 am | जेनी...
उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावी जायचो ... तेव्हा त्याच्या गावात एक वेडी .. म्हणजे
लग्न होउन नवर्याने सोडुन दिलेली मुलगी , वय जेमतेम ( तेव्हाचं ) २० /२१ असेल तिचं ,
पण लग्न होउन तीन महिन्यानीच तिच्या नवर्याने तीला सोडुन दीलं . ़खुप मारहाण केली होती.
माहेरी आल्यावर १५ ते २० दिवस नुसती घुम्यासारखी पडुन असायची ...मग उठुन तासंतास
आरश्यात स्वताहाला बघत बसायची .. स्वतहाला शिव्या द्यायला लागली .. घरच्यांनी आधी
सांभाळुन घेतलं .. पण नंतर पूर्णपणे दुर्लक्ष . मग रस्त्यावरुन फिरणं , गाणी म्हणणं , एक
फाटकी पर्स खांद्याला अडकवुन त्यात आरसा , फनी , गंध ... मग कुठल्यातरी झाडाखाली
बसुन पिंजलेले केस फनीने विंचरायची , गंध लावायची .दिसायला एक्दम साधी . सुंदर नव्हती .
भिती वाटायची तिच्याकडे बघुन .. पण रोजचा दिवस नव्याने उगवलाय असा भास तिच्या
चेहेर्यावर व्हायचा .
मी थोडं विचारल्यावर कळलं कि तिच्यावर तिच्या नवर्याने आणि दीराने दोघानीहि
जबरदस्ति केलेली होती . लग्नानंतरचे पहिले तीन महिने .. जिथे सुखाची अपेक्षा केली
जाते तिथे रोज काट्यांची ओरबड नशिबात असेल तर ??
रोजचा बलात्कार , अत्याचार सहन झाला नाहि त्यामुळे ती वेड्यासारखी , भ्रमिष्ठासारखी
वागु लागली ... परिणाम : नवर्याने माहेरी आणुन सोडलं ..
सॉरी पण , वरच्या ओळी वाचुन एकदम ' ती ' डोळ्यासमोर आली .
सॉरी .
6 Feb 2013 - 12:00 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
असे काही ऐकले कि, कळवळाला होते.
आमच्या इथे ही अशी एक बाइ होती बिचारी.
अशी वेळ देव वैर्यावर देखिल आणू नये. :(
7 Feb 2013 - 6:32 pm | इनिगोय
:(
6 Feb 2013 - 4:59 am | स्पंदना
काय बांधलय शब्दचित्र? निव्वळ सुरेख!
6 Feb 2013 - 6:49 am | आनन्दिता
खुप मस्त लिहीलय क्रांतीतै...
प्रत्येक ओळ एक अखंड प्रसंग डोळ्यासमोर उभा करतेय...
सुंदर!!
6 Feb 2013 - 8:54 am | किसन शिंदे
अप्रतिम लिहलंय क्रांती ताई!!
6 Feb 2013 - 4:48 pm | दत्ता काळे
शब्द आणि रचनेची ताकद अफाट. डोळ्यासमोर चित्र उभे राहीले.
7 Feb 2013 - 4:58 pm | नानबा
क्या बात.... निव्वळ अप्रतिम...
10 Apr 2013 - 8:27 pm | प्यारे१
>>> 'आज' जगे????
हे? असलं? :(
पूजानं लिहीलेलं पण- वाईटच :(
12 Apr 2013 - 12:35 pm | चाणक्य
अंगावर आली कविता...