दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
18 Aug 2008 - 11:32 am

दिवस असे की ढोणी खेळत नाही, अन अनिल चालत नाही.

कांगारुंशी त्यांच्या देशी लढतो.
कधी केनिया बांगलादेशही नडतो.
या हरण्याचे कारण उमगत नाही.
या हरणे म्हणवत नाही.

कसोटी, वनडे, २०-२० चे तुकडे.
त्यावर नाचे बीसीसीआयचे घोडे.
या घोड्याला लगाम शोधीत आहे,
आयसीसीला गवसत नाही.

तेंडल्या अनफ़िट फ़ॉर्मात नाही युवी.
पाटा पीचवर झहीर भज्जी हेवी.
पराभवाला हजार कारणे देतो.
पण कबूल करवत नाही.

फ़ायनल मॅचला आता हसतो थोडे.
मिटून घेतो वस्तुस्थितीचे डोळे.
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पालवत नाही.

-- अभिजीत दाते

मूळ गीत - दिवस असे की कोणी माझा नाही
कवी - संदिप खरे

विडंबन

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

18 Aug 2008 - 11:40 am | मदनबाण

मस्त विडंबन !!

(विडंबन प्रेमी)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

नेत्रेश's picture

18 Aug 2008 - 11:50 am | नेत्रेश

खरच, खुप छान विडंबन !

बेसनलाडू's picture

18 Aug 2008 - 11:54 am | बेसनलाडू

आवडले.
(क्रिकेटरसिक)बेसनलाडू

अनिल हटेला's picture

18 Aug 2008 - 12:01 pm | अनिल हटेला

मस्त च !!!

आवडले बर विडंबन !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

टारझन's picture

18 Aug 2008 - 7:13 pm | टारझन

आमच्या सगळ्यात आवडत्या गिताचे जबराट विडंबन ... काही गफला झाला असता तर एक नविन घागाच काढणार होतो विडंबकाच्या नावाने.. वाचले ...

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

पावसाची परी's picture

18 Aug 2008 - 12:54 pm | पावसाची परी

सुन्दर

टारझन's picture

18 Aug 2008 - 1:35 pm | टारझन

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. ....
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

प्राजु's picture

18 Aug 2008 - 6:50 pm | प्राजु

कोण ग सुंदर ? विडंबन चपलख असते ... सुंदर चेहरा, चित्र, निसर्ग ई.ई असते. ....
वेळ जात नाहीये का रे?

विडंबन एकदम मजेदार. आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अविनाश ओगले's picture

18 Aug 2008 - 8:52 pm | अविनाश ओगले

उत्तम.. आवडले...
शेवटची ओळ
या खेळाला विजयाचाही आता.
मेघ पेलवत नाही
अशीही चालू शकेल.
@टारझन..
चपलख म्हणजे काय?

ते तो चपखलपणे टंकू शकला नाही! ;)

चतुरंग