तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
21 Jun 2012 - 7:37 am
गाभा: 

इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-

From May 30, 2012

याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.

मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)

माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

प्रतिक्रिया

घ्या ..!!
थोड्यावेळापूर्वी " शुभंकरोती म्हना मुलांनो " अस सांगणारे काका
आता स्वताहाच " इश्श्श्श " म्हणू लागलेत ...:P
शुचि धागा सार्थकी लागला गं तुझा ;)
अभिनंदन ......:D

योगप्रभू's picture

27 Jun 2012 - 11:09 am | योगप्रभू

<<थोड्यावेळापूर्वी " शुभंकरोती म्हना मुलांनो " अस सांगणारे काका
आता स्वताहाच " इश्श्श्श " म्हणू लागलेत >>

मग काय बिघडलं त्यात? एकेकाळी 'इस्स्स.. हम ऐसे नही है जी' असं म्हणणारा राजकपूरही आमच्या पिढीचा आयकॉन होताच ना? पूजातैं तुमच्या कविता वाचल्यानंतर 'पुरुष स्त्रियांवर शाब्दिक अत्याचार करतात' असं बिल्कुल वाटत नाही.

वरंधा घाटात, गाडीत निळ्या प्रकाशात, मंद संगीत, उष्ण श्वास, दंडाचा स्पर्श असलं रोमँटिक वातावरण आमच्या नशिबात कधीच नाही. (घाट सुरु झाला, की मी हमखास ओकतो.)

असो, मुलींचं कौतुक असतं आमच्याकडं. त्यामुळं तुमचं चालू देत. पोरांना मात्र तसं सोडणार नाही. खास करुन आमचा बॅट्या. अभ्यास करायला नको आणि 'पद्मिनी', 'हस्तिणी', 'शंखिणी', जखिणी मात्र बघायला पाहिजेत. कामसूत्रापेक्षा गणितातल्या सूत्रांकडे लक्ष द्या म्हणावं.

जी सूत्रे कामाची असतात तिकडे लक्ष देणे हे आमचे परमकर्तव्य आहे काका ;)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2012 - 2:35 pm | अत्रुप्त आत्मा

काय काका ...
देश स्वतंत्र केलाय म्हणताय आणि स्वतंत्रपणे स्वतंत्र विचार मांडतोय
तर तेही नकोय ..
हे असं असतं पूरुषांचं काहिच बोलायला नसलं की असलं बोलुन नारीजातीवर
शाब्दिक अत्याचार करतात .../( Angry
>>>

हम बालिका से पुरी तरहा सेहेमती व्यक्त करते हुए ये कहिते है,की हम्कू ऐसाही स्व-तंत्र देश चाहिये।

प्रभाकर पेठकर's picture

27 Jun 2012 - 1:48 am | प्रभाकर पेठकर

म्हातारपणी, सक्काळी सक्काळी उठून, स्वतःची कवळी बसविणारी बायको जेंव्हा लाजत लाजत म्हणते,'एवढ काय मेलं ते टक लावून बघायचं? माझीच कवळी आहे. तुमची तिथेच, बाथरूम मध्ये, काल रात्री काढून आलात नं (इथे खुदकन हसणं आहे), तिथेच विसराला आहात तुम्ही.' तेंव्हा, ती स्वतःची बायको असूनही, खुप सेक्सी दिसते.

श्रीरंग_जोशी's picture

28 Jun 2012 - 12:17 am | श्रीरंग_जोशी

प्रपे -वाह!! अंत:करणाला स्पर्शून जाणारे वाक्य!!

मनोज श्रीनिवास जोशी's picture

27 Jun 2012 - 2:22 am | मनोज श्रीनिवास जोशी

हा धागा वाचून कधीतरी येण्याची सवय सोडायला हवी असे वाटून राहिले.
२०० हून जास्त प्रतिसाद झालेत. नव्याने काय सांगायचे ? असा प्रश्न पडला आहे पण तरीही लिहितो .
मला वाटते मादकता - सेक्सी असणे , दिसणे बरेचसे बघणाऱ्याच्या नजरेत आणि विचारात असते. सौंदर्या सारखेच थोडेसे.

मादकता ही "सिचुएशन" असते. किती काळ टिकेल माहित नाही. पाउसाच घ्या. कधी कधी साला इतका मस्त जमून पडतो , की एकांत शाप वाटावा. पण तोच पाऊस कधी कधी फार जाम आळणी वाटतो.
आपल्या मनावर सगळे , असे मी तरी मानतो.

५ पैकी जास्तीत जास्त ज्ञानेनद्रीयाना जर ही सिचुएशन अपील झाली , तर मग तिची नाशाच और ! जसे सुंदर स्त्री , अतिशय मंद अत्तर लावून "भजन" जरी गात असती तरी औट करून जाते. मग ठुमरी गात असेत तर मग काय बोलायचे !!

सर्व साधारण मिडिया शी संदर्भात असलेल्या स्रियामध्ये एक बेसिक "सेक्स अपील" असते . पण ते काही वर्षेच रहाते ! फार लांबचा पल्ला गाठणारी एखादी रेखा किंवा माधुरीच !

पुरुषाच्या बाबतीत सेक्सी असण्याचे माझ्या मते अजून दोन अ‍ॅसपेक्टस् आहेत. एक आहे तल्लीनते मधून उद्भवणारी जगाविषयीची बे-फिकीरी आणि चालण्या बोलण्यातला आत्मविश्वास. उदाहरणे देण्याची गरज नाही पण अमिताभ हे एकच पुरेसे आहे .

पण ३-१४ आदिती म्हणतात तसे , विचाराने जर तुम्ही कुणाला जिंकलेत , तर त्या सारखे सेक्सी काहीच नाही. मला हयासंदर्भात आर. डी. बर्मन आणि आशाबाई यांचे लग्न "जामफिट्ट" वाटते.

भर्तृहरीचे शृंगार शतक नावाच्या पुस्तकात आणि कालिदासाच्या मेघदूता सौंदर्य वातींची मध्ये बरीच वर्णने आहेत. मला ते काव्य म्हणून आवडले तरी हया विषया संदर्भात ही वर्णने कालबाह्य वाटतात. प्रा. बिरुटे नी चांगला संदर्भ दिला आहे.

फोटो किल्क केल्या सारख्या शिरशिरी उठवणाऱ्या काही घटना असतात आणि त्यांची छान चर्चा झाली आहे . तर्री , पूजा , मृगनयनी नी अगदी मनस्वी प्रतिसाद दिलेत , अगदी सवडीने वाचावेत असे बरेच प्रतिसाद आहेत.

पुरुषांच्या मादाकातेच्या कल्पना हया शारीरिक असतात आणि म्हणून त्या वक्ष , कटी , नितम्बाशी येवून थांबतात .(आणि दुर्दैवाने तेथेच संपतात ). माझ्या मते स्रियांच्या पुरुषांविषयीच्या मादाकातेच्या कल्पना "अ"शारीरिक असतात आणि त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि म्हणूनच आपण म्हणतो स्रीयांना समजणे कठीण आहे.

विश्वनाथ मेहेंदळेनी हया संदर्भात छान प्रतीसाद दिलाय - त्या दांभिक असतात. येस , त्या अव्यक्त असतात, आणि हा मुद्दा पैसा नी बरोबर पकडलाय असे मला वाटते.

तर मस्त चर्चा होते आहे , एका वेगळ्या विषयावर चर्चेला सुरवात केल्याबद्दल शुची चे धन्यवाद.

संजय क्षीरसागर's picture

27 Jun 2012 - 10:58 am | संजय क्षीरसागर

मुळात सारं अस्तित्वच इंटर-प्ले बीटवीन अपोजिट पोलॅरिटीज आहे त्यामुळे अस्तित्वाचं सर्व प्रकटीकरणच रोमान्स आहे.

भूक स्त्री धर्मी आहे तर भोजन पुरुषधर्मी त्यामुळे उत्तम भूक, उत्तम भोजन आणि तृप्ती अशी साखळी आहे; शांतता स्त्री आहे तर स्वर पुरुष आहे आणि त्या संम्मीलनातून संगीत आहे; श्वास पुरुष असेल तर उत्छ्वास स्त्री आहे आणि त्यांच्या संयोगातून जीवन आहे. सक्रियता पुरुष असेल तर विश्रांती स्त्री आहे आणि त्या रिदम मधनं अ‍ॅक्टिवीटीचा डौल आहे. प्रत्येक प्रकटीकरण हा दोन पोलॅरिटीज मधला कमालीचा नजाकतदार बॅलन्स आहे. प्रणय ही स्वतःला अभिव्यक्त करण्याची निसर्गाची योजना आहे त्यामुळे त्या दोन पोलॅरिटीजमधे आदिम आकर्षण आहे आणि ते कायम राहणार.

अध्यात्मात काम हा प्रथम शत्रू मानला गेल्यानं मानवी मनात अपराध भाव आहे, हा अपराधभाव हळूहळू सघन होत जाऊन आपल्या आयुष्यातला रोमँटिसीजम संपवतो आणि वृधत्वाप्रत नेतो.

रोमँटिसीजम नुसतं मानसिक असून उपयोग नाही ती शारीरिक आणि मानसिक अशी दुहेरी क्षमता असेल तर मजाय त्यासाठी कमालीचा शारीरिक फिटनेस (खरं तर शरीराची लवचिकता) आणि उत्तम इंडोक्राइन सिस्टम (अंतःस्त्रावी ग्रंथीची सक्षमता ) हवी तरच तुम्ही उत्साही राहू शकता.

पोस्टचं शीर्षक `सेक्शुअल अपील' दर्शवतं त्यामुळे विषय एकांगी झालाय तरीही त्यानिमीत्तानं हा प्रतिसाद देण्याची संधी मिळाली हे नक्की.

शीर्षकाच्या अंगानी सांगायचं झालं तर प्रणयानं अंगोपांग तृप्त होऊन पुरुषाच्या बाहुत सुखावलेल्या स्त्रीचा चेहरा आणि काम हा पुरुषार्थ आपल्या सखीसाठी सर्वस्वानं सार्थ केल्याच पुरुषाला लाभलेलं समाधान या दोन गोष्टी मला जगात सर्वात सेक्सी वाटतात कारण वर दिलेल्या जवळजवळ सर्व प्रतिसादांची इतीश्री त्यात सामावलेली असते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2012 - 4:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भूक स्त्री धर्मी आहे तर भोजन पुरुषधर्मी त्यामुळे उत्तम भूक, उत्तम भोजन आणि तृप्ती अशी साखळी आहे; शांतता स्त्री आहे तर स्वर पुरुष आहे आणि त्या संम्मीलनातून संगीत आहे; श्वास पुरुष असेल तर उत्छ्वास स्त्री आहे आणि त्यांच्या संयोगातून जीवन आहे. सक्रियता पुरुष असेल तर विश्रांती स्त्री आहे आणि त्या रिदम मधनं अ‍ॅक्टिवीटीचा डौल आहे. प्रत्येक प्रकटीकरण हा दोन पोलॅरिटीज मधला कमालीचा नजाकतदार बॅलन्स आहे. प्रणय ही स्वतःला अभिव्यक्त करण्याची निसर्गाची योजना आहे त्यामुळे त्या दोन पोलॅरिटीजमधे आदिम आकर्षण आहे आणि ते कायम राहणार.

अहाहा. काय एकेक शब्द आपल्या एका खास लयीत नृत्य करतोय पाहा.

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2012 - 1:00 am | संजय क्षीरसागर

धन्यवाद!

नितिन थत्ते's picture

27 Jun 2012 - 9:41 am | नितिन थत्ते

"इंचाइंचाने" हा धागा मिपाच्या "इतिहासाचे पुनर्लेखन" करणार बहुधा

पैसा's picture

29 Jun 2012 - 9:17 pm | पैसा

इतिहासाचे पुनर्लेखन तर तेव्हा होईल जेव्हा इंच इंच करीत हा धागा ३५० प्रतिसादांच्या पुढे जाईल!

गवि's picture

27 Jun 2012 - 10:40 am | गवि

सगळ्यांचे कुकर नुसते फुसफुसताहेत..मात्र शिट्टी नाही झाली एकाचीही..

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 10:55 am | श्रीरंग_जोशी

शिटी न होऊ देता कूकर वापरल्यानी बरीच ऊर्जाबचत होते ना.

रामजोशी's picture

27 Jun 2012 - 11:45 am | रामजोशी

केजीतील (पुढच्या वर्गातील नव्हेत) आपल्या मुलांना पहाटे किंवा सकाळी सोडायला येणार्‍या सर्व स्त्रिया मलातरी जाम सेक्सी वाटायच्या. त्यांच्या चेहर्‍यावर एक प्रकारचा आत्मविश्वास असतो. सकाळी सकाळीच कामे आवरून आल्यामुळे प्रसाधने वापरायला वेळ नसतो आणि बहुतेक स्त्रियांचे केस विस्कटलेलेच असतात. कपड्याकडेही विशेष लक्ष नसल्यामुळे गबाळ्या पण जाम सेक्सी वाटतात त्या.

एकदा तर एक बाई घाईघाईत उलटा टी शर्ट घालून आली होती पण त्यामुळे ती जास्तच सेक्सी भासली. उघड्या पाठिवरची ताजी नखक्षतेही जाम सेक्सी व सुचक दिसतात. :-)

माझे तर मत आहे कुठल्याही शहरात "शहर दर्शनात" हेही स्पॉट अ‍ॅड करावेतच. :-)

चित्रगुप्त's picture

28 Jun 2012 - 12:12 am | चित्रगुप्त

@ रामजोशी..........केजीतील (पुढच्या वर्गातील नव्हेत) आपल्या मुलांना पहाटे किंवा सकाळी सोडायला येणार्‍या सर्व स्त्रिया मलातरी जाम सेक्सी वाटायच्या.......
............केजीत असल्यापासून पासून जोपासलेल्या आपल्या रसिकतेला आमचा सलाम.

चैतन्य दीक्षित's picture

27 Jun 2012 - 1:12 pm | चैतन्य दीक्षित

घरासमोर सकाळ सकाळी रांगोळी काढण्यात मग्न असलेली तरुण गृहिणी मला आवडते.
(हे दॄश्य पुण्यात वगैरे पहायला मिळणे दुर्मिळ आहे, पण आमच्या सातारला दिसतं अजूनही :))
गाऊन/घरातली साडी.. तीही थोडी अस्ताव्यस्त. पण याकडे लक्ष न देता ती रांगोळी रेखाटण्यात मग्न असेल तर क्या केहने.
तिच्याकडे पाहतोय हे तिला कळेल का? वगैरे भीती न बाळगता तिच्याकडे बघता येतं :)

हापिसात मुलगी साडी नेसून आली असेल तर ती फार कॉन्शस असते, सारखा पदरच सावर, गळ्यातलंच नीट कर वगैरे करत असते. मुली/बायका स्वतःच स्वतःच्या पदराकडे वरून हनुवटी गळ्याला टेकवून बघत असतात. असं दॄश्य जाम सेक्सी वाटतं. त्यात जर तुमच्या उजव्या हाताला अशी कुणी बसली असेल, तर क्वचितच पदराआडुन दिसणारं पोट त्या 'सीन' ला चार चांद लावतं :)

हात वर उचलून केसांना लावलेलं रबर काढून, केस थोडे सारखे करून (ते होईपर्यंत ते रबर तोंडात धरून), पुन्हा ते रबर लावणारी तरुणी .....
बागेच्या बाहेर 'चिंचा-आवळे'वाला/वाली बसला/ली असेल तर,
त्या चिंचांकडे नुसतं बघून डोळे मिचकवणारी (जणु काही आंबट खाल्लंय) तरुणी...

लिस्ट बरीच मोठी आहे :)

वाह! आता कसं अगदी मनापासून आणि समजेल अशा भाषेत लिहिलय : - )
चान चान वाटतय वाचायला!
बादवे तो पूण्याहुन सांगलीला जाताना लागणारा नदीकाठ पण लय सेक्सी आहे.

जेनी...'s picture

27 Jun 2012 - 8:34 pm | जेनी...

ओहो लै भारी ....
जाम आवडला प्रतिसाद .... :)

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jun 2012 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा

हा धागा अक्षय्य राहो... अशी मोकळी मत प्रदर्शने,आणी चर्चा अन्यत्र कधिही वाचली नाही...

चित्रगुप्त's picture

28 Jun 2012 - 9:54 am | चित्रगुप्त

किती वाचणार?
आता थोडी ही दृष्येही बघा, आजच टिपलेली.

क्र. १, २ व ३ : आबाल - वृद्धांना आवडणार्‍या चित्रांचे बारकावे समजून घेताना...


क्र. ४ : या चित्राविषयी इथे वाचा:

क्र. ५ : कशी दिसतेय मी? क्र. ६ : मी अशी दिसेन का कधी?

आज एवढंच.

बरीच वर्षं मनात असलेली शंका विचारतो. खोचकपणे नाही खरंच मनापासून.

चित्र (तैलचित्र, पेंटिंग) या स्वरुपात तीच गोष्ट दाखवली की ती सर्वांनी निरखून पाहण्याजोगी अभिजात, उच्च कला आणि फोटोग्राफ्/व्हिडीओ स्वरुपात ती दाखवली की पॉर्नोग्राफी असं का? अधिक स्पष्टतेसाठी, याच प्रकारचं दृश्य असलेला फोटो इथे अपलोडवला तर अश्लील खालच्या दर्जाचा म्हणून मानला जाईल असं वाटत नाही का?

याचंच प्यारेलल उदाहरण म्हणजे, तमाशातल्या बाईचा नाच गळक्या जुनाट शेडमधे जाऊन पाहणारे किंवा हवेलीत सुपारी देऊन ठरवणारे आंबटशौकीन, बाईलवेडे वगैरे आणि लावणी महोत्सवात सांस्कृतिक मंत्रीच ऑर्गनायझर असल्याने तो मात्र सहकुटुंब येऊन पाहण्यासारखा (लोक)कलात्मक सोहळा?

दोन्हीतली एकच गोष्ट बरोबर आहे असं नव्हे पण कलेच्या आवरणात आपण आपल्या प्रिमिटिव्ह भावना भागवतोच. मग त्याला अधिक प्रतिष्ठा का? अगदी पु.लं नीही परदेशातल्या नग्न नृत्यांचं वर्णन करताना ते अश्लील नसून ते सौंदर्याचे उत्तम नमुने असल्याचं म्हटलं आहे. ते खरंच आहे (नग्न स्त्री हा सौंदर्याचा नमुना असणं) पण त्यासाठी उगाच कलात्मकतेचा आधार घेण्याविषयी प्रश्न आहे.

बॅटमॅन's picture

28 Jun 2012 - 11:20 am | बॅटमॅन

+१.

हा प्रश्न मनात होता कितीतरी दिवसांपासून. चित्रगुप्त हे स्वतः जाणकार चित्रकार असल्यामुळे त्यांनी या शंकेचे समाधान करावे अशी त्यांना नम्र विनंती.

चित्रगुप्त's picture

28 Jun 2012 - 12:50 pm | चित्रगुप्त

महत्वाचा प्रश्न आहे, आणि गुतागुंतीचा पण.
माझ्या कुवतीप्रमाणे उत्तर देण्याचा प्रयत्न अवश्य करेन.

तुम्ही म्हणताय ते मलाहे पटतय गवि.
जेव्हा तात्या मिपा सांभाळत होते तेव्हा होमपेज वर आजची खादाडी सदरात रोज एका नवीन मादक स्त्रीचा फोटो असायचा.
तेव्हा समस्त महिला वर्गाने आक्षेप घेतला होता.
पण मग अशा दर्जेदार पण नग्न कलाक्रुतीवर का नाही कोणी आक्षेप घेत? (आक्षेप घ्या अस माझ आजिबात म्हणण नाही, किंबहुना आक्षेप नसावच.)
पण नग्नता ही दोन्ही कडे आहेच की.

मला वाटतं फक्त मादक स्त्री चा फोटु दिल्याने त्यांनी आक्षेप घेतला असेल. मादक पुरुषाचा पण फोटु द्यायला पाहीजे ना ; - ) हा आता मादक पुरुष फारच कमी असतात पण महीन्यातून एकदा बदलला तरी चाललं असतं...
पुरुषांचा हा दुटप्पीपणा काय बरोबर नाय...वर परत आम्हालाच अप्पलपोटी, दांभिक, स्वार्थी, आतल्या गाठीच्या म्हणतात...

अमेरिकन त्रिशंकू's picture

28 Jun 2012 - 7:46 pm | अमेरिकन त्रिशंकू

हा प्रश्न फक्त तुम्हालाच पडलेला नाही. हा दुवा बघा.

http://en.wikipedia.org/wiki/I_know_it_when_I_see_it

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

28 Jun 2012 - 8:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लुई़ज बूर्ज्वा - खोडसाळ, 'डेंजर' स्त्री शिल्पकार या धाग्यावर आमचे गुर्जी-२ यांनी अशाच प्रश्नाला एका प्रतिसादात उत्तर दिलेलं आहे.

अश्लीलता, पॉर्नोग्राफीसंदर्भात माझी काही एक व्याख्या आहे. जाहीर प्रतिसादात इथे लिहावी का नाही याबाबतीत प्रश्न पडल्यामुळे लिहीत नाही.

एमी's picture

28 Jun 2012 - 10:13 pm | एमी

धन्यवाद अदिती. खूपच इंटरेस्टिँग धागा आणि प्रतिसादची लिँक दिल्याबद्दल.

अर्धवटराव's picture

28 Jun 2012 - 9:10 pm | अर्धवटराव

समान भावना, रादर इन्स्टिंक्ट, दोन वेगवेगळ्या वेष्टनात गुंडाळुन दिल्या असता एक कला म्हणुन मान्यता पावते तर दुसरी अश्लीलतेच्या कर्दमात फसते... याचं कारण वेष्टनानी प्रक्षेपीत केलेला रुढार्थ आहे.
चित्रात नग्नता दाखवली तर ति कल्पनेतुन उतरली असल्यामुळे त्याला मनाचा कॉटेक्स्ट आहे, म्हणुन ति कला सदरात मोडते. छायाचित्रात एका जीवंत शरिराचं सादरीकरण असल्यामुळे ते पॉर्न म्हणुन गणल्या जाते. अर्थात, चित्रकलेच्या माध्यमात देखील काहि नियम पाळत नग्ता दाखवली तरच ति कलेच्या परिघात येते. वरिल चित्रात जर लिंग (ठळकपणे) दखवले असते तर ते ही अश्लील म्हणुन नाकारण्यात आले असते आणि एखाद्या छायाचित्रात तान्ह्या बाळाचे लिंग दिसले तरी त्याला कोणि अश्लील म्हणत नाहि किंव एखादे मोडेलींग फोटोसेशन अदरवाईज अश्लील म्हणवणार्‍या मर्यादांच्या पलिकडे जाऊन बघायला कोणाची ना नसेल

अर्धवटराव

सुनील's picture

28 Jun 2012 - 2:40 am | सुनील

कृपया दुसरा धागा सुरू करावा.

दुसर्‍या-तिसर्‍या पानावरील नवे प्रतिसाद शोधताना दमछाक होत आहे.

एमी's picture

28 Jun 2012 - 6:04 am | एमी

Control f करुन date ने search करा. eg 27/ किँवा 28/ असे.
विषय कधीच न संपणारा आहे पण मला नाही वाटत आता फारसे प्रतिसाद येतील. आणि नविन धागा चालू केला तर लिंक मोडल्यासारखं पण वाटेल.
बाकी छान होता धागा, प्रतिसाद, चर्चा सगळेच. मज्जा आली एकंदरच.

संजय क्षीरसागर's picture

28 Jun 2012 - 8:33 am | संजय क्षीरसागर

एकदम सेक्सी आयडीया, धन्यवाद!

स्मिता.'s picture

28 Jun 2012 - 2:43 am | स्मिता.

माझा तिनशेवा नंबर!!!

पप्पुपेजर's picture

28 Jun 2012 - 12:05 pm | पप्पुपेजर

आमचा हि हातभार !!

क्लीन पिक्चरमधील सिल्क स्मिता कशी वाटते

जेनी...'s picture

29 Jun 2012 - 10:24 pm | जेनी...

बरेच प्रश्न आहेत ....आज रात्री लिहिन .. :)
सगळ्या डेझ मध्ये सगळ्यात सेक्सी डे " फ्रायडे " ;)
सुट्टि असतेना दुसर्‍या दिवशी :) म्हनुन ..

चाणक्य's picture

14 Feb 2013 - 4:49 pm | चाणक्य

.

मनोरा's picture

14 Feb 2013 - 8:44 pm | मनोरा

सेक्सी शब्दाची व्याख्या " सुन्दर" आहे. सेक्स शब्दाचा सेक्सी शब्दा शी काहीही संबंध नाही. तुम्हाला हॉट म्हनायचे आहे. अहा ! काय हॉट दिसतो तो !( फीमेल चे उद्गार- मेल कडे पाहुन) वाव! काय हॉट दिसते ती ! ( फीमेल ला पाहुन मेल ने काढलेला उद्गार). सेक्सी म्हनजे सुन्दर. शब्द्कोषात हा शब्द जेव्हा टाकन्यात आला तेव्हा त्यावर वर्तमान पत्रात चर्चा आली होती. जेव्हा जेव्हा नवा शब्द शब्दकोषात टाकन्यात येतो ताची माहीती पेपरात येते.
बाकी मेल्स ना मेल्स सेक्सी वाटने व फीमेल्स ना कुठली फीमेलच सेक्सी वाटने थोडे हटके आहे. ते तसे " मेल दोस्ताना/ फीमेल दोस्ताना (फायर) " सारखे. वादच नाही.
मला माझ्या आयुष्यात सगळ्यात सेक्सी म्हणा किंवा हॉट म्हणा, फक्त एकुलती एक- सनी लिओन वाटली. तीची जागा कोनी घेने शक्य नाही.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 11:02 pm | बॅटमॅन

सेक्सी शब्दाची व्याख्या " सुन्दर" आहे. सेक्स शब्दाचा सेक्सी शब्दा शी काहीही संबंध नाही. तुम्हाला हॉट म्हनायचे आहे. अहा ! काय हॉट दिसतो तो !

दोन्ही शब्द आर्बिट्ररी आहेत. काय फरक पडतो?

बाकी

फीमेल चे उद्गार- मेल कडे पाहुन) वाव! काय हॉट दिसते ती ! ( फीमेल ला पाहुन मेल ने काढलेला उद्गार).

सेक्सी म्हनजे सुन्दर. शब्द्कोषात हा शब्द जेव्हा टाकन्यात आला तेव्हा त्यावर वर्तमान पत्रात चर्चा आली होती. जेव्हा जेव्हा नवा शब्द शब्दकोषात टाकन्यात येतो ताची माहीती पेपरात येते.
बाकी मेल्स ना मेल्स सेक्सी वाटने व फीमेल्स ना कुठली फीमेलच सेक्सी वाटने थोडे हटके आहे. ते तसे " मेल दोस्ताना/ फीमेल दोस्ताना (फायर) " सारखे. वादच नाही.

हे हेवनली मराठी आणि

मला माझ्या आयुष्यात सगळ्यात सेक्सी म्हणा किंवा हॉट म्हणा, फक्त एकुलती एक- सनी लिओन वाटली. तीची जागा कोनी घेने शक्य नाही.

हे थॉट-पर्ल पाहून ठार आडवा झालो, म्हणजे अगदी ठार मेलो, निर्वाण झाले, खपलो, =)) =)) =)) =)) लैच खळखळून हसवता ब्वॉ तुम्ही.

आपल्या सदस्यनामाच्या निवडीमागेसुद्धा काही फ्रूडियन ओव्हरटोन्ह नाहीत ना? की मचाकान्वित भाषेचा प्रभाव आहे तो =))

अभ्या..'s picture

14 Feb 2013 - 11:09 pm | अभ्या..

__________/\___________
बॅट्या हा आडवा डंडवत तुझ्यासाठी. ;)
काय तो शब्दविलास तुझा. धन्य झाले असतील सिग्मंड्बाबा सुध्द्दा.

बॅटमॅन's picture

14 Feb 2013 - 11:12 pm | बॅटमॅन

रोचक अन "मार्मिक" डंडवत रे अभ्या ;)

सिग्मंड फ्रॉईड विजयते ;)

जेनी...'s picture

14 Feb 2013 - 11:57 pm | जेनी...

=)) माझापण _/\_ =))

पिलीयन रायडर's picture

15 Feb 2013 - 8:01 pm | पिलीयन रायडर

त्यांचा तो "लैंगिक शिक्षणाची गरज - शुचि" च्या धाग्यावरचा प्रतिसाद पाहिला का???

पप्पु अंकल's picture

14 Feb 2013 - 9:18 pm | पप्पु अंकल

मानल तुम्हाला. आपल्या सर्व प्रतिसाद वाचून एव्ह्ढेच सांगतो...एक पुस्तक लिहाच या विषयावर..

श्री गावसेना प्रमुख's picture

15 Feb 2013 - 9:07 am | श्री गावसेना प्रमुख

सेक्स ची व्याख्या काय ठरवली मग(सेक्सी तर काजल आहे)1

मनोरा's picture

16 Feb 2013 - 12:35 am | मनोरा

sunny