सावध रहा!!

अनन्न्या's picture
अनन्न्या in काथ्याकूट
16 Feb 2013 - 7:09 pm
गाभा: 

आजच्या लोकसत्तामध्ये फेबु वर चॅट करून फसवलेल्या एका तरूणाची बातमी वाचली. मुंबई व्रुत्तांत मध्ये त्यावर सविस्तर बातमी आहे. एका मुलग्याने मुलगी असल्याचे भासवून मैत्रीचे जाळे टाकले आणि एक सुंदर मुलगी आपल्याला फ्रेन्ड रीक्वेस्ट टाकते हे पाहताच तो बरोब्बर जाळ्यात अडकला.
अशी एक टोळीही कार्यरत असल्याचे वाचले ज्यामध्ये एक मुलगी सुध्दा सामिल होती. श्रीमंत तरूण पाहून त्याच्याशी मैत्री वाढ्वायची, आणि एक दिवस घरी एकटीच आहे असे सांगून भेटायला बोलवायचे. तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात. सुदैवाने ही टोळी पकड्ली गेली पण अजून असे किती सापळे आंतरजालावर असतील कोण जाणे!!
आणखी कोणाला काही माहिती असेल तर जरूर शेअर करा. चांगल्या गोष्टींबरोबर वाईटही येतेच!! सावध रहा!! सर्व मिपाकर आंतरजालावर सराईतपणे वावरणारे आहेत, तरीही काळजी घ्या!!

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

16 Feb 2013 - 7:14 pm | कपिलमुनी

अनेक टोळ्या आहेत ..त्यांना आम्ही कंपू म्हणतो ..ते सुद्धा एकटा दुकटा आय डी बघून, बदडून, लुटून पलायन करतात.

श्री गावसेना प्रमुख's picture

16 Feb 2013 - 7:17 pm | श्री गावसेना प्रमुख

द्या टाळी

कानडाऊ योगेशु's picture

16 Feb 2013 - 7:32 pm | कानडाऊ योगेशु

द्या टाळी नव्हे द्या टोळी!

(कंपुप्रवेशोत्सुक)योगेश

पण त्या वर काथ्यात उल्लेखलेल्या टोळ्यांशी संबंधीत नाहीत!! जरा टोळीवाल्याना विचारा!! नाहीतर टोळधाड पडायची तुमच्यावर!! अर्थात तुम्ही त्याचे मेंबर असलात तर चालू द्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Feb 2013 - 7:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नुकताच अनुभव घेतलाय इथे त्याचा.

गँग्ज ऑफ मिसळपाव असा चित्रपट बनेल त्यातून :)

आनंद घारे's picture

17 Feb 2013 - 10:22 am | आनंद घारे

ते सुद्धा एकटा दुकटा आय डी बघून, बदडून, लुटून इथपर्यंत ठीक आहे, म्हणजे मला तसा अनुभव आला नाही, इतरांना आला असेल. पण पळून जाणार कुठे आणि कशाला?

संजय क्षीरसागर's picture

16 Feb 2013 - 7:59 pm | संजय क्षीरसागर

आणि आपण मग दुसर्‍याला दोष देतो.

फेस बुकच काय घेउन बसलात इथे काही कमी नाहीत.. ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2013 - 8:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एखादं उदाहरण ?

पक पक पक's picture

16 Feb 2013 - 9:49 pm | पक पक पक

व्यनी करतो.. ;)

प्रचेतस's picture

16 Feb 2013 - 10:17 pm | प्रचेतस

मला पण.

पक पक पक's picture

16 Feb 2013 - 11:10 pm | पक पक पक

च्यायला ! ह्याला चावट्पणा म्हणावा काय आम्ही... ? ;)

प्रचेतस's picture

16 Feb 2013 - 11:15 pm | प्रचेतस

कुतुहल म्हणायचं हो.

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 11:21 pm | अभ्या..

कुतुहल म्हणजे ते बालसुलभ वगैरेपैकी काय? ;) ए कुतु हल

प्रचेतस's picture

16 Feb 2013 - 11:24 pm | प्रचेतस

=))

निरागसपणातले कुतुहल :)

अभ्या..'s picture

16 Feb 2013 - 11:33 pm | अभ्या..

वल्ली दादा मीपण खराच निरागस आहे रे. हे असले फसवणे वगैरे भयानकच आहे. आता सावधच राहायला पाहिजे ह्या अस्ल्या
प्रवृत्तीपासून. यापुढे मी असल्या मुलींच्या नावांच्या आयडींच्या बिल्कुल नादी लागणार नाही.

वल्ली दादा मीपण खराच निरागस आहे रे.

अरे अभ्या पण वल्ली दादा निरागस नाही रे राहीला आता.... ;)

यापुढे मी असल्या मुलींच्या नावांच्या आयडींच्या बिल्कुल नादी लागणार नाही.

अन एवढापण निरागसपणा चांगला नाही... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Feb 2013 - 8:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> व्यनी करतो..
अजून काय व्य.नि. आला नाही.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

17 Feb 2013 - 8:32 am | श्री गावसेना प्रमुख

सांगायच्या बाता दुसरे काय

संजय क्षीरसागर's picture

17 Feb 2013 - 2:38 pm | संजय क्षीरसागर

हे घ्या

मुक्तपीठावरचे ब्रम्हे आठवले!

=))

ब्रह्मे काका इझ माय फेवरेट काका ...
लोकं सीरिअस झालि कि ब्रह्मे काका अवतरतात .. मज्जा येते मग ;)

खटासि खट's picture

17 Feb 2013 - 11:16 am | खटासि खट

प्राचीन काळापासून एकट्या दुकट्या तरूणांना सुंदर तरुणींकडून फसवण्याचे प्रकार घडत असल्याचे ब्रह्मेसंहितेवरून सिद्ध झालेले आहे. तरीही बाप्येमुलगे आजही फसतात याला काय म्हणावे ? बांड तरूणांनी चाटमसाल्यावर शक्यतो अनोळखी मुलींना आपला फोन नंबर देऊ नये, मुलींना भेटायला जाताना एकट्या दुकट्याने जाऊ नये, तशीच वेळ आली तर सार्वजनिक ठिकाणी भेटण्यास बोलावे. सिनेमाला जाऊ नये, तिथे काळोख असतो. हे सर्व गेली अनेक वर्षं सांगूनही मुलं फसतात यात फेसबुकाचा काय दोष म्हणा !!
या प्रकरणात वाइट इतकंच वाटलं कि दोस्ताना बदनाम हुआ !

अधिराज's picture

16 Feb 2013 - 11:36 pm | अधिराज

एवढ्या काळजीने सावध केल्याबद्दल शतशः धन्यवाद!

स्त्रियांना उपभोग्य वस्तु मानणार्‍यांचा धिक्कार असो...

कपिलमुनी's picture

19 Feb 2013 - 2:00 am | कपिलमुनी

पुरुष ही येडा बनवून उपभोगायची गोष्ट झाली आहे ..
हव तर ब्रम्हे काकांना विचारा

अग्निकोल्हा's picture

19 Feb 2013 - 3:33 am | अग्निकोल्हा

उपभोगायची गोष्ट झालि आहे काय ?
अहो पुरुष ही उपभोगायची गोष्ट म्हणुन अगदी फार सुरुवातिपासुनच गणली गेली आहे. आणि ही गोश्ट इतकी मुळ धरली गेली आहे की मुळात पुरुषांच शोषण होतय ही भावनाच त्याच्यामधे रुजु न देण्यापासुन पिढ्यान पिढ्या पध्दतशीर त्याचं ब्रेन वॉशिंग झालेलं आहे... स्त्रियांच्या बाबतीत मात्र हिच सिमारेखा अतिशय थंड डोक्याने व विचारपुर्वक केवळ शारीरीक पातळीपर्यंतच आणुन रोखुन धरली गेली आहे जेणे करुन त्या उपभोग्य वस्तु शोषित वगैरे वगैरे आहेत याचे विझिबल भांडवल करता यावे...

बॅटमॅन's picture

19 Feb 2013 - 12:08 pm | बॅटमॅन

अबे तुम्ही दोघे एकाच निष्कर्षाप्रति आलेले आहात :) आणि तुझा निष्कर्ष पटला हेवेसांनल.

स्त्रियांना उपभोग्य वस्तु मानणार्‍यांचा धिक्कार असो...

अस म्हण्ल्याने नक्की काय होत... :bigsmile:

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2013 - 9:05 am | ज्ञानोबाचे पैजार

चला.....यापासुन आम्हाला तरी काही धोका नाही
आम्ही तरुण नाही, श्रीमंतही नाही आणि आमचे चे.पु.वर खातेही नाही
एकदम मस्त वाटतय त्यामुळे.

नाहीतर हल्ली त्या मंगळसुत्र चोरीच्या बातम्या वाचुन रस्त्यावरुन चालायची सुध्दा भिती वाटते. तसे काही या बातमी मुळे होणार नाही.

पैजारबुवा,

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 10:19 am | श्रीरंग_जोशी

मंगळसुत्र चोरीच्या बातम्या वाचुन रस्त्यावरुन चालायची सुध्दा भिती वाटते

पैजारबुवा, गळ्यात सोन्याच्या साखळ्या घालून फिरता की काय?

पक पक पक's picture

17 Feb 2013 - 10:44 am | पक पक पक

सोन्याच्या साखळ्या

ते मंगळ्सुत्रा बद्द्ल बोलत होते.. ;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

17 Feb 2013 - 12:24 pm | ज्ञानोबाचे पैजार

जोशी सर,
आहो बायकोच्या मंगळसुत्रा बद्दल बोलत होतो आम्ही. तिच्या गळ्यातले ओढले तरी खिसा आमचाच फाटणारना?
त्या मुळे ती बाहेर गेली तरी आम्ही घरात घाबरेघुबरे होतो.

आम्हाला सोसायटीची विलेक्षन जिंकता येत नाही. नगरशेव्हक कसे बनणार. आणि गळ्यात चैनी घालायचा हक्क / मान नगरशेव्हकाचाच असतो.

सध्या आम्हाला फक्त जानवेच परवडते.

पैजारबुवा,

आम्ही तरुण नाही, श्रीमंतही नाही आणि आमचे चे.पु.वर खातेही नाही >>>

हा हा हा हा , पैजारबुवा , + मिड लाईफ क्रायसिस पण नाही असे ही लिहायला हवे होते ;)

नाना चेंगट's picture

17 Feb 2013 - 11:55 am | नाना चेंगट

विचारवंत पण नाही हे सुद्धा लिहीत जावे अधून मधून

परिकथेतील राजकुमार's picture

17 Feb 2013 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

तो तरूण मुलगी एकटी आहे, अशी स्वप्ने रंगवत तिच्या घरी पोहोचतो तर तिचे साथिदार त्याला बदडून, लुटून पलायन करतात.

घर पण सोडून पलायन करतात ? कसे परवडत असेल ?

बाकी असे लूटमार करणारे नाहीत, पण मुलगा असून, मुलगी असल्याचे भासवत मिपावरील स्त्री सदस्यांशी गबोल्यावर गुलुगुलु गप्पा मारणारे काही आयडी मिपावरती देखील होते म्हणे. ;)

मृत्युन्जय's picture

19 Feb 2013 - 12:31 pm | मृत्युन्जय

हो ना राव. खिशातल्या थोड्या दिडक्यांसाठी आख्खे घर सोडायचे म्हणजे अवघडच आहे. सगळेच काही ब्रह्मे काकांसारखे ४००० रुपये (२० वर्षांपुर्वीचे) खिशात घेउन हिंडण्याएवढे श्रीमंत नसतात

इरसाल's picture

19 Feb 2013 - 10:00 am | इरसाल

दीवसापुरवी कुथे तरि वाचल्ले होते की मुलगि असल्याचे बासवुन एकाला वेबक्यामेर्यावर कपडे काडायला लावुन फेसबुकावर फटु टाकायची धमकी देवून पैशे उकलले होते म्हने.

मीपन आजकाल सुद्द लिहिन्याचा सराव कर्त आहे.(काही आयदी परमाने)

इथे पाहते तर....