खांसाहेबांची खिचडी
साहित्यः दोन वाट्या बाजरी,पाव वाटी मुगाची डाळ,पाव चण्याची (हरभरा) डाळ, अर्धी वाटी तांदुळाच्या कण्या.(शक्यतो जाडसर पोलिश न केलेल्या)
चार पाच लसूण पाकळ्या, अर्धा ईंच आले,एक चमचा धन्याची पुड, एक चमचा जिरे पुड (दोन्ही जरा भाजून केलेल्या)
१ चमचा गरम मसाला, किसलेले सुके खोबरे,दोन तमालपत्रे,भिजवुन उकडलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला १ कांदा,बारीक चिरलेली कोथिंबिर,चार पाच लाल सुक्या मिरच्या,तेल,लोणी.
प्रथम बाजरीला थोडा पाण्याचा हात लावून सडून घ्यावी पूर्वी आम्ही खलात छोट्या मुसळाने सडत होतो. आता योग्य तो प्रोसेसर वापरावा.एका बाजरीच्या दाण्याचे दोन तुकडे होतील ईतपत भरड असावे. नंतर ते चांगले पाखडावे. त्या मुळे साले निघून जातील. ईतर डाळी व कण्या धुवून अर्धा तास निथळत ठेवाव्या.
थोड्याशा तेलावर कांदा लालसर परतून घ्यावा. त्यात आले व लसूण बारीक वाटून घालावा. कच्चेपणा गेल्यावर सहा वाट्या आधणाचे गरम पाणी घालुन उकळी येउ द्यावी. त्यावर उकडलेले शेंगदाणे घालावे, बाजरी व ईतर डाळी,कण्या घालाव्यात.बाजरी शिजायला थोडा वेळ लागतो. शिजत आल्यावर धने जिरे पुड,सुके खोबरे,मीठ घालावे.शेवटी पळीने चांगले घोटावे. आवश्यकता असेल तर थोडे पाणी घालावे. शेवटी आच मंद करून वरून लोणी सोडावे.
दुसरीकडे तेल,हिंग,तमालपत्र्,सुकया मिरच्यांची फोडणी करून खिचडीला द्यावी.वरून कोथिंबिर घालावी. ही खिचडी मउसरच चांगली लागते.
[ही खिचडी मांसाहारी लोकांसाठी करायची असल्यास कांदा परतून झाल्यावर उकडलेले चिकन लेग्स घालावेत. उकडताना राहिलेल्या पाण्याचा खिचडी शिजवण्यासाठी वापर करावा व त्या प्रमाणात मसाले थोडे वाढवावेत.]
खांसाहेबांकडून एखादी खास चिज शिकायची असेल तर मी ही खिचडी मुद्दाम करत असे. त्याच्या वासाने खांसाहेब खुष होत त्यांना ती फार आवडे. त्या भरात एखादी खास चिज हमखास शिकवत असत. अशा प्रकारे अनेक चिजा त्यांच्याकडून मी शिकले.
वाचने
8298
वाचनखूण
प्रतिक्रिया
27
खाँसाहेब...
खिचडीचा नवीनच प्रकार वाचायला मिळाला
बाजरीच्या खिचडीसोबत
:)
फोटू???????????????????????
याच पदार्थाला बाजरीचा खिचडा
In reply to याच पदार्थाला बाजरीचा खिचडा by रेवती
रेवा आज्जी ..खानसाहेब नै गं
In reply to रेवा आज्जी ..खानसाहेब नै गं by जेनी...
होय, खरच की!
In reply to होय, खरच की! by रेवती
ताणशेण्खाँ ख्वाँसाहेब
In reply to ताणशेण्खाँ ख्वाँसाहेब by आनंदी गोपाळ
गोप्या... खांसाहेबांना असल्या
In reply to गोप्या... खांसाहेबांना असल्या by गौरीबाई गोवेकर
>>तू कसला आनंदी म्हणे बेसुरा
In reply to >>तू कसला आनंदी म्हणे बेसुरा by सूड
छ्या!
In reply to छ्या! by आनंदी गोपाळ
ते अभद्र शब्द तेवढे मागे घे
In reply to होय, खरच की! by रेवती
ह्म्म... आज्जेला चष्मा लागणार
In reply to ह्म्म... आज्जेला चष्मा लागणार by मदनबाण
बाई मोठी सुरीली हो.
बाजरीची खिचडी होय, मला वाटलं
तुमच्या सर्वांचा प्रातिसाद
In reply to तुमच्या सर्वांचा प्रातिसाद by गौरीबाई गोवेकर
नातीने वाचून दाखवला.
In reply to नातीने वाचून दाखवला. by किसन शिंदे
नातीने वाचुन दाखवला म्हणतायत
In reply to नातीने वाचून दाखवला. by किसन शिंदे
आणि धागा आज्जींनी लिहिलाय
नातीने वाचून दाखवला
फोटो आवडेल
क्या बात है !
In reply to क्या बात है ! by परिकथेतील राजकुमार
प्रशांत महासागरात बुडबुन टाक.
हुम्म्म
संपादन शक्य नाही म्हणुन पुन्हा
बाबौ!