खांसाहेबांची खिचडी

गौरीबाई गोवेकर's picture
गौरीबाई गोवेकर in पाककृती
14 Nov 2012 - 8:45 pm

साहित्यः दोन वाट्या बाजरी,पाव वाटी मुगाची डाळ,पाव चण्याची (हरभरा) डाळ, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या.(शक्यतो जाडसर पोलिश न केलेल्या)
चार पाच लसूण पाकळ्या, अर्धा ईंच आले,एक चमचा धन्याची पुड, एक चमचा जिरे पुड (दोन्ही जरा भाजून केलेल्या)
१ चमचा गरम मसाला, किसलेले सुके खोबरे,दोन तमालपत्रे,भिजवुन उकडलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला १ कांदा,बारीक चिरलेली कोथिंबिर,चार पाच लाल सुक्या मिरच्या,तेल,लोणी.

प्रथम बाजरीला थोडा पाण्याचा हात लावून सडून घ्यावी पूर्वी आम्ही खलात छोट्या मुसळाने सडत होतो. आता योग्य तो प्रोसेसर वापरावा.एका बाजरीच्या दाण्याचे दोन तुकडे होतील ईतपत भरड असावे. नंतर ते चांगले पाखडावे. त्या मुळे साले निघून जातील. ईतर डाळी व कण्या धुवून अर्धा तास निथळत ठेवाव्या.

थोड्याशा तेलावर कांदा लालसर परतून घ्यावा. त्यात आले व लसूण बारीक वाटून घालावा. कच्चेपणा गेल्यावर सहा वाट्या आधणाचे गरम पाणी घालुन उकळी येउ द्यावी. त्यावर उकडलेले शेंगदाणे घालावे, बाजरी व ईतर डाळी,कण्या घालाव्यात.बाजरी शिजायला थोडा वेळ लागतो. शिजत आल्यावर धने जिरे पुड,सुके खोबरे,मीठ घालावे.शेवटी पळीने चांगले घोटावे. आवश्यकता असेल तर थोडे पाणी घालावे. शेवटी आच मंद करून वरून लोणी सोडावे.

दुसरीकडे तेल,हिंग,तमालपत्र्,सुकया मिरच्यांची फोडणी करून खिचडीला द्यावी.वरून कोथिंबिर घालावी. ही खिचडी मउसरच चांगली लागते.

[ही खिचडी मांसाहारी लोकांसाठी करायची असल्यास कांदा परतून झाल्यावर उकडलेले चिकन लेग्स घालावेत. उकडताना राहिलेल्या पाण्याचा खिचडी शिजवण्यासाठी वापर करावा व त्या प्रमाणात मसाले थोडे वाढवावेत.]

खांसाहेबांकडून एखादी खास चिज शिकायची असेल तर मी ही खिचडी मुद्दाम करत असे. त्याच्या वासाने खांसाहेब खुष होत त्यांना ती फार आवडे. त्या भरात एखादी खास चिज हमखास शिकवत असत. अशा प्रकारे अनेक चिजा त्यांच्याकडून मी शिकले.

प्रतिक्रिया

वाटाड्या...'s picture

14 Nov 2012 - 9:00 pm | वाटाड्या...

हे खाँसाहेब कोण?

बाकी पाकृ छानच आहे..विकांताला करायला पाहिजे...

धन्यवाद...पाकॄकरता..

- वाट्या..

खिचडीचा नवीनच प्रकार वाचायला मिळाला ("पहायला" मिळाला म्हंटलं असतं, पण फोटो नाही नं :-( )

धन्यवाद!

पण तो अखेरचा 'हूक' खासच! आमची उत्सुकता चाळवलीच आहेत तर आता ते खां साहेब कोण, आणि त्यांच्याकडून तुम्ही कोणत्या चीजा शिकलात तेही येऊ द्यात!

आनंदी गोपाळ's picture

14 Nov 2012 - 9:59 pm | आनंदी गोपाळ

एक विशिष्ट कढी सारखी आमटी असते.
तिचीही पाकृ टाका :)

पैसा's picture

14 Nov 2012 - 10:10 pm | पैसा

नवीन असलात तर मिपावर स्वागत असे म्हणते! :D
पाकृ चांगलीच आहे. पण फोटो असता तर आणखी मजा आली असता. [असे म्हणण्याचे कारण म्हणजे खांसाहेबांचा उल्लेख.]
हे कोणते खांसाहेब म्हणायचे? हल्ली कोणी खांसाहेब चिजा वगैरे म्हणणारे आहेत काय? नसतील तर तुमचं वय काय असावं हा विचार करते आहे. :P

अत्रुप्त आत्मा's picture

14 Nov 2012 - 10:12 pm | अत्रुप्त आत्मा

फोटू??????????????????????? :-(

याच पदार्थाला बाजरीचा खिचडा म्हणतात का? माझी आजी करायची तेंव्हा तो चविष्ट पदार्थ खाण्याची आवड/ वय नव्हतं आणि ती गेल्यावर कोणाकडूनही ती रेसिपी मिळाली नव्हती. बहुतेक हाच प्रकार असावा. धन्यवाद. फोटू असता तर अंदाज आला असता. आणि हे खानसाहेब म्हणजे नक्की कोण? तुम्ही त्यांच्याकडून काय शिकता?

रेवा आज्जी ..खानसाहेब नै गं :(

खांसाहेब :)

पाक्रु वाचायला छान वाटली :)

रेवती's picture

14 Nov 2012 - 10:27 pm | रेवती

होय, खरच की!

आनंदी गोपाळ's picture

15 Nov 2012 - 12:04 am | आनंदी गोपाळ

आसं हाय ते!
ह्यँ!
तुमाला उच्चार बी जमंना

गौरीबाई गोवेकर's picture

30 Nov 2012 - 8:58 pm | गौरीबाई गोवेकर

गोप्या... खांसाहेबांना असल्या अभद्र नावाने संबोधतोस होय रे, तू कसला आनंदी म्हणे बेसुरा होशील पुढच्या जन्मी.

>>तू कसला आनंदी म्हणे बेसुरा होशील पुढच्या जन्मी.

शिरा पडली ती असल्या अभद्र वाणीवर !!

आनंदी गोपाळ's picture

2 Dec 2012 - 9:23 pm | आनंदी गोपाळ

बेसुरा कसला,
भेसूर आलरेडी आहे मी ;)

गौरीबाई गोवेकर's picture

4 Dec 2012 - 12:33 pm | गौरीबाई गोवेकर

खां साहेब अतिशय रागावले की 'बेसुरी कहीकी' एवढच म्हणायचे.
म्हणून तेवढा एकच गैर शब्द माहित आहे मला. एकदा त्यांच्या
धोब्याने त्यांच्या कुडत्याला निट ईस्त्री केली नव्हती ते लक्षात येताच
ते म्हणाले 'बेसुरा' कहीका... त्या धोब्याचा गाण्याशी काही एक संबंध नव्हता.
तरी त्यांची एक पध्द्त होती ती. ईथे गोप्या बेसूर आणि भेसूर हे वेगवेगळ रे!
भेसूर असणारा खूप सुरीला अस ही मी पाहिले आहे. बेसुरता ही स्वरात
तर भेसूरता ही दिसण्यात असते. बाकी तू या जन्मीही बेसूरच असणार
(खां साहेबांना अस म्हणालास म्हणून हो. नाहितर तू ही माझ्या नातीसारखाच रे.)
ते अभद्र शब्द तेवढे मागे घे. एखाद्याच्या श्रध्देवर असे बोलू नये.

ह्म्म... आज्जेला चष्मा लागणार असं "दिसतय" ! ;)
बाकी तुम्ही खांसाहेबांकडून शिकलेल्या चीजा सांगा जरा बरं...
हं, तो पर्यंत बाकीचे मुबारक बेगमचे गाणं ऐकु शकतात... :)

गौरीबाई गोवेकर's picture

30 Nov 2012 - 8:59 pm | गौरीबाई गोवेकर

बाई मोठी सुरीली हो.

बाजरीची खिचडी होय, मला वाटलं काहीतरी नॉन व्हेज आहे, शंकरपाळी आणि करंजीवर उतारा म्हणुन.

असो, पाकृ विभागात खांसाहेब हे शब्द टाकुन उत्सुकता चाळवण्याची स्टाइल आवडली.

गौरीबाई गोवेकर's picture

15 Nov 2012 - 12:35 pm | गौरीबाई गोवेकर

तुमच्या सर्वांचा प्रातिसाद ऐकला.खूप बर वाटल.ऐकला म्हणजे, नातीने वाचून दाखवला.खांसाहेबांबद्द्लची तुमची उत्सुकता समजली. हा खाद्यपदार्थांचा विभाग असल्याने इथे त्या बद्द्ल अधिक लिहिणे योग्य नाही. पण खांसाहेब म्हणजे भेंडिबाजार घराण्याची तालिम लाभलेले महम्म्द तालिब खान. त्यांच्याबद्द्ल वेगळे सांगेन.

किसन शिंदे's picture

15 Nov 2012 - 10:42 pm | किसन शिंदे

नातीने वाचून दाखवला.

का म्हणे??

धागा तुम्हीच लिहलाय ना?

नातीने वाचुन दाखवला म्हणतायत ओ किसन राव ..
लिहिला गौरिबैनीच . लिहिणं आणि वाचणं ..फरकय कि राव :-/
काय पण जोक मारताय तुमी .ह्या!( हे ह्या! अगदि ' छ्या! ' सारखे वाचावे )

;)

आणि धागा आज्जींनी लिहिलाय, प्रतिसाद नातीने वाचलाय.

आज्जी आणि नातीतला फरक
वाचणे आणि लिहिणे यातला फरक
प्रतिसाद आणि धागा यातला फरक

सगळं विसरून कसं चालायचं देवा?
थोड्या वेळाने म्हणताल संपादक तुम्हीच आहेत ना?
(देवा ह्ल्के घ्या हो)

रेवती's picture

15 Nov 2012 - 6:35 pm | रेवती

नातीने वाचून दाखवला
बरं , बरं.

विनटूविन's picture

30 Nov 2012 - 10:25 pm | विनटूविन

खिचडी, खांसाहेब, गौरिबै व नात पण...... सर्वांचाच....

परिकथेतील राजकुमार's picture

4 Dec 2012 - 12:47 pm | परिकथेतील राजकुमार

गौरी आजी पाककृती एकदम अनवट आहे बरे तुमची. :)

पण IP address आणि MAC address मात्र शिळाच की हो.* ;)

*ही ओळ वाचून लगेच नको त्या चांभार चौकशा करायला आमच्याकडे धाव घेऊ नये अशी काही विशिष्ठ सदस्यांना विनंती आहे.

गौरीबाई गोवेकर's picture

4 Dec 2012 - 8:23 pm | गौरीबाई गोवेकर

तुझे ते सगळे मॅक का का काय म्हणतात ते आयडींचा संग्रह प्रशांत महासागरात बुडबुन टाक.

इरसाल's picture

4 Dec 2012 - 1:49 pm | इरसाल

*ही ओळ वाचून लगेच नको त्या चांभार चौकशा करायला आमच्याकडे धाव घेऊ नये अशी काही विशिष्ठ सदस्यांना विनंती आहे.

ओक्के.पण तुम्ही हे धंदे बंद केले नाहीत हे विचारायला धाव घेवु शकतात का?

धंद्याच्या जागी बिजनेस ह शब्द टाकावा

दादा कोंडके's picture

4 Dec 2012 - 4:22 pm | दादा कोंडके

मांसाहरी पाकृचं नाव वाचून घाबरतच धागा उघडला. पण फूस्स.....