काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814

मोदक's picture
मोदक in काथ्याकूट
24 Mar 2013 - 11:12 pm
गाभा: 

1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.

श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.

अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.

संपादक मंडळास नम्र विनंती.

१) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल.
२) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही.

सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.

प्रतिक्रिया

मैत्र's picture

24 Mar 2013 - 11:14 pm | मैत्र

धागा आवडला मोदका... धन्यवाद

माहेरच्या अव्हेरावर मी दिलेले दोन प्रतिसाद...

यावरही जाणकारांची मते जाणून घेण्यास उत्सुक.

**********

December 20, 1978: Devendra Nath Pandey and Bhola Nath Pandey hijacked Indian Airlines flight IC-410. They demanded the immediate release of Indian National Congress party leader Indira Gandhi who was imprisoned at that time on the charges of fraud and misconduct. Later, they were awarded with party tickets for this act by the Indira Gandhi government in 1980 such that Devendra Nath Pandey rose to become a minister in the government of most populous state of India, Uttar Pradesh. This case was also mentioned by Jarnail Singh Bhindrawale to justify his claim regarding the hypocrisy of the Indian government

**********

On Jan 22, 1993, a Patna-Lucknow-Delhi Indian Airlines Flight IC-810 was hijacked by Satish Chandra Pandey shortly after take-off. Pandey demanded immediate construction of Ayodhya Ram Temple, lifting ban on RSS, the Bajrang Dal, and undertaking that the BJP would not be derecognized. He later surrendered at the insistence of senior BJP leader Atal Bihari Vajpayee.

**********

वरच्या दोन्ही घटनांबद्दल या क्षणी माझ्याकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. सदर घटना चुकीच्या असल्या / तपशीलामध्ये फरक असल्यास मी हा प्रतिसाद बिनशर्त मागे घेण्यास तयार आहे.

हा मुद्दा अत्यंत टाकावू असल्याने याला कोणी हात लावत नाहीये की हा मुद्दा प्रचंड अडचणीचा ठरल्याने यावर मतप्रदर्शन होत नाहिये..??

मैत्र's picture

25 Mar 2013 - 12:09 pm | मैत्र

जाणकार प्रकाश टाकतीलच..
पण या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार प्रकरणाशी फार काही उपयुक्त संबंध नाही.. हे दोन्ही अतिरेकी नव्हते..
विमान उतरवल्यावर इंदिरा गांधी प्रकरणात त्या पांडेनी पत्रकार परिषद घेतली होते असे वाचले..
वाजपेयींच्या आग्रहानंतर दुसर्‍या पांडेनी विमान उतरू दिले. त्यांना मात्र काँग्रेसप्रमाणे बीजेपीने काही खैरात केल्याचा उल्लेख नाही. पण एकूणात ही दोन प्रकरणे झाली असल्याने किंवा नसती घडली तरी त्याने कंदाहार हायजॅक मध्ये काय फरक पडला असता ?

या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार प्रकरणाशी फार काही उपयुक्त संबंध नाही हे सपशेल मान्य.. ही उदाहरणे येथे देण्याचे अन्य प्रयोजन काही नाही, मात्र..

कंदाहार प्रकरणामध्ये अतिरेकी पाकिस्तानी / तालीबानी होते, त्यांच्यामुळे एकाचा मृत्यू झाला व अनेकांचा जीव धोक्यात आला. या प्रकरणांमध्येही प्रवाशांचा जीव धोक्यात आला होताच, कंदाहार प्रकरणावर आपआपल्या पक्षनिष्ठा सांभाळत उत्साहाने प्रतिसाद देणार्‍यांची मते या घटनांवर जाणून घेणे इतकाच उद्देश आहे.

कॉग्रेसने केलेली चूक लक्षात आल्याने काही विशिष्ट सदस्य मौनव्रतामध्ये गेले असावेत असा माझा अंदाज.

असो.. या विषयावर (अन्य कोणी प्रतिसाद देईपर्यंत!) मी ही मौनव्रतात जातो.

नितिन थत्ते's picture

25 Mar 2013 - 5:47 pm | नितिन थत्ते

हा प्रतिसाद अकारण आहे असे वाटते.

मी स्वतः सामान्यतः काँग्रेससमर्थक असलो तरी कंदाहार प्रकरणात आणि नंतर संसद हल्ल्यानंतरच्या आर या पार की लडाई च्या प्रसंगी जमिनीवरील वस्तुस्थिती, सैन्य/निमलष्करी दलांची क्षमता, तयारी आंतरराष्ट्रीय राजकारण वगैरे बाबी लक्षात घेऊन योग्य असलेलीच कृती केली असे समर्थन मी अनेकदा (मिपावर आणि इतरत्र) केले आहे.

एकदा आपली खरडवहीतून चर्चाही झाली होती असे स्मरते.

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 8:24 pm | पिंपातला उंदीर

मला पण हा प्रतिसाद अकारण वाटला. माहेरचा आव्हेर या धाग्यात मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. कॉंग्रेस राजवतीचा इतिहास बोतचेपे पनाने भरला आहे. कमजोर राष्ट्रीय धोरण, कमजोर धोरण आणि धिसाळ कारभार यात कॉंग्रेस आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मी उदाहरण देऊन मी त्या धाग्यावर स्पष्ट केले आहे. आता एका पक्षाचा चष्मा चढवून मत देणार्‍या लोकाणी हे स्पष्ट करायला हवे की भाजपेयी हे कॉंग्रेस पेक्षा वेगळे होते. पण दुर्दैवाने ते लोक कन्दाहार प्रकरण किती अवघड होते हे स्पष्ट करत असताना कॉंग्रेस राजवटीला मात्र तो अवगडपणाचा फायदा द्यायला तैयार नाहीत. संसदेवारचा हल्ला हा भारतीय इतिहासातला एक काळा अध्याय असताना त्यावर पण अळी मिली गुप चिली असे बसले आहेत. बाकी कॉंग्रेस आणि भाजप ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का यावर तुमचे मत पण जाणून घ्यायला आवडेल

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 12:35 am | श्रीरंग_जोशी

या घटनेवर फारच टोकाची मते वाचायला मिळतात.

अपहरणनाट्य सुरू झाल्यावर पहिले काही तास नेमका निर्णय न घेणे व अंमलबजावणीसाठी स्थानिक अधिकार्‍यांना अधिकार न दिले जाणे या चुका भारत सरकारला बर्‍याच महाग पडल्या.

पण तरीही प्रत्यक्ष वाटाघाटी सुरु झाल्यावर एकाही अपहृताचा मृत्यू होऊ न देता सर्व अपहृत प्रवाशांना परत आणले गेले हे भारतीय निर्णयकर्त्यांचे यशच मानायला हवे. इस्राईलने या प्रकारच्या अपहरण प्रसंगात केलेल्या कमांडो कारवाईत काही अपहृतांचे प्राण गेले होते हे लक्षात घेतल्यास भारत सरकारचे यश अधिक ठळकपणे दिसते.

नाही रे श्रीरंगा, ऑपरेशन एंटबेला या चर्चेपासून दूर ठेवूया.

या दोन घटनांची तुलना होवूच शकत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 12:57 am | श्रीरंग_जोशी

मान्य आहे या दोन घटनांची तुलना होवूच शकत नाही. भारताने इस्राईलसारखे वागायला हवे असे मत अनेक लोक मांडतात म्हणून ते उदाहरण दिले एवढेच.

बाकी भारतीय हवाईदलाकडे अफगाणिस्तानच्या विमानतळांबद्दल फारच जुजबी माहिती उपलब्ध होती हे जालावर वाचले होते. अमेरिकन हवाईदलाकडे मित्र असो वा शत्रु, सर्वांच्या हवाई / लष्करी तळांबद्दल कारवाई करण्याइतपत माहिती उपलब्ध असते हेही वाचले होते.

मोदक's picture

25 Mar 2013 - 1:05 am | मोदक

ठीक.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 5:50 pm | श्रीगुरुजी

"पण तरीही प्रत्यक्ष वाटाघाटी सुरु झाल्यावर एकाही अपहृताचा मृत्यू होऊ न देता सर्व अपहृत प्रवाशांना परत आणले गेले हे भारतीय निर्णयकर्त्यांचे यशच मानायला हवे. "

निश्चितच. याबरोबरच, भारत पूर्णपणे हतबल परिस्थितीत असताना, अतिरेक्यांच्या मूळच्या मागण्यांऐवजी (४० अतिरेक्यांची सुटका व २० कोटी डॉलर्स खंडणी) फारच कमी मागण्या पूर्ण करण्यात आल्या, हेही यशच मानायले हवे.

कोणत्याही दोन लष्करी घटना या एकसारख्या कधीच नसतात. फक्त प्रत्येक घडलेल्या घटनेचा व्यवस्थित अभ्यास केला कि पुढच्या वेळेला अजून सुधारणा करता येते. एंटबे आणि कंदाहार अपहरण यांची तुलना करणे मला तितकेसे बरोबर वाटत नाही.

विमान भारतीय हद्दीत असताना थांबवायला पाहिजे होतं आणि न थांबवल्यामुळे पुढचा सगळा प्रकार घडला हे पूर्णपणे बरोबर नाही. भारताकडे NSG आणि MARCOS हे दोन कमांडो अश्या घटनांसाठी प्रशिक्षित आहेत, त्यापैकी कोणीही अमृतसर ला नव्हते. त्यामुळे नुसते धावपट्टीवर अडथळा करून किंवा टायरमधली हवा काढून विमान थांबवलं जरी असतं, तरी कमांडो वेळेत न आल्याने कारवाई सुरु होऊ शकली नसती आणि अतिरेक्यांनी भांबावून जाऊन जास्त प्रवाश्यांचा जीव घेतला असता. NSG कमांडोचा तळ माणेसर, हरयाणा ते अमृतसर, पंजाब हे अंतर सुमारे ५०० km आहे. याचाच अर्थ कमांडोना मानेसर जवळच्या विमानतळावर जाऊन तिथून विमानाने अमृतसर विमानतळावर यायला पाहिजे. ( १९९९ मध्ये NSG कडे स्वत: ची Aviation Wing नव्हती, आठवा -- अक्षरधाम मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या वेळी कमांडोंची बस ट्रफिक जॅम मध्ये अडकल्याने त्यांना विमानतळावर आणि पर्यायाने अहमदाबाद ला पोहोचायला उशीर झाला होता.) म्हणजे कमांडो कधी पोहोचणार याची खात्री नाही, शिवाय त्यांचं विमान अमृतसरच्याच विमानतळावर उतरणार म्हणजे अतिरेक्यांना दिसणार म्हणजे अजून धोका.. तर या एकूण परिस्थितीचा विचार करता, विमान अमृतसर ला न थांबवणच शहाणपणाचा निर्णय होता असा मला वाटतं.

आता एंटबे आणि कंदाहार हे दोन्ही वेगळे प्रसंग आहेत. एंटबे चा विमानतळ हा इस्रायेल च्या एका माजी लष्करी अधिकार्यांनी ( कर्नल बारलेव) यांनी बांधला होता, त्यामुळे इस्रायेलला विमानतळाची ब्लू प्रिंट उपलब्ध होती. आपल्याकडे कंदाहारच्या विमानतळाची काहीही माहिती नव्हती. शिवाय १९९५ पासून, त्या विमानतळावर फक्त सौदी आणि पाकिस्तान याच दोन देशांची विमाने उतरत असल्याने कोणाहीकडून काहीही माहिती मिळण्याचा संभाव नव्हता. अफगानिस्तानमध्ये भारताचा दूतावास नाही, त्यामुळे तिथे काय चाललाय याचीही माहिती मिळत नव्हती. शिवाय अफगानिस्तान अशा देशांनी वेढलेला आहे कि ज्यांच्याबरोबर भारताचे काहीही खास संबंध नव्हते. (सध्या ताजिकिस्तान बरोबर भारताचे फारच चांगले संबंध आहेत, भारताबाहेरचा पहिला लष्करी हवाईतळ हा ताजिकिस्तान मधील फार्खोर येथे आहे. तर अशीच स्थिती काही वर्षानंतर उदभवली तर त्याचा तौलनिक अभ्यास वेगळ्या परिमाणांवर अवलंबून असेल ) म्हणजे हवाई कारवाई करणे अत्यंत कठीण किंवा जवळजवळ अशक्यच. कंदाहार विमानतळावरून विमान नेता आलं नसतच कारण विमान ६ दिवस धावपट्टीवर स्थिर होता आणि उड्डाणाला सक्षम आहे कि नाही (air worthy ) हे माहित नव्हतं. धावपट्टीवर अडथळे होते तो भाग वेगळाच. आणि जरी काहीही करून विमान पळवला असताच तरी अफगानिस्थांच्या बाकीच्या कुठल्याही शेजारी देशाने भारताला मदत केली असती कि नाही याबद्दल शंकाच आहे. एंटबे मध्ये केनियानी परतीच्या प्रवासात इस्रायेलच्या विमानांना इंधनासाठी उतरण्याची परवानगी दिली होती. तशी कोणतीही शक्यता कंदाहार प्रकरणामध्ये नव्हती.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 3:03 am | श्रीरंग_जोशी

या घटनेवर दिवाळी अंकात सविस्तर लेख लिहिलेला आहे त्यातील मुद्द्यांची पुनरावृत्ती करत नाही.

भारताने अशा वेळी इस्राईलचा कित्ता गिरवायला हवा होता हा सूर नेहमीच आवळला जातो. त्या दाव्याला अपवाद करणारे उदाहरण म्हणून उल्लेख केला इतकेच.

बाकी आपल्या प्रतिसादामुळे बरीच नवी माहिती मिळाली. यापुढे असे काही घडल्यास भारताचे उत्तर नक्कीच मजबूत राहील असा विश्वास वाटतो.

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

एंटबे चा विमानतळ हा इस्रायेल च्या एका माजी लष्करी अधिकार्यांनी ( कर्नल बारलेव) यांनी बांधला होता.

माझ्या माहितीप्रमाणे कर्नल बारलेव्ह हे इस्रायल युगांडा प्रेमप्रकरणाच्या वेळी (इस्रायलने इदी आमीनची मिग / लढाऊ विमानांची मागणी फेटाळल्यावर हे प्रेमप्रकरण फिसकटले!) युगांडाच्या आर्मीला 'घडवण्यात' अग्रेसर होते. इदी आमीनचे त्यांच्याशी वैयक्तीक मैत्रीपूर्ण संबंध होते. एंटबे वाटाघाटींच्या वेळी इदी आमीनशी बोलणी करण्यामध्ये इस्रायली बाजूने कर्नल बारलेव्ह यांचा सहभाग होता.

त्यामुळे इस्रायेलला विमानतळाची ब्लू प्रिंट उपलब्ध होती.

सर्व ओलीस एंटबेवरील जुन्या टर्मीनल बिल्डींगमध्ये वसवले गेले होते. ही माहिती खुद्द इदी आमीनने बोलता बोलता कर्नल बारलेव्ह यांना दिली होती. (ओलीस ठीक आहेत, ते जुन्या टर्मीनल मध्ये आहेत, त्यांना चादरी व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत!)
या टर्मीनल बिल्डींगचे बांधकाम 'सोलेल अँड बोनेह' या इस्रायली कंपनीने केले होते त्यामुळे त्या ब्लू प्रिंट्स विनासायास इस्रायली आर्मीला उपलब्ध झाल्या.

शिवाय १९९५ पासून, त्या विमानतळावर फक्त सौदी आणि पाकिस्तान याच दोन देशांची विमाने उतरत असल्याने कोणाहीकडून काहीही माहिती मिळण्याचा संभाव नव्हता.

वेळोवेळी सोडल्या गेलेल्या ओलीसांकडून इस्रायलने माहिती मिळवली. अगदी बेनगाझी येथे पहिला थांबा घेतल्यानंतर गरोदर असलेल्या पॅट्रिशीया हॅमन या महिलेपासून ते इदी आमीन मॉरीशसला जाण्याआधी सोडण्यात आलेल्या ८० पेक्षा जास्ती 'नॉन ज्यू' ओलीसांपर्यंत सर्वांच्या मुलाखती त्या त्या देशात जावून इस्रायली तुकड्यांनी घेतल्या होत्या.

एंटबे मध्ये केनियानी परतीच्या प्रवासात इस्रायेलच्या विमानांना इंधनासाठी उतरण्याची परवानगी दिली होती. तशी कोणतीही शक्यता कंदाहार प्रकरणामध्ये नव्हती.

या विधानाची आवश्यकता / भारताने कंदाहारवर हल्ला केला असता तर एखाद्या 'स्टॉप ओव्हरची' आवश्यकता कळाली नाही.
इस्रायलला नैरोबी विमानतळाची गरज होती कारण "तेलअवीव-लाल समुद्र-इजिप्त-सुदान-सौदी अरेबीया-जिबोती बंदर-केनया-सोमालिया-इथिओपीया-व्हिक्टोरीया तलाव-एंटबे" या मार्गाने ४००० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून विमाने एंटबे ला पोहोचली होती. इंधन भरल्याशिवाय एंटबे ते इस्रायल हा परतीचा प्रवास शक्य नव्हता म्हणून केनियामध्ये थांबा घेतला गेला होता. (सुटकेसाठी गेलेल्या इस्रायली विमानांना केनिया मध्ये इंधन भरण्याची परवानगी एंटबेला उतरण्या आधी काही मिनिटे मिळाली होती, ही परवानगी मिळाली नसती तर एंटबे विमानतळावरील इंधन चोरून इस्रायली विमानांमध्ये भरण्याचा प्लॅन आखला गेला होता व या साठी एक मोबाईल फ्युएल पंप इस्रायली विमानांमध्ये होता. हल्याच्या धामधुमीमध्ये इस्रायलने एंटबे विमानतळावरील रशीयन मशीनरी पळवली. या ढापलेल्या मशीनरीला जागा व्हावी म्हणून हा पंप (नाईलाजाने) एंटबे विमानतळावर सोडून देण्यात आला.

हवाई हल्ल्याचा रूट.

.

वरील प्रतिसादामधील "भारताकडे माहिती नव्हती" हे विधान खरे असेल तर ही अत्यंत दु:खदायक बाब आहे. असे माझे वैयक्तीक मत आहे.

*********************************************************
"एंटबे वारंवार होत नसते" या विधानाला उत्तर म्हणून मी एंटबे शिवाय इतर यशस्वी "हॉस्टेज रेस्क्यू ऑपरेशन्सचा" विदा देण्याचे नितीन थत्ते यांना (बहुदा मागच्या वर्षी) कबूल केले होते. तो विदा खालीलप्रमाणे.

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Entebbe

http://en.wikipedia.org/wiki/Lufthansa_Flight_181

http://en.wikipedia.org/wiki/Air_France_Flight_8969 (बेस्ट ऑफ लक प्यारे ;-))

http://en.wikipedia.org/wiki/Singapore_Airlines_Flight_117

http://en.wikipedia.org/wiki/Hijacking_of_Sabena_Flight_572

http://en.wikipedia.org/wiki/1977_Dutch_train_hostage_crisis

http://en.wikipedia.org/wiki/Train_hostage_Netherlands_1975

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Jaque

http://en.wikipedia.org/wiki/Operation_Emmanuel

यावर आता एक लेखमाला सुरू करण्याच्या विचारात आहे.. पहिला मान अर्थातच ऑपरेशन एंटबेचा!

एकदा आपली खरडवहीतून चर्चाही झाली होती असे स्मरते.

बरोबर.. खालीलप्रमाणे आपली चर्चा झाली होती.

सर्वप्रथम "ऑपरेशन एंटेबी" या धाग्यावर गणपाच्या या प्रतिसादावरून चर्चेस प्रारंभ झाला.

गणपा - Mon, 23/04/2012 - 13:26

मस्त चित्रपट आहे. कुंद्याच्या सांगण्यावरुन पाहिला.
तो पहात असताना कंदहार विमान अपहरणाच्या वेळी भारताला अस एखादं पाउल का उचलता आल नाही याची राहुन राहुन लाज वाटली.

नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 13:37

गणपा भौ मनाला लावून घेऊ नका. इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे.

गेल्यावर्षी इस्रायलने एका अपहृत सैनिकाच्या बदल्यात १०२७ कैद्यांना सोडले होते.

त्याखेरीज वेळोवेळी अनेक कैद्यांना सोडण्यात आलेले आहे.

मोदक - Mon, 23/04/2012 - 19:52
इतिहास - जगाचा की इस्त्रायलचा..?

"यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" ची व्याख्या काय..? म्हणजे Acceptable Civilian Casuality Ratio वगैरे..?

नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 20:00
जगाच्याच (२० व्या शतकापासूनच्या) इतिहासात असेल.

तुम्हाला आणखी बरीच उदाहरणे सापडली तर कळवावी.

मोदक - Mon, 23/04/2012 - 20:16

सांगतो... पण तुम्ही व्याख्या सांगा ना...

(हॉस्टेज रेस्क्यू या विषयावर ठरवून वाचलेले आहे म्हणून विचारले)

येथून पुढील चर्चा खरडवहीमध्ये..

मोदक Wed, 25/04/2012 - 00:19

तुमच्या प्रतिसादातून "दहशतवाद्यांचा Success Rate जास्त आहे" असा संदेश जातो आहे का..?

नितिन थत्ते Wed, 25/04/2012 - 10:16

तसा मेसेज नाही. मेसेज आहे की कुणीतरी नेहमीच डेअरडेव्हिल असतो आणि कुणी(पक्षी-भारत) नेहमी कमकुवत असतो असे नसते.

आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते.

मोदक Thu, 26/04/2012 - 01:08
आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते

"कित्येकवेळा" आणि जगाच्या "इतिहासात एखादेच / दुसरे" हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थछटा दाखवतात.

नितिन थत्ते Thu, 26/04/2012 - 14:05

बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.

मोदक Sat, 28/04/2012 - 00:37

बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.

जगातले सगळे देश Commandos, Neavy Seals, ATS असे आणि यांसारखे बरेच Highly Trained Units पोसून "बहुतेकवेळा तडजोडच करतात" हे मत वाचून आश्चर्य वाटले.

पण तुमच्याकडून असाच प्रतिसाद अपेक्षीत होता

नितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 10:17
तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये. कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात. (इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल. गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे.

तरीही इस्रायल नेहमीच कणखर असतो आणि भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. परंतु मला तो वाद चालवावासा वाटत नाही. माझ्या दृष्टीने तसे नाही एवढे दाखवण्यापुरेसा विदा आहे.

मोदक Sat, 28/04/2012 - 11:17

सर्वप्रथम - मी वाद घालत नाहीये. (तुमचा अनुभव आणि अभ्यासापुढे माझ्या मर्यादा मला माहीत आहेत.)

तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये.
पॉईंट हा आहे की "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" हे खूप धाडसी विधान आहे..

कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात.

"यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" किंवा "बहुतेकवेळा तडजोड" ची तुमची व्याख्या काय आहे..? बेसलान किंवा मॉस्को थीएटर सारखा भयानक प्रकार होवून सुध्दा ते सरकार संपूर्ण जबादारी स्वीकारत आहे... व्याख्या कळाली तर आपल्याला एका पातळीवर येणे सोयीचे पडेल असे वाटते. (१००% ओलीस जिवंत सुटावेत, प्रॉपर्टी / विमान डॅमेज होवू नये, सगळे दहशतवादी ठार व्हावेत आणि एकही गोळी न झाडता हे सगळे व्हावे असे काही आहे का..?)

(इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल.)

बर्‍याच आहेत.. तुम्ही व्याख्या सांगीतली की विदा जमवून पाठवतो.

गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे.

आपण भरलेल्या अर्ध्या ग्लासाकडे बघुया... तसेच तुम्ही १० पैकी ५ विषयात नापास झाला व मी ४ विषयात नापास झलो म्हणोन मी हुषार ठरत नाही.

भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.

हे मी कधीही म्हटले नाहीये. आणि परिस्थिती कितीही वाईट असली / कशीही असली तरी हे विधान खूप धाडसाचे ठरेल.

तुमचा प्रतिसाद विनाकारण Defensive वाटला.

नितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 11:53

व्याक्या करणे फार अवघड नसावे.
८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही].

भारताची २६/११ कारवाई या ८०% क्रायटेरियामध्ये ऑलमोस्ट बसते. परंतु त्यावेळी अतिरेक्यांच्या काही मागण्याच नव्हत्या. ७८% ओलीसांची सुटका झाली. (मीडियाद्वारा सुरक्षा दलांच्या हालचालीविषयी इत्थंभूत माहिती अतिरेक्यांना मिळत असताना मिळालेले यश खरे तर जास्तच आहे). परंतु या कारवाईला काही एण्टेबीच्या कारवाईचा दर्जा देता येणार नाही.

भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात. तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाही

मोदक Sat, 28/04/2012 - 12:02

व्याक्या करणे फार अवघड नसावे.
८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही].

ओक्के..

भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात.

तुलना होवूच शकत नाही. IC 814 ने अमृतसरहून उड्डाण का केले..? हा मूळ प्रश्न आहे माझ्यादृष्टीने.

तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाही
कळाले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.. नक्की काय माहिती हवी आहे तुम्हाला माझ्याविषयी..?

नितिन थत्ते Mon, 30/04/2012 - 08:56

म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही.

मोदक Mon, 30/04/2012 - 09:20

म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही
जोपर्यंत आपली चर्चा पातळी सोडून जात नाहीये आणि दोघांपैकी कोणीही Davil's Advocate मोड मध्ये जात नाही तोपर्यंत खरेतर हा प्रश्न पडायचे कारण नव्हते.

मी मिपावर खूप सुरूवातीपासून वाचनमात्र आहे. गेली ६ महिने प्रतिसाद द्यायला सुरू केले आहे. इतकीच ओळख सध्या पुरेशी आहे असे वाटते.

**********************

यानंतर माझ्या आळशीपणाने मी विदा देण्यामध्ये चालढकल करीत राहिलो.. तो विदा वरती दिला आहे.

तुमच्या मूळ विधानाला "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" असलेला माझा विरोध आजही आहे आणि त्याचा विदा वरीलप्रमाणे... आणखी विदा हवा असल्यास शोधाशोध करून देईनच!

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 7:58 pm | श्रीरंग_जोशी

एखाद्या सदस्याच्या ढोबळ प्रकारच्या विधानावर इतका काथ्या कुटणे मला (माझ्यापुरते तरी) योग्य वाटत नाही.

इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे.

हे विधान (मला तरी) ढोबळ वाटत नाही.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 8:37 pm | श्रीरंग_जोशी

बरं, 'ढोबळ' हे विशेषण मागे घेतो. तरीही एका विधानावर इतक्या प्रमाणात काथ्या कुटणे (पुन्हा एकदा मला माझ्यापुरते तरी) योग्य वाटत नाही.

नितिन थत्ते's picture

25 Mar 2013 - 11:24 pm | नितिन थत्ते

विदा जमवल्याबद्दल धन्यवाद.

आजवर जेव्हाजेव्हा विषय निघाला तेव्हा तेव्हा फक्त आणि फक्त एण्टेबीचेच उदाहरण ऐकू आले. (+ अमेरिकेने इराणबाबत केलेला प्रयत्न फसला होता ते वाचलेले होते) त्यामुळे माझा असा समज झाला. अर्थात मी शोध घेतला नाही हे खरेच.

एकमेव उदाहरण असेल हे विधान सपशेल मागे घेतो.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 5:51 pm | श्रीगुरुजी

हा प्रतिसाद आवडला. खूपच नवीन माहिती मिळाली.

हुप्प्या's picture

25 Mar 2013 - 8:03 am | हुप्प्या

हे मान्य आहे की धडाकेबाज, कमांडोंच्या मदतीने प्रवाशांची सुटका करणे वगैरे अशक्यप्राय होते. त्यामुळे खंडणी, अतिरेकी सोडणे वगैरे मानहानी पत्करावी लागली. पण नंतर काय?
असे करायला लागल्याचा डूख मनात ठेवून काही मोहिम काढली आहे, छुपे वा खुले हल्ले करुन संबंधित अपहरणकर्त्या अतिरेक्यांना ठार करणे वा त्यांना पकडून आणणे अशा कुठल्या हालचाली झाल्याचेही ऐकिवात नाही.
विशेषतः वाजपेयींसारखा थंड, निस्तेज, गलितगात्र नेता असल्यामुळे झाले गेले विसरुन जावे छापाचे वर्तन दिसले. इंदिरा गांधी असत्या तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. बाकी कितीही दोष असले तरी बाईंची एक खंबीर, निर्भिड नेता म्हणून प्रतिमा आहे हे नक्की.

इस्रायलची ऑलिम्पिक टीम अतिरेक्यांनी अपहृत केली (१९७२ म्युनिक). त्यांना सोडवायचे प्रयत्न साफ फसले. जवळपास सगळे खेळाडू मारले गेले. पण मग इस्रायलने युरोपात मोसादची एक निवडक टोळी पाठवून शक्य तितक्या संबंधितांचा निकाल लावायचा प्रयत्न तरी केला.
आपल्या लोकांनी असे काही केले असते आणि त्याला योग्य काळानंतर प्रसिद्धी दिली असती तर पुढच्या संभवित अतिरेक्याने विचार केला असता. पण आपला इतिहास बघता असा कुठलाही धाक अतिरेक्यांना बसावा असा प्रयत्न झालेला नाही.
कंदाहार गेल्याचे दु:ख नाही पण जेहादी सोकावतात त्याचे दु:ख नक्कीच आहे.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 9:14 am | श्रीरंग_जोशी

गेल्या दोन दशकांत अनेकदा भारतीय सुरक्षादलांनी मोठमोठ्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. डिसेंबर २००१ च्या संसद हल्ल्याचा सुत्रधार गाजिबाबाला त्या घटनेला वर्ष पूर्ण व्हायच्या आत मारले गेले होते.

जॉर्ज फर्नांडिस यांची संरक्षणमंत्री म्हणून शेवटची कारकिर्द सुरू झाल्या झाल्या भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती. व स्वतःच्या तिथे असण्याचे कुठलेही पुरावे शिल्लक न ठेवता आपल्या सैन्याची तुकडी सुखरूप परत आली होती. त्यावेळी इंडिया टुडे मध्ये यावर लेख आला होता.

भारताचे शेजारी राष्ट्र लष्करी ताकतीनुसार कमकुवत पण नाहीये व अण्वस्त्रसज्जदेखील आहे त्यामुळे नको ती आगळीक न करण्याचे तारतम्य दाखवणे अपरिहार्य आहे. भारताचा विस्तिर्ण भूभाग व प्रचंड लोकसंख्या या घटकांमूळेदेखील अंतर्गत सुरक्षेवर बरीच उर्जा खर्च होते.

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 9:28 am | पिंपातला उंदीर

त्या इंडिया टुडे आर्टिकल ची लिंक देऊ शकाल का? मी पण प्रयत्न करतो शोधण्याचा

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 9:39 am | श्रीरंग_जोशी

१० वर्षाहून अधिक जुना लेख आहे त्यामुळे शोधणे अवघड आहे. मी छापिल आवृत्तीमध्ये वाचले होते.

उद्या पुन्हा प्रयत्न करेन. त्यावेळी हा लेख वाचलेले इतर कुणी इथे असतील अशी आशा आहे.

सूर्याजीपंत's picture

25 Mar 2013 - 10:37 am | सूर्याजीपंत

अति गोपनीयतेमुळे हे का पूर्णत्वाला गेलं नाही याची पूर्ण कारणमीमांसा कधीच उघडपणाने झाली नाही. पण यामागे मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय दबाव कारणीभूत होता. तसेच मुशर्रफ यांनी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर केलेले प्रसिद्ध भाषण ( शिक्षण आणि चांगल्या सुविधांसाठीचा जेहाद ) हे देखील कारणीभूत होते.

भारतीय सैन्याने उघडपणे कधीच हे operation मान्य केले नाही. पण कारवाई नक्कीच झाली होती. प्रत्यक्ष मिग-२९ आणि मिराज च्या Squadron Leader यांनी, मी त्यांना Salami Slice बद्दल मत विचारल्यावर क्काय ? कसले Salami Slice ? असा आव आणला होता. प्रत्यक्ष कारवाई नंतर वर्तमानपत्रांमध्ये तुरळक बातम्या आल्या होत्या पण त्या लगेच दडपल्या गेल्या.

हा घ्या Operation Salami Slice चा India Today मधला दुवा...

http://archives.digitaltoday.in/indiatoday/20020603/cover.html

सूर्याजीपंत's picture

25 Mar 2013 - 10:46 am | सूर्याजीपंत

Salami Slice चा एकदम सही दुवा सापडलेला आहे... मला वाटतं कि श्रीरंग याच लेखाबद्दल बोलतोय....

http://media1.intoday.in/indiatoday/War-On-Terror.PDF

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 5:56 pm | श्रीगुरुजी

"गेल्या दोन दशकांत अनेकदा भारतीय सुरक्षादलांनी मोठमोठ्या अतिरेक्यांना कंठस्नान घातले आहे. डिसेंबर २००१ च्या संसद हल्ल्याचा सुत्रधार गाजिबाबाला त्या घटनेला वर्ष पूर्ण व्हायच्या आत मारले गेले होते. "

याच्या बरोबरीने काही देशांशी गुन्हेगार हस्तांतरण करार करून इतर देशात पळून गेलेले वाँटेड गुन्हेगार देखील भारताने इतर देशांकडून पकडलेले आहेत. गेल्या काही वर्षात सौदी अरेबिया, दुबई, पोर्तुगाल, नेपाळ इ. देशांनी भारताला हवे असलेले अतिरेकी भारतात पाठविले आहेत. भारताच्या आग्रहामुळे भूतानमध्ये आश्रय घेतलेल्या बोडो अतिरेक्यांना भारताच्या हवाली करून भूतानने त्यांची ठाणी उद्ध्वस्त केली होती. इतर देशात कमांडो पाठवून फरारी गुन्हेगारांना पकडून आणण्याचे किंवा मारण्याचे भारताचे धोरण नव्हते व आजही नाही. पण राजनैतिक पातळीवर या गुन्हेगारांच्या हस्तांतरणासाठी भारताने बर्‍यापैकी प्रयत्न केले आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 6:05 pm | श्रीरंग_जोशी

गेल्या दशकभरात या मार्गाने आपल्या देशाने बर्‍याच गुन्हेगारांस व अतिरेक्यांस बंदी केलेले आहे.
एवढेच नव्हे तर भारतीय विमानतळावरून अतिरेक्यांद्वारे अपहरण घडवले जाणे जवळजवळ अशक्य आहे. सदर प्रकरणही काठमांडू विमानतळावर घडले होते जेथे आता भारतीय विमानात बसण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा तपासणी केली जाते.

सूर्याजीपंत's picture

26 Mar 2013 - 8:07 am | सूर्याजीपंत

"इतर देशात कमांडो पाठवून फरारी गुन्हेगारांना पकडून आणण्याचे किंवा मारण्याचे भारताचे धोरण नव्हते व आजही नाही."

थोडाच बदल. नुकताच सौदी मधून आणलेला अन्सारी हा एका छुप्या कारवाई अंतर्गत आणला गेला आणि जेव्हा तो दिल्ली विमानतळावर उतरला तेव्हा त्याला अटक करून ती जाहीर करण्यात आली. भारताने वेळोवेळी अशी कृत्ये केलेली आहेत, पण ते आपले अधिकृत धोरण नाही, शिवाय प्रसारमाध्यमांपुढे प्रत्येक वेळेला खरे चित्र सांगितला जातंच असाही नाही...

बाकी सर्व सहमत....

विवेक्पूजा's picture

3 Jun 2015 - 2:31 pm | विवेक्पूजा

बेबी चित्रपटाचे कथाबीज हे आहे तर.

निव्वळ अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घालणे वेगळे. तसे अतिरेकी हल्लेही अनेक झाले आहेत.
पण निव्वळ ह्या अपहरणाला प्रत्युत्तर म्हणून त्या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढून त्यासंबंधित अतिरेक्यांना पकडणे शिक्षा देणे हे झाले आहे का? माझ्या माहितीनुसार नाही.
जर पाकिस्तान पुरस्कृत हल्ले (जसे २६/११) होतात तेव्हा तो देश वा त्या देशातील संघटना भारत अण्वस्त्र सुसज्ज आहे तेव्हा आगळिक करताना विचार करु या असा विचार करत नसतील आणि आपल्या अतिरेकी कारवाया बिनबोभाट पार पाडत असतील तर भारताने प्रत्युत्तर देताना तो विचार का करावा? अशाने अतिरेकी सोकावत नाहीत का?

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2013 - 3:49 am | श्रीरंग_जोशी

माझ्या दिवाळी अंकातील लेखाच्या शेवटच्या दोन परिच्छेदांमध्ये मी या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यातील शेवटचा उतारा इथे डकवतो.

या सर्व पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री स्व. वसंत साठे यांचे एका चर्चेतले विधान आठवते. ते भारत व पाक यांच्या संबंधांवर होते. ते म्हणाले होते, 'पाकिस्तान छुरा हैं, और भारत तरबुजा, अब चाहे छुरा तरबुजे पर चले या तरबुजा छुरे पर, कटना तो तरबुजे को ही हैं...

कट्टरवादावर आधारित असलेल्या दहशतवाद व भारतीय लोकशाही व्यवस्था यालाही हेच लागू होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 4:36 am | निनाद मुक्काम प...

तो काळ वेगळा होता ,
अमेरिका भारताच्या प्रेमात पडेल व भारत भविष्यातील महासत्ता होईल असे भाकीत प्रगत जगताने केले नव्हते
ती खरच होईल का नाही माहित नाही पण प्रगत राष्ट्राला असे वाटते
आणि खुद पाकिस्तान मध्ये दहशतवादाचे भूत थैमान घालेल व सगळ्यात महत्त्वाचे
म्हणजे राष्ट्रीय पक्ष दुर्बल होऊन प्रादेशिक पक्ष वाढल्याने केंद्रात पाकिस्तान बाबत मनात येईल असे धोरण ठरवता येत नाही ,
माझ्या मते नुकतेच इटली प्रकरण इंदिरा गांधी ह्यांच्या काळात घडले असते म्हणजे सोनिया भारतात येण्याअगोदर
तर ह्या प्रकरणाचा निकाल ९० टक्के इंदिरा गांधी ह्यांना काय वाटते ह्यावर अवलंबून असता ,
ज्यू राष्ट्राकडून दहशतवादावर साम, दंड भेदाचे शिक्षण घेतलेले आपले सैन्य भोंगळ आदर्शवादाला तिलांजली देऊन कडक कारवाई करेल असे साठे ह्यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल ,
थोडक्यात काळ बदलत आहे ,
एकेकाळी व आज सुद्धा आपण परदेशात नोकर्या करायला जातो , आता भारतात प्रगत देशांचे प्रमुख नोकर्या मागायला येतात ,
आपल्या कंपन्या साहेबाच्या देशात त्यांना रोजगार पुरवतात ,
आर्थिक दृष्ट्या मजबूत भारत क्रिकेट मध्ये आर्थिक महासत्ता झाला आहे , व त्यामुळे आपले क्रिकेट चे मंडळ गोर्यांना तोडीस तोड उत्तर देते , तर आपले खेळाडू सुद्धा तोच कित्ता गिरवतात
पैशाने शहाणपण येत नाही मात्र माज करता येतो ,
तस्मात आता पाकिस्तान तर्बुजा आहे , व दहशतवादी व कट्टर वाद तरबुजा
कोण कोणावर पडले तरी ..........
आता मूष पाकिस्तान मध्ये आला आहे
येत्या निवडणुकीत तेथे मजबूत राडे होणार आहेत ,
कोणाला सत्तेवर येण्यासाठी भारताची मदत लागेल तर कोणाला भारत विद्वेषाची
खुद पाकिस्तानचे मंत्री आपण भारताची बरोबरी करू शकत नाही , असे म्हणतात
तेथील जनता भारत बहोत तरक्की कर गया असे म्हणते
तेव्हा समीकरण नक्कीच बदलले आहे ,

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 9:29 am | पिंपातला उंदीर

+११११११११

अतिरेक्यांनी पकडलेल्या निरपराध १६० लोकांची replacement म्हणुन १६० खासदार ( सर्व पक्षीय ) ओलिस म्हणुन पाठवायला हवे होते. नाहीतरी ते सर्व गोष्टींवर आपला पहिला हक्क आहे असे समजतात ( नाहीतर हक्कभंग प्रस्ताव आणतात ). इथेही त्यांच्या कडुन देशप्रेमाचा त्यांचा पहिला हक्क त्यांना जबरदस्तीने मिळवून द्यायला पाहिजे होता.

मोदक's picture

25 Mar 2013 - 11:54 am | मोदक

हे वस्तुतः शक्य आहे..?

शक्य असेल तर चर्चा करूया.

उपलब्ध खासदारांपैकी "ओलीसांच्या बदल्यात ओलीस" हे खासदार कोणत्या बेसीसवर निवडायचे..?

प्रसाद१९७१'s picture

25 Mar 2013 - 12:22 pm | प्रसाद१९७१

अहो मोदक शेठ - माझे लिखाण अत्यंत उपहासातून नव्हते.

तुम्हाला काय वाटते १६० सोडा १ खासदार तरी तयार झाला असता का ओलिस म्हणुन जायला.

ह्या नीच लोकांना तालीबानी लोकांनी तरी ओलिस म्हणुन ठेउन घ्यायला परवांनगी दिली असती का?

गणामास्तर's picture

25 Mar 2013 - 12:50 pm | गणामास्तर

मजेशीर प्रतिसाद. :)

मोदक's picture

25 Mar 2013 - 2:31 pm | मोदक

१) अहो तो उपहास होता
२) अहो मोदक शेठ - माझे लिखाण अत्यंत उपहासातून नव्हते.

नक्क्की काय म्हणायचे आहे..?

तुम्ही उपहासाने लिहिले असावे असा माझा समज आहे!

प्रसाद१९७१'s picture

25 Mar 2013 - 4:50 pm | प्रसाद१९७१

तो typo होता. मिपा वर प्रतिसाद संपादीत करता येत नाही ना

आशु जोग's picture

25 Mar 2013 - 9:43 am | आशु जोग

लेखन विषयात
'धर्म' का म्हटले आहे ?

मैत्र's picture

25 Mar 2013 - 10:42 am | मैत्र

http://islamicterrorism.wordpress.com/2009/01/24/the-truth-behind-kandah...

कांचन गुप्ता हे बीजेपी कडे झुकलेले मानले जातात. त्यांचा लेख आहे त्यामुळे थोडा with a pinch of salt घ्यायला हरकत नाही आणि तसाही मूळ लेख पायोनियर मधला आहे. पण यात काही महत्त्वाचे उल्लेख आहेत.
जे सरकार पेक्षा सरकारी यंत्रणांचे फेल्युअर दर्शवतात. वाजपेयी त्यांच्या विमानात होते त्यांना ही माहिती लगेच दिली गेली नाही .. नक्की कारण स्पष्ट नाही. बहुधा काही प्रोटोकॉल्स असावेत. त्यात वेळ वाया गेला.
आपल्याकडे काही हॉलिवूडमध्ये दाखवतात तसे एअर फोर्स वन नसावे.. आणि १९९९ मध्ये पायलट वगळता थेट संपर्क शक्य नव्हता. पायलटला का सांगितले नाही हे क्लासिफाईड असावे. वाजपेयींचे विमान उतरेपर्यंत १ तास ४० मिनिटे वेळ वाया गेला. नंतर जसवंतसिंग / अडवानी अशी मीटिंग चालू असताना विमान अमृतसरला उतरवण्यात आले. विमान अमृतसरला अचानक आले होते.. लाहोर विमानतळाने उतरण्याची परवानगी नाकारली आणि इंधन संपत आल्याने केवळ तोच पर्याय होता म्हणून.
जसवंतसिंग यांनी फोनवर काहीतरी करून वेळ काढण्याचा आणि काही अवजड वाहन मध्ये आणून उड्डाण अडवण्याचे आदेश दिले.. अमृतसर मध्ये MARCOS /NSG असे काही नव्हते.. पंजाब पोलिसांचे कमांडो पथकच उपलब्ध होते.
टँकर मध्ये येतो आहे हे तिथे गडबड झाल्याने अतिरेक्यांच्या लक्षात आले आणि विमान उड्डाण करून निघून गेले.
एकूण ४५ मिनिटे मिळाली होती. पूर्वसूचना नसताना..आधी काहीही राजकीय / मिलिटरी / RAW चर्चा नसताना तिथे विमान थांबवण्यात अपयश आले.
एकदा दुबईमार्गे कंदाहार गाठल्यावर बरेच पर्याय बंद झाले जे वर इतरांनी लिहिलेच आहेत. एंटेबी प्रकरण शक्य झाले त्याला इतर अनेक कारणे होती. शिवाय त्यात मध्ये वेळही मिळाला होता.
इदी अमीन चे सैन्य आणि कडवे तालिबानी यातही बराच फरक होता. एंटेबी १९७७ मध्ये झाले आणि कंदाहार १९९९ .. परत एंटेबी होण्याची शक्यता टाळण्याची काळजी न घेण्याइतके तालिबानी आणि आय एस आय मूर्ख असावेत काय?

प्रवाशांच्या नातेवाईकांनी केलेली निदर्शने आणि काही लोकांनी उधळलेली मुक्ताफळे अशक्य होती.. त्यापुढे १६० - १७८ नागरिकांच्या जिवापेक्षा अतिरेकी सोडणे जास्त चुकीचे असे म्हणणर्‍या इथल्या प्रतिसादांचे काहीच मोल राहात नाही..

"“We want our relatives back. What difference does it make to us what you have to give the hijackers?” a man shouted. “We don’t care if you have to give away Kashmir,” a woman screamed and others took up the refrain, chanting: “Kashmir de do, kuchh bhi de do, hamare logon ko ghar wapas lao.” Another woman sobbed, “Mera beta… hai mera beta…” and made a great show of fainting of grief.

To his credit, Mr Jaswant Singh made bold to suggest that the Government had to keep the nation’s interest in mind, that we could not be seen to be giving in to the hijackers, or words to that effect, in chaste Hindi. That fetched him abuse and rebuke. “Bhaand me jaaye desh aur bhaand me jaaye desh ka hit. (To hell with the country and national interest),” many in the crowd shouted back. Stumped by the response, Mr Jaswant Singh could merely promise that the Government would do everything possible.

I do not remember the exact date, but sometime during the crisis, Mr Jaswant Singh was asked to hold a Press conference to brief the media. While the briefing was on at the Press Information Bureau hall in Shastri Bhavan, some families of the hostages barged in and started shouting slogans. They were led by one Sanjiv Chibber, who, I was later told, was a ‘noted surgeon’: He claimed six of his relatives were among the hostages.

Dr Chibber wanted all 36 terrorists named by the hijackers to be released immediately. He reminded everybody in the hall that in the past terrorists had been released from prison to secure the freedom of Ms Rubayya Sayeed, daughter of Mufti Mohammed Sayeed, while he was Home Minister in VP Singh’s Government. “Why can’t you release the terrorists now when our relatives are being held hostage?” he demanded. And then we heard the familiar refrain: “Give away Kashmir, give them anything they want, we don’t give a damn.”

कारगिल नुकतेच झाले होते .. शहीद अजय आहुजाची विधवा या नातेवाईकांची समजूत घालण्यासाठी आली.. पण त्याचा उपयोग न होता सर्व नातेवाईक अजून भडकले.. (http://indiatoday.intoday.in/story/ic-814-hijack-unable-to-access-to-kan...)

जर ५०-१०० किंवा सर्व प्रवासी मारले गेले असते तर त्याचा केवढा मोठा गहजब झाला असता... म्हणजे प्रवासी मेले तर सरकारची चूक आणि अतिरेक्यांच्या बदल्यात सोडवले तरी चूक..
२००९ मध्ये चिदंबरम यांनी असे विधान केले की कंदाहार प्रकरणात निर्णय घेणे अतिशय अवघड होते..

अशा प्रसंगी पक्ष / धोरणे बाजूला ठेवून देशासाठी एकत्र येणे गरजेचे असते आणि तसे केलेही जाते. पण प्रमुख विरोधी पक्षांनी संदिग्ध भूमिका घेतली. आणि सरकारवर पूर्ण जबाबदारी टाकून त्यांच्या असेल त्या निर्णयाशी सहमत असू असे विधान केले. जे सुटका होताच ताबडतोब बदलले आणि तेव्हापासून आजवर टिका चालू आहे.

त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस किंवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षाने आणि परराष्ट्रमंत्र्याने केले असते तरी ते चूक म्हणता आले नसते..

सव्यसाची's picture

25 Mar 2013 - 11:15 am | सव्यसाची

हा प्रतिसाद आवडला. इतिहास पाहताना आपण आजच्या परिस्थितीकडे पाहून त्याचे मूल्यमापन करतो. हे hindsight(मराठी शब्द?)मध्ये पाहून इतिहास कळतो असे मला तरी वाटते.

धन्यवाद!

त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस किंवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षाने आणि परराष्ट्रमंत्र्याने केले असते तरी ते चूक म्हणता आले नसते..

+११११११

अत्यंत ब्लंटली विचारतो.. आपल्यापैली एकजण किंवा आपले नातेवाईक त्या विमानात असते (देव करो आणि असे कधीही न घडो!) तर आपल्या काय भावना असत्या..?

अतिरेक्यांना सोडले नसते तर होणार्‍या परिणामांना सामोरे जाण्यासाठी, ती किंमत चुकवण्यासाठी आपण सर्वजण एक समाज म्हणून तितके प्रगल्भ आहोत का..?

मैत्र's picture

25 Mar 2013 - 12:38 pm | मैत्र

याव्यतिरिक्त एक घटना --
वाटाघाटी करून ३६ अतिरेक्यांची यादी आणि २०० कोटी डॉलर्स हे कमी करून तीन कडव्या अतिरेक्यांपर्यंत खाली आणले सरकारने.. यात काही दिवस गेले..
अपहरणकर्ते यात डाव आहे हा विचार करून चवताळले आणि मारहाण सुरु केली.. रुपेनला तर आधीच मारले होते..
अखेर त्यांनी पूर्ण विमान उडवून देण्याची धमकी दिली.. दारूगोळा होताच शिवाय तालिबानच्या मदतीने तयारी केली..
बहुधा या धमकी नंतर आणि उडवून देण्याची तयारी केली आहे अशी पक्की खात्री झाल्यावर सरकारने अतिरेकी सोडण्याची मागणी मान्य केली..
तालिबानशी कसलाही राजनैतिक संबंध नाही.. प्रवासी सोडवताना संपर्क अवघड जाईल म्हणून जसवंतसिंग स्वतः गेले.. RAW ने विमान पाठवण्यास नकार दिला. तालिबानने मिलिटरी विमान नाकारले.. त्यामुळे इंडियन एअरलाइन्स च्या विमानातून अतिरेकी घेऊन स्वत: जसवंतसिंग गेले..
या कृतीने देशाची नाचक्की झाली आणि भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले असे सर्व विरोधकांनी गेली सगळी वर्षे ढोल वाजवले.. कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्कादायक होती.. पण त्रयस्थ पणे विचार करता त्या १६० लोकांसाठी जसवंतसिंग यांनी किती मोठा वैयक्तिक धोका पत्करला होता याची कल्पना करणे कठीण आहे.

यातून तत्कालिन सरकारवर चालू असलेल्या टीकेपेक्षा.. हे घडवून आणण्यात जो भ्रष्टाचार कारणीभूत ठरला -- नेपाळमध्ये इतक्या बंदूका आणि दारुगोळा विमानात जाऊ शकला. अतिरेकी भारतातून नेपाळ्मध्ये त्यासाठी सहजपणे जाऊ शकले. त्यासाठी ते आधी भारतात आले आणि सहज सीमा ओलांडून गेले.. या सर्व प्रकरणात बराच भ्रष्टाचार असला पाहिजे.
जसे शेखाडी मध्ये स्फोटके उतरवताना स्थानिक भ्रष्टाचारामुळे पुढे इतके मोठी घटना घडली आणि मुंबईचे भविष्य बदलले.. तसेच या प्रकरणात पैसे घेऊन मदत करणार्‍यांमुळे भारतीय राजकारणाचा इतिहास बदलला..
यावर टिका करणार्‍या कोणत्याही पक्षाने तेव्हाच्या स्थितीत केलेल्या कृतीपेक्षा काय मार्ग योग्य ठरला असता हे कधीही स्पष्टपणे मांडले नाही. फक्त २००४ च्या निवडणुकांमध्ये नेहमीप्रमाणे सभांमध्ये बोलण्याच्या मोठ्या आणि बेलगाम विधानांसाठी भांडवल केले गेले..
अखेर देशाच्या सुरक्षिततेपेक्षा राजकारण महत्त्वाचे ठरते आहे..

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 8:30 pm | श्रीगुरुजी

मैत्रे यांचा हा प्रतिसाद सुद्धा आवडला.

"तालिबानशी कसलाही राजनैतिक संबंध नाही.. प्रवासी सोडवताना संपर्क अवघड जाईल म्हणून जसवंतसिंग स्वतः गेले.. RAW ने विमान पाठवण्यास नकार दिला. तालिबानने मिलिटरी विमान नाकारले.. त्यामुळे इंडियन एअरलाइन्स च्या विमानातून अतिरेकी घेऊन स्वत: जसवंतसिंग गेले..
या कृतीने देशाची नाचक्की झाली आणि भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले असे सर्व विरोधकांनी गेली सगळी वर्षे ढोल वाजवले.. कृती आंतरराष्ट्रीय स्तरावर धक्कादायक होती.. पण त्रयस्थ पणे विचार करता त्या १६० लोकांसाठी जसवंतसिंग यांनी किती मोठा वैयक्तिक धोका पत्करला होता याची कल्पना करणे कठीण आहे. "

भारत त्यावेळी काहीही करण्याच्या परिस्थितीत नव्हता. सर्व हुकुमाची पाने अतिरेक्यांच्या हातात होती. जर विमानचाच्यांनी जसवंतसिंग कंदाहारला पोचल्यावर त्यांना व त्यांच्याबरोबरच्या इतर अधिकार्‍यांना ओलिस ठेवून अजून नवीन मागण्या केल्या असत्या तर भारताला काहीही करता आले नसते. त्या दृष्टीने जसवंत सिंह यांनी कंदाहारमध्ये जाऊन खूप धोका पत्करला होता हे लक्षात येते.

सूर्याजीपंत's picture

26 Mar 2013 - 7:45 am | सूर्याजीपंत

सहमत.

अवांतर: वाटाघाटींमध्ये अतिरेक्यांना एवढे खाली आणणे याचे अधिकाधिक श्रेय अजित दोवल यांना जाते.

समाजाची मानसिकता हाच मोठा फरक आहे . ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता असे वाचल्याचे आठवते. आपल्याकडे मात्र अतिशय वेगळे चित्र होते आणि त्याच मानसिकतेमधून तुमच्या या प्रश्नाचे उत्तर निश्चितच आपण एक प्रगल्भ समाज होण्यापासून फार दूरच आहोत असे वाटते.

ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता असे वाचल्याचे आठवते.

तपशीलामध्ये फरक आहे...

१) ऑपरेशन एंटबे दरम्यान "यित्झॅक राबीन" हे इस्राईलचे पंतप्रधान होते
२) ओलीसांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान राबीन यांच्या निवासस्थानावरील सैनिकांचे संरक्षक कडे तोडून व सैनिकांना धक्काबुक्की करून राबीन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता व ओलीसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करा अशी जाहीर विनंती केली होती.

बाकी समाजाच्या प्रगल्भतेबद्दल हेच म्हणावेसे वाटते की.. कितीही उदात्त विचार केला तरी वैयक्तीक पातळीवर आपण थोडेफार स्वार्थी असतो. "माझे नातेवाईक या विमानांमध्ये असते तर...?" या प्रश्नाचे आपल्याबाबतीतले उत्तर सर्व प्रश्नांना पूर्णविराम देते.

इस्राईलमधले आणखी एक उदाहरण - एंटबे संदर्भातलेच..

एंटबे विमानतळावरती हल्ल्याच्या सुरूवातीच्या क्षणांदरम्यान योनी नेतान्याहू च्या आदेशावरून मुकी बेत्सर या योनीच्या सहकार्‍याने दोन सैनीकांवर गोळ्या झाडल्या होत्या व या गोळ्यांच्या आवाजामुळे "Element of Surprise" राहिले नाही व याचा परिणाम योनी नेतान्याहूच्या मृत्यूमध्ये झाला.

या मुद्द्यावरून योनी नेतान्याहूचा लहान भाऊ व सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि मुकी बेत्सर यांनी एकमेकांवर उघड उघड आरोप केले आहेत.

हे उदाहरण द्यायचा उद्देश हाच आहे की.. आपण आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत हळवे असतो, देशप्रेमापुढे वा देशाच्या भलाईपेक्षाही!

लाल टोपी's picture

25 Mar 2013 - 6:29 pm | लाल टोपी

तपशीलातील चूक दाखऊन दिल्याबद्द्ल धन्यवाद
व्यक्तिगत पातळीवर आपण सर्वच हळवे असतो. १०० टक्के सहमत.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 6:08 pm | श्रीगुरुजी

"कारगिल नुकतेच झाले होते .. शहीद अजय आहुजाची विधवा या नातेवाईकांची समजूत घालण्यासाठी आली.. पण त्याचा उपयोग न होता सर्व नातेवाईक अजून भडकले.. "

त्यावेळी इतर सर्व विरोधी पक्षांनी 'नरो वा कुंजरो वा' अशी भूमिका घेतलेली असताना व अपहृतांच्या नातेवाईकांचा दबाव वाढत असताना व वाहिन्या या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया सतत दाखवून वातावरणनिर्मिती करत असताना, तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री वसुंधरा राजे यांनी कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या नातेवाईकांना वाहिन्यांसमोर आणून अपहृतांच्या नातेवाईकांची समजूत घातली होती.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 8:18 pm | श्रीगुरुजी

हा प्रतिसाद खूपच आवडला. सूर्याजीपंत, श्रीरंग जोशी, मोदक इ.चे प्रतिसाद देखील माहितीपूर्ण आहेत. माझ्या माहितीत नव्याने भर पडली.

"एकूण ४५ मिनिटे मिळाली होती. पूर्वसूचना नसताना..आधी काहीही राजकीय / मिलिटरी / RAW चर्चा नसताना तिथे विमान थांबवण्यात अपयश आले."

बरोबर. अमृतसरमध्ये भारताला जेमतेम ४५ मिनिटे मिळाली. अमृतसरमध्ये भारताचे कमांडो किंवा एनएसजी उपस्थित नव्हते व त्यांना तिथे पोचायला काही तास लागले असते. त्यामुळे स्थानिक पोलिसांवरच जबाबदारी येऊन पडली. ४५ मिनिटे इतक्या कमी वेळात दिल्लीत चर्चा करून एखादी कारवाईची योजना आखणे, त्यातले धोके तपासणे व धोके कमी करणे, ती योजना अमृतसरच्या अधिकार्‍यांपर्यंत पोचविणे व त्या योजनेप्रमाणे अमृतसरमध्ये तशी कारवाई स्थानिक पोलिसांनी करणे हे जवळपास अशक्य होते. स्थानिक पोलिसांपैकी एखाद्याने स्वतःहून विचार करून स्वतःच्या मनाने काहीतरी कारवाई करून विमान थोपविण्याचा प्रयत्न केला असता तरच काहीतरी होउ शकले असते. पण आपले पोलिस्/सैनिक हे हुकुमांचे ताबेदार असतात व स्वतःहून काही करायला जाऊन त्यातून अजून हानी झाली असती तर त्यांच्यावरच दोषारोप झाले असते.

या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे.

या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे.

+१११११११११११११

पुण्याचे वटवाघूळ's picture

25 Mar 2013 - 1:21 pm | पुण्याचे वटवाघूळ

जे काही झाले त्यात आपण काही बदल करू शकत नाही.पण यापुढच्या काळात मात्र दोन गोष्टी करायला हव्यातः

१. जर विमान अपहरणाची वेळ आली आणि जर विमान भारतीय हद्दीतून बाहेर न्यावे लागले तर ते पाकिस्तानात किंवा अधिक शक्यता अफगाणिस्तानसारख्या ठिकाणीच उतरवले जाईल-- २०१४ मध्ये अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतले की तालीबानला पूर्ण मोकळे रान मिळेल आणि मग परत २००१ पूर्वीचीच परिस्थिती निर्माण होईल. अशा वेळेला सर्व वैमानिकांना अगदी स्टॅन्डिंग इन्स्ट्रक्शन देण्यात यावी (अर्थातच तोंडी) की वेळ पडल्यास विमान पाकिस्तानात जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या दृष्टीने पाडावे म्हणजे आपणच ९/११ करावे. विमान उर्जाप्रकल्प-बंदरे किंवा नागरी वस्तीत पडले तर अती उत्तम.पण काहीही झाले तरी वैमानिकाने विमान कुठेही लॅन्ड करू नये.

२. कोणत्याही कारणाने (विमान अपहरण किंवा कोणा प्रसिध्द व्यक्तीचे अपहरण वगैरे) जर दहशतवाद्यांना सोडायची वेळ आली तर त्यांना स्लो पॉयझनिंगचे इन्जेक्शन देऊन सोडावे म्हणजे ते हरामखोर लगेच नाहीत तरी महिन्याभरात मरतील. दिल्लीतील १९८४ च्या शीखविरोधी दंगलीसंदर्भात हरकिशनलाल भगत फेब्रुवारी १९९६ मध्ये दिल्लीतल्या कोर्टात गेलेला असताना नेमका तिथे त्याला माईल्ड हार्ट अ‍ॅटॅक आला होता. त्यावेळी असे म्हटले जात होते की त्याने अशा प्रकारचा हार्ट अ‍ॅटॅक "स्टेज" केला होता. त्याच धर्तीवर महिन्याभरात कोणी दहशतवादी मरेल अशा प्रकारचे इन्जेक्शन देणे अगदीच अशक्य नसावे.

आणि निरपराध पाकिस्तानी मरतील किंवा कायद्याचे उल्लंघन होईल अशा प्रकारच्या गळे काढणार्यांना अगदी फाट्यावर मारत आहे.

सूर्याजीपंत's picture

26 Mar 2013 - 7:36 am | सूर्याजीपंत

याला साध्या भाषेत फक्त आत्महत्या म्हणता येईल. प्रत्येक वेळची परिस्थिती भिन्न, आव्हाने भिन्न आणि परिणामकारक घटक भिन्न असणार. अशावेळी अपहरण झाल्यावर काहीच न करता स्वतःच विमान पाडून टाकण्यात काहीही शहाणपणा नाही. अशाने जरी सुटण्याची किंवा कमांडो कारवाईची शक्यता असेल तरी ती होणार नाही. आणि आपणच अशी आत्महत्या करून घेतली तर आपल्यात आणि फिदायीन अतिरेकी आणि सायनाइड घेणाऱ्या तमिळ वाघांमध्ये काय फरक राहिला ?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2013 - 4:59 pm | निनाद मुक्काम प...

श्रीरंग जोशी , सूर्याजीराव , मोदक व इतर अनेकांचे प्रतिसाद वाचून चांगली माहिती मिळत आहे ,
माझ्या माहितीप्रमाणे तालिबान राजवटीत सुद्धा भारताचे चार दूतावास अफगाण मध्ये कार्यरत होते ,
तालिबान राजवटीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्याने व तालिबान विरोधक गटाला भारताचा असल्याने तेथे विमान गेल्यावर डाव पाकिस्तानच्या हातात गेला ,
ह्यावरून एक महत्त्वाचा धडा भारत शिकला
तो म्हणजे अफगाण मध्ये कोणतीही सत्ता असली तरी तिच्याशी चांगले संबंध ठेवून पाकिस्तानला ह्या भूमीचा भारताच्या विरोधात वापर करू द्यायचा नाही ,
उद्या अमेरिका गेल्यावर तेथे जर तालिबान सत्तेवर आले तर त्यांच्याशी संबंध ठेवणे भारतच्या हिताचे आहे , कारण पाकिस्तान हा भरवशाचा साथीदार नाही हे तालिबान ला कळून आले आहे ,
भारतने अमेरिकेला लष्करी सहाय्य केले नाही व आपली भूमी लष्करी वापरासाठी दिली नाही , पाकिस्ताने दिली हे तालिबान ला ठाऊक आहे ,
भारताची अफगाण मध्ये भूमिका शांतता व विकास करण्यासाठी कटिबंध आहे हे तालिबान ला ठाऊक आहे , तेव्हा शक्तीचे संतुलन राखण्यास्तही तालिबान पाक व भारताशी चांगले संबंध ठेवण्याच्या दिशेने प्रयत्न करेन ,
भारत सुद्धा इराण व ज्यू राष्ट्राशी एकाच वेळी वेळी चांगले संबध ठेवून आहे.

प्यारे१'s picture

25 Mar 2013 - 5:29 pm | प्यारे१

>>>चार दूतावास

ऑऑऑऑऑ????
अरे प्यारे राजदूत असावं.
ऑऑऑऑ ????
एका देशात चार राजदूत????
चार राजदूत ?
अरे,स्टाफसकट असेल ते प्यारे.
माठच आहेस.
असो.

बाकी आपलं चालू द्या.

श्रीरंग_जोशी's picture

25 Mar 2013 - 6:01 pm | श्रीरंग_जोशी

एम्बसी एकच असते पण विविध शहरांत अधिक कॉन्स्युलेट्स असतील. कॉन्स्युलेट या शब्दाला मराठी प्रतिशब्द मलाही मिळत नाहीये. येथे कॉन्स्युलेट म्हणजे वाणिज्य दूतावास असे म्हंटले आहे.

बाकी निनाद यांचे या अपहरणानंतरच्या भारतीय अफगाण नितीचे विश्लेषण पटले.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 6:12 pm | श्रीगुरुजी

"माझ्या माहितीप्रमाणे तालिबान राजवटीत सुद्धा भारताचे चार दूतावास अफगाण मध्ये कार्यरत होते ,"

तालीबान राजवटीला पाकिस्तान व सौदी अरेबिया या दोनच देशांनी मान्यता दिली होती. इतर सर्व देशांनी त्या राजवटीला मान्यता न देता आपले दूतावास बंद केले होते. भारताची या राजवटीला मान्यता नव्हती व त्यामुळे तिथे भारताचा एकही दूतावास नव्हता. अफगाणिस्तानचा ९० टक्के भूभाग तालिबानच्या ताब्यात होता व उरलेल्या भागात (पंजशीर खोरे) धडाडीचा ताजिक नेता अहमदशहा मसूद याची सत्ता होती. भारत अहमदशहा मसूद शस्त्रास्त्रे व इतर मदत पुरवित होता. मसूदला ९/११ च्या दोन दिवस आधी ९/९ ला तालिबान्यांनी आत्मघातकी हल्ल्यात मारले होते.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 12:10 am | निनाद मुक्काम प...

माझी लिहिण्यात चूक झाली तालिबान राजवटीत नाही पण सध्या आपले चार दूतावास तेथे आहेत.

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2013 - 12:14 am | श्रीरंग_जोशी

काबूलमध्ये दूतावास (एम्बसी) आहे व कंदहार अन दोन इतर ठिकाणी वाणिज्य दुतावास (कॉन्स्युलेट्स) असतील.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 12:12 am | निनाद मुक्काम प...

माझी लिहिण्यात चूक झाली तालिबान राजवटीत नाही पण सध्या आपले चार दूतावास तेथे आहेत.

सूर्याजीपंत's picture

26 Mar 2013 - 7:29 am | सूर्याजीपंत

आपला Northen Alliance ला पाठींबा होता. त्याच्या अनेक नेत्यांपैकी एक महत्वाचा आणि प्रभावशाली नेता अहमदशाह मसूद होता, त्यालाच पंजशीर चा वाघ म्हणत. बाकीचे प्रभावी नेते म्हणजे अब्दुल रशीद दोस्तम आणि हमीद करझाई. त्यांच्या कबीलाई परंपरेप्रमाणे प्रत्येक नेता आपल्या आपल्या जमातीचे नेतृत्व करतो. पण माझ्या माहितीनुसार तिथेपण काही भारताचा अधिकृत तळ नव्हता. बाकी उत्तरेला अफगाणिस्थान पूर्व-सोविएत राष्ट्रांनी वेढलेला आहे, तिथे भारत प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होता. नवीन विचारसरणीच्या परराष्ट्रीय धोरणांचा हे यश आहे कि ताजिकिस्तान मधील फार्खोर येथे आपला पहिला लष्करी हवाई तळ आहे. तिथे एक मिग-२९ ची संपूर्ण sqaudron तैनात आहे. राजकीय वक्तव्य करायचा झालाच तर, वाजपेयी सरकारच्या काळात NAM धोरणात आणलेल्या मुलभूत वैचारिक बदलाचे हे फलित आहे. लष्करी दृष्टीने बोलायचं झालाच तर, देव न करो, पण अशीच वेळ जर का परत आली, तर आपला प्रतिसाद हा नक्कीच वेगळा असेल.

मालोजीराव's picture

25 Mar 2013 - 5:32 pm | मालोजीराव

विकीपेडिया वर वाचली माहिती मोदका… एकदम जबरा ऑपरेशन तडीस नेलं…

somali pirate

२०११ मध्ये ह्या गोंडस ६१ सोमाली पायरेट्स वर भारतीय नौदलाने केलेली कारवाई पण जबराच होती

बंडा मामा's picture

25 Mar 2013 - 6:51 pm | बंडा मामा

कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला. कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे.

कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला.

मान्य - अवांतर झाले आहे परंतु ते धागा काढला त्यावेळी माहेरच्या अव्हेरावरती दिलेले प्रतिसाद होते. मला या घटनांविषयी अधिक माहिती नसल्याने "स्वपार्टीसमर्थक" इथे थोडा प्रकाश टाकतील अशी अपेक्षा होती! (ह.घ्या.)

एंटबेचा उल्लेख आला कारण अनेकदा तपशीलातील चुका बर्‍याच गोष्टींना वेगळे वळण लावतात...

उदा लाल टोपी यांचा हा प्रतिसाद.

ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता

ही वस्तुस्थिती नाहीये, आणि हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.

कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे.

काँग्रेस वाईट आहे आणि भाजपा स्वच्छ आहे असे मी म्हणालो आहे का..? हे तुमचे मत असेल तर माझी काहीच हरकत नाही. तुम्ही भाजपाला वाईट म्हणाला आणि काँग्रेसला चांगले म्हणाला तरीही माझी हरकत नाही. ;-)

बंडा मामा's picture

27 Mar 2013 - 8:08 pm | बंडा मामा

कॉग्रेसने केलेली चूक लक्षात आल्याने काही विशिष्ट सदस्य मौनव्रतामध्ये गेले असावेत असा माझा अंदाज.

ह्या टिप्पण्या इथे अनावश्यक होता. त्यातुन तुम्हाला कंदाहरवर चर्चा करायची नसुन काँग्रेसच्या चुका दाखवयच्या आहेत असा समज होतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 1:37 am | निनाद मुक्काम प...

गुरुजी फार पूर्वी पाकिस्तानी चर्चा सत्र तू नळीवर ऐकले होते तेव्हा भारतावर पाकिस्तान च्या सीमेवर अफगाणिस्तान भारत अनेक दूतावास उघडून तेथे रॉ चे हस्तक प्रशिक्षित अतिरेक्यांना पाकिस्तानात सोडत आहेत त्यांचा रोख तेहेरीके तालिबान वर होता , ह्याला उद्देशून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की हे चूक आहे ,भारताचे फक्त चार दूतावास असून त्यातील काही तर तालिबानी राजवटीत सुद्धा होते ,
माझ्या डोक्यात तो मुद्दा बसला होता ,

विशेष प्रवासी

ह्या अतिरेक्यांनी जी अफाट खंडणीची मागणी केली होती ती एकरकमी एका चेक वर देऊ शकले असा एक प्रवासी त्या विमानाच्या बिसनेस क्लास मध्ये उपस्थित होता ,ह्याची जर सुद्धा कल्पना त्या दहशतवाद्यांना नव्हती,
जगभरातील करन्सी प्रिंटींग चा ९० टक्के व्यवसाय ताब्यात असलेला हा प्रवाशाचे नाव
होते De La Rue Giori
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले हिंदूइजम म्हणजे काय ह्याची मला अजिबात कल्पना नाही पण ह्या १० दिवसात ह्या परिस्थितीस शांतपणे सामोरे गेले.
हे पाहून मी थक्क झालो , मी कल्पना केली ह्यांच्या जागी फ्रेंच व इटालियन प्रवासी असते तर ह्या परिस्थितीत काय केले असते ,

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

26 Mar 2013 - 1:39 am | निनाद मुक्काम प...

गुरुजी फार पूर्वी पाकिस्तानी चर्चा सत्र तू नळीवर ऐकले होते तेव्हा भारतावर पाकिस्तान च्या सीमेवर अफगाणिस्तान भारत अनेक दूतावास उघडून तेथे रॉ चे हस्तक प्रशिक्षित अतिरेक्यांना पाकिस्तानात सोडत आहेत त्यांचा रोख तेहेरीके तालिबान वर होता , ह्याला उद्देशून एक वरिष्ठ अधिकारी म्हणाला की हे चूक आहे ,भारताचे फक्त चार दूतावास असून त्यातील काही तर तालिबानी राजवटीत सुद्धा होते ,
माझ्या डोक्यात तो मुद्दा बसला होता ,

विशेष प्रवासी

ह्या अतिरेक्यांनी जी अफाट खंडणीची मागणी केली होती ती एकरकमी एका चेक वर देऊ शकले असा एक प्रवासी त्या विमानाच्या बिसनेस क्लास मध्ये उपस्थित होता ,ह्याची जर सुद्धा कल्पना त्या दहशतवाद्यांना नव्हती,
जगभरातील करन्सी प्रिंटींग चा ९० टक्के व्यवसाय ताब्यात असलेला हा प्रवाशाचे नाव
होते De La Rue Giori
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले हिंदूइजम म्हणजे काय ह्याची मला अजिबात कल्पना नाही पण ह्या १० दिवसात ज्या रीत्या ह्या परिस्थितीस शांतपणे सामोरे गेले.
हे पाहून मी थक्क झालो , मी कल्पना केली ह्यांच्या जागी फ्रेंच व इटालियन प्रवासी असते तर ह्या परिस्थितीत काय केले असते ,

श्रीरंग_जोशी's picture

26 Mar 2013 - 1:52 am | श्रीरंग_जोशी

या प्रवाशाच्या व्यवसायाबद्दल अतिरेक्यांना किंवा त्यांच्या सुत्रधारांना काहीच माहिती नसणे हे आपले नशिबच म्हणायचे.

नाहीतर वाटाघाटींमध्ये त्यांचे पारडे अधिकच जड झाले असते. अर्थात त्या व्यक्तिचे प्रसिद्धीपासून लांब राहणे यावेळी उपयोगी ठरले.

बेभान's picture

4 Apr 2013 - 9:57 am | बेभान

९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही? हा मुद्दापण या चर्चेत यायला हवा. प्रत्येकवेळेस "सरकार"ला जबाबदार ठरविण्याऐवजी, जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता. कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे. देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती.
नाना पाटेकरचे दिव्य शब्द : इथे
http://www.youtube.com/watch?v=u-DNavQ5l9w

९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही?

युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी अपहरणाची बातमी देण्यासाठी आपापल्या कुटुंबीयांना मोबाईलवरून कॉल केले तेंव्हा त्यांना ९/११ बद्दल समजले. म्हणजेच त्यांना माहिती होते की ट्वीन टॉवर्स वर विमाने धडकली आहेत व आपणही असेच कुठेतरी आदळणार आहोत. अपहरण झाल्यानंतर युनायटेड ९३ काही मिनिटे अत्यंत कमी उंचीवरून उडत होते व युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी बदललेला रूट फ्लाईट अटेंडंट्सच्या मदतीने "गेस" केला होता.

या सर्व घटनांची परिणीती "मृत्यू निश्चित आहे" या धारणेत झाली व त्यामुळे जिवावर उदार होवून प्रवाशांनी कॉकपीटवर हल्ला केला असावा. त्या सर्व प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे व्हाईट हाऊस / कॅपीटल बिल्डींग शाबूत राहिली असे म्हणायला हरकत नाही.

अवांतर - ९/११ च्या घटनेमध्ये बहुतांश विमानांमध्ये अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना फारसा उपद्रव न करता सरळ कॉकपीटवर हल्ला करून तेच ताब्यात घेतले होते व स्वतःला तिथे कोंडून घेवून विमाने लक्ष्यांवर धडकवली! यामुळे "नक्की काय चालले आहे" हे अनेक प्रवाशांना लक्षात आले नसावे

अतीअवांतर - होलोकॉस्टमध्ये कैद्यांना जाणीवपूर्वक "मृत्यू निश्चित आहे" या भावनेची जाणीव करून दिली नव्हती. "जिवंत राहण्याची आशा" अशा घटनांमध्ये परिस्थिती आणि प्रतिकाराच्या मनस्थितीवर प्रभाव टाकत असावी. :-(

जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता.

तुमच्या भावना समजू शकतो परंतु अपहरणकर्त्यांनी रूपेन कट्याल ला भोसकून आणि मारहाण करून दिलेला मृत्यू दहशत बसवण्यास पुरेसा असावा असे वाटते.

कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे.

हा गैरसमज आहे - प्रतिकाराची एखादी घटना इतक्या टोकाची दहशत बसवू शकत नाही. (असे मला वाटते!)

देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती.

पास.

***********
इतिहास बदलणे, देशाची प्रतिमा उंचावणे वगैरे गोष्टी माझ्या"नंतर" घडणार असल्याने अशा घटनांमध्ये "नंतर" फॅक्टर निर्णायक ठरत असावा.

बेल बॉटम चित्रपटाची कथा कोणत्या अपहरण प्रकारणाशी निगडित आहे