वेंकट

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
24 Oct 2012 - 12:34 pm

नमस्कार
मी वेंकटेशन अय्यर .
हस्तांदोलन करीत तो म्हणाला .आज तो नावाने आमच्या टीम मध्ये सामील होत होता . ओमान मधील “पी डी ओ “ या प्रथितयश कंपनीच्या आलिशान कार्यालयात आमच्या ग्रुप मध्ये आजपासून हा नवीन “मल्लू” जॉईन झाला होता. अशा अनेक “मल्लू”सोबत आजतागायत काम केले असल्याने त्यात विशेष काहीच वाटले नाही...आमच्या ग्रुप चा अन्वर नावाचा दुसरा एक मराठी सदस्य मला हळूच मराठीतून म्हणाला...”चला, आणखी एक यंडूगुंडू आले रे” ...मीही हसून अन्वर कडे पहिले आणि कामात गर्क झालो...

लंचब्रेक मध्ये सगळेजण हास्यविनोद करत असताना अय्यर मात्र शांत आणि गंभीर होता ... माझ्या ते लक्षात आले, कदाचित परदेशात नोकरीचा पहिलाच दिवस ...त्याचे टेन्शन असेल म्हणून मी दुर्लक्ष केले ...पण संध्याकाळी कॅम्पवर गेल्यावरही तोच प्रकार ..हा आपला आपला एकटा-एकटाच ...असेच ४-५ दिवस चालले .शेवटी मी न राहवून ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी कॅम्पवर त्याच्या रूम मध्ये गेलो. स्वारी अगदी शुभ्र धोतरात होती...अंगात जानवे आणि कपाळाला गंध...उदबत्ती निरंजन लावलेले ,आणि तोंडाने मोठ्या आवाजात स्तोत्र-पठण सुरु....

“तुम ब्राह्मिन है क्या?” मी विचारले . “हा साब” तो म्हणाला ...”मै भी ब्राह्मीन है ,लेकीन मै तुम जैसा इतना पूजापाठ नही करता बाबा “मी म्हणालो ...तसा तो उत्तरला ... “साब ,मै आपको क्या बतावू?ये पूजापाठ एक साधन है अपने दुख को छीपाने का, मेरी स्टोरी सुनोगे तो जान जावोगे क्यो मै ऐसा हू..............”असे म्हणून त्याने आपली स्टोरी सांगायला सुरवात केली ...

केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील राजावाडी गावाचे प्रमुख पुजारी राधास्वामी अय्यर .गावातील देवूळ त्यांच्याच ताब्यात.गावातील सगळे धार्मिक कार्यक्रम त्यांनीच करायचे .राधास्वामी होतेच वेदशास्त्रसंपन्न. आजूबाजूच्या ५०-६० गावात राधास्वामी इतका मोठा वेद-विद्वान नव्हता .राजावाडी गावात मोठे घर,शेती आणि गावातील सगळी पूजा/यज्ञ/ लग्न/समारंभ हे राधास्वमिंचे उत्पन्नाचे साधन .पत्नीचे नाव लक्ष्मी तर वेंकट हा मुलगा .वेंकट होता तिसरीला ,अभ्यासात प्रचंड हुशार ,पण वडिलांचा पारंपारिक व्यवसाय पुढे चालवायचा म्हणून वेंकट ला ८ व्या वर्षीच पलक्कडला वेदशाळेत पाठवण्यात आले .

तिथून वेन्कटची ओढाताण सुरु झाली .त्याला शाळा शिकायची होती. खूप मोठे व्हायचे होते. गावातील इतर घरातील बरीचशी माणसे दुबईला नोकरीला होती. ती सुट्टीला गावी येत ,तेव्हा त्यांची ऐट पाहून वेंकटला नवल वाटे. इतर मुले बाबांनी दुबईवरून आणलेली नवीन नवीन खेळणी घेऊन खेळत ,तेव्हा वेंकटला वाटे,आपल्याला का नाही अशी खेळणी मिळत? तो आईला विचारी ,हट्ट करी ,तू पण बाबांना सांग ना दुबईला जायला ...........पण आई त्याची समजूत काढून म्हणे ,अरे बाबा ,आपण तर पंडित आहोत.....आपण नसते जायचे बाळा तिकडे...मग तो पुन्हा म्हणे...पण मी जाणार मोठा झाल्यावर दुबईला ...........आई कशीतरी त्याला गप्प करी.......!

त्यात आता तर शाळा सुटली....आता वेदशाळा ......म्हणजे आयुष्यभर पूजापाठ करून जीवन जगावे लागणार ...त्याचे मन बंड करून उठे ....कित्येक दिवस तो जेवतही नसे...कशीबशी २ वर्षे काढली तिथे ,अजून ३ वर्षे बाकी होती. आणि एक दिवस..............एक दिवस त्याला पलक्कड मधील एक मित्र राघवन भेटला,त्याचे वडील दुबईला होते.त्याच्याकडे पैसेही भरपूर असायचे..............वेन्कटची अवस्था त्याला बघवेना ... “तुला पळून जायचे आहे का इथून? मी मदत करतो तुला “तो म्हणाला “अरे पण पळून जाणार कुठे?” “माझे काका आहेत त्रिवेंद्रम ला,चल आपण दोघेजण त्यांच्याकडे जावू...”राघवन ने धीर दिला .

आणि मग एके दिवशी वेदशाळेला कायमचा रामराम ठोकून ट्रेनने वेंकट राघवनसह त्रिवेंद्रम ला पोचला.निघताना वेंकट खूप रडला,कारण आपण वेदशाळेतून पळालो हे समजल्यावर बाबा कधीही क्षमा करणार नाहीत, यापुढे आई-बाबा आणि गाव ,सगळ्याला विसरावे लागेल,हे त्याने ओळखले होते.तरीही जिद्दीने आणि राघवनच्या दिलाश्यामुले तो त्रिवेंद्रमला गेलाच.तिथे गेल्यावर राघवन ने वेंकटची सारी कहाणी काकांना सांगितली...काका उदार आणि दयाळू मनाचे होते. त्यांनी वेंकटला आपल्या घरी ठेवून घेतले,आणि त्याच्या शिक्षणाची सगळी जबाबदारीसुद्धा स्वीकारली. अट एकच, नोकरीला लागल्यावर झालेला सर्व खर्च वेंकट ने परत करायचा!

ती अट वेंकट ने मान्य केली आणि आनंदाने तो त्रिवेंद्रम च्या शाळेत जावू लागला .राघव पलक्कड ला परतला ,पण वेंकटविषयी कोणालाही काहीही सांगितले नाही.वेदशाळेतून वेंकट गायब झाल्याचे कळल्यावर राधास्वामीनी आकाश-पाताळ एक केले ,खूप शोधाशोध केली ,पण वेंकटचा ठावठिकाणा सापडला नाही.पण वेंकट कुठेतरी शिकण्यासाठीच गेला आहे,याची खात्री त्यांना होती..............

काळ पुढे सरकत होता ,जात्याच हुशार असलेल्या वेंकट ने इंजिनियरिंग पूर्ण केले आणि आणि तिथल्याच एका कंपनीत ट्रेनी म्हणून जोब करू लागला ...तेवढ्यात राघवन च्या वडिलांनी त्यांच्या ओमान मधल्या मित्राच्या मदतीने ओमानमधल्या कंपनीसाठी वेंकटची शिफारस केली ,इंटरव्ह्यू झाला ,आणि हाहा म्हणता जेट एअरवेजच्या विमानाने वेंकट ओमानला पोचलादेखील!!!

तर अशी ही वेंकटची स्टोरी..”तो अब तुम उदास क्यो हो?”मी विचारले.तर तो म्हणाला,.”साब अभी एक बात मुझे बहुत परेशान कर रही है. मै अपने पिताजी,मां और गावको कभी देख पावून्गा?क्या सोचेंगे वो?” मी म्हणालो..घाबरू नकोस,त्या परमेश्वराच्या इच्छेने आणि आशीर्वादाने तुझे स्वप्न पुरे झाले आहे,तोच तुला मार्ग दाखवील ....

त्या दिवसापासून मनावरील ओझे हलके झाल्याने वेंकट खूप मोकळा मोकळा वाटत होता ...हळूहळू तो रुळला ...एक वर्ष संपले ...आता सुट्टीला तो घरी जाईल ...पण सुट्टीत ३ महत्त्वाची कामे आहेत...पहिले म्हणजे आई-वडिलांना भेटणे, राघवनच्या काकांचे पैसे देणे ............आणि तिसरे म्हणजे........नाजूक काम....राघवनच्या काकांच्या मुलीशी साखरपुडा..........................!!!

कथा

प्रतिक्रिया

पप्पुपेजर's picture

24 Oct 2012 - 12:51 pm | पप्पुपेजर

आवरा !!!!

कपिलमुनी's picture

24 Oct 2012 - 12:56 pm | कपिलमुनी

आवडला नाही

इनिगोय's picture

24 Oct 2012 - 1:40 pm | इनिगोय

छान, सरळ साधी गोष्ट.
खरं नाट्य कदाचित तो गावी जाईल तेव्हाच्या घटनांमध्येही सापडेल, लिहून बघा. (प्रकाशित करावं का हे मग ठरवा.)

पुलेशु.

शैलेन्द्र's picture

24 Oct 2012 - 1:43 pm | शैलेन्द्र

खुपच बाळबोध वाटला.. पटल नाही.

चिरोटा's picture

24 Oct 2012 - 2:45 pm | चिरोटा

कुवेतपेक्षा ओमान जरा बरे वाटले.
अवांतर-अय्यर मल्लु नाहीत.जरी ते पलक्क्डला अनेक पिढ्या असले तरी ते पलक्क्ड अय्यर म्हणवून घेतात.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2012 - 2:58 pm | प्रकाश घाटपांडे

सरळ साधा लेख!

मी म्हणालो..घाबरू नकोस,त्या परमेश्वराच्या इच्छेने आणि आशीर्वादाने तुझे स्वप्न पुरे झाले आहे,तोच तुला मार्ग दाखवील ....

इश्वर तेरा भला करे! हा मंत्र खूप लोकांना दिलासा देतो.( भले तो देणार्‍याचा विश्वास नसला तरी)

मैत्र's picture

24 Oct 2012 - 3:11 pm | मैत्र

त्रिवेंद्रम मध्ये बोललात तर तुमची पंचाईत होईल...

मंदार कात्रे's picture

24 Oct 2012 - 7:11 pm | मंदार कात्रे

तिकडे सगळ्या केरळी ना मल्लू म्हणायची प्रथा आहे,तरीही चूक असल्यास क्षमस्व.प्रतिसादाबद्दल आभार ....

सुबक ठेंगणी's picture

25 Oct 2012 - 12:06 pm | सुबक ठेंगणी

केरळी लोक मल्लू असतील कदाचित पण अय्यर मल्लू असतात का हा प्रश्न आहे. :)

दिवाळी आल्याचा पुकारा झाला म्हणायचा.

मंदार कात्रे's picture

24 Oct 2012 - 10:59 pm | मंदार कात्रे

या ब्लॉग ला अवश्य भेट द्या मित्रांनो...

http://radiostargloabal.blogspot.in/

संजय क्षीरसागर's picture

24 Oct 2012 - 11:16 pm | संजय क्षीरसागर

पण सुट्टीत ३ महत्त्वाची कामे आहेत...पहिले म्हणजे आई-वडिलांना भेटणे, राघवनच्या काकांचे पैसे देणे ............आणि तिसरे म्हणजे........नाजूक काम....राघवनच्या काकांच्या मुलीशी साखरपुडा..........................!!!

राघवनच्या काका प्लस मुलीला डायरेक्ट घरी बोलवून आई-वडीलांच्या पायावर डोकं ठेवायला सांगायच, काय बिशाद पैशाचा हिशेब मागतायत!. एका फटक्यात तीन पक्षी!

आणि ते राघवन, तो सुमित राघवन दगडवाला त्याचे वंशज असले म्हणजे...नाही एक शका म्हणुन विचारलं.

पुन्हा एका दगडात तीन पक्षी!

ह्म्म ,मंदार प्रयत्न करत रहा .
प्रयत्न थाबवु नका .

थांबलात तर संपलात . :)

सोत्रि's picture

25 Oct 2012 - 10:28 am | सोत्रि

नव्या मनूतील नव लेखकांच्या तारणहार पूजाताईंचा विजय असो. :-)

-(नव लेखक) सोकाजी