गणपतीला जानवे कोणी घातले ?

शरद's picture
शरद in काथ्याकूट
14 Mar 2013 - 1:28 pm
गाभा: 

गणपतीला जानवे कोणी घातले ?
आपण आज गणपतीच्या मूर्त्या वा चित्रे पाहिली तर आपणास असे आढळून येईल की त्याच्या गळात जानवे असते. माझा प्रश्न असा आहे की हे जानवे गणपतीच्या गळ्यांत कोणी, केंव्हा व कां घातले ? नाही, हा धागा पोरकट, थिल्लर व सनसनाटी नव्हे. मी बरा॒च प्रयत्न करून याची उत्तरे शोधावयाचा प्रयास केला आहे. मला उत्तर मिळाले नाही, येथील एखादा अभ्यासू काही सांगू शकेल या आशेने प्रश्न विचारला आहे. प्रथम हा प्रश्न उद्भवलाच कां ? ते पाहू.

महाभारतातील गोष्ट आहे. एका राजा;ला वाटले की आपण यज्ञ करतो, इतरही करतात. मग आपले वैशिष्ट्य ते काय ? आपला यज्ञ इतरांहून वेगळा, एकमेवाद्वितीय, पाहिजे. त्याने शंकराची तपश्चर्या केली व तो प्रसन्न झाल्यावर त्याच्याकडे वर मागितला कीं "माझ्या यज्ञातील अध्वर्यु तू हो." शंकर म्हणाला " नाही बाबा, तो माझा अधिकारच नाही. ते जमणार नाही, पण माझा अंश असलेला दुर्वास ते काम करेल." लक्षात घ्या, शंकर सांगत आहेत, "देवांना हा अधिकारच नाही". मनुष्य, त्रैवर्णिक समाजच, मुंज, यज्ञ आदि करू शकतात. मुंजच नाही तर जानवे कुठले ? ही गोष्ट फार पुरातन झाली. इतर देवांकडे बघू. विष्णु, शंकर, विठ्ठल, तिरुपती ब्रह्मदेव, यांची चित्रे, मूर्ती पहा. जानवे नाही. मला सोळाव्या शतकांपूर्वीच्या कुठल्याही शिल्पांत, चित्रांत आढळले नाही. राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच. अपवाद फक्त परशुरामाचा. व दत्ताचा. दोघेही ऋषीपुत्र. जानवे आढळते. तरीही कुणाला तीन-चारशे वर्षांपूर्वीची एकमुखी दत्ताची मुर्ती वा चित्र माहीत असेल तर त्यात जानवे आढळते का ते पाहून अवष्य कळवावे. मी पाहिलेल्या तीनशे वर्षांपूर्वीच्या गणपतीच्या, चित्रात, शिल्पात जानवे दिसत नाही. फार काय हल्लीच्या काळातील दक्षिणेकडील धातूशिल्पातही जानवे दिसत नाही. कोणी बन्गलुरु-चेन्नायीवासी जास्त माहिती देऊं शकेल काय?

शरद
.

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

14 Mar 2013 - 1:52 pm | प्रसाद गोडबोले

जानवे अर्थात यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांनाही आहे ...मुंजही तिन्ही तिन्ही वर्णांकरीता आहे ( उपनयन हा १६ संस्कारांपैकी एक आहे बहुधा ) त्यामुळे रामाच्या गळ्यातही जानवे आहे कृश्णाच्याही अन अर्जुनाच्याही !!

देव ह्या शब्दाच्या वापरातही गडबड आहे असे वाटते

देव म्हणजे ३३ कोटि देव = ११ आदित्य + १२ रुद्र + ८ दिक्पाल + २ अश्विनीकुमार (कोटि म्हणजे प्रकार ह्या अर्थाने , तिरुपती , ब्रह्मदेव परशु राम वगैरे फार उशीरा आले आपल्या संस्कृतीत एव्हन गणपती हा उल्लेखही वेदात येत नाही असे ऐकुन आहे तिथे उल्लेख येतो ब्रह्मणस्पती असा !!
शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे :) )

आता ही सगळीच वैदिक माणसे असल्याने जानवे घालत असणारच !!

म्हणजे गणपतीच्या गळ्यात जानवे हे गणपतीनेच घातलेले असले पाहिजे मुंजीच्यावेळी
( अर्थात मला आमंत्रण आले नव्हते त्यामुळे मी प्रत्यक्ष पाहिले नाहीये , हा आपला अंदाज आहे )

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 9:05 am | नाना चेंगट

>>>आता ही सगळीच वैदिक माणसे असल्याने जानवे घालत असणारच !!

असहमत. बाकी चालू द्या

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 12:56 pm | प्रसाद गोडबोले

आपले मत काय आहे हे जाणुन घ्यायला आवडेल

शिल्पा ब's picture

15 Mar 2013 - 1:23 pm | शिल्पा ब

तुम्हाला काय कैपण आवडेल !

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 11:11 pm | नाना चेंगट

तुमच्या आवडीबद्दल आदर आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2013 - 12:37 pm | प्रकाश घाटपांडे

जानवे अर्थात यज्ञोपवीत घालण्याचा अधिकार ब्राह्मण क्षत्रिय वैश्य तिघांनाही आहे

बर्‍याच लोकांचा असा समज आहे की ही मक्तेदारी सुरवातीपासून फक्त ब्राह्मणांचीच आहे. असो जानवी तोडा देश जोडा अभियान चालू राहू द्यात

गणपतीच्या जुन्या कुठल्याही शिल्पांमध्ये जानवे आढळत नाही हे खरेच. वेरूळच्या कैलास लेणीत सप्तमातृकांसह असलेल्या गणेशाच्या मूर्तीत जानव्याऐवजी गळ्यात चक्क नाग दाखवला आहे.

माझ्या मते गणेशाला जानवे घालायची पद्धत त्याच्या पार्थिव मूर्तींपासून सुरु झाली असावी (बहुधा पेशवेकाळात).
गणेश ही विद्येची देवता असल्याने आणि पेशव्यांचे मुख्य दैवत असल्याने साहजिकच त्याला ब्राह्मण मानणे सुरु झाले असावे.

किसन शिंदे's picture

15 Mar 2013 - 3:48 am | किसन शिंदे

हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. या विषयावरील माहिती जाणून घ्यायची खुप इच्छा होती ती या धाग्याच्या निमित्ताने पुर्ण होईलशी दिसतेय. माझ्याही काही प्रश्नांची इथे उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्रात प्रसिध्द असणारी अष्टविनायक देवस्थानं असं म्हणतात फार प्राचीन काळापासून आहेत. पुरातन म्हणजे नेमकी किती जुनी आहेत? कारण शिवकाल किंवा त्यापुर्वीच्या काळात यांपैकी एकाही देवस्थानाचा उल्लेख येत नाही. मग हि देवस्थानं नेमकी कधी अस्तित्वात आली असावीत?

प्रचेतस's picture

15 Mar 2013 - 8:40 am | प्रचेतस

बहुतेक सर्वच अष्टविनायक मंदिरे ही पेशवेकाळात बांधली गेलेली आहेत. त्यापैकी काही मंदिरे पूर्वी अगदी लहानशा स्वरूपात अस्तित्वात असतीलही. शिवकालात अष्टविनायकांचा उल्लेख माझ्या माहितीत तरी आलेला नाही. चिंचवडच्या देवस्थानाचे मात्र उल्लेख आहेत. मोरगावचा पुसटसा उल्लेख वाचलेला आठवतोय पण नक्की नाही.

अष्टविनायकांपैकी एक तर लेण्याद्रीचा बौद्ध विहारच होता. शिवकाळाच्या सुमारास तेथे असलेल्या उठावातल्या अर्धस्तूपाला गणेश समजणे सुरु झाले असावे.
मोरगावचे मयुरेश्वर मंदिर तर पूर्वीचे शिवमंदिर असावे असे तिथे असलेल्या काही पुरातन अवशेषांवरून वाटते. मंदिराच्या पुढ्यातच भग्नावस्थेतील एक नंदी आहे. तर मंदिराच्या काही खांबांवर शिलाहार्/यादवकालीन नाग प्रतिमा कोरलेल्या आहेत.
इस्लामी आक्रमणानंतर पूर्णतया भग झालेल्या शिवमंदिराचा नंतर जीर्णोद्धार करून ते गणेश मंदिरात रूपांतरीत झाले असावे असा माझा अंदाज.

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 12:26 pm | मालोजीराव

शिवकालात अष्टविनायकांचा उल्लेख माझ्या माहितीत तरी आलेला नाही. चिंचवडच्या देवस्थानाचे मात्र उल्लेख आहेत. मोरगावचा पुसटसा उल्लेख वाचलेला आठवतोय पण नक्की नाही.

बादशहा हुमायून,संत तुकाराम महाराज, छत्रपति शिवाजी महाराज ,संभाजी महाराज,महाराणी येसूबाई साहेब यांचा मोरगाव देवस्थानाशी थेट संबंध आला होता व त्यांनी या देवस्थानाला भेट दिल्याचे वाचनात आल्याचे आठवल्या गेले आहे.

बाकी ठीक पण हुमायून इतक्या दक्षिणेत आला होता का कधी? साशंक आहे. विकीवर पाहिले असता तो गुजरातपर्यंत आल्याचे दिसते, त्याच्या दक्षिणेस आला असेल असे वाटत नै.

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 12:42 pm | मालोजीराव

विकीवर पाहिले असता

अरे वाल्गुदेया विकिला तुझ्यासारख्या प्रतिभावंत लेखकांची गरज आहे…वल्लीला मी या पूर्वी सातवाहन इतिहास विकीवर लिहिण्याची रिक्वेस्ट केलेली पण त्यांनी मिपाशिवाय दुसरीकडे लिहिणार नाही म्हणत ती फाट्यावर मारली. विकी मधल्या अर्धवट माहित्या आमच्यासारख्या आळशी लेखकांनी टाकल्यात…टंकायचा कंटाळा आला म्हणून आहे तसा लेख सेव्ह करतो मी :P

बास का मालोजीराव, लाजवता का :)

प्रचेतस's picture

2 Apr 2013 - 12:47 pm | प्रचेतस

=))

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Apr 2013 - 1:35 am | विश्वनाथ मेहेंदळे

वल्लीला मी या पूर्वी सातवाहन इतिहास विकीवर लिहिण्याची रिक्वेस्ट केलेली पण त्यांनी मिपाशिवाय दुसरीकडे लिहिणार नाही म्हणत ती फाट्यावर मारली.

हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले प्रेम आहे. विकिवर लिहून व्यभिचार करणाऱ्यातला तो नाही. मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून तो लग्नही करणार नाही असे त्याने बुवांना सांगितल्याचे किसनने स्पाला सांगताना सूडने ऐकले आहे असे मोदक म्हणत होता.

अभ्या..'s picture

3 Apr 2013 - 1:42 am | अभ्या..

=)) =)) =))

मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये

का मिपावरच्यांच्या? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा

हे बघा, मिपा हे वल्लीचे पहिले प्रेम आहे. विकिवर लिहून व्यभिचार करणाऱ्यातला तो नाही. मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून तो लग्नही करणार नाही असे त्याने बुवांना सांगितल्याचे किसनने स्पाला सांगताना सूडने ऐकले आहे असे मोदक म्हणत होता.>>> ___/\___ ___/\___ ___/\___ http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gifhttp://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing004.gif

५० फक्त's picture

5 Apr 2013 - 8:24 am | ५० फक्त

माझ्याकडे या सुसंवादाचं रेकॉर्डिंग आहे, कुणाला हवे असल्यास व्यनि करा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 8:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

मिपावरच्या प्रेमात बाधा येऊ नये म्हणून...

मलाही तशी आकाशवाणी ऐकू आली आहे हे न सांगितल्याबद्दल टीव्र णीषेढ !

प्रचेतस's picture

2 Apr 2013 - 12:36 pm | प्रचेतस

बादशहा हुमायून,

कसं शक्यय?
त्याचं आयुष्य बरचसं पळ काढण्यातच गेलं आणि इकडे दक्षिणेत त्यावेळी बहमनी सत्ता होती. किंवा आदिलशाही/निजामशाहीचे सुरुवातीचे दिवस.

मग हुमायूनचा संबंध कसा काय पोहोचतो? त्याचे आक्रमण इकडे झाल्याचे ऐकिवात नाही.

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 12:47 pm | मालोजीराव

हुमायून च्या सनदांवर आधारित एक कागदपत्रांचा संग्रह मार्टिन ने प्रकाशित केला होता,त्यात साहेब मोरया गोसावींना भेटल्याचे सांगितले आहे.भारत इतिहास संशोधक मंडळ येथे धुंडळावे, सध्या पुस्तिक हातात नाय त्यामुळ खात्री नाय.

प्रचेतस's picture

2 Apr 2013 - 12:50 pm | प्रचेतस

बघायला पायजेल मग.

विंट्रेष्टिंग!!!! हे प्रकरण पाहिले पाहिजे आता.

लॉरी टांगटूंगकर's picture

2 Apr 2013 - 2:11 pm | लॉरी टांगटूंगकर

१५३०- राज्यरोहण,
१५३१- महमूद लोदिचा पराभव.
१५३२- शेरखानाचे बंड
१५३४- बहादूरशहा चं मॅट्रर -त्याच्या मागे हा मांडवगड ( मध्येप्रदेश) पर्यंत आलेला दिसतो.१५३४-३५ गुजरात स्वारी-साहेब गुजरात कडे गेल्यावर शेरखानने परत लोचे केले, अन् उत्तरेत सत्ता मिळवली. त्याचं अन् हुमायूनचे मॅटर 1540 पर्यंत वाजत राहिले ( मंजे तो उत्तरेतच होता). मग शेरशहा नंतर सलीमशहा सूरने अन् सिकंदर शहा सूर यांनी राज्य पहिले.
थोडक्यात १५४० ते ५३ हुमायून भटकत होता. या काळात मदत मागायला तो कंदाहार अन् कबुल कडे गेलेला (१५४५ ते ५१ कडे तो तिकडे होता असे दिसतंय.) सुरी घराण्याचे लोचे सुरु झाल्यावर तो कबुल कडून बहराम खान अन् अकबर बरोबर भारतात आला १५५५ मध्ये दिल्ली परत मिळवली.१५५६ मध्ये गचकला. हे ढोबळ चित्र आहे,
तो साधारण कधी आला हे सांगितलं तर हुमायूननाम्या मध्ये बघता येईल. आज रिक्कामा बसलोय म्हणून  :ड

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 2:58 pm | मालोजीराव

तो साधारण कधी आला हे सांगितलं तर हुमायूननाम्या मध्ये बघता येईल

नाही सांगता येणार, वर वल्लीला दिलेल्या प्रतिसादातील रेफ़रन्स तपासा…माझ्याकडे ते पुस्तक नसल्याने तपासून सांगू शकत नाही.

lakhu risbud's picture

15 Mar 2013 - 6:32 pm | lakhu risbud

जेजुरीचा खंडोबा ची माहिती तेथील पुजार्यांना विचारली
त्यांनी नक्की कालखंड माहित नाही पण श्रीकृष्णा ने त्याचे कुलोपचार जेजुरी येथे येउन केल्याचे सांगितले
(म्हणजे अंदाजे साधारण इ. स. पूर्व ४ ते ५ हजार वर्षांपूर्वी ). मल्हारी मार्तंड म्हणजे शिवाचाच एक अवतार असून म्हाळसा म्हणजे पार्वती व बाणाई म्हणजे गंगा
या रुपात शंकर कैलास पर्वतानंतर भारतात फक्त जेजुरी इथेच आहेत अशी माहिती सांगितली याच्या बद्दल अधिक माहिती कोणाकडे असल्यास जाणून घेण्यास आवडेल

शिर्षक वाचल्या बरोअबर जोरात मान हलवुन "मी न्हाय" " तुमी घातलं का?" अस फार विचारावस वाटलं. कित्ती वेळ टाळला मोह हा प्रतिसाद टाकायचा पण मग खरच रहावलं नाही.

किसन शिंदे's picture

15 Mar 2013 - 7:09 am | किसन शिंदे

"मी न्हाय" " तुमी घातलं का?" अस फार विचारावस वाटलं.

=))

वर वल्ल्या म्हणतो ना तसं ते शनवार वाड्यातल्या लोकांनीच घातलं असावं. :D

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 9:01 am | नाना चेंगट

काय घातलं असावं?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2013 - 7:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर, गणपती हा अगदी अलिकडचा म्हणजे हजार-बाराशेवर्षापूर्वीचा हे आपल्याला माहितीच असेल. तिस-या चौथ्या शतकापर्यंत गणपतीचं महती काही वाढलेली नव्हती, हे डॉ.भांडारकरांचं मत पाहिल्यावर आणि लेण्यात सापडलेल्या मूर्तीवरुन हजार-बाराशे वर्षापूर्वीच्या गणपतीला उपासनेनिमित्त, पूजे-अर्चेनिमित्त जितकं त्याला विधिवत करता येईल तितकं करण्याचा प्रयत्न झाला असावा, आता ते कोणी केलं हेही तुम्हाला ठाऊकच आहे. :)

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 9:02 am | नाना चेंगट

>>>आता ते कोणी केलं हेही तुम्हाला ठाऊकच आहे
सहमत आहे. महा बदमाश मंडळी हो ती...

गणपती असतो का हो तुमच्या घरी? नाही ना ! सुटलात !! उगा कशाला गतकालाचे ओझे वागवायचे खांद्यावर नाही का ! :)

प्रशु's picture

15 Mar 2013 - 7:55 am | प्रशु

मुर्ती ला स्वत:चे जानवे नसते. षोडोषोपचार पुजेमधला एक संस्कार जानवे (मुर्तीला) धारण करणे असतो. त्यामुळे ते पुजाविधि करताना घालण्यात येते. आणि गणपतीचे म्हणाल तर त्याचे एक नाव आहे. नागयज्ञोपवित, म्हणजे नागालाच यज्ञोपवित म्हणुन धारण करणारा.

Dhananjay Borgaonkar's picture

15 Mar 2013 - 8:55 am | Dhananjay Borgaonkar

काय फरक पडतो काका? कोणी का घातले असेना? आता गणपतीची मुंज झाली होती की नव्ह्ती? कोण कोण गेलं होतं?
या प्रश्णाने असा किती मोठा फरक पडणारे?
प्रशु म्हणतात तसं तो एक षोडोषोपचार पुजेमधला एक संस्कार/भाग असावा.

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 9:03 am | नाना चेंगट

जेवणावळीचा मेन्यु काय होता आणि किती पान पंगत झाली हे प्रश्न राहिले ;)

Dhananjay Borgaonkar's picture

15 Mar 2013 - 9:07 am | Dhananjay Borgaonkar

:D :D

पता करो दया इस कारस्थान के पिछे किसका हाथ है.

नाना चेंगट's picture

15 Mar 2013 - 9:00 am | नाना चेंगट

अच्छा आता गणपतीच्या जानव्यावरुन भारतीय लोकांनी गणपतीची पूजा अजिबात करु नये असे ब्रिगेडी फर्मान निघणार तर लवकरच ! एकदाचे गणपतीचे जानवे बुडवून टाका बरं अरबी समुद्रात आणि ब्राह्मणांना हाकलून द्या देशाबाहेर.

जानवे तोडा देश जोडा !

परिकथेतील राजकुमार's picture

2 Apr 2013 - 2:49 pm | परिकथेतील राजकुमार

फालतुपणा आहे हा सगळा.

उगाच असले काहीतरी प्रश्न विचारायचे, वाद उपस्थीत करायचे आणि बामणांचे गोडवे गाऊन घ्यायचे.

जोवर हा देश नि:बामण होत नाही, तोवर ह्याला भाग्योदय नाही.

अर्धवटराव's picture

3 Apr 2013 - 1:41 am | अर्धवटराव

ह्याला म्हणजे कोणाला रे परा? नान्याला?

अर्धवटराव

तर्री's picture

15 Mar 2013 - 10:43 am | तर्री

गणपतीला जानवे घालणे कायद्याने थांबवा. जानवे हे अहंकाराचे लक्षण आहे तेंव्हा हया साठी आंदोलन करायला हवे.

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 12:59 pm | प्रसाद गोडबोले

हे उपरोधिक लिहिलय का ?

शैलेन्द्र's picture

15 Mar 2013 - 2:48 pm | शैलेन्द्र

छे हो! ईथे सगळे लोक अतिशय गंभिर्पणे प्रतिसाद देतायेत..

पिंपातला उंदीर's picture

15 Mar 2013 - 10:45 am | पिंपातला उंदीर

अवांतर-इथे कोणी Chariots of gods हे पुस्तक वाचले आहे का? त्यात आपण ज्याना देव मानतो ते दुसर्या ग्रहावरून आलेले अंतराळवीर होते अशी भन्नाट थियरी अनेक पटणारी उदाहर्न देऊन मांडली आहेत. त्यामध्ये अनेक हिंदू देवता आणि गणपती चा उल्लेख पण उदाहर्न म्हणून दिला आहे.

टवाळ कार्टा's picture

16 Mar 2013 - 12:04 am | टवाळ कार्टा

मी वाचले आहे...शक्यता नाकारता येत नाही

दादा कोंडके's picture

16 Mar 2013 - 12:50 am | दादा कोंडके

पण गणपती आणि डेस्कट्वाप संगणक यांच्यातली साम्यस्थळे दाखवणारे अनेक लेख वाचले होते.

विद्येची देवता: संगणक
कानः दोन स्पिकर्स
मोठ्ठं डोकं: म्वानिटर
हाईट म्हणजे सारखे पणात दोघांच्यासमोर उंदीर असतो म्हणे.

दुर्दैवानी ट्याब वगैरे आल्यावर त्यांना कै सुचलं नाही. :)

बरीच गंमत जंमत चालू आहे! पण मला वाटते की 'ब्रह्मणस्पति' या नावामुळे गणपती हा ब्राह्मण आहे असं मानलं गेलं असावं. अगदी खेड्यातले लोक अजून गणपती हा ब्राह्मण आहे आणि पार्थिव मूर्तीची पूजा ब्राह्मणाच्या हातूनच झाली पाहिजे असं मानतात. भटजी बिझी असल्यामुळे पूजा, नैवेद्य, घरातल्या लोकांची जेवणं संध्याकाळी उशीरा झाल्याचं अनेकवेळा पाहिलं आहे.

अध्ययन अध्यापन हा ब्राह्मणांचा व्यवसाय मानला गेल्यामुळे विद्येचा देव गणेश ब्राह्मण मानला गेला असावा.

गणपतीला जानवे कोणी घातले या प्रश्नाचे उत्तर शोधताना यज्ञोपवीत म्हणजे जानवे का धारण केले जाते याचे उत्तर शोधले तर जरा जास्त माहिती मिळेल.

गणानां त्वां गणपतिं हवामहे कवी कविनामुपश्रवस्तमम |
ज्येष्ठराजं ब्रम्हणा ब्रम्हणस्पते आ नः शृण्वन्नूतिभि: सीद सादनम ||

(दोन्ही ओळींमधल्या शेवटच्या म चे पाय मोडलेले आहेत.)

ऋग्वेदाच्या दुसर्‍या मंडलातील तेविसाव्या सुक्तातील पहिला मंत्र हा. गणेशपुजनात हा श्लोक आवर्जून वापरला जातो कारण त्यात "गणपतिं' शब्द आहे.

हा श्लोक आपण पुजतो त्या गणपतीबद्दल नसून तो बृहस्पतीबद्दल आहे.

संस्कृतचे जाणकार यावर उजेड पाडतीलच.

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 1:03 pm | प्रसाद गोडबोले

गणपति = ब्रह्मणस्पति !!

कवितानागेश's picture

15 Mar 2013 - 11:33 am | कवितानागेश

कुणीतरी गणपतीचा बाईट घ्या रे,
" कौन है वो जिसने आपको ये जानवा घाल्या? क्या लगता हय आपको इस जानवेके बारेमे?बताईये, ये कब हुवा और क्यूं?? क्या इअसके पिछे किसीकी चाल हय? आप अनार्य होकरभी आपको ये जानवा पहनाया है, क्या इसमे किसीका फायदा है? आपको किसीने डराया तो नहीं? क्या आपने जानवा पहननेकेलिये रिश्वत ली है?...."

अवांतरः शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे> वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली! ;)

अतिअवांतरः जानवें नक्की कशासाठी घालतात? नाग कशासाठी घालतात? फुले कशासाठी वाहतात?......
.
.
.
.
कुंकू कशासाठी लावतात?

सूड's picture

15 Mar 2013 - 11:51 am | सूड

चावा ना गं माऊ ?

आदूबाळ's picture

15 Mar 2013 - 11:56 am | आदूबाळ

वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली!

वैदिक लोक पारशांचे शत्रू होते म्हणे. वेदांत असुर व्हिलन आहे आणि पारशांच्या देवाचं नाव "अहुरा" (असुर) आहे.

कवितानागेश's picture

15 Mar 2013 - 1:02 pm | कवितानागेश

वेदांमध्ये व्हिलन्स? :D

गब्रिएल's picture

15 Mar 2013 - 1:19 pm | गब्रिएल

मला तर वाटायचं जरासे पलिकडचे प्राचीन सिरियन लोक असुर असावे... सद्द्या त्या देशाचे अरबीमध्ये नाव "अस्सुरीया" असे आहे :). आणि आता तिथे काय चाललय यावरून तर पूर्ण विश्वास बसत चालला होता.

आयला अहूरा म्हणजे मला स्टार ट्रेक मध्ये कानाला कडबोळं लाऊन बसलेली कृष्णवर्णी बाई एवढंच माहित होतं!

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 12:54 pm | प्रसाद गोडबोले

अवांतरः शिवाय वेदांच्या सुरवातीला गणपतीचे सुक्त नसुन अग्निचे सुक्त आहे> वेदांची सुरुवात लिहिणारा मनुष्य पारशी असावा का अशी एक शंका मनाला चाटून गेली!

>> ऋगवेदाचे झेंद अवेस्ताशी बरेचसे सार्धर्म्य आहे. वैदिक लोक सगळेच काही भारतात आले नसणार ...काही जण मधेच स्थिरावले असणार .
पारशी लोकांमध्येही अग्निची उपासना होते ...शिवाय त्यांच्या बर्‍याचश्या मंत्रांचे संस्कृतशी सार्धर्म्य आहे ... (उदा. "उश्ता ते " तुझा उधार होवो तुला आनंद मिळो" ह्या अर्थाने . आता ह्याचे मला उषतः(क्रियापद) ते ( षष्ठी ) अशी विभक्ती दिसत आहे ....तात्पर्य बरेच सार्धर्म आहे !!)

सूड's picture

15 Mar 2013 - 1:42 pm | सूड

>>" तुझा उधार होवो तुला आनंद मिळो"

उधार मिळालं म्हणून आनंद होण्यात कसलं आलंय सुख, गिर्जाकाकूंचं आपलं काहीतरीच!!

पैसा's picture

15 Mar 2013 - 2:13 pm | पैसा

मी पण त्यावर २ मिनिटे विचार केला. आणि गोंधळले. मग ते "उद्धार" आहे असं लक्षात आलं.

- पैसाकाकू

इइइइइइइ माऊच्या मनाला कायपण चाटुन जातं बै :-/

कवितानागेश's picture

15 Mar 2013 - 11:45 pm | कवितानागेश

हो ना... काय करु गं?
मन चिकट झालं अगदी.
गणपतीला साकडं घालू का जानव्याबरोबर? :)

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2013 - 12:30 pm | प्रकाश घाटपांडे

इथल्या मंडळींनी ऐसी अक्षरे वरील तर्कतीर्थांचा गणपतीचा शोध हा धागा वाचलेला दिसत नाही.
ब्राह्मण मंडळींपैकी किती लोक कायमस्वरुपी जानवे घालतात? किती लोक 'शास्त्रापुरते' जानवे घालतात हा शोध घेणे रोचक ठरावे. असो......

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2013 - 12:34 pm | श्रीगुरुजी

"राम, कृष्ण हे देव, पण मानवी अवतार, त्यांना अधिकार आहे, पण तेथेही नन्नाच."

माझ्या घरी एका तसबिरीत श्रीराम, लक्ष्मण व जानकी उभे असून त्याच्या पुढ्यात श्रीहनुमान एका गुडघ्यावर बसलेले आहेत. हे खूप प्रसिद्ध चित्र आहे व ते अनेक मंदीरातून, घराघरातून दिसते. या चित्रात श्रीराम व लक्ष्मण यांच्या गळ्यात जानवे आहे.

प्रचेतस's picture

15 Mar 2013 - 12:41 pm | प्रचेतस

ते चित्र बहुधा राजा रविवर्म्याने काढलेले असावे.

दिवेआगरच्या चोरीच्या बाबतीत गणपतीने काय केलं हे कुणी सांगेल का?

प्रचेतस's picture

15 Mar 2013 - 12:57 pm | प्रचेतस

त्या चोरांना पकडून दिलं की राव गणपतीबाप्पानेच. असं काय करता?

ते तर पोलिसांनी सापळा लावून पकडले की राव.

माझा प्रश्न असा आहे की, चोरांनी दिवेआगरच्या मंदिरात जावून तिथला गणपतीचा सोन्याचा मुखवटा पळवून आणला. हे करताना त्यांची दोन म्हातार्‍या सुरक्षारक्षकांशी झटापटी झाली. एका सुरक्षारक्षकाला त्या झटापटीत आपले प्राण गमवावे लागले. चोरांनी तो सोन्याचा मुखवटा अहमदनगरला आणून चक्क वितळवला.

हे सगळं होईपर्यंत गणपती बाप्पा काय करत होते?
चोरांना पकडून देण्यापेक्षा बुद्धीदात्या गणरायाने चोरांनाच चोरी न करण्याची सद्बुद्धी का दिली नाही?
ना त्या सुरक्षारक्षकाला आपला जीव गमवावा लागला असता, ना स्वतःला वितळवून घ्यावे लागले असते, ना दिवेआगरकरांचा तेजीत चाललेला पर्यटनाचा व्यवसाय बुडाला असता.

प्रचेतस's picture

15 Mar 2013 - 1:16 pm | प्रचेतस

सापळा लावायची बुद्धी बाप्पानेच दिली की राव. ;)

असो, जोक्स अपार्ट, तो मुखवटा लै सुंदर होता. सोन्याच्या मूल्यापेक्षाही तो ऐतिहासिकदृष्ट्या अमूल्य होता.
कुठल्यातरी शिलाहार राजाने तो बनवून घेतला होता. साधारण १० व्या/११ व्या शतकात.

मुखवटा सुंदर होता यात वादच नाही. त्या सोन्याची झळाली चित्तवेधक होती.

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 1:16 pm | प्रसाद गोडबोले

बाप्पा काहीच करत नसतो हो ... तो ह्या सगळ्या भौतिक विश्वाच्या परे आहे ... मुखवटा सोन्याचा की मेणाचा की शेणाचा ....वितळवला की जाळला ....त्याला कसला फरक पडतोय ? तो सर्वातुन अलिप्त आहे ...

मनाचे श्लोक पहा ना पहिल्याच श्लोकात बाप्पाला " मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा " असं म्हणलय .... आता जिथुन निर्गुण आरंभते तिथे कसले आलेत हे भौतिक प्रसंग ...

ह्या मुर्ती बिर्ती ज्या आहेत त्या आपण आपल्या अंडर्स्टॅन्डिंग साठी बनवलेली साधने आहेत ...

नातुडे मुख्य परमात्मा | म्हणोनि करावी लागे प्रतिमा ||

|| मोरया ||

थोडा वेळ मुखवटयाचं वितळवणं आपण बाजूला ठेवूया.

चोरांशी झटापट करताना एका सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आणि दुसरा सुरक्षारक्षक जायबंदी झाला. त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे?

वाईट आहे म्हणुन चांगुलपणाला किंमत आहे असं काहीसं कुठेसं ऐकलं होतं बॉ !

धन्या's picture

15 Mar 2013 - 1:34 pm | धन्या

म्हणजे आपल्याला दिवसाची किंमत कळावी म्हणून बारा तासांनी तात्र होते तर. ;)

असो. पण मला गिरिजाकाकूंकडून उत्तर हवंय.

बाप्पा काहीच करत नसतो हो ... तो ह्या सगळ्या भौतिक विश्वाच्या परे आहे ... मुखवटा सोन्याचा की मेणाचा की शेणाचा ....वितळवला की जाळला ....त्याला कसला फरक पडतोय ? तो सर्वातुन अलिप्त आहे ...

हे सगळं मुखवटयाच्या बाबतीत ठीक आहे. त्या जीव गमावलेल्या आणि दुसर्‍या जायबंदी झालेल्या सुरक्षारक्षकांचं काय? देवबाप्पा त्याच्याही परे असतो का? कुणी का ना मरे, मी तर या सगळ्याहून परे असं काही असतं का बाप्पाचं?

धन्या's picture

15 Mar 2013 - 1:36 pm | धन्या

तात्र हा शब्द रात्र असा वाचावा. :)

प्रसाद गोडबोले's picture

15 Mar 2013 - 2:08 pm | प्रसाद गोडबोले

कुणी का ना मरे, मी तर या सगळ्याहून परे असं काही असतं का बाप्पाचं?
>>> हो .
(खालील स्वाक्षरी पहा )

शिल्पा ब's picture

15 Mar 2013 - 11:39 pm | शिल्पा ब

रात्र ही वाईट असते असं कोणी सांगितलं तुम्हाला? जो कोणी असेल त्याला टळटळीत उन्हात बांधुन ठेवा.

जेनी...'s picture

15 Mar 2013 - 11:44 pm | जेनी...

=)) =))

कुणाला गणपतीच्या जानव्याचं तर कुणाला रात्रीच्या वणव्याचं.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2013 - 1:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ुर्ती बिर्ती ज्या आहेत त्या आपण
आपल्या अंडर्स्टॅन्डिंग साठी बनवलेली साधने
आहेत ...

सही रे सही.

प्रसाद गोडबोले's picture

1 Apr 2013 - 8:43 pm | प्रसाद गोडबोले

बिरुटे सर , आत्ता दासबोध ऐकता ऐकता एक रेफरन्स सापडला हा खास तुमच्या साठी

धातु पाषाण मृत्तिका | चित्रलेप काष्ठदेखा |
तेथे देव कैचा मुर्खा | भ्रान्ति पडली || श्रीराम ||


हे आपुली कल्पना | प्राप्ता ऐसी फळे जाणा |
परी त्या देवाचिय्र खुणा | वेगळ्याचि || श्रीराम ||

- समर्थ रामदास
दासबोध दशक सहावा देवशोधन समास सहावा सृष्टीकथन ||

विश्वनाथ मेहेंदळे's picture

3 Apr 2013 - 1:38 am | विश्वनाथ मेहेंदळे

ते सगळे ठीक आहे, पण अहो ठोसर म्हणजे शेवटी ब्राह्मणच ना..... ;-)

प्यारे१'s picture

3 Apr 2013 - 6:36 pm | प्यारे१

तुकाराम वाणी चालेल? ;)

'केला मातीचा पशुपती' नावाचा अभंग आहे तुकाराम गाथ्या मध्ये.
त्यात माती मातीत, सोने सोन्यात, दगड दगडात मिसळते/तो नि पूजा देवापाशी पोचते असे चरण आहेत.

म्हणा तुकाराम महाराज की जय! अभंग वाचणं सोडणार नाही, जयजयकार करणं सोडणार नाही , सांगितलं तसं चुक्कून वागणार नाही . ;)

सूड's picture

3 Apr 2013 - 6:57 pm | सूड

तुकाराम वाणी चालेल?
वाण्यांच्यात पण मुंज होते म्हणे आणि तसंही जानवं घालणारे कोणीही जानवं न घालणार्‍यांच्या दृष्टीने बामणांत मोडतात. त्यामुळे वाणी चालायचा नाही. ;)

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2013 - 7:16 pm | प्रसाद गोडबोले

देहबुद्धीवेगळें जें आकारलें । निर्गुण तें सगुणपणें उभें केलें ॥१॥
देव पहा तुम्हीं देव पहा तुम्हीं । देव पहा तुम्हीं आपुले देहीं ॥२॥
उघडाचि देवो जगीं प्रकाशला । नागव्या भक्तानें देव ग्रासिला ॥३॥
चोखा म्हणे नागवें उघडें झालें एक । सहज मीपण देख मावळलें ॥४॥

दगडामातीत देव नाही ....ती केवळ आपली भावना आहे हे प्रत्येक साधु संताने म्हणुन ठेवले आहे ..

(अवांतर : ह्यालाही हरकत असेल तर शेख महंमद किंव्वा कबीर ह्यांचे साहित्य धुंडाळायला घेतो ....कसें ! =)) )

सूड's picture

4 Apr 2013 - 7:22 pm | सूड

शोधा हो गिर्जाकाकूं !!

प्यारे१'s picture

4 Apr 2013 - 7:24 pm | प्यारे१

काका आहेत ते! ;)

सूड's picture

4 Apr 2013 - 9:21 pm | सूड

आडनावभगिनीची आठवण झाली. ;)

प्रसाद गोडबोले's picture

3 Apr 2013 - 7:04 pm | प्रसाद गोडबोले

केला मातीचा पशुपती । परि मातीसी काय महंती ।
शिवपूजा शिवासी पावे । माती मातीमाजी सामावे ।।१।।
तैसे पूजती आम्हा संत । पूजा घेतो भगवंत ।
आम्ही किंकर संतांचे दास । संतपदवी नको आम्हांस ।।२।।
केला पाषाणाचा विष्णू । परी पाषाण नव्हे विष्णू ।
विष्णुपूजा विष्णूसी अर्पे । पाषाण राहे पाषाणरूपे ।।३।।
केली कांशाची जगदंबा । परी कासें नव्हे अंबा ।
पूजा अंबेची अंबेला घेणे । कांसे राहे कांसेपणे ।।४।।
ब्रह्मानंद पूर्णामाजी । तुका म्हणे केले कांजी ।
ज्याची पूजा तेणेची घेणे । आम्हा पाषाणरूप राहणे ।।५।।

असो .
साधु दिसती वेगळाले । परी ते स्वस्वरूपीं मिळाले । अवघे मिळोनि एकचि झाले । देहातीत वस्तु ॥ ||श्रीराम ||

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 1:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाली मधील हिंदू मंदिरांत (जी मुख्यतः शिवमंदिरे आहेत) गणपतीचे स्थान मंदिराबाहेरील द्वारपालाचे आहे. त्याला मंदिरात स्थान नाही...

 ..........

बाली भटकंतीच्या लेखमालेची वाट बघतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Mar 2013 - 1:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+1

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

बाली सहल माझ्या संस्मरणीय सहलींपैकी एक आहे.

मालोजीराव's picture

2 Apr 2013 - 12:20 pm | मालोजीराव

मग लवकर धागा सुरु करा कि राव !

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 8:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

सध्या जरा... "रात्र थोडी, सोंगं फार" चालू आहे. पण बालीचा धागा नक्की टाकणार.

पैसा's picture

15 Mar 2013 - 2:16 pm | पैसा

तसे आपल्याकडेही मुख्य प्रवेशद्वारावर गणेशपट्टी अगदी जुन्या देवळांतूनही असते की!

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 2:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मुख्य फरक असा की बालीतील गणपतिच्या मूर्ती मंदिराच्या द्वारपालाच्या जागी दरवाज्याच्या दोन्ही बाजूला अथवा एका बाजूला गणपती व दुसर्‍या बाजूला राक्षसासारखी तामसी मुद्रा असलेली मुर्ती असते. दोघांच्याही हातात साधारण गदेसारखा सोटा असतो.

प्रचेतस's picture

15 Mar 2013 - 3:11 pm | प्रचेतस

अगदी जुन्या नाही.
यादवकाळापासून गणेशपट्टी कोरायला सुरुवात झाली. राष्ट्रकूट/शिलाहार/चालुक्य काळात देवी, शिवपिंड किंवा नुकतीच नक्षी प्रवेशद्वारावर कोरलेली दिसते.

किसन शिंदे's picture

15 Mar 2013 - 2:18 pm | किसन शिंदे

ह्याचप्रमाणे वेरूळला हिंदू लेण्यांमध्ये शंकर पार्वती सारीपाट खेळतानाचा प्रसंग जवळ जवळ ५-६ ठिकाणी कोरलेला आहे, पण त्यापैकी एकाही शिल्पात गणपती दिसत नाही पण त्याचबरोबर कार्तिकेय मात्र दिसतो!

कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.

धन्या's picture

15 Mar 2013 - 2:27 pm | धन्या

कदाचित बाप्पा त्यावेळी पाहूणचार झोडायला महाराष्ट्रात आला असावा.

गणपती होता की सप्तमातृकांच्या रांगेत. बहुधा ही लेणी खोदेपर्यंत गणपती शंकराचा मुलगा झाला नसावा. शिवपरीवारात त्याला मागाहून समाविष्ट केले असावे, त्याचं महत्व वाढल्यानंतर.

नेहरिन's picture

15 Mar 2013 - 2:20 pm | नेहरिन

हिंदू टिळा / कुंकू का लावतात...??

उत्तर - हिंदु अध्यात्म ची खरी ओळख टिळा(तिलक) ने होते. टिळा लावल्याने
समाजामध्ये मान-सन्मान ने पाहतात. हिंदु धर्मात प्रत्येक शुभ कार्यात टिळा
लावणे हि प्रथा आहे. टिळा अनेक वस्तू आणि पदार्थाचे असतो.

उदा. हळदी,कुंकू,केशर,भस्म आणि चंदन हे प्रमुख आहे.
पण तुम्हाला माहित आहे टिळा लावण्या मागे काय भावना असते...??
पुराणामध्ये असे लिहिलेले आहे कि,संगमाच्या किनार्यावर "गंगा स्नान" केल्यानंतर
साधू\पंडित द्वारे टिळा लावल्यास मोक्ष प्राप्ती होते.कपाळावर टिळा लावण्यामागे आध्यात्मिक
महत्व आहे.आपल्या शरीरात सात (७) सुश्मउर्जा केंद्र आहे.जे अपार शक्ती चे भांडार आहे.
यांना "चक्र" असे म्हणतात.कपाळाच्या मध्ये जिथे आपण टिळा लावतो,तिथे आज्ञाचक्र असतो.
हा चक्र आपल्या शरीराचा सगळ्यात महत्वपूर्ण स्थान आहे.इथे आपल्या शरीराच्या प्रमुख तीन
नाड्या

१) इडा २)पिंगला आणि ३)सुष्मना येउन मिळतात म्हणून याला "त्रिवेणी" किवा "संगम" पण
म्हणतात.

हे गुरु स्थान आहे.इथूनच पूर्ण शरीर संचालन होते.हे आपल्या चेतनाचे मुख्य स्थान पण
आहे.याला मनाचे घर पण म्हणतात.यामुळे हे स्थान पूर्ण शरीरात सगळ्यात जास्त पूजनीय आहे.
योग मध्ये ध्यान करता वेळी याच ठिकाणी मन एकाग्र केले जाते.टिळा लावल्याने स्वभावात चांगले
बदल घडून येतात व पाहणार्याचे सात्विक प्रभाव आपल्यावर पडतो.टिळा काही खास प्रयोजना साठी
पण लावतात. जसे मोक्षप्राप्ती करायची असेल तर टिळा अंगठ्याने..शत्रू चा नाश करायचा असेल तर
तर्जनी ने,धनप्राप्ती हेतू मध्यमा नी आणि शांती प्राप्ती साठी अनामिका नि टिळा लावला जातो.

साधारणत : टिळा अनामिका द्वारे लावला जातो. आणि त्याच्यात पण चंदनाचे लावला जातो.
तिळ्यासह तांदूळ लावल्यास आई लक्ष्मी आकर्षित होते व थंडक व सात्विकता प्रदान करण्याचा निमित्त
लपलेले असते.म्हणून प्रत्येक हिंदूने टिळा जरूर लावावा.हिंदु प्रथेप्रमाणे टिळा न लावणे अशुभ आहे.

टिळा हिंदु संस्कृती ची ओळख आहे.टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

अहो हे मिपा आहे. सनातनच्या वेबसाईटवरचे चोप्यपस्ते कशाला उगीच इथे आँ?

आणि तसेही उपक्रमवर हा बाष्कळ धागा कोणीतरी आधीच टाकलेला आहे. हा पहा.

http://mr.upakram.org/node/3936

विना रेफ्रन्स चोप्यपस्तेची लाज नै आणि चिकित्सेची इच्छा नै. त्यामुळे तुमच्यासारखे लोक उगीच फालतू मजकूर का पेष्टतात? असा एक नवीन काकू सुरू करावा म्हणतोय.

टिळा लावणे हे फक्त धार्मिक नव्हे तर वैज्ञानिक कारण पण आहे.

या प्रयोगांबद्दल वाचायला आवडेल. कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2013 - 2:44 pm | अत्रुप्त आत्मा

@ कुणी केले होते हे प्रयोग? कधी केले होते? काय निष्कर्ष निघाले?>>>हरं..हरं काय हा अ धर्म...! धर्माच्या मागे लागता काय रे चोरांन्नो??? इतर सर्व क्षेत्रात प्रत्येक गोष्ट अशीच प्रयोग करून वापरात आलेली आहे,हे तु मला दाखवून देण्यासाठी त्य त्या प्रॉडक्टच्या फ्याकट्रीत ... ने ... मगच मी तुझ्यापुढे ... हरिन
http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-569.gif

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Mar 2013 - 2:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

मगच मी तुझ्यापुढे ... हरिन

नाहीतर तोपर्यंत काय ? वाघोबा ??? :))

बोला कुठल्या प्रोडक्टच्या फॅक्टरीत जायचे?

अत्रुप्त आत्मा's picture

15 Mar 2013 - 2:30 pm | अत्रुप्त आत्मा

@गणपतीला जानवे कोणी घातले ?>>> त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी घालतो ;)

हे बाकी जबरं काम केलंत बगा आत्मूस. त्वांडच बंद केलं.

काय लोकहो, मिळाले का उत्तर आता? काकू बंद करून दुसरा उघडा बघू पटापट?

त्यात काय? आंम्ही(च) दरवर्षी घालतो
जबरी

गणपतीला स्वेटर कुणी घातला? ते आधी सांगा मग तुमच्या प्रश्नांचा विचार करू. :)

प्यारे१'s picture

15 Mar 2013 - 6:04 pm | प्यारे१

मार्च आला गणपा....उकडायलंय.
अजून स्वेटर घालून ठिवलाय काय?

बाकी अपर्णा तै सारखंच... आईच्यान म्या नाय घाटलं गनपतीला जानवं!
'त्वं देहत्रयातितः, काल त्रयातित:,अवस्थात्रयातित:' म्हणजे काय कुणास ठाऊक!
जो देहांच्या, काळाच्या, अवस्थाच्या पलिकडला तो कुणाच्या कुळात जन्मला, त्याची जात कुठली, धर्म कुठला याबद्दल कुणाला माहिती आहे काय?

@धन्या,

कोण नाय सापडत म्हणून देवाला वेठीला धरा आता! हे भारीये.
भगवान ह्या शब्दाचा अर्थ ज्याच्या कडे यश, श्री, किर्ती, औदार्य, ऐश्वर्य असं सगळं (भग) अपरिमित प्रमाणात आहे तो.
हे सगळे ऐश्वर्य त्याचंच आहे. सोनं आलं कुठून? जमीन, पृथ्वी मधून. सोनं आपल्यासाठी मौल्यवान. त्याच्यासाठी काय? त्यानं काय पिक्चर मध्ये दाखवतात तसं चोरांना डांबायला पाहिजे होतं का?

डिस्क्लेमरः इथून पुढे लिहीलेलं कैच्याकै वाटणार आहे पण बेस्ट ऑप्शन हे असं आहे हे मानणं हाच आहे. ह्यालाच श्रद्धा म्हणतात.
दुसर्‍या कुणालाही त्रास न होऊ देता जे झालं जसं झालं ते स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही अन्यथा चोरानं एकाला मारलं म्हणून चोराच्या घरच्यांना मारणं असं सूडचक्र सुरु होईल.
जन्माला येतो तो मरतो हे खरं ना?
ज्याचं त्याचं आयुष्य किती असावं हे त्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार (त्यानं केलेल्या कर्माच्या आता मिळणार्‍या फळानुसार) ठरतं. उदाहरणार्थ : एखादा कैदी किती दिवस कैदेत राहावा ह्यासाठी त्यानं काय गुन्हा केलाय, त्याची तीव्रता किती हे माहिती असणं आवश्यक असतं. त्याची कैद संपली की तो मोकळा. एखादा कैद्याला कैद संपण्यापूर्वी पळून जायला मदत करतो, मुद्दाम हून बाहेर काढतो तेव्हा दोघांनाही आणखी शिक्षा ही होतेच.
हे सगळं 'गणित' आपल्याला माहिती न होता होत असल्यानं आपल्याला अतर्क्य वाटतं.
इथे असा अर्थ नाही की खून करणार्‍याचं काही नाही करायचं का? मोकळं सोडायचं का तर नाही.
आज ज्या देशात आपण आहोत त्या देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायाची वाट पहायची.
हसायला आलं ना? हे कायद्याच्या अंमलबजावणी करणार्‍या लोकांचं अपयश आहे. ते यशापयश लोकांनी ठरवावं.

चोरी करणार्‍या लोकांनी देवाच्या प्रॉपर्टीत त्यालाच पळवून नेला म्हणून आक्षेप आहे असं असेल तर देव म्हणजे नेमकं काय हे नीट माहिती करुन घ्यावं लागेल! सर्वांभूत परमेश्वर ही संकल्पना लक्षात घेतली गेली पाहिजे. (चोराच्या आत देखील देव आहेच.)
त्यानं चोरांना मारुन लगेच न्याय करावा अशी अपेक्षा आहे का?
मूर्ती मध्ये देव आहे पण फक्त मूर्ती म्हणजे देव नव्हे आणि देव रखवालदार नाही रे बाबांनो!

बाकी सुरक्षारक्षक काय करत होते? त्यांच्याकडे बंदूक नव्हती का?
त्यांना स्वतःची सुरक्षा करता आली नाही का? असे प्रश्न गेलेल्या व्यक्तीबाबत संपूर्ण सहानुभूति नि आदर ठेवून विचारावेसे वाटतात.

प्रारब्धवाद हा भारतीयांनी लावलेला एक अफलातून शोध आहे. एकदा तो स्विकारला की ब्रम्हदेवाच्या बापालाही वाद घालण्यासाठी एखादी फट त्यात शोधता येणार नाही.

बाकी चालू द्या. :)

प्रसाद गोडबोले's picture

16 Mar 2013 - 1:27 am | प्रसाद गोडबोले

प्रारब्धवाद म्हणजे काय ? हे जाणुन घ्यायला आवडेल ...

माझ्या मते भारतीयांनी माणसाच्या एकुणच अनुभवाचे मॉडेल असे बनवेले आहे

आयुष्य = ब० + ब१ * प्रारब्ध कर्म +ब२ * संचित कर्म + ब३ * क्रियामाण कर्म ( error =० )

=))

ब्रम्हदेवाच्या बापालाही >>>> ब्रह्मदेवाचे बाप कोण हे ही सांगा ?

मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो. एका विचारसरणीनुसार मध्य आशियातले लोक खोरासान,ईरान वगैरे भागात स्थिर झाले. हे अग्निपूजक होते आणि त्यांच्यात झरतुस्त्र हा पुरुष निर्माण झाला. त्याने सांगितलेला धर्म आचरणार्‍या लोकांना सद्रा आणि कश्ती (कोश्ती) परिधान करणे आवश्यक होते. ही कश्ती म्हणजे बहात्तर धागे असलेला एक दोरा असतो आणि तो कमरेभोवती विशिष्ट पद्धतीने बांधायचा असतो .हे लिहायचे कारण म्हणजे वैदिक संस्कृती आणि ही प्राचीन पारसी संस्कृती यात काही समान संकल्पना तज्ञांना आढळल्या आणि हे दोन्ही संस्कृतिगट विलग होण्यापूर्वीच्या काळातल्या एका अतिप्राचीन समान (कॉमन्)संस्कृतीत त्यांची बीजे असावीत असे मत या तज्ञांनी मांडले,जे तज्ञांमधले बहुमत आहे. म्हणजे शरीरावर दोरा धारण करण्याची पद्धत इतकी प्राचीन आहे. बौद्धांमध्ये ही प्रथा आहे तशीच ती अ‍ॅपाचे इंडियन्स मध्येही होती. आपण लहान मुलांच्या कमरेस कडदोरा बांधतो. आणखी एक स्वनिरीक्षण आहे की दुर्गम भागातले आदिवासी लोक कमरेला एक जाडजूड रस्सी बांधत. तीत कोयता,घुंगूर आणि आणखी एखादी वस्तू अडकवण्यासाठी लूप विणलेले असत.याला(ठाणे जिल्ह्यात जाखवण म्हणत) आदिम समाज रानावनात हिंडत असताना ही शस्त्रे उपयोगी पडत. काथ्याऐवजी वेलींचे दोरही पाहिलेले आहेत.(आजही मुंजीमध्ये गवताचा दोरा बांधला जातो) आणि आदिवासीच नव्हेत तर पूर्वास्पृश्य (महार इ.) लोकांनाही फक्त ही रस्सी आणि लंगोटी (कधी कधी तीही नसे) घालून वावरताना पाहिले आहे. म्हणजे जेव्हा वस्त्रे नव्हती तेव्हा कुठल्याही स्वरूपातला दोरखंड, रज्जू, पट्टा ही सतत जवळ बाळगण्याची एक आवश्यक गोष्ट होती, आजच्या सेलफोनसारखी. ती हातात धरण्यापेक्षा अंगावर घातली की हात मोकळे रहातात. जसजशी संस्कृती विकसन पावली तसतशी या आदिम गॅजेटची गरज राहिली नाही आणि केवल प्रतीकरूपाने ती उरली असावी. जसे खगोलशास्त्रामध्ये अतिप्राचीन विश्वासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी अतिदूरच्या तार्‍यांचा वेध घेतला जातो कारण त्या योगे तितक्या प्रकाशवर्षांपूर्वीचे विश्व आपण अंदाजू शकतो, तसेच आदिवासींचे निरीक्षण करताना आपल्याला खूप जुन्या संस्कृतीच्या-जी संस्कृती निर्भेळपणे फक्त या आदिवासींमध्येच टिकून राहिली आहे-खाणाखुणा पटतात.

बॅटमॅन's picture

15 Mar 2013 - 7:15 pm | बॅटमॅन

माहितीपूर्ण आणि लॉजिकल प्रतिसाद! एकदम पटेश.

श्रीगुरुजी's picture

15 Mar 2013 - 7:17 pm | श्रीगुरुजी

"मुळात जानवे घालण्याची प्रथा का निर्माण झालेली असावी असा प्रश्न मनात येतो."

जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता).

जेव्हा माणसे धनसंचय करू लागली तेव्हा ते तिजोरीत ठेवू लागली व ते चोरांपासून वाचविण्यासाठी तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली.

माणसे जेव्हा रोजचे देण्याघेण्याचे व्यवहार बार्टर पद्धतीऐवजी धन, मुद्रा, सोने इ. देऊन्/घेऊन करू लागली, तेव्हा माणसे धनसंचय करू लागली.

.
.
.

ही यादी बरीच वाढविता येईल.

दादा कोंडके's picture

15 Mar 2013 - 8:08 pm | दादा कोंडके

जेव्हा तिजोरीला कुलुप लावायला सुरूवात झाली, तेव्हापासून जानवे घालण्याची प्रथा सुरू झाली असावी (किल्ली अडकविण्याकरिता).

मग किल्ली भिजूनये म्हणून जानवं कानाला अडकव(ता)त का? :))

श्रीनिवास टिळक's picture

15 Mar 2013 - 8:18 pm | श्रीनिवास टिळक

शीख पुरुष त्यांचे किर्पण एका कापडी पट्ट्यामध्ये बाळगतात (गर्ता) जो खांद्यावरून जानव्यासारखा लटकत असतो. मला वाटतं हे जानव्याचच क्षत्रिय रुपांतर असावं.

इन्दुसुता's picture

15 Mar 2013 - 8:36 pm | इन्दुसुता

राही यांनी काही चांगले मुद्दे मांडलेले आहेत. त्यातल्या दोरखंड/ रज्जू / पट्टा या मुद्द्याशी सहमत. अँन्थ्रॉपॉलॉजी च्या काही पुस्तकात असे निरिक्षण व त्यावर भाष्य आहे असेही कुठेसे वाचल्याचे स्मरते. त्यामुळे ह्या मुद्द्याशी काहीशी सहमत. मात्र 'आपण लहान मुलांच्या कमरेस करदोडा बांधतो' ह्या वाक्याबद्दल ( मला जो अर्थ लागला ) काहीशी साशंक.

अवांतर : शरद यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर; जानवे कुणी घातले माहित नाही, पण आता गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच :D

दादा कोंडके's picture

15 Mar 2013 - 10:47 pm | दादा कोंडके

पण आता गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच :D

आमच्या भावना दुखावल्याबद्दल निषेध!

बॅटमॅन's picture

15 Mar 2013 - 10:50 pm | बॅटमॅन

तेच ना! अच्रत बव्लत!

जेनी...'s picture

15 Mar 2013 - 11:50 pm | जेनी...

अरेरे !
कोंडु काकांची भावना काकु दुखावली :(

वाईट झालं .

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2013 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

गणपतीला मंगळसूत्र घालावे म्हणते लवकरच >>> शीssssssssssss कैच्यकै विसंगत अचरट इनोद :-/

नाना चेंगट's picture

16 Mar 2013 - 9:17 am | नाना चेंगट

काय ठरलं मग?

कवितानागेश's picture

16 Mar 2013 - 11:21 am | कवितानागेश

आत्मागुर्जींनी दिली की कबूली.
आता काही चिन्ता नाही! ;)

रमेश आठवले's picture

17 Mar 2013 - 9:21 am | रमेश आठवले

गणपतीला जानवे कोणी घातले या विषयावरचा लेख वाचला. नेहमी प्रमाणे शरद यांचा लेख छान आहे आणि बुद्धीला चालना देणारा आहे.प्रतिसादही भारीभक्कम म्हणजे आत्तापर्यंत ९2 आहेत .
लेखात सुचवल्या प्रमाणे मी गुगल वर- ancient गणेश idols - यासाठी शोध केला असता बरेच धागे समोर आले.त्यापैकी एक धागा तपासला. त्यात बर्याच गणेश मूर्तींची चित्रे आहेत. तो धागा खाली देत आहे.
त्या धाग्यामधील पहिल्या दोन मुर्तींविषयी माहिती आधी पाहिली. प्रत्येक मूर्तीचा फोटो मोठा करून पाहिला असता मूर्तीच्या उजव्या हाताला पानाला भेट द्या असा संदेश येतो. तो पहिला असता या दोन्ही मूर्ती आंध्र प्रदेशच्या मेहबूबनगर जिल्ह्यातील आहेत व १००० आणि ११४० वर्षाच्या जुन्या आहेत असे लिहिले आहे. दोन्ही मूर्तींच्या गळ्यात जानवे दिसते. इतर मूर्तींच्या फोटोंचा शोध घेतल्यास आणखी उदाहरणे सापडतील असे वाटते.
.https://www.google.co.in/search?q=ancient+ganesh+idols&hl=en&tbm=isch&tb...

वैभवजोशि's picture

18 Mar 2013 - 11:18 am | वैभवजोशि

मनुवादि लोकन्चा प्लन असेल ह

यज्ञोपवीत/जानवे हे बहुतांश देव-देवतांच्या मुर्तीवर पहता येते. पण काही योगी/ तपस्वी /ऋषींनीही धारण न केल्याचे अढळते.
काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम)
यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते, याच प्रमाणे विष्णुच्या पशू रुपास जानवे नाही (मत्स्य-कुर्म) पण वराह, नरसिंह आणि वामनावतार पुढे जानवे दिसते, सगळीकडे रावणानेही जानवे घातलेले दिसेल.
तंजावुर - ब्रहदिश्वर मंदिर (इ.स.१०००)गणपतीच्या काही शिल्पांत/चित्रात काहीत गणपतीला जानवे नाही तर काहीत आहे. पण यात शंकराला जानवे नक्की आहे. हम्पीलाही एकाच्या गळ्यात आहे तर दुसर्‍या गणपतीच्या नाही.
इतरदेवांविषयी -
१) हळीबेड-बेल्लूर - (११०० ते १२०० शतक) मंदिर समुह -ब्रह्मा-विष्णू-महेश-सुर्य-इंद्र इत्यादी देव-देवतांच्या तसेच धर्मपाल / न्यायपाल (जज्ज) मुर्तीवर जानवे स्पष्ट पणे कोरलेली आहेत.
२) मदुरै - गोपुरांवरच्या लोकांनी जानवे घातल्याचेही देसते (इ,पु ३५०)
३) महाबलीपुरम (६०० ते ७०० शतक) - अर्जुनाची तपश्चर्या (गंगावतरण शिल्प राजा-हरीश्चचंद्र) या शिल्पातल्या अनेक देवांनी /लोकांनीही जानवे घातले आहे.
४) सुब्रमण्यम स्वामी (सु-ब्राह्मण्यम) अर्थात कार्तिकेयाच्य मुर्तीवरही जानवे आहे.
अन्य मंदिर गोपुरे - तिरुपती - बालाजीच्या मुर्तीवर्ही जानवे आहे.
५) तिरुपती बालाजीही जानवे घालतो.

आर्य (बेंगळूरु / मुंबई)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2013 - 8:39 am | अत्रुप्त आत्मा

@काही शिल्पांत देवींनाही (स्त्रि देवतांना) जानवे दखवले आहे. (उदा: महिषासुर मर्दीनी महाबलीपुरम)
यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते,
>http://mimarathi.net/smile/dash1.gif

शरद's picture

4 Apr 2013 - 6:36 am | शरद

श्री. आठवले, आर्य व अतृप्त आत्मा यांना मनापासून धन्यवाद. आजपर्यंत इतकी शिल्पे पाहूनही या एका दृष्टीतून
कधी शोधले नव्हते. गणपतीच्या अनेक मूर्तीत जानवे आढळत नाही हे खरेच पण आता काही मूर्तीत ते आढळते हेही मान्य. स्त्रियांच्या मूर्तीत जानवे दिसले किंवा तसा दागिना आढळतो हे पाहिल्यावर गंमत म्हणजे बुद्धाच्या मूर्तीतेत तो दिसला.
शरद

इन्दुसुता's picture

5 Apr 2013 - 8:05 am | इन्दुसुता

यावरुन हे सिद्घ होते की पुरुषांबरोबर स्त्रियांनाही जानवे घालता येत होते

अगदी बरोबर.. मग याच प्रमाणे गणपती बाप्पाला ( आणि इतर पुरुषांना ) मंगळसूत्र का घालता येऊ नये? बायका किंवा पुरुषांनी ( ज्याला जे ) हवे असेल ते घालावे.. जानवे / मंगळसूत्र :) :)
--ओरिजिनल मुद्दा न सोडणारी --सुता
अवांतर : उग्गाच काहीतरी 'अचरट विनोद' वगैरे म्हणत बसतात झालं...

गोव्यातील महालसा (म्हाळसा नव्हे) देवीनेही यद्नोपवीत धारण केलेले आहे.

मृत्युन्जय's picture

4 Apr 2013 - 2:55 pm | मृत्युन्जय

Mahishasur Mardini

Arjun 1

Arjun 2

प्रचेतस's picture

4 Apr 2013 - 3:05 pm | प्रचेतस

महिषासुरमर्दिनी.
फोटो कुठले आहेत रे?

मृत्युन्जय's picture

4 Apr 2013 - 3:10 pm | मृत्युन्जय

नुकतेच महाबलिपुरमला जाउन आलो आहे. तिथली ही ३ छायाचित्रे पण चित्रात जानवे कुठे दिसत नाही.

Arjun 2

प्रचेतस's picture

4 Apr 2013 - 3:17 pm | प्रचेतस

जानवे कुठेच नाही पण महिषासुरमर्दिनी, महिष आणि दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा अप्रतिम कोरलीय रे.

धागा टाक की.

मृत्युन्जय's picture

4 Apr 2013 - 3:28 pm | मृत्युन्जय

टाकायचाय रे. इतर काहितरी मध्येच येते. प्रभुंच्या धाग्यामुळे याला थोडा वेळ लागला :)

दोघांमध्ये खालच्या बाजूस असलेली चामुंडा

वल्ली, बाळबोध प्रश्न विचारते की ते चामुंडेचे शिल्प आहे हे तुम्ही कसे ठरवले? उलगडून सांगा.

चामुंडा म्हणजे स्त्रीरूपी अस्थीपंजर. गळ्यांत किंवा पोटात विंचू कोरलेला, काही वेळा चेहरा कवटीसदृश तर काहीवेळा स्त्रीरूपी. शस्त्र खङग.
इथे पोटातल्या बरगड्या स्पष्ट दिसताहेत.

अच्छा! सह्ही आहे हे. धन्यवाद. असं काही उलगडून दाखवणारं लिहा एकेक शिल्प घेऊन ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Apr 2013 - 8:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाल्लीशेठ, हे असलं सगळं ज्ञान पुस्तक रुपाने संग्रहित करून ठेवा. हे सहसा कुठे सापडत नाही आणि दुर्लक्षीत होऊन नष्ट होऊ राहिलंय.

धन्यवाद यशोधरा आणि इस्पिकचा एक्का
तसंही लेखांमध्ये शिल्पांच्या अनुषंगाने लिहित असतोच पण त्यावर एखादा स्वतंत्र लेख कधीतरी लिहिनच.

तोवर ही पहा चामुंडेची वेगवेगळी रूपे

पिंपरी दुमाला
a

भुलेश्वर
a

खिद्रापूर
a

यशोधरा's picture

7 Apr 2013 - 5:27 pm | यशोधरा

तो भुलेश्वराचा फोटो आहे माझ्यापाशी :) खिद्रापूर बघायचे राहिले आहे.

अर्धवटराव's picture

5 Apr 2013 - 12:21 am | अर्धवटराव

वल्ली शेठ, आता या अस्थीपंजर स्त्रीरुपावर, पोटावरच्या विंचवावर पण थोडा प्रकाश टाका कि :)
नेमकं काय इंडीकेट करायचं आहे शिल्पकाराला? काहि स्टोरी आहे का त्या मागे? कुठली तत्कालीन सामजीक प्रथा वगैरे??

अर्धवटराव

अभ्या..'s picture

5 Apr 2013 - 1:08 am | अभ्या..

वल्लीदादा एकेका स्वतंत्र शिल्पाकॄतीचे रसग्रहणाची सुरुवात महाबलीपुरमच्या या "गंगावतरणा" नेच कर. इतक्या आकृती आहेत त्यात आणि प्रत्येक आकृती अभ्यासाचा विषय आहे.

अर्धवटराव's picture

5 Apr 2013 - 3:27 am | अर्धवटराव

आता या लेखमालेची वाट बघणं आलं.

अर्धवटराव

चामुंडा ही सप्तमातृकांमधली एक देवता. या देवतांचे आर्यीकरण होतांना यातल्या वाराही, ऐंद्री, वामनी(ब्राह्मणी), नारसिंही इत्यादी देवता मूळच्या वैदिक अंशाच्या राहिल्या तर माहेश्वरी, कौमारी आणि चामुंडा या पूर्णपणे त्यांच्या अनार्य रूपांतच स्थापिल्या गेल्या.
अस्थीपंजर, गळ्यातला विंचू, नरमुंडमाला, आणि प्रेतावर उभी असलेली चामुंडा ही सगळी पूर्वीची अनार्य प्रतिके. चामुंडेचेच अधिक सोज्ज्वळ प्रतिक म्हणाजे काली असे मला वाटते.
चामुंडा सप्तमातृकांबरोबरच शाक्तउपासनेत पण उचलली गेली ती तिच्या भयप्रद स्वरूपामुळेच बहुधा. त्यामुळेच चामुंडेची शिल्पे सप्तमातृकापटाव्यतिरिक्त इतर ठिकाणीही स्वतंत्रपणे कोरलेली आढळतात (मुख्यतः प्राचीन शिवमंदिरांत तर हमखास दिसतातच)

अर्धवटराव's picture

5 Apr 2013 - 8:44 am | अर्धवटराव

पुरा पिच्चर दिखाएबिगर हम बिन्ती करना छोडुंगा नहि :)

अर्धवटराव

प्रचेतस's picture

5 Apr 2013 - 9:01 am | प्रचेतस

दिखायेंगे. जरूर दिखायेंगे. :)

बॅटमॅन's picture

4 Apr 2013 - 6:20 pm | बॅटमॅन

"आक्रमण!!!!!!!!!!!" स्टाईलचे शिल्प लै आवडले. एकच नंबर!!!!!!