दुनिया गोल आहे...

धन्या's picture
धन्या in जनातलं, मनातलं
20 Mar 2013 - 10:55 pm

"आ रहा हैं क्या इंटरव्ह्यू लेने? टेलिफोनिक हैं." त्याने मीटींग रुमचा दरवाजा उघडताना मला विचारलं. तो मला साडे चार पाच वर्षांनी सिनियर. त्याची माझी ओळख फक्त एक दिवसाची. अगदी कालचीच.
मी त्याला हो म्हटलं.
साहेबांनी उमेदवाराला कॉल केला. समोरचा पठठया पोचलेला निघाला.
"इटस थ्री ट्वेंटी. आय हॅड आस्कड युअर एचार टू शेज्युल माय इंटरव्ह्यू एनीटाईम बीफोर थ्री. नाऊ आय अ‍ॅम इन ओडीसी. आय कान्ट गो अहेड विथ धिस इंटरव्ह्यू.". समोरच्या पठठयाने त्याची वेळ न पाळल्यामुळे आम्हाला निकालात काढले होते.
तो उमेदवार एका मोठया कंपनीत सध्या काम करत असल्यामुळे इतका माज करतोय असं माझ्या त्या वरिष्ठ सहकार्‍याने सांगितले.
मग आम्ही दोघे तिथेच तांत्रिक विषयावर, त्याच्या जुन्या कंपनीतल्या अनुभवांवर गप्पा मारत बसलो. बोलता बोलता त्याने त्याच्या जुन्या कंपनीचे नांव सांगितले.
"वाशीमें रेल्वे स्टेशनके बिल्डींगमें हैं ना यह कंपनी?" मला ती कंपनी माहिती असल्यामुळे मी लगेचच विचारलं.
"मुझे लग रहा हैं मैने भी आपको कही देखा हैं." त्याने प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पाहीलं.
"हा देखा होगा. मैं महापे मे था दो साल. अक्सर विकेंडको वाशी आता था."
मग मी त्याला मी महापेला कुठल्या कंपनीत होतो ते सांगितलं.
"अरे मैं एक बार गया था तुम्हारे उस कंपनीमें ईंटर्व्ह्यू देने. पांच साल पेहले" साहेब काहीतरी इंटरेस्टींग सांगणार आहेत हे ओळखून मी ही कान टवकारुन ऐकू लागलो.
"मैं जब पॅनल के सामने जाके बैठा, मैं शॉक हो गया. अरे बिलकूल बच्चा था वोह. मैं जो बात कर रहा था, वोह बिलकूल उसके समझ में नही आ रही थी. मैंने उसे पुछा की आपको कितने साल का एक्स्पेरीयन्स हैं, वोह बोला टू अँड हाफ. मेरी खिसक गयी. मेरा खुदका एक्स्पेरीयन्स था सात सालका. सामने मेरा ईंटरव्ह्यू लेने जो बंदा बैठा था उसका एक्स्पेरीयन्स था ढाई सालका. मैने उसे येह बात बता दी तो वोह बच्चा बोला की अरे आप सात सालकी क्या बात कर रहे हों, मैने तो बारह सालका एक्स्पेरीयन्स वाले बंदोंके टेक्निकल ईंटरव्ह्यू लिये हैं. मैंने कहा भई सही हैं. मैं जो भी उसके सवालोंके जवाब दे रहा था,, वोह उसके पल्ले नही पड रहे थे. कैसे पडेंगे भाई, आखिर वोह फ्रेशर क्या समझ पायेगा? फीर कभी मैं तुम्हारी उस कंपनीमें गया नही ईंटरव्ह्यू देने."

मी त्याचं बोलणं ऐकत होतो खरं, पण माझ्या चेहर्‍यावरचे रंग उडत चालले होते.

तंत्रप्रकटन

प्रतिक्रिया

मन१'s picture

20 Mar 2013 - 11:08 pm | मन१

:)
गुड वन.

नाना चेंगट's picture

20 Mar 2013 - 11:08 pm | नाना चेंगट

आयटीच्या गॉष्टी ! मोठ्या लोकांच्या (त्यांच्याहून) मोठ्या गोष्टी ! :)

श्रावण मोडक's picture

20 Mar 2013 - 11:35 pm | श्रावण मोडक

हाहाहाहा...
चालायचंच हो. परवा माझ्याकडे एक उमेदवार आला. मुलाखत झाली.
नंतर माझ्याकडचा एक कर्मचारी माझ्याकडे आला. म्हणाला, "सर, हाच तो." मी प्रश्नचिन्हांकित. मग खुलासा झाला.
त्या कर्मचाऱ्याने आदल्या दिवशी विचारलं होतं, "एक उमेदवार पाठवू का?" मी म्हटलं, पाठव. तो म्हणे, "सर, जेजे स्टाईल आहे..." मी म्हटलं, 'हरकत नाही.'
प्रोफाईल (आपल्या भाषेत पोस्ट) - डिझायनर. 'जेजे' म्हटल्यावर मी खुश (काय करणार, आम्ही नावं ऐकूनच गोंधळतो). तो आला आणि त्यानं दिलेल्या चार गोष्टींमध्ये मला अलाईनमेंटच दिसली नाही. बेट्यानं सगळं मान्य केलं.
माझा कर्मचारी म्हणतो, "सर, मी इंटरव्ह्यू द्यायला गेलो होतो ना, तिथं त्यानंच माझा इंटरव्ह्यू घेतला. मग विचारलं, तुमच्याकडं काही आहे का?; मी 'हो' म्हटलं. आत्ता तोच होता..."
आमची कंपनी छोटी आहे बरं... बडे लोग वगैरे नाही. :-)
काये, तुम्ही 'आयटी' म्हटलं म्हणून मी बोललो. ;-)
अरे, कुणी तरी त्या धम्याला कळवा रे, मिपा सुरू झालंय म्हणून. ;-)

अभ्या..'s picture

21 Mar 2013 - 2:22 am | अभ्या..

श्रामोकाका तुमच्या कंपनीत डिझायनर पण लागतात कामाला?
मग मी करु का अ‍ॅप्लाय? ;)
जेजे पण आहे आणि मला अलाइनमेंट चांगली येते हो. :)
आयटी नाहीये मग लावा की वशिला ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Mar 2013 - 11:15 am | विश्वनाथ मेहेंदळे

आयटी नाहीये मग लावा की वशिला

हीहीहीहीही !!!! वशिला ??? कुणाकडे ???

नाना चेंगट's picture

21 Mar 2013 - 9:00 am | नाना चेंगट

सौ बात की एक बात !
वेकन्सी तेच ते जागा... आहे का ? यावं म्हणतो ;)

धमाल मुलगा's picture

21 Mar 2013 - 9:44 am | धमाल मुलगा

च्यायला!!!! येऊन जाऊन बरा धम्याच सापडतो हां? :)

बाकीऽऽ...टोमणा कळतोय बरं! ;)

धन्याशेठ,
पण खरं सांग, च्यायला, कमी अनुभव असला म्हणून काय झालं? भलेभले टेक्निकल इंटर्व्ह्यूमध्ये झोपलेले पाहिलेले नाहीस का?
माझं उगाच आपलं एक निरिक्षण आहे..चुकीचंही असेल, पण जे कोणी छोट्या कंपनीतून पुढे येत जातात त्यांना सतरा भानगडींवर कामं करावी लागल्यामुळं अंमळ जास्त अनुभव आलेला असतो. सी.एम.एम. वगैरे मध्ये क्यांपस रिक्रुट असतात त्यांना वर्षानुवर्षं चाकोरीबध्द कामामुळं तितका अनुभव येत नाही.

माझा एक अनुभव - येका टैमाला मी बिन प्रॉजेक्टचा फुकट-पगारखाऊ झालो होतो. मग मला कॉर्पोरेट ट्रेनिंगमध्ये ढकललं. तेव्हाच्या 'क्यानबे'मध्ये बिझनेस इंटेलिजन्सचं ट्रेनिंग होतं, ज्याच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट कंपनीला मिळणार होतं त्याच्याशी चर्चा करताना विचारलं, 'तुमच्याकडं नाहीत का कोणी ह्यातले माहितगार?' तर म्हणे, 'नोऽ...दे आर नॉट कॅपेबल. जस्ट थ्री-फोर इयर्स ऑफ एक्सपिरियन्स..' अन त्यावेळी मी होतो कसाबसा दोन वर्षांच्या अनुभवावर. :) दिली धडक. अन फिडब्याक चांगला आला की :)

बाकी, दुनिया गोल है हे खरंच! :)

धन्या's picture

21 Mar 2013 - 10:02 am | धन्या

तुमचाबी किस्सा भारी ये.

मी सांगितलेला किस्सा आपल्याच "सिं"हगड रोडवरचा आहे. ;)

धमाल मुलगा's picture

21 Mar 2013 - 10:28 am | धमाल मुलगा

असे खूप सापडतील हों "सिं"हगड रोडला :) उगाच जीवला त्रास नका करुन घेऊ.

श्रावण मोडक's picture

21 Mar 2013 - 5:20 pm | श्रावण मोडक

च्यायला, म्हटलं चार दिवसांहून अधिक काळ झाला मिपा सुरू होऊन, तरी तू दिसेनास. मग काय करावं? मग लक्षात आलं, झोपेचं सोंग घेतलेल्याला जागं करायचं असेल तर टोमणाच उपयोगी पडतो. मग तोच मारला. नुसत्या हाकेला तू थोडंच ओ देणारेस... ;-)

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 11:13 pm | बॅटमॅन

च्यायला!!

आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन आहे काय? कळ्ळं नाही फारसं.

आयटीच्या मालिकेतले पुढचे लेखन नाही. शेवटचं वाक्य पुन्हा एकदा वाचा, लगेच कळेल नेमकं काय सांगायचं आहे ते. :)

रेवती's picture

20 Mar 2013 - 11:29 pm | रेवती

समजलं. बहुतेक तो फ्रेशर मनुष्य तूच असावास. ;)

श्रीरंग_जोशी's picture

20 Mar 2013 - 11:21 pm | श्रीरंग_जोशी

रोचक प्रसंग पण आपल्या अगोदरच्या लेखनापुढे हे लेखन जरा अपेक्षाभंग करणारे वाटले.

या प्रकारचा लेख एखाद्या नव्या सदस्याने लिहिला असता तर फार प्रेमळ प्रतिक्रिया मिळाल्या असत्या, असो.

इनिगोय's picture

21 Mar 2013 - 8:52 am | इनिगोय

खरंय.

स्पंदना's picture

21 Mar 2013 - 5:28 am | स्पंदना

एकदम भारी.
फारच गोल असते दुनिया भाऊ!
एकदा अक्षयन त्याच्या दुप्पट वयाच्या माणसाचा इंटर्व्ह्यु घेतला. अक्षरशः हात जोडत अक्षयन विचारल, इतक चाम्गल करिअर सोडुन तुम्ही इथे काय करताय, उत्तर- मला तेच तेच करुन कंटाळा आलाय मला काहीतरी दुसर करायच आहे.

धनाजीराव इथुन पुढे त्याच्या बरोबर जाऊ नका. आता रंग उडालाय म्हणुन ओळखत नसेल तो, उद्या रंग परतल्यावर....

प्रचेतस's picture

21 Mar 2013 - 8:46 am | प्रचेतस

:)

किसन शिंदे's picture

21 Mar 2013 - 9:22 am | किसन शिंदे

:)

स्पा's picture

21 Mar 2013 - 9:42 am | स्पा

ओ..

अच्च जालं...

तुम्हाला काकस्पर्श झाला आहे का?

तुम्हाला काकस्पर्श झाला आहे का?

बराच मोकळा वेळ दिसतोय

धन्या's picture

21 Mar 2013 - 9:51 am | धन्या

कामाची पाळी बदलली आहे.

स्पा's picture

21 Mar 2013 - 9:54 am | स्पा

कुल :)

परत कधी येताय वाशीला ?
तिकडेच कट्टा करू :)

वाशीला यायची गरज नाही. तो आणि मी एकाच टीममध्ये आहोत. :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Mar 2013 - 11:13 am | विश्वनाथ मेहेंदळे

वाशीला कट्टा ?????? शिरा पडली तुझ्या तोंडाक......
मध्यवर्ती ठिकाण सोडून वाशी ???? रौरवात पडशील रे !!!! ;-)

पैसा's picture

21 Mar 2013 - 10:13 am | पैसा

दुनिया गोल है!

खत्तरनाक अनुभव. बरं झालं गप्प बसलात ते. नाहीतर तुमच्या अ‍ॅप्रेझलची व्यवस्थित काळजी घेतली असती त्याने. =)) आता अजुन एक करा. ऑफिसमध्ये तुम्ही मी मिपा वापरतो असं कौतुकाने सांगु नका. सांगितलच तर तुमचं आयडी सांगु नका. नाहीतर तुम्ही ......हॅहॅहॅहॅ.

पिंगू's picture

21 Mar 2013 - 10:55 am | पिंगू

हाहाहा...

प्यारे१'s picture

21 Mar 2013 - 2:58 pm | प्यारे१

सीनियरच्या चांगल्या 'विस्मरणशक्ती'चे धन्या ला झालेले फायदे!

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2013 - 3:03 pm | नगरीनिरंजन

:)
अरेरे, काय ही आयटीची अवस्था! ;-)

बाकी, प्रत्यक्षात तसे काम असो वा नसो, इंटरव्ह्यूमध्ये सगळं ज्ञान पाजळायची प्रश्नकर्त्यांना हौस असते असे एक निरीक्षण आहे. धन्यारावांनी तसे केल्याचा प्रयत्न केल्याने त्यांच्या अनुभवाचे पितळ उघडे पडले असे तर नाही? ;-)

सोत्रि's picture

24 Mar 2013 - 5:28 pm | सोत्रि

दुनिया गोल है वरुन आठवले.

एकदा एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्युला गेलो होतो. मी अगदी खिजगणतीत नसलेल्या कंपनीत असल्याने इंटरव्ह्यु पॅनेलमधल्या दोघांनी उगाचच पिळ पिळला मला इंटरव्ह्यु मध्ये आणि काहीतरी फालतू कारण सांगून रिजेक्ट केलेरिमी एचाआर शी संपर्क साधून समजावयाचा प्रयत्नही केला पण...

पुढे ३-४ वर्षांनी मी एका मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यु पॅनेलवर असताना तोच पठ्ठ्या इंटरव्ह्यु साठी आलेला आणि मी इंटरव्ह्यु पॅनेलवर :) पण त्याच्यात दम असल्याने त्याला सिलेक्ट केले. पण त्याला माझ्या त्या इंटरव्ह्युची आठवण दिल्यावर बिचारा ओशाळून 'सॉरी, सॉरी' म्हणत बसला होता.

- (एकेकाळचा आयटीतला हमाल) सोकाजी

रच्याकने हे इंटरव्ह्यू पॅनेल कसे निवडले जाते हे कुणी सांगेल काय?