माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.'
त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?'
आचार्यांनी मेधाला बोलवून विचारले. मेधा ही अत्यंत बुद्धिमान, पण खोडकर होती. ती म्हणाली, ' मी आजवर स्थिरबुद्धीकडे बंधू या नात्याने कधीच पाहिलेले नाही. त्यामुळे मला तो पती म्हणून चालेल. पण 'कन्या हे परधन' असे आपली नीती सांगते. स्थिरबुद्धी इथेच राहिला तर माझी सासरी पाठवणी होणार नाही आणि परधन स्वतःकडे ठेऊन घेतल्याचा दोष तुम्हाला लागेल. अर्थात स्थिरबुद्धीने अन्यत्र गुरुकुल चालवले तर मी त्याची सहचरी बनायला तयार आहे. मात्र त्याने येथे गुरुकुल चालवण्यात मला अडचण वाटते.'
आम्ही उपस्थित केलेल्या या पेचावर आचार्यांनी काय केले असावे? या कहाणीचा शेवट काय झाला असावा, असे तुम्हाला वाटते?
प्रतिक्रिया
13 Jul 2012 - 1:50 pm | गणेशा
स्थिरबुद्धी ला गुरुकुल ही चालवायला द्यायचे आणि मेधाशी परिणय ही करुन आणयचा असे दोन्ही ही साध्य करायचेच आहे असे गृहीत धरुन उत्तर देतो ( नाहीतर बरेच पर्याय तयार होतील)
प्रथमता जंबुकाचार्य सर्व गुरुकुल आपल्या शिष्याकडे सोपवुन (विकुन्/हस्तांतरीत करुन/ नावे देवून) मेधा बरोबर इतर कोठे तरी रहायला निघुन जातील.
नंतर ते मेधाचा विवाह स्थिरबुद्दीशी करतील.
13 Jul 2012 - 1:56 pm | गवि
या मार्गाने 'मुलगी हे परधन" हा प्रश्न सुटला तरी भगिनीसमान मेधाशी विवाह करण्याची इच्छा नसणे हे यात सुटलेलं नाही..
13 Jul 2012 - 2:05 pm | परिकथेतील राजकुमार
अहो मेधालाच गुरुकुल चालवायला दिले की सगळे प्रश्नच सुटले. ;)
13 Jul 2012 - 2:37 pm | गवि
पराषेट पराषेट, अहो मेधा गुरुकन्येची थेट प्रोप्रायटर झाली तरी स्थिबुबाबतचं तिचं भगिनीपद आपोआप गळून पडणार आहे थोडंच.. ?
13 Jul 2012 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार
काय हे गवि ? अडकलात 'योग'मायेत ?
जंबूकाचार्यांच्या जागी 'शरदाचार्य' घ्या आणि लग्नाच्या जागी 'मुख्यमंत्रीपद' घ्या.
आता सोडवा बरे कोडे.
16 Jul 2012 - 10:15 am | श्रीरंग
वरचा 'सा'!!
13 Jul 2012 - 2:07 pm | गणेशा
आपले बरोबर आहे.
पण
या एका वाक्यावर आणि मेधाने त्याला बंधुसम न मानल्याने , या प्रश्नाला मी एका फटक्यात विसरलोच की.
जर बघिनीसम मेधाशी त्याला लग्न करण्याची इच्छा नसेल तर उत्तर वेगळे होयील वाटते.
---
बाकी आणखिन आलेले रिप्लाय वाचुन मज्जा येते आहे..
13 Jul 2012 - 9:47 pm | पक पक पक
कॉलेजात असताना मानलेला भाउ अन मानलेली बहिण नावाचा प्रकार फार वेळा पहाण्यात आला होता.... ;)
14 Jul 2012 - 1:22 pm | नाना चेंगट
दादाभाई नवरोजी !
13 Jul 2012 - 1:53 pm | JAGOMOHANPYARE
गुरुकुलाच्या शेजारी दुसरे न्यू गुरुकुल काढावे.
13 Jul 2012 - 1:55 pm | बॅटमॅन
हेच म्हणणार होतो.
13 Jul 2012 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार
विशिष्ठ जातीने विशिष्ठ जातीसाठी काढलेला धागा.
13 Jul 2012 - 9:44 pm | टवाळ कार्टा
कैच्याकै...उगाचच
13 Jul 2012 - 1:57 pm | कवटी
१)जंबूकाचार्यांनी ते गुरूकुल स्थिरबुद्धीच्या हवाली करून तेथून स्वतः चालते झाले...
२)स्थिबुने गुरूकुला समोरच न्यु (हा एकदम छोट्या टाईपात) गुरूकुल चालू करून आचार्यांचा धंदा बसवला...
३) स्थिबुने बाजूच्याच गावात संसार थाटून गुरूकुलासाठी अप्-डाऊन सुरू केले...
अजून सुचतील तसे देतोच... सध्या पोच समजावी....
खरे उत्तर ऐकायची लै उत्सुकत आहे.
13 Jul 2012 - 2:04 pm | ५० फक्त
गुरुकुल आचार्यानीच चालवलं, अन स्थिबु आणि मेघाला, ते दोघं लक्ष्मी विष्णुचा अवतार असल्याचा साक्षात्कार झाला तर सगळे प्रश्न मिटतील, मग पुढं मागं गुरुकुल चाललं नाही तरी चालेल, कसे ?
13 Jul 2012 - 2:10 pm | कपिलमुनी
लिव्ह इन रीलेशन मधे रहातील .. ;)
कशाला पाहिजे लग्नाचं झंझट !!!
13 Jul 2012 - 3:05 pm | इनिगोय
येSSSकदम बेश्ट. पाहिजेच कशाला लग्नाची झंझट?
14 Jul 2012 - 3:56 pm | एमी
त्यापेक्षा ते TomKat सारखं ३ वर्षाँचं कॉँट्रेक्ट चांगलं... पूर्वी 7 year itch असायचं आता 3 year म्हणजे लय झालं...
13 Jul 2012 - 2:11 pm | sagarpdy
१.आधी मेधेला कोणा चौथ्या माणसास दत्तक द्यावे. आता मेधा कायदेशीररीत्या आचार्यांची कन्या नाही. आणि गुरुकुल हे तिचे माहेर हि नाही.
२. गुरुकुल स्थिरबुद्धीच्या नवे करून हिमालयात जावे (उगाच कशाला ढवळाढवळ रिटायर झाल्यावर!?)
13 Jul 2012 - 2:20 pm | गणेशा
पण जो पर्यंत सांगोपण केले तोपर्यंत मेधा ही त्यांची मुलगीच होती, त्यामुळे एकदा बहिनीसम माणलेल्या व्यक्तीस असे दूसर्याला दत्तक दिले की सर्व आधीचे नाते नष्ट कसे होयील.
असे असेन तर, ज्या दिवशी गुरु ने शिकवणे बंद केले त्या दिवशी ते स्थिरबुद्दीचे गुरु राहिले नाही.. म्हणजे पिताच राहिले नाहित.. असा युक्तिवाद पण उभा राहु शकतोच की..
पण हे योग्य वाटत नाहि बॉ..
बाकी काय चालु आहे साहेब ?
13 Jul 2012 - 2:44 pm | sagarpdy
कोड्यासाठी जुळवाजुळव!
बाकी चर्चा ख.व. मध्ये :)
13 Jul 2012 - 2:13 pm | मराठमोळा
स्थिरबुद्धी आणी मंदबुद्धी (पक्षी :मेधा) यांना एकमेकाशी लग्न करण्याची ईच्छा आहे आणि जंबुकाचार्य यांचा याला विरोध नसेल तर नीती वगैरे ला फाट्यावर मारावे. आणि त्या मेधाला अति शहाणपणा करु नये असा सल्ला द्यावा..
(स्वगतः स्त्री ही पित्याची देखील शत्रू असते की काय? पळा...) ;)
13 Jul 2012 - 2:17 pm | गणेशा
पळा का हो.. तुमचे कोणॅए शत्रु आहेत काय ?
13 Jul 2012 - 2:30 pm | कवटी
"आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो. त्यामुळे भगिनीसम मेधाशी विवाह अनुचित नाही का ठरणार?'
अरे चोरा!!!! येवढ सगळ अनुचित वाटतय तर पुन्हा आणि मेधाचा विचार कशाला घ्यायला सांगतोय्स?
सरळ सांगना ती मला बहिणी सारखी आहे अतएव लग्नाचे जमणार नाही, गुरूकुल देत असलात तर बोला!
पण नाही. याला दोन्ही हवय... एक तर लहानपणापासून त्या मेधावर लाईन मारली. नंतर तिला नादी लावलं आणि अता तिचा बापच लग्न करून द्यायला लागल्यावर याला जबाब्दारी नको.
प्रभुगुर्जी , सोडू नका त्याला... चंगला कानाला धरून लग्नाला उभा करा.
13 Jul 2012 - 3:34 pm | ५० फक्त
आयला लाईन मारायची मेघा (संदर्भ - मी याला भावासारखं पाहिलं नाही वगैरे वगैरे ), आणि आळ बिचा-या शिष्यावर, पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे.
13 Jul 2012 - 3:49 pm | कवटी
पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे.
आज मला तुमच्यात युयुत्सु दिसले!!!
कवटीत्सु
13 Jul 2012 - 3:57 pm | अत्रुप्त आत्मा
पुरुषजातीवर हा अन्याव फार प्राचीन आहे, असं आमचं मत आहे.
जोरदार अणुमोदण ;-)
ह्या इरुद्ध आवाज उठवायला हवा ;-)
13 Jul 2012 - 4:35 pm | बॅटमॅन
जोर्दार अणु(की हिग्स्?)मोदण!!!!!!!! या अन्यायाचे परिमार्जन तर दूरच, याला साधी वाचादेखील कोणी फोडत नाही, साली बहुत नाइन्साफी है रे ठाकुर!!!!
13 Jul 2012 - 3:11 pm | निश
गुरुआज्ञा बलियसि / गुरुईच्छा बलियसि.
13 Jul 2012 - 4:23 pm | चैतन्य दीक्षित
त्याचं काय आहे,
त्या स्थिबुचा मेन प्रॉब्लेम (म्हणजे मुख्य प्रॉब्लेम, नाय तर 'मेन' या शब्दावर कुणी तरी श्लेष करायचं ;)) असा आहे की
मेधा 'भगिनीसम' आहे म्हणजे जिला 'सम' बहिणी आहेत अशी आहे.
त्या मेधाला २ किंवा २ च्या पटीत बहिणी असाव्यात. मेधाला विषम बहिणी असतील तर स्थिबुला प्राब्लेम नाय.
त्यामुळे प्राब्लेम सोडवायचा असला तर जंबुकाचार्यांना पुढच्या पाळण्याचं मनावर घेतलं पायजेल :)
13 Jul 2012 - 4:28 pm | प्रीत-मोहर
आणि पुढल्या पाळण्यात पोरगीच झाली पायजेल.
म्हंजे थिबु स्त्रीयांचे जास्तीत जास्त जन्म व्हावेत ह्या मताचा होतर थोडक्यात.
14 Jul 2012 - 12:46 pm | चिखलू
आचार्य मेधाला घेउन दुसरीकडे जातात. आता आश्रमाचा गुरू स्थिरबुद्धि.
नंतर मेधा स्थिरबुद्धिची शिष्या होते, ती शिष्या झाल्यानंतर स्थिरबुद्धिचे आणि तिचे आधीचे नाते अस्तित्वात राहत नाही. म्हणजे गुरूभगिनी ऐवजी शिष्येशी लग्न......
येतायना मग लग्नाला..........
13 Jul 2012 - 4:26 pm | सुहास..
ब्रूट्स ( हाच ना ! ) यु टू ;)
13 Jul 2012 - 5:00 pm | प्राध्यापक
जंबुकाचार्यांनी स्थिरबुध्दीला गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा दिली व त्यानंतर आपल्या मुली चे लग्न त्याच्याशी लावुन दिले जंबुकाचार्यांचे गुरुकुल स्थिरबुध्दीने चालवण्याचा प्रश्नच येत नाही कारण स्थिरबुध्दी जिथे राहील तिथे त्याचे गुरुकुल आपोआपच चालु होइल .
13 Jul 2012 - 5:00 pm | श्रावण मोडक
आज काय दुपारीच का? असो. ;-)
13 Jul 2012 - 6:09 pm | sagarpdy
13 Jul 2012 - 11:32 pm | श्रावण मोडक
इतकंच माहिती आहे की, मेधा ही स्थिरबुद्धीची पत्नी आहे.
14 Jul 2012 - 2:33 am | रेवती
मग ही फसवणूक म्हणावी लागेल. ;) आम्ही कोडे शिरेसली घेतले.
तुम्ही म्हणता तश्या अर्थाने (तो आधी माहीत होता पण त्या अर्थी घेतले नाही) हे लग्न होऊ शकत नाही.
15 Jul 2012 - 9:52 am | जेनी...
:D
13 Jul 2012 - 8:19 pm | रेवती
दोनच गोष्टी विवाहात अडसर ठरत आहेत.
१. मेधा ही टेक्निकली भगिनीसमान वाटणे.
२. त्याच गावात गुरुकुल चालवणे.
उपाय.
१. मेधास दत्तक देणे.
२. दुसर्या गावी गुरुकुल चालू करणे.
या दोन्ही गोष्टी सहज शक्य आहेत.
जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते मेधास वाटत नाही व जे मेधास मान्य आहे ते स्थिरबुद्धीस पटत नाही. अगदी योग्य जोडी आहे. संसार सुखाचा करतील. ;)
13 Jul 2012 - 10:56 pm | पक पक पक
जे स्थिरबुद्धीला वाटते आहे ते मेधास वाटत नाही व जे मेधास मान्य आहे ते स्थिरबुद्धीस पटत नाही. अगदी योग्य जोडी आहे. संसार सुखाचा करतील.
+१
13 Jul 2012 - 10:21 pm | ऋषिकेश
कथा कोणत्या काळातली आहे?
13 Jul 2012 - 11:02 pm | पक पक पक
कथा कोणत्या काळातली आहे?
काय फरक पड्तोय , लग्न निर्विघ्न पार पडावे एवढेच म्हणणे आहे.म्हण्जे कथेचा शेवट छान होईल.. ;)
14 Jul 2012 - 12:15 am | अभ्या..
तो असा... तिघेही आप्ल्या ईच्छा अपुर्या ठेउन मरतात. आणि मोह्बतेन नावाच्या चित्रपटात येतात. गुरुकुल ट्रान्स्फर होते. प्रेम चालू राहते. नवीन पिढीला पण सन्देश मिळतो.
14 Jul 2012 - 12:16 am | आत्मशून्य
हॅहॅहॅ. असो, ये शादी नही हो सकती.
14 Jul 2012 - 9:17 am | सूड
जंबुकाचार्यांनी ते स्थिबुचे मामा असल्याचं सांगावं (थोडक्यात, थाप मारावी).
14 Jul 2012 - 12:50 pm | चिखलू
आचार्य मेधाला घेउन दुसरीकडे जातात. आता आश्रमाचा गुरू स्थिरबुद्धि.
नंतर मेधा स्थिरबुद्धिची शिष्या होते, ती शिष्या झाल्यानंतर स्थिरबुद्धिचे आणि तिचे आधीचे नाते अस्तित्वात राहत नाही. म्हणजे गुरूभगिनी ऐवजी शिष्येशी लग्न......
येतायना मग लग्नाला..........
14 Jul 2012 - 1:46 pm | मन१
मेधा स्थिरबुद्धिची शिष्या
ओ भाउराव, शिष्या ही पुत्रीसमान असते असे आपल्या हिमालयासम उत्तुंग संस्कृतीने म्हटले तर??
14 Jul 2012 - 1:25 pm | नाना चेंगट
ते जाऊ द्या ! लग्न झाले तर जेवणाचा मेन्यु काय आहे? त्यानुसार पाकिट बनवायला !
14 Jul 2012 - 4:04 pm | पक पक पक
त्यानुसार पाकिट बनवायला !
जेवण करुन मगच पाकिट भरायला घ्या... ;)
14 Jul 2012 - 2:16 pm | चिखलू
चालतील ना....
आणि, "शिष्या ही पुत्रीसमान असते असे आपल्या हिमालयासम उत्तुंग संस्कृतीने म्हटले तर??"
अहो हे लग्न न करण्याचे कारण म्हणून देतात, करण्यासाठी नाही.
आपली हिमालयापेक्षाही उत्तुंग संस्कृती असेही म्हणते की "स्त्री ही क्षण कालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते"
14 Jul 2012 - 4:05 pm | पक पक पक
"स्त्री ही क्षण कालाची पत्नी आणि अनंत कालाची माता असते"
या व्याक्यात बहिणीचा उल्लेख नाही... :sad:
16 Jul 2012 - 9:48 am | चैतन्य दीक्षित
स्त्री ही क्षणकालाची पत्नी असते (स्वतःची) आणि अनंतकालाची माता असते (आपल्या मुलाची) त्यामुळे त्या वाक्यात स्वतःचाही (कोड्याच्या संदर्भात- स्थिरबुद्धीचा)विचार व्हायला हवा असे वाटून गेले इतकेच :)
15 Jul 2012 - 2:51 am | योगप्रभू
विचारपूर्वक आणि गंमतीने प्रतिसाद देणार्या सर्वांचे आभार...
(विशेषतः दोन-तीन प्रतिसादक उत्तराच्या जवळपास पोचले त्यांचे अभिनंदन)
जंबूकाचार्यांनी दोघांचेही म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. प्रथम त्यांनी स्थिरबुद्धीचे समाधान केले. ते म्हणाले, ' मी तुझा पिता होऊ शकत नाही कारण १) तू माझा रक्ताचा मुलगा नाहीस २) मी तुला दत्तक घेतलेले नाही अथवा मुलगा मानलेले नाही. ३) तुझा जन्मदाता पिता अद्यापही अज्ञात असला तरी कदाचित या भूतलावर कुठेतरी जिवंतही असू शकेल/किंवा नसेलही. पण समान शक्यता असताना तुला अनाथ मानता येत नाही. जर मी तुझे पितृत्व स्वीकारले नाही तर मी कशा प्रकारचे पालकत्व स्वीकारावे? मी स्वतःला तुझा मामा (मातुल) मानले तर तुला 'मातुलकन्यापरिणय' प्रथेनुसार मेधाशी विवाह करण्यास समाजाचीही हरकत नसेल. पितृकुळाकडे जाणारा संबंध नसल्याने, तसेच सगोत्र विवाह नसल्याने त्याचाही दोष नसेल.
आता तुझा दुसरा मुद्दा. विद्या शिकवून संपल्यावर, शिष्य ज्ञानात बरोबरीचा झाल्यावर आणि ब्रह्मचर्याश्रमातून गृहस्थाश्रमात गेल्यावर गुरुचा त्याच्यावरील अधिकार संपुष्टात येतो. तू आता स्वतंत्र झाला असल्याने माझे गुरुत्वही संपुष्टात आले आहे. तरीही तुला हा विवाह अडचणीचा वाटत असेल तर तू गोंधळशील अशी उदाहरणे मी देतो. महाभारत काळात दुर्योधन हा बलरामाचा शिष्य आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा शिष्य. दोघांनाही आपली सख्खी भगिनी सुभद्रा हिचा परिणय आपल्या शिष्यांशी व्हावा, असे वाटत होते. गुरु हा पित्यासमान असेल तर त्याच्या भगिनीशी परिणय हा आत्याशी विवाहासम ठरला पाहिजे. पण तरी तो सर्वांनी कसा मानला? दुसरे उदाहरण - एखाद्याला केवळ कन्या हेच अपत्य असेल तर तिच्या विवाहानंतर जामाताचे श्वशुराशी नाते मुलासम ठरते. पण मग म्हणून कन्या आणि जामात परस्परांना बंधू-भगिनीसम ठरावेत का?
मेधाच्या शंकेचे समाधान तुलनेने सोपे होते. जंबूकाचार्य तिला म्हणाले, ' तुला अडचण केवळ तुम्ही दोघांनी माझ्या घरी राहण्याची वाटते. स्थिरबुद्धीने स्वतःचे गुरुकुल काढले तर हा प्रश्न संपतो. स्थिरबुद्धीला घर नसल्याने विश्व हेच त्याचे घर. अर्थात तो जिथे नेईल तेच तुझे सासर. त्यामुळे मी असा निर्णय घेतो, की सर्वप्रथम मी माझ्या गुरुकुलातील निम्मा हिस्सा स्थिरबुद्धीला वरदक्षिणा म्हणून देतो. तेथे त्याने स्वतःचे गुरुकुल सुरु करावे. उर्वरित निम्मा हिस्सा माझा असेल. मेधा स्थिरबुद्धीच्या हिश्श्यात म्हणजे माहेरुन सासरी राहायला गेल्याने परधन स्वतःच्या घरी ठेऊन घेतल्याचा दोष मला लागणार नाही. पुन्हा माझ्या वाट्याच्या हिश्शात मी महिलांसाठी नवे गुरुकुल सुरु करेन. तेथे मेधाने महिलांना विद्यादान करावे.
अशा रीतीने मेधा व स्थिरबुद्धीचा परिणय झाला. स्थिरबुद्धीने नवे गुरुकुल काढले. मेधाला स्वतःचे सासर मिळाले. जंबूकाचार्यांचा वृद्धापकाळचा निवारा कायम राहिला व त्यांना व मेधाला उत्पन्नाचे नवे साधन मिळाले. सगळे एकत्र गुण्यागोविंदाने राहू लागले.
बालमित्रांनो! आवडली का ही गोष्ट तुम्हाला? :)
15 Jul 2012 - 7:23 am | प्रचेतस
_/\_
15 Jul 2012 - 11:45 am | आत्मशून्य
स्थिरबुध्दीच्या स्थिरबुध्दीला व त्याला कन्या देणार्या गुरुला मनापासुन प्रणाम.
हो इतक्या वर्षात आपल्यावर लाइन* मारणारी मुलगी त्याची बहीणसम आहे की मैत्रीणसम की आणखी काही समव्यस्त आहे याचा पत्ता लागला नाही म्हणजे गुरु व शिष्याची तयारी जबराच असली पाहीजे. ;)
ओह! म्हणुनच तर लोकांनी प्राध्यापकांना त्यांच्या स्टुडंटशी शरीसंबध ठेवण्यास सपोर्ट करावे (किमान विरोध करु नये) असे माझा मित्रही म्हणतो( तो कुठे नोकरी करतो हे विचारु नका).
15 Jul 2012 - 7:54 pm | रेवती
बालमित्रांना गोष्ट आवडली. ;)
15 Jul 2012 - 9:57 am | जेनी...
आयला लग्न पण झालं ..
भारीये राव ...बोलावलं बी नाय :(
15 Jul 2012 - 1:19 pm | टवाळ कार्टा
तु पण??? :P