कुणी जाल का, सांगाल का,
सुनवाल का या हिमेशला..
नाकातुनी गाऊ नको.
वापर जरा अपुला गळा..!
आधीच चांगल्या गायकांची पैदास आहे थांबली.
रियालिटी शोचीच आता भाउगर्दी वाढली.
मुकेश, रफ़ी, किशोरचा तो काळ मागे लोटला.
मी कधी अल्ताफ़, मिका ,आतिफ़ही कुरवाळिला..
सांभाळूनी अपुल्या कानाला मी जरासे ऐकले.
तेव्हाच गाणे वाजले "आशिक बनाया आपने".
सांगाल का त्या रेशमिया, की कुत्री ऐकत थांबली.
आणि द्याया दाद त्यांनी रात्र भुंकून काढली.
कुणी जाल का, सांगाल का..
-- अभिजीत दाते
मूळ गीत - कुणी जाल का, सांगाल का..
गायक - वसंतराव देशपांडे
प्रतिक्रिया
21 Aug 2008 - 9:59 am | पंचम
सांगाल का त्या रेशमिया, की कुत्री ऐकत थांबली.
आणि द्याया दाद त्यांनी रात्र भुंकून काढली.
खुपच जहाल आणि मार्मिक टिका!
-पंचम