कधी वाटतं..
नाशिकला तात्यासाहेब शिरवाडकरांच्या
घरी भरणा-या सामान्य लोकांच्या दरबारात सामिल व्हावं..
तर कधी वाटतं...
भाई आणि सुनिताबाईंच्या सोबत एखादी
संध्याकाळ घालवावी...त्यांच्याकडून कविता ऐकाव्या..
कधी वाटतं..
बाबूजींच्या पायाशी बसून
'झाला महार पंढरीनाथ..' किंवा
'निजरुप दाखवा हो..' असं काहितरी शिकावं..
तर कधी वाटतं..
थेट उठून पेडररोडला दीदीच्या घरी जावं..
आणि तिच्या पायांना मिठी मारावी..
कधी वाटतं...
हळूच, पावलांचा आवाज न करता
कलाश्री बंगल्यात शिरावं...
आतून भन्नाट जुळलेल्या निषादाच्या
तानपु-यांच्यात अण्णांनी सुरू केलेला
पुरिया कानी पडावा..
वाटलंच तर हळूच हिंमत करून आत जाऊन
चुपचाप ऐकत बसावं..
नाहीच जर हिंमत झाली..
तर कलाश्रीच्या अंगणातली
थोडी माती कपाळावर अबीरबुक्क्यासारखी लावावी
आणि माघारी फिरावं...!
-- तात्या.
प्रतिक्रिया
10 Apr 2013 - 7:21 pm | तर्री
रायगडावर जावेसे नाही का वाटत ?
10 Apr 2013 - 7:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
हि तुमची रचना फेसबुकावर वाचली होती.. एका वाचनातच आवडून गेली.
मस्त.
10 Apr 2013 - 7:53 pm | रामदास
हे आवडलं आणि कलाश्रीची आठवण झाली .धन धन भाग सुहाग तेरो ...
10 Apr 2013 - 7:59 pm | तिमा
तुमची आणि तुमच्या लेखांची फार आठवण येते. असे येत जा हो परत. गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि सर्व मिपावासीयांना शुभेच्छा.
11 Apr 2013 - 5:36 pm | सुधीर
+१
10 Apr 2013 - 8:04 pm | चावटमेला
आधी वाचली असू दे वा नसू दे तात्या, तुमचा लेख इतक्या दिवसांनी मिपा वर पाहूनच आम्हाला आनंद झाला :)
10 Apr 2013 - 11:40 pm | मुक्त विहारि
क्या बात है....
11 Apr 2013 - 2:18 pm | सस्नेह
हे असं वाटणं अशा शब्दात न पकडलं तर असंच विसरून गेलं असतं..!
11 Apr 2013 - 4:43 pm | स्पंदना
व्वा तात्या!
11 Apr 2013 - 5:17 pm | चौकटराजा
तात्या आज पाडवा आहे दसरा नव्हे....सीमोल्लंघनाचा हा दिवस कसा काय निवडला राव ? की तुम्हालाही आता कुमारांसारखी बंडखोरी करावीशी वाटतेय ? बाकी तुमच्या सर्व पंक्तीना दुजोरा देत खाली काही भर टाकत आहे पहा
माझ्यात आपल्याला समानधर्मा दिसतोय का ?
कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं
जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल
तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये
मग असंच देवास गाठावं कुमारांचा कुटीत एका कोपर्यात बसावं
शांत एकचित्त होऊन ऐकावं
राजन अब तो आजाओ थिर न रहत कजरा आंखनमे
नाहीतर
उड जायेगा हंस अकेला जग दो क्षणका मेला .......
न्रिर्गुणी भन ऐकतच पंचत्वात विलीन व्हावं !!!
25 Apr 2013 - 1:09 pm | विसोबा खेचर
कधी वाटतं ठाण्यातील राणी नाखवाच्या घरी जावं
जिथे आता फक्त भितीवर ओ पी नय्यर यांचा फोटो असेल
तेच आहेत असो समजून आपल्या प्रेमाची कबुली द्यावी
बहुत शुक्रिया बडी मेहरबानी ....मेरी जिंदगीमे हुजूर आप आये
मस्त.:)
23 Apr 2013 - 9:50 pm | वेल्लाभट
सुरेख !
25 Apr 2013 - 1:37 pm | मी_आहे_ना
मस्त...
26 Apr 2013 - 1:30 pm | विसोबा खेचर
सर्व प्रतिसादी रसिकवरांचा मी मनापासून आभारी आहे..