अन्न ,कपडा, व निवारा ह्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत. त्या पैकी अन्ननिर्मिती ( कृषी तंत्रज्ञान), व गृह अभियांत्रिकी वर बरीच माहिती मराठीत उपलब्ध आहे . परंतु वस्त्रनिर्मिती शास्त्राबद्दल तितकीशी उपलब्ध नाही. कदाचित हे शास्त्र थोडेसे किचकट व फारच लांबलचक प्रक्रियांचे आहे, त्यामुळे असेल.
या लेखात संपूर्ण वस्त्रनिर्मितीचा थोडक्यात आढावा घेउन आपण त्यातील एका मुख्य प्रक्रियेची म्हणजेच सुत निर्मितिची माहिती घेवू.
वस्त्रे तीन प्रकारांनी बनविली जातात -
१)मागावर विणलेले (वोव्हन) उदाहरणार्थ शर्टिंग, सुटींग, चादरी, पातळे, धोतरे इत्यादी.
२) सुयांनी विणलेले ( निटेड) उदाहरणार्थ बनियन, अंडर गार्मेंटस, स्वेटर, मोजे, इत्यादी.
३) नॉन वोव्हन - हे तंत्र आधुनिक असून केमिकल बाँडींग, थर्मल बाँडींग द्वारे बनविलेले टिश्यू पेपर, रुमाल, इंडस्ट्रीयल फॅब्रिक इत्यादी उदाहरणे देता येतील.
वस्त्रे निर्माण करण्याच्या तंत्राप्रमाणेच त्या साठी वापरलेल्या कच्च्या माला वरून ( तंतू वरुन) परत तीन मुख्य प्रकार पडतात.
१) नैसर्गिक : ह्याचे दोन उपप्रकार आहेत
अ) वनस्पतीज - ह्यामध्ये कापूस, ताग( ज्युट), अंबाडी, वगैरे तंतू येतात
ब) प्राणिज - ह्यामध्ये रेशिम,लोकर, प्रामुख्याने येतात.
२) मानव निर्मित तंतू - नायलॉन, पॉलिएस्टर, ऍक्रॅलिक, ऍस्बेस्टॉस इत्यादी
३) पुनर्निमित तंतू - रेयॉन, विस्कोज इत्यादी.
वरील सर्व तंतूंच्या प्रकारात कापूस हा सर्वाधिक लोकप्रिय व वापराचा आहे. कारण कापसात वातानुकूलन व शोषकता हे गुणधर्म आहेत ,ज्या मुळे सुती कापड हे हिवाळ्यात उब देते ( चादरी हे या संदर्भात उत्तम उदाहरण) , तर उन्हाळ्यात थंडावा ( उन्हापासून संरक्षण करण्यासाठी आपण डोक्यांस रुमाल , टोपी, गमछे, फेटे बांधतो.
सुती कपडा घाम शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला आर्द्र हवेत ( पावसाळ्यात) खुपच आरामदायी वाटतात.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
13 Sep 2012 - 5:38 pm | प्रभाकर पेठकर
नाविन्यपूर्ण माहिती. पण फारच त्रोटक झाला पहिला भाग. प्रत्येक भाग ह्या भागाच्या साधारणपणे दुप्पट तरी पाहिजे. असो.
पुढील विस्तृत भागांच्या प्रतिक्षेत आहे.
13 Sep 2012 - 8:49 pm | अन्या दातार
असेच म्हणतो. :)
13 Sep 2012 - 6:43 pm | sagarpdy
हे ठीके, पुढचे भाग आणि १२ वी चे रसायनशास्त्र आठवून द्वले पानावले :(
13 Sep 2012 - 6:57 pm | रेवती
वाचतिये.
रामदासकाकांची आठवण आली.
13 Sep 2012 - 7:04 pm | मन१
पण पोटभर नाही.
और आन्दो भाय....
14 Sep 2012 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा
+१ टू मनोबा!
अप्रतिम. वेगळा विषय,सोप्पि मांडणी... :-)
14 Sep 2012 - 10:09 am | पिंगू
उपक्रमावरचा विषय मिपावर मांडल्याबद्दल अभिनंदन.. बाकी लेखाची त्रोटक झाली आहे ह्याबद्दल मान्यवर पेठकरकाका आणि मनोबा दोघांशी सहमत आहेच.
पुढच्या लेखात ह्या विषयावर अधिक गहिरा प्रकाश पडेल अशी आशा करतो..
14 Sep 2012 - 11:21 am | मी_आहे_ना
छान सुरुवात, पु.भा.प्र.
14 Sep 2012 - 1:01 pm | बिपिन कार्यकर्ते
क्या बात है! अगदी वेगळाच विषय. वाचतोय. मात्र किंचित सविस्तर आणि मोठे भाग आल्यास अजून मजा येईल!
19 Sep 2012 - 3:57 pm | किलमाऊस्की
थोडं अजून मोठा हवा होता लेख
19 Sep 2012 - 6:19 pm | अभ्या..
येऊ द्यात अजुन मोठे भाग. आवडले अगदी बेसिक पासून सुरुवात आहे ते.
(सोलापूरसारख्या गिरणगावातली दुर्दशा थोडीफार बघितलेला)