माळशेज घाटात

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
14 Aug 2010 - 9:59 am

मागच्या रविवारी पुण्याहून सकाळी निघालो. पाउस नव्हताच. आळेफाट्याला पोहोचलो. तिथून डावीकडे वळून ओतूर गाठले. हवा हळूहळू कुंद बनत होती. सगळीकडे हिरवेगार दृश्य होते. आतापर्यंत दिसत असलेल्या टेकड्यांची जागा आता सह्याद्रीचे महाकाय पर्वत घेत होते. बहुतेक सर्वच हिरवा शालू पांघरून चेहर्‍यावर ढगांचा घुंघट ओढून बसले होते. मूळ राकट पुरुषी सौंदर्‍याचे आता हळूवार नाजूक स्त्रीत रूपंतर झाले होते.

तितक्यात डावीकडे हडसर किल्याने दर्शन दिले. त्याला सातवाहनांच्या गौरवशाली किल्ल्याला वंदन करून आम्ही पुढे जाताच चावंड उर्फ प्रसन्नगडाच्या अभेद्य कातळभिंतीने डोळे दिपवले.
तोपर्यंत उजवीकडे पिंपळगाव जोगे धरणाचा जलाशय साथीला होताच. पलीकडे भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड हा पुर्णपणे धुक्यात स्वताला लपेटून घेउन बसला होता.

आता खुबी गाव मागे टाकून आम्ही सह्याद्रीच्या मुख्य धारेवर-माळशेज घाटात आलो. छोटासा बोगदा पार केला आणि घाटाचे विराट रूप सामोरे आलो. जागोजागी, रस्तोरस्ती धबधबे अगदी कोसळत होते. पर्यटक त्यात भिजून आपला आनंद साजरा करत होते. पण निसर्गाची ही नशा अनुभवत असतानाच काही पर्यटकांना मात्र दारूच्या नशेचाही सहारा का लागतो कुणास ठाउक. अर्थात चोख पोलीस बंदोबस्तामुळे हे प्रमाण कमीच होते. असो.
डावीकडे उंच कडे, उजवीकडे खोल दरी व मध्ये घाटरस्स्त्यावर धबधबे असे विलक्षण दृश्य होते. मधूच सह्याद्री आपला धुक्याच्या पडदा बाजूला करत होता.

आम्हीपण धबधब्यांमध्ये मनसोक्त डुंबून पुर्ण घाट उतरून खाली गेलो.
आता दरीच्या बाजूला एक महाप्रचंड धबधबा दिसत होता. त्याला स्थानिक 'काळूचा वोघ' असे म्हणतात. कारण काळू नदीचा तो उगम आहे.

पुन्हा एकदा ते दृश्य डोळ्यांत साठवून आम्ही परत जलौघात डुंबून आम्ही घाटमाथ्यावर आलो.


बोगदयाच्या पलीकडे असणार्‍या कड्याच्या टोकावर जाउन हरिश्चंद्रगड व माळशेज घाट रांगेचे दर्शन घेतले व निघालो ते शिवजन्मस्थान असलेल्या पवित्र शिवनेरीवर जाण्यासाठी. ते पुढच्या भागात.

हे ठिकाण

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

14 Aug 2010 - 1:16 pm | चिंतामणी

इथे बघुनच चिंब भीजलो.

आणि १० नं.च्या फोटुतल्या व्यक्ती कोण आहेत? कोणी मिपाकर आहेत का?

प्रचेतस's picture

16 Aug 2010 - 10:07 am | प्रचेतस

हौशी पर्यटक आहेत ते.

वल्ली भाऊ एकदम मस्त फोटो बर कां .. आम्ही आळेफाट्याचेच ! माळशेज आम्हाला फार प्रिय!

अप्पा जोगळेकर's picture

14 Aug 2010 - 1:25 pm | अप्पा जोगळेकर

वा वल्ली! अप्रतिम फोटो. जीव सुखावला फोटो पाहूनच.

भिरभिरा's picture

14 Aug 2010 - 2:02 pm | भिरभिरा

मस्त फोटो. पुढच्या भागाची वाट पाहत आहोत अजुन येउ द्या..

स्पंदना's picture

14 Aug 2010 - 7:34 pm | स्पंदना

जीव हलला!
खरच सह्याद्री पावसात असा नटतो की नज्र ठरत नाही.
सारे फोटो एक्दम मस्त!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2010 - 7:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

विलासराव's picture

14 Aug 2010 - 8:35 pm | विलासराव

फोटो आवडले. गावी जान्याचा नेहमीचा रस्ता आहे हा आमचा.
प्रत्येकवेळी इथला निसर्ग वेगळेच रूप घेऊन येतो.पुढच्या आठवड्यात जाउनच येईन म्हनतो.

हेम's picture

14 Aug 2010 - 10:59 pm | हेम

....स्क्रीन ओला चिंब केल्याबद्दल धन्यवाद!

घाटावरचे भट's picture

15 Aug 2010 - 2:04 am | घाटावरचे भट

की दारुण शुंदोर....

दीविरा's picture

18 Dec 2012 - 9:58 am | दीविरा

आवडले सगळेच फोटो!!

सस्नेह's picture

18 Dec 2012 - 1:59 pm | सस्नेह

मूळ राकट पुरुषी सौंदर्‍याचे आता हळूवार नाजूक स्त्रीत रूपंतर झाले होते.
हा हा.. हे भारी वाटले..

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2012 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा

:-)

ह भ प's picture

19 Dec 2012 - 11:49 am | ह भ प

वल्ली साब.. प्रेमळ आमंत्रण आहे असंच कास तलाव+यवतेश्वर+ठोसेघर+बामणोली ट्रीप कराना..

किसन शिंदे's picture

19 Dec 2012 - 7:10 pm | किसन शिंदे

भारी..!!

वल्लीबुवा, तुम्ही असे कुठे कुठे जाता आणि आम्हाला फोटू बघून ईनो घ्यावा लागतो.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Dec 2012 - 8:39 pm | निनाद मुक्काम प...

पोलिसांचा बंदोबस्त हे वाचून बरे वाटले.
फोटो झकास
वल्ली काका तुमचा फोटो न टाकता कोणा हौशी पर्यटकांचा फोटो टाकल्या बद्दल सौम्य निषेध
अवांतर
थोडा आमचा आदर्श ठेवा
किमान ४ फोटो नंतर एक स्वतःचा ........