फुलांचे..!

उपटसुंभ's picture
उपटसुंभ in जे न देखे रवी...
19 Jun 2012 - 2:41 pm

उदंड झाले वार फुलांचे,
उघडले न पण दार फुलांचे

चुरगळणार्‍या, सुगंध देती
कसे असे व्यवहार फुलांचे

तुझा हात फिरला कवितेवर
शब्द शब्द होणार फुलांचे

मिळे न सहवासाचे अत्तर
विस्कटले बाजार फुलांचे

कत्तल माझ्या बागेची अन्
तिला गळाभर हार फुलांचे

मोक्ष मिळावा निर्माल्याचा
जीवन मी जगणार फुलांचे

-- उपटसुंभ

गझल

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jun 2012 - 2:45 pm | प्रचेतस

फुलांची रांगोळी तज्ज्ञ श्री अत्रुप्त आत्मा यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jun 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा

मोक्ष मिळावा निर्माल्याचा
जीवन मी जगणार फुलांचे >>> --^--

सहभावनांचे कोंदण घेऊन आलास रे दोस्ता... !
रचनेवर फिदा झालो आहे.
धन्यवाद.

अरुण मनोहर's picture

20 Jun 2012 - 8:57 am | अरुण मनोहर

गझल आवडली

चुरगळणार्‍या, सुगंध देती
कसे असे व्यवहार फुलांचे

सुंदर