काही महिन्यांपूर्वी 'न्यूयॉर्क टाईम्स' मधे संपादकीय पानावर 'बोको हराम' ह्या नायजेरीयातील दहशतवादी संघटनेवर, न्यूयॉर्क स्टेट युनिव्हर्सिटीतील इतिहासाच्या एका प्राध्यापिकेचा लेख वाचनात आला. सदर प्राध्यापिका नायजेरियन राजकारणात पारंगत आहे, असे लेखाखाली म्हटले आहे. बाईंच्या लेखाचा मतितार्थ असा की ह्या दहशतवादी संघटनेच्या नावाखाली इतरच कुणीतरी (प्रामुख्याने, सत्तेवर असलेले ख्रिश्चन पुढारीच), कत्तली, बाँबस्फोट वगैरे अमानुष कृत्ये घडवून आणत आहेत.
ह्यानंतर काहीच दिवसांनी बोको हरामच्या एका नेत्याने स्वतःच दहशती कृत्ये आपण घडवून आणतो आहोत, असी जाहीर कबुली दिली. ह्यानंतर त्यांचे हल्ले-- प्रामुख्याने उत्तर नायजेरियामधे (जिथे ख्रिश्चन लोकसंख्या प्रामुख्याने आहे) -- वाढत्या क्रमाने होत राहिले आहेत.
बुद्धिवादी जाणकारांच्या हृदयांचे हे भळभळणे तसे नवे नाही. अलिकडेच डॅनियल यर्गिन ह्या तेलसंशोधकाचे, जगाच्या तेल- इतिहासावरील 'द प्राईझ' हे पुस्तक वाचतांना असाच एक मजेशीर उल्लेख वाचनात आला. १९७८-७९ च्या सुमारास इराणमधे शहाच्या विरूद्ध, मुस्लिम धर्ममार्तंडाच्या नेतृत्वाखाली जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या. त्याचे नेतृत्व होते अयातुल्ला खोमेनीकडे. धर्मांध नेहमी करतात तसली दुष्कृत्ये ह्याच्या आदेशाने इराणभर होऊ लागली होती. दुर्दैवाने अमेरिकन सरकारला ह्या उठावाचे गांभिर्य वेळीच लक्षात आले नाही. अमेरिकन सरकार गाफिल राहिलेच, पण यर्गिन नमूद करतात की 'The efforts to construct hastily some new American position were complicated by the fact that the Shah was an object of dislike and criticism in the media in the United States and elswhere, which resulted in a familiar pattern- moralistic criticism of U.S. policy combined with the projection by some of a romantic and unrealistic view of the Ayatollah Khomeini and his objectives'. [अमेरिकन सरकारचे धोरण ठरवण्याच्या कामात जी हयगय झाली त्यात, इराणच्या शहाविरूद्ध तेव्हा अमेरिकन लोकमत बिथरलेले होते, त्याची भर पडली. त्यात, यर्गिन ह्यांच्या म्हणण्यानुसार, तेथील माध्यमांचा बराच हातभार होता. व ह्यातून, अशा प्रसंगी नेहमी दिसून येणारा अनुभव येऊ लागला. तो म्हणजे अयातुल्ला खोमेनींच्या चळवळीविषयींच्या रोमँटिक व अवास्तव कल्पनांवर आधारलेला, अमेरिकन सरकारी धोरणांचा,नैतिक विरोध टोकदार होऊ लागला].
यर्गिन ह्याचे एक उदाहरणच पुढे देतातः 'A prominent professor wrote in the New York Times of Khoemeni's tolerence, of how "his entourage of close advisers is uniformly composed of moderate, progressive individuals," and of how Khomeini would provide "a desperately needed model of human governance for a third world country". ' [ न्यूयॉर्क टाईम्समध्ये एका नामांकित प्रोफेसरांनी, खोमेनीच्या सहिष्णूत्वाची ग्वाही देत म्हटले की त्याच्या निकट वर्तुळांमध्ये मध्यममार्गी, सहिष्णू, व प्रागतिक विचारांच्या व्यक्तिंचा समावेश आहे, व म्हणून खोमेनी हे 'तिसर्या जगातील देशास अत्यावश्यक असलेले, मानवतावादी 'नेतृत्व आहे].
यर्गिन ह्यापुढे नोंदवतात, की अँड्र्यू यंग हे अमेरिकेचे युनोतील राजदूत ह्याहीपुढे गेले. 'खोमेनी हे साक्षात संतच आहेत' ( Khomeini would eventually be hailed as "a saint")! ह्या वक्तव्यामुळे ओशाळलेल्या अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कार्टर ह्यांनी ह्यावर ' एक राष्टृ म्हणून अमेरिका संतपदांच्या शोधांत नाही' अशी जाहीर टिपण्णी केली .
आपल्याकडे वर्षांनुवर्षे पाकिस्तानचे उमाळे येणारे अनेक बुद्धिजीवी आहेत. वाघा सीमेवर मेणबत्या पेटवून पलिकडच्या देशास सद्गगतीत हाक घालणारे कुलदीप नय्यर ह्यांसारखे लोक त्यांतीलच. 'दोन देशांमधील वाद हा निव्वळ राजकीय कारणांतून निर्माण झाला असून राजकारणी त्यास खतपाणी घालतात, अन्यथा दोन देशांतील जनतेमध्ये काहीच वाद नाही, अगदी सलोख्याचे संबंध आहेत आमचे' असे काहीसे ह्या मंडळीचे प्रतिपादन असते. मग, शेरोशायरी, गझला, उर्दूची नजाकत, कुणी पाकिस्तानांत गेलेले असतांना तेथील लोकांनी त्यांचे केलेले कौतुक, प्रेमाने खाऊ घातलेली बिर्याणी वगैरे सगळे उजळवले जाते. व्यक्तिगत संबंध वेगळे व सामाजिक वेगळे. माणसे व्यक्तिशः कितीही आपुलकीने वागत असली (पाकिस्तांन्यांबद्दल माझा स्वतःचा अनुभव अगदी छान आहे, सौहार्दाचा, शालीन मित्रत्वाचा आहे), तरीही त्यापलिकडे सामाजिक पातळीवर त्यांच्यात व आपणात एक प्रकारची दरी आहे, ह्या वास्तवाचे भान ह्या मंडळीस नसते. खरे तर हे अनेकदा लख्ख दिसून येते, पण ते नजरेआड करायचे. ह्यात ते स्वतःची, व त्याबरोबर इतरांचीही प्रतारणा करत असतात. ह्यांची अजून एक गंमत आहे. आपल्या अवतीभोवती, आपल्याच संकृतिशी साधर्म्य असलेले इतरही काही देश आहेत, त्यांविषयी ह्यांना अजिबात आस्था नसते. श्रीलंका घ्या, नेपाळ घ्या, म्यानमार घ्या-- ह्यांच्याशी आपले सामाजिक व राजकीय संबंध सुधारावेत अशी ह्यांना कधीच निकड भासत नाही. ह्यामागे काय कारणे असावीत बरे? हे इतर देशवासी, पाकिस्तान्यांच्या मानाने 'मवाळ' आहेत हे? आपल्यावर कसली ना कसली कुरघोडी करत बसण्याच्या उद्योगात ते नाहीत हे? मग, जे आपल्याशी सामाजिक व राजकीय पातळीवर डाफरून असतात, त्यांची मनधरणी करायची, हे मॅसोचिझम झाले, म्हणायचे?
गेल्या वर्षी अरब जगतात बरीच उलथापालथ झाली. ट्यूनिशियापासून सुरू झालेली वावटळ, इजिप्त, लिबीया, बहरीन अशा अनेक देशांत गेली. हे होत असतांनाही काही गोष्टी अगदी सहज लक्षात येण्यासारख्या होत्या. एकतर, इजिप्तसारख्या मोठ्या देशात सुरू झालेली चळवळ, उत्फूर्त होती, पण अगदी संपूर्ण बेबंद होती, तिला कुठलेही नेतृत्व नव्हते. चळवळ सुरू असतांना जगभरच्या भळभळत्या हृदयांना आशेची नवी पालवी फुटत होती. आता काहीतरी सुंदर, मंगल वगैरे त्या देशात घडणार, तेथे 'नवी पहाट' येणार असा एकंदरीत सूर होता. पण अर्थात पुढे तसे काही झाले नाही. बेबंद चळवळीपुढे नमते घेणे भाग झाल्याने मुबारक पदच्युत झाले खरे, पण चळवळ रीतसर जहाल मुस्लिम धर्ममार्तंडांच्या हाती सुपूर्द झाली. लिबीयात तर खरे तर अगदी टोळीयुद्धच होते (यर्गिन ह्यांच्या वर उल्लेखिलेल्या पुस्तकात, स्वतः गद्दाफीच कसा अशाच टोळीयुद्धातून साठीच्या दशकात सत्तेवर आला ह्याची थोडक्यात माहिती आहे). व भळभळती हृदये तिथे डो़ळे लावून बसली होती. ती बिच्चारी अजूनही इजिप्त, लिबीया इत्यादी ठिकाणांच्या 'नव्या पहाटे' च्या प्रतिक्षेत असतील.
ती तशी असतील तर असोत बिचारी. पण आमच्यासारख्या सामान्यांनी मात्र आपापल्या माहितीची परिसीमा शक्यतोंवर वाढवून घेत, स्वतः डोळस, व प्रॅग्मॅटिक राहून, आपापली मते बनवणे जरूरी आहे.
प्रतिक्रिया
22 Jun 2012 - 8:48 pm | बॅटमॅन
>>"ह्यांची अजून एक गंमत आहे. आपल्या अवतीभोवती, आपल्याच संकृतिशी साधर्म्य असलेले इतरही काही देश आहेत, त्यांविषयी ह्यांना अजिबात आस्था नसते. श्रीलंका घ्या, नेपाळ घ्या, म्यानमार घ्या-- ह्यांच्याशी आपले सामाजिक व राजकीय संबंध सुधारावेत अशी ह्यांना कधीच निकड भासत नाही. ह्यामागे काय कारणे असावीत बरे? हे इतर देशवासी, पाकिस्तान्यांच्या मानाने 'मवाळ' आहेत हे? आपल्यावर कसली ना कसली कुरघोडी करत बसण्याच्या उद्योगात ते नाहीत हे? मग, जे आपल्याशी सामाजिक व राजकीय पातळीवर डाफरून असतात, त्यांची मनधरणी करायची, हे मॅसोचिझम झाले, म्हणायचे?"
वाक्यावाक्याशी प्रचंड सहमत. हे साले खरेच वन- साईडेड मॅसोचिस्ट्स असावेत अशी दाट शंका येतेय.
22 Jun 2012 - 9:15 pm | गणामास्तर
>>>एकतर, इजिप्तसारख्या मोठ्या देशात सुरू झालेली चळवळ, उत्फूर्त होती, पण अगदी संपूर्ण बेबंद होती, तिला कुठलेही नेतृत्व नव्हते. चळवळ सुरू असतांना जगभरच्या भळभळत्या हृदयांना आशेची नवी पालवी फुटत होती. आता काहीतरी सुंदर, मंगल वगैरे त्या देशात घडणार, तेथे 'नवी पहाट' येणार असा एकंदरीत सूर होता. पण अर्थात पुढे तसे काही झाले नाही. बेबंद चळवळीपुढे नमते घेणे भाग झाल्याने मुबारक पदच्युत झाले खरे, पण चळवळ रीतसर जहाल मुस्लिम धर्ममार्तंडांच्या हाती सुपूर्द झाली.
इजिप्त मध्ये "जस्मिन क्रांती" च्या नावाखाली सुरु झालेली चळवळ एक न एक दिवस जहाल मुस्लिम धर्ममार्तंडांच्या हाती जाणारच होती, कारण मुळातच या सगळ्या मागे हसन अल बन्ना ने स्थापन केलेली "मुस्लीम ब्रदरहूड" ही जहालमतवादी मुस्लिम संघटना होती. आज अस्तित्वात असलेल्या बहुतांशी अतिरेकी संघटना पूर्वी याच "मुस्लीम ब्रदरहूड" पासून फोफावलेल्या फांद्या आहेत.
22 Jun 2012 - 9:37 pm | अर्धवटराव
आयातुल्ला खोमेनी ला प्रथम फ्रान्स ने पाठबळ दिले. त्याने उलथवलेली (पहलवी ? ) राजवट अश्याच एका अमेरिका पुरस्कृत क्रान्तीतुन जन्माला आलि होती. इराण - इराक ला एकमेकांविरुद्ध आणि स्वकियांविरुद्ध वापरायला अत्यंत संहारक अशी शस्त्रास्त्रे अमेरिका-युरोपने सढळ हस्ते पुरवली. सुवेझच्या निमित्ताने आणि त्यानंतर देखील झालेल्या इस्त्रायल-अरब संघर्षानंतर इजीप्त-इस्त्रायल संबंध फार गोडीगुलाबीचे झाले... तिथेहि तेल आणि शस्त्र यांचा व्यापार तेजीत होता.
थोडक्यात काय, तर बैलांना युद्धाची खुमखुमी असतेच. ते एकमेकांना टकरा देत असतात... आणि त्यांच्यावर बोली लावणारे उद्योगपती पैसाहि कमवतात आणि मनोरंजनही करतात.
भळभळणारी हृदये पाकिस्तानबद्दल खुप जास्त हळवी होतात... त्यामागे सहृदयता वगैरे काहि नाहि. जी काहि सच्ची सहृदयता आहे ति तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसात तशिही असतेच. अश्या सहृदयतेला मिडियासमोर नक्राश्रु गाळण्याची आवश्यकता नसते. या नक्राश्रु गाळणार्या भळभभणार्या मंडळींना त्याचा योग्य मोबदला मिळतो. शेवटी दाम करी काम हेच खरे.
अर्धवटराव
22 Jun 2012 - 10:00 pm | अन्या दातार
सहमत.
22 Jun 2012 - 10:13 pm | तर्री
स्वतः कसे निपक्ष आहोत , निपक्ष आहोत म्हणजे आपण खूप विचार करतो , खूप विचार करतो म्हणजे आपण बुध्दिमान आहोत हे सिद्ध करण्याची केविलवाणी धडपड.
गेल्या १० वर्षात ही मंडळी "भारतातून " बरीच कमी झाली आहेत. कलाकात्यातून ह्यांचे घावूक उत्पादन होत असते. मार्क्सवादाने - समाजवादाने पुरे नाउमेद केल्याने आता जरा उत्पादनात घात झाली आहे.
महाराष्ट्र तर काय विचारता ? कोणत्याही प्रमुख माध्यमाचा अधिकारी हा असाच केविलवाणा निरुपयोगी असतो.
स्वताचे नाक कापून दुसर्याला अपशकून करणारी पुरोगामी जमात आहे.
22 Jun 2012 - 10:25 pm | शुचि
>> पाकिस्तांन्यांबद्दल माझा स्वतःचा अनुभव अगदी छान आहे, सौहार्दाचा, शालीन मित्रत्वाचा आहे >>
अभिनंदन!!!
माझा पाकड्यांचा अनुभव चांगला नाही!! ३ वाईट अनुभव आहेत. मला त्या लोकांचा अजिबात पुळका नाही.
(१) भर लंच-मीटींगमध्ये माझी एक मैत्रिण भारताला, स्वतःच्या देशाला नावे ठेवीत होती (सहज, नकळत होत होते) आणि झाले .......... हा पाकीस्तानी सहकारी सुरु झाला - हो गाई फिरतात ना रस्त्यांवर वगैरे. तिला तो मुस्लीम आहे हे माहीत होते पण तो पाकीस्तानी आहे हे माहीत नव्हते. मग काय विचारता मला त्याला थांबवता येईना की कुरघोडीकरता येईना. तोंड दाबून बुक्क्यांचा मार झाला :(
(२) अन्य २ वैयक्तिक अनुभव आहेत.
22 Jun 2012 - 10:56 pm | बिपिन कार्यकर्ते
लेख आवडला. अशा भळभळणार्या हृद्यांबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. :)
22 Jun 2012 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा
विषय,मुद्दे आणी मांडणी...बद्दल अनेक धन्यवाद
विशेषतः ''आपल्या अवतीभोवती, आपल्याच संकृतिशी साधर्म्य असलेले इतरही काही देश आहेत, त्यांविषयी ह्यांना अजिबात आस्था नसते. श्रीलंका घ्या, नेपाळ घ्या, म्यानमार घ्या-- ह्यांच्याशी आपले सामाजिक व राजकीय संबंध सुधारावेत अशी ह्यांना कधीच निकड भासत नाही. ह्यामागे काय कारणे असावीत बरे? हे इतर देशवासी, पाकिस्तान्यांच्या मानाने 'मवाळ' आहेत हे? आपल्यावर कसली ना कसली कुरघोडी करत बसण्याच्या उद्योगात ते नाहीत हे? मग, जे आपल्याशी सामाजिक व राजकीय पातळीवर डाफरून असतात, त्यांची मनधरणी करायची, हे मॅसोचिझम झाले, म्हणायचे?'' हा मुद्दा अतिशय सजगपणे उजेडात आणलात,या मुळे भळभळवाद्यांचं बेगडी/आंधळं पीरेम छान उघड पडलं
23 Jun 2012 - 12:04 am | पैसा
सगळ्या जगातील राजकीय घडामोडींचा तुमचा अभ्यास यातून छान दिसतो आहे. अनेक घटनांच्या मागचे कार्यकारणभाव खूपदा लक्षात येत नाहीत किंवा "मला काय त्याचे" अशा वृत्तीने आम्ही तिकडे बघतो. पण या गोष्टी आपल्या आयुष्यात मागच्या दाराने कशा येतात याबद्दल विचार करायला भाग पाडणारा हा लेख आवडला. पाकिस्तानच्या प्रेमाचे उमाळे येणार्या तथाकथित शांततावाद्यांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं गेलं पाहिजे हे नक्कीच.
23 Jun 2012 - 3:56 am | विकास
ती तशी असतील तर असोत बिचारी.
तसे काही नाही... कळते पण वळत नाही.
बर्याचदा समता नांदावी या नावाखाली Ìही मंडळी वागत असतात पण त्यांना कळत नसते की वास्तवीक त्यांच्यामुळेच सामाजिक विषमता (आर्थिक नाही) वाढत असते.
23 Jun 2012 - 7:00 am | सहज
सर्वप्रथम लेख लिहल्याबद्दल धन्यवाद. मागेही तुम्हाला विनंती केली होती महीन्यातुन एकदा अगदी दोन महीन्यातुन एकदा का होईना असा आंतरराष्ट्रीय आढावा घेत जा. पुन्हा एकदा करतो.
>आमच्यासारख्या सामान्यांनी मात्र आपापल्या माहितीची परिसीमा शक्यतोंवर वाढवून घेत, स्वतः डोळस, व प्रॅग्मॅटिक राहून, आपापली मते बनवणे जरूरी आहे.
याच्याशी सहमत आहेच. पण निम्मे प्रतिसाद व नंतर अजुनही येतील ते सलोखाप्रेमी बॅशिंग ह्या एकमेव एजेंडा मधे येउन लेखाचा मुळ हेतू पराभूत करतील अशी शक्यता वाटते.
कालच Army misrule is turning Egypt into Pakistan. हा लेख वाचण्यात आला. गेली साठ वर्षे लष्कर-नोकरशाहीने सत्ता उपभोगली, बस्तान बसवले तर आता जनतेलाही भले ते बाहेरच्यांना धर्ममांतंडाच्या अधीन वाटो. एकदा लोकशाही म्हणले तर ती रिस्क घ्यायला हवी. कारण मग परत आपल्या सोयीचेच राजकारण हा अमेरीका/पाश्चात्य देशावर आरोप आहे तो आहेच. मग इजिप्त-पाकीस्तान मधील जनतेच्या पहाट न होण्यामागे अमेरीका-पाश्चात्य देशांची जबाबदारी टाळता येणार नाही. आजवर इजिप्त व पाकीस्तान दोन्ही लष्कर अमेरीकेच्या आश्रयाखालीच सत्ताधारी होते.
या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या म्यानमारचे उदाहरण घेता येईल का? इथे स्यु की यांचा सक्रिय राजकारणात प्रवेशही झाला आहे पण सत्ता अजुनही मिलीटरी एस्टॅब्लिशमेंट कडे आहेच. इजिप्त/ अरब देशातही पुढची काही वर्षे असे काही करता येईल काय? सरतेशेवटी इजिप्तच्या लोकशाहीची ही सुरवात आहे पहील्या दिवसापासुन ती प्रगल्भ व जबाबदार असेल असे निदान आपण भारतीयांनी तरी समजु नये. वेळ दिला पाहीजे.
भारतीय परराष्ट्रखात्यात जबाबदार, हुशार लोक आहेत अशी माझी अजुनही समजुत आहे.
23 Jun 2012 - 10:26 am | प्रदीप
लेख आवडला असे सांगत कौतुक करणार्या सर्वांचे आभार.
शुचि ह्यांनी लिहीलेला (१) हा अनुभव, मी लिहील्याप्रमाणे व्यक्तिगत पातळीवरील अनुभव व सामजिक पातळीवरील वागणूक ह्यांतील तफावतच अधोरेखित करणार आहे. [ त्यांनी (२) व (३) दोन्ही वाईट व्यक्तिगत अनुभव आहेत, इतकेच लिहीले आहे. तेव्हा त्याविषयी खरे तर फार काही लिहीणे उचित नाही. तरीही, उगाच असे वाटून गेले की त्या अनुभवांचा, त्या स्त्री आहेत ह्याच्याशी संबंध असावा का? पाकिस्तानमधील सर्वसाधारण जनता, स्त्री कस्पटासमान मानते, त्याला अनुषंगून हे म्हणत आहे].
सहज लिहीतातः "निम्मे प्रतिसाद व नंतर अजुनही येतील ते सलोखाप्रेमी बॅशिंग ह्या एकमेव एजेंडा मधे येउन लेखाचा मुळ हेतू पराभूत करतील अशी शक्यता वाटते".
माझ्या लेखाचा हेतू भारतीयच नव्हे तर इतरस्त्रच्याही भळभळत्या हृदयांच्या, वास्तवाशी फटकून स्वप्नाळू वागण्याच्या संवयी नजरेसमोर आणाव्यात हा होता. तेव्हा एकार्थी, त्यात शक्य तितक्या त्रयस्थपणे विवीध घटनांचा व ह्या घटकाच्या वागण्याचा आढावा घेत, त्यांचे (मला वाटते तसे, डोळस) बॅशिंग करण्याचाच होता. हे असे सांगावे लागले, ह्याचा अर्थ लेख फसलेला आहे.
सहज ह्यांनी हुकुमशाही, देशोदेशींच्या हुकुमशहांना बाहेरून मिळणारी मदत, लोकशाही इत्यादींबद्दल टिपण्णी केली आहे. त्याविषयी खरे तर वेगळी चर्चा व्हावी, व ती त्यांनी सुरू करावी असे मी त्यांना सुचवतो. जाता जाता एव्हढेच-- हुकुमशाही नेहमीच अहितकारी असते का, हे पहाणे उद्बोधक ठरावे. (दोन चांगली उदाहरणे-- द. कोरीया, तैवान). लोकशाहीचा आशियात विसाव्या शतकातील, व मध्य पूर्वेत एकविसाव्या शतकातील प्रयोग ह्यांविषयी मात्र माझी काही वेगळी मते आहेत. तो विषय एका वेगळ्या चर्चेचा व्हावा.
23 Jun 2012 - 1:33 pm | शुचि
२ र्या व ३र्या अनुभवाचा स्त्रीत्वाशी संबंध तसा नाही. दोन्ही सांगते.
(२) पाकीस्तानी सहकार्याने खूप आडमुठेपणा , राजकारण दाखविले आणि म्हणून माझ्या एका गरीब भारतीय सहकार्याची नोकरी गेली असे माझे इन्ट्युइटीव्ह पर्सेप्शन आहे पण माझ्याकडे आधार नाही/विदा नाही. जेव्हा केटी (नॉलेज ट्रान्स्फर) करता मी या पाकी सहकार्याबरोबर १ तास घालविला त्या तासात त्याने मला फक्त गोंधळविण्याचे, इतर फोनाफोनी करण्याचे काम केले. त्या मनुष्याने नीट केटी दिली नाही
(३) जेव्हा मी "फेशिअल हेअर" वॅक्स करण्याकरता ब्युटी पार्लरमध्ये गेले होते तेव्हा तेथे एक एशीअन स्त्री होती जिने माझी विचारपूस केली वगैरे आणि मला व्यवस्थित अगदी नीट सेवा दिली. मला विचारले मी कुठून आहे. मग मी तिला अर्थात विचारले, सोडते की काय? तिचे उत्तर होते - "कराची/पाकीस्तान". जाताजाता ती मला म्हणाली "बुरा मत मानना पर आप डॉक्टर से रेग्युलर चेकाप करवाते हो क्या? आप को ज्यादह फेशिअल हेअर है ये "युटरस फाइब्रॉईड" का सिम्प्टम हो सकता है. आपके भले के लिये बोल रही हुं" :) वाह भाई वाह! मी हा कीडा लावून घेण्यासाठीच गेलेले ना :) ...... आणि हे केव्हा? जेव्हा मला माहीत आहे की मला माझ्या मैत्रिणींइतकेच सर्वसाधारण "फेशिअल हेअर" आहेत. दॅट वॅज फ्**ग नन ऑफ हर बिझनेस. *ता क - जेव्हा पार्लरमधून बाहेर पड्ता तेव्हा तुमचा आत्मविश्वास दुप्पट व्हायला हवा कमीत कमी तुम्हाला हलकं आणि खूप प्रसन्न वाटावयास हवं. निदान काळजी तरी वाटू नयेच नये. तुम्ही अधिक चिंता घेऊन बाहेर पडलात तर काहीतरी चुकलय.
दोन्ही उदाहरणे केवळ भारतियांच्या आकसातून आलेली आहेत अशी ग्वाही माझ्या अंतर्मनाने मला दिली. पिरीअड!!!
24 Jun 2012 - 2:11 pm | तर्री
मलाही एका पाकिस्थानी होटल मालकाकडून असा अनुभव आला.
हया पाकी च्या होटेल चे नाव होते "इंडिया किचन". रोज रात्री जेवायला जात होतो.
बोलता बोलता , तो सांगत असे - शहरात खूप ड्रग एडीकट आहेत , भारतीय लोकाना लोकल लाइक करत नाहित , एका भारतीयाचा खून झाला........
अगदी पढवल्यासारखे बोलत असे.
25 Jun 2012 - 7:56 am | स्पंदना
मौशमी नावामुळे फसुन एकदा अशीच एका पकि बाई बरोबर बोलत होते. नंतर कळल की ती पाकिस्तानी आहे. माझी अजुन एक ओळखीची पाकिस्तानी हिंदु मला माहित आहे अस मी तिला बोलता बोलता सांगितल तर एकदम नुर बदलुन ही राक्षसीन म्हणाली, हिंदु ? खदेड देना चाहिये। हा माझा स्वतःचा अनुभव आहे सिंगापुर मधला. एकुण ही लोक अतिशय क्रुर धर्मांध आहेत असच माझ मत आहे. अक्षयचा एक कलिग , बाकि सार्या ऑफिसमधल्या लोकांबरोबर दिवाळीच्या फराळाला आला होता, मला म्हणतो हमारी जनानीयॉ ऐसे बाहर नही निकलती, मग साल्या तु कशाला माझ्याबरोबर बोलतोयस? असा एक झणझणित विचार माझ्या डोक्यात फिरला होता तेंव्हा.
नंतर एका भारतिय मुस्लिम मैत्रीणीला एकदा हा किस्सा सांगितला तर ती एकदम अलर्ट होत म्हणाली, पाकिस्तानी मुस्लिम भारतिय मुस्लिमोंसे अलग होते है। संभालके बात करना। जादा तर अॅव्हॉइड करना।
सो...पकिस्तानीज आर एम एफ पिपल इन माय व्ह्यु.
23 Jun 2012 - 8:14 pm | रणजित चितळे
पाकिस्तान आमचा शत्रू आहे तेवढेच काय ते आम्हाला माहीत आहे. व मरणा पर्यंत तेच राहील.
25 Jun 2012 - 6:59 pm | इष्टुर फाकडा
योग्य माणूस बोलला, विषय संपला !
24 Jun 2012 - 2:30 pm | मन१
आख्ख्या लेखाला व इथल्या काही प्रतिसादांनाच +१.
25 Jun 2012 - 2:07 pm | ऋषिकेश
वा! लय भारी आढावा!
जास्मिनविषयीच्या मताशी अगदी सहमत
25 Jun 2012 - 2:39 pm | नाना चेंगट
अ ' अल्लाह ' चा ब ' बंदूकी ' चा
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14384333.cms
25 Jun 2012 - 4:35 pm | बॅटमॅन
क काफरांचा.
25 Jun 2012 - 7:46 pm | तर्री
कॉलींग चिजाळलेले वैदिक पुरोगामी एट ऑल......
ह्या देशाची फाळणी धर्मावर झाली. एका देशाने एक धर्म स्विकरला आणि दुसरा निधर्मी राहीला. तर काय होणार ?
आपल्या पूर्वीच्या ३ पिढया "धर्मनिरपेक्ष " चे स्तोम माजवत राहिल्या.
आता तर साले बोलणेच चोरी होवून बसले!