तुम्हाला काय /कोण सेक्सी वाटते

शुचि's picture
शुचि in काथ्याकूट
21 Jun 2012 - 7:37 am
गाभा: 

इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-

From May 30, 2012

याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.

मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)

माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

21 Jun 2012 - 7:54 am | चौकटराजा

बेळगावचे चित्रकार के बी कुलकर्णी यांच्या चित्रातील पाठमोरी ललना . तसेच चित्रकार प्रताप
मुळीक यांच्या शैलीत साकार होणारी ललना " सेक्सी" वाटते. मादक असा सेक्सीचा अर्थ घेतला
आहे.

केवळ एक कुतूहल म्हणून विचारते - पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते :) ....... मला स्वतःला मिस्टरी (गूढता/सुप्तता) चे खूप आकर्षण वाटते. जसे सर्क द्यु सोलेल या लास व्हेगास ला होणार्‍या कार्यक्रमाचे अनेक प्रकार आहेत पण मला त्यातील त्यातील सर्क द्यु सोलेल- मिस्टीर हाच पहावासा वाटतो.

पक पक पक's picture

21 Jun 2012 - 9:08 am | पक पक पक

पाठ आकर्षक वाटते की चेहेरा लपविलेला म्हणजे चित्रातील "मिस्टरी" आपल्याला आकर्षित करते

आता पहिले लक्ष पाठीकडेच गेले असणार ना ,अन पाठ सेक्सी दिसल्यामुळेच मग चेहरा पहाण्याची उर्मी मनात दाट्ली असेल....

मराठमोळा's picture

21 Jun 2012 - 7:54 am | मराठमोळा

ह्म्म्म्म्म्म,
सेक्सी य शब्दाची व्याख्या आधी तयार करावी लागेल. सुंदरता आणि शृंगार या दोन भिन्न गोष्टी आहेत.
कुणाला कधी कोण सुंदर वाटेल हा फिजिक्स, केमीस्ट्री आणि बायोलॉजीकल अभ्यासाच्या विषय आहे, तुम्ही म्हण्ता तसं ( तुम्ही स्त्री आहात असं गृहीत धरून) स्त्रीयांना एखादी स्त्री सेक्सी वाटणे, किंवा पुरुषाला पुरुष हादेखील चर्चेचा विषय ठरु शकतो.

लेख आणखी विस्तारीत असता तर मुळ विषय काय आहे आणि चर्चा कशावर करायची हे कळाले असते. ;)

श्रावण मोडक's picture

21 Jun 2012 - 7:56 am | श्रावण मोडक

चरचरीत फोडणी - या लेखाचे शीर्षक.
निःसत्व ढोकळा - लेखनातील आशय.
आजची सकाळ वाईट जाणार होती तर... तरीही हा धागा उघडून ठेवावा म्हणतोय... ;-)

सुनील's picture

21 Jun 2012 - 9:58 pm | सुनील

शीर्षक वाचून अपेक्षा फारच वाढलेल्या होत्या ;)

श्रावण मोडक's picture

27 Jun 2012 - 1:30 pm | श्रावण मोडक

धागा उघडाच ठेवला. सार्थक झाले. आता धागा क्रमांक दोन सुरू करा लेको... लई त्रास होतोय प्रतिसाद शोधताना. ;-)

विकास's picture

21 Jun 2012 - 8:03 am | विकास

वन ओव्हर कॉस सी

मला नीट कळले नाही :( वन ओव्हर कॉस सी म्हणजे? कृपया विस्तार करावा

विकास's picture

21 Jun 2012 - 8:11 am | विकास

1/cos c = Sec C शिंपल गणित (पाश्चिमात्य पद्धतीने, वैदीक नाही. ;) )

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 10:34 am | बॅटमॅन

हेहेहेहे हा तर आपला ष्ट्यांडर्ड प्रतिसाद ;)

सुनील's picture

21 Jun 2012 - 9:45 pm | सुनील

शिंपल गणित (पाश्चिमात्य पद्धतीने, वैदीक नाही.

हे हो काय विकासराव? तुम्हाला त्रयोगुणमितिदर्शनम् ह्या प्राचीन ग्रंथाबद्दल काहीच माहिती नाही? ;)

सोत्रि's picture

21 Jun 2012 - 9:02 am | सोत्रि

जसा Fuck हा शब्द नाम, क्रियापद, उभयान्वयी अव्यय, विषेशण, क्रियाविषेशण असा कसाही वापरला जाण्याच्या ताकतीचा आहे, तसाच Sexy हा शब्द. त्याची व्याप्ती फार मोठी आहे.

ह्या लेखात नेमके काय अपेक्शित आहे ते कळल नाही सबब माझा पास.

-( सेक्सी) सोकाजी

"FUCK" वर ओशोंची क्लीप ऐकली असेलच... ;-)

[इच्छुकांनी व्यनी करावा.]

टवाळ कार्टा's picture

21 Jun 2012 - 4:29 pm | टवाळ कार्टा

मला पाहीजे

आशु जोग's picture

22 Jun 2012 - 11:24 pm | आशु जोग

>> -( सेक्सी) सोकाजी

असं स्वतःनीच म्हणायचं वाटतं

सहज's picture

21 Jun 2012 - 9:20 am | सहज

सेक्सी ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय घ्यायचा?

१) provoking or intended to provoke sexual interest:
२) interesting, exciting, or trendy:

१) म्हणजे बघा रिचर्ड गिअर चा संयत अभिनय पाहून हा इसम आत्ताच्या आत्ता माझ्या मिठीत असावा आणि...

२) की अरे वा! जर अशी भुमीका कोण्या अन्य अभिनेत्याला करायची झाली तर त्याने ही अशी करावी , आदर्शवत, चपखल, योग्य वढवलेली, परफेक्ट भूमीका. इतकी मी ह्या खोट्या खोट्या कथेतही स्व:ताला हरवून बसले. असा अर्थ?

अजुन काही उदाहरणे म्हणजे..

१) हा शर्ट/ड्रेस माझ्या जोडीदाराने घातला तर मला आत्ताच्या अत्ता त्याला/तिला ....

२) एखादी म्हणेल हा दागिना मी घातला तर माझा मूड दिवसभर छान असतो, अमुक ब्रँड्चा पर्फ्युम सकाळी लावला तरी अगदी रात्रीपर्यंत टिकतो. ह्या हेअरकट मधे मीच मला सुंदर वाटते.
एखादा म्हणेल अमुक गॅजेट/ऑब्जेक्ट घेउन बरेच दिवस झाले तरी आजही ते नव्या सारखे सुंदर दिसते, तितकेच इफिशियंटली चालते. अमुक खेळाडू आज अगदीच भारी खेळला, सचिनने मारलेले स्ट्रेट कट, कव्हर ड्राईव्स..

-------

भाग १ जो आहे त्याला सेक्सी म्हणणे हे साधारणता विशिष्ट एन्ड रिझल्ट ओरीएन्टेड असते. व भाग २ आहे जो स्वताचाच मूड चांगला करतो, फिल गुड रिलेटेड विदाउट द नीड ऑफ अनदर पर्सन ऑर फिजीकल अ‍ॅक्शन.

अवांतर - माफी मागतो.
मला वाटते सेक्सी हा शब्द न वापरताही तितकाच/तोच निर्मल आनंद विविध क्रियांमधे उपभोगता येण्यासारखा आहे. तो शब्द वापरुन आपण काहीतरी स्पेशल, हिप, ट्रेंडी आहोत हेच दाखवायचे असेल तर तो हेतू साध्य होत असेलही म्हणा. मला पडणारा प्रश्न सेक्सी हा शब्द उच्चारायची गरजच का पडते? हा शब्द न वापरता कोणताही अंतिम हेतू सहजसाध्य आहेच. इथे मला फक्त वरणभात भाषा, शी बै अच्र्त बाव्ल्त असे काही म्हणायचे नाही. ललित लेखकाला स्व:ताच्या भाषेत जे काय लिहायचे आहे त्याच्या स्वातंत्र्याचा आदर आहेच. पण बोलाचालीच्या भाषेत, एकमेकांशी सार्वजनीक संवादात गरज आहे? हे असे एक एक शब्दाचे स्वातंत्र्य घेत पुढच्या पिढीला जास्त ज्ञानी करत, आपण त्यांची निरागसता लवकर तर संपवत नाही आहोत ना? अशी एक शंका येते. होपफुली आय एम राँग. पण लहान मुलांची निरागसता जितकी जास्त जपता येईल तितकी जपावी असे मला तरी वाटते. मागे लिटील चँप्स की तसल्याच एका कार्यक्रमामधे सेक्सी सेक्सी शब्द असलेली गाणी ८ - १० वर्षाची लहानगी म्हणाली होती असे अंधुकसे आठवते. किंवा अगदीच "प्रौढ" असे अंगविक्षेप नाचात बसवणे हेही आढळते. अर्थात हे माझे मत आहे. इतरांवर लादण्याचा प्रकार नाही.

सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय? असो हे अवांतर फार झाले. शुचिताई माफ करा.

एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच.

सहज कृपया माझा खालचा प्रतिसाद पहा. मी आधी तो प्रतिसाद टंकला आणि मग आपला प्रतिसाद पाहीला. "सेक्सी" शब्द त्या लेखातून जसाच्या तसा उचलला आहे.

सुनील's picture

21 Jun 2012 - 9:55 pm | सुनील

एवढा मोठा प्रतिसाद टाकण्यापेक्षा सहजराव एखादा जहाला आणि मादक लेख का टाकत नाहीत?

सेक्सी, शिट, ओह फक, बास्टर्ड्,अजुन कुठली शिवी, वाऽऽअ अप?, यो मॅन असले शब्द आपल्या रोजच्या शब्द कोशात असायची खरच गरज आहे का? असले शब्द वापरुन वापरुन / तेच लक्षात ठेवून आजवर प्रचलित असलेले त्यातल्या त्यात अलंकारीत, अर्थवाही शब्द आपण विसरत चाललो आहोत काय?

मराठी व्यक्तीला तरी शब्दांची कमतरता पडू नये! :)

एकंदर कोणाला कशात काय वाटतं - यात आता पुन्हा व्यक्ती तितक्या प्रकृती ते तुमचं आमचं सेम असतं अशी आवडनिवड असणारच.
+१

कुणाला मधुबाला मादक वाटते तर कुणाला एक गोड चेहेर्‍याचं पिंप (मराठी शब्द!) वाटतं!

ममो, श्रामो, सोत्रि - सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना.

काहींना स्त्रियांचे "हिप्स स्वे" (नितंबांची डौलदार लय) सेक्सी वाटेल तर कोणाला स्त्रीच्या केवळ नजरेतील जादू, काही पुरुषांना स्त्रियांचे पाय/पाऊले आवडतात तर काहींना ओठ, काही स्त्रियांना पुरषांचे मौन आणि तरीही नजरेतील वचक आवडू शकतो तर माझ्या एका मैत्रिणीला टाय-सूट मधीलच फोटो आवडायचे (डेअर आय से टर्न ऑन करायचे) वेल .........
हे झाले शारीरीक सौंदर्याचे प्रकार

तसेच कला प्रकारही असतील ना जे की धुंदावून सोडतात.

तो विषय आहे. विशेषतः कलाप्रकारातील आपल्याला आवडणारी उदाहरणे. हा विषय मी नीट मांडावयास हवा होता. पण या प्रतिसादानंतर मला वाटते थोडा स्पष्ट होईल.

अर्धवटराव's picture

21 Jun 2012 - 10:17 am | अर्धवटराव

स्त्रियांच्या बाबतीत म्हणाल तर ज्या क्षणी स्त्रि इतर कुठल्याही फाफट पसार्‍यातुन कमोत्तकजतेकडे वळते ( वा एखादी नटी तसा अभिनय करते) तो क्षण मला भयंकर सेक्सी वाटतो. अर्थात, याबाबत एक हाय पास फिल्टर आहे... हुमा खान, मल्लीका शेरावत वगैरे त्यातुन कट होतात.
पंजाबी ड्रेस + लांबसडक केस + जरा उंच बांधा+ गोरा वर्ण + थोडा कडक सुर तुफान सेक्सी वाटतं. सावळ्या वर्णाला टपोरे/मीनाक्षी डोळे (द्विरुक्ती झाली) + सरळ नाक + मंजुळ सुर... एक्दम समा बन गया वाटतं.

काहि भडक रंगांचे कॉम्बीनेशन्स आणि लाईट कलरच्या छटा सेक्सी वाटतात... त्याच्याशी संध्याकाळची शीतल हवा रिलेट करता आली पाहिजे मात्र.

ज्येनुइन मराठी गजल (मालवुन टाक दीप वगैरे), निवांत भाव दर्शवणारे संगीत , पाण्याच्या थेंबांचा हळुवार टप टप आवाज एकदम जानदार.

पेंटींग वगैरे मध्ये म्हणाल तर कमनीय बांधा क्लीक होतो.

असो... यादी बरीच लांब होईल :)

अर्धवटराव

शुचि's picture

21 Jun 2012 - 10:25 am | शुचि

:) क्या बात है! एकदम रसिक प्रतिसाद.

२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला

________________________

ऊऊऊऊऊऊऊऊऊउ........आपण तर लाखोंदा फीदा रीचर्डच्या ' प्रीटी वूमन ' मधल्या अ‍ॅक्टींगवर
:)

शुचि's picture

21 Jun 2012 - 10:30 am | शुचि

हाहा ........ खरच ग. अफलातून आहे. शेवटी दातात गुलाबाचं फूल घेऊन शिडी चढत तो तिच्याकडे जातो ..... एवढा मोठा मिलीयोनेअर (म्हणजे चित्रपटात) , त्यात देखणा, त्यात सौजन्यशीलतेचा कळस पण तिच्यासाठी....... आई ग!!! ..... आणि पार्श्वभूमीवर ते जीवघेणं मधुर संगीत ......... माझं काळीज ठाव सोडतं त्या सीनला :)

दिपक's picture

21 Jun 2012 - 11:03 am | दिपक

होय हाच तो सीन. धन्यवाद शोधून येथे टाकल्याबद्दल.

पण या सीनची जादू संपूर्ण सिनेमा पाहील्यावर , त्या पटकथेच्या पार्श्वभूमीवर पहातानाच कळून येते. असा "एकटा" (आयसोलेटेड) सीन पहाताना मंत्रमुग्ध व्हायला होत नाही. त्या विशिष्ठ जिगसॉ पझलमध्येच तो फिट बसतो.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jun 2012 - 11:14 am | प्रभाकर पेठकर

सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे, आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही धरा ना.

व्याख्या काही पटली नाही.

'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' इथेच 'सेक्सी' शब्दाची व्याक्या संपते. (असे मला वाटते).

आव्हानात्मक, संमोहीत करणारे, धुंदावणारे, वेडावणारे यापैकी सर्व अथवा काहीही..... ह्यात 'सेक्सी' काय आहे?

चित्रकाराला एखादे चित्र, छायाचित्रकाराला एखादे दृश्य, एखादी प्रकाश योजना, कुस्तीगिराला एखादी ,तगड्या पहिलवानाबरोबरची, कुस्ती आव्हानात्मक वाटू शकेल पण ती 'सेक्सी' कशी होईल?

एखाद्या फर्ड्या वक्त्याचे भाषण 'संमोहित' करणारे असू शकते पण म्हणून ते काही 'सेक्सी' ठरत नाही. इथिओपियाच्या 'त्या' उपासमारीने मरणासन्न बालकाचे आणि त्याच्या मरणाची वाट पाहणार्‍या गिधाडाचे छायाचित्रही एखाद्याला संमोहित करेल अशा ताकदीचे होते पण ते 'सेक्सी' नव्हते.

'धुंदावणारे' 'वेडे करणारे' ('वेडावणारे' नाही. त्यात एकाने दुसर्‍याला 'वाकुल्या' दाखविणे अभिप्रेत आहे) निसर्गात खुप काही आहे. पावसाळ्यातील हिरवागार निसर्ग, थंडीत धुक्यात लपेटलेला परिसर, मस्त मातीचा सुगंध, फुलांचा सुगंध 'धुंदावणारा' असू शकतो.

व्याख्येतील 'सेक्सी म्हणजे मादक, कामोत्तेजीत करणारे' असा थेट अर्थ घेतला तर ती एक भावना असल्याकारणाने सर्वांसारखी समान असू शकत नाही. ती २ +२ = ४ इतकी रुक्ष, व्यावहारीक नसते. व्यक्तीगणिक बदलणारी असते. पुरुषाला स्त्री आणि स्त्रिला पुरुष 'सेक्सी' वाटणे नैसर्गिक आहे. (पुरुषाला पुरुष आणि स्त्री ला स्त्री 'सेक्सी' वाटू शकते पण तो वेगळा आणि गहन विषय बाजूला ठेऊ या.)

पुरुषांच्या 'सेक्सी' स्त्री बद्दलच्या कल्पनांमध्ये स्त्रियांच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा समावेश असतो. सुंदर चेहरा, गोरा रंग, प्रमाणबद्ध-बांधेसूद शरीर, आवाजातील गोडवा, उंची, चालण्याची, बोलण्याची लकब इ.इ.इ. सर्वसाधारण बाबी असल्या तरी व्यक्तिमत्त्वातील 'चुंबकिय आकर्षकता' (Magnetism) ह्याचीही प्रखर भूमिका 'सेक्सी' शब्दात सामावलेली आहे. एखाद्याला सावळा रंग, किंचित घोगरा आवाज, मादक डोळे, हाताचे थंडगार तळवे, काहीही उद्दीपित करू शकतात. त्याच्यासाठी त्या एका वैशिष्ट्यासाठी ती स्त्री 'सेक्सी' वाटत असते.

काही जणांना ऐश्वर्या राय 'सेक्सी' वाटते तर काही जणांना सुश्मिता सेन तिच्या आकर्षकतेमुळे 'सेक्सी' वाटते. माधुरी तिच्या अदांमुळे 'सेक्सी' वाटते तर हेलन तिच्या कॅब्रे मुळे 'सेक्सी' ठरायची. व्यक्ती तितक्या प्रकृती आणि आपापल्या प्रकृतीला झेपतील अशा 'सेक्सी'पणाच्या कल्पना.

मृगनयनी's picture

21 Jun 2012 - 12:29 pm | मृगनयनी

पेठकरांचा प्रतिसाद जास्त प्रगल्भ वाटतोय!!...

रच्याकने, मला तर बॉलिवुड'मध्ये 'कल्की कोलचीन' जास्त सेक्सी वाटते!!! ;) ;) ;)

उगीच का अनुराग'सारख्या काश्यप'कुलवन्शीयाने ती'स आपली धर्मपत्नी बनविले!!! ;) =)) =)) =))

पेठकर जी, वरती मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे. यामध्ये त्यांनी सारा बरस या नर्तकीचे नृत्य उल्लेखिले आहे. तिच्या हातांच्या "एलेगंट" (सुडौल) हालचाली आणि विशेषतः तिने नृत्यसमयी हाती घेतलेला गुलाब.

"त्यांच्या मते" तिचे नृत्य सेक्सी आहेच. पण ते हा प्रश्न करतात की गुलाबाहून सेक्सी काय असू शकते? आता बोला.

या लेखात त्यांनी जी जी उदाहरणे दिलेली आहेत ती याच वस्तुस्थितीकडे अंगुलीनिर्देश करतात की या शब्दाचा अर्थ कामोत्तेजना इतका कोता नसून त्याची व्याप्ती अधिक आहेच पण त्याहूनही एक सुंदर वस्तुस्थिती मला जाणवली ती ही की - कलाप्रियता आणि संवेदनशीलता यांच्या बेमालूम मिश्रणातून खूप उत्तम कलाकृती आपल्याला मानसिक पातळीवर "सेक्श्युअली अपील" होत असतात. आपल्याला ते जाणवतं अथवा नाही हा भाग अलाहिदा.

प्रभाकर पेठकर's picture

21 Jun 2012 - 1:13 pm | प्रभाकर पेठकर

शुची जी,

मी जो लेख उधृत केला आहे, त्याचे लेखक आहेत - नाओम श्पॅन्सर - मानसशास्त्राचे एक प्राध्यापक. त्यांनी स्वतः जालावरील "त्यांना" सेक्सी वाटणार्‍या कलाकृतींचा मागोवा घेतला आहे.

संपला विषय. एखाद्या मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने केलेली विधाने खोटी ठरविणारा मी कोण?

मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. ह्या वाक्याने माझी फसगत झाली.

फक्त मिपाकरांनाच काय पण, एकूणात पुरुषजातीला काय 'सेक्सी' वाटत असेल, ह्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न माझ्या कुवती नुसार मी केला.

अर्थात, मानसशास्त्राच्या प्राध्यापकासमोर माझ्यासारख्या शरीरशास्त्राच्या अभ्यासकाच्या मतांना कोण विचारतो? जाऊ दे.

नाही नाही. आपण म्हणालात तेच त्यांनीही म्हटले आहे. २+२=४ अ॑से गणित येथे लावता येत नाही. ही भावना असल्या कारणाने मूल्यमापन करता येत नाही. आपला प्रतिसाद प्रगल्भ आहेच आहे.

त्या प्राध्यापकानेदेखील हेच म्हटले आहे की ही निसरडी व्याख्या उदाहरणांच्या द्वारे मांडायचाअल्पसा॑ प्रयत्न ते करत आहेत.
(The following is a sampling of sexy web finds: clips of art, dance, film and music that capture-for me-the slippery, intoxicating essence of what sexy is.)

शेवटी ठुमकते शरीर असो किंवा त्याला मिळालेली अमूर्त गोष्टींची जोड असो, आरूनफिरून सेक्श्युअली अपील होण्यापर्यंतच गाडी आली ना? विषय कट. सेक्स म्हणजे या ना त्या प्रकारे कामोत्तेजना होणे हाच ढोबळ आशय तुमच्या प्रतिसादावरून जाणवतो आहे.

पेठकरकाका तरी यापेक्षा वेगळे असे काय म्हणाले?

निखल्या कै तरी गफलत होतेय तुझी
' सेक्स ' नै रे ' सेक्सी '
अर्थ बदलतात की रे :(

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 11:17 pm | बॅटमॅन

सेक्स हे नाम तर सेक्सी हे विशेषण, जरा गफलत झाली तरी भापो तीच गं.

निखल्या कै तरी गफलत होतेय तुझी
' सेक्स ' नै रे ' सेक्सी '
अर्थ बदलतात की रे :(

lakhu risbud's picture

21 Jun 2012 - 11:33 pm | lakhu risbud

पेठकर काकांचा सहजरावांचा,अर्धवटरावांचा प्रतिसाद आवडला.

पुरुषाम्च्या बाबतीत सेक्सी की काय ते कसे ठरवायचे?
शोलेतला राकट अमजद खान सेक्सी ठरतो का?
सलमान खानप्रमाणे बर्‍याच चित्रपटातला उघडावाघडा हरीष पटेल सेक्सी ठरतो का?
नाजूक चणीचा शाहीद कपूर सेक्सी ठरतो का?
देखणा दिसणारा फिरोज खान सेक्सी ठरतो का?
बुलंद गडगडाटी आवाजाचा अमरीश पुरी सेक्सी ठरतो का?
स्लीम देव आनंद /ढोल्या राजकपूर / सदैव गंभीर दिलीप कुमार/ चौकोनी ठोकळा विश्वजीत यापैकी कोणाला सेक्सी म्हणता येईल?

नाना चेंगट's picture

23 Jun 2012 - 11:40 am | नाना चेंगट

आणि डोक्यावर केस नसलेला शाकाल?

स्पा's picture

21 Jun 2012 - 11:44 am | स्पा

अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत . :-)

अनसेक्सि स्पा

शैलेन्द्र's picture

21 Jun 2012 - 1:44 pm | शैलेन्द्र

"अनसेक्सि स्पा"

सविस्तर खुलाशाबद्दल अनेकांनी धन्यवाद दीले असतील.. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 6:50 pm | अत्रुप्त आत्मा

सविस्तर खुलाशाबद्दल अनेकांनी धन्यवाद दीले असतील..

शैलेन्द्र's picture

21 Jun 2012 - 1:50 pm | शैलेन्द्र

प्रकाटाआ ;)

तिमा's picture

21 Jun 2012 - 8:50 pm | तिमा

अविनाश कु. श्रिराम दिवट आदि मान्यवरान्च्या प्रतिक्शेत

या प्रतिसादावरुन 'कुणाच्यातरी पंचांगात बारा महिने भाद्रपद' असा मागे एक वाचलेला शेरा आठवतो. तो आठवून हंसू आले.
बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.

बाकी 'कुणाला काय सेक्सी वाटेल ते आजकाल सांगता येत नाही ,' हे निरीक्षण नोंदवतो.

हाहा ..... खाली संजयजींनी म्हटले आहेच आजकाल मुली काहीही सेक्सी म्हणतात. काय सेक्सी चहा आहे वगैरे =))
मी कवाची त्यावरून हसतेय.

एमी's picture

21 Jun 2012 - 9:10 pm | एमी

फारच उशिरा कळलं तुम्हाला...'सेक्सी नुडल्स' हा शब्दप्रयोग मी २००२ मधे ऐकलाय...

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 12:40 pm | परिकथेतील राजकुमार

उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-

ते होकारार्थी उद्गार म्हणजे खरेतर एका प्रसिद्ध वन लाइनरची कमाल आहे.
"Sex is not the answer. Sex is the question. 'Yes' is the answer."

जे.पी.मॉर्गन's picture

21 Jun 2012 - 12:47 pm | जे.पी.मॉर्गन

पुढच्या कट्ट्याला हा विषय झीरो अवरला चर्चिला जावा अशी मागणी करत आहे. मला खात्री आहे की २ - ४ पेग्जनंतर अश्या प्रतिक्रिया यायला लागतील की एक ग्रंथ छापायला लागेल ! 'सेक्सी' म्हणजे काय हे असं शब्दांत मांडण्यासारखं नाही हो शुचितै ! उगाच एक विचारचक्र सुरू केलंत.

छ्या... कुठून हा धागा वाचायला घेतला... आत वाचनखुण मारावी लागणार ! ;)

जे पी

ग्रंथ नाही, ग्रंथमाला म्हणा जेपी साहेब ;)

जुन्या जमान्यातील हुमाखान, बिंदु, सिल्क स्मिता,हेलन्,जयश्री टी,मेडोना,समंताफॉक्स पासुन ते अलिकडील माधुरी,काजोल, मिनाक्षी श्रीदेवी, मनिषा,केतरीना, प्रियांका पर्यंत ब-याच जणी मला सेक्सी वाटत आल्या आहेत.
माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. ;-)

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 1:01 pm | बॅटमॅन

>>माझा मुड चांगला असतो तेंव्हा ब-याच गोष्टी मला सेक्सी दिसतात आणि मुड खराब असेल तेंव्हा ब-याच सेक्सी गोष्टीं कडे बघुन मुड चांगला बनवतो. Wink

शीक्रेटं अशी उघडत नका जाऊ हो जैपालभौ ;)

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 12:58 pm | चित्रगुप्त

बर्‍याच उद्बोधक चर्चेनंतर आता काही चित्रे बघुया:
या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय?

William-Adolphe Bouguereau (1825-1905) - Admiration (1897)

आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे?

William-Adolphe Bouguereau (1825-1905) - Young Woman Contemplating Two Embracing Children (1861)

कामुकतेपेक्षाही ही चित्र त्यातील कलागुणां मुळे जास्त भावतात:(Amadeo Modigliani ची चित्रे)

द्रौपदी वस्त्र-हरणाचा ग्रीक अवतार ?

Jean-Léon Gérôme, Phryne revealed before the Areopagus (1861)

प्राचीन रोम मधे बोली लावून अशीही खरेदी करता यायची :

Jean Leon Gerome Selling Slaves in Rome

देरे कान्हा...चोळी अन लुगडी (पहाडी शैली):

फ्रेंच चित्रकार Jean Jacques Henner याचे एक म्युझियमच आहे, त्याची दोन चित्रे:

(सर्व चित्रे विक्कीमिडियावरून साभार).

या चित्रमय प्रतिक्रियेवरती निव्वळ नि:शब्द झालो आहे ;)

शुचि's picture

21 Jun 2012 - 1:18 pm | शुचि

"प्राचीन रोममधील बोली" चित्रातील रूपगर्विता आवडली. कांती, केसांचा रंग, शरीराची पुष्टता सर्वच. खालील प्रेक्षकवर्गातील खळबळ पाहता ती निर्विवाद सौंदर्यवती आहे असे वाटते. - हे माझे, सर्वसामान्य व्यक्तीचे मत.

आपल्यासारख्या ज्येष्ठ (मानाने) चित्रकाराचे मत वेगळे असू शकेल.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार

वरची दोन बालकांची चित्रे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया तद्दन अनावश्यक आणि चुकीच्या वाटल्या.

शुचि's picture

21 Jun 2012 - 1:36 pm | शुचि

अनुमोदन :(

चित्रगुप्त's picture

21 Jun 2012 - 1:51 pm | चित्रगुप्त

...वरची दोन बालकांची चित्रे आणि त्यावरच्या प्रतिक्रिया तद्दन अनावश्यक आणि चुकीच्या वाटल्या...

त्या दोन चित्रांविषयी मी जे प्रश्न उपथित केले आहेत, त्यांची माझ्यामते उत्तरे अशी आहेतः
१. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय?
उत्तरः नाही. त्रिवार नाही.
२. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे?
उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.

फ्रॉईडची इडिपस कॉम्प्लेक्सची थियरी आठवली.

+१ पण त्या थिअरीनुसार its both ways...isnt it?

परिकथेतील राजकुमार's picture

21 Jun 2012 - 2:07 pm | परिकथेतील राजकुमार

त्या दोन चित्रांविषयी मी जे प्रश्न उपथित केले आहेत, त्यांची माझ्यामते उत्तरे अशी आहेतः
१. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय?
उत्तरः नाही. त्रिवार नाही.
२. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे?
उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.

दोन्ही उत्तरे जर नाही अशी असतील तर मग ही चित्रे इथे टाकण्याचे प्रयोजनच काय ? आणि मुळात चित्रे टाकताना तुम्ही फक्त प्रश्नच विचारलेले आहेत, त्या चित्रांना विरोध झाल्यावरती तुम्ही उत्तरे घेऊन हजर झालात.

लेखकाने स्वतः, अथवा त्यांना शक्य नसल्यास संपादकांनी प्रतिसादात योग्य तो बदल करावा. अशी चित्रे टाकून विनाकारण वाद माजणे योग्य नाही.

संजय क्षीरसागर's picture

21 Jun 2012 - 10:19 pm | संजय क्षीरसागर

Amadeo Modigliani ची पेंटीग्ज सोडली तर बाकी सगळी पेंटीग्ज एकसोएक आहेत. अत्यंत नजाकतीनं रेखाटली आहेत आणि सर्वांच्या चेहेर्‍यावर निरागसता आहे. चित्रगुप्त कलाकार आहेत त्यामुळे न्यूडिटी बद्दल त्यांचा दृष्टीकोन व्यापक आहे, त्यांचा प्रतिसाद थोडा हुकला असला तरी ते नाऊमेद होऊ नयेत असं वाटतं.

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 11:39 pm | बॅटमॅन

+१.

असेच म्हणतो.

प्रदीप's picture

29 Jun 2012 - 8:33 pm | प्रदीप

१. या ललनांना हे बालक 'सेक्सी' वाटते, असे म्हणावे काय?
उत्तरः नाही. त्रिवार नाही.

मग, तुमच्या मते त्यांना त्या बालकाबद्दल काय वाटत आहे, किंबहुना त्या सगळ्या स्त्रीयांचे नक्की काय चालले आहे, असे तुम्हाला वाटते, ह्याविषयी काही लिहा की? (का 'द स्क्रीम' प्रमाणे हेही काही अति तरल, गूढ वगैरे आहे?)

२. आणि या बालकांना एकमेकांविषयी वाटणार्‍या आकर्षणाला काय म्हणायचे?
उत्तरः काहीही म्हणू नये. बर्‍याच गोष्टी शब्दात व्यक्त करता येण्याजोग्या नसतातच मुळी. अश्या उहापोहात पडण्याऐवजी चित्राच्या सौदर्‍याचा आस्वाद घ्यावा.

महा भंपक उत्तर. कसले घंटा सौंदर्य आहे त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्‍हेने सगळे चितारले आहे.

माझी वरील दोन्ही प्रश्नांना उत्तरे अशी आहेतः

१. होय.
२. बालसुलभ कुतुहल.

+१
'कसले घंटा सौँदर्य त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्हेने सगळे चितारले आहे' ही दोन वाक्ये सोडून बाकी सर्व प्रतिसादाशी सहमत.

अर्धवटराव's picture

30 Jun 2012 - 2:35 am | अर्धवटराव

सौंदर्याचा नवीन प्रकार कळाला... "घंटा सौंदर्य"
म्हणुन तर मिपा आवडते आपल्याला.

अर्धवटराव

चित्रगुप्त's picture

30 Jun 2012 - 4:55 am | चित्रगुप्त

@ ... कसले घंटा सौंदर्य आहे त्या चित्रात? अगदी गुळगुळीत तर्‍हेने सगळे चितारले आहे....

.... अगदी गुळगुळीत तर्‍हेने रंगवलेल्या चित्रांत सौंदर्य खरोखरच नसते, तर ते कुणालाही जाणवले नसते, जसे खरोखरच्या दाट अंधारात कुणालाही दिसत नाही... बाकी कुणी डोळे मिटून म्हणत असेल की मला दिसत नाही, तर त्याला एवढेच म्हणू शकतो, अरे बाबा डोळे तर उघड.
...आधुनिक कलेच्या प्रादुर्भावापासून असा प्रचार केला गेला, की त्यापूर्वीची सर्व कला ही हीन दर्जाची होती, आणि आधुनिक कलाच काय ती खरी कला होय.... याउलट पूर्वीची यथातथ्य चित्रणाची कला हीच श्रेष्ठ कला, आधुनिक कला म्हणजे भ्रष्ट, बेगडी, विकृत कला, अश्या दुसर्‍या टोकाचा प्रचारही केला जातो.
... अश्या प्रकारच्या सर्व प्रचारांमागे काही विशिष्ट लोकांचे (मुखत्वेकरून आर्थिक-) हितसंबंध गुंतलेले असतात. उदा. ज्यांनी अमूक एका प्रकारची कला विकत घेऊन ठेवण्यात पैश्यांची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केलेली असते असे लोक, त्या -त्या कलेचे 'डीलर' व कलावंत, असा सर्व कंपू त्या प्रकारच्या कलाकृतींची किंमत नेहमी चढती राहून फायदा मिळवता यावा, म्हणून अनेक हिकमती योजून त्या कलेचा प्रचार करत असतात. एकाअर्थी यातून अनेक कलावंत, समीक्षक, विद्वान इ. त्यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीत्या खरीदून ठेवलेले असतात, असे म्हणता येईल.
कुणाला काय आवडावे वा आवडू नये, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मामला असला, तरी आपल्या बहुतांश आवडीनिवडी व मते ही कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या प्रचारातून, जाहिरातबाजीतून हेतुतः निर्माण केली गेलेली असतात, हे थोडेसे आत्मपरिक्षण केल्यास ज्याचे त्याला कळून यावे.
अमूक एका प्रकारची चित्रे, संगीत, साहित्य इ. एकाद्याला आवडावे, यात वावगे काहीच नाही, परंतु यामुळे आपण अन्य प्रकातील सौंदर्‍यानुभूतींना वंचित होतो, हेही खरे.

मला स्वतःला प्रगैतिहासिक कलेपासून जगभरात केले गेलेले सर्व प्रकारचे कलाप्रयोग, सर्व प्रकारचे संगीत, हे प्रेक्षणीय-श्रवणीय वाटते. भारतीय राग संगीत ऐकतानाचे निकष पाश्चात्य संगीत ऐकताना लावू नयेत, म्हणजे झाले.
तसेच 'गुळगुळीत' कलेचे निकष 'खडबडीत' कलेला लावू नयेत, अभिजात कलेचे निकष बाल-चित्रकला वा आदिवासी कलेला लावू नयेत, आधुनिक कलेचे निकष जुन्या कलेला लावू नयेत. अश्या प्रकारे ज्यात जे आहे, ते पूर्वग्रह न बाळगता बघावे, यातच सर्व कलांचे रसग्रहण करता येते.

प्रदीप's picture

30 Jun 2012 - 6:37 am | प्रदीप

त्या दोन चित्रांच्या सौंदर्याविषयी-- त्यांच्या ट्रॅडिशनल स्टाईलविषयी-- कसलेही पूर्वग्रह माझ्या मनात नाहीत. पारंपारीक स्टाईल, अथवा आधुनिक स्टाईल, असल्या कुठल्याच कप्प्यात चित्रकला बसवू नये; किंबहुना संगीत, वाड्गमय ह्यातील काहीही अशा तर्‍हेने कसल्याही कप्प्यांत बसवू नये असे मला प्रकर्षाने वाटते. मला स्वतःला जुने हिंदी चित्रपटसंगीत खूप आवडते, त्याबद्दल मी खरे तर पॅशनेट आहे. पण म्हणून तेच तेव्हढे चांगले व आताचे सगळे वाईट्ट- वाईट्ट असा माझा भाव नसतो. मी ह्या नव्या तर्‍हेच्या संगीताशी स्वतःस 'रिलेट' करू शकत नाही, इतकेच मी त्याविषयी म्हणतो. त्याविषयी मी जहरी उद्गार काढत नाही.

मला जे वाटले ते नको तितक्या तिखट शब्दांत सांगितले हे खरे. पण त्याचे कारण तुम्ही ह्या चित्रातून केवळ सौंदर्य पहा, त्यात काय चितारले आहे ह्याकडे दुर्लक्ष करा (तुमचे असे शब्द नव्हते, पण एकंदरीत भाव हा होता) असे गुळमुळीत विधान केले आहेत, ते आहे. चित्र वास्तववादी शैलीतील आहे, त्यात काहीही गूढ, अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आहे असे (मलातरी) दिसत नाही, तसे ते असल्याचे तुम्ही दर्शवत नाही आहात. तरीही त्यात जी घटना आहे, त्याकडे दुर्लक्ष करा, व नुसत्या सौंदर्याचा आस्वाद घ्या, हे कशाला? खरे तर चित्र गुळगुळीत नाही, गुळ्गुळीत तुमचा त्यांच्याविषयींचा येथे दिसणारा अ‍ॅप्रोच आहे.

अलिकडेच व्हिक्टोरीयन काळातील समाजाचे दर्शन घडवणारे 'Mrs. Robinson's Disgrace' हे माहितीपूर्वक पुस्तक गाजत आहे. व्हिक्टोरीयन काळातील ही एक विवाहीत स्त्री एका डॉक्टरच्या प्रेमात पडली. ह्यानंतर तिचे त्या डॉक्टरशी खरोखरीच कसलेही शारीरसंबंध आले किंवा नाहीत, ह्याविषयी नक्की माहिती नाही. परंतु तिच्या रोजनिशीत ती तशा अर्थाने बरेच काही नंतर लिहीत गेली. एकदा तिच्या नवर्‍याच्या हातात ती डायरी पडली. त्याने घटस्फोटाची मागणी केली. त्या केसच्या सुनावणीत, तिच्या रोजनिशीतील नोंदींच्या सत्यासत्यतेविषयी बरीच चर्चा झाली. खरे तसे काहीच घडले नव्हते, ती स्त्री तसे लिहून केवळ तिच्या भावनांना वाट मोकळी करून देत होती, असा युक्तिवाद केला गेला. केसचा निकाल तिच्या विरूद्ध लागला. ही खरेच घडलेली गोष्ट आहे. तेव्हाच्या काळातील युरोपातील समाज किती दबलेल्या स्थितीत होता ह्याची ह्या पुस्तकाच्या निमीत्ताने सध्या चर्चा होत आहे.

तेव्हा ह्या चित्रातही त्या तशा दबलेल्या सेक्सच्या भावनांना, थोड्या विचीत्र (perverted म्हणा, हवे तर) तर्‍हेने पहिल्या चित्रातील स्त्रिया वाट करून देत आहेत का? ह्याविषयी टिपण्णीची आपल्याकडून अपेक्षा होती. अन्यथा हीच चित्रे चर्चेत कशाला? निसर्गचित्रे का नाहीत? (आणि तशी ती येथे टाकली तर त्यांचा मूळ धाग्याच्या चर्चेशी संबंध काय, हा प्रश्न येणारच!) ह्याविषयी तुम्ही मौन बाळगून आहात. तुमची गुळमुळीत उत्तरे वाचून ही चित्रे'तुम्हाला काय/कोण सेक्सी वाटते' ह्या धाग्यावर तुम्ही का टाकलीत, ह्या परिकथेतील राजकुमार ह्यांनी सरळ विचारलेल्या प्रश्नाचे तुम्ही काहीही उत्तर देत नाही. इथेही तुम्ही ह्या चित्रांच्या विषयींच्या तुमच्याच प्रश्नांना ह्यात सेक्सचा संबंध नाही असे सुचवताहात.

एकंदरीत ह्यावरून मला जी. एं. च्या एका कथेतील एका गुर्जीची आठवण आली. ते रस्त्यात दुरून दिसतांच कथानायक आक्रसून जातो. कारण आता ते आपणांस रस्त्यात पकडणार, भवतालाच्या बकाल वास्तवातूनही, डोळ्यातून टिपे काढत, चमचाभर मांगल्य काढणार, ... हे त्याला जाणवले.

चित्रगुप्त's picture

30 Jun 2012 - 10:49 am | चित्रगुप्त

या किंवा अन्य धाग्यात मी जे चित्रमय प्रतिसाद देत असतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो. याचे कारण लहानपणापासून आपल्या कानावर विविध प्रकारचे संगीत पडत असल्याने संगीताविषयी बर्‍यापैकी जाण आपल्यात असते, तसे चित्रकलेकलेविषयी मात्र होताना दिसत नाही. चित्र दिसले, तरी त्यातील कलागुण वा सौंदर्य बघण्यापेक्षा बरेचजण त्यातील अर्थ शोधणे वगैरे उहापोहात अडकतात...

'चित्रे बघायला मिळणे' या हेतुमुळे धाग्याच्या विषयाशी बादरायण संबंध असलेली चित्रे सुद्धा मी देत असतो.

बाकी या दोन्ही चित्रांच्या निर्मितीमागे कलावंताची काय कल्पना होती, वगैरे त्याने लिहून ठेवलेले असल्यास कळू शकेल.(असे लेखन मिळाल्यास कळवावे) अन्यथा ज्याची-त्याची कल्पना.
या धाग्यात 'सेक्सी' या शब्दाच्या अनेक अर्थछटा सांगितल्या गेल्या आहेत. त्यापैकी आकर्षक, प्रेक्षणीय, सुंदर इ.इ. अर्थाने ते बालक त्या स्त्रियांना 'सेक्सी' वाटते आहे, असे म्हणू शकतो, परंतु त्याला बघून त्या कामातुर झाल्या असल्याचे चित्रकाराला दाखवायचे आहे, असे मलातरी वाटत नाही.
दुसर्‍या चित्रातील दोन बालके ही दैवी बालके आहेत की मानवी वगैरे जरा शोध घ्यावा लागेल... त्यातून उलगडा होइल. तुम्ही दिलेले 'बालसुलभ कुतुहल' हा विषय सुद्धा चित्रकाराच्या मनात असू शकतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jun 2012 - 5:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>मी जे चित्रमय प्रतिसाद देत असतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो.

मला आपण डकवलेली चित्र आवडतात. सौंदर्य कलागुण चित्रातुन कसे व्यक्त होतात ते मला समजुन घेण्यास आपले प्रतिसाद मदतही करतात. आपण चित्र डकवीत राहावे. आपले मन:पूर्वक आभार.

-दिलीप बिरुटे

चित्रगुप्त's picture

30 Jun 2012 - 6:34 pm | चित्रगुप्त

...आपण चित्र डकवीत राहावे....
हा प्रतिसाद मला नवनवीन चित्रे हुडकून इथे देण्यास प्रेरणा देत राहील. धन्यवाद.

वॉशिन्ग्टन डीसी च्या " नॅशनल म्युझीअम ऑफ अफ्र्रीकन आर्ट " ह्या म्युझीअम मधल्या एका दालनात अशीच चित्र
प्रदर्शनाला ठेवलि आहेत ,फक्त फोटो काढन्यास मनाई आहे .
पण मला त्या चित्रांमध्ये प्रत्येक स्त्रीच्या चेहेर्‍यावर अगतिकपणा दिसला :(
सेक्सी नाहि वाटले .

सहमत.
अशा चित्रांमधे स्त्रियांच्या चेहर्यावर अगतिक/असहाय्य/लज्जा हेच भाव दिसतात. पण त्याच चित्रांमधल्या पुरुषांच्या चेहर्यावर फारच वेगवेगळे भाव दिसतात. eg Jean Léon Gérôme यांचे Selling slaves in rome आणि Phryne revealed before the Areopagus...what a variety of expressions!!! यामागे पण स्त्रिया दांभिक असतात हेच कारण असेल का? की अशा चित्रांमधे भाव पहायचाच नाही फक्त सौँदर्यच पहायच?
तेच पहिल्या दोन चित्रांमधे स्त्रिया 'बघ्यां'मधे आहेत पण त्यातही चेहर्यावरचे भाव फार काही वेगवेगळे नाहीत. आता याला काय म्हणणार...फारच आतल्या गाठीच्या असतात बॉ स्त्रिया...
पण चित्रगुप्त म्हणतायत त्याप्रमाणे फक्त सौँदर्य/ कलागुण पहावे. उगाच भाव, उद्देश शोधायला जाऊ नये कशाला उगीच डोक्याला ताप किती चान, सुंदर, अप्रतिम म्हणलं की झालं : - )

चित्रगुप्त's picture

2 Jul 2012 - 9:46 am | चित्रगुप्त

चित्रांमधील 'चेहर्‍यावरचे भाव' हे वेगळेच प्रकरण आहे.
माझ्या लहानपणी रघुवीर मुळगावकर यांची चित्रे दिवाळी अंक, कॅलेंडरे, रावळगाव टॉफीचे डबे, इ वर बघायला मिळायची. मराठी लोकात मुळगावकर फार प्रसिद्ध होते. ('रंगसम्राट रघुवीर मुळगावकर यांच्या सिद्धहस्त कुंचल्यातून उतरलेले सप्तरंगी मुखपृष्ठ' अशी जाहिरात यायची)
गंमत म्हणजे त्यांचे कोणतेही चित्र बघितल्याबरोबर "चेहर्‍यावरचे भाव कित्ती सुंदर आहेत ना" असे उद्गार मंडळी काढायची. चित्रातले इतर भाग त्यांनी बघितलेच नाहीत की काय, असे वाटायचे. मला त्या लहान वयातही याचे अंमळ आश्चर्य वाटायचे.

पुढे नववीत असताना मी दासबोध वाचू लागलो, त्यात समर्थ रामदास शिवाजी महाराजांना दूरवरचे काहीतरी (हात उचलून बोटाने) दाखवत आहेत, असे चित्र होते. त्यातील रामदासांचा अगदी बायकी लुसलुशीत हात, दोघांच्या आकृत्यांमधील फिल्मी नजाकत, हे बघून हसू यायचे. हाच विषय मायकेलअँजेलोने कसा हाताळला असता, याची मी कल्पना करायचो. (अर्थात तसे काही करायची माझी स्वतःची लायकी नव्हती)

वरील बुगेरोच्या चित्रासारखे चित्र तयार व्हायला अनेक महिने चित्रावर काम करावे लागते. तसेच प्रत्येक आकृती साठी मॉडेलला त्या त्या पोझ मधे बसवून चित्रण करावे लागते. एवढा दीर्घ काळ चेहर्‍यावर अमूक एक भाव दाखवत बसणे मॉडेलला शक्यच नसते. त्यामुळे बर्‍याच चित्रांमधे खरेतर चित्रकाराने भाव वगैरे मुद्दाम काही केलेलेच नसते. मोघमपणे हसरा, रडका, आश्चर्यमग्न वगैरे चेहरे रंगवलेले असतात. अर्थात काही चित्रे याला अपवाद असतातही. परंतु बहुतेकदा चित्रात 'चेहर्‍यावरचे भाव' दिसणे, हा प्रेक्षकाचा कल्पनाविलास असतो.
प्रेक्षकांच्या-रसिकांच्या एखाद्या चित्राविषयीच्या कल्पना, आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात महदंतर असते, पण बहुतेक चित्रकार याची वाच्यता करत नसतात. ते त्यांचे गुपीत असते.

कुठल्याहि स्त्रीच सौंदर्य भावविरहित पहाण्यात काय मजा?
ज्या स्त्रीच्या चेहेर्‍यावर अगणित भाव ,नखरे ,डोळ्यात दिसणारे ,पापणीत खेळणारे ,गालावर रेंगाळणारे ,ओठावंरचे
चंचल भाव ... हे सगळं दिसतं ती स्त्री सेक्सी दिसते ,मोहक दिसते पण चेहेर्‍यावर शुन्य भाव दिसणारी स्त्री
कशी काय मादक असु शकते ?
तसे भावशुन्य पूरुषही मंद वाटतात मला...
चेहेर्‍यावर लज्जा ( लाज ) दिसण म्हणजे सौंदर्याचा अलंकार ,पण ती लाज जर अगतिकतेमुळे आली असेल तर
ती मादकता नव्हे .

चित्रगुप्त's picture

2 Jul 2012 - 10:01 am | चित्रगुप्त

स्त्रीसौंदर्याविषयी तुम्ही जे लिहिले, ते अगदी उचित आहे, परंतु हे सारे चित्रात उतरवण्याएवढी लायकी फारच कमी चित्रकारांमधे असते.
मी इथे फक्त चित्रांबद्दल बोलत आहे.

चित्रगुप्त ,
साधा सरळ प्रश्न आहे ....
राग येणार नाही अशी खात्रीदेखिल आहे ..
विचारतेच ..
तुम्हि ही चित्र इथे या धाग्यावर दीलीत ...धाग्याच नाव " काय सेक्सी वाटते "
तुमच्या चित्रात नक्की काय सेक्सी वाटतय?
पूरुषांसाठी स्त्रीचं शरीरच सेक्सी ,दुसरा तिसरा विचार त्याच्या मनात येत नाहि ,जोशींची प्रतिक्रिया उत्तम बसते इथे .
पण स्त्रीयांच तस नसतं
स्त्रीच्या मनात एखाद्या पूरुषाचं रूप बसलं की ती नंतर त्याच्यातल्या गुनांमध्ये स्वतहाला इनवोल्व करण्याचा प्रयत्न करते,
त्याच्या बाह्यशरिरापेक्षा त्याच्यात असणार्‍या क्वालिटीच तीला जास्त सेक्सी वाटु लागतात ..
त्याच्या हसण्या बोलण्या ,अगदी त्याच्या चिडण्यावरही फीदा होतात मग.
त्यामुळे अर्थातच अशा चित्रांअकडे बघन्याचा स्त्रीचा द्रुष्टिकोन आणि पूरुषांचा वेगळा पडतो ...आणि म्हणुनच मतभिन्नताही दिसुन येते .

चित्रगुप्त's picture

2 Jul 2012 - 10:38 am | चित्रगुप्त

सेक्सी म्हणजे नेमके काय? याविषयी या धाग्यात अतिशय वेगवेगळे विचार मांडले गेले आहेत.
मी इथे जी चित्रं दिलीत, त्यात मला स्वतःला काहीही सेक्सी वाटत नाही. मी त्यांच्याकडे कलात्मकतेच्या दृष्टीकोनातूनच फक्त बघू शकतो.
मला अनेक गोष्टी आकर्षक, सुंदर, मनोरम, मोहक इ. इ. वाटतात, पण मी त्या मला सेक्सी वाटतात, असे कधीच म्हणणार नाही. या शब्दाचा असा उपयोग करणे मलातरी चुकीचे वाटते.
सेक्सी या शब्दाचा मूळ अर्थ 'कामोत्तेजक', कामातुर करणारे, वा जास्त स्पष्ट म्हणजे 'संभोगेच्छा निर्माण करणारे' असा आहे, आणि त्याच अर्थाने तो वापरला जावा, असे माझे मत आहे.
बाकी मी माझ्या प्रतिसादात जी चित्रे का डकवतो, त्यांचा मुख्य हेतु वाचकांच्या नजरेखालून विविध चित्रे जावीत, हा असतो.
बघा:
http://www.misalpav.com/node/22023#comment-409636

चैतन्य दीक्षित's picture

2 Jul 2012 - 10:46 am | चैतन्य दीक्षित

आमच्या हापिसातून बघताना मिपावरचं एकही चित्र दिसत नाही.
त्यामुळे आमच्यासाठी 'चित्र गुप्त' राहते आणि बाकीच्या मुद्द्यांवरचा गदारोळ तेवढा दिसतो :)

बापरे...गदारोळ वगैरेचा माझा उद्देश नाही हम्म...
@चित्रगुप्त तुमचा वेगवेगळी चित्र देण्यामागचा उद्देश चांगलाच आहे. आणि तुम्हाला त्यात कामातुर वगैरे काही वाटत नाही तेही चांगलच आहे.
फक्त तुम्ही स्वतः कलाकार असल्याने त्या काळची समाज, चित्र काढुन घेणारा व चित्र काढणारा यांची मानसिकता समजाउन सांगाल अशी अपेक्षा होती...परा जास्तच आक्रमकतेने बोलल्याने तुम्ही थोडे कचरताहात असेही वाटलेले...पण तुमच्यामुळेच ती चित्र पहायला मिळाली बाकी माहीती गुगलुन मिळेल.

त्या काळची समाज, चित्र काढुन घेणारा व चित्र काढणारा यांची मानसिकता ... इ.इ. विषयी त्या त्या लोकांनी जर प्रामाणिकपणे खरे खरे जर लिहून ठेवलेले उपलब्ध असेल, तरच ते वाचून काही कळू शकते.
बाकी मी एका प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे बरेच समिक्षक, विद्वान इ. काही विशिष्ट हेतुनेसुद्धा लिहित असतात. ते कितपत ग्राह्य मानावे, हा पण प्रश्न.

प्रदीप's picture

1 Jul 2012 - 6:41 am | प्रदीप

चित्रांशी वाचकांचा परिचय व्हावा, ह्या हेतूने धाग्याच्या विषयाशी बादरायण संबंध असलेली चित्रे आपण डकवत असता, हे समजले. त्याविषयी आनंदच आहे.

पण ह्या धाग्यावरील ती चित्रे डकवल्यावर 'त्या' दोन चित्रांविषयी आपणच धागाविषयाशी संबंधित दोन प्रश्न विचारलेत. बहुधा धागाविषयाशी संबंध अधोरेखित करण्याच्या हेतूने आपण तसे केले असावेत. त्यामुळे, व सदर खुलासा अगोदरच न दिल्यामुळे पुढील चर्चा घडली.

योगप्रभू's picture

21 Jun 2012 - 1:34 pm | योगप्रभू

मिपावरील अजाण बालकांचे चित्त विचलित करणारी ही चित्रमालिका बघून अस्वस्थ झालो. लज्जेने मान खाली गेली (तिथेही सातव्या क्रमांकाची दोन चित्रे दिसलीच.)

पहिल्या चित्रात कोपर्‍यातील राजवाडा आणि एका स्त्रीच्या हातातील गुच्छ लक्षवेधक आहेत. झाडांची पानेही जिवंत वाटतात.

तरुण पिढी कशाला 'सेक्सी' म्हणेल याचा नेम नाही. परवा एक गाणे ऐकले. 'मेरी पँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी'

कैवल्यमूर्ती करुणावतारी!

४थे ५वे छायाचित्र खुप भयानक आहेत.

वपाडाव's picture

22 Jun 2012 - 6:48 pm | वपाडाव

परवा एक गाणे ऐकले. 'मेरी पँट भी सेक्सी, मेरा शर्ट भी सेक्सी'

लै वर्ष कोमात म्हणायचं की?

jaypal's picture

21 Jun 2012 - 1:56 pm | jaypal

पराचे अभ्यासपुर्ण प्रतिसाद पण सेक्सी वाटु लागले आहेत.

पाहता तुम्हाला जास्तीत जास्त `रोमँटिक' इतकंच म्हणायचं असावं पण हल्ली सेक्सी हा शब्द कशालाही वापरतात (म्हणजे मुली सुद्धा `काय सेक्सी चहा आहे!' म्हणतात) म्हणून तुमची गल्लत झाली असावी .

असो, आता इथे आलोच आहे तर नक्की अर्थ असा आहे:

हिंदी चित्रपटातल्या सर्व नट्या सर्वतोपरी अनुभव संपन्न असतात तरीही जी नटी आपल्या देहबोली, मुद्राभिनय आणि संवादातनं तिची ही पहिलीच वेळ आहे असं जास्तीतजास्त निरागसतेनं दाखवते ती सर्वात सेक्सी ! तिला करोडो चाहते आणि अमाप यश मिळतं कारण प्रत्येक चाहत्याला वाटतं की अरे, किती अनभिज्ञ, एकदा आपल्याला भेटायला हवी मग सगळं आगदी हळूवारपणे समजाऊन द्यू !!

सूर्याची प्रार्थना अतिशय आवडत असल्याकारणाने ती टॅग लाईन आहे. आणि ती स्माईली कहर क्यूट आहे :) पण दोन्हींचा माझ्या स्वभावाशी अगदी गाढ संबंध नाही म्हणजे इतका तरी नाही की मी स्वतःला त्या दोहोंतच व्यक्त आणि कैद करेन.

आपला अर्थ आवडला. खूप हसते आहे :)

प्रभाकर पेठकर's picture

21 Jun 2012 - 5:49 pm | प्रभाकर पेठकर

बघ आई आकाशांत सूर्य हा आला, पांघरून अंगावर भरजरी शेला
केशराचे घातले हे सडे भूवरीं, त्यावरून डौलानें ये त्याची ही स्वारी.

ही कविता 'कौन परदेसी मेरा दिल ले गया, जाते जाते मीठा मीठा गम दे गया' ह्या हिन्दी गाण्याच्या चालीवरही म्हणता येते आहे. किंबहुना, जेंव्हा जेंव्हा मी ह्या वरील कवितेच्या ओळी वाचतो तेंव्हा तेंव्हा मला 'कौन परदेसी....' हे गाणेच आठवते.

शुचि's picture

21 Jun 2012 - 6:03 pm | शुचि

मस्त!!! खरं आहे :)

आयला खरंच की! मस्त हो पेठकर काका :)

तिमा's picture

21 Jun 2012 - 8:57 pm | तिमा

या चालीवर ही कविताही सेक्सी वाटू शकेल (गाण्यातली मधुबाला आठवून)

श्रावण मोडक's picture

22 Jun 2012 - 10:44 am | श्रावण मोडक

अनुभव संपन्न असतात तरीही जी नटी आपल्या देहबोली, मुद्राभिनय आणि संवादातनं तिची ही पहिलीच वेळ आहे असं जास्तीतजास्त निरागसतेनं दाखवते ती सर्वात सेक्सी !

नेमकी कसली पहिलीच वेळ? जरा स्पष्ट लिहा की. एवढा खुल्या दिलाचा विषय चाललाय, आणि तुमचं आपलं तत्वज्ञानात्मक गूढ लेखन. ;-)

तर्री's picture

21 Jun 2012 - 5:55 pm | तर्री

भारत्तात , अवळी पडळेला पाऊस मला जाम आवडतो !
काही मुलींचे हसणे ( मा.दि.) फारच मादक असते !
बकुळी आणि रातराणीची फुले , म्हणजे हर्बल वायग्राच !
ओल्ड स्पाईस आफटर शेव चा वास कमालीचा मादक आहे !
भरपूर तंगडतोड , ट्रेक झाल्यावर गार पाण्याची अंघोळ !
थंड्गार संध्याकाळी किशोरी अमोण्करांचा आवाज हा अनुभव घ्याच .आवाज फार मादक आहे !
लग्न / समारंभात , नुकत्यात वयात आलेल्या मुलीने नेसलेली साडी हा फटाकाच !
पाहाटेच्या व सकाळच्या संधिकाली वेळी मोकळा समुद्र किनारा भायाण सेक्सी वाटतो.
हिल स्टेशन वर चे बहुतेक पॉईंट्स ( जेथे भणाण-णारा वारा असतो ) हे विलक्षण ऊत्तेजित करतात.
सध्या पुरे ...काय ?

शुचि's picture

21 Jun 2012 - 6:07 pm | शुचि

क्लास!!!! खूप छान प्रतिसाद. मला बहुतांशी पटला. :)
मजा आली.

नाना चेंगट's picture

21 Jun 2012 - 6:05 pm | नाना चेंगट

सेक्सी का? आम्हाला तर सर्व जगच सेक्सी वाटतं !! :)

शुचि's picture

21 Jun 2012 - 6:38 pm | शुचि

हे मंडल अनेक वर्षांपासून जालावर आहे आणि माझ्या मनावर नेहमी भुरळ घालत आलेले आहे. मंडलाचे नाव आहे "अनाहत चक्र मंडल". हृदयाकाश चक्राशी निगडीत हे मंडल आणि विशेषतः त्याची रंगसंगती, नाजूक पाकळ्या,आकार, चांदणी आकृतीबंध इतके मोहक, जादूमय वाटतात की अधून मधून सारखे हे माझ्या डेस्कटॉपवर पार्श्वभूमी बनून राहते.

कोणाही स्त्रीने या रंगसंगतीचा पेहेराव केला की तो पेहराव मला अतिशय आकर्षक वाटल्याशिवाय राहात नाही असे लक्षात आले आहे.

आमच्या कालिदासरावांनी त्यांच्या मते सेक्सी स्त्रीचे वर्णन मेघदूतात केले आहे, थोड्याफार फरकाने आमचीही तिच व्याख्या आहे. म्हणजे काही "फीचर्स" बद्दल मतभेद होऊ शकतील, पण एकूणात मामला तोच.

"तन्वी श्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्ठी;
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणानिम्ननाभि:;
श्रोणीभारात् अलसगमना, स्तोकनम्रा स्तनाभ्यां;
या तत्र स्यात्, युवतिविषया, सृष्टिराद्येव धातु:||

यात हसणे, बोलणे वैग्रे फीचर्स अ‍ॅड केली की झाली आमची परिपूर्ण 'सेक्साड' सौंदर्यवती :)

रा.रा. मल्लनाग वात्स्यायन यांची सर्वांत लाडकी स्त्री "पद्मिनी" (जोहारवाली नव्हे हां ;)) देखील आमची परम फेव्हरीट आहे हेवेसांनल.

शुचि's picture

21 Jun 2012 - 6:43 pm | शुचि

बॅट्मॅन जमले तर - कालीदासाच्या श्लोकाचा अर्थ द्या ना. पद्मिनी ची लक्षणे जर सार्वजनिक रीत्या सांगता येण्यासारखी असतील तर ती देखील सांगा ही विनंती :)

मेघदूतातला बहुतेक ८४वा श्लोक असावा वरती दिलेला. अर्थ सिंपल आहे-

डोळे, दात, कटि, जघनवक्षादि अवयवांची व तज्जनित गतीची स्पेसिफिकेशन्स दिलेली आहेत.

बाकी पद्मिनीची लक्षणे डीटेलवारी आठवत नाहीत, पण फिगर, स्वभाव, काही अदा, एकूणात अभिरुची व सेक्शुअल आवडीनिवडी या आधारे क्लासिफाय केलेले आहे. आकर्षकपणात तिच्यानंतर उतरत्या क्रमाने येतात त्य चित्रिणी, शंखिनी व हस्तिनी या प्रकारच्या स्त्रिया.

योगप्रभू's picture

21 Jun 2012 - 7:32 pm | योगप्रभू

बॅट्या,
बरेच दिवसांपासून विचारायचं राहून गेलं.
अरे तू नाव नोंदवलयस का?
मतदार यादीत रे
:)

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 8:16 pm | बॅटमॅन

मतदार यादी? राजकारणात आपल्याला शष्प विंट्रेस्ट नाही शिवाय आलसः परं दैवतं ;), सबब वय कधीचे झाले तरीदेखील नाव नै नोंदवले. पण मी वयाने लै छोटा वैग्रे नै बरं का हां :)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Jun 2012 - 12:59 am | विश्वनाथ मेहेंदळे

लेका मूळ फरक सांगितलाच नाहीस. हीहीही !!!

चैतन्य दीक्षित's picture

21 Jun 2012 - 7:21 pm | चैतन्य दीक्षित

पण माझाही एक श्लोक :)

सा वामा सोन्नताङ्गा घनजघनभरैर्मन्दमन्दं चलन्ती (फिगर, चालणे वगैरे)
सान्या तिर्यक्कटाक्षैर्हरति खलु मनो लज्जयान्या सुनम्रा | (तिरपे कटाक्ष, लज्जा इ.)
काचित्क्रीडामिषेण स्वतनुचपलतां दर्शयन्तीव रम्या (वर मंद चालणे होते, इथे तनुचपलता:))
कं नो वैविध्यमेतत्पुरुषमिहमहामोहबद्धं करोति || (इतकं वैविध्य असेल तर कुणाला मोह होणार नाही?)
अर्थात-
स्त्रियांच्यात आवडण्यासारख्या इतक्या गोष्टी असतात की त्या वैविध्यामुळे मोहित होणार नाही असा पुरुष सापडणेच शक्य नाही :)

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 8:28 pm | बॅटमॅन

स्वरचित असेल तर तुमच्या प्रतिभेला साष्टांग प्रणिपात _/\_

नसेल तरी आशयात "विषय" मस्त भरला आहे हेवेसांनल :)

मदनबाण's picture

21 Jun 2012 - 7:39 pm | मदनबाण

सिंहकटी,गजगामिनी,मधुर भाषिणी... स्त्रीया सेक्सी न वाटाव्या तर नवलच ! ;)
बाकी सेक्साट हसणारी पाखरं तर जीव घेतात... ;) पाखरं अन् त्यांची पाखरुगिरी काय इचारु नका ! ;)

बाकी,सोप्यासोपस मांड्यांमधे १० हत्तीचे बळ !
असो..."विषय" न-संपणारा आहे.

आशु जोग's picture

21 Jun 2012 - 10:02 pm | आशु जोग

>> सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात

म्हणजे काय पडद्यावरचे गाणे
की गाणार्‍या गायिकेमुळे तुम्हाला तसे वाटले

शब्द-संगीत-चित्रीकरण - एकंदर पॅकेज.

श्रीरंग_जोशी's picture

21 Jun 2012 - 10:21 pm | श्रीरंग_जोशी

Moore

मूर खूप नाजूक आणि गोड आहे. पण मला मर्लीन मन्रो चे सौंदर्य उन्मादक वाटते.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 2:49 am | श्रीरंग_जोशी

बहुधा तुम्ही हा चित्रपट A Few Good Men (1992) पाहिला नसावा किंवा पाहिला असेल तर टॉम असताना डेमी कडे कशाला पाहायचे असे झाले असेल.

चित्रपटातील सुरुवातीच्या गंभीर दृश्यात प्रणयात्मक असे काहीही नसताना गणवेशातील डेमी संमोहित करून टाकते.

मन्रो मन्रो आहे, आपण मधुबालाची तुलना करतो का कुणाशी?

अवांतर - सांप्रतच्या काळात सर्वाधिक वेगवान शतक ठोकणारा धागा बनलाय हा. अभिनंदन!!

टॉम्/डेमी दोघे आवडत नाहीत कारण नाजूक वाटतात :)
पण बरोबर आहे तुलना करण्यात हशील नाही.

jaypal's picture

22 Jun 2012 - 8:26 pm | jaypal

परफेक्ट "नाडी" ओळखली आहे ;-)

पुरूषांना स्त्रियांमधे काय सेक्सी वाटतं याची लाखो उदाहरणं आहेत आणि ती सगळ्यांना ठावूक पण आहेत.

आम्हाला कुतुहूल होतं ते हे की स्त्रियांना पुरुषामधे काय सेक्सी वाटतं? ते कुठल्याच प्रतिसादामधे नाही आलं म्हणून थोडी निराशा झाली.

दुसरं असं की तुम्ही बायका आप्पलपोट्या असता. (ह. घ्या.) म्हणजे असं कि तुम्ही एखादी गोष्ट केली (उदा. मेकप, चांगला ड्रेस, इ. इ.) तर त्याचा फिडबॅक आजुबाजुच्या पुरुषांकडून कुठल्या ना कुठल्या रुपात तातडीने मिळतो. केलेल्या इन्व्हेस्ट्मेंट्ची पोचपावती लगेच मिळते.
पुरुषांच तस नाही. एक कॉम्प्लिमेंट किंवा एक सिग्नल द्याल तर शप्पथ. त्यामुळे आम्ही नेहमीच चाचपडत असतो. हा. हा पाशवीपणा आहे. :)

कधी कधी 'पाशवी/आक्रमकता' पणा पण 'सेक्सी' वाटतो ती गोष्ट वेगळी.

-(व्हॉट वुमेन वाँट? हा प्रश्न पडलेला) एक

हाहा ...... बायका या धाग्यावर प्रतिसाद देत नाहीयेत काय करू? :)
पण मी रिचर्ड जेरेचे उदाहरण दिले - त्यातही तो पैसेवाला आहे, देखणा आहे हे फक्त नाही तर तो अतिशय सौजन्यशीलदेखील आहे हे तितकेच महत्त्वाचे.

दुसरे "टायटॅनिक" मधील त्या प्रसिद्ध दृष्यात - ती हात हवेत पंखांसारखे फैलावून आनंद घेत आहे पण तो मात्र तिचा आनंद बघत आहे/ निरखत आहे असे आहे.

पुरषाने दिलेले हे "अनडिव्हायडेड अटेन्शन" (संपूर्ण संपूर्ण लक्ष) मला तरी सेक्सी वाटते.

तेच आहे ना - स्त्रिया शरीरसुख आणि भावनाप्रधानता या दोन गोष्टी वेगळ्या करुच शकत नाहीत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jun 2012 - 10:45 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आम्हाला कुतुहूल होतं ते हे की स्त्रियांना पुरुषामधे काय सेक्सी वाटतं? ते कुठल्याच प्रतिसादामधे नाही आलं म्हणून थोडी निराशा झाली.

काय हे भौ, स्त्रिया जालावर व्यक्त होण्यास कचरतात हे माहित नाही होय ?? त्यातून सेक्स बद्दल बोलायचे म्हणजे.... शिव शिव !!!

अवांतर:- स्त्रिया या बाबतीत (सेक्स वगैरे) जनरली अत्यंत दांभिक असतात असे माझे स्पष्ट मत आहे.

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 11:09 pm | बॅटमॅन

अवांतराशी पूर्णतः सहमत. अर्थात चर्चाप्रस्तावाचे आणि प्रस्तावकाचे कौतुक आहेच.

@बॅट्मॅन आणि प्रा डॉ बिरुटे - कौतुक नाही हो.
पण उधृत केलेला तो माझा आवडता लेख आहे. किती विविधरीतीने, खोलवर आणि इंटीमेटली (जवळून) कला आपल्याला भीडते ते त्या लेखातून कळते बरे तो लिहीला आहे मानसशास्त्राच्या प्राध्यापकाने. नक्कीच त्याचा काही एक अधिकार आहेच या विषयात.

पण नेहेमीप्रमाणे प्रस्ताव गबाळ्यासारखा मांडला आहे. प्रतिसादांनी त्याचे मूल्य वाढविले आ॑हे.

स्त्रीयानाही पूरुष सेक्सी वाटतात...
थोडी ओबळ ढोबळ प्रतिक्रिया वाटेल पण लिहितेच.
माझी काहि मतं पूरुषांबद्दलची....
सकाळी ऑफीसला जाताना तयार होणारा पूरुष अजुन पाहाण्यात नाहि
पण संध्याकाळी थकलेला ... सकाळपासुनचे सगळे टेन्शन्स झेलुनही
चेहेर्‍यावर मंद स्मित ठेवनारा... घरी जायची ओढ डोळ्यात असलेला
पूरुष खुप सेक्सी वाटतो...
कॉफीचा घोट घेता घेता जाडसर भुवया उन्चावुन हळूवार पापण्याना
छेडत आजुबाजुला पहाणारा पूरुष कधी पाहुन बघा..... ते कलीजा खलास वालं
प्रकरण एकदम ;)
ह्म्म्म सगळ्यात जास्त आवडतो तो शेविंग केलेल्या दुसर्‍या दिवसातला पूरुष
हलकीशी हिरवळ पसरलेली असते चेहेर्‍यावर...
त्या हिरवळीत त्याचं हसण म्ह्न्जे ....अवेळी येणार्‍या पावसाचे
धुंदावलेले तुषार..... हाय :)
काही पूरुषाना खुर्चीत बसल्यावर एकदम रेलुन बसायची सवय असते...
त्यात ,हाताला कोपरात फोल्ड करुन त्यच्या,बोटांपैकीं अंगठा आणि त्या शेजारचं
बोट ,ह्या दोन्ही बोटानी खालच्या ओठाशी खेळणारा पूरुष
इतका मनमोहक वाटतो की बास.
वयक्तिक मतं आहेत....
( मला सुबोध भावे जाम सेक्सी वाटतो ):)

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 2:30 am | श्रीरंग_जोशी

>>ह्या दोन्ही बोटांनी खालच्या ओठाशी खेळणारा पुरुष

ह्या विरुद्धची कृती करणारा सुदेश बेरी (सुराग मालिकेतला) आठवला. तो गुन्हा अन्वेषणाचे काम करताना नसलेल्या मिशीवरून दोन बोटे फिरवायचा...

अवांतर - मिशीवरून आठवले - अशी बरीच उदाहरणे पाहायला मिळतात की लग्न ठरलेले असताना वाद्गत्त वधू होणाऱ्या नवऱ्याला मिशी असेल तर काढून टाक असा तगादा लावते. काही नवरे काढतात काही नाहीच काढत. माझ्या निरीक्षणाप्रमाणे पुरुषांच्या मिशीबाबत स्त्रियांची टोकाची मते असतात बहुतेकदा. दोनपैकी काहीही चालवून घेणारी उदाहरणे विरळा.

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2012 - 11:15 am | श्रीरंग_जोशी

सन्माननीय स्त्री सदस्यांनी पुरुष उरलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली तर धागा द्विशतक नक्कीच गाठेल.

एमी's picture

24 Jun 2012 - 11:18 am | एमी

कोणते प्रश्न???

श्रीरंग_जोशी's picture

24 Jun 2012 - 1:10 pm | श्रीरंग_जोशी

इथून २ प्रतिसाद वर गेल्यास दिसेलच...

हा हा हा
काय मिशीच्या मागे लागला तुम्ही...it depends on gal...नवर्याला हट्टाने मिशी ठेवायला लावणारी एक मुलगी भेटलीय मला, पण बाकी मिशी दाढी बद्दल फार बोलणं नाय झालं कोणाशी...
सुरुवाती पासुन मिशीत पाहीलेले लोक अचानक cleanshave करुन आले की खुप कसेतरीच दिसतात eg साहिब बिबी और गुलाम मधला गुरुदत्त, लम्हे मधला अनिल कपूर, अझरुद्दीन, गांगुली...पण तेच cleanshave वाले अक्षय, अर्जुन, सुधांशु मला मिशीत ही आवडले...

रंगा काका " सुब्याच्या मिश्या ....! " वाचा
सगळी उत्तरं मिळतिल. ;)

मोहनराव's picture

25 Jun 2012 - 6:35 pm | मोहनराव

हेच म्हणायचं होतं!! ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2012 - 10:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान चर्चा, काही प्रतिसाद सोडले तर फारशी समाधानकारक चर्चा नाही असं माझं मत आहे, चर्चा प्रस्ताव धाडसानं मांडल्याबद्दल चर्चाप्रस्तावाचं कौतुक आहेच.असो.

रामायण-महाभारतातील धागेदोरे नावांच श्री.र.भीडे यांचं एक पुस्तक माझ्या संग्रही आहे. सीतेचे सौंदर्य, या प्रकरणात [पृ.क्र.४१] सीतेने स्वत:च्या सौंदर्याचं वर्णन केलं आहे. अर्थात वाल्मिकीनी यानिमित्तानं कोणतीच कसर असं वर्णन करतांना सोडलेलं नाही,असं माझं मत आहे. अर्थ खालीलप्रमाणे पुस्तकात दिला आहे. सीता म्हणते-

'' माझे केस मऊ, सारखे आणि काळे कुळकुळीत आहे. भुवया एकमेकींपासून विलग असून पिंडर्‍या गोल गरगरीत आहेत. त्यावर लव नाही. दात सलग एकसारखे असून त्यात फटी पडत नाही. डोळ्यांची ठेवण शंखाकृती आहे. हात, पाय, घोटे, मांड्या प्रमाणात असून गुबगुबीत आहेत. नखे गोलाकार व गुळगुळीत आहेत. हाताची बोटे निमुळती आणि सारखी आहेत. ती तुळतुळीत (दिसतात) स्तन मोठे, पुष्ट आणि एकमेकाला भिडणारे असून स्तनाग्रे बारीक व स्तनात किंचित रुतली आहेत. बेंबी खोल असून तिचा देठ पुढे आला आहे. अंगावरील लव मुलायम असून पायाची बोटे व तळवे हे बारा भाग जमिनीला व्यवस्थितपणे टेकतात. पाय लालबुंद असून त्यांचावरील यवचिन्ह स्पष्ट (दिसते). हाताची बोटे जुळती असून त्यात फटी नाहीत. लाक्षणिकांनी मला मंदिस्मिता मानले आहे.''

संस्कृतचे जाणकार अधिक व्यवस्थित अर्थ समजावून सांगतील म्हणून त्यांच्यासाठी-

केशा: सूक्ष्मा समा नीला भ्रुवौ चासंहते मम
वृत्ते चारोमके जडःघे दन्ताश्चाविरला मम
शड्खे नेत्रे करौ पादौ गुल्फावूरु समौ चितौ
अनुवृत्तनखा: स्निग्धा: समाश्चाड्गुलयो मम
स्तनौ चाविरलौ पीनौ: मामकौ मग्नचूचुकौ
मग्ना चोत्सेधनी नाभि: पाश्चोर्रस्कं च मे चित् म
मम वर्णो मणिनिभो मृदन्यड्गरुहाणि च
प्रतिष्ठतां द्वदशभिर्मामूचु: शुभलक्षणाम्
समग्रयवमचिद्रं पाणिपादं च वर्णवत्
मन्दस्मितेत्येव च मां कन्यालाक्षाणिका विदु:
(युद्ध. ४८/९-१४)

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 11:41 pm | बॅटमॅन

आहे तर आहे, उगीच वृथा संकोच कशाला तो बाळगायचा? अशा भावनेने केलेले वर्णन अप्रतिम आहे हेवेसांनल.

चैतन्य दीक्षित's picture

22 Jun 2012 - 9:18 am | चैतन्य दीक्षित

या महाकाव्यात कालिदासाने (पहिल्या की दुसर्‍या पर्वात) पार्वतीचे केलेलं वर्णन लाजवाब आहे.
तिच्या पोटांना पडलेल्या तीन वळ्या हा जणू तिच्या वक्षरूपी स्वर्गापर्यंत पोहोचण्याचा सोपान आहे असं वर्णन आहे..
नक्की श्लोक आठवत नाहिये

रघुवंशात 'इन्दुमतीस्वयंवरवर्णनं' नावाचा भाग आहे. त्यात तिच्या नाभीचं वर्णन 'विवर्तमनोज्ञनाभी' (नदीतल्या भोवर्‍याप्रमाणे जिची नाभी आहे अशी) असं वर्णन आहे.
जयदेवाच्या गीतगोविंदात राधेच्या नाभीजवळ असलेल्या रोमावलीचं जे वर्णन आहे ते अत्यंत 'सेक्सी' आहे.
हे असं सुचतं कसं ? असा प्रश्न पडतो जेव्हा केव्हा वाचतो तेव्हा.

सप्तशतीमधल्या शेवटच्या तीन रहस्यांमध्ये, देवीचं जे वर्णन येतं त्यातही
'वृत्तपीनघनस्तनी' (गोल, पुष्ट असे स्तन) किंवा 'दीर्घौ लम्बावतिस्थूलौ तावतीवमनोहरौ' असं देवीच्या स्तनांचंही वर्णन आहे.

व.पु. काळेंच्या कुठल्याशा कॅसेटवरचा एक श्लोक आठवला-
पयोधरानां किल वृष्टिपातो पयोधराणां शिखरेषु पूर्वं
तथैव यूनामपि दृष्टिपातो पयोधराणां शिखरेषु पूर्वं |
(जसे पयोधर= ढग, पहिल्यांदा पर्वतशिखरांवर वृष्टी करतात तसेच तरूणांचे लक्षही आधी 'पयोधरां'कडेच जाते :)

गीतगोविंदामधीलच कृष्णाचे हे वर्णन आठवले पयोधरांवरूनः

धीर समीरे यमुना तीरे वसति वने वनमाली |
गोपी पीनपयोधरमर्दन चंचल करयुगशाली ;)

राधेच्या रोमावलीचे वर्णन खरंच अत्यंत सेक्सी आहे! खर्रं तर संपूर्ण गीतगोविंदच सेक्सी वर्णनांनी भरलेला आहे.

त्या वळ्या व नाभीबद्दलचे श्लोक व्यनि केलेत तर आभारी राहीन ;)

काही वर्ष दक्षिणभारतात रहात असल्यामुळे की काय माहित नाही, पण गोर्‍या नितळ कांतीच्या, थोड्याश्या गुबगुबीत, बेंबीच्या खाली साडी घातलेल्या बायका मला सेक्सी वाटतात. :)

इतकं बोलून मी या धाग्यावरून रजा घेतो.

अर्धवटराव's picture

21 Jun 2012 - 11:02 pm | अर्धवटराव

{ साडी + केश रचना/सफाई + होर्लेक्स (मजबुत, ताकतवर जिस्म का राज)} - कुठलही सेक्स अपील

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

21 Jun 2012 - 11:10 pm | बॅटमॅन

आहेम्म!!!! ;)

वाल्मिकीनी कोणतीच कसर सोडलेली नाही, तुम्ही हा फोटो टाकून सगळ्या प्रतिसादांची कसर भरुन काढली ! शेवटी पुरुषाची रसिकताच स्त्रीला मोहक बनवते हे खरं! अरसिक पुरुष दुर्मिळ आणि रसिक स्त्री दुर्लभ!

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2012 - 2:27 pm | प्रभाकर पेठकर

हे सेक्सी छायाचित्र ह्या प्रतिसादात प्रकाशित झाल्यापासून, जेंव्हा जेंव्हा हा धागा उघडला आणि ह्या छायाचित्रास ओलांडून जाण्याचा दुर्धर प्रसंग आला तेंव्हा तेंव्हा इथे पुन्हःपुन्हा थबकून, डोळे भरून पाहिल्या खेरीज पुढे जाऊच शकलो नाही. आपल्या उद्देशात अत्यंत यशस्वी ठरलेले छायाचित्र आहे हे.

चित्रगुप्त's picture

23 Jun 2012 - 3:38 pm | चित्रगुप्त

या छायाचित्रातील अभिनेत्री आहे नमिता. हिचे भरपूर फोटो जालावर आहेत.
Namita, किंवा Namitha असे गुगला.

प्रभाकर पेठकर's picture

23 Jun 2012 - 3:49 pm | प्रभाकर पेठकर

छे: छे: अति परिचयात अवज्ञा. तिची जास्त ओळख करून घ्यायची नाहिए की तिची अनेक छायाचित्र पाहण्याचा/संग्रही ठेवण्याचाही विचार नाही.
हे एवढे एक चित्र खुप झालं. आणि तेही सारखं सारखं पाहात राहून नजर मारून टाकायची नाहिए. जेंव्हा कधी ह्या धाग्यावर नविन प्रतिसाद येईल आणि अगदी नाईलाजाने हे चित्र 'ओलांडायची' वेळ आलीच तर जरा थबकून निरखायचं. बाकी सर्व कल्पने मध्ये.

श्रावण मोडक's picture

24 Jun 2012 - 11:20 am | श्रावण मोडक

छे: छे: अति परिचयात अवज्ञा. तिची जास्त ओळख करून घ्यायची नाहिए की तिची अनेक छायाचित्र पाहण्याचा/संग्रही ठेवण्याचाही विचार नाही.
हे एवढे एक चित्र खुप झालं. आणि तेही सारखं सारखं पाहात राहून नजर मारून टाकायची नाहिए. जेंव्हा कधी ह्या धाग्यावर नविन प्रतिसाद येईल आणि अगदी नाईलाजाने हे चित्र 'ओलांडायची' वेळ आलीच तर जरा थबकून निरखायचं. बाकी सर्व कल्पने मध्ये.

!!!

प्रभाकर पेठकर's picture

24 Jun 2012 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर

हम्म्म्म..! श्रावण बाळा, मोठा झालास बरं..!

मोहनराव's picture

25 Jun 2012 - 6:38 pm | मोहनराव

_/\_ भावना पोहोचल्या..

श्रीरंग_जोशी's picture

27 Jun 2012 - 3:24 am | श्रीरंग_जोशी

कळत नकळत मालिकेमधील हर्षदा खानविलकर यांची एक अदा!!

यावरून मला अंदाज करावासा वाटतो की इतिहासातील कारस्थानी स्त्रिया देखील अश्याच अपीलिंग असाव्यात.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jun 2012 - 11:30 pm | अत्रुप्त आत्मा

ही आमच्या भूत जमातितली कशी वाटती बघा बरं..? ;-)

पैसा's picture

21 Jun 2012 - 11:59 pm | पैसा

या धाग्यावर स्त्रिया प्रतिसाद देत नाहीयेत, कारण

१. महिला अतिशय हुषार असतात. कुठे गप्प राहिलेलं फायद्याचं आहे हे आम्हाला आधी कळतं. अगदी महिलांचे डु आयडी घेतलेले पुरुष सदस्य सुद्धा या धाग्यावर प्रतिसाद देत नाहीयेत यावरून ग्यानबाची मेख समजून घ्या.

२. आपल्या मनात काय आहे हे गावभर बोंबलून कशाला सांगा? विशेषतः जेव्हा एखाद्या स्मितहास्याचा वापर करून आपली कामं होत असतील तर "तुझ्यात काय नाही "हे सांगून आपल्या पायावर धोंडा पाडून का घ्या?

३. महिलांना सर्वात उत्तम गोष्टीचा ध्यास असतो. सेक्सी वाटतं म्हणा हवं तर. मग सुपरमॅन आणि रजनीकांत यांना पाहिल्यानंतर आणखी कोणी सेक्सी कसा वाटेल?

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 12:35 am | श्रीरंग_जोशी

या प्रतिसादाबद्दल पैसातैंचे पुरुष सदस्यांच्या वतीने विशेष आभार.

याच मुद्द्यावर महाविद्यालयीन जीवनात असलेल्या आमच्या समजांवर जरा लिहितो...

अभ्यासाकडे लक्ष देणारे, शिस्तीत राहून प्रात्यक्षिके व वर्गात उपस्थित राहणारे, मुलींशी बोलताना जरा अंतरावरून बोलणारे तरुण मुलगे मुलींना अजिबात आवडत नाही. त्यांचा उपयोग फक्त अभ्यासासंबंधित मदत मिळवण्याकरिता होतो.

प्रात्यक्षिक व वर्गात अनुपस्थित राहून बाहेर चकाट्या पिटणारे, एखादेवेळी वर्गात आलेच तर उशिरा येऊन मागच्या रांगेत बसणारे, भडक कपडे घालणारे, दाढीचे खुंट वाढवणारे, शिवराळ भाषा वापरणारे व बहुतांश वेळा फुकाडे असे तरुण मात्र मुलींना फार आवडतात.

आता आम्ही समजायचो कारण डोळ्यासमोर तशी उदाहरणे दिसायची. आता यामागची मुलींची मानसिकता कुणी समजावून सांगणार असेल तर बरे होईल.

शिल्पा ब's picture

22 Jun 2012 - 7:08 am | शिल्पा ब

मुलींना मेंगळट तरुण आवडत नाहीत येवढाच त्याचा अर्थ.

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 8:14 am | श्रीरंग_जोशी

उत्तर एकदम पर्फेक्ट आहे.

गंमत अशी आहे की पुढे जाऊन याच मेंगळट मुलांचा लग्नाच्या बाजारातला भाव एकदम वधारलेला असतो.

शिल्पा ब's picture

22 Jun 2012 - 8:35 am | शिल्पा ब

चुक! स्मार्ट मुलं अन मेंगळट मुलं यांची गफलत करता आहात.

संजय क्षीरसागर's picture

22 Jun 2012 - 9:19 am | संजय क्षीरसागर

प्रत्येक स्त्रिला मित्र म्हणून सलमान खान आणि घरात नवरा म्हणून अमोल पालेकर हवाय आणि पुरुषाला मैत्रिण म्हणून मल्लिका शेरावत आणि स्वत:ची पत्नी नूतन हवीये. एकही माईका लाल स्वत:च्या बायकोला तूच माझी वहिदा म्हणत नाही आणि स्वत:च्या पतीला कुणी अमिताभ होऊ देत नाही. हे काय गणित आहे असा सवाल आहे!

श्रीरंग_जोशी's picture

22 Jun 2012 - 9:37 am | श्रीरंग_जोशी

हेच म्हणायचे होते पण व्यवस्थितपणे मांडता आले नाही.

बादवे -सर्व अभ्यासू मुलांतर्फे गरजेच्या वेळी वापर करून घेणाऱ्या प्रवृत्तींचा निषेध....! ;-).

(कोल्ह्यांना द्राक्षे आंबट ;-))

अर्धवटराव's picture

23 Jun 2012 - 2:02 am | अर्धवटराव

पण उदाहरण तेव्हढं कसंनुसं वाटलं...
मला मैत्रीण म्हणुन देखील मल्लीकाबाई चालणार नाहि... आणि नुतनसारखी बायको मिळणार असती तर मी लग्नच केलं नसतं :)

अर्धवटराव

टवाळ कार्टा's picture

22 Jun 2012 - 12:31 pm | टवाळ कार्टा

हाच प्रश्न मलासुध्धा आहे
पण मी मेंगळट नव्हतो (आणि आताही नाही)....मग???

एमी's picture

22 Jun 2012 - 2:38 pm | एमी

...