आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
प्रतिक्रिया
16 Jun 2012 - 10:15 am | प्रचेतस
उडाले ते कावळे, राहिले ते मावळे.
16 Jun 2012 - 10:19 am | श्रीरंग_जोशी
हे नक्कीच कलानगरच्या साहेबांचे विधान असणार...
16 Jun 2012 - 10:21 am | प्रचेतस
:)
16 Jun 2012 - 11:29 am | श्रीरंग_जोशी
२००४ च्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार नुकताच सुरू झालेला असताना बारामतीच्या साहेबांच्या प्रकृतीची समस्या उद्भवली. तर ते आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाले, सेनापती नसला तरी मावळे ही निकराची लढाई जिंकतील असा विश्वास आहे.
यावर कलानगरचे साहेब (या निवडणूकीनंतर वृद्धापकाळामुळे त्यांना कधीच महाराष्ट्रभर सभा घेता आल्या नाहीत) म्हणाले, त्यांच्याकडे कसले आले आहेत मावळे, ते तर कावळे नि बगळे...
16 Jun 2012 - 10:25 am | क्लिंटन
सन १९९८ चा मार्च महिना. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर लोकसभेत चर्चा चालू होती.
राम विलास पासवानः ये भाजपावाले केहते है की राम उनके पास है| राम वहा कहा है? राम तो यहा है जनता दल मै (स्वतःला उद्देशून)
ठाण्याचे खासदार प्रकाश परांजपे: अरे ये तो विलासी राम है. सच्चा राम हमारे यहा ही है|
(असे काहीसे)
16 Jun 2012 - 10:27 am | श्रीरंग_जोशी
हो, राम नाईकांकडे इशारा करून प्रकाश परांजपे असं म्हणाले होते....
16 Jun 2012 - 10:25 am | कानडाऊ योगेशु
राज ठाकरे - माझं आणि त्यांचं रक्ताचं आणि भक्ताचं नातं आहे.
आबा - बडे बडे शहरोंमें ऐसी छोटी छोटी घटनाए तो होती रहती है !
16 Jun 2012 - 11:43 am | श्रीरंग_जोशी
२००६ की २००७ ची एक पत्रकार परिषद, तेव्हा गृहमंत्री म्हणून आबा लोकप्रियतेच्या शिखरावर होते व पत्रकार परिषदेत हिंदी मध्ये उत्तरे द्यायची त्यांची हौसही जोरात होती.
कुठल्या तरी अट्टल गुन्हेगारांना पकडल्या बद्दल त्यांनी पोलिसांचे कौतुक केले. त्यावर कुणा हिंदी वाहिनीच्या पत्रकाराने त्यांना विचारले की अब इस मामले में आपकी सरकार क्या करेगी?
यावर आबा चटकन म्हणाले की, उन्हे शिक्षा मिले इसका हम पूरा प्रयास करेंगे. जेव्हा कुणीतेरी ही चूक आबांच्या लक्षात आणून दिली व समजावले की मराठीमधली शिक्षा म्हणजे हिंदीतले शिक्षण, आबांनी सजा असे म्हणायला हवे होते.
त्यावर आबांनी पत्रकारांना विनंती करून नव्याने बाईट दिला व यावेळी शिक्षेऐवजी सजा देंगे असं ते म्हणाले.
16 Jun 2012 - 1:34 pm | मिहिर
उलटे झाले हो! मराठीतले शिक्षण म्हणजे हिंदीतली शिक्षा. मराठीतली शिक्षा म्हणजे हिंदीतली सजा.
16 Jun 2012 - 8:30 pm | श्रीरंग_जोशी
हो वाक्यरचनेत जरा घोळ झाला.
त्या घटनेत सबंधितांनी आबांना समजावलं की तुम्ही हिंदी वाक्यात जो शिक्षा (मराठी) शब्द वापरताहेत तो वाक्य हिंदी असल्याने शिक्षण असा घेतला जातोय. इथे जे म्हणायचे आहे त्यासाठी सजा या शब्दाचा वापर करावा...
18 Jun 2012 - 10:27 am | डावखुरा
भापो..
16 Jun 2012 - 10:38 am | क्लिंटन
सन १९९९ चा एप्रिल महिना. लोकसभेत वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर चर्चा चालू होती (याच ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते). भाषण चालू होते सोमनाथ चटर्जींचे आणी त्यावेळी संसदीय कामकाजमंत्री होते पी.रंगराजन कुमारमंगलम. सोमनाथदांचे भाषण चालू असताना कुमारमंगलम nature's call साठी गेले होते.
सोमनाथ चटर्जी: I cannot see parliamentary affairs minister here. I am sure he is indulging in non-parliamentary activities outside.
कुमारमंगलम सभागृहात परतत असताना त्यांनी हे ऐकले. आपल्या जागेवर परतल्यावर लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीने त्यांनी interject केले: "I respect Somnath Chatterjee for his long contribution to this house. But I regret to say that Mr. Somnath Chatterjee also indulges in the same unparliamentary activity everyday that he accused me of in his speech" असे म्हणत त्यांनी उजव्या हाताची करंगळी (लहान मुले करतात त्याप्रमाणे) दाखवली. सभागृहात हशा पिकला हे सांगणे न लागे.
(असे काहीसे)
16 Jun 2012 - 10:45 am | श्रीरंग_जोशी
क्लिंटन साहेब - या आठवणी आपण फार जपून ठेवलेल्या दिसताहेत.
तसेही १९९६ ते १९९९ या काळात लोकसभेतील (विश्वास / अविश्वास प्रस्तावांवरील) वादळी चर्चा सारा देश मन लावून बघायचा...
18 Jun 2012 - 10:30 am | डावखुरा
ह्या आठवणी क्लिंटन साहेबांशिवाय कोणाकडे जास्त चांगल्या मिळणार..
[सुधीर काळे आणि ईंद्रराज पवार हे सोडुन]
16 Jun 2012 - 10:39 am | श्रीरंग_जोशी
हरदन हळ्ळी दोडे गौडा देवेगौडा यांना पंतप्रधानपदावरून घालवायची मोहीम मार्च १९९७ मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी सुरू केली होती.
देवेगौडांवर त्यांनी निकम्मा असल्याचा आरोप केला होता.
यावर देवेगौडांनी आक्षेप व्यक्त करताना त्यांच्या मोडक्या तोडक्या हिंदीतून म्हटले की उन्होने मुझे हकम्मा कहा?
अवांतर -देवेगौडांचे वक्तृत जरी प्रसिद्ध नसले तरी लोकसभेतले पंतप्रधान म्हणून त्यांचे शेवटचे भाषण फार मुद्देसुद्धा व प्रभावी ठरले होते.
16 Jun 2012 - 10:54 am | क्लिंटन
महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलायले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे.
हा किस्सा आहे महाराष्ट्रातील बीडच्या खासदार केशरबाई क्षीरसागर यांच्या हिंदीचा. त्या काही कारणानिमित्त इंदिरा गांधींना भेटायला गेल्या होत्या. त्या इंदिरा गांधींच्या कार्यालयात जात असतानाच इंदिराजींचा पारा काही कारणाने चढलेला होता आणि त्यांनी हातातली पेन्सिल टेबलवर आपटत कार्यलयातील शिपायाला दरडावले हे केशरबाईंनी बघितले. इंदिराजींचा पारा चढलेला असताना त्यांच्याकडून आपल्याला पाहिजे ते काम होणे शक्य नाही असे केशरबाईंना वाटले. तेव्हा केशरबाई इंदिराजींना नमस्कार वगैरे करून लगेच जायला निघाल्या. तेव्हा इंदिराजींनी त्यांना विचारले:"केशरबाई आप इतने जल्दी वापस क्यू जा रही है?". त्यावर केशरबाईंचा प्रतिसादः "आपने टेबलपर पेन्सिल आपटी तो मुझे लगा आपसे बात करने का ये टाइम ठिक नही". अर्थातच इंदिराजींना आपटी म्हणजे काय ते कळले नाही आणि केशरबाईंनी पेन्सिल आपटून दाखवली आणि अर्थ सांगितला तेव्हा इंदिराजी खळखळून हसल्या. नंतर अनेकदा केशरबाईंना त्या "आज मैने पेन्सिल आपटी नही तो आप अपनी बात केह सकती है" असे गमतीने म्हणत असत.
16 Jun 2012 - 11:11 am | श्रीरंग_जोशी
अवांतर - जयदत्त क्षीरसागर यांचेच सुपुत्र का?
16 Jun 2012 - 11:19 am | क्लिंटन
हो ते केशरबाईंचेच पुत्र.
19 Jun 2012 - 8:24 am | बब्रुवान
बीडात आपोझिशनवाले न्हेमी योकच लाईन माराय्चे ..
"केशरकाकू .. !! तुहा नव्रा डाकू !! तुहे पोरं खिसेकापू !!! तं मी तुला मत कसं टाकू ???"
17 Jun 2012 - 10:15 pm | विकास
महाराष्ट्रातील अनेक खासदार हिंदीतून बोलायले की हमखास "अध्यक्ष महाराज" असे म्हणत भाषणाला सुरवात करत. हिंदीमध्ये महाराज म्हणजे आचारी. त्यामुळे सभागृहात हशा पिकत असे.
खरे आहे. विशेषतः, शरद पवार जेंव्हा प्रथम संसदेत गेले तेंव्हा त्यांच्याकडून असे म्हणले गेले म्हणून जरा जास्तच गवगवा झाला होता.
केशरबाईंचा किस्सा एकदम मस्तच आहे! बाकी अजून एक गंमत म्हणजे, त्यांना काकू म्हणत असत. आता त्यांच्या नावाने जे कॉलेज आहे, त्याचे नाव देखील, "केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर, उर्फ काकू कॉलेज" असे आहे!
अजून एक आठवले: बाळासाहेब भारद्यांनी केलेली भारतीय राजकारणाची व्याख्या: "काँग्रेसवाल्यांच्या खुर्च्या, जनसंघाच्या पुजाअर्चा, समाजवाद्यांच्या चर्चा आणि कम्युनिस्टांचा मोर्चा"
18 Jun 2012 - 6:08 pm | मेघवेडा
हो हो. त्यांचीही बहुतेक वक्तव्यं विनोदीच असतात. ;)
16 Jun 2012 - 10:55 am | ५० फक्त
हमे देखना है, हमे करना है
16 Jun 2012 - 11:06 am | प्यारे१
किस्सा नक्की कुणाचा ते माहिती नाही पण परदेशी नेत्याचा आहे.
('आपले वक्तृत्व कसे सुधाराल ? ' पुस्तकात होता. ;) )
एका बिल ला त्यांचा पक्ष समर्थन करणार का असे विचारले असता तो नेता म्हणाला...
आय विल... (समर्थक खूश)
नॉट... (विरोधक खूश)
टेल यु... (हशा नि टाळ्या)
16 Jun 2012 - 11:09 am | श्रीरंग_जोशी
मार्च १९९८ मध्ये प्रथमच बहुमताच्या जवळ पोचून भाजप व मित्रपक्षांचे सरकार स्थापन झाले होते. परंतु त्यावेळी बारामतीच्या साहेबांच्या डावपेचांमुळे (शेतकरी दलित गोरगरिबांची माय - काँग्रेस सपा आर पी आय) युतीचे महाराष्ट्रात पानिपत झाले होते. प्रमोद महाजन, मधुकर सरपोतदार सारख्या दिग्गजांचाही पराभव झाला होता.
त्या वेळच्या विश्वास प्रस्तावावरील चर्चेमध्ये लोकसभेमध्ये सेनेकडून बोलायची जबाबदारी तत्कालीन खासदार मोहन रावले यांच्यावर येऊन पडली. फारसे अभ्यासपूर्ण भाषण न करता भावनिक भाषण करायचा त्यांनी प्रयत्न केला. तो बऱ्यापैकी जमतोय असे दिसत असताना नेमका घात झाला.
ते म्हणत होते, की २ वर्षांपूर्वी १३ दिवसांचे वाजपेयी सरकार लोकसभेत विश्वासमत प्राप्त करेल अशी शक्यता दिसता नसल्याने, अखेर अटलजींनी घोषणा केली की, मै जा राहा हूं राष्ट्रपतीजी के पास अपना त्यागपत्र देने... त्यावेळी महाराष्ट्रातील जनता हे दूरदर्शन वर बघत होती त्यात सामान्य मजूर, रिक्षेवाले वगैरे लोक होते.
मोहनराव म्हणाले की, अटलजीकी यह बात सून कर लोगो की आंखों में पानी आ गया.
ऐनवेळी मातृभाषेच्या प्रभावामुळे त्यांनी आंसू आ गये म्हणण्याऐवजी पानी आ गया असे म्हंटले. हे ऐकून विरोधी बाकांवर खसखस पिकली.
सत्ताधारी पक्षाकडून मात्र भारदस्त आवाज असणाऱ्या कुणीतरी विरोधकांची खालील शब्दांत कान उघडणी केली...
एक गैर हिंदी भाषी हिंदी में भाषण दे रहे है, कुछ तोह शिष्टाचार होना चाहिए... मग मात्र सभागृहात शांतता पसरली व मोहनरावांनी आपले भाषण संपवले.
16 Jun 2012 - 11:15 am | तर्री
येथे एक पुढारी चर्चिलसरकार वर टीका करीत असता चर्चिल(चू.भू.) ना म्हणाला की आपलयाला मृत्यू वेडेपणा मुळे किवां गुप्तरोगाने येवो.
त्या वर चर्चिल म्हणाले " ते मी तुमची तत्वे स्वीकारतो (वेडेपणा) की प्रेयसीला मीठी मारतो (गुप्तरोग) त्यावर अवलंबून आहे.
16 Jun 2012 - 11:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
‘आम्ही फक्त स्वप्नं विकली नाहीत. आम्ही जे बोललो ते ‘करून दाखवलं’
-दिलीप बिरुटे
16 Jun 2012 - 11:03 pm | कापूसकोन्ड्या
इंदिरा गांधी च्या १९८० मधील निवडणूकीतील एक कॅप्शन " Elect the government that works"
18 Jun 2012 - 10:39 am | डावखुरा
प्राडाँशी बाडिस..
16 Jun 2012 - 11:17 am | रमताराम
आपला' बुश कसा विसरताहात. त्याचे जगप्रसिद्ध वाक्य आहे ना 'जे आमच्या बाजूचे नाहीत ते सारे दहशतवाद्यांच्या बाजूचे समजले जातील. ' (बुश मराठीत कसा बोलला हा हलकट प्रश्न फाट्यावर मारण्यात येत आहे. बुश हल्ली मराठी शिकतोय नि मिपावर त्याचा एक आयडीपण आहे हे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.)
बुशिजम्स वर सर्च मारला तर बुशमहाशयांनी तोडलेले अनेक तारे सापडतील. बॉस्टनला खेळण्यांचा दुकानात बुश-डॉल्स मिळत, ज्याच्या पायावर दाब दिला की निवडक 'बुशिजम्स'पैकी एक ऐकायला मिळे.
काही बुशिजम्स इथे
16 Jun 2012 - 11:20 am | श्रीरंग_जोशी
बाबासाहेब फारच विनोदी स्वभावाचे होते असे वाचले आहे. विरोधकांचा आक्षेप असायचा की त्यांची विनोदी वृत्ती पत्रकार परिषद, विधानसभेतील चर्चा यामधील गांभीर्य संपुष्टात आणते.
त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात मी रांगत्या वयाचा असल्याने मला नेमकी उदाहरणे ठाऊक नाहीत पण आपल्यापैकी कुणाला ठाऊक असल्यास येथे टंकवावीत.
16 Jun 2012 - 11:41 am | कानडाऊ योगेशु
आता मला "माजी मुख्यमंत्री"पदावरुन कोणीही उतरवु शकणार नाही.
असे काहीसे वाक्य त्यांनी म्हटल्याचे वाचले होते.
16 Jun 2012 - 1:00 pm | मोदक
You are from which city या प्रश्नावर दिलेले उत्तर.
I am from Simplicity. :-o
(शिरीष कणेकर फिल्लमबाजीमध्ये - महाराष्ट्रात फक्त दोनच भोसले प्रसिध्द, शिवाजीराजे भोसले आणि आशा भोसले, बाकीचे सगळे बाबासाहेब भोसले :-D)
17 Jun 2012 - 2:12 pm | प्रदीप
बाबासाहेब अत्यंत बुद्धिमान होते, बॅरिस्टर होते. ते विनोदीही होते. शाब्दिक कोट्या व स्व्तःवरील विनोद करण्यात त्यांचा हातखंडा होता.
त्यांच्या कारकीर्दीत, वारंवार होतो तसा, महाराष्ट्र काँग्रेसी अंतर्गत उद्रेक झाला. मग दिल्लीने तो तात्काळ शमवला. त्याविषयी त्यांना विचारावयास गेलेल्या पत्रकारांशी बोलतांना बाबासाहेब म्हणाले " बंडोबा थंडोबा झाले".
17 Jun 2012 - 10:08 pm | विकास
मला वाटते बाबासाहेब जेंव्हा मुख्यमंत्री होते त्याच सुमारास: पवारांची समाजवादी कॉंग्रेस ज्याला काँग्रेस (स) म्हणत काँग्रेसच्या विरोधात निवडूणकीत उभी होती. त्याला उद्देशून ते म्हणाले होते, काँग्रेस (स) म्हणजे काँग्रेस संपली! :-)
(आधी कधीतरी सांगितलेला किस्सा:)
एकदा महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पार्वतीबाई परीहार ह्या त्या वर्षातील साहीत्यसंमेलनाध्यक्ष शंकरराव खरात यांच्या समवेत एकाच स्टेजवर कार्यक्रमास उपस्थित होत्या. त्या बोलायला उठल्या पण एकदम शंकररावांचे नाव डोक्यातून गेल्याने (आपले हे, असे काहीसे म्हणत) अडखळल्या. म्हणून कोणी तरी पटकन सांगितले. कार्यक्रम सुरळीत पार पडला. पण दुसर्या दिवशी एका वृत्तपत्रात मथळा होता: "पार्वतीबाई, शंकररावांना विसरल्या!" ÌÌÌ
16 Jun 2012 - 11:28 am | क्लिंटन
आचार्य कृपलानी हे प्रजा समाजवादी पक्षाचे तर त्यांच्या पत्नी सुचेता कृपलानी Congress पक्षाच्या खासदार होत्या. आचार्य कृपलानींनी त्यांच्या भाषणात Congress पक्षावर टिका करायला सुरवात केली. अर्थात त्यांच्या पत्नी त्याच पक्षाच्या खासदार म्हणून त्याच सभागृहात उपस्थित होत्या. आचार्य कृपलानी पुढे म्हणाले: "I knew that congressmen are crooks. Still I never expected them to run away with the wives of members of opposition parties". यावर सभागृहात हशा पिकला हे वेगळे सांगायला नको.
16 Jun 2012 - 11:49 am | दादा कोंडके
परवाच बिहारमध्ये १११ बालके मृत्युमुखी पडली. तेंव्हा तिथल्या आरोग्य मंत्री चौबेनी पालकांना मुलांच्या आरोग्यासाठी देवाची प्रार्थना करायला सांगितली! :)
16 Jun 2012 - 11:52 am | दिपक
मै दे रहा हूं,
बालासाहबजी और उद्धवजी को हार्दिक बधाई,
मै करता हूं अभी,
दोनो कॉंग्रेस की खुदाई!
..
‘तुम्ही म्हणता आपली युती टिकेल वर्षे शंभर
पण तुम्ही कुठे लावणार आमचा नंबर?’
16 Jun 2012 - 11:59 am | श्रीरंग_जोशी
नशीब तुम्ही या ओळींना कविता असे संबोधताय...!
16 Jun 2012 - 12:03 pm | श्रीरंग_जोशी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस -
अरेरे अरे ये क्या हुआ, आ गयी सोनिया...
चक्कर खा गई भाजपा.... डर गई शिवसेना...
सेना भाजप युती -
थोडा थोडा भाग भाग सा,
देवेगौडा भाग भाग सा...
16 Jun 2012 - 12:12 pm | श्रीरंग_जोशी
१९९८ च्या लोकसभा निवडणूकीच्या काळात स्व. प्रमोद महाजनांची यवतमाळातील सभा (या सभेत त्यांनी मोनिका लेवेन्स्की चा उद्धार केल्याने गाजलेली).
अटलजींचे गुणगान करता करता ते म्हणाले की अटलजी जवळ जवळ ५० वर्षांपासून राजकारणात आहेत परंतु आजवर त्यांच्या धोतरावर कुठलाही डाग पडलेला नाहीये, अपवाद तुम्ही मारलेल्या मतदानाच्या शिक्क्यांचा.
यावर श्रोत्यांमध्ये बसलेला एक युवक चटकन उभा राहून ओरडला, यावेळी तोही पडू देणार नाही.
एरवी मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे महाजन त्यावेळी रागाने लाल झाले होते.
16 Jun 2012 - 12:21 pm | श्रीरंग_जोशी
तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी त्यांच्या विशुद्ध हिंदीत पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना...
16 Jun 2012 - 12:27 pm | परिकथेतील राजकुमार
ह्या विधानात 'गाजलेले (विनोदी)' म्हणावे असे काय आहे ?
आणि दर दिड मिनिटांनी एक प्रतिसाद देण्यापेक्षा, एकाच प्रतिसादात तुमच्याकडे आहेत ती सगळे विधाने का देत नाही ? प्रतिसादांचा आकडा वाढवायचा असेल तर आम्हाला सांगा की, आम्ही मोकळेच आहोत.
16 Jun 2012 - 12:46 pm | श्रीरंग_जोशी
गुरूजी - मान्य आहे की निखळ विनोदी असे काही नाही, पण केंद्रीय गृहमंत्री (सोबत उप-पंतप्रधानपद) असलेल्या अनुभवी माणसाने अश्या असांसदीय भाषेचा वापर करणे हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे असे माझे मत आहे.
बाकी धाग्याच्या दर्जाला अधिक महत्त्व असावे, प्रतिसादसंख्या गौण आहे.
प्रतिसादातील प्रत्येक विधान वेगवेगळे लिहिण्याचा उद्देश असा आहे की, इतर कुणास (१ किंवा अधिक) त्या पुढाऱ्याचे इतर कुठले विधान अथवा त्या घटनेशी संबंधीत इतर माहिती लिहायची असल्यास वाचकांस त्याचा माग ठेवणे सोपे जाईल. एकाहून अधिक पुढाऱ्यांची विधाने व घटना यांवरच्या प्रतिसादांची सरमिसळ होणार नाही.
बाकी आपलं पॅकेज मात्र जोरदार दिसत आहे...
17 Jun 2012 - 9:49 pm | पक पक पक
माणसाने अश्या असांसदीय भाषेचा वापर करणे हा एक वेगळ्या प्रकारचा विनोद आहे असे माझे मत आहे.
जोशीबुवा,
आपले विनोदाचे अंग फारच विनोदी आहे. ;)
16 Jun 2012 - 12:44 pm | तर्री
जगन्नाथ राव जोशी हे मोठे ईरसाल व्यक्तिमत्व होउन गेले. जन संघ घडवण्यात ज्या अनेकांनी आयुष्य वेचले ( व पदरी काही पडले नाही - आपल्या दृष्टीने) त्या पैकी एक.ते अविवाहित होते
ते मूळ कानडी असले तरी त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. भाषणे तर अती खुसखुशीत करीत असत. त्यांच्या भाषणात लैगिकता सूचकता , अतिशयोक्ती , बिनबुडाचे आरोप यांची बरसात असे. एकंदर जनसंघ-संघात थोडेसे मिसफिट असणारे व्यक्तिमत्व.
त्यांनी महाराष्ट्र , कर्नाटक , म.प्रदेशातून अनेक निवडणुका लढवल्या ( म्हणजे बहुतेक वेळा पडले). लोकसभे साठी १९६७ सालच्या निवडणुकीमध्ये पुण्यात जगन्नाथ राव विरुद्ध आ. अत्रे सामोरा अमोर उभे होते. त्याच वेळी अत्रे विधान सभेची निवडणूक मुंबईतून लढवत होते. आ. अत्रे नी एका भाषणात जगणनाथ रावां वर भरपूर टीका केली. हया कानाड्याची (उपार्याची) पुण्यात हात भर " - - " फाटेल .....
पुढच्याच सभेत जगन्नाथ रावांनी ही कोटी उलटवली "ज्या अत्र्याचा एक पाय मुंबईत व एक पुण्यात आहे त्याची "- -" सव्वा हात फाटलेलीच आहे , शिवण्याची सोय करायची असेल तर सांगा".
तर हया विद्वान ,सज्जन , निष्ठावान कानाड्याची पुण्यात खरच फाटली , आणि आज असाच एक भ्रष्टाचाराचा शिरोमणी कानाड्या पुण्यात संभावित पणे मिरवतो आहे.
उतार वयात जगन्नाथ राव एकाकी झाले. प्रमोद महाजनांनी त्यांची निष्ठेने सेवा केली. हे ही थोडे अवांतर.
16 Jun 2012 - 1:15 pm | मोदक
एक मंत्री / गवर्नर, धरणाला विरोध करताना,
"पाण्यातला कस काढून, त्यातून वीज तयार करून हे लोक निसत्व पाणी शेतीला देतात"
16 Jun 2012 - 1:23 pm | श्रीरंग_जोशी
९ / १० वर्षांपूर्वी कोरेगावच्या ताईंच्या नेतृत्वात या मुद्द्यावर बरीच आंदोलने झाली होती....
19 Jun 2012 - 3:53 pm | आबा
:))
महाविनोदी प्रकार होता तो !
18 Jun 2012 - 1:45 pm | कपिलमुनी
त्यांचा रेफरन्स चुकला असेल पण
पाण्यापासून वीज तयात केली तर कस कमी होतो हे सत्य आहे ..
कारण पा ण्यामधे असणारे सुक्ष्म जीव जंतु , शेवाळे जे शेती पूरक असते ते औष्णिक विद्युत केंद्रात निघुन / मरून जाते ..
19 Jun 2012 - 12:07 am | शैलेन्द्र
औष्णिक विद्युत केंद्रात पाण्यापासुन विज तयार करतात?
19 Jun 2012 - 5:18 pm | कपिलमुनी
हा दुवा
पाण्यापासून वाफ आणि वाफेवर वीज तयार करतात ..पण वाफ हे पाण्याचे एक रूप आहे ...
19 Jun 2012 - 5:37 pm | शैलेन्द्र
पण औष्णीक केंद्रात वीज कशापासुन करतात असं विचारल तर मी तरी कोळशापासुन्/गॅसपासुन किंवा इतर इंधनापासुन अस उत्तर देईन.
19 Jun 2012 - 7:11 pm | श्रीरंग_जोशी
कोळसा वगैरे इंधन म्हणून पाणि तापवायला वापरले जाते. माझ्या माहितीप्रमाणे वाफेच्या जोरावर वीज निर्माण केली जाते.
कृपया जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकावा.
19 Jun 2012 - 7:46 pm | शैलेन्द्र
वीज पाण्यात नसुन इंधनात असते..
19 Jun 2012 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी
माझ्या माहितीप्रमाणे वीज दोन्हीमध्ये नसते. वीजनिर्मितीसाठी कसली तरी शक्ती वापरुन मोशन (मराठी शब्द सुचवा) निर्माण करण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. जसे पाण्यच्या वेगावर शक्तिशाली टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) फिरतात व त्यापासून वीज निर्माण होते.
तसेच थोडे वेगळ्या प्रकारे औष्णिक वीजप्रकल्पात होत असावे असे मला वाटते.
19 Jun 2012 - 10:44 pm | शैलेन्द्र
*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात इंधनात असलेली रासायनीक/ जैवीक उर्जा जाळुन मुक्त केली जाते, त्या उर्जेवर पाण्याची वाफ करुन, ती वाफ कोंडली जाते, त्या स्थीतीज उर्जेवर टर्बाईन्स फिरवुन त्यापासुन गतीज उर्जा तयार केली जाते, त्या गतीज उर्जेवर डायनामो फिरवुन तिचे विद्युत शक्तीत रूपांतर केले जाते.
*जलविद्युत प्रकल्पात योग्य ठीकाणी साचवलेल्या पाण्याच्या स्थीतिज उर्जेचे रुपांतर गतीज उर्जेत करुन त्यावर डायनामो फिरवले जातात.
*पवन विद्युत प्रकल्पात वाहत्या वार्याची गतिज उर्जा वापरुन त्यावर डायनामो फिरवले जातात.
20 Jun 2012 - 1:18 pm | कपिलमुनी
म्हणजेच पाण्याचा थोडा वापर होतो .. मूळ मुद्दा हा होता, अशा पद्धतीने वाफ केलेल्या पाण्याचा 'कस' गेलेला असतो ..
20 Jun 2012 - 12:54 am | मोदक
मोशन (मराठी शब्द सुचवा) - गती.
टर्बाईन्स (मराठी शब्द सुचवा) - जनित्र.
20 Jun 2012 - 1:02 am | श्रीरंग_जोशी
आपले विशेष आभार!!
20 Jun 2012 - 1:27 pm | डावखुरा
वीज निर्मिती साठी टर्बाईन महत्वाची...कोणत्याही प्रकारे टर्बाईन विशिष्ट वेगाने फिरायसाठी फक्त औष्णिक,जल, वायु किंवा लाटांचा उपयोग होतो...
18 Jun 2012 - 3:21 pm | प्यारे१
हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा स्व. देवीलाल म्हणालेले.
18 Jun 2012 - 7:34 pm | ५० फक्त
ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या बाबतीतली आहे. आणि हायड्रो प्रकल्पात असा कस कमी होत नाही, पण औष्णिक प्रकल्पात मात्र हा खुप खुप मोठा प्रश्न आहे हे खरं.
16 Jun 2012 - 1:37 pm | मोदक
मॅनहटनमध्ये एक फ्लायओव्हर किंवा रस्ता असे काहीतरी बांधणे रेंगाळले होते, बड्या बड्यांचे "हितसंबंध" आड येत होते.
शेवटी कंटाळून President नी नकाशावर रस्त्याच्या दोन रेषा आखल्या, खाली सही केली व तो नकाशा हाच फायनल प्लॅन म्हणून अंमलात आणायला दिला.
आणखी कुणाला काही माहिती आहे का या घटनेची?
16 Jun 2012 - 6:32 pm | विजुभाऊ
दादाराजे खर्डेकर सातार्यात एक निवडणूक सभा घेत होते.
भाषण संपल्या नंतर लोकानी घोषणा दिल्या
शरद पवार झिंदाबाद.
त्यानंतर कोणीतरी जोरात ओरडले "दादा राजे......"
लोकाना जय म्हणावे /झिंदाबाद म्हणावे हे कळाले नाही एकदम शांतता पसरली.
कोणीतरी त्या घोषणेला उत्तर दिले ".खर्डेकर........"
सभेत एकदम हशा पिकला
16 Jun 2012 - 7:07 pm | चौकटराजा
शरद पवार बडा मालदार आदमी है ..... शरद यादव इन लोकसभा
हम इंदिराजी जैसे खूबसूरत तो नही फिर भी इतने बुरे भी नही,,,, हमारी एक बार तो सही तस्वीर दिखाओ ना दूर दर्शन पर ,,,,, अटल बिहारी बाजपेयी इन तळेगाव दाभाड
16 Jun 2012 - 7:10 pm | ramjya
खुप दिवसापुर्वी वाचण्यात आलेला किस्सा....संसदेत एका उत्तर भारतीय पांडे नावाच्या खासदारा नंतर एक मराठी खासदार भाषणाला उभे राहिले आणी त्याची सुरुवात " अध्यक्ष महओदय अभो जो पांडे जी ने विचार मांडे है.." ने केली तेव्हा सर्व संसद हसाय लागली..
18 Jun 2012 - 4:17 pm | बॅटमॅन
ते मराठी नेते म्हणजे स का पाटील होते.
"गांधीजी के नेतृत्व के नीचे हमने जो चलवल की" वैग्रे मुक्ताफळे पण त्यांचीच.
18 Jun 2012 - 7:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हमने जो चलवल
मेलो. :)
-दिलीप बिरुटे
16 Jun 2012 - 9:04 pm | कानडाऊ योगेशु
सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यावर पहिल्याप्रथम जे भाषण केले ते फारच भावनिक होते.
मी तुमच्या समोर सून म्हणुन आले.आणि तुमच्यासमोरच विधवा झाले ह्या प्रकारची भावनिक वाक्यरचना भरपूर होती.तेव्हा त्यांना भाषण लिहुन देणार्या टीमचे ही खूप कौतुक झाले होते.
भाजप सरकारपडल्यावर व कॉंग्रेसला बहुमत मिळाल्यावर पंतप्रधानपद नाकारताना ही "अंतरात्मा कि आवाज" नावाचा जबरदस्त गुगली मॅडमनी टाकला होता.
16 Jun 2012 - 9:56 pm | श्रीरंग_जोशी
तेव्हा अशी वंदता होती की सोनियाजींना जावेद अख्तर यांच्याकडून घरपोच शिकवणी मिळत आहे व त्यांच्याकडूनच भाषणे पण लिहून मिळत आहेत.
त्या सर्व कष्टांस फळ येण्यास २००४ साल उजाडले....
17 Jun 2012 - 4:51 am | श्रीरंग_जोशी
१९९८ मध्ये जेव्हा लोकसभा निवडणूका होऊन गेल्या होत्या, नेमके त्यावेळी भारत - ऑस्ट्रेलिया एक दिवसीय सामने (भारतात व नंतर शारजा येथे) सुरू होते. महान फलंदाज राहुल द्रविड त्यावेळी फॉर्मात नसल्याने संघामध्ये नव्हता. कर्णधार अझहर ने, नयन मोंगियास ६ / ७ व्या क्रमांकावरून थेट तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली. तोवर या क्रमांकावर राहुल द्रविड फलंदाजीस यायचा.
नयन मोंगियाच्या छोट्या पण वेगवान खेळींमुळे संघाला फायदा झाला व आपण शारजातील मालिकाही जिंकलो. अर्थात सचिनची दोन्ही शतके अजरामर आहेतच.
त्या मालिकेचे वर्णन करताना बहुधा कणेकर (कदाचित संझगिरीही असतील) यांनी लिहिले, की जसे अटलजींच्या भाषणांतील दोन वाक्यातल्या विरामात सोनिया गांधींचे एक छोटेखानी भाषण संपून जाते तसेच राहुल द्रविडने धाव काढलेल्या २ चेंडूंच्या दरम्यान नयन मोंगियाची अख्खी खेळी संपून जाते.
16 Jun 2012 - 9:15 pm | विकास
विरोधी पक्ष नेते म्हणून (मला वाटते रावांच्या काळात) अटलजी जोशपूर्ण भाषणात, "हम बदलेंगे, हम ये बदलेंगे, वो बदलेंगे" वगैरे म्हणत होते. तर काँग्रेसच्या बाकावरून त्यांच्या नावावरून कोटी करण्यासाठी म्हणून कोणीतरी म्हणाले, की" लेकीन आप तो अटल है (फिर बदलेंगे कैसे?) " ... अटलजींनी मिश्कीलपणे बघत म्हणले, "हां लेकीन मै बिहारी भी हूं!"
अगदी जुना अत्र्यांचा पत्रकार म्हणून किस्सा, आधीच्या एका माझ्याच प्रतिसादात सांगितलेला:
नीलम संजीव रेड्डी आणि व्हि व्हि गिरींच्या मधे झालेल्या चुरशीच्या लढतीची आठवण झाली. ज्या मधे इंदिरा गांधींनी व्हि व्हि गिरींना (अनधिकृत उमेदवारास) निवडून आणून दिले. बर्याच अंशी ही भारताच्या राजकीय आणि काँग्रेस पक्षाच्या अजूनच र्हासाची सुरवात होती. वाचनावरून आठवते त्याप्रमाणे, यशवंतरावांनी तेंव्हा बाईंना त्यांच्या बाजूने मत देईन म्हणून शब्द दिला आणि तो पाळला नाही. बाईंनी आयुष्यभर त्यांच्यावर त्यावरून डूग धरला आणि कधीच आपले समजले नाही....याच गिरीसाहेबांच्या जिंकण्यावरून आणि त्यांच्या ११ मुलांवरून आचार्य अत्र्यांनी दुसर्या दिवशीच्या पेपरात संपूर्ण कुटूंबाचा फोटो देत "व्हि व्हि गिरींची कामगिरी" असे शिर्षक दिले होते.
16 Jun 2012 - 9:41 pm | sagarparadkar
हा घागा फकस्त राजकीय पुढार्यांच्या विनोदी विधानांसाठी मर्यादित केल्याबद्दल णिषेध व्यक्त करण्यात येत आहे ...
परवाच ह्या सहस्रकाचा विनोद ठरलेले विधान वाचले बातमी म्हणून ...
ते म्हणजे पाकिस्तानच्या अतिसभ्य लष्कर प्रमुख कयानींचे विधान .... टाईम्स ऑफ ईंडिया च्या वेब्साईटवर वाचलेले ...
"पाकिस्तान हा शांतिप्रिय देश आहे ..." (हशा ... + टाळ्या)
कोण म्हणतो कि लष्करी अधिकार्यांना विनोदबुद्धी नसते म्हणून ....
16 Jun 2012 - 10:38 pm | श्रीरंग_जोशी
अहो पण मुळात पाकिस्तानी लष्कराचे मोठे अधिकारी त्यांच्या देशात राजकारणी म्हणूनच ओळखले जातात.
आपल्या देशातील राजकारणीही कमी पडतील अशी कामगिरी ते कधी कधी करून दाखवतात.
16 Jun 2012 - 10:27 pm | श्रीरंग_जोशी
माझे सर्वात आवडते राजकीय विधान.
अंगावर आले तर शिंगावर घ्या...!
ज्या माणसाला साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री हा प्रवास होताना पाहिले, त्याला डावा हात म्हणून वागवले तो विरोधकांशी हातमिळवणी करताना दिसतोय असे लक्षात येताच बाळासाहेबांनी पक्षाबाहेर काढले. ही घटना दोन्ही बाजूंना भावनिक वेदना देणारी होती यात शंकाच नाही.
पण राणेसमर्थक राडा करताहेत हे दिसल्याबरोबर लगेच साहेबांचा आदेश आला
अंगावर आले तर शिंगावर घ्या...!
अन सैनिक कामाला लागले.
हाच बाणा दैनंदिन जीवनात कधी कधी कामी येतो, उगाच कुणाच्या वाटेला जाऊ नये पण कुणी उगाचच अंगावर आल्यास तयास शिंगावर घ्यायची तयारी ठेवावी.
अवांतर - हाच बाणा मिपावर सुद्धा बरेचदा वापरला जातो, काही वेळा यश मिळते अन काही वेळा झेपत नाही तर घेताव कशाला (शिंगावर) असे म्हणायची वेळ येते ; -).
16 Jun 2012 - 10:53 pm | कापूसकोन्ड्या
बाबासाहेब भोसले.(प्राचार्य शिवाजी राव भोसले यांचे सख्खे भाउ) ते पण शब्दप्रभू होते.
१) खुदा मेहेरबान तो गधा पेहेलवान (स्वतःमुख्यमंत्री झाल्यावर)
२) बंडोबा थंडोबा झाले ( बंड निवळल्यावर)
स्व.राजीव गांधी एकदा म्हणाले होते "ऐसा नही किया तो हम इलेक्शन लुजेंगे"
16 Jun 2012 - 11:06 pm | श्रीरंग_जोशी
या प्रतिक्रियेसाठी आपले विशेष आभार.
बंडोबा हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात बाबासाहेबांनी प्रथम आणला.
तसेच बारामतीच्या साहेबांनी २ वर्षांपूर्वी 'तोडपाणी' हा शब्दही आणला. काही लोकांनी त्याचा 'तोडबाजी' असा अपभ्रंश केला.
16 Jun 2012 - 11:57 pm | sagarparadkar
प्रमोद महाजन ह्यांनी पुण्यातल्या जाहीर सभेत हा उत्तुंग षटकार मारला होता. त्या सभेला मी स्वतः हजर होतो.
नुकतेच बॅ. आदिक हे आपल्या 'हवाई' कारकीर्दीमुळे पायउतार होत होते किंवा झाले होते. त्या वेळेच्या आसपास जी निवडणूक झाली, तिच्या प्रचारसभेत महाजनांनी जबरदस्त आतषबाजी केली होती.
तेव्हा काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले "काय म्हणायचे ह्या काँग्रेसला ... ह्या महाराष्ट्राला ह्यांनी चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री दिले ..." (लोक अचंबित .... म्हणजे काय?) तर महाजनांनी लगेचच त्या साडेतीन मुख्यमंत्र्यांची यमक जुळवत नावे सांगितली ... "अंतुले, भोसले, दादा .... आदिक आधा !" ....आणि एकच हशा उसळला .... आणि टाळ्यांचा कडकडाटच झाला ....
17 Jun 2012 - 12:58 am | निनाद मुक्काम प...
हटाव लुंगी ,बजाव पुंगी.
हे विधान दक्षिण भारतीयांच्या विरोधात शिवसेनेने आंदोलन केले होते तेव्हा खूप गाजले होते.
किंवा मला सत्ता द्या मी बिहार चे रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत करून दाखवतो.
लालू उवाच
गुड्डी आता बुड्ढी झाली तरी .....
नाना आता तरी टीक रे , नाही मागे एकदा केले विधान केल्यावर मग म्हणाला होता ,
मी असे म्हणालोच नाही.
अवांतर
मिपाच्या इतिहासातील गाजलेली आणि विनोदी तकिया कलाम किंवा विधाने ह्यांच्यावर एखादा लेख काढला तर प्रतिसादातून मराठी साहित्यात अनमोल भर पाडणारा
खजिना सापडेल.
.
17 Jun 2012 - 12:51 pm | एम.जी.
बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज मंत्री म्हणून इंदिराजींच्या म.म्त्रीमंडळात कार्यरत असताना त्यांनी सर्व खासदारांसाठी शासकीय खर्चाने एक सुट्टी मंजूर केली. त्यावेळेस ते म्हणाले ...
" Member is allowed to be accompanied by his or her spouce on the trip..."
अटलबिहारी वाजपेयी उभे राह्यले आणि विचारले..
"What about unmarried members ? Can they go with their friends..?"
बाबू जगजीवनराम क्षणार्धात म्हणाले....
"I said Spouce and not Spice , Mr. Vajpeyi......"
17 Jun 2012 - 1:30 pm | योगप्रभू
(वाचनात लक्षात राहिलेले काही किस्से)
खासदार पिलू मोदी हे मिश्किल गृहस्थ होते. लोकसभेत त्यांच्या विधानांनी खसखस पिकत असे. ते काही वेळा बिनधास्त बोलत असत. एकदा भाषणात टीका करताना ते म्हणाले, 'काही दुय्यम नेते आता स्वतःला सरकार समजू लागले आहेत. यांची पात्रता ती काय? हे नुसते आपल्या विद्यमान पंतप्रधानांचा पेटिकोट पकडून चालत चालत आलेत.' त्यावर सत्तारुढ सदस्यांनी 'पेटिकोट' शब्दाला आक्षेप घेतला आणि तो शब्द कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. अध्यक्षांनी त्यावर मोंदीकडे पाहिले. तर मोदी म्हणाले, 'महोदय, पण पेटिकोट काढून टाकला तर मग उरलं काय?' यावर तत्कालीन पंतप्रधानांनाही हसू आवरले नाही.
महाराष्ट्र विधानसभेत एकदा सर्व सदस्यांच्या छापील माहितीच्या सूचीवरुन चर्चा झाली. या सूचीत अनवधानाने सर्व महिला सदस्यांच्या इंग्रजीतील नावामागे मिस लावले होते. याला विवाहित महिला सदस्यांनी आक्षेप घेतला. त्यावर सभापती मधुकरराव चौधरी यांनी ती चूक दुरुस्त करण्याचा आदेश दिला आणि गंमतीने महिला सदस्यांकडे पाहून म्हणाले, ' मला खात्री आहे. सन्माननीय सदस्या आता 'मिसप्रिंट' वर आक्षेप घेणार नाहीत.
20 Jun 2012 - 1:14 am | बॅटमॅन
मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर खत्रा!!!
20 Jun 2012 - 2:34 am | मोदक
हे घे.. आणखी कांहीमिस्प्रींट..
20 Jun 2012 - 2:53 am | बॅटमॅन
चायला!!!!निर्वाण पावलो आहे __/\__
रूम्मेट झोपलाय नैतर हसुनहसुन मेलोच अस्तो!!
20 Jun 2012 - 11:41 am | विश्वनाथ मेहेंदळे
अजून एक मिसप्रिंट
पेपरातील बातमी "काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात साधारण ३०० वक्ष कोसळले"
20 Jun 2012 - 11:52 am | बॅटमॅन
असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे काम करायला समाजातून सेवकांचा लोंढा येईल येविषीं यत्किमपि शंका आम्हास वाटत नाही ;)
20 Jun 2012 - 12:04 pm | मोदक
विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्या आयडीकडून असले प्रतिसाद बघून एक मिपाकर असल्याची... वैग्रै..., वैग्रै..
(कधी कधी) असभ्य असणारा आणि ते (नेहमीच) कबूल करणारा ;-) - मोदक.
20 Jun 2012 - 1:09 pm | बॅटमॅन
मला सभ्य समजले जाते हे बघून ड्वॉले पाणावले ;)
20 Jun 2012 - 2:00 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य समजा म्हणून... जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाही*.
(नेहमीच) असभ्य असणारा आणि ते (कधी कधी) कबूल करणारा - विमे.
* या मागचा किस्सा सांगू का ?? ;-)
20 Jun 2012 - 3:01 pm | बॅटमॅन
आचार्य अत्रे जिंदाबाद!!!!
21 Jun 2012 - 12:39 am | मोदक
पुरे करा रे पोरांनो...
आधीच जोशी काका दुनियेच्या टारगेट वर आहेत त्यात तुम्ही अवांतराचे तेल ओतू नका.
(सभ्य, सोज्वळ, सज्जन आणि निरागस नसणारा) मोदक.
3 Aug 2012 - 12:49 am | चिगो
अयाया.. गचकलो..:-D
20 Jun 2012 - 9:54 am | श्रीरंग_जोशी
साहेबांचे राजकारणाखेरीज इतर क्षेत्रातील मान्यवरांशी नेहमीच जवळचे संबंध असतात.
असाच एक किस्सा ४०+ वर्षांपूर्वीचा. साहेबांनी बारामतीमध्ये एका साहित्यविषयक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात पुलं व गदिमा यांना आमंत्रित केले होते. कार्यक्रम अर्थातच जोरदार झाला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे साहेबांकडे त्यावेळी स्वतःची गाडी नव्हती. त्यामुळे एका स्थानिक शेठजींची गाडी घेण्यात आली होती. संध्याकाळी पुण्याला परत जाताना शेठजी व साहेब पण बरोबर होते. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर शेठजींनी सवयीप्रमाणे सरळ मुद्द्यालाच हात घातला.
ते म्हणाले, हे साहित्य वगैरे ठीक आहे हो पण तुम्ही लोक पोटापाण्यासाठी काय करता? गाडीमध्ये एक दडपणयुक्त शांतता पसरली. गदिमांच्या कोपिष्ट स्वभावाची साहेबांना पूर्ण कल्पना होती.
अपेक्षेप्रमाणेच, पुलंनी परिस्थितीचा ताबा घेतला, ते म्हणाले आम्ही पोस्टासमोर काम करतो. या अण्णांचं हस्ताक्षर खूप चांगलं आहे त्यामुळे ते लोकांची पत्रं लिहून देतात आणि मी लोकांच्या तुटलेल्या छत्र्या दुरुस्त करून देतो...
20 Jun 2012 - 10:00 am | शिल्पा ब
धागा जरा खाली गेला की लगोलग नवीन किस्सा टंकुन वर आणण्याच्या कामाचे कौतुक आहे.
20 Jun 2012 - 10:21 am | श्रीरंग_जोशी
एकावेळी पाचच धागे मुखपृष्ठावर दिसत असल्याने काहीही केले तरी तारखेनुसार क्र. ६ किंवा त्यापुढील धागा मुखपृष्ठावर दिसणार नसतोच.
कृपया मार्गदर्शन करावे...
20 Jun 2012 - 11:49 am | मोदक
जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत.
ते जावूद्या, तुम्ही नवे किस्से सांगा, मजा येत आहे वाचायला. (खोचकपणे बोलत नाहीये - गैरसमज नसावा)
"राजधानीतून" नावाचे अशोक जैन यांचे पुस्तक वाचले आहे का? राजकारण्यांचे किस्सेच किस्से आहेत त्यात. :-)
20 Jun 2012 - 12:01 pm | श्रीरंग_जोशी
आपला आभारी आहे, मोदकराव!
म्हणजे मिपावरही म्याडम आहेत तर...
हे पुस्तक वाचलेले नाहीये. खरे सांगायचे तर आवड असूनही फारशी पुस्तकं वाचणे जमलेच नाही.
राजकारणाच्या या विनोदी अंगाचे दर्शन प्रथम घडले ते तंबी दुराई (श्रीकांत बोजेवार) यांच्या २ फूल १ हाफ या सदराने. ११ वर्षात एखाद- दुसरेच वाचायचे राहिले असेल. आता ते सदर नसल्याने लोकरंगची पार रयाच गेली आहे.
17 Jun 2012 - 10:18 pm | निनाद मुक्काम प...
जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक बिहार मी लालू रहेगा.
वाकड्या तोंडाचा गांधी , मैद्याचे पोते , लखोबा लोखंडे हि बाळासाहेबांनी दिलेली विशेषणे ज्याचा ते आपल्या भाषणात नेहमी उल्लेख करत खूप गाजली होती.
राजकारण म्हणजे गजकरण ( गजकर्ण ) हे त्यांचे विधान सुद्धा गाजले होते.
18 Jun 2012 - 3:43 am | सूर्याजीपंत
शरद पवारांना विलासराव परत मुख्यमंत्री होणार का विचारल्यावर त्यांनी उत्तर दिलं, समय से पहले और किस्मत से ज्यादा किसीको कुछः नाही मिलता...
18 Jun 2012 - 4:08 am | श्रीरंग_जोशी
१९९८ ची लोकसभा निवडणूक, संयुक्त आघाडीच्या सरकारचा २०-२१ महिन्यांचा कारभार, सोनियाजींचे उगवते नेतृत्व यामुळे भाजप व मित्रपक्ष पूर्ण भरात होते. खास करून महाराष्ट्रात तर युतीचे वारू चौखूर उधळले होते. १९९६ च्या निवडणूकीत युतीला ४८ पैकी ३३ जागा मिळाल्या होत्या.
भाजपचे राज्यातील नेतृत्व तर अती आत्मविश्वासात होते. त्याचीच परिणिती नागपूरचे खासदार यांचे तिकिट कापण्यात झाली. पुरोहितांनीही एका रात्रीत आपला गट बदलला व ते काँग्रेसच्या तंबूत दाखल झाले. द हितवाद (याचे ते मालक -संपादक आहेत अजूनही) वर्तमानपत्रात तर मुख्यमंत्र्यांच्या रामटेकमधील सभेत गुरे ढोरे बसल्याचे छायाचित्र आले होते. नितीन गडकरींनी यावर म्हटले की पुरोहितांबरोबर त्यांचे वर्तमानपत्रही बदलले.
पुरोहितांनी त्या निवडणूकीत काँग्रेस उमेदवार विलास मुत्तेमवार यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण जोर लावला. मतदानाच्या काही दिवस अगोदर सोनियांची नागपूरमधील पहिलीच जाहीर सभा होती. कस्तुरचंद पार्कवर लाखांची गर्दी जमली होती. व्यासपीठावर विदर्भातील ११ ही मतदारसंघांचे काँग्रेस - रिपाई चे उमेदवार व काँग्रेसचे राज्यातील नेते उपस्थित होते. अर्थातच बनवारीलाल पुरोहितही होतेच. नेमका सोनियाजींना सभास्थानी पोचण्यास उशीर झाला.
या संधीचा लाभ उठवण्यासाठी पुरोहितांनी त्यांना सोनियाजी येईपर्यंत भाषण करू देण्याची विनंती केली. एवढ्या मोठ्या गर्दीसमोर भाषण करण्याची संधी उभ्या आयुष्यात मिळणार नव्हती. लोकसत्तेच्या वार्ताहराने याबद्दल लिहिले की त्यावेळी बोलू दिले नसते तर पुरोहितांना हार्ट अटॅकच आला असता. मौके की नजाकत पाहून काँग्रेस नेत्यांनीही त्यांना बोलण्याची संधी दिली. पुरोहितांनीही मिळालेल्या संधीचा पूर्ण वापर करून गडकरी व महाजनांवर यथेच्छ तोंडसुख घेतले.
त्यातल्या त्यात विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच गडकरींनी पूरोहितांना फ्युझ्ड बल्ब म्हणून हिणवले होते. यावर पुरोहितांनी या सभेत प्रत्युत्तर दिले. ये गडकरी ने मुझे फ्युझ्ड बल्ब कहा, अगर मैने इनके ११ के ११ बल्ब फ्युझ नही किये तो नाम बदल दूंगा.
अन काय सांगावे ऐन भरात असलेल्या युतीचे ११ ही उमेदवार पडले. त्यात ७ खासदार होते हे विशेष. महाराष्ट्रातही केवळ १० (सेना ६, भाजप ४) उमेदवार निवडून आले. विदर्भातील ३ धरून रिपाईचेही इतिहासात प्रथमच ४ खासदार निवडून आले. पवारांचे राजकीय समीकरण (काँग्रेस, सपा, रिपाई) व जुलै १९९७ ची रमाबाई आंबेडकर नगरातील घटना यांचा संयुक्त परिणामाने युतीचे न भूतो न भविष्यती असे पानिपत झाले.
18 Jun 2012 - 5:10 am | शिल्पा ब
या संपुर्ण प्रतिसाद नेमकं विनोदी असं काय आहे?
18 Jun 2012 - 8:22 am | ५० फक्त
+१, मी तर प्रतिसाद वरुन खाली, खालुन वर, डाविकडुन उजवीकडे, त्याच्या उलट, मग एक ओळ सोडुन एक ओळ( अशा प्रकारे वाचायचं साहित्य हल्ली फार कमी झालं आहे) सगळ्या प्रकारे वाचुन पाहिलं, विनोद तर सोडा, विनोद तावडेंचं नाव देखील नाही सापडलं.
18 Jun 2012 - 11:28 am | डावखुरा
प्रतिसाद आवडेश..
18 Jun 2012 - 8:42 am | श्रीरंग_जोशी
गाजलेली विधाने हि प्राथमिक पात्रता आहे धाग्याच्या शीर्षकाप्रमाणे. विनोदी असेल तर दुधात साखर.
18 Jun 2012 - 4:45 pm | श्रीरंग_जोशी
आणखी एक गाजलेले विधान.
६ डिसेंबर १९९२ च्या अयोध्येतील घटनेनंतर देशभरात दंगली पेटल्या व बरेच आठवडे सुरू राहिल्या. मोजके बोलण्यासाठी प्रसिद्ध असलेले तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव या घटनेवर धोरणात्मक असं काही बोलले नाही. काही महिन्यांनंतर सर्व काही शांत झाल्यानंतर त्यांनी चक्क अयोध्येत जाहीर सभा घेतली. या सभेत स्वतःच्या कार्यपद्धतीला शोभून न दिसणारे (अयोध्येत मंदिर मशीद पुन्हा बांधण्याचे) आश्वासन त्यांनी दिले.
हा (उजवे व डावे) विरोधकच काय तर स्वपक्षीयांसाठीही एक धक्काच होता. अर्थातच विरोधी पक्षांनी यावर रणकंदन सुरू केले व स्पष्टीकरणाची मागणी केली. त्यावेळी सरकारच्या वतीने तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण (यांना अख्खा महाराष्ट्र हेडमास्तर म्हणून संबोधायचा) याबद्दलचे स्पष्टीकरण दिले.
"पंतप्रधानांनी अयोध्येत मंदिर मशिद बांधायचे आश्वासन जरूर दिले, पण कुठे बांधले जाणार त्या जागेचे नाही".
अर्थातच या एका उत्तराने विरोधकांच्या विरोधामधली हवाच काढून घेतली.
18 Jun 2012 - 3:12 pm | विजुभाऊ
अर्थातच विरोधी पक्षांनी यावर रानाकडनं सुरू केले
तुम्हाला हवा असलेला शब्द "रणकंदन"
18 Jun 2012 - 4:43 pm | श्रीरंग_जोशी
धन्यवाद विजुभाऊ!
मूळ लेखन टंकले तेव्हा 'रणकंदन' असेच टंकले होते अथवा टंकण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित अनुस्वार वगैरे राहिला असेल.
म्हणून शुद्धिचिकित्सकाने सरळ रानाकडे न्यावे? अर्थात शु. चि. वापरताना माझीच घाई व अतिआत्मविश्वास नडला असणार.
18 Jun 2012 - 4:25 pm | बॅटमॅन
ममता ब्यानर्जी रेल्वे बजेट संसदेत सादर करताना म्हणाल्या
"आय कांट सॅटिस्फाय ऑल ऑफ यू", प्रचंड हशा उसळला.
त्यांचेच एक दुसरे उदा. बंगालमध्ये गुंतवणूक करावी वैग्रे सांगणारी एक समिट् बोलावली होती. त्यात त्या म्हणाल्या,
"यू हॅभ टु इन्भेस्ट इन बेंगॉल, बिकॉज बेंगॉल इज द गेटवे टु नॉर्थइस्टर्न कंट्रीज(राज्ये म्हणावयाचे असावे). ऑल्सो, इट इज द गेटवे टु बांगलादेश अँड बांगलादेश इज द गेटवे टु पाकिस्तान".
ऐकता ऐकता कळावयाचे बंद झाले. तूनळीवर ममता ब्यानर्जींच्या मजेशिर भाषणांची क्लिप आहे, सर्चल्यास मिळंल लग्गेच.
18 Jun 2012 - 11:57 pm | मोदक
:-D
जबरा...
18 Jun 2012 - 6:32 pm | गणेशा
काही वाक्य आवडली ...
धागा मस्त.
18 Jun 2012 - 6:34 pm | गणेशा
दादा कोंडकेंचे फेमस भाषण सगळ्यांना माहितीच असेल ..
काय ती वाक्यावाक्यावर हुकुमत आणि टोले.
18 Jun 2012 - 6:55 pm | कपिलमुनी
??
18 Jun 2012 - 8:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अत्यंत थर्ड क्लास भाषण आहे ते.
18 Jun 2012 - 8:22 pm | चेतनकुलकर्णी_85
स्व. दादा कोंडके यांचे कोल्हापुरातील फार जुनी सभा आहे शिवसेनेच्या समर्थनात ..त्यात त्यांनी शरद पवार ला ,राजीव गांधीला आणि कॉंग्रेस ला खूपच हाणले आहे... :)
http://www.youtube.com/watch?v=CK3Ve4nE_A8
कॉंग्रेस(आय) चा अर्थ पण सांगितला आहे.. :)
जाता जाता "लागले हे आपापली "cyclindare" उचलून कामाला..." इति शिवसेना प्रमुख....
19 Jun 2012 - 1:26 am | तर्री
आपले कृषी मंत्री मोजकेच बोलतात. शेती तज्ञ असल्याने कुठे काय पेरावे व त्या पासून किती पिक मिळेल याचा त्यांना नेमका अंदाज असतो.
मोर जसा पावसाळा सुरु झाल्यावर केका करतो तसेच प्रत्येक निवडणुकीच्या आधी साहेब बोलतात.
१.देशाच्या राजकारणामध्ये प्रमोद महाजनांचा दबदबा होता , बाळासाहेबांशी मैत्री होती आणि त्याचा परिपाक म्हणजे मनोहर जोशी (मर्यादित कर्तुत्वावर अलगद) लोकसभेचे अध्यक्ष झाले. वास्तविक पवारही तेंव्हा आपत्ती निवारण संन्स्थेचे मोठे पद (महाजन पवार दोस्तीमुळे परस्पर हितवादी ) राखून होते.
निवडणुका आल्यावर साहेब बोलले होते - हल्ली राजकारण जोशी -महाजनांच्या हातात आहे.
भारताचा कर्णधार रवी शास्त्री असताना , चंद्रकांत पंडित ही भारतीय संघात होता. ( आणि मुंबईचा कर्णधार).
त्यावेळचे त्यांचे उद्गार "भार्तीईय क्रिकेट मध्येही शास्त्री-पंडितांचेच राज्य आहे "
असो. पुढे त्यांनी क्रिकेटचा कारभार हाती घेतला आणि आता मराठी मुलगा भारतीय संघात नाहीच तर मुंबईत ही हाताच्या बोटावरमोजण्याईतकेच.
हया वाक्यामध्ये फार मोठा विनोद ( अतिशयोक्ती हो ) तर आहेच पण , एखादे बीज कसे पेरावे व त्यापासून भरघोस पिक कसे घ्यावे हे सांगणारे आहे.
- साहेब सगळ्यांचे बारसे जेवले आहेत हेच खरे.
19 Jun 2012 - 8:45 pm | हुप्प्या
जाणता राजा म्हणून प्रसिद्ध असणारे शरच्चंद्रजीरावदादासाहेब पवार लोकसभेत दुष्काळ या विषयावर अस्खलित हिंदीत भाषण करत होते,
"महाराष्ट्र में इतना बडा सूखा पडा है के लोगोंको चार घास भी ठीक से खाने को नही मिलते!"
तमाम हिंदीभाषिक बुचकळ्यात. महाराष्ट्र मे लोग घास खाते है?
19 Jun 2012 - 9:03 pm | श्रीरंग_जोशी
खासदार झाल्यावर सुरुवातीच्या काळात हिंदीवर प्रभुत्व नसल्याने झालेले घोळ बघून साहेबांनी हिंदीची शिकवणी लावली होती अशी वंदता होती. तसेच नंतरच्या काळात इंग्रजीची पण शिकवणी लावल्याची कुजबूज होती. खरे खोटे साहेबच जाणे.
20 Jun 2012 - 1:03 am | शिल्पा ब
पुन्हा एकदा - १००वा.
20 Jun 2012 - 1:12 am | श्रीरंग_जोशी
शिल्पातै - आपले टायमिंग (म. श. सुचवा) जोरदार आहे.
20 Jun 2012 - 10:16 am | श्रीरंग_जोशी
इंग्लंडच्या उच्च संसदीय परंपरांचे उदाहरण म्हणून सांगितला जाणारा एक किस्सा...
एकदा इंग्लंडचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडण्यासाठी तेथील संसदेत पोचत होते. प्रवेशद्वारापाशीच एक विरोधी सदस्याला सिगारेट ओढताना पाहून ते कुत्सितपणे म्हणाले, 'महोदय, उद्यापासून ही चैन आपल्याला परवडणार नाही'.
अर्थसंकल्प मांडून झाल्या झाल्या तो विरोधी सदस्य उभा राहून म्हणाला की अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा भंग केलेला आहे म्हणून मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतो. संपूर्ण सभागृह अवाक होवून पाहत असताना त्या सदस्याने सकाळचा किस्सा समजावून सांगितला. अर्थसंकल्पात तंबाखुजन्य पदार्थांवरील कर वाढवल्यामुळे सकाळी बोललेले वाक्य म्हणजे अर्थमंत्र्यांनी गोपनीयतेचा शपथेचा भंग केलेला आहे.
अन आपल्याला आश्चर्य वाटेल अशी गोष्ट म्हणजे अर्थमंत्र्यांनी हा आरोप मान्य करून तडक राजीनामा दिला व तो लगेच मंजूरही करण्यात आला.
21 Jun 2012 - 9:55 am | श्रीरंग_जोशी
बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तान चा न भूतो न भविष्यती असा पराभव केल्यावर फील्डमार्शल सॅम माणेकशॉ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचले होते. पंतप्रधान म्हणून इंदिराजींनि खेळलेल्या राजकीय डावपेचांबद्दल त्यांनाही यथोचित श्रेय मिळतच होते.
पंतप्रधान व सैन्यप्रमुख म्हणून दोघांचेही संबंध सलोख्याचे होते. परंतु या दिग्विजयी कामगिरीनंतर इंदिराजींच्या भोवती असलेल्या काही विघ्नसंतोषी मंडळींनी इंदिराजींचे कान भरणे सुरू केले की माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय लष्कर उठाव करणार आहे.
आपल्या देशाच्या सुदैवाने इंदिराजींनी कुठलेही अविचारी पाऊल न उचलता सरळ माणेकशॉ यांना पाचारण केले व स्पष्ट शब्दांत याबाबत विचारणा केली. सॅम यांनी अगदी सहजणे उत्तर दिले.
देवाने आपल्या दोघांनाही चांगले धारदार नाक दिले आहे जे आपण दोघेही एकमेकांच्या कामात कधी खुपसत नाही व यापुढेही खुपसणार नाही.
21 Jun 2012 - 8:54 pm | साधामाणूस
(बहुतेकांना माहीत असावा.)
चर्चिल हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिध्द होते. एकदा विरोधी पक्षाच्या सदस्या चिडून त्यांना म्हणाल्या," मी जर तुमची पत्नी असते तर तुमच्या चहात विष मिसळले असते." क्षणाचाही विलंब न लावता चर्चिल उत्तरले,"मी जर तुमचा नवरा असतो तर तो चहा आनंदाने प्यायलो असतो!"
21 Jun 2012 - 9:30 pm | श्रीरंग_जोशी
सहीच...!
मला तर नव्हते ठावूक.
अजून येउद्या!!
21 Jun 2012 - 10:31 pm | श्रीरंग
हा किस्सा जॉर्ज बर्नार्ड शॉ चा म्हणून ऐकला होता.
22 Jun 2012 - 10:59 am | श्रीरंग_जोशी
विन्स्टन चर्चिल काय अन जॉर्ज बर्नाड शॉ काय, दोन्हीही इरसाल माणसे. असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत त्यांच्याबद्दल...
19 Nov 2015 - 11:49 pm | जॅक द रिपर
चर्चील आणि नॅन्सी अॅस्टर (ब्रिटनच्या पहिल्या महिला खासदार) यांच्यातला किस्सा आहे तो!
19 Nov 2015 - 11:44 pm | जॅक द रिपर
चर्चीलचा अजून एक गाजलेला किस्सा -
चर्चील पार्लमेंटच्या हाऊस ऑफ कॉमन्सच्या टॉयलेटमध्ये असताना दाराची कडी वाजली. चर्चीलचा सेक्रेटरी बाहेरुन म्हणाला,
"Excuse me Prime Minister, but the Lord Privy Seal wishes to speak to you."
"Tell His Lordship: I'm sealed on The Privy and can only deal with one shit at a time!" चर्चीलने आतून उत्तर दिलं!
19 Nov 2015 - 11:47 pm | जॅक द रिपर
जॉर्ज बर्नाड शॉने एकदा आपल्या नाटकाच्या पहिल्याच प्रयोगाची दोन तिकीटं चर्चीलला पाठवली. सोबत एक खवचट चिठी होती.
"तुला एखादा मित्रं असलाच तर त्याच्याबरोबर नाटकाला ये!"
"तुझ्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर नक्की येईन!" चर्चीलने त्याच कागदावर खाली लिहून पाठवलं!
20 Nov 2015 - 12:32 am | अभ्या..
चिट्ठी जरा अशा भाषेत होती असे वाचल्याचे स्मरते.
मित्राला घेऊन नाटकाला ये......... कुणी असला तर.
अवश्य दुसर्या प्रयोगाला येईन.......जर झाला तर.
20 Nov 2015 - 12:26 am | सौन्दर्य
सर विन्स्टंट चर्चिल हे पंतप्रधान असताना, एकदा आजारी असून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. त्यांना भेटायला विरोधी पक्षाचे काही सद्स्य हॉस्पिटलमध्ये आले होते. नेमके त्याचवेळी, एक नर्स, त्यांचा नैसर्गिक विधी उरकून, ते भांडे घेऊन चालली होती. रुममध्ये त्यावेळी उपस्थित विरोधी पक्ष सदस्याना बघून सर विन्स्टंट चर्चिल म्हणाले, "First time I am seeing my 'motion' being carried unopposed.”
20 Nov 2015 - 12:51 am | जॅक द रिपर
अमेरीकेतील नागरी युद्धाच्या काळातला हा एक किस्सा -
दक्षिणी राज्यांविरुद्ध सुरु असलेल्या लढाईत उत्तरी राज्यांचा मॅक्लेलान नावाचा एक सेनापती होता. हा मॅक्लेलान आपले रिपोर्ट पाठवण्याबाबत कमालीचा आळशी होता. त्याच्या एखाद्या चकमकीचा अहवाल बर्याचदा महिन्याभराने लिंकनच्या हाती येत असे! वैतागून लिंकनने एकदा त्याला रोजच्यारोज डिटेल रिपोर्ट पाठवण्याचा सक्तं हुकूम सोडला.
"आज आम्ही शत्रूच्या चार गाई पकडल्या आहेत!" मोजून दोन दिवसांनी मॅक्लेलानचा संदेश आला!
"ताबडतोब दूध काढून सैनिकांना पिण्यास द्या!" लिंकानने उत्तर पाठवलं!
20 Nov 2015 - 1:12 am | रमेश आठवले
मी हा किस्सा लोकसभेच्या प्रेक्षक ग्यालरीत बसून ऐकलेला आहे -
सभागृहात मिरे (Pepper) निर्यातीबद्दल चर्चा चालली होती. त्या वर बिहार मधील एका खासदारांनी उठून हा प्रश्न विचारला होता - देशात paper (कागदा) चा इतका तुटवडा असताना त्याच्या निर्यातीची चर्चा का चालली आहे ?
20 Nov 2015 - 1:16 am | रमेश आठवले
लालू बेचारा आदत का मारा
घरमे थी रबडी लेकिन खा रहा था चारा
20 Nov 2015 - 1:29 am | जयन्त बा शिम्पि
लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या होत्या. ( कोणत्या साली ते आठवत नाही, जाणकारानी शोधुन लिहावे ) केरळमधुन काँग्रेसचे खासदार जाफर शरीफ निवडून आले होते. पहिलाच दिवस असल्याने , खासदारांचा शपथविधी सुरु होता. जाफर शरीफ यांचे नाव पुकारले गेले आणि नेमक्या त्याच वेळेला ते बाहेर निघून गेले होते. त्यावेळी नाथ पै की मधू दंडवते कोणीतरी पटकन म्हणाले , " हमारे में एक ही तो ' शरीफ ' था , वो भी बाहर गया है '! !
१९६२ सालच्या चिनी आक्रमणा नंतर पं. जवाहरलाल नेहरू , आपण गमावलेल्या १२,००० चो. मैलाच्या भुभागाचे , न पटणारे समर्थन करीत असतांना म्हणाले , " नाहीतरी त्या जमीनीवर गवताचे एक पाते उगवत नव्हते, जमीन काही कामाची नव्हतीच. " त्यावर श्री पिलू मोदी हे गुजराथ मधील खासदार , नेहरुन्च्या , तुळतुळीत टकलाकडे पाहून म्हणाले, " आपल्याही डोक्यावर असेही काही उगत नाही, तेही आपल्या काय कामाचे ? " लोकसभेत हंशा पिकला हे सांगायला नकोच.
20 Nov 2015 - 7:44 am | चौकटराजा
चरिचिलना नभोवाणी वरून भाषण करायचे होते. काही कारणाने त्याना ट्याक्सी तून जावे लागले.रस्त्यावर आल्यावर त्यानी एक ट्याक्सी थांबविली
" नभोवाणी केद्रावर नेतोस का अर्जट ? चर्चिल
" नाही जमायचे नाही ! मला चर्चिल साहेबांचे भाषण ऐकायला थांबायचेय " ड्रायव्हर
अरे, मी चौपट पैसे देतो तुला जायचे " चर्चिल
असे का मग चला साहेब तो चर्चिल गेला खड्ड्यात " ड्रायव्हर .
20 Nov 2015 - 7:55 am | कैलासवासी सोन्याबापु
बरेच आधी एक किस्सा वाचला होता तो लिबरल ब्रिटिश प्राइम मिनिस्टर लॉयड जॉर्ज ह्यांचा होता की अब्राहम लिंकन चा नीट आठवत नाहीये जाणकार कदाचित सांगु शकतील, किस्सा असा की
लॉयड जॉर्ज/ लिंकन एकदा निवडणूक प्रचारासंबंधात एक "नुक्कड़ सभा" सारखी सभा घेत होते तेव्हा प्रेक्षकात बसलेला एक टारगट बाप्या ओरडला
"ह्याचा बाप एक जुना खटारा चालवत असे ज्याला घोड्या ऐवजी गाढ़वे जुंपलेली असत!"
ह्यावर अजिबात तोल न ढळू देता लॉयड जॉर्ज / लिंकन मिश्किलपणे म्हणाला की
"आज आमचे पिताजी जिवंत नाहीत किंवा त्यांचा तो खटारा ही अस्तित्वात नाहीत पण त्याला जुंपलेली गाढ़वे मात्र अजुन जिवंत आहेत"
20 Nov 2015 - 8:09 am | स्पार्टाकस
बापू,
ही कॉमेंट अब्राहम लिंकनची होती.
20 Nov 2015 - 9:10 am | भंकस बाबा
☺☺☺
20 Nov 2015 - 1:01 pm | पामर
१९९६ साली अट्लबिहारी वाजपेयीं पंतप्रधान असताना विरोधकांनी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आणला व NDA सरकार १३ दिवसात पडलं.त्यानंतर तिस-या आघाडीला बाहेरुन पाठींबा देऊन काँग्रेसनी देवेगौडांना पंतप्रधान केलं. त्या वेळी संसदेच्या पहिल्याच सत्रात प्रमोद महाजन बोलत होते. सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात त्यांनी तुफानी आतिषबाजी केली होती. त्या वेळच्या तडजोडीच्या राजकारणावर सडकुन टिका करताना त्यांनी एक किस्सा सांगायला सुरुवात केली.एकदा भारतीय सर्व-पक्षीय संसदीय मंडळ चीनच्या दौर्यावर गेले होते,त्यावेळी एका चिनी राजकारणी माणसाने महाजनांना भारतीय लोकशाही बद्दल काही प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले," हम जब चीन मे गये तो बहुत सारे लोग हमारे साथ थे| तब मुझे किसीने पुछा आपकी democracy कैसे चलती है? मैने कहा की democracy समझाने से अच्छा मैं सिर्फ आपको अपने सहचारिंओंका परीचय करवां देता हूं आप खुद ही भारतीय democracy समझ जायेंगे. मैंने कहा..'I am Pramod mahajan, I am member of Loksabha, I belong to single largest party in the house.. and I am in opposition!' फिर मैंने श्रीवल्लभ पाणिग्रहींकी ओर हाथ करे बोला,'He belongs to second largest party (Congress). He is outside the Government..supporting the Government', फिर मैंने अहमद बेदी साहाब को उठाया और कहा,'He is in third largest party(Janata Dal).. he is inside the front but out side of government' और फिर मैंने कहा,'he is Mr. Ramakant Khalap,( Maharashtrawadi Gomantak Party) he is the only member of his party and he is in the government!!(Law Minister)'...
20 Nov 2015 - 1:06 pm | गॅरी ट्रुमन
प्रमोद महाजनांचे हे भाषण म्हणजे खरोखरच खूपच छान होते.
एक सुधारणा-- हे भाषण प्रमोद महाजनांनी देवेगौडा सरकार आल्यानंतर पहिल्या संसद अधिवेशनात केले नव्हते तर सीताराम केसरींनी देवेगौडा सरकारचा पाठिंबा अचानक काढून घेतल्यानंतर ११ एप्रिल १९९७ रोजी देवेगौडा सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेत केले होते.
(११ एप्रिल १९९७ च्या विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेतील प्रत्येक भाषण अगदी भक्तीभावाने ऐकलेला) ट्रुमन
20 Nov 2015 - 3:52 pm | जिन्क्स
law will take its own course - या वरुन
"आप रेस कोर्स मे बैठे हो ऑर उनको ओन कोर्स बोल रहे हो ये कैसे चलेगा" - हे पण याच भाषणा वेळी. :) :)
21 Nov 2015 - 6:01 pm | निनाद मुक्काम प...
त्यांची भाषणे आणि घोडे बाजारातील खरेदी विक्रीचे कसब चांगले होते.
आता संघात भाजपात फर्डे व्यक्ते अनेक होते पण भाजपात पंचताराकित वलयांकीत व कलंकित संस्कृती आणण्याचा बहुमान ह्यांचाच
भाजपला महाराष्ट्रात दुबळे व सेनेचे बांडगुळ ह्यांनीच बनवले.
नुसत्या भाषणांनी आर्थिक सुधारणा व प्रशासकीय कारभारात सुधारणा शक्य असत्या तर अजून काय हवे होते
आपल्या मतदार संघात त्यांना गुरुदास कामत ह्यांचे अप्रतिम कामाचे व प्रभावी कार्यकर्त्यांच्या जाळ्याचे आव्हान लाभले होते , राम मंदिर नानात्र ची निवडणूक वगळता इतरवेळी त्यांचा नेहमीच सुपडा साफ झाला.
20 Nov 2015 - 1:15 pm | पामर
चुकी साठी माफी असावी..मला हा प्रसंग कोणता तरी विश्वासदर्शक ठरावादरम्यान होता हे आठवत होते..
20 Nov 2015 - 1:30 pm | गॅरी ट्रुमन
माफी वगैरे कशाला? समजा प्रमोद महाजनांनी ते भाषण एप्रिल १९९७ मध्ये केले असे म्हणण्याऐवजी जून १९९६ मध्ये केले असे म्हटले तरी त्यामुळे आभाळ थोडीच कोसळणार आहे? रेकॉर्ड स्ट्रेट असावा म्हणून सुधारणा सुचवली इतकेच. माफी वगैरे मागून टेन्शन घेऊ आणि देऊ नका राव. मिपा आपलाच असा :)
20 Nov 2015 - 2:44 pm | बबन ताम्बे
"इंदिरा इ़ज इंडीया "
आणीबाणीच्या काळातले हे काँग्रेस पुढा-याचे वाक्य खूप गाजले होते. बहुतेक बॅ. रजनी पटेल. नक्की आठवत नाही.
अजून एक,
"काँग्रेसला राजीव गांधींशिवाय पर्याय नाही आणि देशाला काँग्रेससिवाय पर्याय नाही " - बॅ. विठ्ठलराव गाडगीळ
20 Nov 2015 - 3:14 pm | गॅरी ट्रुमन
हे नरपुंगव होते काँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरूआ.
20 Nov 2015 - 4:36 pm | बबन ताम्बे
देवकांत बरूआ.
20 Nov 2015 - 4:23 pm | गॅरी ट्रुमन
लालबहादूर शास्त्रींनंतर इंदिरा गांधींना पंतप्रधान बनविण्यात कामराज, निजलिंगप्पा, अतुल्य घोष इत्यादी सिंडिकेटचा महत्वाचा वाटा होता. १९६७ च्या निवडणुकांपर्यंत इंदिरांना पंतप्रधानपदी ठेवायचे तोपर्यंत त्यांना कठपुतलीप्रमाणे कसेही फिरवता येईल असा त्यांचा कयास होता.पण तो कयास जोरदार फसला. इंदिरा गांधींनी पंतप्रधानपदी आल्यावर स्वतःचा इंगा दाखवून द्यायला सुरवात केली. १९६६ मध्ये रूपयाचे अवमूल्यन करायचा निर्णय इंदिरा गांधींच्या सरकारने घेतला.हा निर्णय सिंडिकेटला फारसा रूचला नव्हता.त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष कामराज यांनी "Great man's daughter--small man's mistake" असे म्हटले. म्हणजे Great man's (नेहरूंच्या) daughter (इंदिरांना) पंतप्रधान बनविणे ही small man's mistake होती. इथे small man हे कामराजांनी स्वतःला उद्देशून म्हटले.
अर्थातच यात विनोदी काहीच नाही पण हे कामराजांचे गाजलेले विधान होते म्हणून इथे लिहित आहे.
20 Nov 2015 - 4:49 pm | बबन ताम्बे
लोकसभा निवडणूक १९८४. बारामती मधून शरद पवारसाहेब (स. काँग्रेस) आणि शंकरराव पाटील (काँग्रेस) असा प्रमुख सामना होता.
पवारसाहेबांची आकुर्डीच्या सभेमधील भाषणातील काही वाक्ये -
".... आजच टाईम्समधे गेल्या पाच वर्षांत ज्यांनी लोकसभेत एकही प्रश्न विचारला नाही अशा खासदारांची लिस्ट आली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २८ खासदारांची नावे आहेत. त्यात पहीले नाव आहे शंकरराव बाजीराव पाटील. या माणसानी लोकसभेत फक्त दोन वेळा तोंड उघडले. पहील्यांदा खासदारकीची शपथ घ्यायला. कारण त्याशिवाय खासदारकीचे बेनीफिट मिळत नाहीत. आणि दुस-यांदा जांभई दयायला..."
प्रचंड हशा ....
21 Nov 2015 - 5:00 am | शुंभ
(चु. भु . द्या . घ्य.) बाबासाहेब भोसले यांच्या विरुद्ध त्यांच्याच पक्षातील लोकांनी एका बैठकीत बंड केले, प्रकरण हातघाईवर आले, तेव्हा कसेबसे बाहेर आलेल्या बाबासाहेबांची प्रतिकिया :-
यांची उक्ती बंडाची वृत्ती गुंडांची कृती षंढांची