गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा, पंधरा दिवसामाग पाखर शोधायला आम्ही माळशेजच्या खालच्या जंगलात घुसलेलो, सकाळी सहा ते बारा फिरुनही, एकही मनासारखा फोटो मिळाला नाही. जंगलात चोहुकडे भरपुर पाणी आणी दाट झाडोरा झाल्याने आमची सगळी मेहनत फुकट गेली, दुधाची ताकावर या न्यायाने, व रिकामा न्हावी भिंतीला तुंबडी लावी या भावाने मी ही कोळीष्ट्क टिपलीत.
शेवटची दोन चित्र सहज काढली, आवडली म्हणुन इथे टाकलीत..
अवांतर - माझा एक मित्र रिव्हर्स लेन्स मॅक्रो तंत्र वापरून अश्या कोळ्यांचे व लहान सहान किड्यांचे जबरी फोटोज काढतो.
त्यामुळे तुंम्हाला नवे प्रयोग करायचे असल्यास या तंत्राबद्दल अवश्य विचार करा. बिंग.कॉम वरचा चार दिवसांपूर्वीचा वॉलपेपरमध्ये ड्रॅगनफ्ल्यायचा या तंत्राने काढलेला फोटो होता. होमपेज वर अजूनही उपल्ब्ध आहे.
माझ्या माहितीप्रमाणे नुसताच एक adapter मिळतो - त्याची मागची बाजू लेन्स च्या माउंट्सारखी असते आणि पुढची बाजू फिल्टर रिंग सारखी, ह्या फिल्टर रिंगला लेन्स उलटी करुन लावायची. माझ्याकडे आहे पण मॅन्युअल अॅपर्चर अॅडजस्ट करता येत नसल्यामुळे आणि माझ्याकडे खर्या मॅक्रो लेन्स extension tube सकट असल्यामुळे नाद सोडला.
हा दुवा बघा: reverse macro lens adapters
प्रतिक्रिया
18 Oct 2012 - 7:08 pm | सस्नेह
कोळिष्टके सुरेखच आहेत्.पण तेची कायतर गोष्ट सांगा की राव 'एका कोळियाने..' म्हणून !
शेवटचे दोन फोटो वाट चुकून घुसले आहेत काय कोळिष्टकात ?
18 Oct 2012 - 11:59 pm | शैलेन्द्र
गोष्टीच म्हणजे अस्स झाल बघा, पंधरा दिवसामाग पाखर शोधायला आम्ही माळशेजच्या खालच्या जंगलात घुसलेलो, सकाळी सहा ते बारा फिरुनही, एकही मनासारखा फोटो मिळाला नाही. जंगलात चोहुकडे भरपुर पाणी आणी दाट झाडोरा झाल्याने आमची सगळी मेहनत फुकट गेली, दुधाची ताकावर या न्यायाने, व रिकामा न्हावी भिंतीला तुंबडी लावी या भावाने मी ही कोळीष्ट्क टिपलीत.
शेवटची दोन चित्र सहज काढली, आवडली म्हणुन इथे टाकलीत..
18 Oct 2012 - 7:18 pm | मदनबाण
मस्त ! :)
19 Oct 2012 - 11:39 am | शैलेन्द्र
धन्यवाद मालक..
18 Oct 2012 - 8:15 pm | प्रचेतस
मस्तच रे शैलेंद्र.
19 Oct 2012 - 12:01 am | शैलेन्द्र
तुझाही येवु दे पहिल्या धारेचा माल :)
19 Oct 2012 - 11:47 am | प्रचेतस
लवकरच येईल.
पण तूर्तास तरी १८-५५ आणि ५५-२५० आयएस आहेत. ह्यांनी मॅक्रॉस कितपत चांगले येतील याबद्द्ल जरा साशंकच आहे.
19 Oct 2012 - 12:08 pm | शैलेन्द्र
अरे, पहिल्या धारेचा माल स्पेसिफिकेशन्चा मोहताज नसतो.. बाकी, झूम वापरुन डेप्थ ऑफ फिल्ड मस्त दाखवता येत.. ट्राय करुन बघ.
19 Oct 2012 - 12:12 am | श्रीरंग_जोशी
छायाचित्रे आवडली व विशेष सुचना पण.
अवांतर - माझा एक मित्र रिव्हर्स लेन्स मॅक्रो तंत्र वापरून अश्या कोळ्यांचे व लहान सहान किड्यांचे जबरी फोटोज काढतो.
त्यामुळे तुंम्हाला नवे प्रयोग करायचे असल्यास या तंत्राबद्दल अवश्य विचार करा. बिंग.कॉम वरचा चार दिवसांपूर्वीचा वॉलपेपरमध्ये ड्रॅगनफ्ल्यायचा या तंत्राने काढलेला फोटो होता. होमपेज वर अजूनही उपल्ब्ध आहे.
19 Oct 2012 - 12:23 am | शैलेन्द्र
रिव्हर्स लेन्स मॅक्रो नक्की वापरायचय, पण त्यासाठी स्पेअर लेन्स हवीय, तिचा जुगाड चालु आहे.. हे सगळे फोटो ५५-३०० झुमने काढलेत.
19 Oct 2012 - 7:25 pm | वाचक
माझ्या माहितीप्रमाणे नुसताच एक adapter मिळतो - त्याची मागची बाजू लेन्स च्या माउंट्सारखी असते आणि पुढची बाजू फिल्टर रिंग सारखी, ह्या फिल्टर रिंगला लेन्स उलटी करुन लावायची. माझ्याकडे आहे पण मॅन्युअल अॅपर्चर अॅडजस्ट करता येत नसल्यामुळे आणि माझ्याकडे खर्या मॅक्रो लेन्स extension tube सकट असल्यामुळे नाद सोडला.
हा दुवा बघा: reverse macro lens adapters
20 Oct 2012 - 12:52 pm | शैलेन्द्र
मुळात मी हे करुन पाहीलेल नाही, तंत्रच शिकायचय मला..
19 Oct 2012 - 5:53 pm | ५० फक्त
लई भारी फोटो आणि कोळी पण.
19 Oct 2012 - 6:28 pm | तिमा
लई भारी फोटो आणि कोळी पण.
सहमत. कोळीणीचेही काढले असते तर अजून मजा आली असती.
19 Oct 2012 - 11:09 pm | शैलेन्द्र
"कोळीणीचेही काढले असते तर अजून मजा आली असती"
फोटोंबद्दलच बोलताय ना?
19 Oct 2012 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा
..........
@फोटोंबद्दलच बोलताय ना?
20 Oct 2012 - 8:32 pm | सोत्रि
आमचीही ही थोडी भर ह्या कोळीष्टकात...
-(भटक्या) सोकाजी
20 Oct 2012 - 10:55 pm | शैलेन्द्र
आहा.. जबरदस्त.. तेरा कोळी मेरे कोळीसे अच्छा कैसा? .
21 Oct 2012 - 4:14 pm | चिगो
शैलेन्द्र, फोटोज सुंदर आहेत.. शेवटच्या फोटोमध्ये एक्पोजर/लाईट जास्त झालाय की मलाच असं वाटतंय? सोत्रिंचे कोळीही भारी..
21 Oct 2012 - 7:31 pm | शैलेन्द्र
नाही , जास्तच झालाय, प्रोसेस नाही केला..