वादग्रस्त, चाकोरीबाहेरची, धक्कादायक पुस्तकं - २

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in काथ्याकूट
21 Aug 2008 - 4:56 pm
गाभा: 

प्रतिसादांची संख्या ५०च्या पुढे गेली की दर वेळी पान उलटावं लागतं. गैरसोय होऊ नये म्हणून फक्त, हा नवा धागा.

आधीच्या भागाचा दुवा:

http://misalpav.com/node/3141

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

21 Aug 2008 - 10:12 pm | भाग्यश्री

नवीन धाग्यासाठी खरंच धन्यवाद..
चर्चा मस्तच चाल्लीय.. वाचत आहे. मी बरीच पुस्तकं वाचली २ वर्षांपूर्वी पर्यंत.. आता काहीच वाचन होत नाही..आणि तेव्हाची वादग्रस्त्,चाकोरीबाहेरची पुस्तकं म्हणजे गौरी देशपांडेचीच.. बाकी नॉन फिक्शनच खूप वाचलं जातं..
त्यामुळे लिस्ट करून ठेवत आहे..त्यासाठी उपयुक्त चर्चा!

लिखाळ's picture

21 Aug 2008 - 10:17 pm | लिखाळ

प्रतिसाद वाचत आहे..पण भर घालण्यासारखे आत्त काही नाही.
--लिखाळ.
नेहमी फॉरिनच्या देशात टूरचे दौरे करत असल्याने मराठी फारसे वाचत नाही :) - वार्‍यावरची वरात

प्राजु's picture

22 Aug 2008 - 12:19 am | प्राजु

दौर्‍यामध्ये मी "काबूल ब्युटीस्कूल हे पुस्तक वाचलं. वेगळं वाचलं. त्याचं परिक्षण इथे...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

कोलबेर's picture

22 Aug 2008 - 12:25 am | कोलबेर

मी खूप पुर्वी एक 'सेंट्रल एसटी स्टँड' नावाचे पुस्तक वाचलं होतं. भन्नाट होतं. हे कुणी वाचलं असल्यास त्याची आणखी माहिती मिळू शकेल का? मी लेखक वगैरे सगळेच विसरलो आता. कदाचित नाव देखिल थोडंस वेगळं असेल. कथा एका ग्रामिण भागातील यष्टीत घडते. कुणाला आठवते आहे का?
-कोलबेर

चित्रा's picture

22 Aug 2008 - 12:49 am | चित्रा

वादग्रस्त वाचणारे मिपावर बहुदा कमी असावेत :-)
किंवा वयाप्रमाणे कुठचीच गोष्ट धक्कादायक वाटत नसावी बहुतेक.

पण धागा छान आहे. माहितीपूर्ण.

सुमारे १९०० पासून पुढच्या काळात अमेरिकेत अशी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली ज्याना या ना त्या गटाने, संस्थेने सर्वसामान्य जनतेच्या हाती लागण्याच्या दृष्टिने अहितकारक असे आव्हान दिले. आव्हान दिलेले प्रत्येक पुस्तक सरकारी लायब्ररी, शाळांमधून काढूनच टाकले जाते असे नाही ; पण जनमताचा रेटा असेल तर असे होऊ शकते. कुणाही व्यक्ती/संस्थेस अधिकृतरीत्या असे आव्हान देता येऊ शकते.

ही पहा त्या पुस्तकांची (एक) यादी :

धनंजय's picture

22 Aug 2008 - 1:18 am | धनंजय

:-(
यांच्यापैकी ५-६ पुस्तकेच वाचली आहेत. वाचलेल्या पुस्तकांपैकी यादीत जॅक लंडन चे "कॉल ऑफ द वाइल्ड" बघून आश्चर्य वाटले. त्यात वादग्रस्त असे काय असावे, असे डोके खाजवतो आहे...

केशवराव's picture

22 Aug 2008 - 3:21 am | केशवराव

' ते सतर दिवस' नांवाचे एक पुस्तक ३०/३५ वर्षांपूर्वी वाचले होते. एक फुटबॉल टीम‍ विमान अपघातात दुर्गम भागात अडकते. त्यात वाचलेले ७० दिवस तिथे कसे काढतात ह्याचे मनावर आघात करणारे वर्णन त्यात आहे. मी कितीतरी दिवस अस्वस्थ झालो होतो .

स्वाती दिनेश's picture

22 Aug 2008 - 11:53 am | स्वाती दिनेश

हे पुस्तक वाचून बरीच वर्ष झाली.
मेघना,हा धागा उत्तम आणि माहितीपूर्ण!
सध्या चाकोरीबाहेरचे असे काहीच वाचले नाही. :( (मराठी वाचायला काहीबाही मिळाले तरी खूप..)
द इयर्लिंगचा 'पाडस' हा अनुवाद भावला होता... ह्या निमित्ताने ह्या आणि कार्वर,श्वाइटझर,रारंगढांग आणि आणखीही बर्‍याच पुस्तकांची आठवण झाली.
स्वाती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

द इयर्लिंगचा 'पाडस' हा अनुवाद भावला होता

मलापण! मी अलिकडेच वाचलं ते पुस्तक! आणि माझी मराठी शब्दसंपदाही थोडी वाढली त्यामुळे!

चंबा मुतनाळ's picture

22 Aug 2008 - 5:44 pm | चंबा मुतनाळ

ह्या पुस्तकावर एक चित्रपट पण निघाला होता. हि घटना बोलिव्हियाच्या फुटबॉलपटुंबद्दल होती. त्यांच्या विमानाला अँडीज पर्वतावर अपघात होतो, आणी वाचलेल्या लोकांना जिवंत रहाण्यासाठी मेलेल्या सहकार्‍यांची प्रेते खाऊन दिवस काढायला लागतात. खूप छान पुस्तक आणी चित्रपट होता तो.

ऋषिकेश's picture

22 Aug 2008 - 8:31 pm | ऋषिकेश

७०दिवस वाचून बरिच वर्षे झाली.. अत्युत्तम पुस्तक.. संगावर काटा येतो ती परिस्थिती वाचून

मराठी अनूवादः रविंद्र गुर्जर
किंचित शक्यता : श्रीविद्या प्रकाशन (प्रकाशकाबद्दल केवळ अंदाज.. लक्षात नाहि)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

गणा मास्तर's picture

22 Aug 2008 - 6:01 am | गणा मास्तर

हे पुस्तक रविन्द्र गुजर यांचे आहे. दक्षिण अमेरिकेत अऍन्डिज पर्वतात ही घटना घडते.
पेरु मधला एक फुट्बॉल क्लब सामने खेळायला चिलीला जाताना विमानाला अपघात होउन अडकुन पडतो.
अपघातात जगलेले जीवघेण्या थंडीत कसे रहातात, गरजेपोटी आपल्याच मित्रांचे मांस खाउन कसे जगतात याचे चित्तथरारक वर्णन आहे.
महत प्रयासाने यातले दोन जण शेवटी शेकडो फुटांची चढण चढुण , आठ दिवसांनी बाहेरच्या जगात पोचतात. आणि उरलेल्यांसाठी मदत पाठवतात.
अपघातानंतर एकुण फक्त सात जण परत येतात.
हातात घेतले की हे पुस्तक खाली ठेववतच नाही.

मला चाकोरीबाहेरचे वाटणारे दुसरे पुस्तक म्हणजे पुलंचे 'एक शुन्य मी'.
पुलंनी यात गंभीर आणि भिडणारे लि़खाण केले आहे.
विषेशकरुन 'अंधश्रद्धा आणि आम्ही ' ' एक शुन्य मी' हे लेख चटका लावुन जातात.

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 9:45 am | भडकमकर मास्तर

हे पुस्तक रविन्द्र गुजर

अनुवाद रविंद्र गुर्जर यांचा आहे असे म्हणायचे असावे...
( त्यातली तथाकथित धक्कादायक गोष्ट म्हणजे जगण्यासाठी सर्व अन्नसाठा संपल्यानंतर उरलेल्यांनी आपल्या मृत साथीदारांचे ( अर्थात ते मेल्यानंतर ) मांस खाल्ले होते....
याच गोष्टीवर सिनेमा सुद्धा होता.... मी एच बी ओ वर पाहिला होता....
ते मी शाळेत असताना वाचले होते आणि त्यातल्या घटनांवर फार काळ विचार करत राहिलो होतो, हे आठवते....
( अन्न म्हणजे काय ? नरमांस खाऊन त्यांनी कोणता गुन्हा केला किंवा कसे ? त्यातल्या काहींनी नरमांस न खाता मरणे पत्करले , काहींच्या दृष्टीने जगणे महत्त्वाचे....वगैरे वगैरे)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चतुरंग's picture

22 Aug 2008 - 10:01 am | चतुरंग

'अलाइव्ह-द स्टोरी ऑफ अँडीज सर्वायवर्स' असे आहे आणि ते पिअर्स रीड नावाच्या लेखकाने लिहिले आहे.
त्यावर त्याच नावाचा सिनेमाही निघाला.
ह्याची कथा रीडर्स डायजेस्ट मधेही प्रसिद्ध झालेली होती.
ह्या दुव्यावर बरीच माहीती आहे.

चतुरंग

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 10:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मी अनेक वेळा या गोष्टीबद्दल ऐकलं आहे पण शोधायचे कष्ट घेतले नव्हते. आता आयतंच नाव-गाव सापडलं

यमी

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 9:50 am | भडकमकर मास्तर

शाम मनोहर यांचे कळ....
.... १९९८ मध्ये वाचले असावे... धक्कादायक नाही पण चाकोरीबाहेरचे आहे ...त्या क्षणी काय लिहिले आहे ते समजते परंतु एकूणच कादंबरी म्हणून हे सगळं काय चाललं आहे हे कळेनासे होते...बरोब्बर ...अगदी प्रायोगिक नाटकासारखे !!!. पण स्टाईल भन्नाट आहे....
त्यात ऍटॉमिक फिजिक्स आणि त्यात लागलेले शोध यांचे भरपूर उल्लेख आहेत.... तो एकदम इंट्रेष्टिंग प्रकार आहे....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

एलेव्हन मिनीट्स : पावलो कोएल्हो
कालच वाचले
वेदना दु:ख आणि आनन्द हे एकच असते.
वेदनेतुन आनन्द मिळतो
सॅडॉमाचोइझम आणि नैसर्गीक आनन्द यात नक्की फरक कोणता
सेक्स आणि आत्मिकआनन्द यावर बरेच उलटसुलट विचार आहेत.
वाचनिय आणि खरोखर धक्कादायक पुस्तक
याचे परिक्षण लिहीन मिपा वर लवकरच

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

गलगलेनिघाले's picture

22 Aug 2008 - 10:45 am | गलगलेनिघाले

मला सुध्दा असेच एक पुस्तक वाचल्याचे स्मरते. नाशिक सीबीएस्...नाईटआउट....
कावळेसाहेब.....ड्रायव्हरचा एस्टी चालवीत असताना म्रुत्यू........
असे काहीसे सन्दर्भ होते का तुम्ही वाचलेल्या पुस्तकात?

मेघना भुस्कुटे's picture

22 Aug 2008 - 11:22 am | मेघना भुस्कुटे

होय होय.
लेखक वसंत नरहर फेणे काय?

कोलबेर's picture

25 Aug 2008 - 11:37 pm | कोलबेर

होय हेच ते पुस्तक. अशीच काहीशी कथा होती...

सचीन जी's picture

22 Aug 2008 - 11:27 am | सचीन जी

>> मी खूप पुर्वी एक 'सेंट्रल एसटी स्टँड' नावाचे पुस्तक वाचलं होतं. भन्नाट होतं. हे >>कुणी वाचलं असल्यास त्याची आणखी माहिती मिळू शकेल का? मी लेखक वगैरे >>सगळेच विसरलो आता. कदाचित नाव देखिल थोडंस वेगळं असेल. कथा एका >>ग्रामिण भागातील यष्टीत घडते. कुणाला आठवते आहे का?

हे पुस्तक महादेव मोरे यांनी लिहले आहे. चांगले आहे!

मेघना भुस्कुटे's picture

22 Aug 2008 - 11:31 am | मेघना भुस्कुटे

होय का? अजून काहीतरी लिहा ना त्याबद्दल. का वेगळं आहे वगैरे...

मला आवडलेली चाकोरी बाहेरची पुस्तके -

१. शाळा - मिलिंद बोकिल
२. बाकी शुन्य - कमलेश वालावलकर
३. अमुकचे स्वातंत्र्य - शशांक ओक
४. कोसला, बिढार, झुल - भालचन्द्र नेमाडे
५. एम. टी. आयवा मारु - अनंत सामंत

सचीन जी

आनंदयात्री's picture

22 Aug 2008 - 11:37 am | आनंदयात्री

बाकी शुन्य मला वैयक्तिकरित्या भिकार वाटले.

मेघना भुस्कुटे's picture

22 Aug 2008 - 11:42 am | मेघना भुस्कुटे

असं नुसती विशेषणं नि नावं देऊन नाही थांबायचं. का ते सांगा ना. सगळ्यांना ऐकायला आवडेल 'बाकी शून्य' आणि 'एम टी आयवा मारू'बद्दल.
समुद्रावरचं विश्व 'रणांगण'नंतर प्रथमच मराठीत इतकं सांगोपांग आणि स्टायलिश आलं होतं 'मारू'मधे. आणि 'बाकी शून्य' हा 'कोसला'चा पुढचा अवतार होता, असं काही जणांचं म्हणणं होतं. सांगा ना तुमचं मत त्याबद्दल.

आनंदयात्री's picture

22 Aug 2008 - 11:54 am | आनंदयात्री

मास्तर काय म्हणतायेत ते इथे पहा.

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 2:21 pm | भडकमकर मास्तर

धन्यवाद आंद्या....
मी माझा धागा शोधावा म्हणत होतो तोपर्यंत तूच टाकला होतास....
तिथे खरंतर मी भलतंच जपून, मोजून मापून लिहिलं आहे....
शेवट अगदी टुकार होत जाते ही कादंबरी...
बाकी शून्य
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

छोटा डॉन's picture

25 Aug 2008 - 9:11 pm | छोटा डॉन

बाकी शून्य; शेवट अगदी टुकार होत जाते ही कादंबरी...
मी माझा धागा शोधावा म्हणत होतो तोपर्यंत तूच टाकला होतास....
तिथे खरंतर मी भलतंच जपून, मोजून मापून लिहिलं आहे...

हम्म !
मास्तर आणि आंद्या, खरेच का डायरेक्ट "टाकाऊ , टुकार, अर्थहीन [ पक्षी : बाके शुन्य ] " म्हणण्याएवढी ही कादंबरी बोगस आहे ?
मास्तरांनी मागे धागा लिहला होता याबद्दल आणि मनोसोक्त [ तरीपण मोजुन मापुन ] रेवडी उडवली होती त्याची.
जास्त वाद नको म्हणुन त्यावेळी उत्तर दिले नाही ...

[ येथुन पुढे व्यक्त केलेली मते माझी वैयक्तीक आहेत, त्याला सर्वसाधारण निष्कर्ष समजु नये. समजल्यास आमची हरकत नाहीच ]
असो. आम्हाला तर ही कादंबरी "लै लै लै " आवडली ...
त्यात डायरेक्ट टुकार वाटावे असे काहीच नव्हते ...
मुळात ही कादंबरी एका "सर्वसामान्यापेक्षा किंचीत जास्त बुद्धीमत्ता असलेल्या एका मध्यमवर्गीय मुलाच्या जीवनात येणार्‍या अनेक वळणांचे, त्याचे जीवनाच्या तत्वज्ञानाचे, त्याच्या सहकार्‍यांचे आयुष्याकडे पाहणाच्या दॄष्टीचे " भेदक, यथार्थ व काहीसे मोकळेचाकळे व सर्वसामान्य "श्लाघ्य / अश्लाघ्यांच्या व श्लील / अश्लीलाच्या सिमारेषा" ओलांडुन केलेले वर्णन आहे.
काही ठिकाणी शेंडीला झिणझिण्या आणणारी वर्णने असली व काही ठिकाणी "पटणारच" नाही एवढ्या खालच्या पातळीला जरी त्याच्या जीवनाची नौका गेलीली आढळली तरी मी त्यामुळे कादंबरीला टुकार ठरवुन मोकळे होणार नाही.
कादंबरीच्या शेवटाबद्दल असणार्‍या अक्षेपाबाबत मी आपल्याशी स्पष्ट असहमत आहे ...
उलट माझे मत आहे की पुर्ण कादंबरीत लेखकाने रचलेल्या व्यक्तीरेखांची उतरंडीला ह्या कादंबरीचा यथार्थ शेवट एकदम अचुक न्याय देतो. कारण त्यांनी जीवनभर जी तत्वे सांभाळली वा त्यांची जी विचारसारणी होती त्याला अनुसरुनच त्यांचे ध्येय ठरत गेले व ते त्यांच्याकडुन गाठले गेले. कादंबरीच्या नायकाच्या बाबतीत असे काहीच नसल्यानेच कदाचित ह्या कादंबरीला "बाकी शुन्य" हे नाव एकदम फिट्ट आहे.

कदाचीत ह्या कादंबरीचा शेवट जनरितीप्रमाणे " राजाने त्या राक्षसाचा पराभव केला व राजा-राणी सुखाने नांदु लागले" किंवा "समर्थांनी [ रामदास नव्हे, नारायण धारपांचे समर्थ ] आपल्या दैवी शक्ती व गुरुंकडची विद्या वापरुन त्या अनिष्ट शक्तीला पुढच्या २०० वर्षासाठी मंत्राने बंधनात अडाकवले व गिरीषची सुटका केली " किंवा "अशा प्रकारे वसंतरावांनी आयुष्यभर कष्ट करुन स्वतःच्या हिमतीवर पुण्यात कोथरुड भागात श्रमसाफल्य नावाचा बंगला बांधला व त्यात ते सुखाने आपल्या नातवंडासह राहु लागले" किंवा "कुठल्यातरी फलाण्या गुप्तहेराने वर्षानुवर्षे पोलीसांना चकमा देणार्‍या चोराला कशा बेड्या ठोकल्या " किंवा " अ व क्ष ची प्रेमकहाणी दुनयेला फाट्यावर मारुन कशी यशस्वी झाली " ह्यापैकी काही नसल्याने तो "अनपेक्षीत व टुकार, निर्रथक, अनावश्यक, चुकलेला, फसलेला" वाटु शकतो ...

बाकी काही भागात "तत्वज्ञानाचा असा किस" पाडला आहे की डोके औट होते.
ते "कोसला" शी तुलना वगैरे करणे मुर्खपणा ठरेल पण मी असे म्हणतो की "कादंबरी कुठेही अपेक्षाभंग होउ देत नाही" ...

बाकी अशा शुल्लक प्रतिसादात मी मला काय भावले हे पुर्णपणे व सविस्तरपणे लिहु शकत नाही ....
त्यासाठी मी खास वेगळे " बाकी शुन्य : परिक्षण " ह्या ५-६ दिवसात जरासे सवडीने व सविस्तर टाकतो, त्यावर सविस्तर चर्चा करु ...
मला वाटते चर्चा रंगेल व मजाही येईल ...

असो. आपल्या मताचा मला आदर आहे हे वेगळे सांगायलाच नको. पण माझी बाजु मांडणे हे माझे कर्तव्य आहे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भडकमकर मास्तर's picture

25 Aug 2008 - 11:08 pm | भडकमकर मास्तर

पण माझी बाजु मांडणे हे माझे कर्तव्य आहे ...

मस्त केलेस...
त्याशिवाय मजा नाही...
..
तुझे परीक्षण वाचायला उत्सुक...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आनंदयात्री's picture

26 Aug 2008 - 8:32 am | आनंदयात्री

>>ते "कोसला" शी तुलना वगैरे करणे मुर्खपणा ठरेल पण मी असे म्हणतो की "

वा वा ... झालच की मग !!

बाकी क्षुल्लक हा शब्द शुल्लक असा नव्हे तर क्षुल्लक असा लिहला जातो ;)

चिमणी's picture

26 Aug 2008 - 4:29 pm | चिमणी

हे बाकी शून्य म्हणजे यात नायकाला लहानपणापासून स्वप्न पडत असते की तो एक अंधार्‍या भुयारातून जात आहे आणि ज्ञानाचा(की असाच कशाचातरी. पुस्तकातला नेमका शब्द आठवत नाहिये) शोध घेण्यासाठी शाळेतूनच पळून जातो. रात्र एक गुहेत काढतो. नंतर पुस्तकाच्या शेवटी शेवटी एक आर्मी कँप असलेल्या टेकडीवर चढून जातो. असले काही आहे का? मला त्या पुस्तकाचे नाव आठवत नाहिये पण या चर्चेवरून कथा थोडी ओळखीची वाटली.

छोटा डॉन's picture

26 Aug 2008 - 4:46 pm | छोटा डॉन

आपण सांगता तेवढं भयानक आणि अतार्कीक काही नाही त्यात, एक सर्वसधारण पण हटके आत्मचरित्र आहे.

कथानायक "जयराज सरदेसाई" , त्याचे बालपण, त्याचे कॉलेजचे आयुष्य, तिथले संगती, त्यांची जीवन जगण्याची पद्धत व तत्वज्ञान, पहिल्या "मार्केटिंग जॉब" चा अनुभव, त्यानंतर मुम्बईमधले काही अनुभव, मग पत्रकारितेच्या क्षेत्रातले काही प्रसंग , नायकाची "आ ए एस" होण्यासाठीची धडपड, आयुष्याचा एक नैराष्येचा कालखंड व त्यावेळची कथानायकाची मानसीक दोलनामय अवस्था व शेवटी सो कॉल्ड "उत्तरार्थ वा शेवट" असा साज आहे कादंबरीचा ...
ह्यात कथानायक व त्याचे दोस्त, कुटुंबिय, सहकारी, प्रेयसी, वरिष्ठ व इतर संबंधीतांमधले संबंध व परस्परांच्या जीवनाविषयीक तत्वज्ञाच्या फरकामुळे होणारा संधर्ष याचे झकास वर्णन आहे ...

त्या अंधार्‍या भुयाराचा उल्लेख आहे पण वेगळ्या अर्थाने, त्यासाठी तो टेकडी वगैरे चढत नाही बॉ ...

वाचा जरुर ते पुस्तक ...

बाकी मी सविस्तर परिक्षणात लिहीनच ...

स्वगत : च्यायला एक हलकट म्हणतो की "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहु दे !", त्या अंमळ भाड्याला उत्तर दिलेच पाहिजे .. ;)

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

26 Aug 2008 - 5:47 pm | आनंदयात्री

>>आयुष्याचा एक नैराष्येचा कालखंड व त्यावेळची कथानायकाची मानसीक दोलनामय अवस्था व शेवटी सो कॉल्ड "उत्तरार्थ वा शेवट" असा साज आहे कादंबरीचा ...
ह्यात कथानायक व त्याचे दोस्त, कुटुंबिय, सहकारी, प्रेयसी, वरिष्ठ व इतर संबंधीतांमधले संबंध व परस्परांच्या जीवनाविषयीक तत्वज्ञाच्या फरकामुळे होणारा संधर्ष याचे झकास वर्णन आहे ...

अगायायाया .... डायरेक्ट जीवनाविषयीक तत्वज्ञानालाच हात घातलाय का त्या पुस्तकात .. वा वा .. =)) =))

उठ की पी दारु .. मार सिगरेट हेच त्याचे जिवनविषयक तत्वज्ञान होते वाटतं !!

>>च्यायला एक हलकट म्हणतो की "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहु दे !", त्या अंमळ भाड्याला उत्तर दिलेच पाहिजे ..

अर्‍या बाबोsssssssss !!
प्रतिसादवाचकवर्गहो मी इथे नमुद करु इच्छितो की इथे हलकट हा शब्द मला म्हणजे प्रसाद मुळे अका आनंदयात्री याला उल्लेखुन आहे, "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहु दे !" या वाक्याच्या जनकाचा इथे काहिही संबध नाही !

-
(डान्याचा साताजन्माचा मित्र पण शुन्याच्या बाबतीत पाठीत सुरा खुपसणारा)

आंद्या हलकट

मला वाटते आहे की प्रतिसादकर्त्यांनी पुर्वग्रहदुषीतदॄष्टीने हे पुस्तक वाचले आहे किंवा त्याला अनुसरुनच त्यांचे तसे प्रतिसाद पडत आहेत. जरासे चष्मा काढुन वाचलेत तर कदाचित वेगळा अनुभव येईल ...
हां, आता जाणुन घेण्याचीच इच्छा नसेल व नुसते पुराण काळासारखे "अब्राम्हण्यम् अब्राम्हण्यम्" म्हनायचे असेल तर त्याला पर्याय नाही.

जाऊ दे, कळीचा प्रश्न, नक्की आक्षेप कशात आहे ?
नाही म्हणजे तुम्हाला जर काही आवडले नाही तर ते कुठले ? आणि का ? काही सबळ कारण ?
[ ह्याला उत्तर देताना नेहमीच्या रुढीपरंपरागत कादंबर्‍यांचे दाखले देऊन "बाकी शुन्य" ची लाज काढु नये ]
सामान्यता "विरोध करताना त्याला सबळ कारण" द्यावे असा प्रघात आहे, नुसते भाजपासारखे "विरोधासाठी विरोध " करु नये हे अपेक्षीत. मी माझे मुद्दे मांडतो पण त्याला उत्तर फक्त "उपरोध" अलंकार वापरुन मिळत असेल तर त्यात काय दम नाही. मी फक्त "नॉट फेअर" असेच म्हणीन ...

अगायायाया .... डायरेक्ट जीवनाविषयीक तत्वज्ञानालाच हात घातलाय का त्या पुस्तकात .. वा वा ..

मला वाटते की थोडी विसंगती आहे प्रतिसादात.
मी [ किंवा कमलेश वालावलकराने ] "एकुणच जीवनाचे तत्वज्ञान" असा शब्दप्रयोग कधीही केला नाही. जे काही होते ते फक्त "जयराज सरदेसाई" पुरतेच मर्यादीय आहे. आता हे लक्षात घेतले की आपल्या "उपरोधा" मागची हवाच निघुन जाते.
पुन्हा एकदा सांगतो, मुद्द्याला मुद्द्याने उत्तर द्या ...
उपरोध वापरत असाल तर बाकीच्यांत व आपल्यात काहीच फरक नाही असे मी समजावे का ?

उठ की पी दारु .. मार सिगरेट हेच त्याचे जिवनविषयक तत्वज्ञान होते वाटतं !!

बेश्ट !!!
अशी बेसलेस विधाने केली आणि आतातायी निष्कर्ष काढले की झालेच.
मी कधी त्याच्या "दारु / सिगारेट" च्या नादाचे समर्थन, कौतुक, उल्लेख केला. आप्लयाला तेवढीच गोष्ट का दिसावी ?
तर आपल्या मते साधारणता ३५०-४०० पानी ह्या पुस्तका फक्त "दारु - सिगारेट" चीच वर्णने आहेत ? त्याचा आधार नायक त्याच्या अवगुणांचे समर्थन करण्यासाठी घेतो ? त्यामुले त्याचे कल्याण झाल्याचा कुठे उल्लेख आहे ?

एक खोचक प्रश्न विचारतो, वरच्या गोष्टी सोडुन अजुन काय आठवते ? मला तर बरेच काही चांगले अजुनही आठवते बाबा.

मोह आवरत नाही म्हणुन एक वाक्य वापरतो " मनी वसे ते स्वप्नी दिसे", असा तर प्रकार नाही ?
[ अगर मन दुखावले गेले असेल तर आमची सपशेल माफी. वाक्यामागचा आयश व उद्देश महत्वाचा ...]

बाकीचे "माझे तत्वज्ञान" मी माझ्या लेखात मांडीन ...

प्रतिसादवाचकवर्गहो मी इथे नमुद करु इच्छितो की इथे हलकट हा शब्द मला म्हणजे प्रसाद मुळे अका आनंदयात्री याला उल्लेखुन आहे, "रुद्ध प्रतिभा चतुरस्त्र वाहु दे !" या वाक्याच्या जनकाचा इथे काहिही संबध नाही !

अगदी सरळ आहे हे.
इतर अनावश्यक शंका आणि फाटेफोडही नको ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

आनंदयात्री's picture

26 Aug 2008 - 6:55 pm | आनंदयात्री

>>मोह आवरत नाही म्हणुन एक वाक्य वापरतो " मनी वसे ते स्वप्नी दिसे", असा तर प्रकार नाही ?

हा हा हा ... व्यक्तिगत शेरेबाजी तुमची जळजळ दाखवुन देतेय =))
इनो घ्या साहेब इनो !!

आपलाच,

आंद्या (हलकट)

रत्नागिरीकर's picture

22 Aug 2008 - 3:12 pm | रत्नागिरीकर

सहमत, मला पण हे पुस्तक आवडले नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Aug 2008 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

सचीन जी,

या पुस्तकांबद्दल थोडक्यात माहितीपण द्याल का?

यमी

भडकमकर मास्तर's picture

22 Aug 2008 - 2:23 pm | भडकमकर मास्तर

हा माझा शाळेचा रिव्ह्यू...
http://www.misalpav.com/node/659
ह्ये आपलं मिपा वरचं पहिलं लेखन बर्का...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

बबलु's picture

23 Aug 2008 - 12:20 am | बबलु

डॉ. कणेकरांचा मुलगा --- लेखकः शिरीष कणेकर.

मला फार आवडलं हे पुस्तक. आणि माझ्यासारख्या "कणेकर फॅन" ला तर जबरी पर्वणी.
वाचून पहा.

....बबलु-अमेरिकन

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Aug 2008 - 1:05 am | बिपिन कार्यकर्ते

इस्तन्बूल ते कैरो...

नुकतंच इस्तन्बूल ते कैरो हे निळू दामल्यांचं पुस्तक वाचलं. तसं हे पुस्तक वादग्रस्त, धक्कादायक वगैरे नसलं तरी चाकोरीबाहेरचं नक्कीच आहे. लेखकाने स्वतःच म्हणल्याप्रमाणे, मराठीत रिपोर्ताज (ज्याला दामल्यांनी 'फिरस्ती पत्रकारिता' असा शब्द वापरला आहे) प्रकारचे लेखन तसे कमीच आहे. शिवाय सद्यस्थितीतले समाजमान, आंतरराष्ट्रीय प्रश्न वगैरे असे विषय पण फार कमीच हातळले जातात. त्या मुळे एक अनुभवी मराठी पत्रकार हे आव्हान कसे पेलतो आहे असे कुतूहल वाटले आणि पुस्तक वाचायला घेतले.

मूळात दामल्यांना 'मुस्लिम' आणि 'मुस्लिम मानसिकता' या विषयांमधे भरपूर रस असावा. त्यांनी इंडोनेशिया पासून अफगाणिस्तान पर्यंत मुस्लिम समाजाच्या मानसिकतेचा पूर्ण स्पेक्ट्रम जवळून पाहिला आहे असे नमूदही केले आहे. त्याचाच पुढचा भाग म्हणून त्यांनी तुर्की आणि इजिप्त हे दोन देश जवळून पाहण्याकरता केलेला प्रवास आणि त्या प्रवासातले अनुभव, निरीक्षणं याची परिणती म्हणजे 'इस्तन्बूल ते कैरो' हे पुस्तक. हे दोन देश निवडायचं कारण बहुधा असे की, जरी हे दोन्ही देश सुधारणा वादी असले तरी एक देश (तुर्की) हा आपण मुस्लिम आहोत ही जाणीव शक्य तितकी पुसून टाकायचा प्रयत्न करत वाटचाल करतो आहे तर दुसरा देश (इजिप्त) आपल्या धर्माचा अभिमानी आहे पण त्याला आधुनिकतेचंही भान आहे. स्वाभाविकपणे अश्या समाजांमधे बरेच अंतर्विरोध (इन्टर्नल कन्फ्लिक्ट्स) असतात. ते छान टिपले गेले आहेत. उदा. इस्तन्बूल मधल्या हॉटेलचा मॅनेजर इस्राएलचा द्वेष करतो कारण त्यांनी जेरुसलेम बळकावलं आहे, तिथली इस्लामची तिसर्‍या क्रमांकाची पवित्र मशीद बळकावली आहे पण त्याला धार्मिकता किंवा धार्मिक विचारसरणीची माणसंही आवडत नाहीत.

दोन्ही देशात स्त्रियांच्या जीवनाबद्दल त्यांच्या परिस्थिती बद्दलही त्यांनी लिहिलं आहे. पूर्वी हिजाब (बुरखा) लादला जायचा, आज ती परिस्थिती नाही तरीही खूपश्या तरूण मुली स्वतःहून तो वापरणे पत्करत आहेत. (प्रथेनुसार एकदा हिजाब वापरायला सुरूवात केली की मग तो जन्मभर वापरावा लागतो.) हे का होत आहे? असे अनेक विविध पैलू दामल्यांनी हातळले आहेत.

सर्वसाधारण पणे इस्लाम किंवा मुस्लिम समाज हा एकसंध किंवा एकजिनसी आहे असंच आपल्याला वाटत असतं, हे पुस्तक वाचल्यावर ते तसं नाहिये हे प्रकर्षानं जाणवेल. सर्वसामान्य मराठी वाचकाला पुस्तक नक्कीच आवडेल.

इस्तन्बूल ते कैरो - लेखक निळू दामले.
मौज प्रकाशन, किंमत १५० रूपये.

बिपिन.

मेघना भुस्कुटे's picture

23 Aug 2008 - 12:07 pm | मेघना भुस्कुटे

निळू दामलेंनी लंडन बॉम्बस्फोटांवरपण लिहिलं आहे. 'लंडन बॉम्बिंग २००५' असं आहे पुस्तकाचं नाव. मौज प्रकाशन. लंडनमधली कॉस्मोपॉलिटिन जनता, त्यांचं अपरिहार्यपणे एकत्र राहणं आणि त्यातून निर्माण होणारे ताण, ९/११नंतर गोर्‍यांच्या दृष्टिकोनात झालेला विखारी बदल आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या काही आशावादी गोष्टी. शिवाय ज्या मुस्लिम मुलांचा या स्फोटांमधे प्रत्यक्ष हात असल्याचं सिद्ध झालं, त्यांच्या राहत्या वस्तीतले पडसाद आणि पार्श्वभूमी. कुठल्याही महाशहराला आता हे ताण चुकले नाहीतच. त्याचं फार सुरेख भान बाळगलं आहे दामलेंनी.

तसंच त्यांचं जेरुसलेमवरचं पुस्तकही वेगळं आहे. जेरुसलेममधल्या अनेक भागांतून प्रत्यक्ष फिरून त्यांनी ते लिहिलं आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा व्यापक पट तर त्या लिखाणाला आहेच. त्यात फारसं आश्चर्य नाही. पण त्यांचे काही लहान लहान वैयक्तिक अनुभव त्या लिखाणाला वेगळीच खुमारी देतात. उदाहरणार्थ त्यांनी लिखाणासाठी केलेल्या नोंदी तिथल्या अधिकार्‍यांनी तपासल्या. त्या मराठीत - देवनागरीत होत्या. ते त्या अधिकार्‍याला कळलं नाही. आपल्याला न कळणार्‍या लिपीत काहीतरी लिहिलेलं पाहून त्याला प्रचंड असुरक्षित वाटलं. आपल्या लिपीनं दिलेलं हे खाजगीपण चटकन उर्दूबद्दलच्या आपल्या असुरक्षिततेची आठवण करून देतं. निदान मला तरी ती झाली. अशी अनेक माणसं. अनेक लोकविलक्षण अनुभव.

भानू काळेंचं 'बदलता भारत'ही अशा रिपोर्ताजमधे मोडणारं पुस्तक. जागतिकीकरणानंतरच्या भारताचं एक चित्र काढण्याचा तो प्रयत्न आहे. अनेक सामाजिक संस्था, उपक्रम आणि वैयक्तिक प्रयत्न यांच्या काठाकाठानं केलेला. सगळंच्या सगळं चित्र या पुस्तकामधे आलं आहे, असा दावा नाहीच. पण तो एक वेगळा आणि लक्षणीय प्रयत्न आहे..

'कर के देखो' या समकालीन प्रकाशनाच्या पुस्तकाबद्दलही बर्‍याच जणांना माहीत असेल. 'साप्ताहिक सकाळ'च्या वर्धापनदिनी आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणांचा तो संग्रह आहे. जागतिकीकरणाच्या छायेतल्या निरनिराळ्या प्रश्नांना सामोरं जाताना किती सर्जनशील पद्धतीनं प्रयत्न करता येतील, आपली दृष्टिरेषा कशी उंचावता येईल याचा तो एक वस्तुपाठच आहे. योगेंद्र यादव, जावेद अख्तर, यू. आर. अनंतमूर्ती ही काही नावं वानगीदाखल. भाषा काहीशी अवघड वाटली मला. पण नाव सार्थ करणारं पुस्तक आहे.

सचीन जी's picture

27 Aug 2008 - 2:12 pm | सचीन जी

बाकी शुन्य च्या बाबतीत मी डान्याशी १०० % सहमत आहे.
आता ते मला का आवडलं हे कदाचीत मी डान्याइतकं पटवुन सांगु शकणार नाही किंवा पुस्तकांबद्द्लच्या आक्षेपांना उत्तरही देउ शकणार नाही. पण पुस्तक मनाला भीडतं राव!
कधी कधी स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं ( दारु, सिगरेट, लफडी या बाबतीत नाही, आधीच सांगीतलेले बरे! नाही तर खेचायला बसलेतच मिपाकर)

सध्या पाचव्यांदा वाचतोय!

अवांतर - मी कमलेश वालावलकरांना भेटलो पण आहे! एकदम मस्त माणुस ! आणि दुसरी कादंबरी लिहायचा त्यांचा विचार नाही! बरोबर आहे म्हणा, अशी कलाक्रुती एकदाच जन्माला येते.
उत्तम उदाहरण म्हणजे आयवा मारु. सामंतांच्या नंतरच्या कादंबर्या तितक्याशा जमल्या नाहीत.

छोटा डॉन's picture

27 Aug 2008 - 5:37 pm | छोटा डॉन

पण पुस्तक मनाला भीडतं राव!
कधी कधी स्वतःचं प्रतिबिंबही दिसतं ( दारु, सिगरेट, लफडी या बाबतीत नाही, आधीच सांगीतलेले बरे! नाही तर खेचायला बसलेतच मिपाकर)
सध्या पाचव्यांदा वाचतोय!

++++१
वा ! वाचुन बरे वाटले.

बाकी पुस्तक आहेच वारंवार वाचण्यासारखे. मी वाचतो नेहमी वेळ मिळेल तसे.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

वाचक's picture

27 Aug 2008 - 9:00 pm | वाचक

ह्या कादंबरीने ह्या संस्थळावरच नव्हे तर इतर अनेक ठिकाणी 'वाद विवाद' घडवले - हे त्या कादंबरीचे सामर्थ्य मानता येइल.

मी वाचली आहे ही - बर्‍याच वेळेला कारण माझ्याकडे स्वत:ची प्रत आहे.

आता (मला जाणवलेल्या) सामर्थ्य स्थळांबद्दल
- शैली (नेमाड्यांची आठवण करुन देणारी असली तरी नक्कल नाही)
- भाषा (ईंजिनियरींग कॉलेजच्या मुलांच्या तोंडात शोभेल अशी, चपखल)
- प्रवाह (फ्लो म्हणायचं आहे मला - अगदी शेवटच्या २०-२२ पानांपर्यंत कुठेही कंटाळवाणी होत नाही)

मला अस वाटल की "जयराज" ह्या जरा जास्त संवेदनशील, हुषार तरुणाच्या मनात येत गेलेल्या भावनांच प्रतिबिम्ब ही कादंबरी दाखवते. जयराज ह तरुण त्याच्याच वयाच्या इतर तरुणांपेक्शा बराच वेगळा आहे. कदाचित लहानपणापासून सगळे मिळत गेल्यामुळे म्हणा किंवा स्वभावाची एक घडण म्हणा, बर्‍यापैकी 'उदासिन' आहे म्हणजे कुठली गोष्ट मिळवण्यासाठी 'धडपड' करावी अशी त्याची मानसिकताच नाही. आणि गंमतीचा भाग म्हणजे सगळ्या गोष्टी - ज्या इतरांना बरेच हातपाय आपटून मिळवाव्या लागतात - त्या त्याला सहज प्राप्त होतात - परीक्षेतील यश, नोकरी, मुली - त्यामुळेच कदचित अजूनच त्याचा 'ह्या धडपडीवरचा' विश्वास उडत जातो आणि दुसरे म्हणजे मिळणारा रिकामा वेळ (मानसिक दृष्ट्या) म्हणून त्याला असे निरनिराळे प्रश्न पडत जातात आणि उत्तरे शोधायचा हि उत्साह असतो.

कमकुवत स्थळे
- रटाळ शेवट
- "बाळ" च्या गोष्टीमुळे झालेले विषयांतर
- जयराजची मानसिक बैठक नीटपणे कुठेच उलगडून सांगितली जात नाही - बर्‍याच वेळेला हे काम इतरांच्या संभाषणातून दाखवल जात - इथे तस घडत नाही
- पलायनवादी तत्त्वज्ञान
- आजूबाजूच्या व्यक्तिरेखा नीट न उभ्या रहाण - (अर्थात अपवाद आहेतच)

आजकालच्य तरुणांपुढे पुरेसे आदर्श नसल्यामुळे आणि न मागताच सगळ मिळत गेल्यामुळे त्यांनी असा पलायनवाद स्वीकारला असावा असे आपल्याला वाटत रहाते - पण लेखक तसे कुठेच सुचवत नाही आणि आपण आपले मारतोय अंधारात दगड

(अजून लिहायचे होते पण कार्य बाहुल्यामुळे आवरते घेतो :) )

छोटा डॉन's picture

27 Aug 2008 - 9:09 pm | छोटा डॉन

वाचकसाहेब, आपला अभ्यासपुर्ण प्रतिसाद आवडला ...
मस्त परिक्षण आहे ...

आजकालच्य तरुणांपुढे पुरेसे आदर्श नसल्यामुळे आणि न मागताच सगळ मिळत गेल्यामुळे त्यांनी असा पलायनवाद स्वीकारला असावा असे आपल्याला वाटत रहाते - पण लेखक तसे कुठेच सुचवत नाही आणि आपण आपले मारतोय अंधारात दगड

सौ टके की बात !!!
+++१

- "बाळ" च्या गोष्टीमुळे झालेले विषयांतर

विषयांतर असले तरी कुथेही कादंबरीचा डौल हरवत नाही यामुळे ...
काहीशी हटके विचारसारणी आहे ह्या भागात.

असो. बरे वाटले

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मृदुला's picture

28 Aug 2008 - 3:50 am | मृदुला

"अंधारात मठ्ठ काळा बैल" नावाचं एक पुस्तक दहाबारा वर्षांपूर्वी वाचलं होतं. चाकोरीबाहेरचं नक्कीच. वादग्रस्त की काय कल्पना नाही. धक्कादायक तेव्हा वाटलं होतं पण आता वाचून कदाचित वाटलं नसतं.
बाकी लेखक "कळ"वाले शाम मनोहर असावेत असं अंधुकसं वाटतंय.

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 4:07 pm | विनायक पाचलग

जुना धागा वर काढल्याबद्दल माफी
पण या पुस्त्काचे लेखक श्याम मनोहरच आहेत
या पुस्तकवर आमचा संस्थेने दीर्घांक केला होता याच नावाचा म्हणून आठवले

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

चिलिगार्ड's picture

14 Sep 2008 - 8:11 pm | चिलिगार्ड

भिन्न . सलग वाचल्यास ..

सुहास..'s picture

16 Jan 2009 - 5:50 pm | सुहास..

सर्वा॑ना एक नम्र विन॑ती...

ही काद॑बरी दहावे नाथ(नवनाथाच्या न॑तरचे) या॑च्यावर आहे...बहूतेक बाबा कदम्...कोणी मला नाव आठवण करून देईल का ?

सुहास

विंजिनेर's picture

16 Jan 2009 - 5:52 pm | विंजिनेर

पुस्तक वाचन हा माझ्याही अतिशय जिव्हाळ्याचा विषय.
सध्या इंग्रजी वाचनच जास्त होते पण काही लक्षात राहिलेली (लक्षात राहयला पुस्तक वादग्रस्तच असायला पाहिजे असे नाही...) मराठी पुस्तके म्हणजे (क्रमवार नाही)
१. आमचा बाप आणी आम्ही - नरेंद्र जाधव
२. चौघीजणी - शांता शेळकेंनी केलेला "लिटील वुमन" चा अनुवाद. (आता कदाचित उपब्लध नसावा)
३. रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर

- (नोकरीच्या धबडग्यात मराठी वाचन हरवलेला) आदित्य

सागर's picture

16 Jan 2009 - 5:58 pm | सागर

अरुण ताम्हणकरांची पुस्तके चाकोरीबाहेरची म्हणून म्हणता येतील.

१. सर्पगंध
२. दिक्-बंधन
३. कुठे फिरविशी जगदीशा
४. जन्मांतर

ही ४ पुस्तके वाचली आहेत मी. ज्यांना विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड शोधण्यात रस आहे त्यांनी ही पुस्तके अवश्य वाचावी

बाकी अध्यात्म या विषयावरची "साद देती हिमशिखरे" ही माझी भलतीच आवडती व प्रिय कादंबरी आहे
(मूळ लेखक :जी.के.प्रधान , अनुवादः रामचंद्र जोशी) इंग्रजी नाव : Towards the Silver Chrest of the Himalayas

- सागर

चेतन सुभाष गुगळे's picture

16 Jan 2009 - 6:28 pm | चेतन सुभाष गुगळे

अरूण हरकारे यांचे रावजी प्रकाशन, डोंबिवली तर्फे प्रकाशित झालेले हे पुस्तक कुणी वाचले आहे काय?
वादग्रस्त आहे की नाही ते मी सांगु शकत नाही कारण हे पुस्तक वाचलेला कुणी मला अजून भेटला नाहीय पण व्यक्तिशः मला हे पुस्तक चाकोरीबाहेरचे आणि अतिशय धक्कादायक वाटले.

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ९८६०२०११०१
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com