आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
प्रतिक्रिया
21 Nov 2015 - 8:23 am | भंकस बाबा
या माणसाचे नाव घेतले की हसायला येते राव!
जैतापुर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करताना अबू आझमीं ने तोडलेले तारे!
इस प्रोजेक्ट को हर एक मुसलमान को विरोध करना चाहिए। कयोकि ये प्रोजेक्ट बना कौन रहा है? अरेवा कंपनी। अरेवा कंपनी किधर की है? फ़्रांस की। ये फ़्रांस ऐसा देश है जिसने मुसलमानो को बुरक़ा पेहन्नेपर पाबन्दी लगाईं है। तो सब मुसलमान भाइयो को इस प्रोजेक्ट का विरोध करना चाहिये।
21 Nov 2015 - 8:31 am | भंकस बाबा
शिवसेनेच्या दसरा मेळावा,
" हे कॉंग्रेसवाले सेनेला उखडून टाकायची भाषा करतात, साले हे कॉंग्रेसचे उपटू शकले नाय तर आमचे काय उपटणार" एक छोटासा पॉज, मोठा हसा प्रेक्षकातुन. नंतर दादा बोलले " गवत हो"
22 Nov 2015 - 11:30 am | योगी९००
दादा कोंडके या माणसाविषयी थोडाफार आदर आहे. पण त्याची शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळची केलेली भाषणे फारच खालच्या लेवलची होती. कोल्हापुर येथे भाषणात "बाळासाहेबांना पकडणार म्हणजे त्यांचे काय पकडणार?" असे बोलण्यापर्यंत मजल गेली होती. (नंतर लगेच "संपुर्ण बाळासाहेब तुम्हाला कधीच सापडणार नाही" असे बोलून टाळ्या घेण्याचा प्रयत्न केला होता). अर्थात दादांच्या या भाषणाला कोल्हापुरकरांनी हशा दिला आणि टाळ्या वाजवल्या याचे जास्त वाईट वाटले.
एकदा शंकरराव चव्हाण यांच्याविषयी दादांनी असे उद्गार काढले होते. "शंकरराव आणि त्यांच्या पत्नी आतमध्ये आहेत आणि त्यांच्या पत्नी XXXX पहात आहेत". त्या काळात ना.धो. ताम्हनकराचा मानसपुत्रावर आलेली गिरीश घाणेकर दिग्दर्शित एक सिरीयल खूपच प्रसिद्ध होती. XXXX च्या जागी दादांनी त्या सिरीयलचे नाव घेतले होते त्यामुळे भलताच अर्थ निघत होता. अशा त्यांच्या बोलण्यावर शंकररावांनी टिका केली असता खुद्द बाळासाहेबानी दादांची खरडपट्टी काढली होती.
22 Nov 2015 - 11:33 am | योगी९००
"ना.धो. ताम्हनकराचा" ऐवजी "ना.धो. ताम्हनकरांच्या" असे वाचावे.
23 Nov 2015 - 9:47 am | पामर
आरपीआयचे खासदार रामदास आठवले अटलजींवर कवितेतुन टिका करताना