ह्मम्म...नेहमीपेक्षा डेंजर आहे खरं...ताण व्यक्त करण्याची शैली आवडली.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
अगायायायाया....
पहिलाच फोटो शेंडीला झिणझिण्या आणणारा...
जगात बरेच लोक इतर कोणाचीही पर्वा न करता त्यांना वाटेल ते करत असतात, एवढे मात्र जाणवले...
शिल्पे आचरट वाटली तरी जगाला फाट्यावर मारायच्या या धैर्याचे कौतुक वाटते...
उत्तम लेख. धन्यवाद.
या बाईंना खोडसाळ म्हणणे म्हणजे आपल्या मुला नातवंडाना "मेल्या, चहाटळा" म्हणण्याच्या जातीचे वाटले. टर्म ऑफ एन्डीअर्मेंट.
लैंगिकतेच्या (जेंडर आणि सेक्शुआलिटी , दोन्ही अर्थाने ) विषयासंबंधीच्या कलाकृती हा प्रकार विसाव्या शतकात तरी नवा कधी होता असे मला वाटत नाही. मात्र स्त्रियांचा कलेच्या प्रांतातला(सुद्धा) प्रवेश उशीरा झाल्याने त्यांनी त्यांची मते , त्यांची राजकीयता या क्षेत्रात आणली ,शतकानुशतके ज्याना संधी मिळाली नाही त्यांचे आवाज ऐकायला मिळायला लागले हे सारे स्वागतार्ह. प्रस्तुत आजीबाईना आमचा सलाम.
कदाचित लैंगिकता अशी उघड्यावर मांडणे हे सभ्य स्त्रीचे लक्षण नाही हि संकल्पना पूर्वापार चालत आली आहे....म्हणून असेल, बंडखोरी करताना असे विषय हाताळले असू शकतील...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
लहानपणच्या तीव्र अनुभवांचे पडसाद संवेदनशील मनाच्या व्यक्तीच्या उत्तर आयुष्यात केवढ्या मोठ्या प्रमाणावर पडतात असे ह्या कलाकृती बघून वाटले.
(बाकी मनाला येईल ते करुन बघण्याचे आणि ते लोकांना दाखवण्याचे धारिष्ट्य असलेल्या अशा व्यक्ती बघितल्या की मी थक्क होतो!)
चिंजंचे लेखन वेगळ्याच धर्तीचे असते ह्या मताशी सहमत.
चतुरंग
ओळख आवडली.
एक संवेदनशील, कोवळ्या मनावर लहानपणापासून झालेले लैंगीकता, स्त्रित्व, पौरुष यांचे संस्कार आणि त्या सर्व अनुभवांना वाचा फोडण्यासाठी व्यक्तीमधे असलेली सर्जनशीलता, धैर्य यांचा परीपाक ही अद्भुत शिल्पे असावीत. खूपशी प्रतीकात्मक - बाह्यचक्षू, ज्ञानचक्षू आणि अंतर्चक्षू तीहींच्या योगे नक्की कलाकारचं मन जाणून घेता येणारी.
मला 'मामेल' शिल्प आवडलं. मटाराच्या उललेल्या शेंगेसारखं दिसणारं. त्याचा अर्थ सुरेख.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
लेख आवडला ...आजीबाईंना आमचाही सलाम
पुरुषप्रधान व्यवस्थेत कुटुंब हा एक मोठा घटक असतो. 'सेल' नावाच्या मांडणीशिल्प (इन्स्टॉलेशन) गटामध्ये (१९९०-९३) कुटुंबव्यवस्थेवरील टीका दिसते. उदा. खालच्या चित्रात दिसणारे घर हे लुईजचे बालपण जिथे गेले त्या घराची प्रतिकृती आहे. ते एका पिंजर्यात आहे, व त्यावर एक गिलोटिन लटकते आहे. स्त्री जोवर घराची जो़खडे झुगारून बाहेर येत नाही, तोवर ती अडकून राहणार व शेवटी क्रूर पध्द्तीने तिचा शिरच्छेद होणार, असा काहीसा भाव यात जाणवतो
वरिल कलाकृती विवेचन काहीसे न पटणारे आहे पण शेवटी कलाकाराचेच विवेचन ते, तिच्या पुर्वानुभवावर आधारित असेल ही कदाचित ..
एकदा असेच तस्लिमा नसरीन वर शोभा डे ने लिहिले होते की तस्लिमा ला पुरुष हा फक्त लैंगिक शोषण करणाराच का वाटतो ??
पण मला वाटते Man is also a 'Protector - a Fatherly Figure' . What probably she is missing is Fatherly Affection someone who could have understood her as a Girl Child. Probably Emotional Insecurity has made them so rebellious, that they wana hit back with Harsh Sword (which can either be pen or brush) in their hand हे तुमच्या ही लेखात जाणविले
पुरुषांविषयीची तिची मते घडवण्यात लहानपणीच्या एका अनुभवाचा मोठा हात होता. आपल्या वडिलांचे आपल्याच दाईशी शरीरसंबंध असल्याचे तिच्या लक्षात आले, तेव्हा ती ११ वर्षांची होती. ही गोष्ट आईला ठाऊक असूनही ती सोईस्करपणे वा नाईलाजाने तिच्याकडे दुर्लक्ष करते, हेही लुईजच्या लक्षात आले
कुछ यादें जिंदगी भर साथ चलती है.... और हर मोड पर अपना अक्स (प्रतिबिंब) छोड जाती हैं ! असे मला तरी जाणविले
~ वाहीदा
१. दादा कोंडके वगैरेंच्या डब्बल मीनिंग विनोदांना नाके मुरडणारे लोक ही वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे असे म्हणतील का?
२.हाच धागा या फोटोंसकट टारझनने काढला असता तर इथे टिकला असता का?
दादा कोंदकेच्या विनोदांना काही वैचारीक बैठक आहे का ज्याचं चिंतन करून कोणती इनसाइट मिळू शकेल?
जर टारझन यांनी ही चित्रं व्यवस्थित स्पष्टीकरणासहीत इथे डकवली असती तर का नसती राहीली? टारझन आणि चिंतांमधे फरक काय आहे?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
दादा कोंदकेच्या विनोदांना काही वैचारीक बैठक आहे का ज्याचं चिंतन करून कोणती इनसाइट मिळू शकेल?
>> मुळातच ही तुलना चुकीची आहे. दादांना लोकांचे मनोरंजन करण्यात रस होता. त्यामुळे संवग विनोद हे त्यात येण्याची शक्यता मोठी होती. ह्या शिल्पकाराची शिल्पे ही एक प्रकारचा निषेध आहे. जरी ह्या शिल्पकाराला कोणी नावे ठेवली असती, बहीष्कार घालता असता, तरी तीने काम चालुच ठेवले असते ही शक्यता दादांपेक्षा जास्त आहे.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
१. दादा कोंडके वगैरेंच्या डब्बल मीनिंग विनोदांना नाके मुरडणारे लोक ही वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे असे म्हणतील का?
>>'डब्बल मीनिंग' येथेच बर्याच गोष्टी स्पष्ट होतात. ही चित्रे सरळ एकाच अर्थाची आहेत. जर शिल्पकराने त्यांचा तसा अर्थ नाहीच असे सांगितले असते तर 'वरची डब्बल मीनिन्ग कलाकारी आचरट / अश्लील आहे' अशी शक्यता आहे.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
प्रतिसादांबद्दल सर्वांस धन्यवाद. एका महत्त्वाच्या स्त्री कलाकाराचा परिचय करून देणे हा लेखाचा मूळ हेतू होताच, पण त्याशिवायही एक दीर्घगामी हेतू होता. एकंदरीत दृश्यकलांविषयी मराठी माणसाच्या मनात एक अढी, दुरावा, संशय, अज्ञान वगैरे असावे, असे वेळोवेळी जाणवले आहे. काहींना विविध प्रतिमा (विविध कारणांसाठी) आक्षेपार्ह वाटू शकतात, यामागे या अज्ञान, संशय वगैरेंचा मोठा हात असतो, असेही लक्षात येत गेले. यावर उपाय एकच, तो म्हणजे विविध प्रतिमांना लोकांसमोर आणत राहणे, व त्यांच्या अर्थबोधाविषयी उहापोह होऊ देणे. मग हळूहळू दृश्य-साक्षरता वाढेल, अशी आशा करता येते.
दृश्य-समज वाढवण्याच्या या प्रयत्नात सर्वांना एक आवाहनः
लुईजच्या कलाकृतींमधली एक लढाऊ स्त्रीवादी वृत्ती/भूमिका व लैंगिक प्रतिमांद्वारे त्या भूमिकेची झालेली अभिव्यक्ती येथे किंचित विशद केली होती. पण समजा, कलाकृतीचे नाव व वरील प्रतिमा एवढेच आपल्यासमोर ठेवले गेले असते, तर (म्हणजे वरील विवेचनाअभावी) त्यातल्या लैंगिक प्रतिमा आपल्याला उमजल्या असत्या का, हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारावा.
अशा कलाकृतींच्या बाहेरच्या, म्हणजे रोजच्या जगातही प्रतिमांचा महापूर आहे, आणि त्यातल्या अनेकांतही लैंगिकता अंतर्भूत असते. तीही जर उमजू लागली, तर त्या (म्हणजे रोजच्या जगण्यातल्या) प्रतिमांचे आपण स्वतःपाशीच जे अर्थबोधन करतो, ते अधिक सशक्त होऊ लागेल; आणि मग लुईजची त्या स्त्री-वस्तू प्रतिमांच्या विरोधातली बंडखोरी कदाचित अधिक डोळसपणे लक्षात येईल. मग विवेचनाची गरज भासणार नाही; मग लुईजची शिल्पे अश्लील का नाहीत, हे उमजेल; आणि मग (जे आमच्या मते सर्वात महत्त्वाचे आहे) खालील आकर्षक प्रतिमा (जिला आपण सहसा अश्लील मानत नाही, आणि जिच्यासदृश प्रतिमा राजरोस या संस्थळावर दिसतात) त्या लुईजच्या शिल्पांहून अधिक आक्षेपार्ह का आहे, हेही उमजेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
स्त्रीकलाकाराऐवजी पुरूष कलाकाराने अशा विषयावर कलाकृती निर्माण केल्या असत्या तर त्याचे असेच कौतुक केले गेले असते का असा प्रश्नही मनात आला.
यावरून एक सांगायची राहून गेलेली गोष्ट आठवली. लेखाच्या वर 'दुर्गुणी' लुईजचे जे खट्याळ छायाचित्र आहे, ते रॉबर्ट मॅपलथॉर्प या 'कु'प्रसिध्द छायाचित्रकाराने काढले आहे. त्याच्याविषयीची माहिती आणि त्याची छायाचित्रे जरूर पाहावीत.
वि. सू. छायाचित्रे कार्यालयातून पाहू नयेत. जालावरच्या दाईंच्या (नेट नॅनी) चाळणीपलीकडे येणार नाहीत बहुतेक.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
लेखाच्या वर 'दुर्गुणी' लुईजचे जे खट्याळ छायाचित्र आहे,
खट्याळ नव्हे तर ते गोट्याळ छायाचित्र वाटते.तुम्ही लिहीले म्हणुन पुन्हा पाहीले आणि नको तेच दिसले. :O
पण धाग्याच उद्देश,तुमचे विवेचन उत्तमच.!
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
अतिशय उत्तम प्रतिसाद, लेखाइतकाच छान आणि महत्वाचा.
माझ्यापुरते, विवेचनाशिवाय मला या कलाकृती उमजल्या नसत्या. अजूनही उमजल्या आहेत असे नाही, पण एक स्टार्टिंग पॉइंट म्हणून नक्कीच उपयोग आहे विवेचनाचा.
बिपिन कार्यकर्ते
सुंदर वैचारिक प्रतिसाद
पण कधी कधी कलाकारांच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्यात काही तथाकथीत सामाजिक सिमारेषांचे उल्लोघन (बापरे काय शब्द आहे 8| ) केले जाते. मग त्यात बंडखोरी आलीच (rebellious = बंडखोर ...शी बाई , मला कसा हा शब्द सुचला नाही :-( )
पण जसे प्रियाली ने विचारले ते माझ्या ही मनात आले हेच जर पुरूष कलाकाराने केले असते तर ... प्रतिमांचे अर्थबोधन वेगळे निघाले असते का ??
~ वाहीदा
भारतात देखिल असाच तुमच्या भाषेत बंडखोर म्हातारा आहे. हुसेन त्याचे नाव आहे. तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.
वेताळ
भारतात देखिल असाच तुमच्या भाषेत बंडखोर म्हातारा आहे. हुसेन त्याचे नाव आहे. तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.
वेताळ
तो देखिल अशीच स्त्रीपुरुषाची नागडी चित्रे काढतो.
भारतातील म्हातारा एम एफ हुसैन काढतो ना अशी चित्र पण कोणाची काढतो हिंदु देवदेवतांची काढतो म्हणुन तर आपल्या पार्श्वभागाला पाय लावुन कुवैतच्या आश्रयाला पळाला आहे
त्याच्या पश्चात देखिल असेच कौतुक पर लेख येतील.
किव येते तुमच्या बुध्दीची अहो
लुई़ज बूर्ज्वा ह्या बाईने कोणत्या जाती धर्माच्या देवदेवतांचा अपमान केलेला दिसत नाही पण ह्या म्हातारा एम एफ हुसैन समस्त हिंदु धर्माचा अवमान केला त्या म्हातार्या बद्दल एव्हडा कळ्वळा का बुवा ?
तुम्हाला
(आग्यावेताळ ) घाश्या कोतवाल
माझ्या बुध्दीची किव केल्याबद्दल धन्यवाद रे. :D
तुझी बुध्दी महान आहे रे.
आम्ही बिचारे गरीब बापडे...कोणी काय बोर्ड वर चितारतो, कोणी वेडेवाकडे काही तरी शिल्पे बनवतो त्यातुन आम्ही कसला अर्थ काढणार? वरील चित्रात कुठे काय बनवले आहे हेच समजले नाही. वाचल्यावर समजले.मग बघ किती बुध्दी कमी आहे ते. =))
मला हुसेनबद्दल कळवळा किंवा तिरस्कार काही नाही आहे.मला फक्त तो इतका प्रसिध्द कसा झाला ह्याबद्दल कुतुहल आहे बाबा. ;)
वेताळ
पुरुषाने अशी (बंडखोर) अभिव्यक्ती केली असती, तर त्याचे स्वागत कसे झाले असते, असा एक प्रश्न आला आहे. यात 'पुरुषाने' 'अशी' आणि 'बंडखोरी' याबद्दल थोडा खुलासा करावा लागेल:
'बंडखोरी'च्या मागे साधारणतः दमनाची पार्श्वभूमी असते. उदा: लुईजची बंडखोरी ही पुरुषप्रधान संस्कृतीत होणार्या स्त्रीच्या लैंगिक व सामाजिक दमनाविरोधात होती.
बंड करणार्याची ओळख 'पुरुष' ही असेल, तर हे दमन त्याच्या पुरुष असण्याशी संबंधित असावे लागेल. म्हणजे दलित लेखकांनी मराठी साहित्यात केलेली वाटचाल बंडखोरी असूनही ती यात मोडणार नाही, कारण ती 'पुरुष' या ओळखीपेक्षा 'दलित' या ओळखीतून झालेली होती.
'अशी' (म्हणजे लुईजसारखी): लुईजची बंडखोरी ही लिंगविशिष्ट दमनाविरुध्द होती, म्हणून त्यात (धक्कादायक वाटू शकतील अशा) लैंगिक प्रतिमा होत्या.
त्यामुळे 'पुरुषाची' 'अशी' अभिव्यक्ती बंडखोर ठरण्यासाठी त्यामागे पुरुषाच्या लिंगविशिष्ट दमनाची पार्श्वभूमी असावी लागेल. म्हणून (उदा.) निव्वळ उत्तान बायकांच्या प्रतिमा एखाद्या पुरुषाने आज या संस्थळावर टाकल्या, तर ती अशी बंडखोरी होणार नाही, पण जर कधीकाळी अशी वेळ आली की या संस्थळावर शाहरुख खानचे (पक्षी: आकर्षक पुरुषाचे; चूभूद्याघ्या ;-) ) छायाचित्र चालेल, पण मधुबालाची हास्यमुद्रा (पक्षी: आकर्षक स्त्री प्रतिमा; यात बहुधा चूभू नसावी :-) ) संपादित होईल, तर मग वरचे ओष्ठनलिकेसहित स्त्रीमुखाचे छायाचित्र टाकणे, ही एक (लैंगिक प्रतिमा असणारी) पुरुषी बंडखोरी होऊ शकेल.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
पटण्यासारखा फरक आहे. "बंडखोरी"चे चांगले विश्लेषण.
मालकाने नोकराची वेंगाडून नक्कल करून निर्भर्त्सना केली तर आपण त्याला "छळ" म्हणू "बंडखोरी" नाही. मात्र नोकराने मालकाची वेंङाडून नक्कल केली तर अपण त्याला "बंडखोरी" म्हणू.
प्रतिक्रिया
ह्मम्म...ने
जगदंब ...
खोडसाळ नि डेन्जर
अगायायाया
प्रतिसाद
असेच म्हणतो...
कदाचित
उत्तम
उत्तम परिचय
ओळख आवडली
+१
लै भारी.
अफाटच आहे!
ओळख आवडली.
Probably Emotional Insecurity has made them so rebellious...
डोक्यात येणारे प्रश्न
दादा
दादा
१. दादा
प्रतिमांचे अर्थबोधन
उत्तम
प्रतिसाद आवडला
मॅपलथॉर्प
लेखाच्या
अतिशय
अभिव्यक्ति स्वातंत्र्य
चिंतुभाऊ
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म......
ह्म्म ह्म्म ह्म्म ह्म्म......
तो देखिल
धन्यवाद रे कोतवाला....
वेताळाच्य
उत्तम
पुरुषाची अशी बंडखोरी
- 'बंडखोरी'च्या मागे साधारणतः दमनाची पार्श्वभूमी असते. उदा: लुईजची बंडखोरी ही पुरुषप्रधान संस्कृतीत होणार्या स्त्रीच्या लैंगिक व सामाजिक दमनाविरोधात होती.
- बंड करणार्याची ओळख 'पुरुष' ही असेल, तर हे दमन त्याच्या पुरुष असण्याशी संबंधित असावे लागेल. म्हणजे दलित लेखकांनी मराठी साहित्यात केलेली वाटचाल बंडखोरी असूनही ती यात मोडणार नाही, कारण ती 'पुरुष' या ओळखीपेक्षा 'दलित' या ओळखीतून झालेली होती.
- 'अशी' (म्हणजे लुईजसारखी): लुईजची बंडखोरी ही लिंगविशिष्ट दमनाविरुध्द होती, म्हणून त्यात (धक्कादायक वाटू शकतील अशा) लैंगिक प्रतिमा होत्या.
त्यामुळे 'पुरुषाची' 'अशी' अभिव्यक्ती बंडखोर ठरण्यासाठी त्यामागे पुरुषाच्या लिंगविशिष्ट दमनाची पार्श्वभूमी असावी लागेल. म्हणून (उदा.) निव्वळ उत्तान बायकांच्या प्रतिमा एखाद्या पुरुषाने आज या संस्थळावर टाकल्या, तर ती अशी बंडखोरी होणार नाही, पण जर कधीकाळी अशी वेळ आली की या संस्थळावर शाहरुख खानचे (पक्षी: आकर्षक पुरुषाचे; चूभूद्याघ्या ;-) ) छायाचित्र चालेल, पण मधुबालाची हास्यमुद्रा (पक्षी: आकर्षक स्त्री प्रतिमा; यात बहुधा चूभू नसावी :-) ) संपादित होईल, तर मग वरचे ओष्ठनलिकेसहित स्त्रीमुखाचे छायाचित्र टाकणे, ही एक (लैंगिक प्रतिमा असणारी) पुरुषी बंडखोरी होऊ शकेल. - चिंतातुर जंतू :S "ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त | भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||पटण्यासारखा फरक
पटण्यासार
छान ओळख