अरुंधती रॉय वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा काय?

बाळकराम's picture
बाळकराम in काथ्याकूट
14 Feb 2013 - 4:41 am
गाभा: 

भारताविरुद्ध सतत गरळ ओकणार्‍या अरुंधती रॉयनी ही मात्र कमालच केलीये.

ह्या नतद्रष्ट बाईला देशद्रोहाच्या, किमान राज्यद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला हवी इतका गंभीर आणि खळबळजनक गुन्हा तीने केला आहे.

तुम्हाला काय वाटतं?

संतप्त-
बाळकराम

प्रतिक्रिया

खटासि खट's picture

14 Feb 2013 - 5:40 am | खटासि खट

संसदेला टॉयलेट म्हटलं तरी देशद्रोह ठरत नाही हे नुकतंच कोर्टाने सांगितलंय. ;)
हा हल्ला ज्या वेळी झाला होता त्या वेळच्या काहींच्या मासलेवाईक प्रतिक्रिया अजून लक्षात आहेत. त्याच लोकांकडून हल्ल्याची निर्भत्सना होताना बघून डोकं काम करेनासं झालंय.

चिंतामणी's picture

14 Feb 2013 - 8:38 am | चिंतामणी

त्यांनीसुद्धा असेच तारे तोडले आहेत.

यु.पि.ए.चा घटक आणि काश्मीरमधे काँग्रेससह सत्तेत असलेल्या मंत्रीमंडळाचे हे प्रमुख आहेत.

विकास's picture

14 Feb 2013 - 8:47 am | विकास

अरूंधती रॉय यांचे विचार मला अजिबात पटत नाहीत. त्या समाजभेदी आहेत आणि त्यांचे लेखन वाचणार्‍या पब्लीकची त्या दिशाभूल करत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. तरी देखील ज्या लोकशाहीला डाग पडला आहे असे त्या म्हणत आहेत त्या लोकशाहीच्या तत्वानुसारच त्यांना लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आणि ते त्यांना मिळाले पाहीजे...

"I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." - Evelyn Beatrice Hall

हंस's picture

14 Feb 2013 - 10:45 am | हंस

+१

श्रावण मोडक's picture

14 Feb 2013 - 10:50 am | श्रावण मोडक

समजा एखाद्याने या लेखनाच्या आधारे फिर्याद दिली, त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळले तर अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा लागेल. तसे झाले तर, माझ्या मते, तशा स्थितीत अरुंधती रॉय यांनी त्या कारवाईला सामोरे गेले पाहिजे. तेथे या स्वरूपाच्या नकारात्मकतेला महत्त्व नसावे. कारवाईतून तावून-सुलाखून बाहेर येणे हे प्रेयस नसते, पण श्रेयस असते, दीर्घकालीन सामाजिक प्रक्रियांसाठी. अर्थात, येथे सापेक्षतेला खूप वाव आहे आणि त्यामुळे डावे-उजवे होण्याचा धोका मोठा आहे. पण नेमके तसे होऊ नये हीच नेतृत्त्वाकडून (हे नेतृत्त्व लोकप्रतिनिधींचे असेल, वा नोकरशाहीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे असेल) अपेक्षा असते.

सुनील's picture

14 Feb 2013 - 10:55 am | सुनील

सहमत.

@ विकास

I disapprove of what you say, but I will defend to the death your right to say it." - Evelyn Beatrice Hall

माझ्या माहितीनुसार, सदर अर्थाचे वाक्य वोलतैर (Voltaire) यांचे आहे.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 12:21 pm | बॅटमॅन

+१.

मीपण व्हॉल्टेअरच्या नावाखालीच ते वाक्य वाचलेय.

विकास's picture

14 Feb 2013 - 5:33 pm | विकास

ते वाक्य व्होल्टेअरचे आहे असा गैरसमज आहे. वास्तवीक एव्हलीन हॉलने लिहीलेल्या व्होल्टेअरच्या चरीत्रात, व्होल्टेअर कसा होता (त्याचे जीवनाचे तत्व कसे होते) हे स्पष्ट करण्यासाठी म्हणून तीने हे वाक्य लिहीले होते. पण त्यामुळे ते व्होल्टेअरचे आहे असा गैरसमज झाला.

बाकी व्होल्टेअरचे एक वाक्य मात्र आत्ता लागू होत आहे असे वाटते: history is a bag of tricks we play on the dead :)

सुनील's picture

14 Feb 2013 - 6:25 pm | सुनील

माहितीबद्दल धन्यवाद !

नितिन थत्ते's picture

14 Feb 2013 - 12:30 pm | नितिन थत्ते

श्रामोंशी सहमत आहे.

गांधी नेहमीच जी काय शिक्षा होईल ती भोगायला तयार असत.

विकास's picture

14 Feb 2013 - 5:38 pm | विकास

समजा एखाद्याने या लेखनाच्या आधारे फिर्याद दिली, त्यात सकृतदर्शनी तथ्य आढळले तर अरुंधती रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवावा लागेल. तसे झाले तर, माझ्या मते, तशा स्थितीत अरुंधती रॉय यांनी त्या कारवाईला सामोरे गेले पाहिजे.

गुन्हा नोंदवता आला तर कारवाईस सामोरे जावेच लागेल, बाई देशाच्या कायदेकानू पेक्षा मोठ्या नाहीत. पण देशाचे कायदेकानू, घटना देखील तकलादू नाही आणि मुख्य म्हणजे देश इतका दूर्बल नाही की एका लेखाला देशद्रोह म्हणावे. हा लेख म्हणजे काय, "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?" पठडीतली घटना आहे का? (जरी तो प्रश्न सर्वांनाच आत्ता जास्त पडत असला तरी! ;) ) थोडक्यात विचार-लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आता ब्रिटीश राज नाही...

श्रावण मोडक's picture

14 Feb 2013 - 6:17 pm | श्रावण मोडक

स्वातंत्र्य आहेच. त्याविषयी दुमत नाही. त्या स्वातंत्र्याचे एक मोल आहे इतकाच माझा मुद्दा आहे.

शुचि's picture

14 Feb 2013 - 6:04 pm | शुचि

+१

पुण्याचे वटवाघूळ's picture

17 Feb 2013 - 6:54 pm | पुण्याचे वटवाघूळ

अरूंधती रॉय यांचे विचार मला अजिबात पटत नाहीत. त्या समाजभेदी आहेत आणि त्यांचे लेखन वाचणार्‍या पब्लीकची त्या दिशाभूल करत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे.

अरूंधती रॉयला आदरार्थी बहुवचन वापरावे या योग्यतेची ती नाही तेव्हा तिच्याविषयी एकेरीच उल्लेख करत आहे. ती समाजभेदी आहे वगैरे गोष्टी मान्य.

तरी देखील ज्या लोकशाहीला डाग पडला आहे असे त्या म्हणत आहेत त्या लोकशाहीच्या तत्वानुसारच त्यांना लेखन-भाषण स्वातंत्र्य आहे. आणि ते त्यांना मिळाले पाहीजे...

तरी आपल्याला हे स्वातंत्र भारतातल्या लोकशाहीने दिले आहे आणि त्या स्वातंत्र्याचा उपभोग जबाबदारीनेच घ्यायला हवा हे असल्या नतद्रष्टांना कोण कळवून देणार? संसदभवनावरचा हल्ला जर यशस्वी झाला असता तर भारतावर खूप मोठे संकट कोसळले असते.भारताच्या लोकशाहीच्या मुळावरच असा हल्ला झाल्यास असे वाटेल ते बरळायचे स्वातंत्र द्यायला ती लोकशाहीच शिल्लक राहणार नाही याची जाणीव अरूंधती रॉयला नाही का?मग कोर्टाने रितसर खटला चालवून फाशीची शिक्षा ठोठावलेल्या अफझल्याचे समर्थन ती कशी करू शकते?अशा लोकांना ती जाणीव होण्यापुरती तरी काहीतरी शिक्षा करायला हवी. तेव्हा या बयेला तिचा वाटेल ते बरळायचा हक्क मिळायला हवा याला -१.

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2013 - 8:54 am | श्रीरंग_जोशी

आधीच भारतीय न्यायव्यवस्था प्रलंबित खटल्यांच्य ओझ्याने पिचून गेली आहे. अन अशा लोकांना खटला दाखल झाल्याने अधिक प्रसिद्धी मिळून त्यांचा हेतू सफल होईल.

प्रसाद१९७१'s picture

14 Feb 2013 - 11:01 am | प्रसाद१९७१

अरुंधती रॉय सारखी बांडगुळे फक्त प्रसिद्धी साठी जगत असतात. प्रत्येक गोष्टीवर काय बोलले की प्रसिद्धी मिळेल हे त्यांना पक्के माहिती असते. त्यांच्या कडे दुर्लक्ष केले तर आपोआप च ही लोक संपतील.

न्यायालयात दावा ठोकला तर ह्यांना भाषणबाजी करायला मोठा फोरम च मिळेल.

सुहास..'s picture

14 Feb 2013 - 11:12 am | सुहास..

मुळात लेखात अरूंधती रॉय ला काय म्हणायचे आहे तेच कळले नाही :(

एकीकडे ती पोलीस तपासाला नावे ठेवते तर दुसरीकडे बीजेपी च्या नेत्यांची सेन्टेन्स काय आहेत ते लिहीते आहे. पोलीस तपासाच्या आधारावर कोर्ट शिक्षा ठोठवते , मग आरोपी कुणीही, कुठल्याही प्रांताचा, धर्माचा असला तरी न्यायदेवतेला त्याने फरक पडत नाही, आणि जर तो पडणार असेल तर तो योग्य त्या मार्गाने कोर्टापुढे ठेवावा लागतो , जनहित याचिका ई.ई. ...

तिथे उसगावात बसलेलं ईन्टेलेक्च्युल किती सडलेल आहे, हेच यावरून दिसते ..असो ..

जय जवान जय किसान जय शेझवान ;)

नाना चेंगट's picture

14 Feb 2013 - 12:06 pm | नाना चेंगट

अरुंधती रॉय विचारवंत आहे.

श्रावण मोडक's picture

14 Feb 2013 - 12:20 pm | श्रावण मोडक

=))

सुहास..'s picture

14 Feb 2013 - 1:54 pm | सुहास..

;)

श्रीगुरुजी's picture

14 Feb 2013 - 2:12 pm | श्रीगुरुजी

हाच लेख "हिंदू" दैनिकात १० फेब्रुवारी २०१३ ला छापला आहे.

http://www.thehindu.com/opinion/lead/a-perfect-day-for-democracy/article...

एकच लेख दोन वेगवेगळ्या दैनिकात छापता येतो का? आपल्या प्रकाशनात छापल्या गेलेल्या लेखावर दैनिकाचा प्रताधिकार नसतो का?

अरुंधती रॉय सारखे निधर्मांध प्रसिद्धीसाठी हपापलेले असतात. त्यामुळे प्रस्थापित गोष्टींना विरोध करूनच ते प्रसिद्धि मिळवितात. पूर्वी देखील रामायणातील कैकेयी, रावण, पेशवाईतील आनंदीबाई इ. ना निर्दोष सिद्ध करण्याची एक लाट आली होती. आता देखील कसाब, अफझल गुरूच्या बाजूने लिहिले की अमाप प्रसिध्दी मिळते हे त्यांना माहीती आहे. सुरवातीला अनेक वर्षे, संसदेवरील हल्ला हे वाजपेयी व अडवाणींनी रचलेले कारस्थान आहे असे ही रॉय बाई म्हणत होती. दंगल घडवून आणण्यासाठीच संघाच्याच लोकांनी गोध्रा येथे रेल्वेचा डबा पेटवून दिला, अमेरिकेत जागतिक व्यापार
केंद्रावर आदळलेली विमाने हे धाकट्या बुशचे कारस्थान होते असे जावई शोध हेच निधर्मांध लावत असतात.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2013 - 3:30 pm | परिकथेतील राजकुमार

कोण अरुंधती रॉय ?

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 5:18 pm | बॅटमॅन

+१.

एक नंबरची मूर्खागमनी बाई आहे. तिला दुर्लक्षाने मारणे हेच योग्य.

मालोजीराव's picture

14 Feb 2013 - 5:38 pm | मालोजीराव

कोण अरुंधती रॉय ?

अरुंधती रॉय विचारवंत आहे.

मग इम्रान हाशमी ब्रह्मचारी साधू आहे, आशिष नेहरा जलदगती गोलंदाज आहे, आणि युपीए सरकार अत्यंत सज्जन नेत्यांनी भरलेलं आहे... :D

वाह्यात कार्ट's picture

14 Feb 2013 - 6:37 pm | वाह्यात कार्ट

वाचून वारलो !! :)

रमेश आठवले's picture

14 Feb 2013 - 5:14 pm | रमेश आठवले

दोन वेळा परीक्षण करून सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम केली.कायद्यानुसार ह्याच्या नंतर फक्त राष्ट्रपति यांना आपल्याला जास्त अक्कल आहे असे दाखवण्याचा अधिकार आहे. इतरांनी असे उद्योग केले तर तो फक्त मतस्वातंत्र्य या अधिकाराचा दुरुपयोग आहे.
यावर दुर्लक्षस्वातंत्र्य या मुलभूत अधिकाराचा सर्व माध्यमे आणि नागरिक यांनी उपयोग केला पाहिजे..
अन्नुलेखाने मारणे हा एक प्रभावी उपाय आहे.

पैसा's picture

14 Feb 2013 - 6:00 pm | पैसा

आता फेसबुकवर एकाने हा फोटो शेअर केलेला पाहिला.यासिन मलिकबरोबर अरुंधतीबाई.

link

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2013 - 6:12 pm | परिकथेतील राजकुमार

आता हा यासिन मलिक कोण ?

शुचि's picture

14 Feb 2013 - 6:19 pm | शुचि

हाहा :) खरय!!!

पैसा's picture

14 Feb 2013 - 6:21 pm | पैसा

JKLF च्या एका तुकड्याचा नेता आणि माजी अतिरेकी.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2013 - 6:27 pm | परिकथेतील राजकुमार

JKLF च्या एका तुकड्याचा नेता आणि माजी अतिरेकी.

अच्छा ! म्हणजे चांगले माननीय व्यक्तिमत्व आहे म्हणा की.

पण माजी अतिरेकी म्हणजे ? आता दुसरा व्यवसाय निवडलाय, निवडून आलेत का गचकले ? नाही मिपावरती श्रद्धांजलीचा किंवा आनंद व्यक्त करा असा सुचवणारा धागा दिसला नाही म्हणून ही चौकशी.

पैसा's picture

14 Feb 2013 - 6:42 pm | पैसा

एअरफोर्सच्या ४ ऑफिसरांना मारल्यानंतर आता शांततेचा मार्ग पकडला आहे म्हणे.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Feb 2013 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार

हिंदू दहशतवादी देखील ह्यांचा आदर्श घेतील तो सोनीयाचा दिन.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 6:58 pm | बॅटमॅन

आँ? कोटी की उपरोध की अजून काही?

(गोंधळलेला) बॅटमॅन.

अस्वस्थामा's picture

14 Feb 2013 - 9:16 pm | अस्वस्थामा

कोटी की उपरोध की अजून काही?

ब्याटम्यान भौ, आज काल परा फारच गूढ गूढ प्रतिसाद देऊ लागालाय नाही का ?
लय विचार करावा लागतोय समजून घ्यायला.. ;)

प्यारे१'s picture

14 Feb 2013 - 6:21 pm | प्यारे१

बाई डाएटवर आहेत काय????? काही नाही. खंगल्यात म्हणून विचारलं.

बाकी गुन्हा कोण दाखल करणार आहे म्हणे बाळकराम?

विकास's picture

14 Feb 2013 - 6:49 pm | विकास

संक्रातीच्या कार्यक्रमातून बाई बाहेर आल्या आहेत का?

पैसा's picture

14 Feb 2013 - 8:27 pm | पैसा

हा "तिळगुळ घ्या गोग्गोड बोला" कार्यक्रम २००५ सालचा आहे. तेव्हापासून त्यांची या गरीब बिचार्‍या लोकांशी मैत्री आहे वाटते.

विकास's picture

14 Feb 2013 - 8:53 pm | विकास

संक्रातीच्या वेळेस लुटण्याचा कार्यक्रम असतो. त्याला लुटणे का म्हणत असावे हे वेगळ्याच कारणाने समजले. वरचा फोटू बघताना, काश्मीर लुटण्याचा कार्यक्रम करत देशावर संक्रात आणण्यास मदत करणे चालू आहे असे दिसते.

बॅटमॅन's picture

18 Feb 2013 - 2:07 pm | बॅटमॅन

कसला ठरकी दिसतोय तो मलिक. ईस्स %)

मनोरा's picture

14 Feb 2013 - 8:17 pm | मनोरा

बाई फार बदमाश आहे. भारताचे दुर्दैव आहे. काय म्हणनार अजुन>

बापू मामा's picture

16 Feb 2013 - 3:26 pm | बापू मामा

फक्त २ वर्षे वाट पहा म्हणावं अरुंधतीबाईना.
रेल्वे सुरु झाल्यावर श्रीनगरचे पटना होते कि नाही ते पहा.

चौकटराजा's picture

16 Feb 2013 - 4:22 pm | चौकटराजा

श्रीनगरचे पटना की श्रीनगरची मुंबई ...... ???

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2013 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार

श्रीनगरची मुंबई

चला, मग ताबडतोब 'अकबरसेना' किंवा 'श्रीनसे' ह्या पक्षांची नोंदणी करून ठेवायला हवी.

हारुन शेख's picture

16 Feb 2013 - 5:14 pm | हारुन शेख

प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत. आणि लोकशाहीत त्यांची खरोखर गरज आहे. सध्याच्या बर्यापैकी सवंग पत्रकारितेच्या जमान्यात आणि सुमारसद्दी कळसाला पोचलेली असतांना रॉयबाई नेहमीच वेगळ्या दृष्टीकोनातून परिस्थितीचे विश्लेषण करत असतात. कोणास पटो न पटो, प्रसिद्धी मिळो की कुप्रसिद्धी त्यांना जे वाटते ते त्या निर्भीडपणे मांडतात.एका विचारवंताची हीच तर ओळख असते. अफजल गुरू खटल्याबद्दलचे त्यांचे आक्षेप जर योग्यरित्या खोडून काढता आले तर त्यातून आपलीच कायदा आणि न्यायव्यवस्था उजळ होईल. हा एक रोचक लेख.

हारुन शेखजी, अरुंधती बाईंनी काही विरोधी मत व्यक्त केलंय म्हणून हा राग नाही तर ज्या बेजबाबदार पणे आणि बेछूटपणे ते आरोप केले आहेत त्याचे स्वरूप भारताच्या लोकशाहीप्रधान आणि सांविधानिक प्रजासत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न म्हटला जाऊ शकतो.
अरुंधती बाईंनी मांडलेले काही मुद्दे:
१. अफजल गुरु ला प्रतिवादाची पुरेशी संधी देण्यात आली नव्हती
२. अफजल गुरु वरचे आरोप पूर्णपणे साबित झाले नव्हते.
३. अफजल गुरु चा गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नव्हता.
अफजल गुरु ने भारताच्या संसदेवर २००१ मध्ये हल्ला केला आणि २००२ मध्ये त्याच्यावर खटला उभा राहिला. त्याच्यावर रीतसर खटला भरुन आरोप मांडले गेले आणि न्यायालयात ते सिद्धही झाले. सर्वोच्च न्यायालयात सुद्धा त्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर त्याला राष्ट्रपतींकडे अपील करण्याची संधी देखील दिली गेली. एक भारतीय नागरीक म्हणून जेवढ्या जेवढ्या न्यायिक सुविधांचा तो हक्कदार होता त्या सर्व त्याला उपलब्ध केल्या गेल्या होत्या. ( आणि हे लक्षात घ्या, हे सगळे कुख्यात दहशतवाद्याला दिले जात आहे). थोडक्यात, न्यायालयीन प्रक्रिया निर्दोष होती असं नक्कीच म्हणता येइल. अरुंधती बाईंना ती नीट पार पाडली जात नाहीये किंवा त्या बिचार्‍यावर अन्याय होतोय असं त्यांना वाटत होतं तर त्याविषयी काहीतरी करायची संधी त्यांना गेल्या १२ वर्षात जरूर होती. त्यांनी त्याची बाजू घेऊन भांडण्याची धमक तेव्हा का दाखवली नाही- एव्हढा जर पुळका होता तर?
अफजल गुरुने संसदेवर केलेला हल्ला हा कुठल्याही देशात त्या देशाविरुद्ध छेडलेले युद्धच मानले जाते आणि म्हणून तो या देशाचा शत्रू ठरतो. अशा भयंकर शत्रूला देखील त्याच्या बाजूने युक्तिवाद करण्याची संधी दिली गेली आणि रीतसर न्याय दिला गेला. एक लोकशाहीप्रधान देश म्हणून भारताची ही कृती निश्चितच अभिमानास्पद होती (भलेही त्याला लागलेला वेळ आणि खर्च हा एक वादाचा मुद्दा असेल). आणि अरुंधती बाईंनी या लेखाद्वारे आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करायचा प्रयत्न करुन आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करुन भारताच्या शत्रूला मदतच केली आहे. त्यामुळे, शत्रूचा मित्र तो शत्रू या न्यायाने अरुंधती बाई देशद्रोही आणि राज्यद्रोही ठरतात. यात त्यांच्या घटनात्मक अधिकारांचा (भाषण आणि लेखनस्वातंत्र्याचा) संकोच होत नाही तर उलट या अधिकारांचा दुरुपयोग (देशहितविरोधी) होतो.

अफजल गुरू खटल्याबद्दलचे त्यांचे आक्षेप जर योग्यरित्या खोडून काढता आले तर त्यातून आपलीच कायदा आणि न्यायव्यवस्था उजळ होईल. हा एक रोचक लेख
मुळात त्यांनी स्वतः त्यांचे आक्षेपांना काही आधार वा पुरावा दिलेला नाहीये त्यांच्या लेखात, तो दिला असता तर ते खोडून काढण्याची तसदीसुद्धा घेतली असती.

श्रीगुरुजी's picture

18 Feb 2013 - 10:27 am | श्रीगुरुजी

"प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत. आणि लोकशाहीत त्यांची खरोखर गरज आहे. "

जर अरूंधती रॉय विचारवंत असेल तर, दिग्विजय सिंग हा महान विचारवंत समजला पाहिजे. सातत्याने खोटे बोलत राहणे व नियमितपणे आचरट उद्गार काढत राहणे ही विचारवंतांची लक्षणे नव्हेत.

विकास's picture

16 Feb 2013 - 6:24 pm | विकास

प्रस्थापित विचार तपासून बघण्यासाठी अरुंधती रॉय, बशारत पीर, अंगना चटर्जी हे विचारवंत कसोटीच्या दगडासारखे महत्वपूर्ण आहेत.

परिकथेतील राजकुमार's picture

16 Feb 2013 - 6:36 pm | परिकथेतील राजकुमार

एका 'विचारवंती' प्रतिक्रियेत असे फेरबदल केलेले पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

निर्भिड
परा

श्रीरंग_जोशी's picture

17 Feb 2013 - 11:25 pm | श्रीरंग_जोशी

या प्रकारणात (अफझल गुरू - फाशी) वैचारिक गोंधळ उडवण्यात संबंधीत दहशतवादी चांगलेच यशस्वी झाले आहेत.
कुणाही दहशतवाद्याल अटक झाली की तो कसा सरळमार्गी माणूस आहे यासंबंधी बातम्या पेरल्या जातात. मराठवाड्यातल्या अबु जुंदालबद्दलही असेच पसरवले गेले.

संसद हल्ला खटल्यात एस ए आर गिलानी याची सुटका झाली. पोलिसांना खोटे पुरावे तयार करून अडकवणे खरंच शक्य असते तर त्याचीही सुटका झाली नसती. सत्र न्यायालयात एक वेळ कमी अधिक झाले असेलही. पण उच्च व सर्वोच्च न्यायालय फाशीच्या शिक्षेच्या अपीलावर काळजीपूर्वकच निकाल देत असते.

तिथेही कुणावर इतक उघड उघड अन्याय होईल इतकी वाईट परिस्थिती भारतीय न्यायव्यवस्थेची कदापी नाही. आपल्या न्यायव्यवस्थेचे मूलतत्वच १०० गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला चुकून शिक्षा होऊ नये.

अफझल गुरूबद्दल माहिती वाचून त्याच्या बुद्धिमत्तेविषयी काही शंकाच नाही. त्याने बनवलेली कथा सत्यच वाटते.

बाकी केंद्रीय गॄहमंत्रालयाने थोडी कल्पकता दाखवून (उदा. तो आजारी आहे असे सांगून कुटूंबियांना दिल्लीला आणून अखेरची भेट घालून व त्यांना फाशी होईपर्यंत प्रतिबंधात्मक अटकेत ठेवून (संपर्कसाधनांपासून लांब) फाशी झाल्यावर शेवटचे दर्शन घेण्याचे संधी देऊन सोडायला हवे होते). मानवाधिकारवाल्यांना संधी द्यायला नको होती.

अर्थात गृहमंत्रालयाने कुठलाही धोका न पत्करण्याचा तुलनेत सोपा पर्याय निवडला...

आळश्यांचा राजा's picture

18 Feb 2013 - 1:01 am | आळश्यांचा राजा

माझ्या माहितीप्रमाणे आणि आठवणीप्रमाणे
१. अफझल गुरु हा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी नव्हता. त्याच्यावरील आरोप हे "कट" या सदरातील आहेत.
२. अफझल गुरु हा शरण आलेला दहशतवादी होता, आणि त्याच्यावर सुरक्षा दलांची/ पोलीसांची नजर असणे अपेक्षित होते. (त्यामुळे त्याने हा कट रचला असेल, तर त्याच्यावर नजर ठेवणारे लोक काय करत होते असा प्रश्न अवाजवी नाही.)
३. या आरोपींचे वकीलपत्र राम जेठमलाणी आणि शांती भूषण (टीम अण्णा फेम) या दोन नामांकित वकीलांनी (आणि माजी कायदामंत्र्यांनी) घेतले होते (विनामूल्य). अर्थात बचावाची रीतसर व्यवस्था होती.

ही माझी माहिती आहे. चुकीची असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.

विकास's picture

18 Feb 2013 - 2:58 am | विकास

अफझल गुरु हा प्रत्यक्ष हल्ल्यात सहभागी नव्हता. त्याच्यावरील आरोप हे "कट" या सदरातील आहेत.

त्याने तो कटात सामील असल्याचे मान्य केले होते आणि त्या अनुंषंगाने पुरावे देखील मिळाल्याचे वाचल्याचे आठवते. एन डी टी व्ही वरील त्याची मुलाखत या संदर्भात बघण्यासारखी आहे. त्याने कुठेही "मी त्यातला नाही" असे म्हणलेले नाही. फक्त आता पश्चाताप होतो आहे पण कोण विश्वास ठेवणार असे हताश पणे म्हणलेले आहे. ज्यात तथ्य वाटते आणि एक माणूस म्हणून दुर्दैवी वाटते. खाली एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे गांधीहत्येसंदर्भात कटात सामील असल्याबद्दल आपटेस देखील फाशी झाली होती.

अफझल गुरु हा शरण आलेला दहशतवादी होता, आणि त्याच्यावर सुरक्षा दलांची/ पोलीसांची नजर असणे अपेक्षित होते.

अफझल गुरू १९९६ च्या सुमारास शरण आला होता पण मला वाटते २००० नंतर परत तो दहशतवाद्यांच्या सान्निध्यात आला होता त्यामुळे त्याचे "उलट मतपरीवर्तन" झालेले होते आणि त्या नव्याने जागृत झालेल्या त्याच्या जुन्या कॉन्शसने त्याने दिल्लीत संसदेवर आणि इतर राष्ट्रांच्या (कदाचीत अमेरीका, युरोपीय राष्ट्रांच्या) वकीलातींवर हल्ला करण्याच्या कटात सामील असलेल्या दहशतवाद्यांना त्याने मदत केली होती. थोडक्यात हे राष्ट्राच्या विरोधातील युद्ध होते आणि तो नुसताच एखाद्या हत्याकांडाच्या कटात सामील नव्हता तर एका अर्थी फितूर आणि देशाचा त्याग केलेला शत्रू होता असे म्हणले तरी गैर नाही. तरी देखील त्याला आपल्या न्यायव्यवस्थेने तसे मानले नाही आणि ज्या लोकशाहीवर हल्ला करण्यास त्याने मदत केली, त्या लोकशाहीतील नियमानुसारच न्याय दिला - रेअरेस्ट ऑफ दी रेअर...

(त्यामुळे त्याने हा कट रचला असेल, तर त्याच्यावर नजर ठेवणारे लोक काय करत होते असा प्रश्न अवाजवी नाही.)

कट रचला होता हे वास्तव आहे, जे त्याने स्वतः माध्यमांना देखील सांगितले होते. अफझल गुरू हा अनेक दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी होता आणि त्याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्याइतकी पोलीस/गुप्तचर यंत्रणा भारतात आहे असे वाटत नाही. शिवाय जर पोलीसांना आधी कळले असते आणि त्याला अटक केले असते तर तथाकथीत मानवतावाद्यांनी काय आक्रस्ताळेपणा केला नसता असे म्हणायचे आहे का? त्या व्यतिरीक्त, जर अशी नजर ठेवणारी लोकं असतील आणि ते जर यात कमी पडले असले तर काय अफझलगुरूचा गुन्हा कमी होतो का?

या आरोपींचे वकीलपत्र राम जेठमलाणी आणि शांती भूषण (टीम अण्णा फेम) या दोन नामांकित वकीलांनी (आणि माजी कायदामंत्र्यांनी) घेतले होते (विनामूल्य). अर्थात बचावाची रीतसर व्यवस्था होती.

खरे आहे. मला वाटते या संदर्भात अरूंधती रॉय यांचे म्हणणे आहे की सरकारी वकील चांगला नव्हता. पण त्याला काही अर्थ नाही जेंव्हा असे मोठे वकील पाठीशी असतात तेंव्हा त्याला बचाव मिळाला नाही असे म्हणण्यास काही अर्थ नाही.

किंचित अवांतरः शांती भूषणच्या संदर्भात माहिती नाही, पण जेठमलानींनी नक्की असले किती खटले जिंकले असावेत असा प्रश्न पडतो. सगळ्यात कुप्रसिद्ध (जिंकलेला) खटला हा मंजुश्री सारडा खून खटला होता. पण इंदीरा गांधी हत्येकरी आणि तसेच अफझल गुरूपर्यंत तत्सम इतर अनेकांचे त्यांनी खटले लढवले आहेत. त्यातील ते किती जिंकले? जर जिंकले नसले तर हे काय, "येन केन प्रकारेण..." असे म्हणायचे का?

सरते शेवटी: जोशी-अभ्यंकर हत्याकांडात जक्कल, जगताप, सुतार यांच्याबरोबरच्या मुन्वर शहास देखील फाशी झाली होती. त्याने तुरूंगातून "येस आय अ‍ॅम गिल्टी" नावाचे पुस्तक लिहीले होते. त्यात शेवटी पश्चाताप झालेला आणि आता फाशी होणार याचे दु:ख झाल्याचे स्पष्ट करत लिहीले होते की "असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ, असे माझ्या बाबतीत घडले आणि येस आय अ‍ॅम गिल्टी". तसेच अफझल गुरूच्या बाबतीत घडले असे म्हणता येईल... असो.

विकास ह्यांच्याशी १००% सहमत. इतका मोठा प्रतिसाद मुद्देसुद लिहायचा कंटाळा आला होता. :-)

रमेश आठवले's picture

18 Feb 2013 - 1:50 am | रमेश आठवले

नारायण आपटे हा गांधींचा खून झाला त्यावेळी घटनास्थळी हजर नसताना सुद्धा न्यायमूर्ती आत्मचरण यांनी त्याला कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून फाशीची शिक्षा दिली आणि ही शिक्षा कोणताही उहापोह अथवा दिरंगाई केल्याशिवाय अमलात आणली गेली. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांनी दिलेल्या निवाड्यात-
" He was the brain behind the assassination conspiracy."
-अशा अर्थाचे लिहिले आहे.