संत सोशी अंगी घावा, वाटी दार्यात साखर
उसा चिरडूनी चक्री, येते फेर्यात साखर
नेत्याच्या वल्गना, कधी जेत्याची पुंडाई
देते खावया गोग्रासा, जैशी चार्यात साखर
जणू नित्याची वंचना असा छळे मधुमेह,
तोंडी लागले ते काढे, म्हणे सार्यात साखर
डोळे लागेनात मूळी, होता कडू बाळझोप,
दूधा फुंकरे आई जे, तीच्या वार्यात साखर
घाली गुंजारव भुंगा, फूल नि:शब्द स्तब्ध
घट्ट बन्द पंखुड्या, ठेवी पहार्यात साखर
रुसलेली साजणी, तिचे बिंब कसे गोड?
आरश्याच्या जणु पाठी होती पार्यात साखर
प्रतिक्रिया
17 Jun 2012 - 7:20 pm | मदनबाण
मस्त :)
17 Jun 2012 - 7:40 pm | प्रचेतस
छान.
कविता आवडली.
17 Jun 2012 - 7:40 pm | प्रचेतस
छान.
कविता आवडली.
17 Jun 2012 - 7:49 pm | पक पक पक
मला पण दोनदा आवड्ली .. :)
मि पण दोनदा वाचली..:)
17 Jun 2012 - 8:07 pm | राजेश घासकडवी
रुसलेली साजणी, तिचे बिंब कसे गोड?
आरश्याच्या जणु पाठी होती पार्यात साखर
हे फार आवडलं.
18 Jun 2012 - 8:05 am | स्पंदना
सुरेख काका.