तेरी कौनसी है मंझील

विकास's picture
विकास in काथ्याकूट
22 Mar 2013 - 3:46 am
गाभा: 

"बीस साल बाद" या चित्रपटातील "कही दीप जले कही दिल" या अवीट गोडीने म्हणलेल्या पण गुढ गाण्यात गायीका आणि चित्रपटातील नायीका, वीस वर्षां नंतर परदेशातून गावी आलेल्या नायकाला सावध करताना त्याला "तेरी कौनसी है मंझील" म्हणत असते.

आज अचानक हे आठवायचे कारण म्हणजे यंदाच्या १२ मार्च ला मुंबईतील साखळी बाँबस्फोटांना वीस वर्षे झाली आणि वीस वर्षांनंतर आजच्या (मार्च २१) दिवशी त्या स्फोटातील आरोपींना अखेर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा दिली... प्रामाणिकपणे म्हणायचे झाले, तर एक सामान्य व्यक्ती म्हणून आज त्या प्रसंगाची तिव्रता कालाच्या ओघात कमी झाली खरी, पण १२ मार्च म्हणले की १३ डिसेंबर, २६ नोव्हेंबर प्रमाणेच आठवते आणि त्या तारखेस कुठेतरी ठसठसते.

वास्तवीक आज सर्वोच्च न्यायालयाने त्यावर शिक्कामोर्तब केला. त्यात जसे न्यायाधिशांनी त्यातील प्रत्यक्ष आरोपींना जबाबदार धरले, त्यांच्यातील ज्यांना पकडले गेले त्यांना योग्यच शिक्षा केल्या. योग्य म्हणायचे कारण इतकेच की सरसकट प्रत्येकास अंतिम जबाबदार न धरता, त्यातील प्यादी कोण आणि वझीर कोण यात फरक करत फाशी पासून तुरूंगवासापर्यंत शिक्षा दिल्या गेल्या. त्यात मुन्नाभाई पण आला... वास्तवीक संजय दत्तला सहा वर्षांची शिक्षा कमी करून पाच वर्षे दिली गेली. त्यातही त्याने आधीच दिड वर्षाचा कारावास भोगलेला असल्याने, आता केवळ साडे तीन वर्षेच तुरूंगात जावे लागणार आहे. त्याची चूक नक्कीच झाली आणि त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली हे देखील जरी चांगले झाले असले, तरी देखील वाईट वाटले... शिक्षा मिळाली म्हणून नाही, पण असंगाशी संग करण्याची त्याला दुर्बुद्धी त्यावेळेस झाली म्हणून. किमान या निर्णयातून बॉलीवूड, टिव्ही मालीका, खेळाडू वगैरे जे कोणी लोकप्रिय होत, आपण काही करू शकू या संभ्रमात रहाणार नाहीत अशी आशा करूयात.

पण १९९३च्या मुंबई बाँबस्फोटांचा विचार केल्यास गेल्या वीस वर्षांत नक्की काय काय झाले हे पाहीले तर काय दिसते? - फक्त मुंबईचाच विचार केल्यास विकीवरील माहितीप्रमाणे:

12 March 1993 - Series of 13 bombs go off, killing 257
6 December 2002 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 2
27 January 2003 - Bomb goes off on a bicycle in Vile Parle, killing 1
14 March 2003 - Bomb goes off in a train in Mulund, killing 10
28 July 2003 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 4
25 August 2003 - Two Bombs go off in cars near the Gateway of India and
Zaveri Bazaar, killing 50
11 July 2006 - Series of seven bombs go off in trains, killing 209
26 November 2008 to 29 November 2008 - Coordinated series of attacks, killing at least 172.
13 July 2011 - Three coordinated bomb explosions at different locations, killing 26

त्या व्यतिरीक्त प्रमुख शहरांमधे (पुणे, हैदराबाद, बंगलोर, दिल्ली इत्यादी) येथे आणि महत्वांच्या स्थळांवर संसद, उच्च न्यायालय, आय आय एस, अक्षरधाम मंदीर येथे झालेले अनेक हल्ले. त्याव्यतिरीक्त काश्मीर मधले हल्ले तर विचारायलाच नकोत... सर्वोच्च न्यायालयाने आज निकालात पाकीस्तानच्या आय एस आय वर देखील ठपका ठेवला आहे. ते आय एस आय ह्यातील बहुतांशी हल्ल्यात सामील होते असे म्हणता येईल.

आज खरेच सर्वोच्चा न्यायालयाने निकाल दिला म्हणून त्यासाठी खरेच अथक प्रयत्न करणार्‍यांचे केवळ आभार मानायचे का उशीरा मिळालेला न्याय हा एका अर्थी अन्याय असतो म्हणून आणि या सर्व प्रसंगातून काहीच न शिकलेल्या आपल्या राज्यकर्त्यांना, राजकारण्यांना आणि शासकांना लक्षात घेत खंत बाळगायची?

म्हणून मग प्रश्न पडतो... आपण नक्की काय शिकलो आहोत? आपण नक्की कुठल्या मार्गावर जात आहोत? या प्रश्नाने सतावलेले असताना एका वेगळ्याच अर्थाने "बीस साल बाद" मधील "तेरी कौनसी है मंझील..." या ओळी आठवतात.

प्रतिक्रिया

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2013 - 3:58 am | निनाद मुक्काम प...

आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी.
हे नगमा व संजय वर चित्रित झालेल्या गाण्याचे शब्द आजच्या घडीला खरे ठरले.

आर्थर रोड जामिनावर सुटलेल्या संजय दत्त ला म्हणत होता.
आखिर ,तुम्हे आना हे जरा देर लगेगी.
त्याने आता डोंगरी ,नागपाडा ह्या भागातून खासदार की ला तुरुगांतून २०१४ ला उभे राहावे , तुरुंगातून खासदारकी लढवणारे हमखास विजयी होतात. हे युपी मधील अनेक खासदार पहिले तर सहज लक्षात येईल.
साडेतीन वर्ष शिक्षा त्यात चांगली वर्तणूक केली म्हणून अर्धा महिना कमी ( हे गृहीत धरायचे
म्हणजे फारतर फार ३ वर्ष आत गेला.
किंवा गेला बाजारभाव वैद्यकीय कारणे दाखवून वातानुकुलीत इस्पितळात भरती
व्हायचे. पण जर चुकून माकून असे काहीही न होता संजय ने त्याची सर्व शिक्षा तुरुंगात घालवली , तर तुरुंगात राडे कमी होतील , मुन्ना भाई आता तेथे गांधीगिरी वर प्रवचन देतील.

संजू बाबाला शिक्षा सुनावली. वाईट वाटले . असो

कायदयापुढ़े सर्वजन समान ...... हा संदेश

लेखन समयोचित आहे. फार काय बोलायचे? पैलतीरावरचे जे त्यातून शिकले आहेत ते वेगवेगळे आधुनिक मार्ग जास्तीतजास्त क्रूरपणे हाताळत आहेत. ऐलतिरावरच्यांना काही बोलावे तर कितपत फरक पडेल हे आपण पाहतोच आहोत. तमाम जनतेला धारेवर धरल्याने वाईट अवस्था झालीये. आपण काही शिकलोय असे निदान वरवर पाहता वाटत तरी नाही. खूप बारकाईने विचार केला नाहीये मी तरी असे म्हणते.

चौकटराजा's picture

22 Mar 2013 - 7:17 am | चौकटराजा

आळस, अहंकार , अज्ञान, अंधश्रद्धा व असंग हे पाच "अ" माणसाचे शत्रू असतात. त्यातील एकालाही जवळ केले तरी आपला सर्वनाश करण्यासाठी दुसरे चार लगेच त्याच्या मदतीला धावून येतात. आपल्या सोसायटीत एखादा असंग असेल तर व आळसाने त्याला फोफावू दिले की तो सगळ्या गोष्टी नासवतो याचा अनुभव अनेकाना त्यांच्या इथे आला असेल. शक्यतो अशांची संगत टाळणे हे तर आपण करू शकतो. संजय दत्त ने हे केले असते तर ..........? साडेतीन वर्षे कशीही निघून जातील. या चुकीचे परिमार्जन म्हणून उर्वरित आयुष्यात त्याने सिनेमात कामे बंद करून समाज हिताला वाहून घेतले तर..? त्याच्या हातूनही कदाचित एखादे रामायण लिहिले जाईल.

आदूबाळ's picture

22 Mar 2013 - 12:15 pm | आदूबाळ

__/\__

टाळ्यांचा कडकडाट...

चौकटराजा's picture

24 Mar 2013 - 8:12 am | चौकटराजा

अशाच अर्थाचे एक पत्र साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा. रा ग जाधव यानी आजच्या रविवारच्या मटा मधे लिहिले आहे.

नितिन थत्ते's picture

22 Mar 2013 - 10:17 am | नितिन थत्ते

>>आपल्या सोसायटीत एखादा असंग असेल तर व आळसाने त्याला फोफावू दिले की तो सगळ्या गोष्टी नासवतो याचा अनुभव अनेकाना त्यांच्या इथे आला असेल. शक्यतो अशांची संगत टाळणे हे तर आपण करू शकतो. संजय दत्त ने हे केले असते तर ..........?

सहमत आहे. ६ डिसेंबर ९२ च्या मागेपुढे पण अशाच असंगाला फोफावू दिले नसते तर......?

विकास's picture

22 Mar 2013 - 4:47 pm | विकास

६ डिसेंबर ९२ च्या मागेपुढे पण अशाच असंगाला फोफावू दिले नसते तर......?

खरेच आहे. ६ डिसेंबर ९२ हा परीणाम होता, असंगास दिलेली प्रतिक्रीया होती, कारण नव्हते... आपल्या देशाला दोन मुख्य असंगांनी पछाडले होते आणि अजूनही आहे. शासनकर्त्याने केलेले धर्माधारीत लांगूलचालन तथाकथीत विचारवंत आणि तथाकथीत स्युडोसेक्यूलर्स यांनी आधी तयार करून आणि नंतर खदखदत ठेवलेला बहुसंख्यांकांचा धर्माधारीत द्वेष. त्यात जेंव्हा अरूंधती रॉय सारखी तथाकथीत विचारवंत येते तेंव्हा तो द्वेष केवळ बहुसंख्यांकांचा धर्मापुरता मर्यादीत रहात नाही तर देशाचाच द्वेष होऊ लागतो. असो.

बाकी दहशतवादाच्या घडलेल्या घटना म्हणजे - जे आडात होते तेच पोहर्‍यात आले, ते येणारच होते. त्याचा इतर कुठल्याही घटनांशी संबंध नाही. दुर्दैवाने आपण त्याकडे अजूनही डोळेझाक करत आहोत.

६ डिसेंबर ९२ व्यतिरिक्त किती तारखा तुम्हाला चटकन लक्षात येतात?
जो ढाचा पाडला गेला तिथे नेमक्या कसल्या प्रार्थना कधीपासून कधीपर्यंत होत होत्या?
मुळात बंद असणारे ते स्थळ कुणी उघडले? कशासाठी? नेमक्या वेळीच असे मतपरिवर्तन का झालं?

एकानं गाय मारली म्हणून दुसर्‍यानं वासरु मारु नये, गाय मारणाराला मारावं किमान हात तोडावा.

बंडा मामा's picture

22 Mar 2013 - 6:24 pm | बंडा मामा

ढाचा पडणे ही गोष्ट तात्कलिक असली तरी त्यानंतर झालेल्या दंगली आणि मुसलमानांचे खच्चीकरण ह्यातुन मेमन सारख्या खुनशी लोकांना नैतिक पाठबळ मिळाले ज्यामुळे स्फोट घडवुन आणले. ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट पाहिला नसल्यास तो जरुर पाहावा. मेमन सारखे लोक अशा घातक कारवाया करण्यात का यशस्वी होतात ह्याचे खूप सुंदर विश्लेषण दिले आहे. श्रीकॄष्ण आयोगाला साफ धुडकावुन लावुन उलट त्यात ठपका ठेवलेल्या पोलिस अधिकार्‍यांना नंतर बढ्त्या देण्यात आल्या. अशावेळेस प्रचंड असुरक्षीतता निर्माण होते आणि ज्याचे मूळ ६ डिसेंबर मधे आहे.

इतक्या मोठ्या घटनेचा दुसर्‍याबाजुने विचार करणे कठीण जाते आपण भावनिक होतो हे ही खरे आहे.

विकास's picture

22 Mar 2013 - 7:16 pm | विकास

मुसलमानांचे खच्चीकरण ह्यातुन मेमन सारख्या खुनशी लोकांना नैतिक पाठबळ मिळाले ज्यामुळे स्फोट घडवुन आणले.

यातून असा अर्थ निघतो की भारतातील तमाम मुसलमानांनी मेमन आदींना पाठबळ दिले. मी याच्याशी पूर्ण असहमत आहे. भारतातील संपूर्ण मुसलमान समाजच काय पण त्यातील अशा कारवायांना पाठींबा देणारे टक्केवारीत मोजायलाच गेलात तर अतिशय कमी असतील, असेच मला वाटते. - मग ते ६ डिसेंबरला प्रतिक्रीया म्हणून पाहीलेत तरी, काश्मीर पाहीलेत तरी अथवा इतर काही असले तरी.

६ डिसेंबरच्या आधी देखील मेमन तसाच होता आणि दाऊद देखील तसाच होता. त्यांचा आय एस आय आणि त्यांनी आय एस आयचा पूर्ण फायदा घेत भारत आणि मुंबई/मुंबई पोलीसांवरील खुन्नस काढला. हे होणारच होते. त्याचा काही ६ डिसेंबरशी संबंध नाही. पण स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे जे काही राजकारणातील प्यादे म्हणून वापर केला, आणि त्यांना दुखावले तर दुष्परीणाम होतील अशी भिती तयार करत त्यांना समाजात समरस होऊन दिले गेले नाही. त्याची ही विषारी फळे आहेत. त्याचा परीणाम म्हणून सामान्य अल्पसंख्यांक, विशेष करून मुस्लीम समाज अतीसामान्य झाला हे त्यांचे खर्‍या अर्थी दुर्दैव आणि त्यातील लबाड, खुनशी म्होरके मात्र त्याचा गैरवापर करत सर्व गुन्हे करू लागले आणि सामान्यांमधील असहाय्य तरूणांना स्वतःकडे खेचून घेऊ लागले. दाऊद, मेमन आदी हे याचाच "अँटीक्लायमॅक्स" आहेत...

चिरोटा's picture

22 Mar 2013 - 7:47 pm | चिरोटा

त्यांचा आय एस आय आणि त्यांनी आय एस आयचा पूर्ण फायदा घेत भारत आणि मुंबई/मुंबई पोलीसांवरील खुन्नस काढला

६ डिसेंबर नंतर मुंबईत ज्या दंगली झाल्या त्याचा खुन्नस काढला गेला. वास्तविक दाउदचे साम्राज्य फोफावले ते मुंबई पोलिसांच्या,राज्यपातळीवरील पुढार्‍यांच्या जोरावर. अशा लोकांवर खुन्नस काढण्याचे दाउदला कारण नव्हते.स्फोटांनतरही दाउदचे/शकीलचे मुंबई गुन्हेगारी जगतात,बॉलिवूडवर नियंत्रण असल्याचे दिसून येते.

बंडा मामा's picture

22 Mar 2013 - 8:03 pm | बंडा मामा

भारतातील तमाम मुसलमानांनी पाठबळ दिले असे मीही लिहिलेले नाही. मुसलमान तरुणांना खवळवण्यासाठी मेमनला हत्यार मिळाले.

हे होणारच होते. त्याचा काही ६ डिसेंबरशी संबंध नाही.

मेमन आणि दाउद हे आधीही गुन्हेगार होते. मेमन चांदिची स्मगलिंग करायचा पण अतिरेकी कारवाया तो आधी करत नव्हता. ६ डीसेंबर नंतरच्या दंगलीत त्याचे माहिमचे ऑफिसही जाळले होते. त्यानंतर ह्यांनी बदला घेण्यासाठी हल्ले झाले हे सर्वज्ञात आहे. तुम्ही ब्लॅक फ्रायडे हा चित्रपट पाहिला नसल्यास जरुर पाहावा.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2013 - 8:51 pm | श्रीगुरुजी

"६ डिसेंबरच्या आधी देखील मेमन तसाच होता आणि दाऊद देखील तसाच होता. त्यांचा आय एस आय आणि त्यांनी आय एस आयचा पूर्ण फायदा घेत भारत आणि मुंबई/मुंबई पोलीसांवरील खुन्नस काढला. हे होणारच होते. त्याचा काही ६ डिसेंबरशी संबंध नाही. "

सहमत. १९८८ साली रशियाने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यावर पाकिस्तानने प्रशिक्षित केलेले अफगाण व पाक मुजाहिद बेकार झाले होते. त्यांना हाताशी धरून पाकिस्तानने १९८९ पासून काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया सुरू केल्या होत्या. आज ना उद्या दाऊद, टायगर मेमन इ. त्यांना सामील झाले असतेच. ६ डिसेंबरचे केवळ निमित्त झाले. ६ डिसेंबर झाले नसते तरी दाऊद कंपनीने घातपाती कारवाया केल्याच असत्या.

पाकिस्तानला घातपाती कारवायांसाठी "काश्मिर प्रश्न" हे कारण १९९२ पर्यंत पुरले, १९९२ पासून २००२ पर्यंत पाकिस्तान "६ डिसेंबर" हे कारण वापरत होता आणि २००२ पासून पाकिस्तान "गुजरात" हे कारण वापरून भारतात अतिरेकी कारवाया करत आहे. भविष्यात नवीन कारणाचे निमित्त करून पाकिस्तान अतिरेकी कारवाया सुरूच ठेवील. "६ डिसेंबर" व "गुजरात" झाले नसते तर भारतात अतिरेकी हल्ले झालेच नसते असा भारतातल्या निधर्मांधांचा भाबडा गैरसमज आहे. "६ डिसेंबर" व "गुजरात" झाले नसते तरी "काश्मिर" हे कारण वापरून अतिरेकी कारवाया झाल्याच असत्या.

बंडा मामा's picture

23 Mar 2013 - 7:30 pm | बंडा मामा

म्हणजेच पाकिस्तानी लोकांना घातपाती कारवाया करण्यास आपल्या लोकांची डोकी भडकवण्यासाठी ६ डिसेंबर, गुजरात अशी कारणे हवी असतात. जी आपण त्यांना वरचेवर पुरवत असतो.

एकट्या काश्मिर कारणावरुन इतका घातपात शक्य नव्हता. काश्मिर वरुन मुंबईमधे कधीच स्फोट झाले नव्हते, कोकणात आरर्डीएक्स उतरवले गेले नव्हते. ६ डिसेंबरने ते करणे सहज शक्य केले. ६ डिसेंबर झाले नसते तर कोकणात इतक्या घाऊक प्रमाणात आर्डीएक्स कधीच उतरले नसते. हा भाबडा गैरसमज नसुन प्रॅक्टिकल थिंकिंग आहे. दाऊद वगैरे मंडळी स्मगलिंग, ड्र्ग्ज, खंडणी ह्यामधे मश्गुल होती. त्यांना अतिरेकी कारवाया करण्यास प्रवॄत्त अशा घटनांनी केले. तुम्ही सत्य घटनांवर आधारीत ब्लॅक फ्राय्डे हा सिनेमा पाहा त्यात हे सगळे दाखवले आहे.

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2013 - 8:15 pm | श्रीगुरुजी

तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. ६ डिसेंबर झाले नसते तरी मुम्बई किंवा तसले प्रकरण झालेच असते. १९८९ पासून पाकिस्तानने भारतात अतिरेकी कारवाया सुरू केल्या कारण रशियाने १९८८ मध्ये अफगाणिस्तानमधून माघार घेतल्याने प्रशिक्षित मुजाहीद पाकिस्तानला घाऊक प्रमाणात उपलब्ध झाले. त्यांना पाकिस्तानने भारताकडे वळविले. "६ डिसेंबर" हे फक्त कांगावा करण्यासाठी कारण म्हणून वापरण्यात येते. तसे नसेल तर ६ डिसेंबर पूर्वी जे अतिरेकी हल्ले भारतात झाले त्यामागे कोणते कारण होते? आणि "२००२" झाले नसते तर "६ डिसेंबर" हेच कारण चालू ठेवून अतिरेकी कारवाया सुरूच ठेवल्या असत्या. "६ डिसेंबर" किंवा "गुजरात" यांचा व पाकिस्तानच्या कारवायांचा संबंध नाही. या घटना घडल्या नसत्या तरी पाकिस्तानने अतिरेकी कारवाया थांबविल्या नसत्या.

बंडा मामा's picture

23 Mar 2013 - 9:38 pm | बंडा मामा

६ डिसेंबर झाले नसते तर पुढचे अघटित झालेच नसते असे माझे म्हणणे नाही. ६ डिसेंबर (आणि त्यानंतरच्या दंगली) ह्यामुळे अतिरेकी कारवाया सहज शक्य होण्यास मदत झाली. ६ डिसेंबर झाले नसते तर पाकिस्तनला मुजाहिदिन लोकांच्या बंदुका आणि आर्डीएक्स भारतात पाठवणे सहज शक्य झाले नसते. अशा कारवायांसाठी लोकल लेवलला सपोर्ट महत्चाचा असतो जो मिळवण्यासाठी स्थानिक लोकांच्या भावनेला हात घालावा लागतो. काश्मिर किंवा इतर जुनी कारणे त्यात तितकी उपयोगी पड्त नाहीत. ६ डिसेंबरच्या दंगलींमुळे हे करण्यात पाकिस्तनला मदत झाली हेच तुम्हाला मान्य नसेल तर वी अग्री टू डिसग्री.

अर्धवटराव's picture

23 Mar 2013 - 11:50 pm | अर्धवटराव

आझाद मैदानावर जे काहि झालं त्यामागे तर ६ डिसेंबर वा गुजरात कांड नव्हते ना? तिथे बहाणा मिळाला आसामच्या सो कॉल्ड मुस्लीम त्रासाचा. म्हणजे बांग्लादेशी घुसखोर आसाम मधे येणार, तिथल्या स्थानीक जनतेवर शिरजोर होणार, त्याविरुद्ध जनमत पेटलं तर हे लोक मुंबईमधे दंगल करणार, व घुसखोर विरुद्ध स्थानीक अशा संघर्षाला "इस्लाम खतरेमे है" चा नारा देऊन मुंबईकर मुस्लीम सपोर्ट करणार. (आझाद मैदान काण्ड हे शत्रु राष्ट्राने त्यांच्या न्युसन्स व्हॅल्युची टेस्ट म्हणुन घडवुन आणले असा माझा वैयक्तीक अंदाज आहे... तो भाग निराळा)

तात्पर्य असं, कि भारतात सो कॉल्ड अल्पसंख्यांकांविरुद्ध काहि घडो न घडो, भारताचे शत्रु काहि ना काहि निमीत्त करुन, तसे उपद्व्याप मुद्दाम घडवुन आणुन भारताला त्रास द्यायला तत्पर असतील. यात सर्वात प्रथम नुकसान कोणाचं होत असेल तर ते ही आपल्या मायनॉरीटीज् चं. ते बिचारे सगळीकडुन नागवले जातात.

अर्धवटराव

बंडा मामा's picture

24 Mar 2013 - 12:33 am | बंडा मामा

गुड पॉइंट...माझेही हेच म्हणणे आहे. आझाद मैदान आणि मुंबई बाँम्ब स्फोट ह्यामध्यला विध्वसांत कमालीची तफावत आहे. आसाम वगैरे रिमोट कारणे असली की तितके नुकसान करता येत नाही हेच ह्यातुन सिद्ध होते. लोकल लेवलला सपोर्ट मिळवुन मजबुत विध्वंस करायला ६ डीसेंबर नंतरच्या दंगलींसारखे मजबुत कारण लागते. ६ डिसेंबर झाले नसते तरी पाकिस्तानने काहितरी (आझाद मैदान सारख्या) कुरापती काढल्या असत्या पण इतके भिषण कृत्य करणे त्यांना कदाचित शक्य झाले नसते. हेच मला म्हणायचे होते. तुमच्या प्रतिसादाने तो पॉइंट चांगला मांडता आला. धन्यवाद.

विकास's picture

24 Mar 2013 - 6:35 am | विकास

६ डिसेंबर झाले नसते तरी पाकिस्तानने काहितरी (आझाद मैदान सारख्या) कुरापती काढल्या असत्या पण इतके भिषण कृत्य करणे त्यांना कदाचित शक्य झाले नसते.

२६ नोव्हेंबर २००७ च्या जवळ काहीच घडलेले नव्हते... शिवाय याच चर्चा/लेखात मुंबईत जे काही हल्ले झालेले दाखवले आहेत, त्याबाबत देखील तेच म्हणता येईल. तेच इतरत्र झालेल्या हल्ल्यांच्या बाबत देखील लागू आहे. दहशतवादाचा विषारी शाप हा आधीपासूनच पोसला गेला होता - जसा पाकीस्ताननेन पोसला, तसाच भारतातील राजकारण्यांनी केला. फरक इतकाच भारतात जे पोसत होते त्यांना त्याची जाणीव नव्हती, की देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दूरदॄष्टी नव्हती. त्यामुळे तो मोठा होत गेला. कधी ना कधी तरी तो बाहेर येणार होताच. त्याचेच लहानसे रूप हे पंजाब प्रश्नाच्या वेळेस दिसले आणि नंतर एलटीटीईचा प्रश्न देखील जसा चुकीच्या प्रकारे सोडवायचा प्रयत्न केला, त्यातून दिसले होते.

दहशतवाद्यांची आणि त्यांना पोसणार्‍या पाकीस्तानची हिंमत होत राहीली कारण आपण काही करू शकत नाही याची त्यांना खात्री होती... असो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Mar 2013 - 7:01 am | निनाद मुक्काम प...

ह्याच सोबत सत्ता मिळवण्यासाठी मंदिर वही बनायेंगे ,पर डेट नही बतायेंगे अशी शायनिंग इंडियाचे राजकारण केले नसते तरी सुद्धा पुढचे रामायण घडले नसते
ब्लेक फ्रायडे ह्या सिनेमात सत्य परिस्थिती मांडली आहे ,
अयोग्य मार्गाने सत्ता मिळवली व ती टिकवण्यासाठी अपरिहार्य तडजोडी केल्या ,
म्हणून जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली ,
आता तरी मोदी ह्यांच्या नेतृत्वाखाली विकास म्हणजे फक्त विकासाच्या मुद्यावर
निवडणूक लढवली तरच भाजपला सत्ता दिसेल ,
सध्या निवडणुकीच्या वर्षभर आधी काही लोकंना परत राम मंदिरांचे भरते येत आहे ,
ह्या देशात लोकांना प्यायचे पाणी नसले तरी चालेल पण ह्यांना मंदिर हवे.

अर्धवटराव's picture

24 Mar 2013 - 10:02 am | अर्धवटराव
थोड्याफार कुरापती काढुन त्रास देणे,इन्स्टेबल करणे, इतका सौम्य हेतु नाहि शत्रुचा. शक्य झाल्यास मुळावर उठायचय त्याला. शत्रुची तयारी त्या दिशेने सुरु आहे. आपण त्याला अगदी शुण्य चान्स दिला तरी त्यात १०० जोडायची शर्थ करेल शत्रु. अर्धवटराव
बंडा मामा's picture

24 Mar 2013 - 5:47 pm | बंडा मामा

अहो असं काय करता..हेतू त्यांचा सौम्य नाहीच आहे. मी कुठे म्हणालो की त्यांचा हेतू सौम्य आहे? पण कार्य सिद्धीस नेण्यास आपण काही प्रमाणात चान्स द्यावा लागतो. ६ डिसेंबर दंगली सारखे उत्प्रेरक मिळाल्यास उत्तम होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Mar 2013 - 5:18 pm | llपुण्याचे पेशवेll

६ डिसेंबर, काश्मिर वगैरे छाटछूट कारणे आहेत. खरी लढाई दिल्लीसाठीच आहे. बाकीचांनी राममंदीत, गुजरात्,वगैरे टुमणी चालू ठेवावीत.

श्रीगुरुजी's picture

25 Mar 2013 - 2:27 pm | श्रीगुरुजी

"आझाद मैदानावर जे काहि झालं त्यामागे तर ६ डिसेंबर वा गुजरात कांड नव्हते ना? तिथे बहाणा मिळाला आसामच्या सो कॉल्ड मुस्लीम त्रासाचा. "

६ डिसेंबर किंवा गुजरात हे केवळ निमित्त म्हणून वापरले जाते. ही निमित्ते नसती तर कोणतीतरी दुसरी निमित्ते वापरली असती.

१९२१ मध्ये इंग्रजांनी तुर्कस्तानचा खलिफा बरखास्त केल्यावर इथल्या मुस्लिमांनी दंगली केल्या होत्या, नंतर १९६० च्या दशकात इराणी सैनिकांनी मक्का शहरात प्रवेश केल्यावर भारतात दंगली झाल्या, इस्राएलने पॅलेस्टाईन बळकावले म्हणूण भारतातल्या ज्यूंवर हल्ले, १९९१ मध्ये अमेरिकेने इराकवर आक्रमण केल्यावर दिल्ली, मालेगाव इ. ठिकाणी मोर्चे निघाले, २०१२ मध्ये बर्मामध्ये बौद्ध्-मुस्लिम यांच्यात दंगली झाल्यावर मुस्लिमांनी मुम्बईत दंगल केली . . . एकंदरीत कोणते तरी कारण पुढे करून दंगल करणे हा मुख्य हेतू आणि दंगलीला देशातील किंवा स्थानिक कारण लागतेच असे नाही. जगाच्या कानाकोपर्‍यात कोठेही काहीही झाले तरी लगेच भारतात दंगाधोपा करायचा. त्यामुळे ६ डिसेंबर, अफझल गुरूची फाशी, काश्मिर किंवा गुजरात झाले नसते तरी दंगली मात्र अपरिहार्य होत्या.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2013 - 9:25 pm | श्रीगुरुजी

"६ डिसेंबर झाले नसते तर पाकिस्तनला मुजाहिदिन लोकांच्या बंदुका आणि आर्डीएक्स भारतात पाठवणे सहज शक्य झाले नसते. "

रशियाने १९८८ मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर तिथे लढणारे मुजाहिद बेकार झाले होते. भारताला रणभूमीवर हरविणे अशक्य असल्याचे झिया उल हकने ओळखले होते. मुजाहिंदांचा वापर करून घेण्याची त्याने "ऑपरेशन टोपॅक" या नावाने योजना बनविली होती. या योजनेनुसार भारताबरोबर युद्ध करण्यापेक्षा शस्त्रे व दारूगोळा देऊन मुजाहिदांना पाठविणे व तिथे अतिरेकी हल्ले करून भारताला जखमी करणे ही ती योजना होती. याआधी पंजाबी अतिरेक्यांना दिलेली मदत व त्याचे यश त्याच्या डोळ्यापुढे होते. अशाच कारवाया मुजाहिद पाठवून करायच्या व काश्मिरचा घास घ्यायचा. काश्मिर घेणे जमले नाही तर निदान भारताला रक्तबंबाळ करता येईल असा त्याचा हेतू होता.

भारतात मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवाया १९८९ मध्ये सुरू झाल्या हा योगायोग नाही. ६ डिसेंबर झाले असते किंवा नसते तरी अतिरेकी कारवाया झाल्याच असत्या.

पिंपातला उंदीर's picture

24 Mar 2013 - 9:28 pm | पिंपातला उंदीर

जे करण्यात ज़ीया अपयशी झाले ते यशस्वी करण्यात वाजपेयी सरकारने वाटा उचलला. कारगिल युद्धात एक महत्वाचे शिखर गमावून.

श्रीगुरुजी's picture

24 Mar 2013 - 9:35 pm | श्रीगुरुजी

राहवत नाही म्हणून बोलतो. १९४८ व १९६२ मध्ये भारताने मूर्खपणामुळे किती लाख किलोमीटर भूमी गमावली आहे याची कल्पना आहे का?

पिंपातला उंदीर's picture

24 Mar 2013 - 9:47 pm | पिंपातला उंदीर

मग १९७१ आणि १९६५ चे श्रेय पण कॉंग्रेस ला देताय का ?

अर्धवटराव's picture

24 Mar 2013 - 10:08 pm | अर्धवटराव

किंबहुना इंदीरा गांधीने केलेली बांग्लादेश निर्मीती हि आपली आजवरची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कामगिरी असावी. याच कामगिरीला एका जाहिर सभेत "गांधी कुटुंबाचे वैयक्तीक यश" संबोधुन राहुलने शेण फासले.

अर्धवटराव

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Mar 2013 - 7:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''स्वातंत्र्यानंतर राज्यकर्त्यांनी अल्पसंख्यांकांचे जे काही राजकारणातील प्यादे म्हणून वापर केला, आणि त्यांना दुखावले तर दुष्परीणाम होतील अशी भिती तयार करत त्यांना समाजात समरस होऊन दिले गेले नाही. त्याची ही विषारी फळे आहेत. त्याचा परीणाम म्हणून सामान्य अल्पसंख्यांक, विशेष करून मुस्लीम समाज अतीसामान्य झाला हे त्यांचे खर्‍या अर्थी दुर्दैव आणि त्यातील लबाड, खुनशी म्होरके मात्र त्याचा गैरवापर करत सर्व गुन्हे करू लागले आणि सामान्यांमधील असहाय्य तरूणांना स्वतःकडे खेचून घेऊ लागले''

सहमत.

-दिलीप बिरुटे

तर्री's picture

22 Mar 2013 - 6:46 pm | तर्री

शहाबनो प्रकरण व मिझोरम ला "ख्रिश्चन राज्य " म्हणणे हे असंग झाले नसते तर प्राणाची गाठ पडली नसती.

श्रीगुरुजी's picture

22 Mar 2013 - 8:39 pm | श्रीगुरुजी

>>> सहमत आहे. ६ डिसेंबर ९२ च्या मागेपुढे पण अशाच असंगाला फोफावू दिले नसते तर......?

खरं तर १९४७ च्या आसपास एका मोठ्या असंगाला भारतात सर्वत्र फोफावू दिलं नसतं तर भारताची आजची दयनीय अवस्था झाली नसती.

बंडा मामा's picture

23 Mar 2013 - 7:32 pm | बंडा मामा

हे म्हणजे महा विस्फोट झाला नसता तर हे विश्वच उदयाला आले नसते आणि ह्यातले काहीच झाले नसते असे म्हणण्यासारखे आहे.

मराठी_माणूस's picture

22 Mar 2013 - 8:38 pm | मराठी_माणूस

संजय दत्त ला शि़क्षा झाली म्हणुन वाइट वाटले हे वाचुन धक्का बसला. त्याला आपण काय करतोय ह्याची पुर्ण जाणीव होती. सहानभुती वाटली पाहीजे त्यांच्याबद्दल , ज्यांचा ह्यात वापर केला गेला, ज्याना आपण काय करतोय हेच माहीत नव्हते. जे जेल मधे सडले आणि अजुन सडणार आहेत. सहानुभुती वाटली पाहीजे त्यांच्या कूटूंबाबद्दल. स्फोटात म्रुत्यमुखी पडलेल्यांच्या आप्तस्वकीया बद्दल.

विकास's picture

22 Mar 2013 - 8:43 pm | विकास

संजय दत्त ला शि़क्षा झाली म्हणुन वाइट वाटले असे नक्की कोण म्हणतयं? माझे मूळ लेखातील वाक्य परत खाली चिकटवत आहे. त्यातील संबंधीत गोष्टी ठळक केल्या आहेत.

"त्याची चूक नक्कीच झाली आणि त्यामुळे त्याला शिक्षा मिळाली हे देखील जरी चांगले झाले असले, तरी देखील वाईट वाटले... शिक्षा मिळाली म्हणून नाही, पण असंगाशी संग करण्याची त्याला दुर्बुद्धी त्यावेळेस झाली म्हणून."

विकास's picture

22 Mar 2013 - 10:43 pm | विकास

अजून आतपण नाही गेला आणि त्याच्या आत संजय दत्तला दिलासा मिळणार? अशी बातमी झळकली देखील...

गंमत म्हणजे सुप्रिम कोर्टात केस देखील होऊ न शकलेल्या मोदींना जे भूतपूर्व न्यायमुर्ती काट्जू, अजूनही दोषी ठरवत आहेत, तेच काट्जू त्याच सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या संजय दत्तला माफी मिळावी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे अर्ज करत आहेत आणि "या प्रकरणाची केंद्र सरकार योग्य वेळी दखल घेईल", असे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी म्हणले आहे!

काट्जूंचे पत्र करमणूक म्हणून मुळातूनच वाचण्यासारखे आहे...

कुणालातरी लवकरच राज्यसभेत खासदारकी मिळणार असे दिसतयं! :-)

पुष्करिणी's picture

22 Mar 2013 - 11:07 pm | पुष्करिणी

सर्वात भारी म्हण्जे काटजू टिव्हीवर म्हणत होते की 'संजय दत्तने मुन्नाभाई सिनेमाद्वारे गांधीजींच्या तत्वांचा समाजात प्रसार केला, हे कार्यही त्याच्या माफीसाठी विचारात घेतलं जावं'

प्यारे१'s picture

22 Mar 2013 - 11:48 pm | प्यारे१

असं एक व्यक्ती जिनं न्यायव्यवस्थेतल एक अत्यंत महत्त्वाचं पद भूषवलेलं आहे ती म्हणू शकते???????

काटजूंना कॉमेडीयन ऑफ द इयर साठी नॉमिनेट करावं काय?
इथेही मोठी लिस्ट आहे अर्थात.
दिग्विजय,राहुल,आसाराम, ह्यांच्या बरोबर टफ फाईट आहे राव!

अभ्या..'s picture

22 Mar 2013 - 11:21 pm | अभ्या..

एखाद्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आणि निकालाची खात्री नसताना पुढील ५-६ वर्षासाठी चित्रपटाचे करार करणे योग्य की अयोग्य? (संजय दत्तने पण आणि निर्मात्यांनी पण)
काहीतरी करुन सुटू शकेल म्हणून पैसा गुंतवला जातो की गुंतवलेल्या पैशासाठी सुटकेचे प्रयत्न चालू आहेत?

चौकटराजा's picture

23 Mar 2013 - 9:39 am | चौकटराजा

आता या दुरदैवी घटनेला फार काळ लोटला असल्याने नीट आठवत नाही. मुंबई बोम्बस्फोट व संजय दत्त ने शस्त्र ख्ररीदणे यात दुवा काय आहे. की ज्यामुळे त्याला यात सहआरोपी केले गेले आहे ? जर दुवा असेल तर त्याला इतकी कमी शिक्षा का" व नसेल तर त्याला वेगळा बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचा खटला का केला नाही ????

श्रीगुरुजी's picture

23 Mar 2013 - 7:24 pm | श्रीगुरुजी

"गंमत म्हणजे सुप्रिम कोर्टात केस देखील होऊ न शकलेल्या मोदींना जे भूतपूर्व न्यायमुर्ती काट्जू, अजूनही दोषी ठरवत आहेत, तेच काट्जू त्याच सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवलेल्या संजय दत्तला माफी मिळावी म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे अर्ज करत आहेत "

काटजू आणि त्यांच्यासारख्या निधर्मांधांचं तर्कशास्त्र व्यक्ती व तिच्या धर्माप्रमाणे बदलण्याइतकं लवचिक आहे.

उदा.
अफझल गुरू - न्यायालयाने दोषी ठरविले तरी यांच्या दृष्टीने तो निर्दोष
मोदी - न्यायालयाने निर्दोष ठरविले तरी यांच्या दृष्टीने तो दोषी

काटजु हे सध्या दिग्विजय, लालू, सिब्बल, मनीष तिवारी इ. ची जागा भरून काढत आहेत.

बंडा मामा's picture

23 Mar 2013 - 7:33 pm | बंडा मामा

काटजू आणि त्यांच्यासारख्या निधर्मांधांचं तर्कशास्त्र व्यक्ती व तिच्या धर्माप्रमाणे बदलण्याइतकं लवचिक आहे.

अहो पण संजय दत्तही हिंदूच आहे की. व्यक्तिच्या धर्माप्रमाणे त्यांचे मत असते तर मोदींना जो न्याय तोच संजूलाही दिला असता.

प्रदीप's picture

23 Mar 2013 - 7:44 pm | प्रदीप

ह्यांचा उल्लेख आलाच आहे,तर इथे पहावे

चिगो's picture

22 Mar 2013 - 11:35 pm | चिगो

संजुबाबाला वाचवण्याचे वकीलपत्र घेतलेले लोक जे काही तारे तोडताहेत, ते लै मजेशीर आहे ब्वाॅ.. काल जया बच्चन बाईंचा तडफडाट पाहीला.. यंव रे यंव ! खुप सहन केलंय म्हणे त्यानं.. :-O काटजु साहेबांबद्दल बर्यापैकी आदर होता, त्यांचे विचार पटायचेही. पण संजुबाबाच्या केसमध्ये हसं करुन घेतलं त्यांनी.. मला जी एक गोष्ट अजुनही कळत नाही ती ही, की धोका वाटतंच होता तर तो पोलीसांकडे का गेला नाही किंवा कायदेशीर हत्यार का घेतलं नाही? नाही म्हणजे, फिल्मस्टार खासदाराच्या फिल्मस्टार पोराला काही हलक्यात घेतलं नसतं पोलिसांनी..
बाकी, न्युजचॅनल्सच्या चर्चा बघून 'सम आर मोर इक्वल्स' हे पटलं..

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Mar 2013 - 12:42 am | निनाद मुक्काम प...

अतिरेक्यांशी लढणार्‍या मुंबई पोलिसांच्या हातात काठ्या
व ह्याच्या हातात एके फोर्टी सेवेन
काय तर म्हणे वडिलांना दंगलीनंतर धमक्या येत हो त्या, म्हणून स्वसंरक्षणार्थ
ही बंदूक मागून घेतली होती.
आयुष्य म्हणजे काय तुझा शिणेमा आहे का
की २० पंचवीस जणांच्या झुंडी वर तू एकटा बंदूक घेऊन वन मेन शो करणार तुरुंगातून बाहेर आल्यावर ह्याचे शकील सोबत दोस्ताना कायम राहिला होता , व त्यांच्या
संभाषणाची क्लिप मुंबई पोलिसांच्या हाती लागली. ह्यात नंगा म्हणजे बहुदा सलमान खान असावा.

पैसा's picture

23 Mar 2013 - 6:04 pm | पैसा

ही सगळी बॉम्बस्फोट आणि हल्ल्यांची मालिका आठवता आपण एक देश, समाज म्हणून इतिहासातून काहीच शिकत नाही हे पुन्हा पुन्हा सिद्ध होते. बॉम्बस्फोटात नकळत शहीद झालेल्यांना पुन्हा एकदा श्रद्धांजली आणि त्यात आम्ही नव्हतो याबद्दल देवाचे आभार. :(

फिल्मस्टार्स, त्यांचे गुन्हेगार आणि देशद्रोह्यांशी संबंध ही सगळी उघडी गुपिते आहेत. त्यांच्यातल्या वयाने पन्नाशीत पोचले तरी बाबा आणि बेबी राहिलेल्यांबद्दल आम्ही पामरांनी काय बोलावे? :(

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

24 Mar 2013 - 6:23 am | निनाद मुक्काम प...

https://fbcdn-sphotos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-ash3/550057_10151413626918071_1358348621_n.jpg

Zanjeer, a golden labrador, saved thousands of lives
during the serial bomb blasts in the city in March 1993 by
detecting more than 3,329 kgs of the explosive RDX, 600
detonators, 249 hand grenades and 6406 rounds of live
ammunition. He was buried with full honours during a
ceremony attended by senior police officials.
A senior police officer lays a floral wreath on Mumbai's
most famous dog Zanjeer....
सौजन्य
Indian Army Fans's
ह्या मुक्या प्राण्याने अनेक निर्दोष लोकांचे प्राण वाचवले ,
हा खरा हिरो ,
नाहीतर हे पडद्यावरचे हिरो दुबई ला जाऊन दाउद च्या पार्टीत नाचकाम करणार

हुप्प्या's picture

24 Mar 2013 - 9:11 pm | हुप्प्या

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19162698.cms

काँग्रेस पक्षाचा मेंदू अशी ज्यांची ख्याती आहे असे दिग्विजय सिंग म्हणत आहेत की भगव्या अतिरेक्यांच्या भीतीने केवळ स्वसंरक्षणाकरता म्हणून अशी मोठी मोठी हत्यारे बाळगायला बिच्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्च्चार्‍या संजूबाळाला भाग पडले. त्यात त्याची काय बी मिष्टिक नाही. सगळी चूक त्या दहशतवादी भगव्यांची आहे. त्या हरामखोरांना फाशी देऊन अहिंसाधर्मी, सेवाव्रती, निर्व्यसनी, निधर्मी संजूबाळाला माफी द्यावी आणि जमल्यास पद्मश्री वगैरे देऊन पापक्षालन करावे असेही सुचवले जाईल.

पिंपातला उंदीर's picture

24 Mar 2013 - 9:24 pm | पिंपातला उंदीर

असेच काहीसे मत माजी हिंदू सम्राट यानी व्यक्त केले होते. इत्क्यावरच न थांबता त्यानी त्याची त्यावेळेस सुटका होण्यात सक्रिय वाटा उचलला होता. त्याच्यावर पण काही बोला की

हुप्प्या's picture

24 Mar 2013 - 11:35 pm | हुप्प्या

हे लिहिताना "दारू म्हणजे काय?" लेखावर आधारित प्रात्यक्षिके/प्रयोग चालू होते काय?
स्व. सेनाप्रमुखांनी संजय दत्तने हिंदू दहशतवादापासून संरक्षण व्हावे म्हणून घातक शस्त्रे बाळगली आणि ते योग्यच होते असे मत व्यक्त केल्याचे मला तरी आठवत नाही. मात्र त्यांची अन्य मते बघता ते हिंदू दहशतवादाकडे तुम्ही वा दिग्विजयसिंग ह्यांच्या दृष्टीकोनातून बघत असतील असे वाटत नाही.
संजय दत्त, पिता व अन्य कुटुंबियांना घेऊन सेनाप्रमुखांकडे गेला. तिथे त्यांच्या पाया पडून, गयावया करून वा अन्य अर्थपूर्ण आर्जवे करुन त्यांच्याकडून माफी घेतली. हे खरे असावे. त्या काळात संजय दत्तच्या सिनेमांवर बंदी, बहिष्कार घालावा असे काही विचार चालू होते त्यावर उपाय म्ह्णून थेट बाळासाहेबांची भेट घेतली गेली असावी.
पण संजय दत्तने तुरुंगातच जाऊ नये असे मत ठाकर्‍यांनी व्यक्त केल्याचे मी वाचलेले नाही. आपली माहिती वेगळी असल्यास खुलासा करावा.

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 8:48 am | पिंपातला उंदीर

But only when Sunil Dutt pleaded with his mightiest political rival Bal Thackeray, chief of the then ruling party Shiv Sena, Thackeray championed for Sanjay and wrote to the Supreme Court. A letter from Sanjay to the prison authorities was generously reinterpreted into a petition for mercy and for bail. On October 16, 1993, the Supreme Court decided that, as the TADA Act required evidences for the culprits' intentions, Sanjay's confession would not be enough to keep him in detention as long as the CBI provided no other evidence against Sanjay, and therefore he was granted bail.

http://www.sanjay-dutt.info/17.html

हुप्प्या's picture

25 Mar 2013 - 10:35 pm | हुप्प्या

ठाकर्‍यांनी संजय दत्तला माफी मिळावी म्हणून प्रयत्न केले का नाही हा कळीचा मुद्दा नाही. दिग्विजय साहेबांनी असा शोध लावला की मुस्लिमांकरता भक्कम काम केल्यामुळे काही लोक (म्हणजे अर्थातच हिंदुत्ववादी) त्याचा सूड घ्यायला टपलेले होते आणि हा मी दिलेल्या बातमीतील एकमेव कळीचा मुद्दा आहे. आपण असा दावा केला होतात की बाळासाहेबांचे मत असेच होते वगैरे. ह्या बिनबुडाच्या दाव्याला मी आव्हान दिले होते. वर आपण दिलेल्या उतार्यात आपल्या दाव्याच्या जवळपास जाणारे देखील काही नाही.
आणि हो, थोरल्या ठाकर्‍यांनी एकदा चूक केली म्हणून आता कायम सगळ्यांनी तोच कित्ता गिरवावा हा आग्रह का बरे?

अद्द्या's picture

25 Mar 2013 - 3:00 pm | अद्द्या

तुमचं इंग्रजी कच्चं आहे कि मराठी ?

CBI provided no other evidence against Sanjay, and therefore he was granted bail.
असं आहे

कुठे हि "हिंदू दहशतवाद्यांपासून संरक्षण म्हणून हत्यारे ठेवणे योग्य" असं नाही .

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 8:42 pm | पिंपातला उंदीर

माझ इंग्रजी किंवा हिंदी कस आहे ते आपण नंतर पाहु. पण तुमची आकलन क्षमता किती कमी आहे हे आपण नीट मी कुठल्या मुद्द्यावर प्रतिसाद आहे ते बघितले तर कळेल. हिंदू दहशतवाद कुठे आला यात? तुमची आकलन क्षमता कमी आहे म्हणून काही पण टंकायच का राव. बाळासाहेबानी संजू बाबाला कसे आपल्या पदराआद घेतले हे दाखवायला ती लिंक दिली होती मी. बाकी आकलन क्षमता वाढवा एवढेच

पैसा's picture

25 Mar 2013 - 5:26 pm | पैसा

http://www.indianexpress.com/news/sanjay-dutt-did-more-than-just-keep-a-...

इथे मुंबई पोलीस काय सांगत आहेत बघा!

नितिन थत्ते's picture

25 Mar 2013 - 6:30 pm | नितिन थत्ते

पोलीस हे आपणहून सांगत आहेत की राजकीय पाठबळाच्या जोरावर सांगत आहेत?

पैसा's picture

25 Mar 2013 - 11:23 pm | पैसा

पण मुंबई पोलिसाना महाराष्ट्र सरकारातून कोण पाठबळ देणार संजूबाबाची कृत्ये उघड्यावर आणा म्हणून?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

25 Mar 2013 - 6:18 pm | निनाद मुक्काम प...

संजय दत्त ह्यांच्यावर दहशतवादी कृत्यांचा ठपका पुराव्यानिशी असल्याने त्याला इतकी वर्ष जमीन मिळत नव्हता ,
अचानक चक्र फिरली , खासदारकीचे घोडे नाचवल्या गेले ,
काही कागदपत्रे अंतर्धान पावली , संजू बाहेर आला , व पुढे दहशतवादी हा ठपका त्यांच्यावरून निघाला व आता ५ वर्षाची साधी शिक्षा झाली , नाहीतर आताआतापर्यंत
तुरुंगात सडला असता ,
आता संजू बाबाला वाचवायला पितामह व पिताश्री ह्या जगात नाहीत ,
असे होणार आता ह्या कलियुगातील सुयोधनाचे
सलमान ने शकील सोबत तर अनिल चे दाउद सोबत फोटो प्रसिद्ध आहेत , पण गुन्हेगारीला प्रतिष्ठा मिळवून देण्यात तत्कालीन दशकात बेरोजगारी व इतर अनेक कारणे असल्याने नेहरूंचा समाज व आदर्श वाद धुळीस मिसळला ,
व कोणालाच काहीच वाटेनासे झाले ,
ज्यांच्याकडे पैसा व सत्ता त्यांच्या हातात कायदा हे चित्र अलीकडच्या काळात जरासे बदलत आहे हेच ह्या निकालावरून दिसून येते ,
बॉंब स्फोटातील जे आरोपी ह्याच्या सोबत बाहेर आले त्यांतील मोठे मासे छोटा राजन ने देश के गद्दार ह्या नात्याने उडवले ,
तुमचा दाउद तर आमचा अरुण ह्या विधानाला
आय एस आय चा दाउद तर आय बी चा छोटा राजन असे आंतरराष्ट्रीय परिमाण लाभले.
म्हणूनच की काय मांडवली खात्यात संजू बाबाने दीपक मामाचा ? छोटा राजन चा छोटा भाऊ दीपक निकाळजे चा सिनेमा स्वीकारला ,
हा वास्तववादी सिनेमा संजू बाबांच्या कारकिर्दीचा कळस साध्य ठरला.
ज्या काळात वडाला येथे सिनेमे पाहण्याची नवी क्रेझ चेंबूरच्या लोकांमध्ये रुजत होती जेथे बसंत व सहकार सारखी सिंगल स्क्रीन चे थिएतर मान टाकत होते तेथे
सहकारला म्हणजे टिळक नगरला राजन च्या बालेकिल्ल्यात हा घरचा सिनेमा विनामूल्य दाखवत होते ,
हा सिनेमा तेथे पाहायला गेलो होतो , तेव्हा जेव्हा संजू बाबांच्या दिवाळीच्या मुहूर्तावर
त्यांचे चाळीत आगमन होते ,
तेव्हा कारगिल वीराच्या थाटात त्यांचे थिएतर मध्ये शिट्या व टाळ्यांच्या कडकडाटात
स्वागत केले गेले , हे पाहून डोळे दिपले ,
पुढे सन एन सेंड मध्ये ह्या सिनेमाचे यश साजरे केले गेले , तेथे इंटर शिप करत असल्याने
ह्या सिनेमा एकदा आमच्या सहकार मध्ये येउन पहाच असा सल्ला मिळाला असल्यामुळे आम्ही हा अनुभव घेतला होता ,
आता येरवड्याला राडे कमी होणार तेथे संजूबाबा गांधीगिरी चे प्रवचन देईल जमल्यास याकुब मेनन सारखे एखादी पदवी घेईल ,
किंवा वैद्यकीय कारणे सांगून त्यांची सर्व शिक्षा वातानुकुलीत इस्पितळात घालवेल ,
किंवा जेल मधून डोंगरी ,नागपाडा किंवा उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवेल ,
जेल मधून निवडणूक लढल्याने कदाचित जिंकून सुद्धा येईल कारण त्याला बाहुबली लोकांचे आपसूकच समर्थन प्राप्त होईल ,
आता पुढे काय होते ते पाहणे मनोरंजक आहे ,
च्यायला ह्यांचा सुप्रीम कोर्टात वशिला चालला नाही ह्यांचे फार दुःख होत आहे ,

आजानुकर्ण's picture

25 Mar 2013 - 6:26 pm | आजानुकर्ण

संजय दत्त याला कोणत्याही राजकारण्याने काडीचीही दयामाया न दाखवता न्यायव्यवस्थेने दिलेल्या शिक्षेची निमूट अंमलबजावणी करावी असे वाटते. बाळासाहेब ठाकऱ्यांनी त्यावेळी चूक केली म्हणून आताच्या राजकारण्यांनीही तशीच चूक करावी हे योग्य नाही.

विकास's picture

25 Mar 2013 - 8:43 pm | विकास

पूर्ण सहमतीची सुवर्णसंधी घेत आहे. :-)

पिंपातला उंदीर's picture

25 Mar 2013 - 8:48 pm | पिंपातला उंदीर

बाळासाहेब संघाचे नवते म्हणून का? हलके ह्या : )

विकास's picture

25 Mar 2013 - 9:02 pm | विकास

आम्ही हलक्या कानाचे नाही. त्यामुळे हलके घेत नाही. :-)

जर कुठे चूक वाटली तर तसे बोलायला कमीपणा पण वाटत नाही. बाळासाहेबांचा मुद्दा हा संजय दत्तला निर्दोष सोडण्यासाठी नव्हता तर त्याला टाडाच्या अंतर्गत खटला न चालवता तुरूंगात खितपत ठेवण्यात होता, जो त्यांचामुद्दा हा साध्वी प्रज्ञासिंग यांच्या बाबततीत देखील होता आणि इतरांचा आहे. तरी देखील, तुम्हाला आवडो अथवा तुम्ही नुसता बोटे मोडत द्वेषकरत नावडो, बाळासाहेब हे अनेकांचे दैवत होते, अनेक जण त्यांना राजकारणी नेतॄत्व देखील मानायचे. अशा नेत्याने असे व्यक्तीगत मैत्रितून कुणाची कितीही योग्य कारण असले, तरी सुटका करायला लावू नये असे मला वाटते. त्यामुळे एक नेतृत्व म्हणून अशी मागणी चूक वाटते...

तरी देखील, बाळासाहेबांकडून या संदर्भात जरी चूक झाली असली तरी त्याच्यात केवळ सुनील दत्त यांची एक जागा मिळवणे इतकेच नसावे. नाहीतर नंतर प्रिया दत्तसाठी त्यांनी शिवसेनेची जागा सोडली नसती. थोडक्यात हे व्होटबँक पॉलीटीक्स म्हणून दुर्लक्ष करत केलेली अक्षम्य चूक नव्हती जी काँग्रेसने एक पॉलीसी म्हणून अनेक वर्षे केली असे म्हणावे लागेल....

कवितानागेश's picture

25 Mar 2013 - 11:48 pm | कवितानागेश

अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही! :)