शब्दाशब्दांवर तुझा हक्क
मला नाकारता येईना
अक्षरांची जुळवणी
अर्थाचा अनर्थ करतेय ...
वेदनेची बारीक कळही
मला दाखवता येईना
भरत आलेल्या जखमांचीच
परत खपली निघतेय ...
नातं होतंच कुठे? पण जे होतं ते
मला आता निभवता येईना
श्रावणातल्या सरींनी भिजूनही
कोरडेच थेंब पुसतेय ...
आठवणींची पानं पलटली तरी
अजिबातच आवाज होईना
कधीतरी तुला आठवण येईल
आसवांची समजुत घालतेय ...
प्रतिक्रिया
9 Nov 2012 - 8:22 pm | रेवती
कविता आवडली. पहिल्या कडव्यात आणि शेवटच्या खूप अंतर आहे असं वाटतय.
9 Nov 2012 - 8:24 pm | जेनी...
म्हणजे गं ??
थोडं अर्थ लावुन सांगना .मला कळेना .:(
9 Nov 2012 - 9:00 pm | रेवती
भावनांमध्ये वेगळेपणा वाट्टोय. जसं की पहिल्यांदा बुवा आणि बाई एकत्र आहेत नंतर मात्र लांब राहतायत किंवा म्हातारी एकटी उरलीये टाईप. वाईट किंवा चांगलं असं काही नाही. कविता वाचल्यावर एकदम काहीतरी मिसींग असल्यासारखं. (मला कवितांमधलं फारसं ज्ञान नाही हेही आहेच.;))
9 Nov 2012 - 9:13 pm | सस्नेह
कवितांमधलं फारसं ज्ञान मलाही नाही, पण सदर कविता वाचल्यावर काहीतरी 'टच' करून जातं , एवढं मात्र खरं !
9 Nov 2012 - 9:19 pm | जेनी...
रेवा आज्जी .
ओह्ह ... !
थँक्स रेवा आज्जी :)
9 Nov 2012 - 8:32 pm | लीलाधर
येता तूझ्या मनी :) फारच छान ;)
9 Nov 2012 - 8:34 pm | दादा कोंडके
पण,
जम्या नाही. धन्यवाद.
9 Nov 2012 - 8:45 pm | तर्री
चौथ्या ओळीत यमक आहे आणि भावना आहेत.
मुक्त ही नाही आणि मीटर मध्ये ही नाही.
9 Nov 2012 - 9:17 pm | इनिगोय
अशा वेड्या समजुतीच कधी कधी उद्यावर विश्वास ठेवायला लावतात. कधी ना कधी ही वेदना जिथून आली तिथे पोचती होईल, याची वाट पाहायला लावतात.
9 Nov 2012 - 9:53 pm | प्रचेतस
छान लिहिलंय.
9 Nov 2012 - 10:04 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त मस्त गो बालिके,मस्त...! :-)
9 Nov 2012 - 10:10 pm | मुकुन्द पेद्नेकर
आसवान्चि समजुत घालतेय --हि भावना आवदली
9 Nov 2012 - 10:56 pm | पैसा
ठाकून ठोकून कविता केली आहे असं वाटलं. म्हणजे मुद्दाम वेगळं काही करायच्या प्रयत्नात लय पण आली नाही आणि रेवतीने म्हटल्यासारखं एकसंध परिणाम वाटला नाही. चमत्कृतीपूर्ण शब्दरचना करण्याच्या नादात अर्थाकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही.
पूजा आज्जे, एवढं कडक लिहिल्याबद्दल "सॉरी" म्हणते. पण खरोखरच बात कुछ जमी नहीं. तू याहून खूप चांगली कविता लिहू शकतेस हे माहिती असल्यामुळेच जे वाटलं ते सपष्ट लिहिलं आहे.
9 Nov 2012 - 11:04 pm | जेनी...
=)) =))
पै बै टेन्शन नै लेनेका ;) बिनदास कमेंटनेकाा :D
:P
9 Nov 2012 - 11:51 pm | श्रीरंग_जोशी
प्रयत्न चांगलाच आहे पण आजच्या युवा पिढीने असे देवदासछाप काही लिहिले की मला तरी बरे वाटत नाही.
पण कलेचा एक प्रकार म्हणून ठिक आहे.
पूजा एखादे रोखठोक, सकारात्मक, प्रेरणादायी काव्य येऊदे...
10 Nov 2012 - 6:33 pm | बॅटमॅन
आजच्या युवा पिढीने???????
तुमचे वय कितीये हो :)
10 Nov 2012 - 6:47 pm | श्री गावसेना प्रमुख
वय वर्ष १२५
10 Nov 2012 - 2:12 am | अभ्या..
शीर्षक एकदम परफेक्ट.
नाय आलं तुला सांगता. :(
काय होतं, काय आहे हे कळत नाहीये बिल्कुल :(
कुठलीतरी वेदना आहे पण ती सुध्दा कशाची आहे कळले नाही.
10 Nov 2012 - 2:58 am | जेनी...
एक्झॅटली .अब्या ..
म्हणुनच हे नाव दीलं कवितेला .
नेमकं जे वाटतय ते मांडताच आलं नाहि ...
च्यामारी ..मनातलं सांगताच येईना :-/
असो ,कविला\कवयित्रिला परिक्षकांच्या योग्य परिक्षणाची खरच गरज असते ,
त्याशिवाय त्याला\तिला कविता फुलवायला इंटरेस्ट येत नाहि .
आपणच लिहुन आपणच वाचुन चांगलं वाईट म्हणन्यात अज्जिब्बात मज्जा नसते .
त्यातल्या चुका ,चांगलं ,वाईट ,पोचलेल्या भावनांची पोचपावती ह्या सगळ्याच गोष्टी
वाचकांकडुन ऐकन्यात मजा ..
सगळ्यांना धन्यवाद ......! :)
10 Nov 2012 - 6:23 pm | श्री गावसेना प्रमुख
10 Nov 2012 - 12:37 pm | संजय क्षीरसागर
कविता एकदम शुद्ध आणि प्रतिसाद पूजा स्टाईलमधे...
अर्थात, या ओळी मस्त जमल्या आहेत :
आणि या ओळी एकदम खल्लास!
कवितेचं मीटर आणि फ्लो बरोबर आहे
10 Nov 2012 - 12:41 pm | खटासि खट
पॉ पॉ पॉ पॉ पॉ
10 Nov 2012 - 6:03 pm | किसन शिंदे
नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला??
10 Nov 2012 - 6:58 pm | जेनी...
अरे त्यांनापण माझ्यासारखच ' मनातलं सांगताच येईना ' बहुतेक :-/
:P :D
10 Nov 2012 - 8:34 pm | मृगनयनी
पू ssssssssssss.... सुन्दर टची कविता!!...
अ प्र ति म ! ! ! :) आवडली कविता!!! :)
12 Nov 2012 - 2:54 pm | निश
पूजा पवार जी , कविता आवडली