मराठी गाणी

neeta's picture
neeta in कलादालन
23 Dec 2012 - 2:48 pm

आता जरा नवीन व जुनी गाणी आठ्वूया, एका शब्दावरून किती गाणी आठवता आहेत ते बघूया . हे संकेत स्थळ मराठी साठी असल्यामुळे मराठी गाणी आठवूया. शब्द आहे जीवन.

माझ्याकडून : जीवनात ही घडी अशीच राहू दे. धागा आवडला नाही तर प्रतिसाद देऊ नका. ज्यांना गाणी आवडतात त्यांना लिहून देत.

संगीत

प्रतिक्रिया

दिपक.कुवेत's picture

23 Dec 2012 - 2:56 pm | दिपक.कुवेत

१. जीवनगाणे गातच जावे...झाले गेले विसरुन जावे...पुढे पुढे चालावे..जीवनगाणे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2012 - 3:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्रर्र, माझा प्रतिसाद चुकला.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Dec 2012 - 3:27 pm | श्री गावसेना प्रमुख

डॉ.साहेब ग वरुन ना हो,
गुमनाम है कोइ बदनाम है कोइ
किसको खबर कौन है वो बदनाम है कोइ
एक सांगाच मला तुम्ही स्वतचा प्रतीसाद संपादीत करु शकता का?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2012 - 6:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>> एक सांगाच मला तुम्ही स्वतचा प्रतीसाद संपादीत करु शकता का ?
हो.

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Dec 2012 - 7:00 pm | श्री गावसेना प्रमुख

धन्यवाद माहीती दिल्या बद्दल्,फक्त अजुन काही क्वेरी एकुण किती संपादक आहेत हो,आणी संपादक काय नाही करु शकत जे निलकांत करु शकतात,
1

आनन्दिता's picture

24 Dec 2012 - 1:24 am | आनन्दिता

झाले गेले विसरुन जावे...पुढे पुढे चालावे..जीवनगाणे

झाले गेले विसरुन जावे... रोज नवे कै च्या कै धागे काढावे... =))

दिपक.कुवेत's picture

23 Dec 2012 - 2:57 pm | दिपक.कुवेत

दोन घडिचा डाव...याला जीवन एसे नाव..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Dec 2012 - 2:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग गपासून.....अ....हं...

गोरी गोरी पान फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आन

http://www.misalpav.com/node/31 इथंही मिसळपाववर अंताक्षरी दिसते आहे.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

23 Dec 2012 - 2:58 pm | परिकथेतील राजकुमार

दिवसामाजी काहीतरीच ते लिहित जावे...

प्रतिसाद आवडला नाही तर लक्ष देऊ नका. ज्यांना आवडला नाही त्यांना तसे लिहून देत.

पैसा's picture

23 Dec 2012 - 3:23 pm | पैसा

अरे, २०१३ च्या नव्या डायर्‍या आल्या नाहीत काय अजून?

खरं सांग हा तुझाच नवा आयडी आहे ना? ;)

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Dec 2012 - 3:13 pm | श्री गावसेना प्रमुख

येउ देत भेन्ड्या ,,मिसळपाव जहां जहां जायेगा,मेरा नाम उपरही रहेगा,
@निता ताई इतक छान छान कसे काय सुचत हो,
1

neeta's picture

23 Dec 2012 - 3:17 pm | neeta

जीवन गगन मी पाखरु

चिंतामणी's picture

23 Dec 2012 - 5:09 pm | चिंतामणी

माझे जीवन गाणे, माझे जीवन गाणे !

व्यथा असो आनंद असू दे
प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !

कधी ऐकतो गीत झर्‍यातुन
वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वार्‍यांतुन, कधि तार्‍यांतुन झुळझुळतात तराणे !

गा विहगांनो माझ्यासंगे
सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरी माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे !

कवितानागेश's picture

23 Dec 2012 - 5:10 pm | कवितानागेश

कुन्या गावाचं अलं पाखरु?! ;)

चिंतामणी's picture

23 Dec 2012 - 5:25 pm | चिंतामणी

जीवनात ही घडी अशीच राहु दे
प्रीतिच्या फुलावरी वसंत नाचु दे

रंगविले मी मनात चित्र देखणे
आवडले वेडीला स्वप्‍न खेळणे
स्वप्‍नातिल चांदवा जीवास लाभु दे

हळुच तुला बघण्याचा छंद आगळा
लज्जेचा त्याविण का अर्थ वेगळा
स्पर्षातुन अंग अंग धुंद होऊ दे

पाहु दे असेच तुला नित्य हासता
जाउ दे असाच काळ शब्द झेलता
मीलनात प्रेमगीत धन्य होऊ दे

समयांत's picture

23 Dec 2012 - 5:29 pm | समयांत

नॉट ऍट होम.

आता प्रतिसाद तर दिला आहे म्हणजे धागा आवडलाय कसातरी, पण 'गाण्या'त नो आवड.
मराठी गाणी अपवाद मात्र ; )

चित्रगुप्त's picture

23 Dec 2012 - 5:44 pm | चित्रगुप्त

एक आगामी गाणे:
मुखडा:
तो: माझं जीवन..हुं.हुं हुं..
ती: तुझं जीवन लरलला..

दोघे: अ‍ॅडजस्ट एव्हरिथिंग..लाइट, साउंड..एव्हरिथिंग...

तो: तुझं जीवन लरलला...
ती: माझं जीवन हुं.हुं हुं..

दोघे: करेक्ट लायटिंग, मोर र्हिदम.. फास्ट... येस.. ओके वन टू स्टार्ट...

अंतरा:
तो: टा रा रा रा...टा रा रा रा
ती: ल ल ल ला...ल ल ल ला...

तो: दोघे मिळुनि आपले जीवन
ती: जगुया जगुया जगुया .... (आवाज हळळूळू विरत जाऊन पार्श्वसंगीत गहिरे होत जाते)
तो: जगता जगता जगता .... (आवाज हळळूळू विरत जाऊन पार्श्वसंगीत गहिरे होत जाते)
दोघे: मरुया मरुया मरुया....

ती: आय्याम डेड..डेड.. डेड..
तो: यूआर डेड..डेड.. डेड ....
संगीतः जोरात र्‍हदयाचे ठोके ऐकू येतात, आणि हळुहळु मंद होत जातात...

ऑर्केस्ट्राचा गदारोळ : ढिंग टकाक..टिंग धडाक...टट्टर टट्टा.. टट्टर टट्टा.. पप्पर पप्पा..पप्पर पप्पा.. पीपी पीपी...धडाक धूम तडाक धूम...

आणखी बरीच आगामी गाणी आहेत, सध्या एकच देत आहे. याचे रेकॉर्डिंग अद्याप व्हायचे असून या गाण्याने 'कोलावेरी' चे विक्रम मोडावेत, यासाठी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आखली जात आहे.

हसून पुरेवाट झाली की हो. देवा, मेले मेले!

सस्नेह's picture

26 Dec 2012 - 9:01 pm | सस्नेह

खी खी...काय ते दिव्य म्युझिक ! हसून मेले..

अन्या दातार's picture

23 Dec 2012 - 6:21 pm | अन्या दातार

हा घ्या समग्र संग्रह. http://www.aathavanitli-gani.com/Anukramanika
कशाला डोक्याला अन बोटांना त्रास?

(मुलखाचा आळशी) अन्या

अग्निकोल्हा's picture

2 Feb 2013 - 9:10 pm | अग्निकोल्हा

निव्वळ म्हणजे एकदम निव्वळच.

पण माझ्या आवडिचं साजणी मैत्रिणी ग हरणी उन्हात चांदण पडलं गं... शोधायला मद करणार काय ?

सर्व संबंधितांना पुन्हा एकदा नम्र व प्रामाणिक विनंती,

मिसळपावचं ऑर्कुट किंवा फेसबुक करु नये. मा संपादक मंडळ अशा धाग्यांबद्दल काही कार्यवाही करु शकेल काय.

जेनी...'s picture

24 Dec 2012 - 11:09 pm | जेनी...

पन्नासशी अगदी सहमत .

स्मिता.'s picture

24 Dec 2012 - 4:07 pm | स्मिता.

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे....

हे गाणं आजकाल फार फार सुचतंय.

बहुगुणी's picture

24 Dec 2012 - 11:06 pm | बहुगुणी

:-)

एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे....
लय भारी!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Dec 2012 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल पासून जीवनावर काही गाणं आठवेना. :(
जीवनाची ही घडीच आठवतंय.

-दिलीप बिरुटे

अरे बापरे. बिरुटे सर. नुसत्या घड्या घालत बसला आहात कालपासून.

गाणी कमी येत आहेत. वायफळ वाक्यच जास्त दिसत आहेत.स्मरण शक्तीला चालना द्या की जरा.

काऽऽऽय वो हे ?? हे बघाऽऽऽ की जरा म्हणतो मी !! तुमचं स्मरणशक्ती सुन्नं होतंय येवडी गाणी हायत की वो.

निखिल देशपांडे's picture

27 Dec 2012 - 4:53 pm | निखिल देशपांडे

छान धागा...
असे अनेक धागे रोज मिपावर यावेत.

वामन देशमुख's picture

27 Dec 2012 - 5:07 pm | वामन देशमुख

आकाशी झोप घे रे पाखरा...
चांदण्यात घोरताना माझा धरलास हात...
छोडो ना मेरी जुल्फ़े, सब लोग क्या कहेंगे...

श्रीनिवास टिळक's picture

27 Jan 2013 - 7:13 am | श्रीनिवास टिळक

८२ साली मुंबईला हिंदमाता सिनेमात एक मराठी चित्रपट बघितला. नाव आता आठवत नाही पण त्यातील एक गाणे मला फारच आवडले होते आणि अजून काही ते डोक्यातून जात नाहीये. त्याची एक ओळ अशी होती "भावफुलांची बाग इथे बघ कशी फुलली..." मिसळपावाच्या सूज्ञ सभासदांपैकी कोणाला हे गाणे आणि चित्रपट माहित असतील तर कृपया कळवावे. मी आपला सदैव ऋणी राहीन.

आनन्दिता's picture

27 Jan 2013 - 8:20 am | आनन्दिता

चित्रपट : दैवत

गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर.

इथे ऐकु शकाल
http://m.dhingana.com/marathi/daivat-songs-31973d1

इथे विकत घेउ शकाल.
http://www.flipkart.com/bhaav-phulanchi-baag-sakhaye/p/itmd5bgz5wyhdvkm

श्रीनिवास टिळक's picture

28 Jan 2013 - 7:11 am | श्रीनिवास टिळक

धन्यवाद. इतक्या लवकर माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळेल याची कल्पना नव्हती. पण माझे नशीब थोर म्हणून मिसळपावच्या माध्यमातून आपण मला शांती मिळवून दिलीत. पुनःश्च आभार.

आनन्दिता's picture

28 Jan 2013 - 9:15 am | आनन्दिता

मेन्शन नॉट !!!

तर्री's picture

27 Jan 2013 - 11:15 am | तर्री

जीवन त्यांना कळले हो
मीपण ज्यांचे ,
पक्‍व फळापरी सहजपणाने गळले हो

( मि पा त्यांना कळले हो , धागे ज्यांचे सहजपणाने उडले हो...)

सूड's picture

28 Jan 2013 - 12:07 pm | सूड

मिपा त्यांना कळले हो
धागे ज्यांचे,
पंख लागूनि प्रतिसादासह उडले हो !!

तर्री's picture

28 Jan 2013 - 1:11 pm | तर्री

मला असेच काहीतरी म्हणायचे होते.....पण ती प्रतिभा की कोण ती रुसली होती.
भावना पुढे ढकलल्या बददल धन्यवाद.

हे जीवन सुंदर आहे ! (चित्रपट : चौकट राजा)

नितळ निळाई आकाशाची अन् क्षितिजाची लाली
दवांत भिजल्या वाटेवरती किरणांची रांगोळी
कोठेही जा अवतीभवती निसर्ग एकच आहे
हे जीवन सुंदर आहे !

पानांमाधली सळसळ हिरवी अन किलबील पक्षांची
झूळझुळ पाणी वेळूमधुनी खुळी शीळ वार्‍याची
इथेतिथे संगीत अनामिक एकच घुमते आहे
हे जीवन सुंदर आहे !

गायक: आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे

"देव भाकरीशिवाय कशाकशातही नाही" एवढी एकच ओळ एका दूरदर्शनच्या कार्यक्रमात एका भजन / कीर्तन करणार्‍याने गायलेल्या गाण्यातली आठवते आहे. एकदाच ऐकल्याने इतर तपशील लक्षात नाहीत पण चाल इतकी उत्तम लावलेली होती की ते व्यक्तिगत त्या गायकाचं बनवलेलं गाणं नसणार. पूर्ण गाणं, टायटल असं काहीही कळलं तरी बाकी शोध घेता येईल. पण जालावर अजिबात सापडलं नाही. :( कोणी देईल का माहिती?

श्रीनिवास टिळक's picture

29 Jan 2013 - 8:11 am | श्रीनिवास टिळक

७२ साली प्राध्यापक ना सी फडके यांच्या कादंबरीवर आधारित कलंक शोभा हा चित्रपट बघितला होता. त्यातील खालील एक गाणे मी अजूनही नेहमी ऐकतो कारण शब्द आणि चाल दोन्ही अत्यंत मधुर आणि भावपूर्ण आहेत.

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे !

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले, तुझ्यामुळे !

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते करी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे !

करात माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले, तुझ्यामुळे !

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिर परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे !

मराठी गाणं आता आठव ना झालय, माफ करा पण लाई आवडणार हिंदी गाणं सांगतो

यॅ यॅ यॅ यॅ...........
ओह यॅ यॅ यॅ यॅ...........

जीवन मे जाने जाना एक बार है होता प्यार - 4
वन्स यू फॉल इन लव इन लाइफ, वन्स यू फॉल इन लव - (2)
आ आ आ आ.........
रे पा पा रे पा पा पा...................

अग्निकोल्हा's picture

2 Feb 2013 - 9:03 pm | अग्निकोल्हा

पण बहुतांश गाणी फ्रिक्वेंट रिपीट व्हॅल्यो नसलेलीच असल्याने जी खरच छान व फ्रिक्वेंट रिपीट व्हॅल्यो असलेलि अगदी मराठ्मोळी साँग्ज आहेत ना त्यावर फारच लोड येतो व गुड असुनही चटकन बोर मारतात म्हणून आपला पास.....

हे तुमी नक्कि ऐका पण!