भारताच्या सर्वोच्चपदावर दीर्घकाळ विराजमान असणार्या महात्यागी, महाबुद्धीमान, महातेजस्वी राजमाता सोनियाजींचे माहेर इटलीचे हे आपल्याला आठवत असेलच.
काही दिवसांपूर्वी इटलीच्या दोन सैनिकांना निरपराध भारतीय कोळ्यांवर गोळीबार करुन त्यांची हत्या केल्याच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनुसार या सैनिकांना चार आठवड्यांसाठी मायदेशात जाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही सुटी संपल्यानंतर त्यांनी खटल्याचे कामकाज सुरु ठेवण्यासाठी परतणे अपेक्षित होते. मात्र आता इटालियन सरकारने हे सैनिक भारतात येणार नाहीत हे जाहीर केले आहे.
नेहमीच्या नेभळट परंपरेनुसार इथेही आपल्या इज्जतीचे मुस्काट फुटले आहे.
मात्र महाराणींच्या माहेरचा घोटाळा असल्याने प्रश्न प्रतिष्ठेचा बनू शकतो. त्यामुळे शक्य तितके प्रयत्न करून भारत सरकार काखा वर करणार असे दिसते आहे. क्वात्रोचीजींचे आणि हेलिकॉप्टर घोटाळ्याचे उदाहरण ताजे आहे.
मागेही तंत्रज्ञानक्रांतीसूर्य राजीवजींच्या कारकीर्दीत ह्याच देशाने निकृष्ट हेलिकॉप्टरे भारताच्या गळ्यात मारली आणि नंतर ती नगण्य भावात विकली गेली. पण ते प्रकरणही दडपले गेले असावे.
जय सोनियाजी!
http://www.thehindubusinessline.com/news/italian-marines-wont-return-to-...
-हुय्या
प्रतिक्रिया
22 Mar 2013 - 6:09 pm | आजानुकर्ण
पूर्णपणे सहमत. इटालियन सरकारला एक इटालियन व्यक्ती भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखपदावर ठेवण्यासाठी या दोन सैनिकांचे बलिदान देण्यास काहीही हरकत नाही हेच यातून दिसते. कसाब, अफजलची फाशी आणि आता घडलेले हे प्रकरण यामुळे मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता वाढली आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भावी पंतप्रधान सुषमा स्वराज यांच्याबरोबरच भावी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांचा भ्रमनिरास होऊ शकतो. जनतेने काँग्रेस करत असलेले अल्पसंख्याकांचे लांगूलचालन आणि मोठमोठे भ्रष्टाचाराचे खटले न विसरता राष्ट्रवादी पक्षांना मतदान करावे.
- श्रीहेडमास्तर
22 Mar 2013 - 9:04 am | पिंपातला उंदीर
कारगिल च्या वेळेस शवपेटी भ्रष्टाचार झाला होता असे काही देशद्रोही लोक बोलतात
22 Mar 2013 - 9:24 am | विकास
भ्रष्टाचार हा भ्रष्टाचारच, कोणी केला महत्वाचे नाही. त्या मुळे तो पण उघडकीस आणून शिक्षा केली पाहीजे. जर त्या वेळच्या सरकारने योग्य पावले उचलली नसली तर ते सरकार गेल्यावर, गेल्या ८ वर्षात या सरकारने का उचलली नाहीत हे पहायला हवे. तसे त्या वेळेस ओरडणारे नंतर का गप्प झाले हे देखील पाहीले पाहीजे.
22 Mar 2013 - 12:20 pm | श्रीगुरुजी
>>> जर त्या वेळच्या सरकारने योग्य पावले उचलली नसली तर ते सरकार गेल्यावर, गेल्या ८ वर्षात या सरकारने का उचलली नाहीत हे पहायला हवे. तसे त्या वेळेस ओरडणारे नंतर का गप्प झाले हे देखील पाहीले पाहीजे.
जर त्या प्रकरणात थोडा भ्रष्टाचार जरी झाला असला तर त्याविरूद्ध पावले नक्कीच उचलली असती. मुळात तो आरोप हा निवडणुकीच्या प्रचारसभेतला होता व तो धादांत खोटा होता हे आरोप करणार्यांना नक्कीच माहिती होते. त्यामुळे निवडणुक संपून सत्ता हातात आल्यावर आरोप करणारे आपोआपच गप्प झाले, अन्यथा त्यांचे पितळ उघडे पडले असते.
22 Mar 2013 - 7:22 pm | अर्धवटराव
एन. डी. ए. ची सत्ता गेल्यावर जॉर्ज फर्णॅण्डीस ने प्रणवदादांना विनंती करुन सत्य शोधुन काढायला पाठपुरावा केला होता .... पण मुळात भ्रष्टाचार झालाच नव्हता तर सापडणार काय.
अर्धवटराव
22 Mar 2013 - 12:25 pm | श्रीगुरुजी
"कारगिल च्या वेळेस शवपेटी भ्रष्टाचार झाला होता असे काही देशद्रोही लोक बोलतात "
या आरोपांचा कोणत्याही तपास संस्थेतर्फे तपास करून गुन्हा दाखल करा(अगदी काँग्रेस ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन तर्फे तपास केला तरी हरकत नव्हती) असे आव्हान दिले गेले तेव्हा आरोप करणार्यांची दातखिळ बसली आणि ती आजतगायत उचकटलेली नाही. निवडणुकीच्या प्रचारसभेत वाटेल तेवढे खोटेनाटे आरोप केले जातात व अशा आरोपांना निवडणुक संपल्यावर काडीचीही किंमत नसते.
24 Mar 2013 - 9:16 pm | पिंपातला उंदीर
मग वाजपेयी सरकारला बोफोर्स प्रकरण तडीस नेण्याची किंवा राम मंदिर बांधण्याची सुवर्नसंधी होती की? ती त्यानी वाया का घातली हे जाणून घेण्यास आवडेल. उलट त्याकाळात ज्या सुखरााम यांच्यावर खूप टीका केली त्यांचा पाठिंबा घेण्यात भाजपेयी नि धन्यता मानली
24 Mar 2013 - 9:32 pm | श्रीगुरुजी
बोफोर्स प्रकरणातला मुख्य आरोपी क्वाट्रोची हा काँग्रेसच्या सहकार्याने भारताबाहेर पळून गेला होता. १९९८ मध्ये वाजपेयी सत्तेवर आल्यानंतरच त्याच्यावर इंटरपोल तर्फे वॉरंट जारी झाले व त्याची लंडनमधली खाती गोठविली गेली. त्यामुळेच तो १९९९ मध्ये मलेशियात पकडला गेला. मलेशिया व भारत यांच्या गुन्हेगार हस्तांतरण करार नसल्याने मलेशियाने त्याला भारताच्या हवाली केले नाही पण इंटरपोलच्या दबावामुळे त्याला मलेशियातून सोडलेही नाही. त्याला हस्तगत करण्यासाठी भारताने मलेशियाच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. पण त्याचा निकाल क्वाट्रोचीच्या बाजूने लागल्याने तो मलेशियातूनही निसटला.
त्यानंतर २००५ मध्ये त्याला अर्जेंटिनात पकडण्यात आले. ही बातमी मनमोहन सिंग सरकारने गुप्त ठेवली व न्यायालयाला याची माहिती दिली नाही. शेवटी ही बातमी बाहेर फुटल्यावर भारत सरकारने त्याच्या हस्तांतरणासाठी फारसे प्रयत्न केलेच नाहीत व तो तिथूनही सुटला. नंतर काही महिन्यातच त्याची लंडनमधली खाती भारताच्या विनंतीवरून मुक्त झाली व त्यातले ४० लाख डॉलर्स त्याने काही मिनिटातच काढून घेतले. नंतर काँग्रेसने त्याच्यावरील खटलाही काढून टाकला.
केवळ वाजपेयी सरकारच्या प्रयत्नामुळेच त्याला आडकाठी घालण्याचे प्रयत्न झाले होते पण त्याच्या काँग्रेसमधील हितचिंतकांमुळे तो सहीसलामत सुटला.
24 Mar 2013 - 9:43 pm | निनाद मुक्काम प...
भष्टाचार दोन्ही सरकारच्या काळात झाले ,
वाजपेयी सरकारने भष्टाचार मुक्त घोटाळा मुक्त ५ वर्षांचे सरकार जे भारतातील मध्यम वर्गाला अपेक्षित होते ते करू शकले नाही , महाराष्ट्रात युती च्या काळात सुद्धा घोटाळे झाले ,
थोडक्यात दोन्ही पक्षात झोलर आहेत ,
कुलकर्णी हे भाजपाचे महत्वाचे सल्लागार त्यांनी एका कार्यक्रमात आमच्या पक्षात
बेशिस्तपणा व भष्टाचार ह्यांना पक्षातून घालवणे हे प्रमुख उदिष्ट असल्याचे सांगितले आहे ,
मोदींच्या राजवटीत घोटाळे कानावर आले नाही , विरोधी बाकडे बडवणारे व झारीतील शुक्राचार्यांनी मोदी ह्यांच्या दिल्ली आगमनाला हात दाखवून अवलक्षण करू नये असे मनापासून वाटते. कृपया ह्या निवडणुकीत राममंदिराचा मुद्दा काढू नयेत
देशाला इस्पितळे व शाळा ह्यांची जास्त गरज आहे.
विकास व विकास ह्या एका मुद्द्यावर बोलावे. जे मोदी बोलत आहेत. बाकीच्यांनी मम म्हणावे
एवढेच त्यांच्या हाती उरले आहे.
गुरुजी चला बरे एका सुरात म्हणूया
एका बार दिलसे ,,,,,,,,,,,,,,
24 Mar 2013 - 9:43 pm | पिंपातला उंदीर
आता सरकार भाजप चे आणि कॉंग्रेस सत्तधारी पक्षापेक्षा पण ताकदवान. मग सत्तेवर याआयचेच नाही. विरोधिपक्ष म्हणूंच राहायचे. उद्या म्हणाल भाजप सरकार सत्तेवर असताना राम मंदिर कॉंग्रेस मुळे बान्धता आले. कारगिल युद्धात महत्वाचे शिखर कॉंग्रेस मुळेच आपण गमावले. कमाल करता राव
22 Mar 2013 - 2:43 pm | प्रदीप
* चावेजच्या कारकीर्दीत वेनेझुएलाचे तेल उत्पादन कमी झाले, तसेच तेथील गरीब- श्रीमंत दरी वाढली असे समजले जाते.
* सायप्रसच्या बँका आता गुडघ्यांवर रांगत आहेत, कधी कोसळतील हे पहायचे, असे काही लोक म्हणतात.
* चीनमध्ये माओच्या कारकीर्दीत प्रचंड दुष्काळात अनेकानेक माणसे मरण पावली, असे समजले जाते.
* सायप्रसच्या नैसर्गिक वायूसाठ्यांवर रशियाचा आता डोळा आहे, तेव्हा त्या छोट्या देशास मदत करण्याच्या मिषाने रशिया त्या साठ्यांवर हक्क मागेल, असे बोलले जाते.
*.....
*.....
*.....
......
इत्यादी. ही असंबंध यादी बरीच वाढवता येईल, सध्या इथे थांबतो.
हेही इथे लिहायचे कारण एकच-- इथल्या सर्वच चर्चांत अत्यंत टोकाची भूमिका घेता घेता तुम्ही केव्हाच रॅशनॅलिटीशी फारकत घेतली आहे. सुरूवातीस ते थोडे bemusing वाटले. आता ते irritating वाटू लागले आहे.
22 Mar 2013 - 3:57 pm | पुण्याचे वटवाघूळ
+१. पण अशाच लोकांना विचारवंत म्हणायची फॅशन आहे.
22 Mar 2013 - 4:01 pm | बॅटमॅन
किमानपक्षी मिपावरच्या मराठीत तरी विचारजंत असा एक अतिशय समर्पक शब्द आहे या लोकांसाठी. तोच वापरला तं उत्तम होईल :)
22 Mar 2013 - 9:11 pm | आजानुकर्ण
प्रस्तुत संकेतस्थळावर विचारजंत कोणास म्हटले जाते याची मुक्तसुनीत यांनी केलेली व्याख्या अशीः "कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाकडे संयत दृष्टीने वेध घेण्याच्या , त्या प्रश्नांचे स्वरूप समजून घेण्याच्या प्रवृत्तीला जेथे "विचारजंत" असे हिणवले जाते "
दुवाः http://www.misalpav.com/comment/213638#comment-213638
23 Mar 2013 - 2:32 pm | बॅटमॅन
असहमत. संतुलित आणि संयत विचार करणारे आणि एकच एक बाजू घेऊन भांडणारे यांत फरक आहे. ती बाजू संयत विचार करणार्यांची बाजू कधी कधी होत असल्याने माझी व्याख्या बाद ठरत नाही.
23 Mar 2013 - 3:35 pm | पिंपातला उंदीर
एक ठराविक बाजू घेऊन वाद करणारे लोक समंजस आआणी आपल्या मताच्या विरुद्द मत मांडणारे लोक विचारजंत असा दुटापपी पणा अनेक वेळा दिसून येतो.
23 Mar 2013 - 7:16 pm | बंडा मामा
एकच बाजू लावुन धरण्यात काही गैर नाही. श्रीगुरुजी ह्यांच्यासारखे सदस्य त्यांची बाजू चांगली लावुन धरतात. त्यातुन नविन माहितीही मिळते. त्यांना विचारजंत म्हणणे योग्य नाही.
22 Mar 2013 - 6:55 pm | प्रदीप
माझ्या (पक्षी: सर्वसाधारण [काहीजण त्याला सुमार म्हणतील बहुधा] विचारसरणी असलेल्या व्यक्तिसमूहातील एक व्यक्ति)विचारांच्या बरोब्बर विरूद्ध विचार व्यक्त करणारे अनेक सभासद मिसळपाववर आहेत, ह्याच धाग्यातही त्यांचा सहभाग आहे. पण हे सर्वच विषयाला धरून, माहितीपूर्ण प्रतिसाद देतात, त्यांच्याकडून मीही बरेच काही शिकलो आहे, शिकतो आहे. पण इथे नुसतेच काळे- पांढरे जग अध्याहृत धरून 'काळ्यां'ना, संबंध असो अथवा नसो, धोपटण्याचे प्रयत्न दिसतात. ते हास्यास्पद राहिलेले नाहीत, तर प्रत्येक सामाजिक विषयावरील चर्चेच्या दरम्यान केवळ अडथळे आणतात व म्हणून ते त्रासदायक होऊ लागले आहेत, असे मला वाटते.
22 Mar 2013 - 9:06 am | इरसाल
काँग्रेस ची हाजी हाजी करुन जितके प्रतिसाद मिळत नव्हते तितके छीथु करुन मिळाले(भले त्यासाठी स्टेटमेंट करायला दुसर्या आयडी सारखे स्वतःला कल्पुन घेतले)
22 Mar 2013 - 6:15 pm | आजानुकर्ण
भारतीय शेअर बाजार कोसळत असल्याने काही ना काही करून मिपावरील प्रतिसाद मिळवल्याने माझे मार्केट कॅपिटलाझेशन वाढून माझ्या एकंदर संपत्तीमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे काहीही करून मिपावर प्रतिसाद मिळवणे हे मी माझे जीवनध्येय ठरवले आहे.
ृ
-छत्रसाल
22 Mar 2013 - 9:40 pm | इरसाल
मला हे माहित नव्हते. स्वारी बरकां तसापण मी कोणाच्या पैश्यांवर जळत नाही.
राजा छत्रसाल. अस हवं होत राव.
22 Mar 2013 - 1:13 pm | श्रीगुरुजी
- केरळच्या न्यायालयाने या प्रकरणात सुरवातीपासून कडक भूमिका घेतलेली होती. त्या नौसैनिकांना या न्यायालयाने काही काळ तुरूंगात देखील ठेवले होते. नंतर त्यांना बाहेर आणून सरकारी विश्रामगृहात स्थानबद्ध करुन उपाहारगृहाचे जेवण पुरविण्यात आले. पण केंद्र सरकारच्या पाठिंब्याने या खटल्यात सरकारी पक्षाने एक विशिष्ट भूमिका मांडून खटला केरळ उच्च न्यायालयाच्या अखत्यारितून काढून घेऊन दिल्लीला हलविला.
- नंतर सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यासाठी विशेष न्यायालय स्थापण्याचा आदेश दिला असताना केंद्र सरकारने असा न्यायमंच स्थापना करण्यासाठी टाळाटाळ केली व भारतात या खटल्याला खूपच दिरंगाई होत आहे अशी ओरड करण्यास इटलीला वाव दिला.
- सर्वोच्च न्यायालयाने या आरोपींना देशाबाहेर जाण्यास परवानगी देऊन अभूतपूर्व निकाल दिला. पण या जामीनाला केंद्र सरकारच्या वकीलांनी विरोध केला नाही व जामीनासाठी ईटालियन राजदूताच्या लेखी आश्वासनाव्यतिरिक्त कोणतीही आर्थिक व दुसरी कोणतीही अट घातली नाही. ख्रिस्तमसच्या वेळी नौसैनिकांना जामीन देताना केरळ न्यायालयाने इतर अटींबरोबर रू. ६ कोटी इतकी मोठी बँक गॅरंटी मागितली होती. पण यावेळी अशी कोणतीही अट नव्हती. आपण कोणतेही लेखी आश्वासन दिले तरी राजदूताला असलेल्या कायदेशीर संरक्षणामुळे आपण आपोआप सुटु असा इटलीच्या राजदूताला विश्वास असावा. त्यामुळे त्याने बिनधास्त लेखी आश्वासन दिले. या राजदूताची केवळ ३ महिन्यांपूर्वीच भारतात नेमणूक झाली होती. इटलीच्या नौसैनिकांची सुटका करणे या एकमेव कामगिरीवर त्याला पाठविण्यात आले असावे. त्यामुळे भारताने खूप आरडाओरडा करून राजदूताची हकालपट्टी केली असती तरी त्याला इथून जाण्याचे अजिबात दु:ख झाले नसते कारण त्याला सोपविण्यात आलेले काम त्याने केले होते.
- भारताची सर्वत्र नाचक्की झाली असताना व इटलीची खेळी यशस्वी झालेली असताना नेमके सुब्रह्मण्यम स्वामी जागे झाले. त्यांनी तातडीने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करुन इटलीच्या राजदूताला देश सोडण्याची मनाई करावी अशी न्यायालयाला विनंती केली. आपल्या आज्ञेचे उल्लंघन झाल्यामुळे संतापलेल्या सर्वोच्च न्यायालयाने लगेचच इटलीच्या राजदूताला भारत सोडण्याची मनाई केली व त्यांना भारताबाहेर जाऊ देऊ नये असे केंद्र सरकारला आदेश दिले. "आपल्याला राजनैतिक संरक्षण आहे" हा इटलीच्या राजदूताचा दावा देखील न्यायालयाने अमान्य केला.
- न्यायालयाच्या या पवित्र्यामुळे इटली, भारताचे केंद्र सरकार व इटलीचे राजदूत यांची चांगलीच पंचाईत झाली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्याची हिंमत केंद्र सरकारात नव्हती, त्यामुळे मागील दाराने राजनैतिक बोलणी करून नौसैनिकांना परत पाठविण्याचे ठरले असावे.
- नौसैनिकांना परत पाठविताना इटलीने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामध्ये, त्यांचा खटला केरळमध्ये न चालविता दिल्लीत चालविला जाईल, त्यांना तुरूंगात न ठेवता विश्रामगृहात किंवा इटलीच्या दूतावासात ठेवले जाईल, त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही इ. अटी आहेत. अजूनही बाहेर न आलेल्या काही अटी असाव्यात.
- इटलीने आमचा आमचा विश्वासघात केला असा भारत खोटाखोटा गळा काढणार, मग भारत सरकार कडक (!) भूमिका घेऊन ईटलीच्या राजदूताची हकालपट्टी करणार, इटलीच्या राजदूताचे काम झाल्यामुळे तो आनंदाने परत जाणार, नौसैनिक आपल्या घरी मजेत राहणार . . . अशी विन-विन परिस्थिती योजली गेली असावी.
पण नौसैनिकांना सुखरूप सोडविण्याची युपीएची विन-विन योजना, सुब्रह्मण्यम स्वामी व सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितरित्या हाणून पाडलेली दिसत आहे.
22 Mar 2013 - 6:18 pm | आजानुकर्ण
अगदी मनातले बोललात. सुब्रम्हण्यम स्वामी आणि सुप्रीम कोर्ट असल्याने आपली आंतरराष्ट्रीय नाचक्की वाचली. अन्यथा या इटालियन सैनिकांना वाचवण्यासाठी इटलीमध्येच भारतीय कोर्ट सुरु करण्याची मागणी सरकारने केली असती. असो सरकारी पक्षाने खटला केरळमधील न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात नेण्याची ही विशिष्ट भूमिका का मांडली असावी बरे?
-श्रीविद्यार्थी
22 Mar 2013 - 7:05 pm | विकास
हे सुब्रम्हण्यम स्वामी म्हणजे तेच का ज्यांनी, आदरणीय सोनीयाजी गांधींनी जेंव्हा स्वपक्षिय खासदार + आघाडीतील खासदारांबरोबर स्वतःस पंतप्रधानपदासाठी अनुमोदन दिले (नॉमिनेट केले), पण मग या स्वामींच्या डोळ्यात भारतवर्षाचा होणारा उत्कर्ष खुपला आणि त्यांनी रेसिप्रोकेटीव्हिटीचा मुद्दा राष्ट्रपतींच्या लक्षात आणून देऊन इटालीचे नागरीकत्व घेतलेल्या भारतीयास असे काही मिळत नाही हे लक्षात आणून दिले? अर्थात सोनीयाजी म्हणजे त्यागाची मुर्ती असल्याने, त्यांनी तात्काळ त्याग केला होता, पण भारताचे त्यात नुकसान झाले त्याचे काय?
- लंबकर्ण
22 Mar 2013 - 7:43 pm | नितिन थत्ते
राष्ट्रपतींच्या लक्षात स्वामींनी काय आणून दिले ते ठाऊक नाही पण कलाम हे स्वामींना योग्य जागी मारण्यास तयार होते हे अनेकदा कळूनही राष्ट्रवादी लोक आपल्याच स्वप्नात जगत असताना दिसतात.
22 Mar 2013 - 8:28 pm | विकास
कलामांनी सांगितलेले (जे वृत्तपत्रात आले आहे तितकेच वाचलेले आहे) खरेच आहे. पण नरोवाकुंजरोवा पद्धतीने सांगितलेले आहे इतकेच वाटते.
या संदर्भात माहीतीचा हक्क वापरून घडलेली घटना रोचक आहे. या दुव्यातील महत्वाचा भाग खालील प्रमाणे: (मूळ पत्राची प्रत पण चिकटवली आहेच).
Delhi-based activist Subhash Agrawal filed an RTI application with the president’s secretariat seeking detailed information along with documents and correspondence relating to the formation of the central government when Dr Singh was appointed prime minister for the first time in the year 2004.
In its reply, dated 26th April 2012, the secretariat said that, “Letter written by Dr Subramanian Swamy, president, Janata Party to the president was inter alia, a communication sent in confidence by him to the president, based on which the president exercised his/her discretion to appoint the prime minister under Article 75.”
However, the president’s secretariat refused to furnish the copy of the letter as asked by Mr Agrawal in his RTI application. “Disclosure would be a breach of confidentiality and fiduciary relationship and therefore attracts section 8(1) (e) of RTI Act.”
Dr Subramanian Swamy's letter against Sonia Gandhi to President Abdul Kalam in 2004
यातील ठळक भागात, "based on which the president exercised his/her discretion to appoint the prime minister under Article 75" जे म्हणले आहे त्यावरून काय म्हणले आहे असे वाटते?
25 Mar 2013 - 10:20 pm | आजानुकर्ण
येथे राष्ट्रपतीभवनाचे स्पष्टीकरण सापडले
http://pib.nic.in/newsite/erelease.aspx?relid=1730FirefoxHTML\Shell\Open\Command
थोडक्यात नागरिकत्त्वाचा कायदा व त्या अनुषंगाने सोनिया गांधी यांचे भारतीय नागरिकत्व यावर कलाम यांनी कोणतीही चर्चा केली नाही असे दिसते.
25 Mar 2013 - 11:03 pm | नितिन थत्ते
सांगून काही उपयोग नाही.
खरे तर कलाम यांनीच नव्हे तर त्या आधी एक दोन वर्षे त्यांच्या सचिवांनीही "कलाम यांनी सोनिया गांधींच्या नियुक्तीचे पत्र तयार ठेवले होते" असेच म्हटले होते. पण राष्ट्रवाद्यांना ते पटतच नाही. झोपलेल्याला जागे वगैरे..... हे तर आहेच.
सुब्रम्हण्यम स्वामींच्या पत्रावर आधारून निर्णय घेण्याइतकी कलाम यांची बुद्धी मंद नसणार याची खात्री आहे.
22 Mar 2013 - 8:48 pm | श्रीरंग_जोशी
हे वाक्य वाचून जरा वेगळाच अर्थ निघतो. त्याऐवजी खालिलप्रमाणेही लिहिता आले असते.
पण नौसैनिकांना सुखरूप सोडविण्याची युपीएची विन-विन योजना, सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या पुढाकाराने व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अयशस्वी झाल्याचे दिसत आहे.
कृपया न्यायालयीन निर्णयांच्या बाबतीत मते व्यक्त करताना शब्दरचनेची अधिक काळजी घ्या. ते वाक्य लिहितानाची भावना सकारात्मक असेलच पण नको तो अर्थ निघेल अशी वाक्यरचना टाळावी.
22 Mar 2013 - 8:55 pm | श्रीगुरुजी
"कृपया न्यायालयीन निर्णयांच्या बाबतीत मते व्यक्त करताना शब्दरचनेची अधिक काळजी घ्या. ते वाक्य लिहितानाची भावना सकारात्मक असेलच पण नको तो अर्थ निघेल अशी वाक्यरचना टाळावी."
सूचनेबद्द्ल आभार! यापुढे लिहिताना काळजीपूर्वक लिहीन.
22 Mar 2013 - 9:08 pm | मदनबाण
भारतासमोर इटली झुकली, आरोपी खलाशी परतणार
22 Mar 2013 - 9:25 pm | भटक्य आणि उनाड
प्रत्येक डिफेन्स घोटाळा म्हणजे आपली संरक्षण दले प्रत्येक वेळी आधुनिक आणि सुरक्षित शस्त्र सामुग्री पासुन वंचित राहणार !
सगळीकडे माती खाणार्या सरकारला योग्य ती जीवनसत्वे मिळत नसल्याचेच हे लक्षण आहे.
कधीकाळी काश्मीर युनोत नेले आता हे बोफोर्स आणि हेलिकॉप्टर पण तसेच आंतर्राष्ट्रीय लवादात जाणार.
मानले भाऊ !!!
22 Mar 2013 - 11:16 pm | हुप्प्या
राष्ट्रमातेने मदर तेरेसासारखे दयाळू, कृपाळू, सेवाळू रुप सोडून त्या उन्मत्त, खुनी इटालियन खलाशांकरता मर्दानी झाशीवालीचे रुप धारण केले!
त्या पीडित खलाशांकरता एखाद्या जलदेवतेप्रमाणे ती माता धावून आली.
कोळी बांधव दर नारळी पौर्णिमेला जलदेवतेला नारळ अर्पण करतात तद्वत पुढच्या निवडणूकीच्या पवित्र प्रसंगी राष्ट्रमातेलाही नारळ मिळेल का?
नको नको! असा दुष्ट विचारही नको!
जय सोनियाजी!
23 Mar 2013 - 6:13 pm | वेताळ
ठरल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
23 Mar 2013 - 8:05 pm | श्रीगुरुजी
इटलीने खलाशांना परत पाठविताना भारताला खालील अटी मान्य करायला लावल्या आहेत.
- खलाशांना अटक केली जाणार नाही.
- ते इटालियन दूतावासात राहतील.
- त्यांना फाशीची शिक्षा दिली जाणार नाही.
म्हणजे खलाशांना परत पाठविताना सुद्धा इटलीने भारताची पुरेपूर मानहानी केली. जय हो!
23 Mar 2013 - 10:22 pm | बंडा मामा
मग आता ह्या मानहानीला जवाबदार कुणाला धरायचे? सरकार, स्वामी की न्यायालय?
24 Mar 2013 - 1:02 pm | श्री गावसेना प्रमुख
मी घेउ का जबाबदारी तुम्ही नाकारत असाल तर्,मलाही सध्या काही काम नाहीये,
24 Mar 2013 - 9:08 pm | श्रीगुरुजी
अर्थातच सरकार. दुसरे कोण? नाहीतर मग संघपरिवार/भाजप यांना जबाबदार धरू या.
24 Mar 2013 - 9:20 pm | पिंपातला उंदीर
आता जसवन्त सिंघ यानी अतिरेक्याना जातीने स्वताहा नेऊन मोकळे केले याची जबाबदारी तुम्ही त्यावेळेसच्या सरकारवर टाकत असाल तर मग आपण ही जबाबदारी आपण या सरकारवर टाकु
25 Mar 2013 - 6:30 pm | आजानुकर्ण
मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी हे सर्व श्रेय सुब्रम्हण्यम स्वामी आणि सुप्रीम कोर्टास देऊन, सर्व अपश्रेय आपल्या पदरात घेत आहेत आणि श्रीगुरुजींच्या समोर संत ज्ञानेश्वरांची ओवी म्हणत आहेत हे मनोरम दृश्य समोर आले.
तरी न्यून ते पुरतें । अधिक ते सरते । करून घ्यावे हें तुमते । विनवीतु असे
असो. अपश्रेयाचा वाटा काँग्रेसला आणि श्रेयाचा वाटा सुप्रीम कोर्टास देण्याचा श्रीगुरुजी यांचा संतुलित प्रतिसाद नेहमीप्रमाणेच आवडला. श्रीगुरुजींचे प्रतिसाद संतुलित असतात हे समजणाऱ्या इतरांशी बा.डि.स. (शब्द बरोबर आहे का?)
25 Mar 2013 - 8:30 pm | पिंपातला उंदीर
असे बोलू नका हो. इथे अनेक लोकाणा श्रीगुरुजी यांचे प्रतिसाद संतुलित आणि माहितीपूर्ण वाटतात. बाकी आपलयसारके लोक विचार्जंत आहोत. मग कितीही उदाहरण देऊन तुम्ही तुमचा मुद्दा सिद्ध केला असला तरी.
25 Mar 2013 - 9:43 pm | मैत्र
विषय मिटला..
आणि हो.. http://www.misalpav.com/comment/471069#comment-471069
हा प्रतिसाद नक्कीच संतुलित नव्हता हे स्पष्टपणे मांडतो..
24 Mar 2013 - 6:45 pm | श्री गावसेना प्रमुख
भारत व अमेरीकेची परराष्ट्र नीती आता मिसळपाव या संकेतस्थळावरचे लेख वाचुन ठरवणार आहेत घेतलाय्,एखाद्या राष्ट्रप्रमुखास वा नागरीकांच्या गटास ओलिस ठेवल्यास काय काय उपाय करायचे ह्याच्यावरही विचार चालु आहेत्,भरीस भर म्हणुन भारत सरकारने मि पा वर वॉच ठेवलाय ,
नरेंद्र भाइंनी ही आयडी घेतलाय,भविष्यात प्रधानमंत्री झाल्यावर उपयोगी पडेल म्हणुन,
24 Mar 2013 - 9:39 pm | श्रीरंग_जोशी
या विषयावर दिवाळी अंकात मी लेख लिहिला होता - काठमांडू ते कंदहार
त्यामधील हा एक उतारा
जसवंत सिंह यांचे स्वतः अतिरेक्यांना कंदहारला सोबत घेऊन जाणे हि खूप सकारात्मक बाब होती. दर वेळेस केवळ सुरक्षा रक्षकांनीच का जीव धोक्यात घालावा?
24 Mar 2013 - 10:34 pm | बंडा मामा
जणू काही जसवंत सिंह एकटेच विमान चालवत अतिरेक्यांना घेऊन कंदाहारला गेले. अहो सुरक्षा रक्षक, वैमानिक आणि मंत्री महोदय आणखी काही अधिकारी असा जत्था कंदाहरला गेला होता. आणि जेव्हा शेपूट घालून अतिरेकी सुखरुपच पोहचवायचे होते तेव्हा मंत्री गेले काय रक्षक काय कुणालाच धोका नाही. अतिरेकी त्यांचे स्वागतच करतील.
24 Mar 2013 - 10:48 pm | श्रीरंग_जोशी
तालिबानी राजवटीबरोबर आपले मित्रत्वाचे संबंध नव्हते. तेथे काहीही घडणे शक्य होते. तीन अतिरेक्यांना सोडण्याचा अप्रिय निर्णय घेण्याबाबत मी मूळ लेखात लिहिलेच आहेच, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करत नाही.
सुरक्षा रक्षकांना (सैनिकांना) केवळ भाषण देवून प्रोत्साहित करणे व अशा प्रसंगात प्रत्यक्ष सोबत राहणे यामध्ये दुसरा पर्याय मला तरी स्पृहणीय वाटतो.
24 Mar 2013 - 9:58 pm | प्यारे१
मा.श्री.आजानुकर्ण ह्यांना हुय्याच्या बॅटने मारलेल्या उत्तुंग स्कोअरसाठी हार्दिक शुभेच्छा.
तशेच,
ह्या ठिकानी मिसळपाववर जे उच्चस्तरीय शिष्ठमंडळ जमलेले आहे त्या सगळ्यांचा लंबर आपन याठिकानी घेतलेला आहेच आनि याठिकानी मी भारत सरकारला आनि मा. श्री. सलमान खुर्शिद साय बांना व सु श्री सोनिया म्याडम ह्यांना मी जातीने या ठिकानी विनंती करुन सगळ्यांना देशोधडीला आपलं या ठिकानी देशाच्या प्र्राष्ट्र खात्याच्या धोरनाच्या (हे धोतराच्या का दिसतंय) आम्म ल बजावनीसाठी फोन करुन करुन बलवावं आशी याठिकानी विनंती करुण दोन शब्द संपवतो.
जय हिंद जय भारत!
25 Mar 2013 - 2:52 pm | श्रीगुरुजी
वाजपेयी किंवा तत्कालीन मंत्री यांच्यापेक्षा इथल्या काही जणांना परराष्ट्रनीती कशी असली पाहिजे याची जास्त चांगली जाण आहे. भारताने १९९८ ला अणुचाचणी करून केवढी मोठी घोडचूक केली हे वाजपेयींच्या अल्पमतीला समजले नसले तरी यांनी ते अचूक ओळखले आहे. कंदाहार प्रकरणातील विमानचाच्यांना मारायला कमांडो कसे पाठवायला पाहिजे होते, त्यांना शस्त्रास्त्रासहीत प्रवासी विमानातून पाठवून इतर देशांची कशी दिशाभूल करायला पाहिजे होती किंवा आमचे प्रवासी विमान लंडनला चालले आहे असे सांगून अफगाणिस्तानच्या हवाई प्रदेशात आल्यावर अचानक कंदाहारला उतरवून चाच्यांची व जगाची कशी दिशाभूल करता आली असती किंवा मग कमांडोंना शस्त्रास्त्रे व क्षेपणास्त्रे देऊन हवाईदलाच्या विमानाने पाठवून ते विमान रशिया किंवा इराण किंवा युरोप किंवा अशाच तत्सम प्रदेशावरून पाठवून खुष्कीच्या मार्गाने कंदाहारला उतरवता आले असते व नंतर कमांडो कारवाई करून चाच्यांना मारून सर्व १६० प्रवाशांना कसे सुखरुप सोडविता आले असते . . . इ. ची संपूर्ण योजना यांच्याकडे तयार आहे. समजा कमांडो पाठवायला जमले नसते तर भारताने १६० प्रवाशांच्या जीवाची काळजी न करता बाणेदारपणा दाखवायला पाहिजे होता हेदेखील ही मंडळी सप्रमाण सिद्ध करून दाखवतील.
भविष्यात असे विमान अपहरण झाले तर आपल्याला काळजी नाही. इथल्या काहीजणांकडे कारवाईची संपूर्ण योजना तयार आहे.
एकंदरीत या चर्चेतील कंदाहार प्रकरणावर काही जणांचे प्रतिसाद वाचल्यानंतर "वाजपेयी तुम्हारा चुक्याच" असे वाटू लागले आहे. जय हो!
25 Mar 2013 - 6:45 pm | बंडा मामा
आणि उरलेल्यांना मनमोहन सरकार पेक्षाही चांगली जाण आहे. इटलीचे खलाशी हातळण्यात सरकार कसे चुकले, शेवटी सुब्रम्हण्यम स्वामींनी कशी अब्रु राखली आणि तरीही सरकारने जाचक अटी स्विकारुन मानहानी केलीच. मनमोहनजी तुम्हारा पण चुक्याच!
25 Mar 2013 - 8:32 pm | पिंपातला उंदीर
असे कसे बोलता इंटरनेट हिंदू आहेत ते. तुम्हाराच चुकया
25 Mar 2013 - 9:08 pm | श्रीगुरुजी
"इटलीचे खलाशी हातळण्यात सरकार कसे चुकले, शेवटी सुब्रम्हण्यम स्वामींनी कशी अब्रु राखली आणि तरीही सरकारने जाचक अटी स्विकारुन मानहानी केलीच. मनमोहनजी तुम्हारा पण चुक्याच! "
सद्यपरिस्थितीवरून हाच निष्कर्ष निघतो. याव्यतिरिक्त दुसरा कोणताही निष्कर्ष निघत नाही.
२जी प्रकरणातला भ्रष्टाचार असो वा राष्ट्रकुल स्पर्धतली लूटमार असो वा भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या व्ही के थॉमस यांची दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूकीचा निर्णय असो वा कोळसा खाण वाटपातील भ्रष्टाचार असो वा ईटलीच्या खलाशांच्या प्रकरणात झालेली नाचक्की असो . . . सुब्रह्मण्यम स्वामी व सर्वोच्च न्यायालय हेच तारणहार ठरले आहेत.
25 Mar 2013 - 11:00 pm | मैत्र
चला इथपर्यंत आलाच आहे काथ्याकूट तर आपला २०० वा प्रतिसाद जाहीर करतो...
मुद्दा काही नाही.. असाच काथ्याच कुटणं चालू आहे तर किमान २०० व्या प्रतिसादाचा टप्पा तरी साजरा करावा!!