मात

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
30 Jan 2013 - 10:54 pm

गुलजार यांच्या "खुदा" या रचनेचा स्वैर भावानुवाद करण्याचा माझा प्रयत्न

गगनपटावर डाव मांडला, ओढलेस खेळात मला
घुमता पट अन् अगम्य खेळी, मुळीच रस ना त्यात मला!

सूर्य मांडला घरात काळ्या, तुला वाटले विझेन मी,
दीप उजळला मी, जो दावी वाटा अंधारात मला

तुझा वादळी सागर माझ्या अस्तित्वाला गिळताना
एक चिमुकली पुण्याईची नाव तारते त्यात मला!

काळाची सरकवुन सोंगटी घेसी का अंदाज उगा?
तोडुन काळाच्या बेड्यांना मौज मिळे जगण्यात मला

चमत्कार दाखवून माझे आत्मतेज मिटवू बघसी,
तुझा चंद्र जिंकला पहा मी, कसली देशी मात मला?

शह मृत्यूचा दिला, वाटले तुला, "चला, हरला आता!"
देह सोडला मी, वाचविला आत्मा, भय ना घात मला!

घुमव पुन्हा पट, मांड सोंगट्या, अन् माझीही चाल पहा,
बघेन मीही तुझी कुशलता, आता दे ना मात मला!

******** मूळ कविता ***********

"खुदा"
.

पूरे का पूरा आकाश घुमा कर बाज़ी देखी मैने

काले घर में सूरज चलके,
तुमने शायद सोचा था
मेरे सब मोहरे पिट जायेंगे.
मैने एक चराग जलाकर रोशनी कर ली,
अपना रस्ता खोल लिया..

तुमने एक समन्दर हाथ में लेकर मुझपे ढेल दिया,
मैने नोह की कश्ति उस के ऊपर रख दी

काल चला तुमने और मेरी जानिब देखा,
मैने काल को तोड़कर,
लम्हा लम्हा जीना सीख लिया

मेरी खुदी को मारना चाहा
तुमने चन्द चमत्कारों से
और मेरे एक प्यादे ने चलते चलते
तेरा चांद का मोहरा मार लिया

मौत की शह देकर तुमने समझा था अब
तो मात हुई
मैने जिस्म का खोल उतारकर सौंप
दिया,
और रूह बचा ली

पूरे का पूरा आकाश घुमा कर अब
तुम देखो बाज़ी...

- गुलज़ार

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

30 Jan 2013 - 11:05 pm | प्रचेतस

सुरेख भावानुवाद.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Jan 2013 - 11:17 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मुळात गुलजारांच्या रचनांचे कुठल्याही प्रकारे रुपांतरणे करणे हे अजिबात सोपे नाही, त्यात इथे तर दोन वेगळ्या भाषा आहेत. गुलजारांसारख्या अत्यंत संवेदनशील कविच्या रचना पूर्ण समजणे हेच बर्‍याचदा एक आव्हान असते.
पण क्रांतितै, तुमचा भावानुवाद आवडला. मुळ रचनेचा अर्थ छान पकडलात. विषेशतः

काळाची सरकवुन सोंगटी घेसी का अंदाज उगा?
तोडुन काळाच्या बेड्यांना मौज मिळे जगण्यात मला

इथे केवळ वाह येते... तुम्ही जी मुळ रचनेची लय आहे ती कायम ठेवण्यात नक्की यशस्वी झालात.
खुप अभिनंदन.. अश्याच अजुनही रचना / भावानुवाद वाचायला नक्की आवडतील.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2013 - 11:33 pm | अत्रुप्त आत्मा

१ नंबर ........... :-)

कवितानागेश's picture

31 Jan 2013 - 12:14 am | कवितानागेश

मस्त. अतिशय सुंदर भावानुवाद. :)

इन्दुसुता's picture

1 Feb 2013 - 8:42 am | इन्दुसुता

भावानुवाद अतिशय आवडला.

किसन शिंदे's picture

1 Feb 2013 - 8:46 am | किसन शिंदे

सुंदर भावानुवाद!!

आनन्दिता's picture

1 Feb 2013 - 9:06 am | आनन्दिता

गगनपटावर डाव मांडला, ओढलेस खेळात मला
घुमता पट अन् अगम्य खेळी, मुळीच रस ना त्यात मला!

सुरुवातच इतकी अप्रतिम केलीत की बस्स!!

शुचि's picture

3 Feb 2013 - 5:46 am | शुचि

सहमत

सुधीर's picture

1 Feb 2013 - 10:49 am | सुधीर

खूपच सुंदर भावानुवाद. गुलजारांची मूळ कविता उत्तम आहे पण तुमचा भावानुवाद मला त्याहूनही सुंदर वाटतोय. कदाचित, हिंदी कवितां वाचण्याची इतकी सवय नाही, त्यामुळे असेल कदाचित. अजून चांगल्या कवितांचा भावानुवाद वाचायला आवडेल.

सुधीर's picture

1 Feb 2013 - 10:58 am | सुधीर

भावानुवाद अन मूळ कविता पुन्हा वाचली. हिंदी शब्दसंग्रह तोकडा असल्याने तुमचा भावानुवाद वाचला नसता तर कदाचित ती इतकी चांगली समजली नसती. (स्वसंपादनाची सोय असायला हरकत नाही)

चेतन's picture

1 Feb 2013 - 2:43 pm | चेतन

अनुवाद ठीक (नाही आवडला या वेळेला)

खास करुन
चमत्कार दाखवून माझे आत्मतेज मिटवू बघसी,
तुझा चंद्र जिंकला पहा मी, कसली देशी मात मला?

हा याचा मेरी खुदी को मारना चाहा
तुमने चन्द चमत्कारों से
और मेरे एक प्यादे ने चलते चलते
तेरा चांद का मोहरा मार लिया

भावानुवाद वाटत नाही आहे

क्रांती हे नाव वाचले की माझ्या मनात आजकाल प्रतिक्षिप्त उद्गार उमटतात "वाह! क्या बात है"
त्या उद्गारांना सार्थ करणारी ही कविता सुद्धा.
अतिशय आवडली.

श्रिया's picture

2 Feb 2013 - 5:00 pm | श्रिया

खुपच सुरेख भावानुवाद, शब्दयोजन अप्रतिम!

पैसा's picture

2 Feb 2013 - 8:22 pm | पैसा

अगदी सुरेख भावानुवाद!

अभ्या..'s picture

4 Feb 2013 - 1:59 am | अभ्या..

सुरेख, अप्रतिम.
क्रांतीतैच्या कवितांबद्दल जेवढे ऐकले होते, अगदी १०० टक्के पटले.
मिका, क्रांतीतै तुम्हालाच कसे जुळते हे जिगसॉ पझल?

पिवळा डांबिस's picture

4 Feb 2013 - 8:37 am | पिवळा डांबिस

सुरेख!!
अप्रतिम भावानुवाद!!!
खूप म्हणजे खूपच आवडली दोन्ही व्हर्शन्स...
जियो!!

क्रान्ति's picture

5 Feb 2013 - 12:28 am | क्रान्ति

सगळ्या वाचकांना आणि प्रतिसादकांना मनःपूर्वक धन्यवाद!

दीपा माने's picture

5 Feb 2013 - 11:37 pm | दीपा माने

व्वा, फारच सुरेख शब्दरचना केलीय. खुपच आवडला मराठीतला भावार्थ.