इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
From May 30, 2012
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
प्रतिक्रिया
22 Jun 2012 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
>>पण मी मेंगळट नव्हतो (आणि आताही नाही)....मग???
हे स्वतःहून सांगायची गरज का पडावी?
बादवे - मेंगळट असण्याचेही बरेच फायदे असतात बरं का. जसे कुणी अवाजवी अपेक्षा वगैरे ठेवत नाही.
अवांतर - यावरून अक्षय -प्रिती -सलमान यांचा जानेमन नावाचा टुकार चित्रपट आठवला.
22 Jun 2012 - 9:18 am | जेनी...
मुलीना डॅशींग मुलं आवडतात ...
डेअरींग लागतं हो एवढ सगळं करायला ... ;)
नाहितर ते पूस्तकी कीडे काय कामाचे??
फक्त सबमिशनच्यावेळी काय तो त्यांचा उपयोग होतो :P
22 Jun 2012 - 2:53 pm | बॅटमॅन
स्वार्थी कुठली!!!!
22 Jun 2012 - 6:29 am | श्रीरंग_जोशी
द टॉक
अमेरिकन दूरचित्रवाणीवरील एका चर्चाविषयक कार्यक्रमात मॅडोनाच्या नव्या कारनाम्याबद्दल चर्चा करण्यात आली. गेल्याच आठवड्यात इस्तंबूल येथे मॅडोनाचा कार्यक्रम झाला.
ती तिच्या वयाला शोभेल असे वागत नाहीये असा सूर होता चर्चेचा...
22 Jun 2012 - 9:07 am | एमी
एक शेर आहे. ना सुरत है, ना सीरत है, ना दौलत है, ना ताकत है, तुममे ऐसा क्या है जो तुमसे जलेगा कोयी. 'से जलेगा' ऐवजी 'पे मरेगा' ही चालेल.
बाकी सेक्सी कोण/काय वाटेल हे शब्दात सांगता येण अवघड आहे. तरी प्रयत्न करते. फिजिकल ब्युटी मैटर्स. रेखिव फिचर्स, प्रमाणबद्ध बांधा (जाड नको बारीक नको बॉडी बिल्डर हि नको), डोळ्यात प्लिजंट/अप्रोचेबल भाव हवा, वागणे जंटलमनली हवे (despo, childish, arrogant behaviour strict NO)
मला केटरिना आवडते आणि अँजेलीना जोली ही आवडते. दिपिका, ऐर्श्वया, प्रियंका, मधुबाला, मेर्लिन, जे लो, स्कारलेट नाही आवडत. एलिझाबेथ टेलर, क्रिस्टन, कैरा, वाहीदा रेहमान आवडतात.
अक्षय, अर्जुन, जॉन अब्राहम आवडतात आणि टॉम क्रुझ, ओरलँडो, मेथ्यू ही आवडतात. पीट, रिचर्ड, हेरिसन, लिओनाद्रो, सनी देवल, हाशमी, शाहरुख, सलमान, आमीर नाही आवडतात.
22 Jun 2012 - 9:31 am | श्रीरंग_जोशी
>> एक शेर आहे. ना सुरत है, ना सीरत है, ना दौलत है, ना ताकत है, तुममे ऐसा क्या है जो तुमसे जलेगा कोयी. 'से जलेगा' ऐवजी 'पे मरेगा' ही चालेल.
धाग्याच्या विषयावर वेगळ्या कोनाने विचार केला तर काही उदाहरणे डोळ्यासमोर आली.
शाळा, महाविद्यालय, कार्यालय या सर्व ठिकाणी चारचौघात उठून दिसणारी काही थोडकीच व्यक्तिमत्त्वे असतात. त्यांची खालील वैशिष्ट्ये असू शकतात
१. नीटनेटके कपडे व मेक-अप
२. सकारात्मक देहबोली
३. वागण्या बोलण्यातली शिस्त
४. चेहऱ्यावर अचूक असे भाव
५. कमालीचा आत्मविश्वास
असे लोक लिंगनिरपेक्षरित्याही इतरांना संमोहित करू शकतात.
उदा. काही यशस्वी डॉक्टर, कार्यालयातील मोठ्या पदावरील लोक, मनुष्यबळ विकास विभागात काम करणारे, शाळा / महाविद्यालयात शिकवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक / शिक्षिका वगैरे. त्यांच्यापासून संमोहित होणाऱ्यांना आतून असे वाटत असते की जर आपणही असे बनलो तर?
अनेक लोकांना अश्या लोकांशी कुठल्याही कारणाखेरीज एखादवेळेस संवाद साधावा वाटतो.
22 Jun 2012 - 10:21 am | एमी
अजून थोडे...
आधीच छान दिसणार्या मुलांना क्लिनशेव्ह किँवा दाढीमिशी ऐवजी अनशेव्हड लूक छान दिसतो. छोटी छोटी दाढीमिशी एकदम सेक्सी.
मला simbi/law clg road वर छान दिसणारे मुलं मुली सिगरेट पिताना (दुरुन पहायला) खूप सेक्सी वाटतात. छान वासाची सिगरेट असती तर जवळुनही आवडले असते.
22 Jun 2012 - 10:33 am | श्रीरंग_जोशी
>>छान वासाची सिगरेट असती तर जवळुनही आवडले असते.
जसे सात्विक कोंबडी मिळाली असती तर श्रावणातही खाल्ली असती ; -).
पाहुणेतै - असं नाही वाटत का या प्रकारच्या भ्रामक कल्पनांमुळे सरळमार्गी असणारे तरुण - तरुणी नशापाण्याच्या आहारी जातात.
22 Jun 2012 - 10:46 am | एमी
:) मी फक्त मला काय सेक्सी वाटते ते सांगितलं...
मला सेक्सी वाटते म्हणुन कोणी सिगरेट पित नाही...आणि इतरांना नशेच्या आहारी गेलेत असे वाटु नये म्हणुन कोणी सिगरेट पिणे सोडत नाही...
22 Jun 2012 - 11:02 am | मृत्युन्जय
पाहुणेतै - असं नाही वाटत का........
कश्यावरुन त्या तै आहेत?
22 Jun 2012 - 11:18 am | श्रीरंग_जोशी
हि प्रतिक्रिया वाचा.
आपल्या भाषेत, क्रियापदांचे प्रत्यय बदलतात की कर्त्याच्या लिंगाप्रमाणे.
24 Jun 2012 - 8:20 am | एमी
अजुन थोडं
१. खाली लिहल्याप्रमाणे मुलीँचे collar bones, मुलांचे strong jaw line, हनुवटी वरची खळी
२. मुलांचे गळ्याचे हाड. शब्द???...(Rajit kapoor)
३. घोगरा आवाज (Arjun Rampal)
४. muscular पाठ आणि खांदे
इतर काही गुण मुलांसाठी
१. गिटार वाजवत बॉलीवूड रोमँटीक/sad गाणी म्हणणे
२. स्वयंपाक करणे आणि मुलीला आग्रहाने खाऊ घालणे
३. मुलगी काय म्हणतेय ते लक्ष देउन ऐकणे आणि समजून घेणे. (not interupting n jumping to conclusions)
४. मुलीला मनापासुन आणि खळखळुन हसवणारी मुलं (P G Wodehouse)एकदम सेक्सी. sense of humour is very tricky quality. sarcasm n personal nasty coments is NOT soh.
22 Jun 2012 - 10:28 am | प्रेरणा पित्रे
मला रहना है तेरे दिल मे मधिल मॅडी प्रचंड सेक्सी वाटतो...
22 Jun 2012 - 11:26 am | एमी
हा हा हा
मला जंगल मधला फरदिन आणि सोल्जर मधला बॉबी पण सेक्सी वाटतो...
बाकी कालच The Girl With The Dragon Tattoo वाचुन झालं...त्यामुळे सध्या मला Lisbeth प्रचंड सेक्सी वाटतेय...
26 Jun 2012 - 12:39 am | मोदक
The Peacemaker मधली निकोल किडमन. अॅग्रेशन आणि डॉमिनन्स मुळे अपील होते. (खतरा मराठी सेन्टेन्स झाले आहे हे ;-))
गिरीजा ओक (या गाण्यात) सोज्वळ दिसते. म्हणूनच सेक्सी वाटते.
ये हे प्रेम मधली प्रीती जांगीयानी...
बरीच मोठी यादी आहे.. धागा खाली गेला असे वाटले की प्रतिसाद दिला जाईल. ;-)
26 Jun 2012 - 8:15 am | एमी
हम्म्म The Peacemaker पाहीला नाही पण निकोल च्या डोळ्यांचा रंग खूपच सेक्सी आहे. आणि Sebastian Vettel, Jude Law च्या डोळ्यांचा रंग पण खूप सेक्सी.
आणि आक्रमकता, वर्चस्व पहायच म्हणलं तर मला टर्मिनेटर २ मधली Linda Hamilton खूप सेक्सी वाटली.
अजुन येउदेत सावकाश...
27 Jun 2012 - 1:07 am | मोदक
निकोलस केज.. जॉर्ज क्लूनी.. पिअर्स ब्रॉन्सन.. ही नावे अपेक्षीत होती. ;-)
27 Jun 2012 - 5:58 am | एमी
अरे हो केज आणि क्लूनी पण आवडतात की मला (एवढी मोठी यादी आहे की त्या यादीत कोण कोण आहे ते पण विसरुन जाते) ब्रॉसनन आधी एका प्रतिसादात आलाय.
हा जो क्लूनी आहे ना त्याच्याकडे पाहीलं की वाटतं 'मूर्ख/बावळट/वेँधळट सारखा काही घोळ घातला आणि हतबल होऊन त्याच्याकडे गेलो तर तो एक छानशी smile देईल डोक्यावर दोन तीनदा pat करेल आणि अगदी सहजपणे matter आपल्या हातात घेईल आणि लगेच सगळं ठीक होईलं' एकदम pleasant, approachable, dependable, mature, intelligent gentleman : - )
27 Jun 2012 - 11:48 am | मोदक
ब्रॅड पीट पण तसाच वाटत असावा...
फक्त तो क्लूनी सारखा pat करताना खट्याळपणे आणखी बरेच काहीतरी करेल असे वाटते... ;-)
La Isla Bonita वाल्या Alizee ची सर कशालाही नाही.
स्वतः Alizee... पाय संयतपणे थिरकवणारा तो ठेका.. ते गाणे व त्याचा अर्थ. जबराट आहे सगळे.
27 Jun 2012 - 4:28 pm | एमी
नाय पीटोबा नाय आवडत मला पण जोली खूप आवडते आणि तिचा पहीला नवरा पण खूप सेक्सी होता.
music आणि गाणी ची फारशी आवड/जाण नाही मला. तशी मी जरा अरसिकच आहे. पण i understand music can giv high/kick.
बादवे रेखाच्या व्हटावरचा तीळ नकलीच असला तरी जाम सेक्सी आहे.
28 Jun 2012 - 11:58 pm | मोदक
शब्द.
Last night I dreamt of San Pedro
Just like I'd never gone, I knew the song
A young girl with eyes like the desert
It all seems like yesterday, not far away
Tropical the island breeze
All of nature wild and free
This is where I long to be
La isla bonita
And when the samba played
The sun would set so high
Ring through my ears and sting my eyes
Your Spanish lullaby
I fell in love with San Pedro
Warm wind carried on the sea, he called to me
Te dijo te amo
I prayed that the days would last
They went so fast
I want to be where the sun warms the sky
When it's time for siesta you can watch them go by
Beautiful faces, no cares in this world
Where a girl loves a boy, and a boy loves a girl
Last night I dreamt of San Pedro
It all seems like yesterday, not far away
22 Jun 2012 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा
चला या सेक्सी धाग्याच्या निमित्तानी,आपण कुठे आणी कसं असायला हवं याचा अभ्यास जाहला.धन्य वाटले. ;-)
22 Jun 2012 - 11:29 am | मृगनयनी
"पूजा आणि पाहुणे" यांच्याशी सहमत!!!.... क्लीन शेव केलेल्या मुलांपेक्षा चेहर्यावर थोडीशी हिरवळ ठेवलेली मुलं जास्त सेक्सी वाटतात!!!.. नुसत्या मिशीपेक्षा थोडीशी दाढी ठेवलेली मुलं... ..मस्त वाटतात.. फक्त त्यांची हाईट ५'७" पेक्षा जास्त पाहिजे!!!...आणि "के.एस." चा कुठल्याही फ्लेवरचा स्ट्रॉन्गली मारलेला डिओ...
पुजा.... यु आर्र राईट्ट्ट्ट्ट!!... सुबोध भावे'चे साधे लूक्स पण जबराट सेक्सी वाटतात!!!... कपाळावर आलेले...त्याचे कर्ली हेअर....आईग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गग.... :) हिज सेक्सी लिप्स... उफ्फ्फ!!!.. आय गेट मॅड!!!
तसा जत्रा'तल्या "ये गं ये ये मैना" या गाण्यातल्या अन्कुश' पण रापचीक फ्लर्ट वाटतो!!.. ;) पण सुबोध'चा जवाब नै!!!!!! .... ;)
22 Jun 2012 - 9:10 pm | अर्धवटराव
बालगंधर्व बघुन आमच्या काहि हलकट मित्रांनी अश्याच काहिश्या प्रतिक्रिया दिल्या होत्या...
अर्धवटराव
23 Jun 2012 - 1:51 pm | मृगनयनी
अ.रा. ... =)) =)) बालगन्धर्व'मध्ये सुबोध जरी स्त्री-वेषात असला तरी त्याचं पौरुषत्व जाणवत राहतं!!.. त्याचं मार्दव... आपल्याला खुणावत राहतं!!!!! :)
'परवरदीगार' गाण्यातले त्याचे लूक्स पाहून क्षणभर "गोहरबाई"चा हेवा वाटला.. ;)
याउलट नटरन्ग'मध्ला अ.कु. प्युअर नाच्या वाटतो... अगदी 'हाईट बॉडी' भारी असूनही!!!
22 Jun 2012 - 11:25 pm | जेनी...
आइला सुब्याचे ओठ......
थोडं वर्ण्न करु का?? ;)
त्याच्या खालच्या ओठाचा मधला भाग दुभागल्या सारखा आहे..
खालच्या वरच्या ओठांच्या कडा ओठांच्या नैसर्गीक रंगापेक्षा
साधारण गर्द रंगाच्या ...इतक्या उठावदार ... नशा आणणार्या
गोड गोड वाटतात..... :)
हसल्यानंतर ब्रॉड होणारे त्याचे ओठ
म्हणजे वादळात हरवलेली अधांतरी बोट
मंद स्मित करणारे त्याचे सेक्सी ओठ
म्हणजे मिठात विरघळणार्या ट्किलाचे घोट :D
23 Jun 2012 - 2:05 am | अर्धवटराव
पण मिपाचा स्त्रि वर्ग रंगात आला खरा.
बायकांना पेशन्स फार हे पुन्हा एकदा सिद्ध झालं :)
अर्धवटराव
23 Jun 2012 - 11:23 am | मृगनयनी
पूsssssss जा ssssssss ... बास्स्स गं बाई बास्स.... ई अम जुस्त उनब्ले तो चोन्त्रोल म्य्सेल्फ!!!...;)
____/\____ ;) या... बट इट्स ट्रु.. दॅट हिज लिप्स आर सिम्प्ली किसेबल...... ;) ;) ;)
रानभूल'मधला बर्यापैकी व्हिमझीकल सुभ्या... जबराट रान्टी आणि सेक्सी वाटतो!... अश्या माणसाकडून 'टीझ' करून घेण्यातही वेगळीच नशा असते... आय जस्ट लाईक इट!!!!! :)
23 Jun 2012 - 12:06 pm | एमी
खि खि खि...मला गोल गोबरा चेहरा (प्रिती झिंटा, सुबोध) किँवा चौकोनी चपटा चेहरा (ऐश, दिया, जॉय मुखर्जी) नाय बा सेक्सी वाटत...मुलीँचा Oval आणि मुलांचा Rectangular चेहरा सेक्सी वाटतो. मस्त strong jaw line पाहीजे मुलांना. आणि गालांपेक्शा हनुवटी वरची खळी (Nawazuddin siddiqui) जास्त सेक्सी वाटते. आणि मुलीँचे collar bones पण सेक्सी वाटतात.
23 Jun 2012 - 1:47 pm | मृगनयनी
ह्म्म्म.. मला पुर्वी जॉन'च्या गालावरची खळी जाम आवडायची... पण 'दोस्ताना' पाहिल्यापासून जॉन मला 'पराया' झालाय..... ;) ;)
तसा तुमच्या म्हणण्याप्रमाणे अक्षयकुमारचा चेहरा रेक्टॅन्ग्युलर आहे.. पण त्याच्यात कुठलंच सेक्स अपील वाटत नाही.. हां.. त्याच्या काही जुन्या पिक्चरामध्ये तो हॅन्ड्सम वाटायचा... पण सेक्सी नै वाटला कधी... उलट मला कधी कधी त्याच्याबरोबर असलेला 'सुनील शेट्टी' सेक्सी वाटतो... ;) एकदम चिम्पांझी लूक्स... एकदम नॅचरल!!!! हि इज ऑल्सो हॅविन्ग रेक्टॅन्ग्युलर फेस..... सुनील शेट्टी इज प्युअर वाईल्ड!... त्याचे बारीक डोळे पाहिले.. की असं वाटतं.. की हा इतका भुकेला आहे.. की याला कुणीही चालेल!! =)) =))
+++++ सहमत!!!! हनुवटीवरची खळी... आणि गालावर किन्वा हनुवटीवर एखादे 'शौर्यनिशाण' असेल.. तर लई भारी!!!!... (शौर्यनिशाण म्हणजे एखादी जुनी कापल्याची किन्वा एखाद्या जखमेची खूण.. लहानपणापासून जपलेली.. आणि तीही चेहर्यावरच्या सेक्सी हिरवळीत लपलेली.. ;) ) आणि गुलाबी ओठ ..आईश्शपथ!!!... हसताना अशी मुलं खरंच मारून टाकतात मुलींना..... ;) ;)
एकदम रॉ लूक्स्स...... :)
आणि मुलींचे कॉलर बोन्स' माईट बी आवडत असतील मुलांना .. पण त्या मुली एकदम किडकिडीत वगैरे नसाव्यात... नाहीतर त्या मुली कुपोषित वाटतात... :|
23 Jun 2012 - 2:52 pm | एमी
हम्म...
अक्षय, अर्जुन, जॉन, अभय देवल मला नेहमीच सेक्सी वाटतात. आणि सुधांशु पांडे, रोनीत रॉय, रजीत कपूर...पिअर्स ब्रोसनन, रॉबर्ट डोउने Jr, बीली झेन...हेन्सी क्रोनिए, केनेडी Jr, बेकहम...मराठीत रविँद्र महाजनी, रमेश देव...लय मोठी यादी हाय...
हा हा सुनिल शेट्टी खरच चिँपाझि दिसतो, मला नाय आवडत...शेवटी प्रत्येकाची आवड वेगळी...हा पण शौर्यखूण चा मुद्दा मान्य :-)
24 Jun 2012 - 12:17 am | जेनी...
शौर्यखुनावर एकदम फीदा....
त्याहीपेक्षा मानेच्या शीरेवर असणारा तीळ ... अगदी जीव ओवाळुन टाकावासा
वाटावा इतका मादक...मला तो किसेबल वाटतो :)
थोडी उंच असणारी माण .... तीही अगदी भरलेली... त्यावर हलक्याशा
ब्राव्न ब्लॅक रंगाचा अगदी हाताच्या अंतरावरुन दीसणारा तीळ ...
जशी जशी मान वळेल तसा तो ही हलतो .... बोलतोच म्हनाना;)
जीवंत वाटतो ......
23 Jun 2012 - 5:25 pm | जेनी...
येस मुलींचे कॉलरबोन सेक्सी वाटतात
मला क्रीकेटपट्टु युवराज त्याचे अॅटिट्युड्स
जाम सेक्सी वाटतात , अभिशेक बच्चनची
दाढी सेक्सी वाटते,रीचर्ड चे डोळे सेक्सी वाटतात...
..... बाकि अजुन खुप आहे , ते नंतर
हळुहळु दील के राज खोलने मे मज्जा आती ह्ये ;)
24 Jun 2012 - 8:12 am | एमी
हम्म. अजुन येउदेत सावकाश...
मुलांच तेच ते तेच ते आणि तेच ते चालुय... बोअरिंग...yawn
बाकी पूजा आणि मृगनयनी तुम्हा दोघीना माझ्याकडून कोणताही धोका/स्पर्धा नाही...आपली आवड वेगवेगळी आहे wink
24 Jun 2012 - 12:25 pm | मृगनयनी
पा...... =)) =)) सहमत गं.... मुलांचे तेच ते चालूये.. ( बहुतेक ते आपल्या सौभाग्यवतींना घाबरत असावेत!!! ;) ;) ;) ) बाकी आपली आवड वेगळी आहे...
ता.क.- सुनील शेट्टी मला कितीही सेक्सी वाटत असला.. तरी मी नेहमीच त्याची तुलना चिम्पान्झी'शी करत आलीये...
पू........ तुला आणि मला सुभ्या.. कितीही सेक्सी वाटत असला.. तरी सुबोध त्याच्या मन्जिरीशी प्रामाणिक आहे... त्यामुळे आपण त्याचे फक्त वर्णनच करू शकतो... ;) ;)
24 Jun 2012 - 6:00 pm | जेनी...
वहिच तो
मला प्रामाणिक मुलं लै सेक्सी वाटता. ;)
25 Jun 2012 - 10:30 pm | एक
गप्पा मस्तपैकी "एंजॉय" करणारी स्मायली आहे का कुठे..
पूजा, मॄगनयनी, लिमा, प्लिज..कंटिन्यु..
-(डोळे मिटले असले तरी कान सताड उघडे ठेवून 'नोट्स' घेणारा) एक.
25 Jun 2012 - 11:03 pm | अत्रुप्त आत्मा
ही घ्या...
26 Jun 2012 - 1:02 am | अर्धवटराव
>>... मुलांचे तेच ते चालूये..
--मिपा च्या एकंदर अनुभवावरुन मला खात्री आहे कि मुलांनी काडि लावण्याचे काम अगदी व्यवस्थीत केलय.. आणि आता ते दुरुन गम्मत बघताहेत :P
अर्धवटराव
26 Jun 2012 - 7:20 am | एमी
: - ) येस आय एम शुअर की मुलांच तेच ते चालुय...
एक तर त्यांची सेक्सी काय वाटत ही वर्णनं फारच जुनाट आणि बोअरिंग आहेत (त्यातल्या त्यात सुरुवातीचे काही प्रतिसाद आणि चित्रगुप्त यांचा चित्र असलेला प्रतिसाद इंटरेस्टिँग होता पण त्यावर लगेच हल्लाबोल करुन पुन्हा तेच ते चालु झालं)...
आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्याच द्रुष्टीने सेक्सी नाहीय हे लक्षात आल्याने शांत बसलेत...
आणि तिसरं म्हणजे आपला पराभव झालाय हे मान्य करण्याऐवजी आपणच काडी लावलीय असं प्रिटेन्ड करतायत... ; - )
26 Jun 2012 - 8:51 am | अर्धवटराव
कसय ना, स्त्रिवर्गाला नवं काहि सुचलं तर पाहिजे ना सेक्सीपण दाखवायला... म्हणुन आम्हाला जुन्या बोअरींग कल्पनेतुनच काम भागवावं लागतं :P
दुसरं असं कि आम्हाला कुठं फुलासारखं सुंदर, सेक्सी वगैरे दिसायचय... सुंदर सुगंधी मकरंद चाखायला मिळावा बस्स.. एव्हढी माफक अपेक्षा ;) आम्हि आपले काळेकुळकुळीत भ्रमरच बरे :D
आणि पराभवाचं म्हणाल... तर असले पराभव ज्या पुरुषाला नाहि लाभले तो करंटाच म्हणावा. शराब चाखावी ति मदहोशी करताच... उगा आपलं रांजणं रिचवुन देखील मी जागचा हालत नाहि वगैरे विजयीभाव म्हणजे तद्दन मुर्खपणा :)
हा धागा असाच उत्तरोत्तर १००० प्रतिसादांपर्यंत रंगावा आणि आम्हाला दिलखेचक जानलेवा चितपट करणारे नखरे वाचायला मिळावे हि इच्छा :)
अर्धवटराव
26 Jun 2012 - 9:09 am | चैतन्य दीक्षित
सहमत आहे :)
26 Jun 2012 - 9:59 am | एमी
हे हे हे..
पण ते सीता, शकुंतला, पार्वती आणि वाल्मिकी, कालिदास यांचा आधार घेणं म्हणजे फार फार बोअर...तुम्हाला काय वाटतय ते तुमच्या भाषेत मनापासून सांगा ना...मला तर्रि आणि पेठकर यांचे सुरुवातीचे प्रतिसाद आवडले...
आणि अगदी Fifty Shades Triology नाही तरी Playboy पर्यँत तरी या...अजुनही कामसुत्र आणि खजुराहो मधेच अडकलाय...जुनीच वाइन असली तरी बाटली तरी नविन आणा...
26 Jun 2012 - 10:12 am | जेनी...
कमाल वाटते मिपावर एवढे पूरुष आहेत ..
पण तेच तेच प्रतिसाद ,त्याच त्याच काळ्याकुळकुळीत भ्रमराशीच स्वतहाची तुलना ..
बाकि कै नै जमत तर नीदान लिखान तरी सेक्सी करा
कुणा कुणाच लिहिनही जबर्या सेक्सी वाटतं ...
प्रेमपत्र
जाम सेक्सी वाटतं त्यात हटकुन केलेले काहि शब्दांचे वापर ....
म्हणजे ..चढता श्वास ,धडधडणारं काळीज , ओठानी टिपावासा वाटनारा शहारा , अबोल वेदनेची जानीव ..
मिठितला स्पर्श ,आवेग ,संवेदना , धुंद ,मंद ,मदमस्त ,मोहक , मदन .बरेच ..
जस की ...
"
थंड गार वातावरणातही वाफाळलेले श्वास ..तुझ्या उबदार मिठीवर ..भरदार छातीवर माझ्या श्वासांचे पाश ......मिटलेल्या पापण्यांवर पडणारा हलकासा स्नोव ....तू तुझ्या ओठांनी उचलतोयस ....घट्ट बांधून ठेवलयस तू स्वतःला माझ्यासोबत ..जणू एकही क्षण तुला मिस करायचा नाहीय ..आणि त्या क्षणांना मी माझ्या श्वासात भरून घेण्याची घाई करतेय ..ओठांवर रेंगाळलेले तुझे ओठ ..त्याना संपूर्णपणे आपलसं करण्याचा प्रयत्न करतेय .तुझ्या केसात मी इतकी रमलेय कि खेळता खेळता बरीच पुढे गेली ..तुझे श्वास सर्वांगावर ..शहार्यांची फुंकर घालून सर्वांगाला स्पर्शानं भिजवत होते .....आणि मी त्यात मनसोक्त भिजत होती .अगदी धुंद होवून ."
असच काहि वाचलं तरी लिहिणारी व्यक्ती काय सेक्सी असेल अस आपलं उगा वाटुन जातं ;)
26 Jun 2012 - 9:40 pm | अर्धवटराव
अहो त्याचीच तर वानवा आहे. चावडीवर धुंद गप्पागोष्टी करणारी प्रतिभा नेमकं कीबोर्ड हाती घेतल्यावर कुठे तोंड काळं करते कोण जाणे. तसं सेक्सी गोष्टींची फेरिस्त पार काश्मिर ते कन्याकुमारी जायची... उदाहरण द्यायचं झालं तर...
मुक्करदर का सिकंदर मधली आंघोळीची तयारी करुन "वफा जो ना कि तो" गाणं म्हणणार्या रेखाचा वस्त्रसंभार, १९४२ अ लव्ह स्टोरी मधे डोळे मिटुन चुंबन दृष्यात विरघळलेली मनिषा कोईरालाची तिरपी गोरीपान मान ... बरं नको ते व्हर्च्युअल वर्ल्ड... पहिलाच प्रोजेक्ट स्क्रॅप झाल्यावर थोड्याश्या घाबरलेल्या-गोंधळलेल्या फ्रेशर मुलींचे चेहेरे, कामाचा प्रचंड ताण असताना रात्री २ वाजता कॉफीचा मग टेबलवर ठेऊन बॉडी स्ट्रेच करत डोकं मागे रेलुन डोळे मिटुन शांतपणे विचार करणार्या आमच्या ऑफीसच्या गौरांगनांच्या पापण्या , भरपुर एरोबीक्स केल्यानंतर घामाने भिजलेले, कमनीय शरिराला चिकटलेले वर्काऊट टॉप्स, वातानुकुलीत जीम मध्ये अश्या घामेजलेल्या ताटव्यांमधुन फिरताना जाणवणारा एकप्रकारचा उष्मा, सरदारजींचे जोक्स ऐकुन झाल्यावर सगळा ग्रुप हसत असताना त्यात खरच हसण्यासारखं काय होतं म्हणुन खाजगीत विचारणार्या नुकत्याच मोठ्या झालेल्या आमच्या मैत्रीणींचे बालीश प्रश्न, कुणी रस्त्यावर छेडखानी केली तर त्याची कॉलर धरणार्या मा*, भे* वगैरे शिव्या देणारे ओठ, रविवारी ब्युटी पार्लरमध्ये भरपूर खर्च केल्याची साक्ष देणारे- स्लिव्हलेस आणि थ्रीफोर्थ मधुन अगदी कॉन्फीडण्ट्ली प्रदर्शीत होणारे सुंदर सुंदर हात-पाय. प्रत्येक एकतर्फी-दुतर्फी प्रेमभंगानंतर "आता पुन्हा नाहि" अशी १ महिना मुश्किलसे टिकणार्या प्रतिज्ञेतील वज्रनिर्धार दाखवणारा नाकावर वर-खाली होणारा नाजुक फ्रेमचा चश्मा...
जाउ दे. लिस्ट खरच खुप लंबीचौडी आहे... पण प्रतिभेतील कद्रुपणा नडतो ना.
अर्धवटराव
26 Jun 2012 - 10:05 pm | जेनी...
ये हुई ना बात........!!
हेच तर अपेक्षित होतं.
स्वतहाच्या शैलीत लिहिलयत , सॉलिड एकदम
जवळच्या वातावरणात खुप काही सेक्सी असतं
बस्स्स वो नजर होनी चैये ;)
26 Jun 2012 - 10:47 pm | अर्धवटराव
>>जवळच्या वातावरणात खुप काही सेक्सी असतं बस्स्स वो नजर होनी चैये
-- येप्स. १००% सहमत
अर्धवटराव
26 Jun 2012 - 10:57 pm | मृगनयनी
सहमत गं!.. पूsssssssss
ते रन्गीला'तलं "ऐ रामा ये क्या हुआ.. क्यों ऐसे हमे सताने लगे" हे गाणं प्रवासात रात्री ऐकायचं.. एखादी इनोव्हा गाडी मस्त वरन्धा घाटातून किन्वा तत्सम घाटातून सफाईदार पणे वळणं घेत घेत जाते आहे... आणि मस्त डीम लाईट मध्ये आपण तिच्यात बसून हे गाणं ऐकतोये.... आईशपथ्थ्थ्त!!!!!!!
अशक्य आनि अवर्णनीय!!!...
किन्वा मग एखाद्या कोकणातल्या सी-बीचवर मस्त लाटांशी खेळून सात-साडेसातच्या नन्तर जवळपासच्या कौलारू घरात मस्त गरम पाण्याने अन्घोळ करून.. नन्तर थोडेसे ओलेसे वाटत असताना... ओल्या केसांच्या बटा सावरताना...मस्त एखादा सेक्सी परफ्युम स्लीवलेस कुडत्यावर मारून ....घरी परतताना हे गाणं ऐकणं.. म्हणजे पर्वणी असते... .. अश्या वेळेस गाडीतल्या निळसर प्रकाशात आपल्या प्राणप्रियाच्या गरम उबदार मस्क्युलर दन्डाचा आपल्याला नकळत स्पर्श होणं. किन्वा मग..उगीचच काच खाली किन्वा वर घेण्याच्या निमित्ताने त्याचं आपल्या अन्गावर नकळत रेलणं...आणि.. तो काच वरखाली करण्याचा निष्फळ प्रयत्न करताना. वर झालेल्या त्याच्या हातांमुळे..त्याच्या ताज्या डिओ'चा वास आपल्या नाकात भरून घेणं...म्हणजे दुधात साखर..!!!..
आणि तो निळसर प्रकाश थोड्या वेळासाठी ड्रायव्हरने बन्द केल्यानन्तर त्या दन्डासकट त्याच्या हाताचा विळखा आपल्याभोवती पडणं. आणि आपल्या प्राणप्रियाचे गरम श्वास आपल्या परफ्युमशी स्पर्धा करणं...आपल्या लिप्स्टीकचे रन्ग त्याच्या ओठात मिसळून जाणं... ... म्हणजे आपणच साखर होऊन दुधात विरघळून गेल्यासारखे वाटते...
बस्स... हेच्च गाणं.. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते...... :)
तात्पर्यः- रन्गीला'तलं.. हे गाणं ऐकणं.. म्हणजे..... सेक्सी होणं!!!..... ;)
26 Jun 2012 - 11:34 pm | बॅटमॅन
लैच रंगात आलात ;) मस्त प्रतिसाद :)
27 Jun 2012 - 12:05 am | जेनी...
आयीगं ...... नैनी मार डाला........!!
दोन मिनटांसाठी तर मी खरच गाडीतल्या निळ्या प्रकशात विहार करुन आली
;)
मस्क्युलर दंडाचा सहज म्ह्नुन दाखवलेला पण ' सहज ' नसलेला
स्पर्श..... बस मध्ये एखादा स्मार्ट देखना भरदार छातीचा तरुण
हेरुन त्याच्याशी त्याच्याहि नकळत नजरेचा खेळ खेळण ....
आणी बस मधुन उतरताना ( नशिबाने साथ दिलि आणि एकाच स्टॉपवर उतरलो तर )
मुद्दाम्हुन त्याच्यापूढे अॅटीट्युड दाखवत चेहेर्यावर असेल नसेल तितका कॉन्फिडंस
आणुन त्याच्या , आपल्यावर खिळलेल्या नजरेला आनखी छेडण ...
काय सेक्सी सीन असतो तो .... धम्माल ;)
27 Jun 2012 - 12:07 pm | मृगनयनी
आआअईईईग्ग्ग्ग्ग!!!!!!!!... पूजा'जी.... तुमचे चरणकमल कुठेत? ;) =))
फ्लर्टिन्ग'ची पण हद्द असते यार! ;) ;) ;)
असो.. पण कधीतरी असा अनुभव पण मजा देऊन जातो.. फक्त अश्या वेळी खेळवणारे आपण पाहिजे.. आणि आपल्याला पाहिजे तसा खेळणारा 'तो' पाहिजे... आणि हा बसप्रवास किमान ४ तासाचा तरी हवा..... नैतर तितकीशी मजा नाही येत! ;) ;)
28 Jun 2012 - 12:35 am | जेनी...
नैनी एकदा असा पूणे मुंबई प्रवास केला होता " नैन लड जै के " वाला
पण बसमधुन उतरल्यावर भारी पडला ...
:(
त्यापेक्षा अर्धा ते पाऊन तासाची मजा बास होते ;)
त्यातच इतके तीर मारायचे की त्याचे निशाण नीदान त्याला आठवडाभर
तरी मिटवता येणार नाहित ;)
एकदा तरी मित्रांजवळ बोलताना " यार .. क्या लडकी थी ! "
असा उल्लेख आलाच पाहिजे ... :P
असं नजरेनं घायाळ करुन सोडण आणि त्यावर पून्हा पून्हा आपल्या
फीतुर डोळ्यानी जिवघेनं वार करण .. जोडीला खळखळतं हसण ठेवायचं
ओठांवर ... बास्स्स की पक्षी जाळ्यात.. ;)
27 Jun 2012 - 11:32 pm | एक
राहून राहून वाटतं आहे की तुझा असा कधी विमानात प्रवास झाला आहे का?
माझा झाला आहे.. २४ तासाचा प्रवास फारच लवकर संपल्यासारखा वाटला होता. ;)
28 Jun 2012 - 12:38 am | जेनी...
विमान प्रवास ?? :-o
नको आठवण करुन देऊस त्या सोनेरी क्षणांची :(
;)
27 Jun 2012 - 12:23 am | एमी
हाय रामा
: - P काय लिहलय!!! जबर्याच !!!
26 Jun 2012 - 10:30 pm | एमी
: - ) वाह! छान प्रतिसाद!
तुम्ही अगदी सुरुवातीचा प्रतिसाद पण छान दिलेला. हा त्याचाच extension : - )
26 Jun 2012 - 10:26 pm | एक
खरंतर लिस्ट खूप मोठ्ठी आहे पण ही थोडी उदाहरणार्थ..
नजरेला नजर मिळवणारी स्त्री.. खरंतर नजरेतून स्त्री बरच काही बोलू शकते पण ते तेव्हढावेळ वाचत बसायला मुलात गट्स असावे लागतात.
"सहज केला" असं दाखवून केलेला स्पर्श. अनुभवावरून असं लक्षात आलं कि हे "सहज" वगैरे काही नसतं . इट्स स्ट्रॅटेजिक. आम्हाला कळतं बट वी प्ले अलाँग. ;)
भर पार्टीत कोणाच्याही लक्षात न येता टेबलाखाली सुरू केलेला फूट-प्ले ;) अभिनयाची कसोटी लागते ती इथे.
आपण सुंदर दिसत आहोत आणि लोकं वेडी होत आहेत हे माहित असलेली पण ते लपवण्याचा प्रयत्न करणारी.
परफ्युम चा वापर कुठे आणि कसा वापरावा हे माहित असलेली. एकाच परफ्यूम चा वास वेगळ्या ठिकाणी वेगळा येतो. त्याचा मादकपणा मनगट, मानेचा कानाजवळचा भाग, इ. इ..... ;) असा वाढत जातो.
रोमान्स मधे पुरुषाकडून तिला काय हवय हे स्प्ष्ट सांगू शकणारी (वसूल करून घेणारी असेल तर उत्तमच) .थोडक्यात लीड घेणारी.
मेकप करणारी फारच नेमकं म्हणजे लिपस्टिक लावत असतानाची. बादवे, तसा मी थोडा भाग्यवंत. नाटकात कामं करत असताना काही सुंदर सुंदर मुलींनी माझापण मेकप केला आहे. मला लिपस्टिक (स्टेज मेकपला लावावी लागते. शंका नको.) लावताना त्या स्वःता का तोंड ओपन करत होत्या कळालं नाही. पण नजारा अच्छा था! सो नो कम्प्लेंटस!
मला स्वःत ला माझ्यापेक्षा उंच असलेल्या मुली सुद्धा आवडतात. त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स असतो.
सध्या इतकच पुरे..
-एक
26 Jun 2012 - 10:57 pm | जेनी...
आज काय खरं नाय ...
कुठे होता रे एवढा वेळ???
कसले भन्नाट भेद खोलताय.... मस्त!!
आत्ताशी कुठे हा धागा रंगात आलाय अस मी म्हणेन ;)
मुलांचा अजुन एक प्लस पॉइंट ... पूढच्या केसांचे नॅच्युरली पडनारे
फ्लिक्स ...
बोलता बोलता केसात बोटं फिरवायची स्टाइल ....खालि बघताना
अगदी नजरेकडे झुकणारे अलगद रस्ता बदलुन ट्र्न घ्यावा अश्या
तोर्यात डोळ्यावर येणारे केस ..... खल्लास ;)
26 Jun 2012 - 11:28 pm | एक
आम्ही जंटलमन ना त्यामुळे 'सगळ्याच' ठिकाणी लेडीज फर्स्ट हे तत्त्व पाळतो. ;) म्हणून इतका वेळ बोलत नव्हतो.
तसही हुकुमी पत्त्यांची हळूहळू उतारी करण्यातच मजा आहे की नाही?
तो केसांचा विषय मात्र उगाच काढलास. :( आमचे कुरळे केस तू म्हणतेस तसं वागत नाहीत ना. :(
बादवे.. माझ्या वरच्या उदा मधे एक राहिलं. : हाय हिल्स घालणार्या मुली..चालताना अप्रतीम तर दिसतातच पण खुर्ची वर बसल्यावर , एक पाय दुसर्या पायावर टाकून जेव्हा पायाच्या बोटांवर तो सँडल चाळा म्हणून खेळवतात.. तो प्रकार जास्त जिवघेणा असतो.
त्यात स्कर्ट आणि स्टॉकिंग्ज असतील तर जीव तिथल्यातिथे गेलाच!
27 Jun 2012 - 12:29 am | जेनी...
हेहेहे .... कुरळ्या केसांची पण रंगाने सावळी त्यात चौकोणी चेहेरा...
ओठांच्या जराशी खाली ओठाना लागुनच एखादा जीवघेना तीळ ...
नजर करडी ... पण त्यात एक अनोळखी भाव जो फक्त काहि ठिकाणीच
स्वताहाच अस्तित्व दाखवतो अशी नजरच इतकी आकर्षक आणि मादक
वाट्ते की अजुन काय बोलु यार बास्स्स :)
( फक्त एक शंका वाट्ते की त्या कुरळ्या केसात लाडेलाडे घुसवलेली बोटं
सहिसलामत बाहेर येत असतिल काय ?? :-o ) :D
27 Jun 2012 - 12:47 am | एक
बोटं घुसवणार्यांना बाहेर काढण्याची घाई नसते. ;) आणि मला तर अजिबातच नाही. "हे शिर दिले तुझ्या हाती..." :)
27 Jun 2012 - 4:41 am | जेनी...
>>>> " हे शिर दिले तुझ्या हाती "
अगदी पापण्या झुकवुन , लाजुन , ओठावर हलकसं स्मित आनुन
मान तिरपी करुन , थोडं पाठमोरं वळून , वितभर अंतरावरुन'च' ऐकु
जाईल असं " इश्श्श्य ...!! " :P
27 Jun 2012 - 11:28 pm | एक
आता यावर काही लेखी प्रतिसाद
देता येणार नाही. :P
शब्दच खुंटले.
27 Jun 2012 - 6:08 am | एमी
हा हा हा
आत्ताशी कुठे हा धागा रंगात आलाय...
या वाक्याला +१
26 Jun 2012 - 11:38 am | चैतन्य दीक्षित
आधार घेतलेला नसून-
स्त्रियांबद्दल काय सेक्सी वाटतं उदा. बांधा, रंग, केस, उन्नत अंगे इ. हेही सांगायचं आहे
आणि त्याचं वर्णन करताना वापरलेली भाषाही कशी सेक्सी आहे हे सांगायचं आहे म्हणून काही श्लोक उद्धृत केलेत इतकंच.
आणि त्याला बोअर म्हणत असाल तर काय बोलणार आम्ही?
कामसूत्र आणि खजुराहो मधे अडकलोय कारण ते आहेच तसं भुरळ घालणारं.
निसर्गानं स्त्रियांना याबाबतीत जास्त इंटरेस्ट दिला नसेल तर तो पुरुषांचा दोष कसा?
26 Jun 2012 - 8:27 pm | एमी
Nothing personal : - )
माझा आणि संस्कृत चा बालपणापासून ३६ चा आकडा आहे म्हणून मला तसं वाटलं असेल...
पण खरच दुसर्याच्या बोजड भाषेत लिहण्यापेक्षा स्वतःच्या ओबडधोबड भाषेत लिहलेलं कधीही चांगलं...आणि max मुलं तिच ती सेक्सी अंग सांगतायत...त्यात वेगळं काय...अगदी पूजा ने वर लिहलय तसं एकदम सेक्सी आणि विशेषणं वापरा नाय म्हणत पण जरा समजेल अशा भाषेत आणि वेगळं काही तरी लिहा एवढच सांगतेय...
26 Jun 2012 - 10:22 am | श्रीरंग_जोशी
>> आणि दुसरं म्हणजे आपण कोणत्याच द्रुष्टीने सेक्सी नाहीय हे लक्षात आल्याने शांत बसलेत...
दया दया...
22 Jun 2012 - 12:45 pm | कवितानागेश
२ दिवस विचार करतेय, करतेय,....
पण मला न आवडणार्या गोष्टीच जास्त आहेत.
डोक्यात जाणारी माणसे देखिल खूप आहेत. सेलेब्रिटी म्हणवणार्यांमध्ये शून्य इंट्रेस्ट आहे.
स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात.
चित्रे निर्जीव वाटतात. गाणे ऐकले की मी झोपून जाते.
फक्त धो धो पाउस आवडतो. पण तेंव्हा असे सेक्सी वगरे काही वाटत नाही.
वास्तविक नक्की काय वाटते ते सांगता येणार नाही. गारगार वाटते फक्त. बाकी काहीच होत नाही.
मी आजारी तर नाही ना?
22 Jun 2012 - 4:40 pm | चैतन्य दीक्षित
>स्मार्ट लोक मला आगाउ वाटतात, गोड माणसे मंद वाटतात.
यावरून नीतिशतकातला एक श्लोक आठवला.
नोकराच्या बाबतीत-
जर तो शांत असेल तर त्याला भित्रा म्हणतात,
बोलत असेल तर फार तोंडाळ आहे म्हणतात
समोर उभा राहात असेल (मान वर करून) तर 'मॅनरलेस' म्हणतात
लांब लांब राहात असेल तर त्याच्यात प्रगल्भता नाही असे म्हणतात..
थोडक्यात- सेवाधर्म (एखाद्याची त्याच्या मनाप्रमाणे चाकरी करणं) हे योग्यालाही कठीण असं काम आहे.
22 Jun 2012 - 7:57 pm | कवितानागेश
पण मी कुणालाच नोकर वगरै समजत नाही. किंवा हीन पण समजत नाही.
फक्त लांब ठेवते! :)
22 Jun 2012 - 8:11 pm | प्रभाकर पेठकर
मी तर काही जणांना, ह्याही पुढे जाऊन, मोलकरणीला 'जवळ' करताना पाहिलं आहे.
22 Jun 2012 - 8:54 pm | jaypal
पुष्पक सिनेमातील मोलकरीण आठवली हो!
22 Jun 2012 - 9:07 pm | अर्धवटराव
सिंहासन सिनेमातली देखील.
अर्धवटराव
22 Jun 2012 - 10:11 pm | दादा कोंडके
ह पण! :)
23 Jun 2012 - 2:33 am | प्रभाकर पेठकर
एक से काम चलता है, पर दो की जरूरत है.
हे म्हणजे जरा 'भारी'च आहे.
24 Jun 2012 - 12:19 am | दादा कोंडके
भावना पोहोचल्या एव्हडच म्हणतो.
22 Jun 2012 - 9:04 pm | अर्धवटराव
तुला बोके सेक्सी वाटत असणार ना ;)
अर्धवटराव
22 Jun 2012 - 9:25 pm | शुचि
माऊ =)) =))
22 Jun 2012 - 10:38 pm | जेनी...
हो तु आजारी आहेस माऊ :(
स्मार्ट डॉक्टर ला दाखव बै , मंद डॉक्टराकडे अजीबात जाऊ
नको
:P
22 Jun 2012 - 12:53 pm | गणपा
खोटं कशाला बोला? मला तर साडी नेसलेली बायको खुप सेक्सी वाटते बॉ. :)
22 Jun 2012 - 1:26 pm | नाना चेंगट
कुणाची रे मेल्या?
22 Jun 2012 - 1:32 pm | गणपा
ज्याची त्याची जाण...... वैग्रे वैग्रे .. ;)
22 Jun 2012 - 1:34 pm | नाना चेंगट
अच्छा ! ज्याची त्याची बायको जाणू असे म्हणतो का?
22 Jun 2012 - 1:43 pm | गणपा
आधी स्वतःची तर जाणुन घे. (त्यासाठी आधी लग्न कर मेल्या.. चालला गगेच दुसर्यांच्या ताटात डोकावायला.)
;)
22 Jun 2012 - 1:46 pm | नाना चेंगट
खिक ! तसेही जाणून घेता येत असतांना केवळ त्यासाठी बायको करायची गरज काय? :?
22 Jun 2012 - 3:11 pm | परिकथेतील राजकुमार
लोकाच्या पुस्तकाने आणि नोटसने अभ्यास उलट अधिक चांगला होतो हा अनुभव आहे.
22 Jun 2012 - 9:06 pm | अर्धवटराव
ते "मंदाकिनी" वरुन कळलच होतं... बाय द वे, मंदाकिनीचं पुढे काय झालं ?
अर्धवटराव
22 Jun 2012 - 7:48 pm | बॅटमॅन
बाकी या निमित्ताने "कर्मसूत्रां" चे विवेचन कसे काय बाहेर नै आले काय माहिती ;)
(बुचकळ्यात पडलेला) बॅटमॅन.
22 Jun 2012 - 8:01 pm | कवितानागेश
:)
भ्यास वाढवला नाही इथे कुणी. दुसरं काय?
कुणाला काही माहित नाही हो कामसुत्रांबद्दल.
22 Jun 2012 - 8:19 pm | बॅटमॅन
असेच म्हणतो. नपेक्षा गेलाबाजार सचित्र नाही पण चित्रविचित्र वर्णने वाचायला तरी मिळाली असती ;)
22 Jun 2012 - 8:24 pm | पैसा
निख्या, माझं लक्ष आहे बरं का!
22 Jun 2012 - 8:31 pm | बॅटमॅन
हॅहॅहॅहॅ कस्चं कस्चं ;)
28 Jun 2012 - 11:47 pm | मोदक
चित्रे... वर्णन.. व्यनीत मिळाले का रे? ;-)
25 Jun 2012 - 9:59 am | चैतन्य दीक्षित
एकदा खजुराहोला भेट दिली की सगळं काही कळेल ;)
इतकी प्रमाणबद्ध शिल्पं कोरणार्या कारागिरांचा शरीरशास्त्राचा आणि कामशास्त्राचाही गाढा अभ्यास असणार हे पटतेच ती शिल्पे पाहिल्यावर.
तिथे एक शिल्प आहे, स्त्री स्वतःची वस्त्रं उतरवीत आहे आणि तिच्या मांडीवर एक विंचू आहे (विंचू म्हणे तिच्या 'कामोत्तेजनेचं प्रतीक' आहे). ते शिल्प आणि इतरही अनेक (इथे अवर्णनीय) अशी शिल्पे जाम सेक्सी आहेत.
26 Jun 2012 - 1:01 pm | वपाडाव
दिक्षित साहेब, माझी रास वृष्चिक आहे. तिचा काही असर होतो का यावर...
काही माहिती असल्यास जरूर कळवा...
26 Jun 2012 - 2:25 pm | प्रभाकर पेठकर
त्यांचा 'वृश्चिक दंश' जहरी असावा. जो 'इश्काची इंगळी डसली ग बाई मला....' असे बोंबलायला स्त्री जातीला भाग पाडत असावा.
22 Jun 2012 - 11:04 pm | अन्नू
इतक्या दिवसांतून इथं आलो आणि....
काय विषय! सेक्... श्या...
आण्णा महाराज!!!! ;)
23 Jun 2012 - 11:41 am | चित्रगुप्त
एवढ्या दीडशेच्या वर प्रतिसादात आपला साधा उल्लेखही नाही, हे बघून त्या वयोवृद्ध, ह.भ.प. महर्षींच्या आणि त्यांच्या आश्रमातील त्या आश्रम-हरिणींच्या मनाला किती वेदना होतील, या विचाराने आमचे डोळे पाणावले आहेत.
23 Jun 2012 - 12:01 pm | श्रीरंग_जोशी
गेल्या वर्षी त्यांची वाद्गत्त वधू पळून गेल्यामुळे त्यांचा भाव एकदम उतरलाय बहुधा...
23 Jun 2012 - 3:09 pm | बॅटमॅन
अरे हो की!!!! आमचेपण ;)
23 Jun 2012 - 9:31 pm | खटासि खट
कै च्या कै धागा आणि कै च्या कै चर्चा..
23 Jun 2012 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> कै च्या कै धागा आणि कै च्या कै चर्चा..
>>> पोष्टण्याआधी थांबा.
का बरं ? राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा म्हणाल्या होत्या की, सेक्सी शब्दाचा अर्थ सुंदर, आकर्षक असा होतो. आता हे आकर्षक दिसण्याच्या काही सार्वत्रिक अशा कल्पना असतील आणि त्याबद्दल चर्चा होत असेल तर संयत अशी चर्चा करायला हरकत नसते, असं माझं तरी मत आहे. आदिवासी स्त्रिया, शहरी स्त्रिया, विविध जाती-जमातीमधल्या स्त्रीया, देश-विदेशातल्या स्त्रिया आकर्षक दिसाव्या म्हणुन प्रयत्न करत असतात. आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया अलंकाराचाही वापरत करतात त्यावरही उत्तम चर्चा झाली असतो. जसे, आपल्या कडे अलंकारामागे काही परंपरा असतीलही परंतु काही अलंकारांनी आकर्षक दिसलं पाहिजे हा भाग आहेच. स्त्रियांच्या गळ्यातील विविध अलंकार, नाक, कान, मनगटे, हातापायातील बोटांमधील अलंकार, शरीरावर गोंदुन घेणे, तरुण-तरुणींमधे असलेलं टॅटूचं वेड. तसंच, बारीक भुवया, उंच कपाळ, सिंहाप्रमाणे बारीक कंबर, वगैरे. असो.
आपण जे कोणी असाल ते असाल, पण येत चला....सालं आमच्या मिपाला कशा-कशाचं वावडं नाही. :)
-दिलीप बिरुटे
24 Jun 2012 - 1:08 am | विश्वनाथ मेहेंदळे
नक्की का ?? ;-)
24 Jun 2012 - 12:42 pm | अविनाशकुलकर्णी
कुंतल...नेत्र ..नासिका..अधर..स्तन .नाभी प्रदेश ..+२ [ते समजून घ्या ]
हि प्रेम व काम वासना जागृत करणारी अष्टांगे आहेत .
व हि अंगे जागच्या जागी व प्रमाण बद्ध असणा~या अश्या सुंदरीस अष्टांग सुंदरी म्हणतात असे एका मित्राने खूप वर्षा पूर्वी सांगितल्याचे स्मरते.
24 Jun 2012 - 3:13 pm | प्रभाकर पेठकर
श्री. अविनाशकुलकर्णी साहेब,
तुमच्या प्रतिसादात रंग, गंध, स्पर्श, आवाज, अदाकारी, उंची (शारीरिक आणि बौद्धीक) वगैरे महत्त्वाच्या 'अंगांना' तुम्ही 'स्पर्श' न केल्याने आमच्या सेक्स 'विषय'क भावना दुखावल्या आहेत. संपादक मंडळाने कृपया नोंद घ्यावी.
24 Jun 2012 - 1:01 pm | चित्रगुप्त
अशा अष्टांग-सुंदरींचे फोटो वा चित्रेही येऊ द्यात काही.
(आमची मदत हवी असल्यास सांगा)
25 Jun 2012 - 10:26 pm | अर्धवटराव
अहो फक्ट चित्रच का... सुंदरींनाच घेऊन याना... टेम्पो पाठवतो.. नव्हे मी स्वतः टेम्पो चालवत येतो ( आजकालच्या टेम्पो चालकांना मालकाच्या "गुड्स" ची काळजीच नसते म्हणुन.. बाके काहि नाहि)
अर्धवटराव
24 Jun 2012 - 10:13 pm | श्रीरंग_जोशी
नको तिथे नको तसे वागणे.
बऱ्याच मा. त. कंपन्यांमध्ये दर शुक्रवारी परिधानाच्या बाबतीतल्या अटींमध्ये शौथिल्य असते.
बरेच पुरुष कर्मचारी गबाळे पोशाख करून येतात. अन काही तरुणी असतात ज्या कंपनीने दाखविलेल्या औदर्याचा पुरेपूर गैर फायदा घेतात.
पुरूष सहकाऱ्यांचे चित्त विचलित होईल व नियमात बसणारे कपडे घालून येणाऱ्या स्त्री सहकाऱ्यांना अवघडल्यासारखे वाटेल असा पोशाख त्या करतात. मुद्दामच त्या पोशाखांबाबत कुठलेही विशेषण वापरत नाहीये कारण पोशाखाबाबतच्या व्याख्या ह्या व्यक्तीगणिक बदलतात.
अर्थातच कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाला या गोष्टींची दखल घ्यावी लागते. अधून मधून त्यांचे सर्व कर्मचाऱ्यांना इशारावजा विपत्र येत असते. त्यात वर उल्लेखलेल्या दोन्ही मुद्द्यांचा अंतर्भाव असतो. अन असेही लिहिले असते की बऱ्याच लोकांना वैयक्तिक सूचना देऊन काहीही उपयोग होत नाहीये.
याच कारणांमुळे माझ्या कंपनीत तर २००७ साली शुक्रवारचे अटींमधील शौथिल्य काढून टाकण्यात आले होते.
तर मुद्दा असा आहे की काही लोक नको त्या तिथे नको तश्या कपड्यांचा वापर का करतात, याखेरीज त्यांच्या देहबोलीतून जाणवणारी सूचकताही आजूबाजूच्यांना अवघडल्यासारखे वाटवणारी असते (पुन्हा ह्याची व्याख्यादेखील व्यक्तिसापेक्ष आहे). अर्थात काही आंबटशौकीन या गोष्टींचाही लाभ उठवतातच.
जेव्हा मनुष्यबळ विकास विभागाला अशा लोकांना इशारे देण्याची वेळ येते म्हणजे सामाजिकदृष्ट्याही हे स्वीकारार्ह नसावे.
याउलट माझा अमेरिकेतला अनुभव आहे, इथेही काही लोक या प्रकारची वस्त्रे परिधान करतात व इथेही अश्या लोकांना इशारे दिले जातात. पण ज्या प्रकारची अस्वीकारार्ह देहबोली मला भारतात आढळली त्या प्रकारचे उदाहरण येथे विरळाच.
मला तर त्या म. वि. विभागातील कर्मचाऱ्यांची दया येते जे अश्या व्यक्तिंशी प्रत्यक्ष बोलून त्यांना इशारा देतात. त्या वेळी त्यांच्या मनाची अवस्था काय होत असेल कारण नियम तोडणारी व्यक्ती उलट उत्तर देणारीही असू शकते. ती जर म्हणाली की बघणाऱ्यांच्या नजरेतच दोष आहे तर अश्या वेळी हे लोक प्रसंग कसा हाताळतात?
असे ऐकले आहे की, मॅनेजर लोकांनाही असे इशारा देण्याचे काम करावे लागते. ही परिस्थिती तर त्याहून अवघड, रोज ज्या व्यक्तीकडून काम करवून घ्यायचे असते तीला असे काही समजावून सांगणे म्हणजे.
माझ्यावर भविष्यातही असे कुणाला बोलायची वेळ न येवो म्हणजे मिळवली.
24 Jun 2012 - 11:21 pm | अविनाशकुलकर्णी
आजचा सेक्सी सवाल...
नेट वरील चित्रे पाहून व मजकूर/चर्चा वाचून बुद्धीजीवी समाजाचे मन व नजर मेली आहे ..
प्ले बॉय ने भारतीय आवृत्तीचे प्रकाशन करण्या साठी भारतात बस्तान बसवण्या साठी हि योग्य वेळ आहे असे वाटते का?
25 Jun 2012 - 12:06 am | चित्रगुप्त
प्लेबॉय ची भारतीय आवृती म्हणजे भारतीय मॉडेल्स ची अनावृत्त छायाचित्रे असलेली, की फोटो तिकडल्यांचेच, मजकूर फक्त हिंदी, मराठी वगैरे भाषांमधे असलेली?
... यावर सदर मासिकाचे व्यावसायिक यश अवलंबून राहील, असे वाटते.
अर्थात नेटवर सर्व फुकट उपलब्ध असता महागडे मासिक कितपत खपेल, हाही प्रश्न.
भारतात योग्य वेळ नेहमीच होती आणि राहील, हे खजुराहो वगैरे किंवा ताडपत्रीवरील वरकरणी धार्मिक (उदा. दशावतार) चित्रे, पण घडी उघडल्यावर आत रतिचित्रे असे अनेक प्रकार बघता वाटते.
....उदाहरणार्थ या धाग्याला मिळत असलेला प्रतिसाद.... वगैरे.
25 Jun 2012 - 10:26 am | तिमा
डब्बल सेंचुरीला हातभार!
25 Jun 2012 - 3:46 pm | खटासि खट
डॉ दिलीप बरुटेजी
माझा उद्देश ताशेरे ओढण्याचा नाही. हा विषय खूपच खाजगी आहे. कदाचित इथे महिला, मुली देखील असू शकतात. त्यांना वघडल्यासारखे वाटू शकते. या विषयावर आणखी संयत चर्चा होऊ शकते असं माझं मत आहे. विषय अशा पद्धतीने समोर ठेवल्यानंतर पुढे त्याचं काय होणार म्हणा..
गैरसमज नसावा.
25 Jun 2012 - 4:08 pm | बॅटमॅन
हा विषय खाजगी आहे आणि त्याची चर्चा करू नये वैगे वैग्रे वरकरणी संस्कृतिसंरक्षक पण व्हिक्टोरियन इंग्लंडाकडून उचललेल्या उपर्या जाणिवांची मुक्ताफळे उधळण्याआधी हे बघा:
१. हा धागा एका महिलेने काढला आहे.
२. चर्चा संयत झाली आहे. पुरुषांचे प्रतिसाद जास्त आहेत(असणारच), पण स्त्रियांचे देखील प्रतिसाद आहेत बर्यापैकी.
३. सेक्सीपणा म्हणजे काय हा विषय परिपक्वपणे चर्चिताना मुलींना अवघड का वाटावे? आजकालच्या सगळ्या मुली काय सानेगुरुजीछाप संस्कारवाल्याच असतात का? मुळात या मान्यतेमागे "सेक्स ही टॅबू प्रकारची गोष्ट आहे", अशी तद्दन भंपक धारणा आहे. शिवाय इथे काही स्त्रियांनी त्यांच्या मते सेक्सीपणा कशात असतो यावर आपापली मते मांडली आहेत. त्यांवरती प्रतिक्रिया देखील पुरेशा सभ्यच आहेत.
४. असभ्यपणा आणि सेक्सबद्दलची परिपक्व चर्चा यात बराच फरक आहे. संयत चर्चा म्हणजे अजून काय अपेक्षित आहे? सेक्स हा विषयच मुळात भौतिक जगाच्या केंद्रस्थानाशी असणारा आहे, त्याची "परिपक्व चर्चा" काय अॅब्स्ट्रॅक्टपणे रॉबर्ट किन्से वैग्रेंचे दाखले देऊन रु करणार आहात का? तसे तुम्हाला वाटत असेल तर धाग्याचे शीर्षक बघा, "तुम्हाला काय/कोण सेक्सी वाटते". इथे प्रामुख्याने वैयक्तिक मते मांडणे अपेक्षित आहे.
तेव्हा हा दांभिकपणा टंकण्याआधी थांबा.
25 Jun 2012 - 10:28 pm | अत्रुप्त आत्मा
.........हा दांभिकपणा टंकण्याआधी थांबा. >>> सहमती +११११
25 Jun 2012 - 4:22 pm | आबा
१९९
25 Jun 2012 - 6:13 pm | नाना चेंगट
२००
25 Jun 2012 - 6:47 pm | मोहनराव
हे घ्या!!
25 Jun 2012 - 10:29 pm | जेनी...
२०२ हा क्रमांक लै लै सेक्सी वाटतो :D
25 Jun 2012 - 10:55 pm | मोहनराव
आता आवरा!!
28 Jun 2012 - 7:18 am | अविनाशकुलकर्णी
नाहि 69 वाटतो
25 Jun 2012 - 11:15 pm | आशु जोग
बॅटमॅन
>> सानेगुरुजीछाप संस्कारवाल्याच असतात का?
म्हणजे काय नक्की...
25 Jun 2012 - 11:27 pm | बॅटमॅन
म्हंजे अगदी निष्पाप, कोणीही अरे बापरे ऐवजी चायला म्हटले तरी ऐय्या, औव्वा करणार्या वैग्रे वैग्रे....
26 Jun 2012 - 1:22 am | श्रीरंग_जोशी
>> तरी ऐय्या, औव्वा करणार्या वैग्रे वैग्रे....
जुन्या काळी मराठी चित्रपटात आवर्जून असणारा 'इश्श' हा शब्द ही हद्दपार झालाय हो....
26 Jun 2012 - 9:38 am | जेनी...
कोण म्हणालं ' इश्श्श्य ' हद्दपार झालाय? \( /(
मी तर म्हणते बॉ .....छान वाटतं ' इश्श्श्य ' म्हणायला :)
26 Jun 2012 - 7:33 am | वीणा३
जॉन इब्राहीम प्रचंड आवडतो (दोस्ताना बघितल्यावर वैतागलेच होते, तरीपण.)
केबीसी पासून अमिताभ बच्चन खूप आवडतो (फ्रेंच बेयार्ड मुळे).
टकलू आणि फ्रेंच बेयार्ड हे कॉम्बिनेशोन पण खूप सेक्सी वाटतं
26 Jun 2012 - 9:57 am | श्रीरंग_जोशी
अब्राहम चा इब्राहीम कधी झाला जॉनचा, वीणातै?
26 Jun 2012 - 10:34 am | वीणा३
sorry typo mistake :).
26 Jun 2012 - 11:45 am | चित्रगुप्त
अब्राहम आणि इब्राहिम हे एकच:
http://en.wikipedia.org/wiki/Islamic_views_on_Abraham
दोघेही 'अब्राम्हण' :)
26 Jun 2012 - 9:04 am | जेनी...
बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे पापण्या झुकवुन ,चोरट्या नजरेने पहाते ...खरं आहे हे ,त्या नजरेत तिला फक्त त्याचं पूरुषत्व न्याहाळायचं असतं .जसं पूरुष स्त्रीचं सौंदर्य न्याहाळतो ..तसच स्त्रीलाहि पूरुषातल्या मर्दाणगीचं आकर्षण असतं.
अतिशय नैसर्गिक आहे हे . जीवनचक्र ह्यावरच तर चालु आहे ..त्यामुळे आकर्षणाबद्दल बोलताना ते सहजसुंदर आहे ह्या
भावनेतुन बोललं गेलं तर बरेच राज\ गुपित उलगडु शकतिल ...
' आवडणार्या ' पूरुषाबद्दल स्त्रीला काय वाटु शकतं हे थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतेय ...
माझ्याच काही ओळी .....कधीतरी लिहिलेल्या .....
पूरुष .....
पुरुष इतका सुंदर असू शकतो ?म्हणजे एखाद्या स्त्रीच्या स्त्रीत्वालाही आव्हान देईल असा? इतकं अस भरदार त्याच्याकडे असत तरी काय ....कि एखाद्या नाजूक मनाची ...कोमल शरीराची पावलं आपोआप त्याच्याकडे वळली जावित ? त्याच्यात स्त्रीपेक्षा जास्त काही असेल किवा असू शकतं ..ह्यावर तुला पाहण्या आधी विश्वास बसायचा नाही ...
' ' पुरुष ' ह्या शब्दाचीच जाणीव होण खूप महत्वाच असतं ..त्यात बरीच रुपं लपलेली असतात ..
प्रत्येकवेळी स्त्री त्याच्याबाबतीत एकच विचार नाही करू शकत ..त्या पुरुषात तिला तिचे वडील ..भाऊ ..मुलगा ..नात्यातले पुरुष आणि महत्वाचा नवरा ..हि सगळी नाती मिळतात ...
ज्या मायेने तिचा हात तिच्या मुलावर फिरतो ..त्याच मायेची अपेक्षा ती तिच्या वडिलांकडून करते अन ती माया ..ती काळजी .....ते प्रेम ....तो भावूक स्पर्श सर्व काही तिला तिच्या नवर्याकडून हवं असतं ..तिच्या नवर्यात पहायचं असतं ..जिथे तिच्या ह्या अपेक्षा पूर्ण होतात ..तिथे ती तिच्या आणि तिच्या नवर्याच्या मानसिक आणि शारीरिक ..दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी समर्थ ठरते ......
शरीराचं आकर्षण प्रत्येकाला असतं ...पण त्याहूनही महत्वाचं आकर्षण हे मनाचं असतं ....तुझं माझं जवळ येन म्हणजे मानसिकतेतून घडणार मिलन ..असे प्रकार खूप कमी पहायला मिळतील ...पण जिथे हे मिलन होतं ..ते दोन जीव जगाच्या पाठीवर कुठेही असोत एकमेकांच्या आठवणीत जगतात ....निदान माझ्यासाठी तरी तू माझ्या खूप जवळ येवून गेलायस ..इतका जवळ ..कि भास होता ..कि स्वप्न होतं ..कि खरच न घडलेलं एक सत्य होतं ...ह्या प्रश्नानाही आता जागा नाहीय ......
जगातली अप्रतिम निर्मिती म्हणजे पूरुष ..स्त्री ही अनेक नात्याची रुपं घेऊन पूरुषाशी जोडलेली असते ..
मुलगी ही नेहेमीच वडीलांच्या अतुट मायेचा एक अविष्कार असते ,तर आईचं तिच्या मुलाभोवती असणारं ममतेच आवरण.
स्त्री अनेक नात्यातला जीव्हाळा एकाच पूरुषात जास्त पहाण्याचा, त्याला मिळवण्याचा प्रयत्न करते तो म्हणजे
तिचा प्रियकर ,तीचा पती .. हे नातं तर निसर्गालाही हेवा वाटावा इतकं सुंदर असतं ....
त्यांच्यात असणार्या मानसिक आणि शारिरिक आकर्षणामुळे ते कायम एकमेकांचा आधार ,एकमेकाना पूरक बनुन राहातात.
मी एवढच म्हणेन , स्त्री ही जेवढी पूरुषाला आकर्षक वाटते ...तेवढच स्त्रीच मनहि पूरुषाकडे आकर्षित होतं
आणि त्यात गैर काहिच नाहि .
26 Jun 2012 - 9:53 am | प्रभाकर पेठकर
'सौंदर्य' हे स्त्रीचे 'सामर्थ्य' आहे तर, 'सामर्थ्य' हे पुरुषाचे 'सौंदर्य' आहे. असे कोणीतरी म्हणून ठेवले आहे.
27 Jun 2012 - 4:55 pm | सुधीर मुतालीक
पेठकर साहेब, असे आचर्य अत्रे म्हणाले होते. नक्की कोण्त्या लेखात आठवत नाहीय अत्ता.
26 Jun 2012 - 9:55 am | श्रीरंग_जोशी
पूजातै - अप्रतिम शब्दरचना वापरली आहे, अरे जरा काही स्फुटलेखन वगैरे करा, दिवाळी अंकांच्या प्रकाशकांमध्ये चढाओढ होईल तुमचे लेखन छापण्यासाठी.
27 Jun 2012 - 10:36 am | गवि
पण दिवाळी अंकांच्या कव्हरवर मात्र बाईचाच फोटो असेल हं.. ;)
26 Jun 2012 - 10:37 am | अन्नू
ज्जे बात है!
आता आमच्या पुढच्या कथेच्या नायिका पुजा पवारच. ;)
खल्लास!!!
26 Jun 2012 - 12:47 pm | अत्रुप्त आत्मा
मी एवढच म्हणेन , स्त्री ही जेवढी पूरुषाला आकर्षक वाटते ...तेवढच स्त्रीच मनहि पूरुषाकडे आकर्षित होतं
आणि त्यात गैर काहिच नाहि . >>> ग्रेट...२०० मार्कं... मी परत एकदा म्हणतो,बालिके-तू महान आहेस. :-)
26 Jun 2012 - 12:52 pm | मृगनयनी
पू ssssssssssssssssssssssssss जा ssssssssssssssssssssssss .......
_______________________/\__________________________
ग्रेट्ट्ट्ट्ट्ट !!!!/////\\\\\!!!! :)
26 Jun 2012 - 9:44 am | नगरीनिरंजन
वाचून ड्वाळे पाणावले.
सेक्सी या शब्दात 'भोग्य' असा एक अर्थ अध्यारुत आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते. त्या अर्थाने सुगंधी वाफाळत्या पंचपक्वान्नांनी भरलेल्या ताटापासून ते लसलसत्या लाल रंगाची वाईन भरलेल्या स्तनाकार गोल गरगरीत ग्लासापर्यंत, लाल-पिवळ्या आंब्यांनी भरलेल्या करंडी पासून ते निळ्या डोळ्यांना लालचुटूक ओठांशी जोडणार्या सरळ पातळ नाकापर्यंत, समुद्र किनार्यावर केशरी रंगाच्या बिकिनीतल्या बिनधास्त रुपगर्वितेपासून नऊवारीतल्या चोळी न घातलेल्या सावळ्या वडारणीपर्यंत काहीही सेक्सी वाटू शकते. तशी भूक फक्त पाहिजे.
सेक्सीपणाच्या कल्पना फिक्स्ड असलेले लोक मलातरी अजिबात सेक्सी वाटत नाहीत. ;-)
27 Jun 2012 - 6:38 am | एमी
वाह ननि छान प्रतिसाद!
फक्त ते ड्वाळे का पाणावले काय कळालं नाय : - )
27 Jun 2012 - 6:42 am | जेनी...
वूऊऊऊऊऊ. ...
असले प्रतिसाद ही अतिशय सेक्सी वाटायला लागलेत आता :)
मस्त....
26 Jun 2012 - 11:21 am | चित्रगुप्त
कोणतीही गोष्ट सेक्सी म्हणा, आकर्षक म्हणा, वा आणखी काही म्हणा, तशी वाटण्यासाठी काही एक मनो-शारीरिक-रासायनिक स्थिति असणे आवश्यक असते, असा अनुभव येतो. शरिरात काही 'केमिकल लोचा' झालेला असता काहीच आकर्षक वाटेनासे होते, वा विशिष्ट वयात काही केमिकल लोचा झाल्याने गोष्टी सेक्सी वाटू लागतात (हार्मोन्स वगैरे ?).
यावर कुणी प्रकाश टाकेल का ?
पाश्चात्य विज्ञान, आयुर्वेद वा अन्य शास्त्रे याबद्दल काय म्हणतात? कृत्रिम उपायाने असे बदल घडवून आणण्याबद्दल काय प्रयोग केले गेले आहेत?
26 Jun 2012 - 10:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
दोन-चार लोकांची मतं वाचून समस्त स्त्री (किंवा पुरूष, किंवा मराठी माध्यमात शिकलेले किंवा बंगाली भाषा बोलणारे किंवा ठराविक जातीचे किंवा उंच किंवा वर्णाने काळे किंवा ....) जातीबद्दल किंवा एकूणच सरसकट मतं बनवणार्या व्यक्ती मला बोअर (=अन-सेक्सी) वाटतात.
मग सेक्सी कोण वाटतं? हुशार व्यक्ती, ज्यांना स्वतःबद्दल गंड नाही आणि समोरच्या माणसाबद्दल भीती नाही, ज्यांच्याशी वाट्टेल त्या विषयावर बोलता येतं; ज्या व्यक्तिंना विचारपूर्वक स्वतःची मतं असतात आणि मतं स्वच्छ शब्दांत/कृतीत मांडता येतात. अशा व्यक्ती दिसायला बुद्रुक नसल्या तर उत्तम! माझ्या ओळखीत तीन अपवाद वगळता एकही व्यक्ती दिसायला बुद्रुक नाही. (हे लोकं मला तसेही बोअरच वाटतात.) पण सेक्सी व्यक्तीं*ची संख्याही या आकड्याहून फार अधिक नाही.
शरीराची व्यवस्थित काळजी घेणारी लोकं हेल्दी आणि म्हणून मला सुंदर दिसतात. कपडे कसे घातले आहेत, चेहेर्यावरून किती आधी रेझर किंवा ब्रश फिरवला आहे, उन्हापासून त्वचेचं रक्षण करण्यासाठी केस किती उरले आहेत वगैरे गोष्टी मला फार महत्त्वाच्या वाटत नाहीत. किंबहुना बाह्यरूपावर फार वेळ घालवणार्या व्यक्ती काही काळानंतर मला बोअर वाटतात.
अन्यथा अद्ययावत तंत्रज्ञान असणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, वारूणी, चीज, महाप्रचंड आकारांच्या दुर्बिणी, पवनचक्क्यांची ग्रिड इत्यादी गोष्टी सुद्धा सेक्सी वाटतात.
*यात स्त्रिया आणि पुरूष दोन्हींचा समावेश आहे. मला n एवढ्या व्यक्ती उपभोग्य वाटल्या तरीही त्या प्रत्येकाचा उपभोग घेणे अत्यावश्यक वाटत नाही.
27 Jun 2012 - 12:01 am | आशु जोग
पूजा पवार यांचे लिखाण वाचून अनेकांना लेखनाची प्रेरणा मिळते आहे असे दिसते.
म्हणूनच
>> 'सौंदर्य' हे स्त्रीचे 'सामर्थ्य' आहे तर, 'सामर्थ्य' हे पुरुषाचे 'सौंदर्य' आहे. असे कोणीतरी म्हणून ठेवले आहे.<<
ही अशी वाक्ये वाचायला मिळतात.
हे वाक्य 'समिधा' च्या प्रस्तावनेत राम शेवाळकर यांनी लिहीले आहे
27 Jun 2012 - 12:07 am | बॅटमॅन
२५०!!!!
27 Jun 2012 - 12:57 am | योगप्रभू
संध्याकाळी दिवा लाऊन शुभंकरोती/परवचा म्हणा म्हटलं तर या पोरांना नकोय..
आणि सेक्सी शब्द काय सापडला तर अगदी चवीचवीने चर्चा करत बसलेत.
मुलांपेक्षा मुलीच जास्त चहाटळपणाने एकमेकींना टाळ्या देत रंगून बोलताहेत
अरे! हाच दिवस बघायचा होता तर कशाला देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढलो?
हरी हरी..
27 Jun 2012 - 1:00 am | बॅटमॅन
ओ काका थांबा हो....कधी नव्हे ते मुली मुलांपेक्षा जास्त बोलताहेत या विषयावर..जरा स्वातंत्र्याचे वारे घेऊद्यात की त्यांना ;)
27 Jun 2012 - 1:02 am | मोदक
>>>तर कशाला देश स्वतंत्र करण्यासाठी आम्ही लढलो?
हा वेळेचा परिणाम का..? की झोपेत टाईप करायला शिकला आहात..? ;-)
(ह घ्या हो..!!!!! :-))
27 Jun 2012 - 1:15 am | जेनी...
काय काका ...
देश स्वतंत्र केलाय म्हणताय आणि स्वतंत्रपणे स्वतंत्र विचार मांडतोय
तर तेही नकोय ..
हे असं असतं पूरुषांचं काहिच बोलायला नसलं की असलं बोलुन नारीजातीवर
शाब्दिक अत्याचार करतात .../( \(
हे प्रभु .....
योगा करा काका तुमी रोज ... त्यात शिर्शासन रोजरोज करा :P
27 Jun 2012 - 2:06 am | संजय क्षीरसागर
हे अस्तित्वाचे देणे मी देऊ लागलो आता
मालवून क्षण तो पुढला शतरंगी सजणे येना ...१
हा विदेह बघ मी झालो निर्बंध-मुक्त तू होना
ही शांत समाधी माझी, लय-पूर्ण त्यात तू होना ...२
आरपार सखये होऊ किती आत्मिक ही तन्मयता
शून्यात तुझ्या मी पूर्ण उमलतो, नृत्य निरंतर होता.... ३
हि कविता माझी नाही हे अस्तित्वाचे देणे
कुणी न उरले कुणा मध्ये ग, हे असे निरंजन जगणे... ४
27 Jun 2012 - 9:55 am | जेनी...
संजय जी तुमची रात्री २ वाजताची होती , माझी ही पहाटे सहा वाजताची होती ....
" मिठीत रे सख्या...! "
मिठित रे सख्या तुझ्या
अशी रात्र जाई.....!!
भिजलेल्या ओठांवर माझ्या
चांदणी खुलुन येई....
उतरल्या पापण्या ,लाजली नजर माझी
धडधडतं काळीज बघ
अशी नको करु घाई...
रात्र सरे बघ ही सरसर ,उठे मदनाचा शहारा
स्पंदनातुन माझ्या सख्या
तुझे नाव ऐकु येई...
उरला फक्त चंद्र , गेल्या तारका निजुन
रात्रही सख्या गगनाला
पापणीत मिटुन घेई...
शहारला श्वास माझा,थरथरे तुझाही श्वास
स्पर्श भावनांचा मुग्ध
क्षण विरघळुन जाई....
तनु विहारली मिठित, मिठी मंत्रमुग्ध झाली
लाजुन पाकळी ओठांची
मुख ओठात लपवुन घेई....
मिठीत रे सख्या तुझ्या अशी रात्र संपून जाई
दरवळ भावनांचा कुशीत
पहाटेच्या फुलुन येई ....
मिठित रे सख्या तुझ्या
अशी रात्र जाई
भिजलेल्या ओठांवर माझ्या
चांदणी खुलुन येई.....!!
:)
27 Jun 2012 - 2:08 am | योगप्रभू
हे प्रभु .....
<<योगा करा काका तुमी रोज ... त्यात शिर्शासन रोजरोज करा.>>
...मुली! तुझा सल्ला चांगला आहे, पण आताशा वयोमानामुळे भीती वाटते. योगा करायला जायचो आणि मणका सरकला तर कर्माचा भोगा नशिबी यायचा. पूर्वी मी डोक्यावर पडलो असल्याने शिर्शासन जमणार नाही, पण शवासन खूप आवडते. ते करीन.
<<हे असं असतं पूरुषांचं काहिच बोलायला नसलं की असलं बोलुन नारीजातीवर
शाब्दिक अत्याचार करतात >>
...इश्श्श...
(चालेल ना हा शब्द मी वापरला तर? :))