पाप -पुण्य याची भीती गेल्याने समाजाचे हित झाले की अहित?
पूर्वी जेव्हा भारतीय समाज मेकॉलेच्या तथाकथित शिक्षण पद्धतीनुसार अशिक्षित(!) होता तेव्हा तो पाप पुण्य इत्यादी जीवन मूल्ये मानीत असे पण जेव्हा कालांतरानी वर उद्धृत केलेला असा सुशिक्षित मनुष्य निर्माण झाला तेव्हा तो हिंदू धर्म पद्धती व जीवन पद्धती हि मागासलेली व बुरसटलेली व आंग्ल जीवन पद्धती हि आदर्श मानू लागला त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीत येणारी प्रत्येक गोष्ट तो कुठलाही विचार न करता त्याज्य व तिरस्करणीय मानू लागला . अर्थात साहेब जिंकला. आज आपल्याला हिंदू सणवार करायला वेळ नाही पण विनाकारण वेळ व्यतीत करण्याला आहे .
आज आपण पापपुण्यालाही भीत नाही आणि कायद्याला विचारीत नाही .
म्हणजे अनागोंदी आणि अनाचाराची नांदीच झाली आहे ..
करा करा विचार करा आणि केवळ मराठीत व्यक्त करा. मिंग्लिश व हिंराठीत नको. कृपया विषय गंभीर आहे उगाच अनावश्यक लिखाण करू नये. ही विनंती बघा प्रयत्न करून
पाप पुण्य विचार असावा की नसावा
गाभा:
प्रतिक्रिया
28 Aug 2012 - 5:16 pm | स्पा
खूप आवडला.. अभिनव कल्पना मांडलीत सहस्त्रबुद्धे साहेब तुम्ही
कृपया विषय गंभीर आहे उगाच अनावश्यक लिखाण करू नये.
सहमत
28 Aug 2012 - 5:53 pm | अत्रुप्त आत्मा
नवलेखकांन्नो, हवेत नेणाय्रा प्रतिक्रीयांपासुन विशेष सावध रहा! ;-)
28 Aug 2012 - 11:19 pm | शुचि
खी: खी: कसली हसतेय!!!
29 Aug 2012 - 7:45 am | ५० फक्त
बुवा, नवलेखिकांबद्दल काय म्हणणं आहे आपलं, त्यांनी हवेत नेणा-या प्रतिसादांपासुन सावध रहावे किंवा कसे ? फक्त नवलेखकांना सावध करुन तुम्ही स्त्री-पुरुष असा भेदभाव करुन पाप करत आहात असे का समजु नये.
29 Aug 2012 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा
@पाप करत आहात असे का समजु नये. >>> ९लेखक/लेखिकांन्नो..
धागा भर-कटवणार्या प्रतिसादांपासून सावधान...! ;)
अवांतर- ए...ढिंक चिका...ढिंक चिका...ढिंक चिका...ढिंक चिका...ए...ए..ए..ए..![](http://www.sherv.net/cm/emo/dancing/number-one-dance.gif)
29 Aug 2012 - 2:20 pm | ५० फक्त
तुम्हाला 'धागा भर कटवणार्या प्रतिसादांपासून सावधान...!' असं म्हणायचं आहे का बुवा ?
29 Aug 2012 - 5:42 pm | सूड
त्यांना 'धागाभर कटवणार्या' असं म्हणायचं असेल.
आज चा सुवि चार : स्वच्छ तारा खा.
(संत्रस्त आत्मा)
29 Aug 2012 - 2:23 pm | ५० फक्त
डुझाकाटा
28 Aug 2012 - 5:46 pm | sagarpdy
केवळ अमूर्त विषय म्हणून उत्तर द्यायचं झालं तर - अहित.
पण पाप काय आणि पुण्य काय, हे ठरवणार कोण?
केवळ जुन्या धर्मग्रंथात लिहिला आहे / मोठ्यांनी सांगितलं आहे म्हणून - अमुक एक कृत्य म्हणजे पाप, आणि तमुक एक कृत्य म्हणजे पुण्य - असे मानणे योग्य आहे का?
हम्म. मला असं वाटत नाही (ज्या गोष्टी सभोवार बघतो त्यावरून). आजही माझ्या माहितीतील बहुतेक सर्व माणसं हिंदू जीवन पद्धती शक्य त्या प्रमाणात आचरतात.तिरस्करणीय तर नक्कीच मनात नाहीत.
खरच तुम्हाला असं वाटतं ? जवळपास सगळे महत्त्वाचे सण आज आपण साजरे करतो. गणपती, गोपाळकाला, दिवाळी ई. सणात तर जरा जास्तच.
मुख्य मुद्दा. पण (मला तरी) याचा आणि बाकी मुद्द्यांचा संबंध बराच लांबचा वाटतो. सध्या ट्यामप्लीज.
मिंग्लिश व हिंराठीत वाईट काय आहे ?
हे सांगावं लागतंय? बरं.
28 Aug 2012 - 5:56 pm | बॅटमॅन
पापपुण्याची कल्पना गेल्यामुळे समाजाचे नुकसान झाल्याचा आमचा स्पष्ट अभिप्राय आहे. पूर्वीचं पुणं राहिलं नाही. आमच्या वेळी असं नव्हतं.
-प्रोफेश्वर गॉथमकर.
28 Aug 2012 - 6:00 pm | कपिलमुनी
पाप म्हणजे काय ?
पुण्य म्हणजे काय ?
हे व्यक्ती आणि धर्म सापेक्ष असते.. त्यामुळे नेमके काय म्हणायचे आहे ते उलगडून सांगा
हिंदू जीवन पद्धती मध्ये हिंदू , मुस्लीम , शिख , बौद्ध ( इतर सर्व धर्म -पंथ- निधर्मीय ) हे सर्व जणांचा विचार करून लिहिला आहे का ?
आणि जागतिकीकरणाच्या , औद्योगिकरणाच्या रेट्यात काही जीवन पद्धती बदलणे अपरीहार्य आहे ..
हिंदू जीवन पद्धती मध्ये काय अपेक्षित आहे ते जरा तपशील वार लिहिले तर विस्ताराने चर्चा करता येइल
28 Aug 2012 - 7:59 pm | मोहनराव
जरा विस्कटुन सांगा मुनीवर!
28 Aug 2012 - 8:19 pm | अन्या दातार
हा धागा वाचला नाहीत काय हो?
रच्याकने, तुम्ही अजूनही लंगोट, धोतर वापरता का रोज? संदेशवहनासाठी किती कबुतरे आहेत तुमच्याकडे?
29 Aug 2012 - 2:21 pm | मोहनराव
तो धागा नाय वाचला.
हो धोतर वापरतो, बरं असतय, हवेशीर. संदेशवहनासाठी कबुतरे नाय, माकडं बाळगलीत!! ;)
28 Aug 2012 - 6:26 pm | आनन्दा
"पण पाप काय आणि पुण्य काय, हे ठरवणार कोण?
केवळ जुन्या धर्मग्रंथात लिहिला आहे / मोठ्यांनी सांगितलं आहे म्हणून - अमुक एक कृत्य म्हणजे पाप, आणि तमुक एक कृत्य म्हणजे पुण्य - असे मानणे योग्य आहे का?"
बहुधा तुकोबांनी फारच सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे.
"पुण्य पर-उपकार पाप जे परपीडा"
बाकी यावर विस्तृत लिहायचे आहे.. पण नंतर.
30 Aug 2012 - 3:04 pm | चैदजा
क्रुपया यावर सविस्तर लिहा. तुकोबांचे उत्तर पटण्यासारखे आहे.
पण सनी लिऑन करते ते पाप की पुण्य, तिला जे तश्या चलतपटात बघतात ते पाप की पुण्य, यावर माझा गोंधळ आहे. तो क्रुपया सोडवावा.
31 Aug 2012 - 10:52 am | प्यारे१
दोन्ही पाप आहे....!
परस्त्री/पुरुष, परधन, परनिंदा हे निषेध (करता येण्यासारखे असले तरी करायला बंदी असलेले) असे आहेत.
सो नॉट अलाऊड.
तुकाराम महाराजांचाच अभंग आहे अशा अर्थाचा.
31 Aug 2012 - 1:44 pm | llपुण्याचे पेशवेll
चामारी कोणत्यातरी मोठ्या माणसाने लिहून ठेवले म्हणून उगा काय त्याला पाप मानायचे. फारच मागास दिसता बॉ तुम्ही!
एक महत्वाचे शिका. मोठ्या माणसाचे चांगले गुण आपल्या सोईचे असतील तर घ्यावे. उगा धस सोसून चांगले गुण घ्या कशाला?
अशा गुणांवर सरळ म्हणावे उगा कोणीतरी सांगितले म्हणून मी एखाद्या गोष्टीला पाप किंवा पुण्य म्हणणार नाही. कळलें?
31 Aug 2012 - 10:06 pm | प्यारे१
च्यायला!!!!
सांगणाराचं नाव थोSSSSडं हिरवं असतं नि त्यानं थोडी समीकरणं मांडून दाखवली असती तर पटलं असतं म्हणा की तुम्हाला!
बाकी आमचं वाईच नाय नाय समदंच चुकलंय म्हणा! ;)
खाली दिलेल्या प्रतिक्रिये मध्ये म्हतल्या मध्ये एक बदल सुचवतो. शाळे ऐवजी 'घरच्या घरीच 'ग्लास भरणे इ.इ. काही गोष्टी जमल्यास उत्तम असे म्हणा! :) विचारात उदात्तपणा कसला तो नाहीच.
28 Aug 2012 - 6:36 pm | अमोल सहस्रबुद्धे
मी इथे लिहिले आणि त्याची प्रचीती लगेच आली. आत्ता दूरचित्रवाणीवर बातमी आल्ये की सातवी आठवीतली मुले मद्यप्राशन करून धिंगाणा घालीत होती. आजच्या बातम्या पहा आणि ढिम्म निष्क्रिय बसा.
वर प्रतिक्रियेत लिहिल्याप्रमाणे आपण उत्सव साजरे करतायत. पण गणपती म्हणजे मद्य पिऊन नाचणे. एवढेच होते इतरही सणांची तीच वाट लागली आहे. धार्मिक उत्सवात धार्मिकता नाही. आम्हाला आमची वस्त्र परिधान पद्धती पूर्णपणे माहित नाही. त्याचे वैषम्य नाही पण आंग्ल पद्धतीतील आचार (!) आला नाहीतर आकाश कोसळते . वैयक्तिक उपासना सणावारी न करता केवळ मिरवणे चालले असते .
{वि. सू.- मला बोलताना किंवा लिहिताना त्या माध्यमातून, त्या ठिकाणी , त्या संदर्भात इत्यादी शब्द वापरावे लागले नाहीत.}.............
अमृताते पैजा जिंके.... माय मराठी
28 Aug 2012 - 9:43 pm | रेवती
आता सातवी आठवीतल्या मुलांनी मद्यप्राशन केले.
केले ते केले वर धिंगाणा घातला याला आम्ही हो काय करणार?
यात पापपुण्यापेक्षा शिस्त आणि चांगल्या सवयी असणे/नसणे यांचा विचार व्हायला हवा.
पुन्हा वडीलधारे जर रोज दारू पित असले तर त्यांना त्यात मोठेसे काय वाटणार?
अश्यावेळी शक्यतो वडील मंडळीस अभिमान वाटतो हे पाहण्यात आलेले आहे. मग काय बोलणार?
आम्ही आणि आमची मुले आमच्या पैश्यांनी पितो, तुमचं काय जातय? तुमच्या मुलांवर परिणाम होतो असं वाटतय तर त्यांना लांब ठेवा, जीव तोडून संस्कार करा असे म्हणतील (म्हणजे म्हणताना ऐकले आहे.)
माझ्या घरी पूजा होती म्हणून प्रसादाचे जेवण घेण्यास काही मंडळींना बोलावले तर त्यांनी घरात येण्याआधी कारमध्ये बसून पुष्कळ ढोसली (आस्वाद आणि चिक्कार हा फरक लक्षात घेणे) आणि आले. मग मीच विचारलं की निदान आत्ता तरी हे टाळता येण्यासारखं नव्हतं काय? तर म्हणतात की इथं पूजेला काही फरक पडलाय का? आमचा तो कारमधला बार म्हणजेच 'कारोबार' आहे.
त्यानंतर त्या मनुष्यप्राण्यांना पुन्हा बोलावले नाही.
28 Aug 2012 - 11:33 pm | विकास
यात पापपुण्यापेक्षा शिस्त आणि चांगल्या सवयी असणे/नसणे यांचा विचार व्हायला हवा.
अहो कलीयुग आहे हे कलीयुग! त्यामुळे असे घडत असावे!
28 Aug 2012 - 11:39 pm | शुचि
=)) =))
28 Aug 2012 - 11:34 pm | कवितानागेश
कमाल आहे. सातवी आठवीतल्या मुलांना चढली नाही? वास्तविक ती झोपून जायला हवी होती!
कदाचित रोजचीच सवय असेल. असो.
पापपुण्याबद्दल असे काही ठरवता येत नाही हो कुठल्याच काळात. माणूस महालबाड प्राणी आहे. तो कायद्यातूनदेखिल पळवाटा काढतो, तिथे या पापपुण्याच्या 'धार्मिक' भुसभुशीत भिंती कुणाला काय बदलणार?
........पण चर्चा चालू राहू दे.
28 Aug 2012 - 11:48 pm | विकास
मुले मद्यप्राशन करून धिंगाणा घालीत होती.
हे खेदजनक आहे हे नक्कीच. सिगरेटी ओढणारी, तंबाखू खाणारी त्या वयोगटातली मुले पाहीली आहेत. आता दारू इतकेच काय ते...पण या बातमीचे वर्णन खरेच त्या मुलांना लागू होते का नाही हे कळायला मार्ग नाही. यात मुलांची बाजू घेत नाही आहे, काही कार्टी नक्कीच तशी असतील पण बातमी वाचताना वेगळेच वाटले. म्हणून मुद्दामून चिकटवत आहे:
राज्याची सांस्कृतिक राजधानी व शिक्षणाचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या सुसंस्कृतांच्या पुण्यात मंगळवारी लाजिरवाणा प्रकार घडला आहे. तब्बल ७०० अल्पवयीन शाळकरी मुलांनी एका हॉटेलमध्ये दारू पार्टी करून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पार्टीच्या आठ आयोजकांकडून दंड वसूल करून त्यांची सुटका केली आहे.
आठवी, नववीच्या मुलांसाठी पुण्याच्या मुंढवा परिसरातील 'रिव्हर व्ह्यू' हॉटेलमध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. पुण्यातील वेगवेगळ्या शाळांतील सुमारे ७०० मुलं यात सहभागी झाली होती. अल्पवयीन मुलांसाठीच्या या पार्टीत चक्क दारू ठेवण्यात आली होती. विशेष म्हणजे मुलगा टॉयलेटला जात नाही तोपर्यंत त्याला दारू सर्व्ह करायची, असा नियम या पार्टीत ठेवण्यात आला होता. या पार्टीत अनेक बड्या व्यक्तींचाही समावेश होता. पालकांचा विरोध धुडकावून ही पार्टी आयोजित करण्यात आली. अखेर पालकांनीच पोलिसांमध्ये धाव घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणला. त्यानंतर पोलिसांच्या समाजसेवा शाखेने तत्काळ कारवाई करून दारूच्या नशेत झिंगलेल्या मुलांना ताब्यात घेतलं व नंतर सोडून दिलं. पालकांनी सर्व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली असून दोन आयोजकांवर गुन्हा दाखल केला आहे तर इतर आयोजकांची चौकशी सुरू आहे.
28 Aug 2012 - 11:52 pm | शुचि
बातमीमध्ये सुसंस्कृतांच्या पुण्यात अशी द्विरुक्ती झालेली आहे ;)
28 Aug 2012 - 11:57 pm | बॅटमॅन
म्हंजे बाकीचे असंस्कृत असे म्हणायचे आहे की काय आँ ;)
(*काडीसारक) बॅटमॅन.
*श्रेयअव्हेर = अन्या दातार.
29 Aug 2012 - 12:00 am | शुचि
म्हणायची काय गरज आहे? ;)
(सारक-काडी-निर्मूलन कर्ती) शुचि
29 Aug 2012 - 12:05 am | बॅटमॅन
दाखवलीत आपली संस्कृति ;) <पाहुणे मोड ऑन>संमंकडून तुम्हाला समज दिल्या गेली पाहिजे चांगलीच. <पाहुणे मोड ऑफ>
29 Aug 2012 - 12:11 am | शुचि
समंवर अधिक आणि अनावश्यक कामाचे आलोडन करु नये. तसेच येथे फार गप्प मारु नयेत. खवच्या सुविधेचा वापर करावा ;)
- सूचनेवरून
29 Aug 2012 - 12:15 am | बॅटमॅन
आलोडन...म्हटलं संमंची मंमं करायची वेळ झाली की काय ;) खाई त्याला खवखवे :P
29 Aug 2012 - 12:18 am | शुचि
३ तासात (कदाचित मिनिटातही) हे सर्व संभाषण उडविण्यात येईल कारण हे अति-महा-फार्-तात्कालिक व अवांतर स्वरुपाचे झालेले आहे. =))
29 Aug 2012 - 12:21 am | बॅटमॅन
पाप-पुण्याची संकल्पना न राहिल्यामुळे असं होतं बघा. पूर्वीचं पुणं राहिलं नाही. आमच्या वेळी असं नव्हतं.
29 Aug 2012 - 12:25 am | रेवती
शुचीतै आणि ब्याम्या, तुम्ही असे 'त्या' पार्टीत जाऊन आल्यासारखे का वागत आहात? ;)
29 Aug 2012 - 12:27 am | शुचि
कारण बॅटमॅन नी सुरू केले व मला शेवट करायचा असल्याने ;) पण बॅट्मॅन मला शेवटच करू देत नाहीयेत :(
1 Sep 2012 - 7:29 pm | रमताराम
ह्या बाकी खरां हा. ह्या वाल्गुदेयाला रीतभात कशी ती नाहीच.
अवांतरः एकदा भाचीबरोबर डिस्नेचा 'अरिस्टोकॅट्स' पहात होतो. त्यात माऊची तीन छोटी पिले दंगा करत असतात, त्यापैकी एक भाटी पिलू असते. दंगा केल्याबद्दल त्यांची आई रागवत असता दुसरे पिलू तक्रार करते 'हिने आधी भांडण सुरू केले.' त्यावर ती ठसक्यात म्हणते 'लेडिज डोन्ट स्टार्ट फाईट्स.... दे फिनिश इट'. उगाचच आठवण झाली बरं का... उगाचच.... :)
(हेल्मेट घालून बसलेला) रमताराम
29 Aug 2012 - 12:31 am | बॅटमॅन
रेवतीआज्जी, जेलसलात तर नै ना आम्हां पामरांवरती ;)
29 Aug 2012 - 12:40 am | शुचि
रेफ- मिस्टर बॅटमॅन्'स कमेन्ट (इन माय खव,) आय डिक्लेर धिस सभाषण डन!!!
अळीमिळी गुपचिळी जो पहीला बोलेल त्याची जीभ काळी.
29 Aug 2012 - 12:43 pm | अत्रुप्त आत्मा
@जो पहीला बोलेल त्याची जीभ काळी.>>>![](http://www.sherv.net/cm/emo/laughing/giggling.gif)
30 Aug 2012 - 3:08 pm | इरसाल
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=247...
31 Aug 2012 - 1:55 pm | llपुण्याचे पेशवेll
अवांतरः
तुम्ही मुलांची बाजू घेत का बरे नाही. आम्ही तर मुलांची बाजू पूर्णपणे उचलून धरतो. सदर मुलांना पेग एज्युकेशन न दिल्याचा हा परिणाम आहे. तस्मात शाळा, सरकार, शिक्षणखाते यांनी हा विषय लवकरात लवकर अभ्यासात समाविष्ट करावा अशी माझी जाहीर विनंती आहे. दारू पिण्याचे सरकारी वय (म्हणजे परवानगी असलेले) १६ करावे. १२व्या वर्षापासून पेग एज्युकेशनमधे शास्त्रीय कारण, कृती अन त्याचे परीणाम या अंगाने विषय समजाऊन द्यावा. (म्हणजे मिक्सिंग करतान प्रोब्लेम नाही येणार) म्हणजे मुले दारु पिऊन झिंगण्यापेक्षा १-२ पेग झाले की जास्त झाली आहे आता घरी जाणे इष्ट असा विचार करून रिक्षाने घरी जातील.
28 Aug 2012 - 8:24 pm | तर्री
१.पाप हे वय , जात , धर्म , कार्य-कारण भाव , कृती मागचा उद्देश हया व अश्या गोष्टींवर अवलंबून असते.
-लहान मुलाच्या हातून हत्या झाल्यास क्षम्य आहे , मोठया माणसाच्या हातून अनावधाने झालेली हत्या क्षम्य आहे.
-गो-मांस खाणे हे हिंदू धर्मात महापाप आहे तर इतर धर्मात हे पाप नाही.
-मासे खाणे सारस्वतांना क्षम्य आहे पण इतर ब्राह्मण , लिंगायत , जैन यांच्या साठी ते पाप आहे.
२. पाप पुण्याच्या भावना काल सापेक्ष आहेत.
- आजच्या जगात कामाच्या जागेवर होणारे लैगिक शोषण हे सगळ्यात मोठे पाप ठरावे - धर्म ग्रंथात ह्याचा संदर्भ असणे अशक्य
३. पाप पुण्याच्या भावना व्यवसायाशी निगडीत आहेत.
- वैद्याने मृत्युमुखी असलेल्या एखाद्याला दया-मृत्यू दिला तर ते पाप कसे ?
- काळ्याचे मासे आणि सैनिकाने मारलेले शत्रू पाप कसे ?
हया भावना अश्या कोणत्याही चौकटीत कोंबणे शक्य नाही.
आपण आपल्या मर्यादा आखाव्या व सांभाळाव्या !
28 Aug 2012 - 8:33 pm | सूड
विचार असला काय नि नसला काय लोक जसे वागायचे तसे वागणारच. पापपुण्याचे विचार पूर्वी होते म्हणून लोक गुन्हे नव्हते करीत का पूर्वी ? तेव्हाही गुन्हे होत होते आताही होत आहेत. नवीन असं काही नाही.
>>केवळ मराठीत व्यक्त करा. मिंग्लिश व हिंराठीत नको.
यामागचा उद्देश कळला तर बरे होईल.
28 Aug 2012 - 8:44 pm | तिमा
आम्ही सुशिक्षित असल्याने व कुठलेही धर्मकृत्य, सण वगैरे साजरे करत नसल्याने अत्यंत पापी आहोत. त्यांत बाकीचा समाज कसा वागतोय हे बघूनही, काहीच करत नसल्यामुळे आम्ही (बहुधा) रौरव नरकातच जाणार आहोत.
आपल्यामुळे कुणाचेही नुकसान होऊ नये, वा कुणाला त्रास होऊ नये एवढाच धर्म (महाराष्ट्र धर्म ?) आम्ही पाळत आलो आहोत. पण तो पुरेसा नाही हे आज कळले.
28 Aug 2012 - 9:13 pm | चौकटराजा
पाप पुण्य हे अगदी अति नैसर्गिक पातळीवर ( वैश्विक म्हणा फारतर ) विचार करू गेले तर बकवास !
पण मानवी समाज ही एक अजब अशी संस्था आहे. त्यात स्खलनशीलता व कल्याणविचार या दोन्ही
प्रेरणा माणसांमाणसामधे भिन्न प्रमाणात कार्यरत असतात. यामुळे पहिल्या वाक्यातील बकवास बाजूला
ठेवून कालपरत्वे, वय परत्वे, लिंगपरत्वे, राष्ट्रपरत्वे , धर्मपरत्वे पाप पुण्य कल्पना येत रहाणार त्यांचा
पगडा रहाणार ! व त्या रहाव्यात ही !
28 Aug 2012 - 11:24 pm | शुचि
पाप-पुण्य या फालतू कल्पना नाहीत. - असे मत आहे.
स्वानुभव / मिळालेले संकेत हे सांगता येणार नाहीत कारण खूप वैयक्तिक बाब आहे. पण पाप-पुण्याची गणना असते यावर ठाम विश्वास आहे.
29 Aug 2012 - 12:38 am | विश्वनाथ मेहेंदळे
वैयक्तिक बाब आहे ? वैयक्तिक बाब आहे ?? मग मला ती विचारलीच पाहिजे....
सांगा ना, सांगा ना, प्लीsssssssssssज ;-)
(प्रेरणा :- अश्लील पत्र होते? अश्लील पत्र होते?? मग मला ते वाचलेच पाहिजे )
29 Aug 2012 - 12:44 am | बॅटमॅन
स्त्रीसदृश आयडींना वैयक्तिक प्रश्न विचारणार्या विमेकाकांना संमंतर्फे समज देण्यात यावी.
- मेहुणे.
29 Aug 2012 - 12:58 am | शुचि
आयडी स्त्रीसदृश कसा असेल? आयडी स्त्रीनामसदृश असेल. चु भू द्या घ्या. (किंवा हवं तर फक्त घ्या ;) )
29 Aug 2012 - 1:05 am | बॅटमॅन
अहो ती मिपाची परिभाषा है.
=))
कुकु
कुकु
29 Aug 2012 - 5:07 am | भडकमकर मास्तर
अवांतर : नान कटाई खावी... गोश्त खावे .. सुखी रहावे.
29 Aug 2012 - 12:19 pm | Nile
पुण्ण्याचं माहित नाही.. पण पाप ही कन्सेप्ट जायला नको राव. पापं करण्यातली मजा काही औरच!!
29 Aug 2012 - 12:58 pm | पुण्याचे वटवाघूळ
या धाग्याचा विचका झाला आहे त्यावरून लक्षात घेण्याजोगा एक धडा : केवळ मराठीतच लिहा (मिंग्लिश/हिंराठी नको) किंवा अनावश्यक लिखाण करू नये असे म्हटले की त्या धाग्यावर अनावश्यक लिखाण होणारच बघा.
29 Aug 2012 - 1:12 pm | अत्रुप्त आत्मा
@पाप -पुण्य याची भीती गेल्याने समाजाचे हित झाले की अहित? >>> पाप/पुण्याची भिती असल्यामुळे समाजाचे हित होते याला आपला पुरावा/दाखला काय...? सर्व धर्मांच्या इतिहासाचा पुरावा याच्या विरोधी जाणारा आहे.त्याचे काय?
@पूर्वी जेव्हा भारतीय समाज मेकॉलेच्या तथाकथित शिक्षण पद्धतीनुसार अशिक्षित(!) होता तेव्हा तो पाप पुण्य इत्यादी जीवन मूल्ये मानीत असे पण जेव्हा कालांतरानी वर उद्धृत केलेला असा सुशिक्षित मनुष्य निर्माण झाला तेव्हा तो हिंदू धर्म पद्धती व जीवन पद्धती हि मागासलेली व बुरसटलेली व आंग्ल जीवन पद्धती हि आदर्श मानू लागला त्यामुळे हिंदू जीवन पद्धतीत येणारी प्रत्येक गोष्ट तो कुठलाही विचार न करता त्याज्य व तिरस्करणीय मानू लागला . अर्थात साहेब जिंकला. आज आपल्याला हिंदू सणवार करायला वेळ नाही पण विनाकारण वेळ व्यतीत करण्याला आहे .>>> हे तुमचं अनुमान अतिशय भंपक आहे...वर अनेकांनी या विषयीचा यथा-योग्य खुलासा केलेलाच आहे. मी वेगळं लिहिण्याची काहिही गरज नाही.... आंग्ल पद्धतीही काहि फार शहाणपणाची आहे असं नव्हे, पण आपली हिंदू धर्म पद्धती व जीवन पद्धती हि मागासलेली व बुरसटलेली आहे का नाही...? तुंम्हाला स्वतःला काय वाटतं? आणी काय वाटतं ,याच्यापेक्षा काय आहे...?..हे तुंम्ही विचारात घेतलेलं आहे कि नाही..? ते इथे जाहिरपणे सांगण्याचं पुण्य करणार की पापीच रहाणं पसंत करणार...? सांगा बरं?
@आज आपण पापपुण्यालाही भीत नाही आणि कायद्याला विचारीत नाही .म्हणजे अनागोंदी आणि अनाचाराची नांदीच झाली आहे ..>>> हे बाकी खरं आहे...पण या वाक्यात आज हा अप्रस्तुत शब्द तुंम्ही पूर्ण जाणिवेनी का वापरला..? हे जरा सांगा बरं... कारण,या जगात सगळे धर्म जन्माला आले,तेंव्हापासुन एकही असा कालावधी काढुन दाखवता येत नाही,की जेंव्हा माणुस पाप/पुण्याला भितोय,आणी कायद्याशी इमान राखुन आहे. असा जगलाय.
@करा करा विचार करा आणि केवळ मराठीत व्यक्त करा. मिंग्लिश व हिंराठीत नको. कृपया विषय गंभीर आहे उगाच अनावश्यक लिखाण करू नये. ही विनंती बघा प्रयत्न करून >>> व्वा....! तुमचा हा तोरा आंम्हास चांगलाच ठाऊक आहे, त्यामुळे त्याची झींग इथे वेगळी उतरवायला जात नाही. पण तुंम्ही तुमच्या विचारांशी निदान *स्वत: तरी प्रामाणिक आहात कि नाही? ते या निमित्तानी आपण बघू.
* मी विचारलेल्या प्रश्नांना अनावश्यक लिखाण न करता ,ते प्रश्न गंभीर असल्यामुळे प्रामाणिक उत्तरे देण्याचे करा...
*आपल्याला जाणवणार्या समस्या खर्या आहेत,असं मानलं,किंवा तसं आंम्ही आपल्याला कबुल केलं,तर याच्या निवारणाचा उपाय काय व कसा राहिल ते कृपया सांगा?
*कृपया पळून जाऊ नका,धीटपणे उत्तरे द्या ही विनंती :)
29 Aug 2012 - 1:22 pm | पुण्याचे वटवाघूळ
सहमत. मला एक प्रश्न नेहमी पडतो. जर भारतीय संस्कृती एवढी महान असेल तर आपल्याकडे इतके संत/समाजसुधारक यायची गरज का पडली? प्रत्येक संत्/समाजसुधारकाने समाजाला सुधरवायचाच (म्हणजे समाजातील वाईट गोष्टींविरूध्द जागृती करायचाच) प्रयत्न केला ना? जर मुळात सगळेच काही आयडीअल असते तर त्यात सुधारणा करायची गरज का पडली? तेव्हा अत्रुप्त आत्म्याशी सहमतील
यावर भारतीय संस्कृतीवाले म्हणतीलच की "मुळातली आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेली संस्कृती आणि लोक आचरत असलेली संस्कृती यात फरक होता आणि मुळातल्या ग्रंथांमध्ये अभिप्रेत असलेली संस्कृती यावी म्हणून या संत/समाजसुधारकांनी प्रयत्न केले". म्हणजेच काय तर "गिरा तो भी टांग उपर" असे काहीसे म्हणतात ना त्यातलाच प्रकार आहे हा. (बघा मुद्दामून हिंदीतून लिहित आहे. लेखकाला इतर भाषांमधील प्रतिसाद वर्ज्य होते ना. मग घ्या मुद्दामून एखाद दोन वाक्ये इतर भाषेतून लिहावीत असेच वाटले. काय करणार?)
29 Aug 2012 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा
@भारतीय संस्कृतीवाले म्हणतीलच की "मुळातली आमच्या ग्रंथांमध्ये लिहिलेली संस्कृती आणि लोक आचरत असलेली संस्कृती यात फरक होता आणि मुळातल्या ग्रंथांमध्ये अभिप्रेत असलेली संस्कृती यावी म्हणून या संत/समाजसुधारकांनी प्रयत्न केले". म्हणजेच काय तर "गिरा तो भी टांग उपर" असे काहीसे म्हणतात ना त्यातलाच प्रकार आहे हा. >>> इस कथन से हम भी सेहेमत है।... पण एक गफलत आहे यात,संस्कृतीवाले वाट्टेल ते म्हणोत, मुळ ग्रंथातलीच संस्कृती कींवा समाजनियमनाच्या गोष्टी चूक किंवा सरळ सरळ अनैतिक आहेत. हे पुराव्यानिशी सिद्ध करता येतं,किंबहुना ते स्वयंसिद्धच आहे.
नरहर कुरुंदकरांनी(मौ.आझादांवरिल एका लेखात) एके ठिकाणी समजावणुकीच्या सुरात असं म्हटलय/दाखवुन दिलय,,,की ''काही चुका धर्म अनुयाई करतात,तर काही चुका ह्या मूळातच(धर्मात)असतात...'' यातलं दुसरं जे आहे ना,,,ते धर्माचा/संस्कृतीचा मुखवटा वापरणारे लोक कध्धिह्ही मान्य करत नाहीत. आणी हेच तर त्यांच्या पुढचं खंरं आव्हान आहे. हे त्यांना कळत नाही. :)
29 Aug 2012 - 1:14 pm | कॉमन मॅन
आपली कळकळ तशी समजण्यासारखी आहे. असो..
29 Aug 2012 - 1:26 pm | ज्योत्स्ना
पाप पुण्य जाऊ द्या हो. आधुनिक आहोत तर प्रचलित कायदा प्रामाणिकपणे पाळणे तरी जमतय का बघा.
29 Aug 2012 - 2:35 pm | परिकथेतील राजकुमार
पुण्य ही समाजाला लागलेली किड आहे!
जगात सगळेच पापी झाले तर कारभार किती सुखाचा होईल ह्याचा विचार करा.
29 Aug 2012 - 7:21 pm | विकास
याला इंग्रजीत "Out of box thinking" असे म्हणतात. (मराठीकरण केले नाही कारण, "खोक्या बाहेरचे विचार" हे जरा गोंधळ करणारे विधान ठरले असते, असे वाटले. :) )
29 Aug 2012 - 8:43 pm | गणामास्तर
त्याऐवजी "चाकोरी बाहेर जाऊन केलेला विचार" म्हणलं तर कसे वाटेल? :)
29 Aug 2012 - 8:49 pm | विकास
त्याऐवजी "चाकोरी बाहेर जाऊन केलेला विचार" म्हणलं तर कसे वाटेल?
बरोब्बर!
31 Aug 2012 - 2:16 pm | सुहास..
खोक्या बाहेरचे विचार >>
त्या पेक्षा 'डोक्या बाहेरचे विचार' असे का नको
31 Aug 2012 - 9:23 am | llपुण्याचे पेशवेll
सहमत. सगळेच पापी झाले तरी भागणार नाही. मग पाप आणि महापाप अशा दोन्ही गोष्टी सुरु होतील. सध्या तरी तथाकथीत फडतूस भारतीय संस्कृती काय आहे ती नष्ट करण्यासाठी त्यात पाप म्हणून वर्णिलेल्या सगळ्या गोष्टींचे आचरण करून त्या संकल्पनेचा बोर्या वाजवू. मग एकेक करून बाकीचे धर्म खालसा करू. शगले कसे चान चान होईल.
30 Aug 2012 - 3:03 pm | नाना चेंगट
काय ठरलं मग शेवटी ?
30 Aug 2012 - 6:51 pm | मनीषा
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गगौघाचे पाणी |
http://www.youtube.com/watch?v=UDgG0luC3hU
30 Aug 2012 - 7:06 pm | विकास
नाही पुण्याची मोजणी
मला आपण पुणे या शहरासंदर्भात लिहीले असे वाटले. त्यामुळे, परत विचार करताना, परा यांच्या वरील प्रतिसादातील "पुण्य ही समाजाला लागलेली किड आहे!" हे वाक्य जर कुणी, "समाजाला पुण्याची किड लागली आहे" असे केले तर त्यातून वेगळाच अर्थ निघेल हे लक्षात आले. :-)
30 Aug 2012 - 7:27 pm | मनीषा
मुघल सैन्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी .. संताजी आणि धनाजी दिसायचे म्हणे .
तसे तुम्हाला "शहर - पुणे" दिसायला लागले की काय ? :)
30 Aug 2012 - 7:50 pm | विकास
तसे काही नाही! उलटे आहे... जन्माने नसलो तरी मी पुणेकरच आहे. :( त्यामुळे अस्मितेची काळजी घेत म्हणूनच शब्दांचे कसे अर्थ होऊ शकतात हे सांगितले इतकेच. ;)
1 Sep 2012 - 1:15 am | सोत्रि
पाप पुण्य विचार असा विचार मुळातच अजीबात नसला पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे!
ह्याने लैच काशी होते. कशी ????
लहान असताना म्हणजे दहावी पास झाल्यावर आतेभावाकडे रहात होतो. तेव्हा शेजारी एक सुबक ठेंगणी रहायची. वयाने बरीच मोठी माझ्यापेक्षा. ती नेहमी येउन 'चिकटायचा' प्रयत्न करायची. अगदी धसमुसळेपणाने. पण हाय रे कर्मा! ह्याच... ह्याच... 'पाप पुण्य' असल्या विचार करण्यामुळे मी तिच्यापासून लांब पळायचो. :(
आता पाप पुण्य असल्या विचारांपासून लांब गेलो आहे पण त्या बरोबरच तसल्या सर्व सुबक ठेंगण्याही तेवढ्याच लांब गेल्या आहेत. आता फक्त 'गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी ' असे झाले आहे.
त्यामुळे माझा 'पाप पुण्य विचार' असे कोणी म्हटले की तीळपापड होतो. ह्या सगळ्या बाजरगप्पा आहेत. त्यावेळी असले पाप पुण्य असले काही माहिती नसते तर........
- ( अजुनही हळहळ वाटणारा) सोकाजी