राम राम मंडळी,
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने पांडवांची बाजू घेतली आणि त्यांचे सारथ्यही केले. कारण काय तर पांडवांची बाजू धर्माची होती. कौरवांची बाजू अधर्माची होती.
परंतु जुगारात स्वत:च्या पत्नीलादेखील दावणीला दावावर लावण्याचा निर्ल्लज्जपणा करणार्या पांडवांची बाजू ही धर्माची कशी काय? कुणी खुलासा करेल काय?
भर दरबारात एका स्त्रीची विटंबना करणारे कौरव तर अधर्मी होतेच परंतु त्या क्षणीच रक्त उसळून कडवा प्रतिकार न करता तो तमाशा चुपचाप बघणार्या पांडवांकडे धर्माची बाजू कशी काय येते?
उद्या माझ्या पत्नीस जर कुणी रस्त्यात छेडू लागला आणि मी त्या माणसाच्या कानाखाली न भडकावता चुपचाप ते दृष्य पहात बसलो तर 'अधर्मी' ह शब्ददेखील माझ्याकरता कमी पडेल! मग पांडवांकडे धर्माची बाजू होती म्हणून केवळ श्रीकृष्णाने त्यांचं सारथ्य केलं अशी जी बतावणी मी गेली अनेक वर्ष ऐकत आहे, त्यात कितपत तथ्य आहे?
कुणी खुलासा करेल काय?
तात्या.
प्रतिक्रिया
24 Aug 2008 - 1:02 pm | II राजे II (not verified)
पांडवामध्ये धर्मराज युधीष्ठर हाच मला देखील कधी समजलाच नाही... !
बाकी राहीली गोष्ट विरोधाची तर अर्जुनाने व भीमाने आपल्या परिने प्रयत्न केला होता.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले... पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून !
त्या सभेत कोण नव्हतं ? दोष त्या धर्म राजाचा तर आहेच पण त्याच बरोबर.. अंध राजा, भिष्म, द्रोणाचार्य.. व असंख्य लोकांचा देखील होता... पण येथे एक गोष्ट नमुद करण्यासाठी आहे की... खेळासाठी जे फासे सोडले तर शकुनीने कुठला ही नियम मोडला नव्हता... दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे !
काही ही असो मी काही जागी महाभारतामध्ये मानव स्वभावातील दोष दाखवले गेले आहेत भले ही तो धर्म राज असो व सामान्य पण मुर्ख शिशुपाल असो !
व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
24 Aug 2008 - 5:38 pm | विसोबा खेचर
.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले...
अच्छा! म्हणजे पत्नीच्या अब्रूपेक्षा जुगारी थोरल्या भावाचा आदेश जास्त महत्वाचा! असेच ना?
पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून !
उद्या रस्त्यात माझ्या बायकोच्या साडीला कुणी हात घातला की मी तिथल्या तिथे माणसाला थोबडावून काढणे अधिक योग्य की एखादा पण-बिण करणे अधिक योग्य?
दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे !
हा हा हा! वाचून गंमत वाटली! धर्मराजाची आणि इतर पांडवांची अक्कल काय शेण खायला गेली होती का? आणि मग शिवाय हा प्रश्न उरतोच की अक्कल गहाण ठेवून स्वत:च्या पत्नीची भरदरबारात बेअब्रू करणार्या पांडवांच्या बाजूने कृष्ण कसा काय लढला?
व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... !
द्रौपदी वस्त्रहरणाचे हे समर्थन आहे का?
तात्या.
24 Aug 2008 - 5:38 pm | विसोबा खेचर
.. पण जेष्ठ बंधू च्या अधिकारात व आदेशात राहणे हा त्यांचा नियम होता त्यामुळे ते अपमानाच घोट घेऊन चुपचाप बसले...
अच्छा! म्हणजे पत्नीच्या अब्रूपेक्षा जुगारी थोरल्या भावाचा आदेश जास्त महत्वाचा! असेच ना?
पण भीम शांत बसला नाही त्यांने तेथेच प्रण केला होता भर राज्यसभेत की दुशासन व दुर्योधन ह्यांचा वध करेल ! एकाची छाती फोडून तर एकाची मांडी फोडून !
उद्या रस्त्यात माझ्या बायकोच्या साडीला कुणी हात घातला की मी तिथल्या तिथे माणसाला थोबडावून काढणे अधिक योग्य की एखादा पण-बिण करणे अधिक योग्य?
दुर्योधन प्रत्येक विजयानंतर धर्मराजाला पुन्हा खेळण्यासाठी तयार करत असे व जेष्ठपुत्र व प्रतिष्ठा.... व कोठे तरी जे हरले आहे ते जिंकण्याची आशा म्हणून तो पुन्हा पुन्हा खेळत असे व हरत असे !
हा हा हा! वाचून गंमत वाटली! धर्मराजाची आणि इतर पांडवांची अक्कल काय शेण खायला गेली होती का? आणि मग शिवाय हा प्रश्न उरतोच की अक्कल गहाण ठेवून स्वत:च्या पत्नीची भरदरबारात बेअब्रू करणार्या पांडवांच्या बाजूने कृष्ण कसा काय लढला?
व असे म्हणतात की... कलियुग महाभारताच्या युध्दानंतर चालू झाले पण त्यांची सुरवात कृष्ण जन्मापासूनच झाली होती... त्यांचा जन्मच द्वापर युगाचा अंत व कलियुगाची सुरवात करण्यासाठी झाली होती.... !
द्रौपदी वस्त्रहरणाचे हे समर्थन आहे का?
तात्या.
24 Aug 2008 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तात्या,
तुम्ही म्हणता ते मान्य! (याचा अर्थ मला बायको आहे असा नाही).
आणि हा प्रश्न काय कालच्या अशोक काकांच्या व्याख्यानाचा परीणाम का? त्यांनाच विचारा एकदा त्यांचं मत आणि इथेही टाका ते!
(बॅक टू द रीअल नेम) अदिती
24 Aug 2008 - 5:46 pm | विसोबा खेचर
त्यांनाच विचारा एकदा त्यांचं मत आणि इथेही टाका ते!
नक्की विचारीन...
24 Aug 2008 - 1:14 pm | अवलिया
तात्या
धर्म अधर्म नीती अनीती या संज्ञा कालसापेक्ष आहेत म्हणजेच कालानुरुप यात बदल होतात.
समाजामुळे, राज्यकर्त्यांमुळे यात वारंवार बदल होत असतात व होतील
महाभारत ज्याकाळात घडले तेव्हाच्या संकल्पना ज्यात अनेक गोष्टी धर्म अधर्म गणल्या जात होत्या त्या आज तशाच्यातशा असतील असे नाही
परंतु जुगारात स्वत:च्या पत्नीलादेखील दावणीला दावावर लावण्याचा निर्ल्लज्जपणा करणार्या पांडवांची बाजू ही धर्माची कशी काय? कुणी खुलासा करेल काय?
त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते.
आता या युद्धात स्वतः हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार त्याला होता की नाही हा वादाचा मुद्दा झाला व त्याचाच वापर करुन धृतराष्ट्राकडुन द्रौपदीने परत सर्व मिळवले.
परत जात असतामना वाटेवर निरोप येवुन पुन्हा केवळ एकच डाव खेळावयाचा व जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञात वास हे ठरले.
धर्मराज पुन्हा हरला व त्यांना राज्यत्याग करावा लागला.
जेव्हा ते परत आले तेव्हा आधी ठरल्याप्रमाणे कौरवांनी पांडवांचे राज्य देणे आवश्यक असतांना सुईच्या अग्रावर मावेल इतकी पण भुमी मिळणार नाही अशी भुमिका घैतली व नंतर महायुद्ध झाले.
ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे वागणे हे धर्माला अनुसरुन अशी समजुत ज्याकाळात होती त्या काळात पांडव जसे ठरले तसे वागले म्हणुन धर्माला अनुसरुन वागले असे म्हटले जाते तर कौरव हे अधर्माने वागले असे म्हटले जाते.
म्हणुन कृष्णाने त्यांची बाजु घेतली
आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही. अर्थात मी यातील तज्ञ नाही. अजुन संशोधन होणे गरजेचे आहे.
नाना
24 Aug 2008 - 5:46 pm | विसोबा खेचर
धर्म अधर्म नीती अनीती या संज्ञा कालसापेक्ष आहेत म्हणजेच कालानुरुप यात बदल होतात.
अच्छा! म्हणजे स्वत:च्या बायकोला जुगारात हारणे हे तेव्हाच्या काळात योग्यच होते आणि म्हणून कृष्णाने पांडवांना झोडून न काढणे हेही योग्यच म्हणायचे का?
महाभारत ज्याकाळात घडले तेव्हाच्या संकल्पना ज्यात अनेक गोष्टी धर्म अधर्म गणल्या जात होत्या त्या आज तशाच्यातशा असतील असे नाही
समर्थन मजेशीर आहे! :)
त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते.
स्वत:ची पत्नीदेखील जुगारात लावणे हे क्षात्रधर्माला मान्य होते काय? क्षत्रियांकरता ही गोष्टदेखील मानाची होती काय??
ज्याप्रमाणे ठरले त्याप्रमाणे वागणे हे धर्माला अनुसरुन अशी समजुत ज्याकाळात होती त्या काळात पांडव जसे ठरले तसे वागले म्हणुन धर्माला अनुसरुन वागले असे म्हटले जाते
मग कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे कारण काय?
तात्या.
24 Aug 2008 - 5:50 pm | प्रियाली
कृष्णाचा काय फावल्या वेळात साड्या तयार करायचा कारखाना होता काय? :O कृष्णाने हस्तिनापुरात हजर न राहता साड्याबिड्या पुरवल्या नाहीत. हा चमत्कार कृष्णाच्या माथी मागाहून कोणातरी चावट माणसाने मारला. ;) व्यासानी नाही.
24 Aug 2008 - 7:26 pm | अवलिया
अच्छा! म्हणजे स्वत:च्या बायकोला जुगारात हारणे हे तेव्हाच्या काळात योग्यच होते आणि म्हणून कृष्णाने पांडवांना झोडून न काढणे हेही योग्यच म्हणायचे का?
तात्या आपण त्या काळातल्या समाजाबद्दल बोलत आहे जो स्त्री नोकर दास यांचे आयुष्य ही आपली वैयक्तिक मालमत्ता आहे असे समजत होता.
अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत, लोकलला लटकत कामावर जावुन परत घरी आल्यावर स्वयंपाक करुन मुलांचा अभ्यास घेवुन नव-याच्या सर्व इच्छा पुरवुन परत दुसरे दिवशी तेच ... असे सतत करायला लावणारे महाभाग आजही २१ व्या शतकात आहेत ना !
अहो द्रोपदी तरी एकदाच पणाला लागली होती... आजची द्रौपदी रोज पणाला लागत आहे ...
समर्थन मजेशीर आहे!
समर्थन नाही केवळ वस्तुस्थिती :)
स्वत:ची पत्नीदेखील जुगारात लावणे हे क्षात्रधर्माला मान्य होते काय? क्षत्रियांकरता ही गोष्टदेखील मानाची होती काय??
माझे म्हणणे काय होते ते बघा
त्याकाळी द्युत खेळणे हे क्षत्रियांसाठी मानाचे होते. द्युताला नकार देणे हे क्षात्रधर्माविरुद्ध होते.
आता या युद्धात स्वतः हरल्यानंतर द्रौपदीला पणाला लावायचा अधिकार त्याला होता की नाही हा वादाचा मुद्दा झाला व त्याचाच वापर करुन धृतराष्ट्राकडुन द्रौपदीने परत सर्व मिळवले.
याच्यापेक्षा वेगळे कसे व काय लिहायचे? :)
मग कृष्णाने द्रौपदीला वस्त्रे पुरवण्याचे कारण काय?
माझे म्हणणे काय होते ते बघा
आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही. अर्थात मी यातील तज्ञ नाही. अजुन संशोधन होणे गरजेचे आहे.
यातच साडी, अक्षय्य थाळी, कर्णाचे चाक फसणे, परशुरामकर्ण कथा वगैरे वगैरे यांचा अंतर्भाव होतो. मी त्यांचा उल्लेख केला नाही कारण मग यादी फार मोठी होइल व या लेखाचे ते प्रयोजन नाही असे मी समजतो.
मी कदाचित आपले शंकासमाधान करु शकलो नसेल तर क्षमस्व.
नाना
24 Aug 2008 - 8:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का
हे पण काय बरोबर नाही! त्या भीमानी, ताकद होती म्हणून (लिंबूटींबू सहदेवाला) दुसय्राला का कामाला लावावं! ही जुनी परंपराच दिसते लहान भावंडांना कामाला लावण्याची! निषेध, निषेध, "जाज्वल्य" निषेध!
(नकटी आणि धाकटी) अदिती
24 Aug 2008 - 8:20 pm | अवलिया
ओ नकटे अन धाकटे
जरा अडाणी काय तुम्ही ?
नीट वाचा
आता प्रत्यक्ष द्रौपदीची छेडछाड प्रत्यक्षात किती झाली, तिची वस्त्रे खरोखरीच फेडली गेली होती का? सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील या भागांचे वर्णन करतात त्यांची रचना उर्वरीत भागांइतकी पुरातन वाटत नाही.
कळले का? की दुर्बीण पाठवायची ?
मराठी कच्च होत चाललय लोकांचे :)
25 Aug 2008 - 1:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> कळले का? की दुर्बीण पाठवायची ?
नाना, दुर्बिणीमुळे क्यांपूटरमधे उजेड पडतो, डोक्यात नाही!
>> मराठी कच्च होत चाललय लोकांचे
आणखी थोडं शिजवायचं (पकवायचं) मग शाळेत, असे विषय शिकवून!
>> सहदेवा अग्नी आण म्हणुन भीम गर्जना झाली होती का? वगैरे हा भाग कदाचित प्रक्षिप्त असु शकतो कारण मुळ संस्कृत श्लोक जे महाभारतातील ...
ज्यानी कोणी हे महाभारतात टाकलं त्याला बोलले मी! तुला का त्याचा / तिचा पुळका एवढा? ;-)
25 Aug 2008 - 1:15 pm | अवलिया
इथे भेटलात
वर नका भेटु
(तसे येवढी टवाळी करता की तुम्हाला वरती प्रवेश मिळणारच नाही)
24 Aug 2008 - 9:53 pm | लंबूटांग
>>> अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत, लोकलला लटकत कामावर जावुन परत घरी आल्यावर स्वयंपाक करुन मुलांचा अभ्यास घेवुन नव-याच्या सर्व इच्छा पुरवुन परत दुसरे दिवशी तेच ... असे सतत करायला लावणारे महाभाग आजही २१ व्या शतकात आहेत ना !
बर्याचदा बायकांचाच हट्ट असतो की मला नोकरी करायची आहे. विषयांतरा बद्दल क्षमस्व
25 Aug 2008 - 1:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> बर्याचदा बायकांचाच हट्ट असतो की मला नोकरी करायची आहे. विषयांतरा बद्दल क्षमस्व
आणि त्याबरोबर हापण हट्ट असतो की माझ्या घरातल्या लोकांचंही घर आहे, तर त्यांनी पण घरात बूड हलवावं!
फारच विषयांतर होतंय, दुसरा धागा काढता येईल या विषयावरच्या चर्चेसाठी!
25 Aug 2008 - 9:58 pm | लंबूटांग
रास्तच आहे. अशा पुरूषांचे मी पण समर्थन करत नाही. सर्वांनी थोडे थोडे काम केले तर बराच भार हलका होतो गृहलक्ष्मीचा.
25 Aug 2008 - 3:21 pm | बिपिन कार्यकर्ते
अरे लंबूटांग भाऊ,
अहो आजही घरात गडगंज असतांना, नवरा लाखौ रुपये पगार कमवित असतांना गृहलक्ष्मीला बसला लोंबकळत
आधी मी एवढंच वाचलं, पुढे वाचायच्या आधी विचार करत होतो, "आयला काय डेरिंग, एवढं डायरेक्ट लिहिलंय", मग पुढे वाचताना कळलं, बसला म्हणजे बस ला =))
बिपिन.
25 Aug 2008 - 4:26 pm | अवलिया
खुलासा
वरती बसला म्हणजे फतकल मारुन बसला किंवा इतर कोणताही अर्थ न समजता बेस्ट, पीएमटी, यस्टी, ट्रक, रिक्षा, डुक्कर गाडी वगैरे वाहन ज्यातुन माणसांची ने आण केली जाते ते समजावे.
लोकलला म्हणजे मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे किंवा हार्बर लाइन वरील स्थानिक रेल्वे वाहतुक किंवा लोणावळा पुणे रेल्वे वाहतुक वगैरे समजावे.
(काही जण लोकलला म्हणजे स्थानिक व्यक्तिला असा समज करुन घेतील म्हणुन खुलासा)
खुलासा संपला.
25 Aug 2008 - 10:00 pm | लंबूटांग
हे मी पाहिलेच नव्हते. =))
(typing चे कष्ट न घेता ctrl+C आणि ctrl+v ने शक्य तितके काम उरकणारा) लंबूटांग
25 Aug 2008 - 5:37 am | दिगंबर
नानांच्या मताशी सहमत
24 Aug 2008 - 1:19 pm | घाटावरचे भट
तात्याबा,
हा प्रश्न मलाही पडला होता. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी याचा अर्थ असा लावला की पांडवांनी स्वतःच्या धर्मपत्नीला द्यूतात पणाला लावून जो घोर अपराध केलेला होता, त्याचं प्रायश्चित्त त्यांना १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात काढायला लावून मिळालं होतं. धर्मयुद्ध झालं ते राजसिंहासनासाठी!
युधिष्ठीर ज्येष्ठ युवराज असल्याने त्याचा हस्तिनापुराच्या सिंहासनावर प्रथम हक्क होता. तो डावलून हस्तिनापुराचं विभाजन केलं गेलं त्याला आणि इतर पांडुपुत्रांना इंद्रप्रस्थात धाडण्यात आलं. त्यानंतर द्यूतात छलकपटाच्या आधाराने शकुनीने पांडवांकडून त्यांचे राज्य हिरावून घेतलं (युधिष्ठीराने नसत्या क्षत्रिय धर्माला जागून द्रौपदीला पणाला लावले ही त्याची चूकच, आणि आपला ज्येष्ठ बंधू असा मूर्खपणा करत असताना केवळ तो ज्येष्ठ बंधू आहे म्हणून त्याला एक अक्षरही न बोलणार्या पांडवांची तर त्याहूनही मोठी चूक!). पण वनवासातून परत आल्यानंतर पांडवांनी इंद्रप्रस्थ परत मागितलं आणि त्याला दुर्योधनानं नकार दिला. इथे ऑफिशिअली युद्धाची चर्चा सुरु झाली. साहाजिकच, पांडवांचा इंद्रप्रस्थावर हक्क होता, आणि या ठिकाणी त्यांची बाजू सत्याची/धर्माची होती (कारण त्यांनी त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नव्हता) म्हणून कृष्णानं पांडवांना साथ दिली. बाकी त्या युद्धात जे वैयक्तिक हेवेदावे, अपमान वगैरे गुंतलेले होते त्याबद्दल आधीच खूप काही लिहिलं गेलं आहे, त्यामुळे मी काही अधिक बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही.
--आपलेच (आणि घाटावरचे) भट...
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
24 Aug 2008 - 5:54 pm | विसोबा खेचर
माझ्या अल्पमतीप्रमाणे मी याचा अर्थ असा लावला की पांडवांनी स्वतःच्या धर्मपत्नीला द्यूतात पणाला लावून जो घोर अपराध केलेला होता, त्याचं प्रायश्चित्त त्यांना १२ वर्ष वनवास आणि १ वर्ष अज्ञातवासात काढायला लावून मिळालं होतं.
भर दरबारात स्वत:च्या पत्नीच्या अब्रूचे धिंडवडे काढणे त्याकरता वरील शिक्षा पुरेशी आहे असं आपल्याला वाटतं का?
युधिष्ठीराने नसत्या क्षत्रिय धर्माला जागून द्रौपदीला पणाला लावले ही त्याची चूकच, आणि आपला ज्येष्ठ बंधू असा मूर्खपणा करत असताना केवळ तो ज्येष्ठ बंधू आहे म्हणून त्याला एक अक्षरही न बोलणार्या पांडवांची तर त्याहूनही मोठी चूक!).
हो ना? मग या चुकीकरता कृष्णाने पांडवां झोडून काढायचे की त्यांचे सारथ्य करायचे?
कारण त्यांनी त्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी कोणत्याही चुकीच्या मार्गाचा वापर केला नव्हता) म्हणून कृष्णानं पांडवांना साथ दिली.
हो, पण द्रौपदीच्या गेलेल्या अब्रूचे काय? तेव्हा कृष्ण कुठे गेला होता? आणि मारे त्याने द्रौपदीला वस्त्र वगैरे पुरवल्याच्या कथा आहेत, परंतु मुळात द्रौपदीला भरदरबारात हजर करणे आणि तिच्या निरीपर्यंत दु:शासनाचा हात जाणे इथेच द्रौपदीची अब्रू गेली असं आपल्याला वाटत नाही काय? प्रत्यक्ष निरी ओढणे ही त्यानंतरची क्रिया झाली! पण तो पर्यंत तिची अब्रू गेलेलीच होती. तेव्हा तिला वस्त्र पुरवणारा कृष्ण कुठे होता?
तात्या.
24 Aug 2008 - 1:29 pm | टारझन
रामायण महाभारतावरच आपला विश्वास नाहीये. ते पौराणिक ग्रंथ केवळ मानवाला धर्म-अधर्म शिकवण्यासाठी असावेत.
बाकी पांडव जरा बावळटच होते. येत नाय तर कशाला कसिनो खेळायचा ? तात्यांनी फक्त एक मुद्दा उपस्थित केला... मला तर असंख्य प्रश्न पडलेत ...कृष्णाचं अर्जुनावर जरा जास्तच प्रेम होतं त्यामुळे तो पांडवांकडे गेला.
असाच एक अवांतर प्रश्न ..
जर आकाशवाणी ने कंसाला कळले होते की "वसुदेव-देवकी चा आठवा मुलगा त्याला मारणार आहे." आणि असं ग्रुहित धरली की त्या युगात बोललं ते खरं व्हायचं .. तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो.
बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल म्हणनारा
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
25 Aug 2008 - 7:52 pm | स्वप्निल..
जर आकाशवाणी ने कंसाला कळले होते की "वसुदेव-देवकी चा आठवा मुलगा त्याला मारणार आहे." आणि असं ग्रुहित धरली की त्या युगात बोललं ते खरं व्हायचं .. तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो.
=))
=))
स्वप्निल..
25 Aug 2008 - 10:11 pm | प्रभाकर पेठकर
एकदा आठवा मुलगा मारणार म्हंटल्यावर त्यांना वेगवेगळे ठेवून ती भयाची टांगती तलवार सतत आपल्या मस्तकी ठेवायची ( हो! काय नेम त्यांचा कांही वेगळी क्लूप्ती काढतील) त्या पेक्षा एकत्र ठेवून, रोमँटीक वातावरण तयार करून, काय ती पटापट ८ मुलं होऊ द्यायची आणि त्यांची विल्हेवाट लावून ह्यांना मोकळं करून टाकायचे पुढील प्रॉडक्शन साठी. कारण ९ नंतर कांही भिती नव्हती. अस सूज्ञ विचार कंसाने केला असावा.
24 Aug 2008 - 1:41 pm | शैलेन्द्र
". तर मग .. त्या अति मुर्ख कंसाने वसुदेव- देवकी ला एकाच तुरूंगात , एकाच रूम मधे का ठेवलं ... साधी गोष्ट आहे राव.. स्वत:च त्यांना ८ मुलं होतील अशी व्यवस्था करून देतो"
घे दणदणीत, कमितकमी एक टी व्ही तरी ठेवायचा.. देवकी क क च्या सेरिअल बघत झोपुन गेलि असति
24 Aug 2008 - 1:53 pm | देवदत्त
तात्या,
युधिष्ठिर हा धर्माप्रमाणे वागत होता म्हणून धर्मराज, पांडव धर्माप्रमाणे वागत होते की नाही त्याबद्दल जास्त माहित नाही. पण कृष्णाने पांडवांची साथ का दिली ह्याबाबत मी काही वाचल्याचे सांगतो.
प्रत्यक्षात कृष्णाला युद्धात भाग घ्यायचा नव्हता. पण दोन्ही बाजूंच्या हट्टामुळे त्याने भाग घेतला व पर्याय दिले होते की ज्याला माझे सैन्य पाहिजे तो घेउ शकतो व ज्याला कृष्ण पाहिजे त्याचा सल्लागार म्हणून कृष्ण त्याला साथ देईल. ह्यात कौरवांनी सैन्य मागितले व पांडवांना कृष्ण पाहिजेच होता, म्हणून मग कृष्णाने अर्जुनाचे सारथ्य केले.
मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर इतिहासच बदलला असता का? भगवद्-गीता सांगण्यात आली असती का?
24 Aug 2008 - 6:00 pm | विसोबा खेचर
मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर इतिहासच बदलला असता का? भगवद्-गीता सांगण्यात आली असती का?
करेक्ट!
24 Aug 2008 - 1:58 pm | II राजे II (not verified)
>>>मग प्रश्न पडतो की जर कौरवांनी कृष्णाची मागणी केली असती तर
पाडवांचा पोपट झाला असता ;)
*****
कृष्णाने पांडवांची साथ का दिली ?
पाडवांच्या स्वत:च्या काही चुका सोडल्यातर (ज्या तात्यांनी वर लिहल्या आहेत त्या) त्यांनी जाणून बुजून अधर्म कधीच केला नाही... उलट इतरांची मदतच केली होती... त्यामुळे कृष्णांने त्यांची बाजू घेतली.... व फक्त बाजू घेतली नाही... तर पांडवाचाच विजय व्हावा ह्यासाठी प्रयत्न देखील केले (उदा. कर्णाकडून कुडंले व श्रीखंडी च्या मदतीने भिष्म वध.... व धर्मराजातर्फे अंशीक खोटे बोलवून द्रोणाचा वध)
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
24 Aug 2008 - 6:00 pm | विसोबा खेचर
त्यांनी जाणून बुजून अधर्म कधीच केला नाही...
जर एखाद्याने माझ्या बायकोची छेड काढली तर ते दृष्य हाताची घडी घालून चुपचाप पहात बसणे हा मी अधर्मच मानतो! आपलं मत काय?
उद्या जर एखाद्याने माझ्या बायकोची छेड काढली आणि ते दृष्य मी नुसतं पहात बसलो तर मी जाणूनबुजून अधर्म केला नाही असं आपण म्हणाल का?
तात्या.
24 Aug 2008 - 6:31 pm | बिपिन कार्यकर्ते
ओ तात्या... वहिनींच्या हातात एवढा मोठा दांडक्या सारखा ऊस आहे.... कोण कशाला त्यांची छेड काढेल? ;)
बिपिन.
24 Aug 2008 - 3:51 pm | मनीषा
त्या काळाच्या प्रथे प्रमाणे द्युताचे आमंत्रण स्विकारणे राजा या नात्याने युधिष्ठिराचे कर्तव्य होते.
महाभारताच्या काळात पत्नी ही पति ची वैयक्तिक संपत्ति मानली जाई (अजुनही त्यात खूप बदल झालेला नाही ) त्यामुळे पत्नी विकणे , पणाला लावणे त्या काळात अधर्म किंवा अनीती समजली जात नसे. (हरिश्चंद्राने सुद्धा तारामती ला विकले होते - आपले स्वप्नात दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी ) द्रौपदी ने तीला दरबारात आणले तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्वांना विचारले कि जे आधि गुलाम झाले आहेत त्याना मला (म्हणजे द्रौपदीला), इंद्रप्रस्थाच्या राणीला पणाला लावायचा हक्क आहे का ? म्हणजे तिला सुद्धा पतिने पत्नीला पणाला लावणे मान्य होते (असावे) पण एका गुलामाची एका महाराणीवर काय सत्ता आहे असाच प्रश्न तीला पडला होता.
यावर निर्णय देताना दरबारातील पंडितानी सांगीतले (त्या वेळे तेथे भिष्म, द्रोण, विदुर गांधारी इ. हजर होते ) कि गुलाम असला तरी त्याचा (म्हणजे धर्मराजाचा) पत्नीवरील हक्क अबाधित राहतो आणि तो तीला पणाला लावू शकतो.( अर्थात तरीही हे कृत्य फार भयंकर आहे , आणि म्हणुनच महाभारतासारखे सर्वसंहारक युद्धा झाले ..)
आपल्याला आता जरी विचित्र वाटले तरी त्या वेळी हे धर्माला अनुसरुनच होते.
आणि पांडवांनी जे अधर्म केले त्यात ब-याच वेळा स्वतः श्रीकृष्णच सामील होता. (त्याचे प्रायश्चित्त म्हणून नंतर त्याच्या कुळात यादवी झाली). आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी अधर्माचा सहारा घेतला (कारण युद्धात सारे काही क्षम्य असते??) असे म्हणतात..
24 Aug 2008 - 4:55 pm | सचिन
हे द्यूतच कपटनीतीने खेळले गेले होते ..शकुनीच्या. त्यामुळे त्यात पांडवांचे हरणे हेच कौरवांच्या अधर्माने वागण्याचे पहिले पाऊल होते. अधर्माची सुरुवातच तेथे झाली. बाकी सारे परिणामतः घडत गेले...आणि त्या काळाच्या योग्यायोग्यतेच्या नीतिनियमांनुसार पांडव वागत गेले. (मोठ्या भावाच्या आज्ञेबाहेर नसणे, द्रौपदी पत्नी असली तरी द्यूतात हरलेली होती...वगैरे..). आपल्या आजच्या विचारांमधे हे कोठेच बसणार नाही...कालाय तस्मै नमः !!!
24 Aug 2008 - 5:15 pm | प्रियाली
वाचते आहे. पण काही सुधारणा / पटणार्या गोष्टी सांगत जाते -
१. महाभारत युद्ध द्रौपदीमुळे झालेले नाही, ते जमिनीच्या वादामुळे झालेले आहे. (बायका कलहाचे कारण ही व्युत्पत्ती फारा काळानंतरची)
२. शकुनीने कपट केले असे मूळ महाभारत कोठेही म्हणत नाही, द्यूत कपटाने खेळलेले नाही. युधिष्ठीर बकवास खेळाडू होता असे म्हणता येईल फारतर.
३. नानांचा प्रतिसाद सर्वोत्तम. परत जात असतामना वाटेवर निरोप येवुन पुन्हा केवळ एकच डाव खेळावयाचा व जो हरेल त्याने १२ वर्षे वनवास व १ वर्ष अज्ञात वास हे ठरले - बरोबर, याला अनुद्युत म्हणतात.
४. घाटावरील भटांनी, कृष्णाने पांडवांची साथ देण्याचे जे कारण सांगितले आहे ते ही बरोबर.
आपली,
(व्यासभक्त ;) ) प्रियाली
24 Aug 2008 - 5:25 pm | बिपिन कार्यकर्ते
सेम हिअर...
(व्यासभक्त ;) )
दे टाळी...
बिपिन.
24 Aug 2008 - 6:02 pm | विसोबा खेचर
आपली,
(व्यासभक्त ) प्रियाली
य विषयावर आपण नंतर बोलू! ;)
(व्यासभक्तांचा शत्रू!) तात्या.
24 Aug 2008 - 7:22 pm | देवदत्त
कृष्णाने हस्तिनापुरात हजर न राहता साड्याबिड्या पुरवल्या नाहीत. हा चमत्कार कृष्णाच्या माथी मागाहून कोणातरी चावट माणसाने मारला. व्यासानी नाही
१. महाभारत युद्ध द्रौपदीमुळे झालेले नाही, ते जमिनीच्या वादामुळे झालेले आहे. (बायका कलहाचे कारण ही व्युत्पत्ती फारा काळानंतरची)
२. शकुनीने कपट केले असे मूळ महाभारत कोठेही म्हणत नाही, द्यूत कपटाने खेळलेले नाही. युधिष्ठीर बकवास खेळाडू होता असे म्हणता येईल फारतर.
एक प्रश्न पडतो, ह्यात मूळ महाभारत कोणते हे कसे ठरविणार? गेल्या हजारो वर्षांत त्यात किती बदल झाले असतील. 'चायनीज व्हिस्पर' खेळाचा प्रकार ना तो?
थोडेसे आणखी,
मुळात भगवद्-गीता कृष्णाने अर्जुनालाच सांगितली होती, तरीही संजयने ती ऐकून धृतराष्ट्राला सांगितली होती असे म्हणतात. पण मग ते लिहिले कोणी? धृतराष्ट्राने? संजयने? व्यासांनी गणपतीला सांगून? व्यासांनी कशावरून त्यात पूर्ण कथा सांगितली? गणपतीने तर त्यात स्वतःचे काही घातले नाही ना इथपासून प्रश्न पडतात मग ;)
24 Aug 2008 - 7:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
गणपती/व्यास असेल तर उत्तर व्यासच! कारण श्टूडंटला पीएच.डी करताना शोध लागला आणि त्याला नोबल पुरस्कार मिळाला तर मास्तरला क्रेडीट जातं!
(श्टूडंट नसलेली आणि कसलेही दिवे न लावलेली) अदिती
24 Aug 2008 - 7:29 pm | देवदत्त
गणपती/व्यास असेल तर उत्तर व्यासच! कारण श्टूडंटला पीएच.डी करताना शोध लागला आणि त्याला नोबल पुरस्कार मिळाला तर मास्तरला क्रेडीट जातं!
बिचारा गणपती... पण वाचला माझ्या आरोपांतून :D
24 Aug 2008 - 8:19 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> बिचारा गणपती... पण वाचला माझ्या आरोपांतून
काहो, बिचारा का?
आणि नाना म्हणतो तसं तेव्हाचे नियम वेगळे असू शकतात ... त्यामुळे बोलायचं असेल तर बोलून घ्या!
24 Aug 2008 - 8:40 pm | देवदत्त
तर मास्तरला क्रेडीट जातं!
ह्याकरीता म्हटले बिचारा गणपती. म्हणजे क्रेडीट फक्त व्यासांनाच.
24 Aug 2008 - 7:34 pm | प्रियाली
कोणते हे ठरवणे कठिण आहेच पण मूळ कथेत चमत्कारांचा भरणा नसावा असे वाटते.
गणपतीला काही इतर कामधंदे नाहीत का? लोकांच्या कलागतींची इश्टोरी लिहिण्यावाचून? ;) असो, कोणा शिवनंदन गणपतीने महाभारत इ. लिहिले नाही. महाभारतात तसे म्हटलेले नाही. महाभारताच्या टंकनाचे काम गणपतीने केले हे खरे - पण तो शिवपुत्र गणपती असावा हे आपले तर्क. कदाचित तो कोणा गणाचा शासक - टोळीप्रमुखही असावा.
गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती.
बाकी, "डॉन को ग्यारह मुलकोंकी पुलीस ढूंढ रही है|" असे डॉन नाही प्रत्यक्षात त्याचा पटकथाकार म्हणत असतो हा फरक ध्यानात घ्यावा.
24 Aug 2008 - 7:49 pm | अवलिया
कोणते हे ठरवणे कठिण आहेच पण मूळ कथेत चमत्कारांचा भरणा नसावा असे वाटते.
बरोबर
चमत्कार बाजुला काढले तर महाभारत एक सुंदर इतिहास म्हणून समोर येतो व खरीच अशी कथा असु शकते
गणपतीला काही इतर कामधंदे नाहीत का? लोकांच्या कलागतींची इश्टोरी लिहिण्यावाचून?
मस्त
कोणा शिवनंदन गणपतीने महाभारत इ. लिहिले नाही. महाभारतात तसे म्हटलेले नाही.
बरोबर
महाभारताच्या टंकनाचे काम गणपतीने केले हे खरे - पण तो शिवपुत्र गणपती असावा हे आपले तर्क. कदाचित तो कोणा गणाचा शासक - टोळीप्रमुखही असावा.
नागरी लिपीचा शोधक गणेश असावा जो पाणिनीच्या की पतंजलीच्या अनेक शिष्यांपैकी असावा
बघा ना त्याने स्वतःच्या नावातील अक्षरांना कसे वेगळे बनविले आहे
ग ण श
उभी रेघ वेगळी
इतर सर्व अक्षरे जोडलेली
भारी ब्रैंडीग आहे नाही?
गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती.
मला नाही वाटत
कुणातरी उपनिषद अभ्यासकाने नंतर हा भाग कृष्णार्जुन संवाद रुपाने घातला असावा
काही असले तरी गीते इतका सुंदर भाग कोणत्याच धर्मग्रंथात नाही हे १०० टक्के
नाना
25 Aug 2008 - 12:17 am | विसोबा खेचर
प्रियाली,
गीतेचे लेखक व्यास असू शकतील. तेवढी त्यांची प्रतिभा नक्कीच होती.
तुला काय गं माहिती? कशावरून?
माझ्या माहितीप्रमाणे व्यासाचा कुणीतरी एक शिष्य होता ज्याने मूळ महाभारत लिहिले. ती ष्टोरी व्यासाला इतकी आवडली की त्याने ती स्वत:च्या नावावर खपवायचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने दडपशाही करून शिष्याचे साहित्य ढापले व स्वत:च्या नावावर खपवले! :)
तात्या.
25 Aug 2008 - 3:46 am | प्रियाली
शिष्य नाही, शिष्या. मीच ती. आता कृपया, विचारू नका की तुला कसं माहिती? :D
24 Aug 2008 - 5:19 pm | विनायक प्रभू
पट्ले बर का. पण देवकी ने काय तरी वेगळी आय्डीया काढली असती. कुंती टाइप.
कूंती पुत्र जन्म हा आजकाल पण होतात की. Artificial insemenation. त्याकाळी प्रोसेस ला वर म्हणायची सिस्ट्म होती. आता ए.आय्.डी म्हणतात. मग प्रश्न असा पडतो की तेव्हा जर हे शास्त्र प्रगत होते तर नसबंदी का नव्ह्ती? मुळातच सगळ खुंट्ल असत की.
विनायक प्रभु
24 Aug 2008 - 6:37 pm | टारझन
अहो पण ... आकाशवाणी अशी होती की "वसुदेव-देवकी" चा आठवा पुत्र ... कोणाचाही वर कसा चालेल मग ?
अंमळ येडपट कंसाला ७ मुले आणि १ मुलगी मारण्यापेक्षा , वसुदेवाला मारता नाही तर अधु करता आले असते .. आणि त्याच्या पापाचा हंडा/कळशी काय असेल ते .. जरा उशीरा भरला असतां ना... शिवाय कृष्णपण जन्माला नसता आला ... मग पांडव भारतिय टिम सारखे २र्या दिवशीच १ इनिंग आणि ५००-६०० रनांनी हारले असते ... व्यासांची शाई वाचली असती ... रामानंद सागर ने बंगला थोडा उशिरा बांधला असता .. आणि तात्यांना हा प्रश्नच पडला नसता ... हे सगळं त्या अंमळ **** कंसामुळे झालं ..
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
24 Aug 2008 - 9:09 pm | प्रकाश घाटपांडे
त्यान्ला वायलं वायलं ठुवायच व्हतं म्हंजी फुड्ली भानगडच झाली नसती.
प्रकाश घाटपांडे
24 Aug 2008 - 6:43 pm | विनायक प्रभू
अधु????????
वि.प्र.
24 Aug 2008 - 6:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=))
24 Aug 2008 - 6:49 pm | विनायक प्रभू
तुम्हाला कोणी सांगीत्ले की मुले व्हाय्ला एकच रुमची गरज होती देवकी वसुदेवाला.अगदी वसुदेवाची.
वसुदेव फॉरीन ला असता तरी झाली असती. आता होतात की.
विनायक प्रभु
24 Aug 2008 - 7:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
"हमार भैय्या है ना गांव में!" का हो भौ??
24 Aug 2008 - 8:18 pm | इनोबा म्हणे
"हमार भैय्या है ना गांव में!" का हो भौ??
=))
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
25 Aug 2008 - 12:02 am | बिपिन कार्यकर्ते
;) ;) ;)
आमच्या कडे पण हाच स्टँडर्ड विनोद आहे....
बिपिन.
24 Aug 2008 - 10:02 pm | ऍडीजोशी (not verified)
बोलण्याच्या ओघात, स्ट्रॉंग अर्गुमेंट करण्याच्या नादात आणि विनोद करण्याच्या उत्साहात आपण आपल्याच संस्क्रुतीतील पुजनीय पुरुषांविषयी / देवांविषयी वेडेवाकडे तर बोलत नाही ना ह्याचे भान ठेवा.
बाकी चालू द्या.
(महाभारता कडे बोधकथा म्हणून बघणारा) ऍडी जोशी
24 Aug 2008 - 10:34 pm | देवदत्त
सहमत.
भान ठेवेन. :)
24 Aug 2008 - 10:36 pm | देवदत्त
पण माझा मूळ महाभारताचा प्रश्न राहिलच. तो मी नेहमीच विचारत असतो.
24 Aug 2008 - 11:32 pm | ऋषिकेश
आपल्याच संस्क्रुतीतील पुजनीय पुरुषांविषयी / देवांविषयी
:) नक्की कोण ? कारण आज काल कोण कोणाची पुजा करेल काहि सांगता येत नाहि ;)
कालच आता रजनीकांतचे आणखी एक मंदिर उभे राहणार असे वाचले.. ५०० वर्षांनंतर कोणी तो एक आपल्या संस्कृतीतील महान पुरुष / देव होऊन गेला असं नाहि सांगितलं म्हणजे मिळवलं :)
-(महाभारताला केवळ एक उत्तम कथा मानणारा) ऋषिकेश
25 Aug 2008 - 1:21 am | कोचरेकर मास्तर
आज काल कोण कोणाची पुजा करेल काहि सांगता येत नाहि
सहमत आहे
कालच आता रजनीकांतचे आणखी एक मंदिर उभे राहणार असे वाचले.. ५०० वर्षांनंतर कोणी तो एक आपल्या संस्कृतीतील महान पुरुष / देव होऊन गेला असं नाहि सांगितलं म्हणजे मिळवलं
नक्कीच सांगतील.
शेवटी रामायण आणि महाभारत (किंवा सगळ्याच पुराणकथा) तरी काय आहेत? माझ्यामते या कथांचा लोकरंजन(जसे की आज निरनिराळे सुपरहिरो) आणि धर्म- अधर्म शिकवण्याकरिता(इसापनिती, पचतंत्र वगैरे) जन्म झाला असावा. आणि कालांतराने त्यांचाच रोजगार हमी योजनेअंतर्गत देवळे बांधून उपजिवीकेसाठी वापर केला जात असावा.
25 Aug 2008 - 5:51 am | मिलिन्धा
नवीनच पहाण्यात आलेली ही साइट मजेदार वाट्ली
25 Aug 2008 - 12:53 pm | नाटक्या
याचं उत्तम उदारहण म्हणजे महाभारत. आनंद साधले यांचे एक पुस्तक आहे, "हा जय नावाचा इतिहास आहे". त्या बाबत एक परिक्षण मला इथे मिळाले. माझ्याकडे होते पण कोणीतरी घेवून गेला पण परत आणून दिले नाही. हे पुस्तक सध्या मिळत नाही. कोणाकडे असल्यास हवे आहे. मिळाल्यास जरुर वाचा.
... नाटक्या
25 Aug 2008 - 3:05 pm | राघव
महाभारत कुणी लिहिले अन् नक्की किती श्लोक होतेत, याबद्दल सर्वसाधारण माहिती येथे मिळेल - दुवा
[उपरोक्त माहिती ही बरीच खरी असावी असे समजण्यास काही हरकत नसावी.]
महाभारत युद्धाचे प्रयोजन स्वत: श्रीकॄष्णांनीच गीतेत सांगीतलेले आहे. नक्की कोठे अन् कसे ते जाणकारच सांगू शकतील. पण
"यदा यदा..." ह्या श्लोकात त्यांनी जे अवतार प्रयोजन सांगीतलेले आहे ते सुद्धा सहजच युद्धाचे कारण सांगते.
द्रौपदीवस्त्रहरणाचा प्रसंग घडण्याच्या अगोदरपासून अनेक अधर्मकृत्य कौरवांकडून घडलेले आहेत. हा प्रसंग म्हणजे "Final nail in the coffin"असे म्हणता येईल. पण माझ्या मते महाभारत युद्धाचे निमित्त जरी कौरव-पांडव असतील तरी त्याची व्याप्ती फार मोठी आहे.
या युद्धाअगोदरही अनेक अधर्मी राज्यकर्ते श्रीकृष्णांनी नामोहरम केलेत -
कंस, कालयवन, पौण्ड्रक, शाल्व, दंतवक्र, जरासंध(पांडवांची मदत घेऊन), बाणासूर हे त्यातले काही. तसेच करून ते कौरवांनादेखील नामोहरम करू शकले असते. मग एवढे सर्वसंहारक युद्ध घडविण्याचे प्रयोजन काय? ते केवळ कौरव-पांडवांची भाऊबंदकीमुळेही घडलेले नाही किंवा द्रौपदीवर झालेल्या अन्यायामुळेही घडलेले नाही. अधर्म उच्चाटनाचे मूळ प्रयोजन साध्य करण्यासाठी झालेले आहे.
या पार्श्वभूमीवर तुमच्या प्रश्नासारखाच माझाही एक प्रश्र:
खांडववन जाळण्याचे प्रयोजन काय असावे? ते जाळणारे, त्यातल्या अगणित प्राणिमात्रांसकट जाळणारे, श्रीकृष्णार्जुन हेही मग अधर्मीच नाहीत काय?
[टिप: जर श्रीकृष्ण नसते तर काय झाले असते याचे उत्तर देण्याची गरज आहे असे वाटत नाही. :) ]
25 Aug 2008 - 3:25 pm | विदुषक
महाभारत हे जय नवाचा इतिहास आहे (.... आणी इतिहास नेहमी जेते लिहीतात ... आपण नाही का गोरया कातडीने लीहलेले सगळे खरे मनतो .....)
हे एकदा ल्क्षात घेतले कि बरेच प्रश्न सुट्तात .. (आणी कही नवीन निर्मण होतात ते जाउ दे )
त्यच्या कडे 'धर्म' म्हणुन पहीले कि अमळ पन्चाइत होते
मजेदार विदुषक
25 Aug 2008 - 4:04 pm | भोचक
तात्या, माझ्या मते त्या काळी महिलांना पत्नी म्हणूनही काही विशेष स्थान होते असे नाही. (त्या काळी बर्याच बायका करण्याचीही चाल होती) त्यात द्रौपदी पडली पाच भावांची बायको. त्यामुळे ती गेली तर काय दुसरी कुठलीही करता येईल, अशी सोय होती. तशा पांडवांच्या वैयक्तिक इतर बायकाही होत्या. त्यामुळेच तिची वस्त्रफेड सुरू झाल्यानंतरही पांडवांना फारसे काही वाटले नसावे. असो. पण महाभारत ही एक उत्तम लोकरंजनात्मक कथा आहे. कानडी लेखक एस. एल. भैरप्पा यांनी लिहिलेली 'पर्व' ही कादंबरी महाभारताकडे मानवी दृष्टिकोनातून पहाते. त्यामुळे महाभारतात चमत्कार म्हणून जे काही सांगितलं जातं, त्याचं अतिशय तार्किक विश्लेषण त्यात आहे. मला तरी ते बर्यापैकी पटलं आहे. उदा. द्रौपदी ही पाच भावांची बायको असल्याने तिच्या उपभोगाची लालसा पाच भावांमध्येही कशी होती. त्यातच नियम मोडल्याने अर्जुन कसा घरातून बाहेर पडला. बाहेर गेल्यानंतरही त्याने काय दिवे लावले. किती ठिकाणच्या राजकन्यांशी त्याने लग्न केली. अखेरीस अज्ञातवासात तो 'बृहन्नडा' च का झाला. याचेही विश्लेषण त्यात आहे. ते पटते.
25 Aug 2008 - 4:24 pm | विदुषक
थोडे अवान्तर ....
रामायणा वर पण असेच वेगळ्या द्रुष्टिने 'नरेन्द्र कोहली' ह्यानी फार छान लिहिले आहे
अतीशय ओघवत्या आणी शूद्ध हिन्दी मधे ...
सगले चमत्कार टाळुन त्याचे पतेल असे स्पश्टीकरन दीले आहे ..
७ भागान्मधे ही कदम्बरी आहे .. जमल्या नक्की वाचा
मजेदार विदुषक
26 Aug 2008 - 6:08 am | गणा मास्तर
'युंगांत' नावाच्या पुस्तकात इरावती कर्वेंनी महाभारतातील व्यक्तिरेखांचे व्यवस्थित विश्लेषण केले आहे.
मिळाले तर हे पुस्तक जरुर वाचा.
क्रुष्णाचे वासुदेवत्व, त्याचे आणि अर्जुनाचे एकमेकांवरील प्रेम, युधिष्ठीराचा स्वभाव, कर्णाचा उतावीळपणा, द्रौपदीच्या चुका व इतरही खुप महत्वाची माहिती आहे.
पुस्तक विचार करायला लावते.