रविवार आज रविवार
किती छान छान वार
अभ्यास नाही शाळा नाही
खूप मजेचा आज वार !
मारामारी आणि कुस्ती
येत नाही मुळीच सुस्ती
खेळ खेळण्यांची कमाल
दिवसभर नुसती धमाल !
दिवसभर खाणेपिणे
नाचणे अन् हुंदडणे
गट्टी फू अभ्यासाशी
कट्टी फक्त खेळण्यांशी !
नाही धपाटा आईचा
नाही रट्टा बाबांचा
ताईचे ऐकायचे नाही
दादाशी बोलायचे नाही !
दोस्तमंडळ झिंदाबाद
मौजमस्ती झिंदाबाद
धिंगाणा गाणे गाणी
रंगीत फुग्याची पिपाणी !
रविवार हो रविवार
आमचा आवडता वार
घरात आणि मैदानात
दंगामस्ती चालणार !
.
प्रतिक्रिया
17 Mar 2013 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
17 Mar 2013 - 10:21 am | निवेदिता-ताई
छान छान
17 Mar 2013 - 2:03 pm | सस्नेह
हम्म...
रविवार खरा, पण उद्या आहे गणिताचा पेपर..! तेव्हा अभ्यासातून सुटका नाही.
17 Mar 2013 - 3:44 pm | अविनाशकुलकर्णी
निरागस कविता
18 Mar 2013 - 1:35 pm | पक पक पक
खरच निरागस.. ;) पण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या ना राव आता कसला रविवार.. ? :)
20 Mar 2013 - 12:19 pm | अत्रुप्त आत्मा
@आता कसला रविवार..? >>>
खरं आहे,आता कसला रविवार..? -आता रवि वरच वार ;-)