नमस्कार मंडळी,
हा धागा काढायचं प्रयोजन सांगणं थोडं कठीण आहे पण तसं पहाता आपण सर्वच यात कदाचित मोडतो म्हणून. खरं तर मालिका लिहायला हवी पण आजकाल लोकांना फास्ट्फुडची सवय आहे म्हणून थोडक्यात. ;)
ईंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं हे सर्वज्ञात आहेच, पण जी छाप आपल्यावर पडली आहे ती पिढ्यान् पिढ्या राहील असे दिसते. तशी ती इंग्रजांनी राज्य केलेल्या सर्व देशात दिसते खरी, पण आपल्याकडे जरा जास्तच, नाही का? ;)
आत्मापरीक्षण तसेच आलेले काही स्वानुभव मांडण्याचा प्रयत्न करीत आहे.
अनिवासी भारतीय : अतिशय क्लिष्ट मुद्दा.. बरं मुद्दा मुद्द्यासहितच मांडतो.
१. काही लोक्स १ महिन्यासाठी भारताबाहेर जातात ( काही नेपाळ मधे पण) आणि फोरेन रिटर्न असं लग्नाच्या बायोडेटा मधे लिहितात.
२. आल्यावर हे लोक्स "शी भारतात किती घाण आहे, लोकं किती चुकीचं ईंग्रजी बोलतात, आय हेट धिस" वगैरे बोलतात.
३. यांना नीट मराठी बोलता येत नाही, २०-३० वर्षे भारतात राहिल्यानंतर पण, भारतात राहिलो याचं दु:ख यांना फार.
४. आम्ही कसे फोरवर्ड आहोत, आणि तुम्ही कसे घाणेरडे आहात हे दाखवण्यात यांना फार स्वारस्य असते.
५. भारताच्या पॉलिटीक्स मधे हे लोकं फार नाक खुपसतात, जसं काय ह्यांच्या सांगण्याने सो कॉल्ड भारतीय पॉलिटीशियन अॅक्शन घेणार आहेत.
अजुन बरेच मुद्दे आहेत, प्रतिसादक मांडतीलच.
बरं एमएनसी मधे काम करणारे..
१.यांना असं वाटतं की हे आभाळातून टपकले आहेत. रोज "आम्ही अॅडव्हान्स्ड आहोत" अशी आरोळी ठोकणारे संध्याकाळी बायकोला शिव्या घालत.. काय कलयुग आला आहे, बायको नवर्याची सेवा करत नाही" असं म्हणत आराम खुर्चीवर बसणारे.
२. आयटीवाल्यांनी भारताची कशी वाट लावली हा यांचा रोजचा चर्चेचा विषय, त्यांचे पगार कसे कमी करावेत हा गहन चर्चेचा विषय.
आई-बाप, काका-मामा
१. आमचा मुलगा फॉरेन मधे काम करतो.
२. मुलगी आयटीतली पाहिजे.
३. आमच्या मुलाला ६ लाख पगार आहे. (डॉलरचा पगार रुपयात कन्वर्ट करुन, तिथे तो भिक मागून का राहिना)
ईतर
१. ए, चांगलं ईंग्लिश बोलता येतं का?
२. पिझ्झा हट, अय्या.. जावु ना.. ते भाकरी झोपडी नको..
३. क्रेझी जॉन.. किती छान.. वेडा माध्या हॉटेल नको
मी स्वतः एकदा हापिसच्या कँटीन (खानावळीमधे) गेलो होतो, तिथे "डिलाइट कॉर्नर" नावाचा एक "स्टॉल" होता, मी विचार केला की जर हा मराठीत ( आनंदी कोपरा) किंवा हिंदीत (खुश कोना) असतं तर आपण गेलो असतो का?
आपण आजही एखाद्याच्या ई़ंग्रजी बोलण्यावरुन तो/ती किती हाय-फाय आहे हे न-जाणतेपणे ठरवतो. त्याच्या/तिच्या राहणीमानावरुन "सो चिप" किंवा "सो गुड" म्हणतो. हे खरं आहे ना. एखादा/दी भारताबाएर राहुन आला/ली आहे की नाही यावरुन आपण अनुमान लावतो.. ते कितपत बरोबर आहे?
पण हे कितपत खरं आहे? हा प्रश्न उभा आहे.. तुमच्याकडे उत्तर आहे का? आणखीन अपेक्षित आहे प्रतिसादामधून..
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
13 Jun 2012 - 10:49 pm | अत्रुप्त आत्मा
हाssण तेझ्याsss!
13 Jun 2012 - 9:33 pm | मुक्त विहारि
कसले काय?
कलयूग आले आहे , असे म्हणायचे आणि गप्प बसायचे.
13 Jun 2012 - 9:35 pm | शिल्पा ब
:)
असे लोकं पाहीलेत बॉ! महीना - सहा महीने येउन गेले की भारतात अगदी आम्ही कसे हाय फाय, मधुनच चुकीचं का होईना इंग्रजी बोलणे, सारखं इकडे - तिकडे तुलना (जसं काही हे भारताबाहेरच जन्मलेत अन मोठे झालेत) वगैरे हास्यास्पद प्रकार पाहीलेत. कीव येते दुसरं काही नाही.
13 Jun 2012 - 9:43 pm | विकास
(*)
13 Jun 2012 - 9:46 pm | बिपिन कार्यकर्ते
आयडी हॅक झाला का? ;)
13 Jun 2012 - 9:47 pm | विकास
फारीन रिटर्न्ड आयडी हाय! ;)
13 Jun 2012 - 9:44 pm | बिपिन कार्यकर्ते
डिलाईट कॉर्नरबद्दल अजून जाणून घ्यायला उत्सुक आहे!
- आपला (उत्सुक)
13 Jun 2012 - 10:45 pm | चिरोटा
हे आपण मध्ये कोण कोण येतात? बाकी सफाईदार इंग्रजी वरून व्यक्ती हाय्-फाय आहे की नाही हे ठरवायची पद्धत ब्रिटिश काळापासून आहे.तीच गोष्ट विलायतेत जावून परत येणार्यांची.
प्रश्न- भारतिय प्रशासकिय सेवा,भारतिय विदेश सेवा,मोठ्या भारतिय्/बहुतांशी एम्.एन्.सी.ज मधील मुख्य कार्यकारी अधिकारी इंग्रजी माध्यमातून शिकलेले असतात.ह्या बद्दल मराठमोळा ह्यांचे मत काय?
13 Jun 2012 - 10:45 pm | चिरोटा
.
13 Jun 2012 - 11:48 pm | श्रीरंग_जोशी
या विषयावर पूर्वीही अनेक चर्चांमधून हे मुद्दे मांडले गेले आहे व सरकत्या विपत्रांतून बरीच विनोदनिर्मितीही झाली आहे.परंतु माझ्या निरीक्षणात तरी आपण उल्लेखलेल्या प्रवृत्तींची उदाहरणे फारच कमी आहेत.
या विषयावरची मते अतिरंजितच का असतात हे मोठे कोडे आहे. कदाचित २५-३० वर्षांपूर्वी परदेशी जाणे खरंच विशेष बाब असायची. गेल्या १२-१५वर्षात यात विशेष असे काहीच राहिले नाहीये.
14 Jun 2012 - 12:38 am | रेवती
ममो, काय हे? ;)
कितीवेळा तेच ते!
आता इथे आलेच आहे तर जरा देतेच प्रतिसाद. ;)
मी तर बै, येताजाता माझा हिरवेपणा सिद्ध केल्याशिवाय रहात नाही.
आम्ही कस्से ग्रेट आहोत हे सांगत फिरते.
जे लोक अमेरिकेशिवाय इतर देशात आहेत त्यांना कमी लेखते (तेही लोक मला कमी लेखतात हे विसरून जाते).
गेल्या काही वर्षात झालय काय, भारतात डर्टी वाटत असतानाही येते आणि सगळ्या वस्तू, पदार्थ, कपडा महाग असल्याबद्दल नाक मुरडते. आजूबाजूच्या लोकांचा श्वास अडकतो, क्काय? तुला हे महाग वाटतं? आम्हाला नै ब्वॉ वाटत असं म्हणतात. काय करावे कळत नाही. घरी रोज भाजी पोळी, भात आमटी खाण्यापेक्षा पौष्टिक पिझ्झा आणि बर्गर याशिवाय काह्ही म्हणता काह्ही खात नाही. ;)
चला, जरावेळ खोडसाळपणा करून झाला. :)
14 Jun 2012 - 9:10 am | मराठमोळा
रेवती तै,
१ नंबर प्रतिसाद, खुप हसवलत. :)
15 Jun 2012 - 11:02 am | jaypal
14 Jun 2012 - 12:39 am | सुजित पवार
थोडि माझिहि असहमति अहे.
हे सर्व आधि होते आता फार कमि आहे. आम्च्या कार्यलयातिल ३ मराठी मुलि एकमेकिअन्शि हिन्दि मधे बोलतात, का ते कलत नहि. आनि जेव्हा मि स्वता मराठि बोलतो तेव्हा मराठीत बोलतात
14 Jun 2012 - 1:19 am | गावरान
या बाबत माझा अनुभव. मी गेली ४५ वर्षॅ अमेरिकेत स्थायीक आहे. घर आहे, दोन गाड्या आहेत, वगैरे वगैरे. जेव्हा जेव्हा मी भारतात भेटीला जातो त्यावेळी माझ्या बोलण्या, चालण्या, वागण्यावरून घरचे म्हणतात की तू अमेरीकेत रहातोस हे खरे वाटत नाही. (गमतीने उलट मीच विचारतो की मी काय केल्याने तुमची खात्री पटेल?) आता बोला. त्यामुळे असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते.
14 Jun 2012 - 1:29 am | दादा कोंडके
फक्त आंतरजालावर काय करावं हे सांगतो. पटल्यास बाकिचं बघू. :)
१. ताबडतोब सगळ्या मराठी संकेतस्थळावर वावर वाढवावा. नाहितर तिकडे जाउन मराठी अभिव्यक्तीची खाज भावण्यासाठी दिडक्या खर्च करून संकेतस्थळं कशाला काढलियेत? लवकरच संपादक पदावर वर्णी लागण्याची सुद्धा शक्यता आहे.
२. मधनं मधनं नॉस्टेल्जिक व्हावं
३. आपण इथल्या व्यवस्थेला कंटाळून आपली माणसं सोडून जरी तिकडे गेला असला तरी "भारताची प्रगती" यावर लेख प्रसवावा. इथं राहणार्या लोकांना पटणार नाही पण कुंथुन कुंथून विदा द्यावा आणि लोकांना पटवावं. :)
आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो. ;)
14 Jun 2012 - 1:53 am | विकास
आणखी लिहिलं तर पब्लिक मारायला येइल म्हणून थांबतो.
जालावरील मार "virtual" च असतो. :-)
14 Jun 2012 - 5:37 am | बन्या बापु
मराठमोळा साहेब,
आपल्या काही विचारांशी असहमत आहे.. तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते.
१. अनिवासी भारतीय :
अनिवासी भारतीय म्हणजे जो भारताबाहेर वर्षातून १८०+ दिवस राहतो आणि परदेश मध्ये आपला आयकर भरतो तो. आपण उगीच गोड गैरसमज करून घेतला आहे कि परदेशात जाऊन आलेला अनिवासी भारतीय !!
असे अतिशहाणे ( म्हणजे परदेश वारी करून आलेले , अनिवासी नाही ) यांना मराठी बोलता येत नाही असे नसून आपण त्यांच्याशी फाजील इंग्रजी बोलतो.असे लोक्स जर काही वेडेवाकडे बोलत असतील तर त्यांच्या सरळ सरळ श्रीमुखात देण्याची तयारी असावी.
२. एमएनसी मधे काम करणारे:
आपल्याला भेटलेले नमुने असतील तुम्ही म्हणता तसे ( सगळे अपवाद तुम्हालाच का येऊन भेटले हा चर्चेचा विषय ठरेल )..
पण ह्या अपवादांना प्रमाण ठरवून असा सामान्य नित्कर्ष काढणे योग्य नाही असे वाटते.
विचार वाचून पडलेले काही प्रश्न:
१. किती वेळा आपण मुलांना घेऊन कावरे / गणु शिंदे / तत्सम मराठी माणसाच्या दुकानात icecream घेऊन दिला आहे ? देताना बघितला आहे ? आपल्याला सोस वाडीलाल, Naturals चा. Mc donalds चा burger चांगला आणि आमचा वडापाव तेवढा unhygenic ठरतो !!
२. आई बाप कौतुक करतात म्हणता ? मग तुम्ही बाप म्हणून काय असा म्हणणार का कि माझा मुलगा वाया गेला. भारतात शिकला आणि आता गोर्या साहेबाची चड्डी धूत बसला आहे ?
३. मराठी माणूस सल्ला देताना कायम आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकून दुसर्याला असे का सांगत बसतो कि सरकारी शाळा उत्तम ?
४. आपल्याला ठराविक विषयात ब्रह्मज्ञान आहे अशी समजूत करून ठिकठिकाणी अक्षता वाटणारे पुण्यात , मुंबईत, भारतात नाहीत ? ( जे तुमच्या लेखी अनिवासी भारतीय / एमएनसी मधे काम करणारे वैगेरे वैगेरे नाहीत असे )
५. माझ्या बघण्यात पुण्यनगरीत एक जोशी आहेत. त्यांचा घोषा एकच.. "शिक्षक व्हा.. शाखेत जा.. देशाचे भले करा.." त्यांचा बाळ्या मात्र परदेशात जाऊन संडास घासतो त्याचे काय ? स्वतः जोशी काका कर्जतच्या पुढे कधी गेलेले ऐकले नाही..
६. अमुक अमुक मराठी कादंबरी / पुस्तक / चित्रपट / नाटक भिक्कार कसा हे भरभरून लिहिणारे आणि रा-one कसा महान चित्रपट आहे, शाहारूक कसा क्लास आहे सांगणारे अनेक दिसतात ? त्यांचे श्राद्ध कोण घालणार ? ( कुठलेही मराठी दैनिक उघडा आणि वाचा भरभरून ही मुक्ताफळे )..
मुळात प्रश्न असा विचारा की असे काय आहे कि ज्यामुळे अनिवासी भारतीयांना भारतामधील त्रूटी दिसतात ? आणि आपण काय करू शकू की ज्याने परिस्थिती सुधारेल ?
१. नागरिक समज ( सिविक sense ) नसलेली जनता ?
२. आपल्या तुंबड्या भरणारे राजकारणी लोक्स ?
३. पायाभूत सुविधांचा अभाव ?
४. नको तिथे पिंका टाकत बसलेले विचारवंत ( स्वयंघोषित !! लोकमान्य न्हवे ! )
५. ...
जेथे खायला नाही २ घास तेथे सुग्रास अन्नाची स्वप्ने कसली दाखवताय ? ( खाणे प्रतीकात्मात म्हंटले आहे, उगाच शब्दछल नको.. )
अवांतर :
नाना पाटेकरने मध्ये कुठेतरी एक किस्सा सांगितला होता कि पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता. आजुबाजूला किती लोक मूर्चित झाले आणि किती लोक्स हसले ह्याला पुरावा नाही. पण हे उदाहरण आपण दार्शनिक मानून आत्मचिंतन करण्याची गरज आहे असे वाटते.
असो.. मला आपले जे दिसते ते लिहिले हो.. हलके घ्या आणि रागाऊ नका.
बन्या बापू
14 Jun 2012 - 9:09 am | मराठमोळा
तुम्ही लैच सिरियसली घेतलं बुवा..
तुमच्या विचारांचा आदर आहे, मला हे जनरलाईझ करायचं नाहीये. पण काही नमुने भेटतात त्यांची कीव येते. म्हणून गंमत केली थोडीशी. :)
14 Jun 2012 - 10:45 am | विश्वनाथ मेहेंदळे
ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!!
14 Jun 2012 - 10:49 am | Nile
फुलटॉस नाही, इट वॉज अ गूड लेंथ डिलीव्हरी. डोंट यू सी, ही इज ऑन बॅकफूट?
14 Jun 2012 - 10:51 am | रमताराम
निळोबा, तुझ्या इंग्रजीवरून तुम्ही यनाराय वाटंत नाही बरं का.
14 Jun 2012 - 11:07 am | Nile
यमयनशी वाला तरी वाटतो का नाय वो?
15 Jun 2012 - 6:45 am | मराठमोळा
>>ममो, धागा शतकी करण्याची उत्तम संधी आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप समजून सोडतोस काय? फुलटोस आहे, उचलून मार. !!!!
हाहाहा.. नको बुवा, आजकाल फुल्टॉस उचलून मारले की सिक्सरच्या ऐवजी कॅच जातात चुकुन. आपले ग्राऊंड शॉट्स खेळलेले बरे, म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो" :P
15 Jun 2012 - 10:10 am | विश्वनाथ मेहेंदळे
मान गये. अलगद सचिनला चर्चेत आणला. क्या बात है, क्या बात है !!!! शतक नक्की.
इतके कमी म्हणून की काय, खाली हुंड्याचा विषय पण आहेच. वा वा !! :-)
15 Jun 2012 - 10:36 am | टवाळ कार्टा
>>म्हण्जे सचिनसारखं मलाही म्हणता येईल "मी रेकॉर्ड साठी खेळत नाही, देशासाठी आणि टीमसाठी खेळतो"
अछ्छा...मग देशासाठी खेळणार्यांची नावे सांगा
द्रविड आणि कुंबळेपण .... हे दोघे * सोडुन आणखी कोण आहे??
*मी अझरच्याकाळानंतर बद्दल बोलत आहे...त्या आधीचे मला माहीत नाही
14 Jun 2012 - 5:43 pm | आदिजोशी
पुण्यातील एका ब्राह्मण घरातील ( सदाशिव पेठ / नारायण पेठ / कसबा तत्सम विभागात राहणारी ) मुलीने समर्थांच्या फोटोकडे बघून " why is he not wearing pants ?" असा सवाल टाकला होता.
ह्यात मूर्च्छीत होण्यासारखे काही नाही. 'रामदास स्वामी धोतर का नेसत नव्हते' हा प्रश्न चौथीत असताना मलाही पडला नव्हता. मोठ्या मुलीने असा प्रश्न विचारला असेल तर नक्कीच ती भारतात राहणारी नसावी. अथवा ब्राह्मण घरातल्या मुलांना असे प्रश्न कधीच पडू शकत नाहीत.
14 Jun 2012 - 6:50 am | शुचि
काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये.
_______________________
आई-वडीलांचे म्हणाल तर प्रत्येक आई-वडीलांना मुलांच्या कर्तुत्वाबद्दल अभिमान असतो. त्यात वावगे ते काय?
_________________________
बाकी राहणीमानावरून "सो चीप/सो गुड" वगैरे ठरविणे, उथळपणाच वाटतो. राहणीमानापेक्षा अधिक अर्थपूर्ण निकषांवर मैत्री आधारीत हवी हे नक्की.
___________________________
बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत ;), त्यांना आपल्या नातेवाईकांची व भारताची आठवण येते, भारतात घाण आहे वगैरे बोलण्यापेक्षा भारतात चांगले काय, हेच आता आठवले जाते कारण "दुर्मीळता"
14 Jun 2012 - 10:52 am | रमताराम
पहिल्या वाक्यात 'डायवर्शन' चा बोर्ड लागलाय. आता शंभरी काय दोनशे नक्की. नेहमीच्या मल्लांना पाचारण करतो आहे. :) (म्हणजे त्यांना पाचारण करण्याची गरज नाहीच, गुगल अॅलर्ट लावलेले असतातच त्यांनी. मी आपलं फुकटचं श्रेय उपटतोय इतकंच.)
14 Jun 2012 - 11:13 am | चावटमेला
काही लोकांना "जेन्युइन" कारणांनी परदेशी जावावेसे वाट॑ते जसे ऊठसूठ मनावर ओरखडे उमटवणारी बेकारी-गरीबी न बघवणे, आरक्षण मान्य नसणे, प्रदूषणमुक्ती हवी असणे, लाचखोरीपासून मुक्ती हवी असणे किंवा अन्य काहीही वैयक्तिक कारण असू शकेल. मी असे म्हणत नाही की हे सर्व दोष भारतात आहेत पण या तृटी कदाचित परदेशात नसतील असा स्वप्नाळूपणा कुठेतरी या लोकांना वाटतो. याबद्दल त्यांना गुन्हेगार धरता येणार नाही. प्रत्येकालाच वाटते की - आपल्याला ज्या खस्ता भोगाव्या लागल्या तशा खस्ता आपल्या पुढच्या पीढीस भोगाव्या लागू नये.
सहमत!!
बाकी जे अनिवासी भारतीय माझ्या पहाण्यात आले आहेत ते स्वतः च "शी डिड वेन्ट" वगैरे चूकीचे इग्लिश स्वतःच बोलत असल्याने कोणालाच नाव ठेवत नाहीत
इथे तर डबल सहमत ;)
14 Jun 2012 - 9:29 am | ऋषिकेश
नाही हो! उलट आम्ही आम्रिकेला जाताना आम्ही इथून गव्हाचं पीठ तिथे घेऊन जातो आणि मऊसूत पोळ्या खातो आणि भारतात आल्यावर मात्र (इथल्यासारखं) पिझ्झा-बर्गर खातो.. :) :P
14 Jun 2012 - 11:05 am | प्यारे१
रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करुन पुन्हा सहर्ष सादर करीत आहोत.... अगणित अंकी नाटक.... बाब्या नि कार्टं.
कलाकार : नेहमीचेच यशस्वी .
लेखनः / दिग्दर्शन : आपापले.
.
.
.
.
.
14 Jun 2012 - 12:07 pm | प्रभाकर पेठकर
अमराठी माणसाने मोडकंतोडकं मराठी बोललं तरी आपण कौतुक करतो. पण कोणी चुकीचे इंग्रजी बोलला की नेमक्या चुकीवर बोट ठेऊन आपण त्याचे सर्व व्यक्तिमत्त्वच डागाळून टाकतो. इंग्रजी भाषेला एवढ्या उच्चपदावर कोणी आणि का नेऊन बसविले? आपणच. विचारांपेक्षा भाषेला आपण जास्त मान देतो आहोत.
विदेशात राहून, काही निमित्ताने, भारतास भेट दिल्यावर खुप गोष्टींवर टिका केली जाते. भारतात राहून काही सोयीसुविधा, सामाजिक भान ह्या गोष्टी आपण कधी तरी नुसत्याच ऐकलेल्या आणि पुस्तकांमधून वाचलेल्या असतात. पण, परदेशात त्या प्रत्यक्ष अनुभवल्यावर त्यांचे महत्त्व जाणवून आणि त्या अनुषंगाने आयुष्यात येणार्या सहजतेने भारावून माणूस अशी टिका करतो. त्या मागे ह्या सुधारणा करणे शक्य असूनही भारतात त्यांना ना राजकारण्यांकडून महत्त्व दिले जाते ना समाजाकडून, ह्या बद्दलचे वैषम्य असते. भारताबद्दल प्रचंड अभिमान असतो. भारतियांच्या हुशारीबद्दल, उपलब्ध कौशल्याबद्दल असणार्या रास्त अभिमानातून जन्मलेल्या काही अपेक्षा असतात. प्रचंड भ्रष्टाचाराने पोखरलेल्या भारताबद्दल बोलताना असा विचार असतो की राजकारणी पैसे खातात तर खा पण त्याच बरोबर आवश्यक त्या सुधारणाही करा. १० रुपयातील १ रुपया खाऊन ९ रुपये समाजकारणासाठी वापरले तर लोकं तक्रार करणार नाहीत. पण आपल्या कडे १० तील ६-७ रुपये खाण्याकडे कल दिसून येतो. तसाच मुद्दा आरक्षणाबद्दल आणि सामाजिक स्वच्छतेबद्दल.
मुंबईतच (आता नक्की विभाग आठवत नाही, पण कुर्ला-मानखुर्द असावा) एका १५ फुट खोल नाल्याच्या काठी झोपडपट्टी आहे. त्या नाल्याची भिंत सिमेंटने बांधलेली आहे. ह्या भिंतीला लागून सार्वजनिक संडास बांधलेले आहेत. त्या संडासातून मैला भिंतीवरून ओघळून थेट त्या नाल्यात पडतो. जेवायला बसले असताना 'ते', अगणित जुलाब वाहून तयार झालेले, भिंतीवरील पिवळ्या रंगाचे, रोगण कधी आठवले तर माणूस जेवणही अर्धे सोडून उठून जाईल. अशा 'देखाव्यातूनच' स्लम डॉग मिलेनियर सारख्या हॉलीवूड चित्रपटांना 'ते' दृश्य सुचतं. पण आपले 'कलाकार' स्वत्व विसरून ऑस्कर स्विकारायला धावतात. भारत तो चित्रपट भारतात सर्वत्र अभिमानाने प्रदर्शित करतो. भारतिय सेन्सॉर बोर्डही त्यात गैर मानत नाही. एवढी नजर मेलेली आहे. फक्त अमिताभ बच्चनने त्या सीनला आक्षेप घेतला होता. असो. तर वरील झोपडपट्टीची 'ती' भिंत स्थानिक पालिकेस, पोलीसांस, नगरसेवकांस दिसत नाही का? ह्यावर जर एखाद्या अनिवासी भारतियाने काही भाष्य केले किंवा किळस व्यक्त केली तर ती त्या अनिवासी भारतियाची चुक आहे का? अनिवासी किंवा निवासी भारतियांनी अशा गोष्टी पाहूनही अभिमानच बाळगावा का? हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी अस्वच्छतेची अनेक उदाहरणे देता येतील. गुंडगिरी, अन्याय्य राजकिय हस्तक्षेप, असुरक्षितता, रहदारीतील बेशिस्तता, सामाजिक असंवेदनशिलता ह्यांचे परिणाम आता हळू हळू आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचले आहेत.
भारतात चांगले काही नाहीच का? तर तसे नाही. कित्येक चांगल्या गोष्टी जाणवतात. परदेशात त्या पासून आपण वंचित राहतो हे सतत जाणवत असतं. जसं, रुक्ष व्यावहारिकता. (इथे आखातात) निसर्ग, काही अंशी अजूनही उरलेला आपलेपणा, धान्य-भाज्यांची चव, ताजेपणा आणि सर्वात मुख्य हवेतील परिचित सुगंध, मातीशी जोडलेलं नातं. सार्वजनिक सेवा पुरवताना आकारलेला स्वस्त सेवाकर (तो वाढवून चांगली सेवा द्यावी), रेल्वे, एस्टीची स्वस्त आणि सर्वदूर पुरविली जाणारी सेवा. बरीच मोठी यादी देता येईल. मी तर रजेवर येतो तेंव्हा रस्त्याने चालताना शेजारच्या इमारतीतून येणारे जेवणाचे सुगंध, कुकरच्या शिट्ट्या, दुध तापवलेला खरपुस वास, पोळ्या करतानाचा खमंग वास, मोठ्याने लावलेला रेडिओ (हल्ली नाही ऐकू येत), चट्टेरी लेहेंगा घातलेले आजोबा, गॅलरीत कपडे वाळत गालणारी गृहिणी, इमारतिच्या खाली उभी राहून चवथ्या मजल्यावरील आपल्या मैत्रीणीला 'ए मालविकाSSSSSSSS' अशी साद घालणारी चिमुरडी किंवा हातात क्रिकेटची बॅट घेऊन मैदानावर निघालेला कोणी 'सचिन', कॉलनीच्या रस्त्यात भेटलेल्या कोणा बाईला 'काकू, 'सौरव' आहे घरी?' असा प्रश्न करतो ते पाहूनही परदेशात मी काहीतरी 'मिस' करतोय हे जाणवतं. असो.
काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत.
माझे भारतावर प्रेम आहे आणि जे जे देश मी पाहीले तिथल्या सर्व चांगल्या चांगल्या गोष्टी भारताय याव्यात सर्व निवासींनाही त्याचा लाभ व्हावा, समाजाचे प्रबोधन होऊन सामाजिक स्वच्छता, समन्वय नांदावा असे मनापासून वाटते.
परदेशात का गेलो? तर एक संधी मिळाली म्हणून. भारतात राहूनही आपण अधिक आर्थिक लाभ देणार्या वेगवेगळ्या नोकर्या बदलतो तसेच अधिक आर्थिक लाभ दिसल्याने 'नोकरी' बदलली इतकेच. भारत घाणेरडा आहे म्हणून देश सोडून बाहेर पडलो असे अजिबात नाही.
जय हिन्द.
14 Jun 2012 - 12:30 pm | बॅटमॅन
आत्तापर्यंतचा सर्वांत भारी प्रतिसाद. जियो काका!
14 Jun 2012 - 1:03 pm | मोहनराव
उत्तम प्रतिसाद!
14 Jun 2012 - 7:18 pm | रेवती
काका, स्लमडॉग शिनेमा पाहून आलेल्या आमच्या हिरव्या मित्राला व त्यांच्या पत्नीला (दोघांचे वय ६५ च्या आसपास) माझ्या मुलाच्या मुंजीला भारतात यायची इच्छा होती पण त्यांनी स्लमडॉगमधल्या गोष्टी कितपत खर्या आहेत असे घाबरून विचारायला का सुरुवात केली ते आता समजले. मी तो चित्रपट पाहिला नाही. शेवटी ते आले नाहीतच. ;)
15 Jun 2012 - 6:49 am | मराठमोळा
पेठकर काका,
ऑनेस्ट आणि विचारपुर्वक प्रतिसाद आवडला आणि तुमचे म्हणणे पुर्णपणे पटले :)
पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं?
15 Jun 2012 - 11:58 am | बिपिन कार्यकर्ते
ममो, असे लोक असतील, आहेतही... मान्य. पण कितीसे असतात रे असे लोक? साधारण टक्केवारी काय असेल? माझ्या अनुभवावरून सांगतो... मला बाहेर असताना भेटलेले एनाराय आणि इथे असताना भेटलेले एनाराय यांच्यावरून... बहुतेक लोकांना ओढ असते इथली. संस्कार, स्मृती काही विसरू म्हणता विसरत नाही. सुरूवातीला गफ्फा मारणारे लोकही ५ / ६ वर्षं झाली की मऊ होतात. बरेचसे लोक इथल्या मातीशी, लोकांशी संपर्क ठेवून असतात. इथे आंजावरच असे लोक सापडतील की आपल्याला.
त्यामुळे काही लोकांच्या वागण्यामुळे, (त्यातही बोलणारे सगळेच नाक वर करून बोलणारे नसतात काही खर्या पोटतिडिकिनेही बोलणारे असतात), सगळ्याच एनाराय लोकांवर ठप्पा मारणे योग्य वाटत नाही.
15 Jun 2012 - 12:23 pm | प्रभाकर पेठकर
पण मग अर्ध आयुष्य भारतात काढल्यानंतर काही महाभागांना अचानक भारतीय असल्याची, स्वतःच्या भाषेची, लोकांची लाज वाटायला लागते. त्यांच काय करायचं?
श्री. मराठमोळासाहेब,
माझ्या प्रतिसादातच तुमच्या वरील प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. तरिपण, तुमच्या संदर्भासाठी तेच इथे पुन्हा उदघृत करतो:
काही काही माणसे (अनिवासी आणि निवासीही) अर्ध्या हळकुंडात पिवळी होणारी असतात. सर्व समाजात असतात. काही अनिवासी, निवासी भारतियांना दोष देतात, स्वतःला उच्चभ्रू समजतात तर काही निवासी, अनिवासींना स्वार्थी, स्वत:ला 'शहाणे' समजणारे वगैरे मानतात. त्यांचे शेरे ऐकून सोडून द्यायचे. मनावर घ्यायचे नाहीत.
15 Jun 2012 - 11:53 am | बिपिन कार्यकर्ते
जोरदार!
14 Jun 2012 - 12:11 pm | कवटी
तसही अता भारतात काय ठेवलय? सगळीकडे नुसती अनागोंदी, लूटमार, भ्रष्टाचार... काहीही धड करत नाहीत... करायला गेलं तर पैसे खायचे साधन म्हणून बघतात....
दर पावसाळ्यात सगळीकडच्या रस्त्यांची बोंब... तिकडे अगदी खेडेगावातही चकाचक रस्ते असतात.... हे आपल्याकडे साध मुंबै-दिल्ली-बंगळूर मधे पण दिसत नाही.
लोक पण किती घाण करतात इंडियात... पचापचा थुंकतायत काय, रोडच्या कडेलाच काय बसतात, घरातला कचरा रोड वर फेकतात...
गाड्या चालवताना शिस्त नाही... वर माजुर्डेपणा करणार...
मुंबै चे शांघाय, कोकण चे कॅलिफोर्निया करायला ब्रह्मदेव जरी खाली आला तरी त्याच्या बापालाही ते शक्य होणार नाही. कारण हे करायला जी शिस्त आणि इच्छाशक्ती लोकांच्यात लागती ती काडीचीही नाही इकडच्या लोकांत... उलट हे लोक शांघायचे मुम्बै आणि कॅलिफोर्निया चे कोकण करतील तिकडे नेउन सोडले तर....
लोक नाक मुरडणार नाय तर काय करणार असल्या लोकांना आणि पर्यायाने देशाला... तुम्ही उगच त्यांचे फालतू पुळके घेउ नका .
14 Jun 2012 - 12:31 pm | नाना चेंगट
चालू द्या !!
14 Jun 2012 - 5:55 pm | नितिन थत्ते
असेच म्हणतो. आम्ही फॉरेन रिटर्न (की रिटर्न्ड?) नसल्याने आमचा पास.
14 Jun 2012 - 1:36 pm | गणपा
लोकं जर त्याच त्याच चर्चेला कंटाळली नसतील तर शतकी - त्रीशतकी होण्यासाठी बरंच पोटेंशियल ठासुन भरलय या धाग्यात. ;)
निवासी अनिवासी, मराठी-हिंदी व्हाया इंग्रजी, आयटी विरुद्ध सर्व, वरण-भात विरुद्ध पिझ्झा.
चालुद्या आपला पास.
मनीच्या बातां : गण्या चणे-फुटाणे आणायला हवेत. दोन घटका मज्जा घ्यावी. ;)
14 Jun 2012 - 7:09 pm | रेवती
चणे फुटाणे?
अरे, आता तू पॉपकॉर्न खायला हवेस. ;)
14 Jun 2012 - 7:10 pm | परिकथेतील राजकुमार
कालच एका काकांनी 'वैदिक पॉपकॉर्न'ची रेसिपी शोधली आहे म्हणे.
14 Jun 2012 - 7:13 pm | नाना चेंगट
सहमत आहे.
लवकरच त्याची पाकृ पण टाकणार आहेत असे समजते
14 Jun 2012 - 7:17 pm | राजेश घासकडवी
मला वाटतं टाकलीही होती, पण ती उडाली.
14 Jun 2012 - 7:19 pm | नाना चेंगट
पॉपकॉर्न आणि अंडं समान असतं ?
असेल असेल आम्ही काय पुराणमतवादी, तुम्हा आधुनिक लोकांचं काय चालतं ते आम्हाला काय माहित? असो.
14 Jun 2012 - 7:20 pm | पैसा
या वैदिक काड्या का?
14 Jun 2012 - 7:22 pm | नाना चेंगट
काड्या ? नाही नाही या तर समिधा.
फक्त या आधुनिक समिधा असुन पुराणमतवादी वैदिक यज्ञाच्या पुनरुज्जीवनासाठी आहेत हो !
असा संशय घेऊ नका त्यांच्यावर :)
15 Jun 2012 - 1:28 pm | मेघवेडा
'आंतर(जाल)अग्नि क्षणभर तरी फुलवावा' म्हणून का? ;)
16 Jun 2012 - 12:27 am | नंदन
>>> 'आंतर(जाल)अग्नि क्षणभर तरी फुलवावा' म्हणून का?
उच्च! :)
शिवाय ह्या कवितेतही 'दूरस्थ कुणी' आहेच :)
16 Jun 2012 - 5:37 pm | प्रदीप
'समिधां'चा उल्लेख झाल्यावर कुणीतरी हा फुलटॉस सोडणार नाही असे वाटले होतेच!!
14 Jun 2012 - 2:01 pm | सूड
असा हुच्चपणा फक्त अनिवासी वैगरे दाखवतात असं नाही. ह्याच वीकांतात घडलेला किस्सा. मुरुडला गेलो होतो, रात्रीची जेवणं झाली आणि सोबतच्यांपैकी दोघांना आईस्क्रीम खाण्याची लहर आली. शोधत निघालो वाटेत 'कावरे' आईस्क्रीमच्या एका दुकानात गेलो. तिथला पेशवाई फ्लेवर नवीन वाटला म्हणून ट्राय केला. बर्यापै़की होता चवीला. सोबतचे दोघेही 'शाह'. खाताना चापून खाल्लं पण त्यांनी खिशात हात घालेपर्यंत मी पैसे देऊन टाकले होते.
दुसर्या दिवशी परत यांना आईस्क्रीम खायची लहर आली. वाटेत 'हॅवमोर'चा व्हॅनिलाचा एकेक कप सफाचट केला दोघांनी. नंतर माझ्याशी चर्चा:
शाह ज्युनियरः दादा, मेरे को वो कल का कावरे का पेशवाई बिल्कुल पसंद नही आया, उससे ये 'हॅवमोर' का व्हॅनिला अच्छा था. (काल तेच चवीचवीनं खाल्लं होतं)
मी: क्या हुआ उस में क्या बुरा था ?
शा ज्यु: वो इंडियन ब्रँड था ना.
मी: तो ये 'हॅवमोर' भी इंडियन ही है. (माहित नाही पण ठोकून दिलं.)
शा ज्यु: मगर इसका नाम तो इंग्लिश है.
या वाक्यावर काय बोलावं तेच कळेना.
14 Jun 2012 - 3:38 pm | बॅटमॅन
च्यायला या मानसिक गुलामांच्या.......हा किस्सा वाचून मीपण मनातल्या मनात अवाक् झालो.
14 Jun 2012 - 7:12 pm | रेवती
हा हा हा
बघ तुला नवा धडा मिळाला. ;)
हवं तर 'लेसन' म्हण.
15 Jun 2012 - 1:51 pm | आनंदी गोपाळ
णवा ळेसण लक्साट ठेवा.
शा लोकांसाठी पैशे भरत जाउ नका
14 Jun 2012 - 2:10 pm | परिकथेतील राजकुमार
ममोला नक्की काय विचार मांडायचे आहेत तेच कळाले नाही.
माझ्या बघण्यात तर अगदी उलट परिस्थिती आहे. परदेशातून एखादी व्यक्ती भारतात आली, की एखादा देव अथवा असामान्य माणूस आल्यासारखे इथले काही लोक त्याच्या मागे पुढे करायला लागतात. तो माणूस कितीही माय मराठीत गप्पा मारायला उत्सुक असला तरी बळंच 'यू सी' ' यू क्नो व्हॉट' वैग्रे करत त्याला जेरीला आणतात. माझ्या माहितीत असे बरेच अनिवासी आहेत ज्यांना भारतात आल्यावरती बस, लोकल इ. मधून प्रवास करायला काहिही हरकत नसते. पण इथलेच काही महाभाग त्यांना 'तु होता तेंव्हा बरीच चांगली परिस्थीती होती रे. आता टोटल वर्स्ट. ट्रॅफिकची पार वाट लागली आहे. सगळे असुरक्षित आहे. मी बेटर तुला न्यायला येतो, किंवा तू रिक्षा कर.' असली महान माहिती ऐकवतात. मग उद्या तो परदेशात जाऊन बोंबलला, तर त्याला दोष का द्या ?
हे परदेशी मित्र भेट ठरवा म्हणायला लागले, की इथल्या आमच्या मित्रांना ताबडतोब किव्हाज, पिझा हट असली ठिकाणेच आठवतात. कारण आलेला माणूस तिथेच जायला उत्सुक असणार किंवा तो दुसरीकडे कुठे बसूच शकणार नाही अशी आपणच आपली समजूत करुन घेतलेली असते. मी वैयक्तिकरीत्या मिपावरच्या देखील बर्याच अनिवासी / परदेशात कामानिमीत्त राहून आलेल्या मिपाकरांना भेटलेलो आहे. कोणाच्याही वागण्या बोलण्यात मला वरीलपैकी कुठलाही दोष कधीच आढळलेला नाही. अगदी 'खुर्ची कशाला च्यायला !' असे म्हणत माझ्या दुकानाच्या पायर्यांवरती पाय पसरुन मस्त बसून गप्पा मारणारे सहजराव, मुसु ही उदाहरणे तर अगदी बोलकी.
हा धागा काढणार्या हलकट माणसाला देखील अनेकदा भेटलो आहे. त्याच्या देखील वागण्यात असे काही दोष आढळले नाहीत. निदान शेवटच्या भेटीपर्यंत तरी. ;)
15 Jun 2012 - 7:16 am | मराठमोळा
परा,
तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे खरं. सगळेच अनिवासी अर्ध्या हळकुंडात पिवळे होत नाहीत, आणि सगळेच ईंग्रजी तो बाळ्या असं म्हणत नाहीत.
जे जे ईंग्रजी किंवा पाश्चात्य ते ते उत्तम, बरोबर आहे अशी बहुतांश लोकांची समजूत झालेली आहे, मग ते ईंग्रजी बोलणं असेल किंवा खरेदीसाठी एखादा पाश्चात्य ब्रँड. ईंग्रजी खाणं स्टँडर्ड असते आणि आपले नाही. सगळी फॅशन बाहेरुनच भारतात येते. काही उदाहरणं देतो.
१. माझा एक महाभाग मित्र ५ महिने भारताबाहेर राहुन आला. आल्यानंतर त्याने किती तरी दिवस सगळ्यांना तो भारतीय नाही याचीच जाणीव करुन देत होता. "मला इथलं हवामान सहन होत नाही.", "मला इथल्या जेवणाची सवय राहिली नाही" ,"ऑईली जेवण मला चालत नाही" असे एक ना अनेक
२. या केस मधे एक भारतीय मराठी जोडपं ऑस्ट्रेलियात आल्यापासून स्थानिक लोक नसतील इतके स्वतः फिरंगी झाले आहेत. ऑफिसमधे जेवण करायला हा व्यक्ती फिरंगी जेवण आणतो, भारतीय लोकांबरोबर जेवण टाळतो, येता-जाता भारतीय लोकांच्या चुका शोधणे, त्यावर फिरंग लोकांसोबत जोक करणे असले प्रकार करतो, त्याला भारतात वाढलो याचं खुप दु:ख आहे आणि भारतात होता तेव्हा तो किती "चीप" रहात होता, आता कसा हाय फाय आहे. लवकरच त्याला भूत्काळ विसरायचा आहे कारण तो आता भारतीय राहिलेला नाही.
अशी बरीच उदाहरणे देता येतील, मराठी बोलण्याची लाज वाटणारे, वर सूडने उदाहरण दिलं तसं ईंग्रजी नाव असेल तर भारी, इतर बकवास असा फरक करणारे. लोक सुद्धा कुणी परदेशात गेला असेल तर त्याचं कौतुक करणार आणि एखाद्याच नशीब नसेल तर मग त्याला कमी लेखणार. चांगलं ईंग्लिश बोलता येणे ही काळाची गरज असली तरी कित्येक लोकं आहेत की ज्यांना ईंग्रजी येत नसलं तरी त्यांनी अभिमान वाटावा अशी कारकिर्द घडवली आहे. युरोपात देखील कितीतरी देशात लोकांना नीट ईंग्रजी बोलता येत नाही पण ते त्यांच्या देशात काम चांगलं करीत आहेत.
एक तेलगु मुलगा होता माझ्या आधीच्या कंपनीमधे, तो कंपनीला म्हणायचा की मला ऑनसाईटला पाठवा, पैसे मी देतो, पगार अर्धा दिला तरी चालेल पण पाठवा. कारण काय तर म्हणे हुंडा डबल मिळेल ऑनसाइटला जाउन आला की. :)
नोकरीच्या निमित्ताने परदेशात जाणे, स्थायीक होणे, मोठ्या कंपनीत काम करणे, काळाबरोबर चालणे ह्या ओघाने येणार्या आणि ज्याच्या त्याच्या ईच्छेच्या गोष्टी आहेत, पण मग यात खोटेपणा नसावा, स्वत:ची लाज वाटु नये आणि आपल्यामुळे आपल्या देशाचा, माणसांचा अपमान होऊ नये याची काळजी घेतली जावी
15 Jun 2012 - 11:44 am | चिरोटा
पण अशा लोकांची संख्या कमी होत आहे. किंबहुना 'ईतके वर्षे बाहेर रहात असला तरी अजूनही खूप साधा आहे.(मुल्ये वगैरे) विसरला नाही' अशांची संख्या जास्त आहे. आमचा एक मित्र युरोपातून वर्षातून एकदा मुंबईत आला की लोकल ट्रेनने मुद्दामून जातो.नातेवाईकांमध्ये ही 'बातमी' कशी होईल ह्याची तयारी व्यवस्थित तो करतो.आणि एक मित्राला फिरताना कांदा भजी खायची लहर येते.मग हॉटेलात जाण्याऐवजी/घरी खाण्याऐवजी त्याला कुठल्याशा टपरीवरच कांदाभजी खायची असते.तशी कांदाभजी न्यु जर्सीत कुठेच मिळत नाही असे कौतुकही होते.आणि एका मित्र भारतात आला की त्याला जुनी मराठी पुस्तके वाचायची असतात्.जी.ए./कुरुंदकर वगैरे लेखकांची पुस्तके ते जाताना घेवून जातो.
14 Jun 2012 - 3:50 pm | एम.जी.
पूर्वी मीसुद्धा असं लिहायचो...
एनाराय झाल्यापासून नाही लिहीत..
काही खरं नसतं.
माझा एक मेव्हणा कुठेही गेलो की बिल भरताना " रुपयात इतके म्हणजे तुमच्याकडचे किती " असं विचारून कन्व्हर्ट करतो आणि त्यानंतर " इतके म्हणजे तुम्हाला फार नाही..." असं म्हणून मलाच बिलं भरायला लावतो...
15 Jun 2012 - 3:14 am | तात्या विंचु
काय हो मराठमोळा साहेब तुम्ही कधी गेलात परदेशात ?
एकदा जावून या आणी बोला ... :-)
15 Jun 2012 - 3:33 am | रेवती
आले होते की ममो अमेरिकेत.
मला वाटतं ऑस्ट्रेलियातही होते काही दिवस.
15 Jun 2012 - 10:17 am | विश्वनाथ मेहेंदळे
मध्ये मुंबईला आला होता काही महिने. आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही.
परत गेल्यावर पर्वतीपेक्षा जीवदानी उंच आहे म्हणत होता. दिल्ली दरबार सारखी बिर्याणी पुण्यात मिळत नाही असे पण म्हणाला. आणि चक्क सारसबागेतील तळ्यापेक्षा ठाण्याचा तलाव चांगला आहे असेही म्हणाला. आत्ता बोला, स्वदेशाचा अभिमान सोडून असे परदेशाचे गुणगान करणे शोभते का ??
15 Jun 2012 - 10:52 am | प्रदीप
:) :) :) :)
15 Jun 2012 - 12:00 pm | बिपिन कार्यकर्ते
+१
15 Jun 2012 - 3:08 pm | श्रावण मोडक
+२
15 Jun 2012 - 11:08 am | प्यारे१
विमे अॅज युज्वल इन फॉर्म...!
इट्स अ ब्राईट सन्नी डे हिअर अॅन्ड वी हॅव ममो ऑन स्ट्राईक विथ विमे अॅट द अदर एन्ड. ;)
15 Jun 2012 - 12:05 pm | नंदन
अगागागा! दंडवत स्वीकारावा, विमे! :)
15 Jun 2012 - 1:52 pm | सूड
>>आता पुण्याचा माणूस पुण्याबाहेर पडला म्हणजे परदेशी जाण्यासारखेच झाले की नाही.
ह्या वाक्यासाठी हॅट्स ऑफ !! :D
15 Jun 2012 - 2:34 pm | मराठमोळा
विमे विमे कुठे फेडणार ही पापं? ;) आता पुणेकरांना यात खेचायची गरज होती का?
आणि मी आपलं मुंबईला रहाणं नको नकोसं झालं असताना आपलं मानलं, एका पुणेकराने सगळा जाज्वल्य अभिमान बाजूला ठेवून मुंबईची तारीफ केली तर वर हे ऐकायला लागतय... अरेरे.. डोळे पाणावले.
बाकी चालु द्या.. मुंबईकर विमे, धाग्याचा पुरेपूर अभ्यास केलाय आणि अलर्ट लावून बसलाय जणू :P
15 Jun 2012 - 2:48 pm | रमताराम
इतके बार फुसके गेले पण 'पुणे' म्हटलं (रामबाणच हो, वाया कसा जाईल) की लग्गेच धागा धडधडू लागला. नाना, चल ये समिधा टाकायला.
15 Jun 2012 - 3:06 pm | मृत्युन्जय
आमच्याकडे अजुन एक - दोन रामबाण आहेत म्हटलं ;)
सनातन पुणेरी ब्राह्मण ;)
15 Jun 2012 - 6:29 am | आनंद घारे
आजकाल काही काही लोकांच्या घरातच एकादा विंग्रजी बाळ्या / बाळी आणिक एकादं देशी कार्ट/ कार्टी असतात. लई पंचाईत होते बघा!
15 Jun 2012 - 8:09 am | कवितानागेश
नाही, पण मी काय म्हणते,
असे उगीच देश देश , भाषा भाषा , वरण भात वगरै आग्रह करत रहाणे म्हनजे मागालसेपणाचे लक्षण नाही का?
कधी 'ग्लोबल' होणार आपण लोक्स? त्याशिवाय प्रगती कशी व्हायची?
शिवाय आपण 'विश्वबंधुत्व'वाले नाही का?
मग का बरे परदेशाला असे कमी लेखायचे?
........
.........
..........
.....
असेच काहीबाही......
पुरे. :)
15 Jun 2012 - 9:57 am | नाखु
माझि एक धाव..
15 Jun 2012 - 3:38 pm | मेघवेडा
नाही, पण मी काय म्हणतो, 'इंग्रजी' बाळ्याचा विषय असताना सगळे अमेरिकेला धरून का बसलेत? अमेरिकन्स आणि इंग्रजांत काही फरक आहे की नाही म्हटलं?
15 Jun 2012 - 5:50 pm | रेवती
असेल असेल. फरक असेल पण जगात भारी अमेरिकावारी! ;)
(मग इकडे आमचे कंबरडे मोडलेले का असेना!)
15 Jun 2012 - 6:06 pm | रमताराम
ह्या बाकी बराबर हां. जल्ला ते अमेरिकन म्हंजे इंग्लिश लोकांच्या उलटे हो. हे लोक चा पितात ते काफी. हेंच्याकडे डावीकडून गाडी चालवतात त्यांच्याकडे उजवीकडून. हे शिष्टाचाराचे पक्के तर ते अर्धी चड्डी घालून रस्त्याने बर्गर खात खात जाणार, हेंच्याकडं बटन खाली केलं का लैट चालू व्हतोय तर तेंच्याकडं वर केल्यावं. येकडाव कशाबाबत मी 'तुमी लोक असं उलट काऊन करतावं, तसं काऊन नाय करत, सोपं हाय न्हवं?' आसं इचारलं तर 'नो, दॅट इज सो ब्रिटिश' आसं उत्तर येका पाकिस्तानी-आम्रिकनानं धिलं व्हतं, आता बोला.
15 Jun 2012 - 6:54 pm | मेघवेडा
एकदा दोघांचं भांडण चालू असता आम्रिकन कार्ट्यानं चिडून इंग्लिश बाब्याला म्हटलं "We'll take you out"
इंग्लिश बाब्या उत्तरला "No wonder you spell 'colour' as 'color' mate!"
;)
16 Jun 2012 - 12:13 am | रमताराम
पण mate हा टिपिकल अमेरिकन शब्द ना. मला नेहमीच गंमत वाटत आली आहे. कुणीसं आम्रिकन म्हटले की अरे 'रुम-पार्टनर' म्हणत नाही आम्ही, रूम-मेट म्हणतो. पार्टनर चा अर्थ जोडीदार असा घ्यायचा. हे म्हणजे उलटच झालं की नाही. 'The one who 'mates' is called a partner and the one who doesn' mate, is called a mate' आहे की नाही गंमत. :) या आम्रिकनांचं डोकंच उलटं ब्वॉ.
16 Jun 2012 - 12:55 pm | आनंदी गोपाळ
मला तर पार्ट-नर हा शब्दही गमतीदारच वाटतो..
15 Jun 2012 - 6:31 pm | गणपा
आलं यांच इंग्लंड प्रेम उफाळुन लगेच. ;)
15 Jun 2012 - 5:55 pm | योगप्रभू
बाळ्या हे बाळी शब्दाचे अनेकवचन समजून उत्सुकतेने धागा वाचू लागलो, पण पुढे विषय गंभीर तत्त्वज्ञानाचा आल्याने अपेक्षाभंग झाला. :)
15 Jun 2012 - 6:43 pm | रमताराम
निम्म्या गवर्या गेल्या की हो, आं? आता 'हरिभजनाविण काळ घालवू नको रे' प्रभूदेवा.
15 Jun 2012 - 8:55 pm | श्रावण मोडक
त्यांचे एक अनुभवकथन येणार आहे लवकरच - पांढरे केस, हिरवे मन!
16 Jun 2012 - 9:45 am | योगप्रभू
श्रामो,
ते अनुभवकथन माझे नाही. लिहिलेच तर ते 'तरुण आहे गात्र अजुनि' नावाने लिहीन. :)
16 Jun 2012 - 11:23 am | रमताराम
म्हणजे हे सांगण्यासाठी/पटवण्यासाठी पुस्तक लिहायची वेळ आलीये म्हणायची....
16 Jun 2012 - 2:31 am | चतुरंग
'नारीभजनावीण काळ घालवू नको रे' असं आहे! ;)
16 Jun 2012 - 11:22 am | रमताराम
रंगाशेट, विश्वसनीय सूत्रांकडून समजले आहे की नित्यानंद (स्पेलिंगी 'निथ्यानंद') स्वामींनी ह्युमन क्लोनिंगचा प्रयोग यशस्वी केला आहे. त्यांचे क्लोन्स देशाच्या वेगवेगळ्या भागात त्यांचे मठ स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पुण्यातही एकजण आहे म्हणे असे परवाच एका पत्रकार मित्राने सांगितले.
16 Jun 2012 - 9:41 am | योगप्रभू
रमता,
अरे अभी तो हम जवान है. उगा अकाली वृद्धत्व मिरवण्यात काय गंमत?
तुला भजनच्या ऐवजी भोजन म्हणायचे होते का?
चांगल्याच कळा आहेत तुझ्या अंगात. मला भजनाचा उपदेश करायचा आणि स्वतः जंगलवाटांवरचे कवडसे न्याहाळत बसायचं. :)
16 Jun 2012 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
शिनिअर शिटिझन्सनी एक तरुण उगवत्या सदस्याचा धागा हायजॅक केलेला बघून शरम वाटली.
विषयांतर करणरे इतके प्रतिसाद पाहून मिपाकरांना दिलेल्या सुटीचा किती प्रचंड गैरवापर होतो आहे हे पाहून खूप वाईट वाटले..!
सदर धाग्याचा श्री बिपिन कार्यकर्ते, रमताराम, योगप्रभु आणि चतुरंग यांनी खरडफळा सजमून जो दुरुपयोग केला आहे याची मिपाचा सदस्य म्हणून मला अत्यंत लाज वाटते...!
मिपावर जास्तीत जास्त मोकळे व खेळकर वातावरण ठेवले आहे याचा गैरफायदा कसा घ्यावा याचं हा धागा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे...
वरील चौघांच्या अनावश्यक आणि वाहवत जाणार्या विषयांतराकरता मी उर्वरीत मिपाकरांची हात जोडून क्षमा मागत आहे..
परातात्या.
16 Jun 2012 - 1:12 pm | रमताराम
नित्यानंदांच.... आय मिन योगप्रभूचं अध्यात्माचं दुकान चालू झालं की आपलं बुडणार हे ध्यानात येऊन स्वामी परेंद्रांनी जो त्रागा चालवला आहे हे पाहून एक अध्यात्मिक मिपाकर म्हणून शरम वाटली.
ता.क.: स्वामी योगेंद्रांच्या मठात कार्यकारी अधिकार्याची जागा परेंद्रांना द्यावी असे योगेंद्रस्वामी म्हणत होते परवा. मठाचे सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायला एवढा लायक माणूस दुसरा कुठला, असं म्हणत होते.
ता.क.२: त्याबदल्यात ते किरकोळ फेवर मागत आहेत ते म्हणजे सौंदर्यफुफाट्याचा डेटा.
16 Jun 2012 - 1:31 pm | परिकथेतील राजकुमार
परवाच आमची व योगप्रभूंची एक अत्यंत खाजगी बैठक झाली, ज्यात आम्ही व त्यांनी ह्यापुढे एकत्रच दुकान चालवायचे ठरवले आहे. ह्या निर्णयाला आशिर्वाद द्यायला परमश्रेष्ठ श्री. यक्कु स्वामी खुद्द उपस्थीत होते.
आता बोला !
16 Jun 2012 - 1:34 pm | नंदन
हा परस्पर-खोड-सामंजस्याचा ऐतिहासिक पुणे करार आठवला ;)
16 Jun 2012 - 8:40 pm | रमताराम
एकुण गुपितं काढून घेण्याचं आमचं कौशल्य वादातीत आहे हे पुन्हा सिद्ध झाले. थोडक्यात हिटलर नि मुसोलिनी आधीच भेटले होते तर. मग याबाबत आमच्यासारख्या स्टॅलिनला अंधारात ठेवणे ओघाने आलेच. पण शेवटी तुमचं स्टॅलिनग्राड आम्हीच करू, समजलात.
(मठाचे उत्पन्न परस्पर लाटले गेल्याने चिडलेला) कॉ. रमताराम.
(अर्र, हा प्रतिसाद कोटिभास्करांना कस्काय पडला?)
15 Jun 2012 - 10:43 pm | इंद्रवदन१
मारुती गाडी कमी दर्ज्याची समजली जाते आणि होंडआ हुच्च ....
15 Jun 2012 - 11:56 pm | निनाद मुक्काम प...
विमे आता पुणेकरांच्या रडारवर आला आहे :
पण हश्या हक्काने वसूल करणारा प्रतिसाद होता.
परा ह्यांच्या प्रतिसादात त्याने अनिवासी लोकांच्या पाठीमागे रुंजी घालणार्या भारतीयांबद्दल म्हटले आहे.
ह्यावरून वार्यावरची वरात आठवली.
पु ल देशपांड्यांना गावात ते मुंबईहून आले आहेत हे कळल्यावर गावकरी त्यांना मुंबईज्वर कसा चढला आहे हे "दिल देखे देखो" असा चाचा करत दाखवून देतात.
आमच्या कॉलेजातील एका मित्राच्या पंजाबी परिवारात लग्नासाठी अमेरिकेहून भावंड आली होती. तेव्हा मित्राच्या आईने संगीत मध्ये मुलांना विंग्रजी गाण्यावर नाचायला लावले व प्रत्येक वेळी आपण मुंबईत म्हणजे चेंबूर च्या सिंधी केंप मध्ये नेहमी यु ए से चा माल कसा वापरतो हे अभिमानाने सांगितले ( मागाहून कळले की ह्यांचे यु एस ए म्हणजे
उल्लासनगर , सिंधी , असोशिएशन ला म्हणतात.
पेठकर व शुची च्या प्रतिसादाशी सहमत.
आपले ठेवावे झाकून आणि लोकांचे पहायचे वाकून ह्याच प्रवृत्तीने मी अनिवासी भारतीय ह्या नात्याने माझ्या परदेशी पत्नीस मुंबई व भारत दर्शन घडवतो.
माझ्या प्रत्येक भारतभेटीत मी भारताच्या विविध राज्यांना भेट देऊन माझाच देश जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पुढील भारतभेटीत गोव्यावर स्वारी करण्याचे आधीच मिपावर जाहीर केले आहे. योग्य वेळी गवी व टीम गोवा व इतर मिपाकरांचे मार्गदर्शन घेण्यात येईलच.
माझ्या निरीक्षणातून मला असे जाणवले की आमच्या लहानपणी आमचे केनेडा व अमेरिकेतून नातेवाईक व भावंडे आली की आम्ही एक न्यून गंडाने पछाडले जाऊन त्यांना तुमचे घर त्या होम अलोन मधील केविन एवढे मोठे आहे का ?
त्यांनी आणलेल्या विडीयो गेम वर भिकार्यासारखे तुटून पडणे. एखादे पेन किंवा अंगावरील झबले अमेरिकेतून आले आहे हे समस्त डोंबिवली ला कळे पर्यंत अंगाहून न काढणे व आठवीत मिळालेल्या परदेशी पेनातून शाळांत परीक्षेचा पेपर लिहिणे इत्यादी प्रकार केले.
आता मात्र माझ्या शाळेतील वर्गातील अर्धी मुले अनिवासी आहेत व सगळे चेपू वर आहेत. पण आम्ही भारतात येतो तेव्हा आम्हाला कोणीही वेगळी खास वागणूक देत नाही. अनिवासी शब्दाचे अवमूल्यन भारतीय चलनापेक्षा जास्त झाले आहे. व ह्यांचे मला एक भारतीय म्हणून खूप अभिमान वाटतो.
भविष्यातील महासत्ता असे परकीय आपले वर्णन करतात.
माझे डोंबिवलीतील काही मित्र आता मुंबईत टोलेजंग इमारतीत नवं श्रीमंतांचा झगा चढवून हम किसीसे कम नही अश्या आवेशात आमच्याशी वागतात. हे पाहून जीव सुखावतो. ह्याच भारतीय उच्च मध्यमवर्गीय वर्गावर तमाम बहुराष्ट्रीय कंपन्या डोळा ठेवून असतात.
पदवी नंतर आता काय? असे प्रश्नार्थी चेहरे आजकाल दिसत नाहित. अमेरिकन व इतर प्रगत देशातील नोकर्या स्तलांतरित झाल्याने आजकाल भारतात नवीन वर्ग उदयास आला आहे.
आयटीत आम्ही आयटी मध्ये आहोत असे न प्रत्यक्ष न सांगता सर्वकाही सांगून जाणारा वर्ग येथे आहे. अश्या सर्व परीस्थितित अनिवासी भारतात येतो आणि महिनाभराच्या अनुभव व आठवणीची सुदाम्याची शिधोरी घेऊन मायदेशी परततो. पैलतीरी वर्षभर ह्याचं शिधोरीतील पोहे चघळून चघळून त्यास जगायचे असते.
आता एखाद्या शितावरून उगाच भाताची परीक्षा करण्यास काय हाशील आहे.
16 Jun 2012 - 12:17 am | श्रीरंग_जोशी
निनादराव - अगदी मनापासून लिहिलंय तुम्ही.
शेवटचा परिच्छेद तर मनाला स्पर्शून गेला...
16 Jun 2012 - 5:20 am | मराठमोळा
निनादराव,
प्रतिसाद आवडला. तरी तो केवळ अनिवासींच्या बाबतीत होता असे म्हणतो.. धाग्यामधे केवळ अनिवासीच नव्हे तर एकुणातच जे जे ईंग्रजी ते ते उत्कृष्ट असते अशी जी धारणा आहे त्या अनुशंगाने येणार्या अनुभवांआबत लिहिले होते.
भारतात ब्रँड क्रिएशन नाही मान्य आहे, आपल्याकडचे सगळेच ब्रँड हे पाश्चात्य देशांतील ब्रँडच्या मानाने कमी लेखले जातात. भारतीय माणूस भारतीय माणसला किंमत देताना आढळत नाही. वर बर्याच लोकांनी नाकारले असले तरी अशा लोकांची संख्या कमी होत असली तरी (?) सध्या खुप आहे. पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्याला हाय-फाय समजतो.
भारतात प्रॉब्लेम आहेत हेही मान्य आहे, पण मग तुमच्याकडे बाहेर जाण्याचा मार्ग आहेच ना, बाहेर जाऊन पुन्हा भारताची बदनामी (कधी कधी खोटंनाटं सांगून) करण्याची काय गरज आहे?
मागे मुंबईत असताना नेदलरलँड्स वरुन तिथल्या गव्हर्नमेंट्चे मोठे अधिकारी आयटी टीमला भेट द्यायला आणी अनुशंगाने भारत बघायला आले होते. मुंबईत आल्यानंतर त्यांना विश्वास बसेना की मुंबईत ईतक्या मोठ्या बिल्डींग्/ईंफ्रास्ट्रक्चर आहे. त्यांच्या मते भारत म्हण्जे गरीब देश, आजही अंगावर झाडाची पाने गुंडाळणारा टाईप्स. या विचारांमागचं कारण म्हणजे तिथे स्थायीक असलेल्या भारतीयांची त्यांना भारताबद्दल सांगितलेली माहिती. जे लोकं भारतात आलेले नाहीत त्यांना अजुनही भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल गैरसमज आहेत कारण आपल्याच लोकांनी पुरवलेली चुकीची माहिती/ उडवलेली टर.
इथे देखील काही भारतीय फिरंगांना अशी काय मस्त माहिती देतात भारताबद्दल की फिरंग भारतात कधीच जाणार नाही याची शपथच घेतो.
16 Jun 2012 - 8:50 am | सुधीर
माझ्या मते, ज्या काही लोकांमुळे तुम्हांस असं वाटतंय, त्यात त्यांचीही काही चूक नाही. बिचार्यांना परमेश्वराने द्वंद्वात्मक आघात सहन करण्याची पुरेशी ताकद दिली नसावी.
एक चालतं बोलतं उदाहरण घ्या ना! दीक्षित-नेने बाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचा "अॅक्सेंट" काही बदलला नाही. जे लोक परदेशात दोन-तीन वर्षांहून अधिक काळ राहून आलेत ते तिची बाजू निदान समजू शकतात आणि ज्यांनी उभ्या आयुष्यात कधीही परदेश पाहिला नाही त्यांचं तिच्या नावाने बोटं मोडणंही मी समजू शकतो.
मी स्वत: अमेरिकेत दीड वर्ष वास्तव्य केलं, जाण्यापूर्वी अमेरिकेबद्दलचं मत प्रतिकूल होतं, अगदी राजकारणापासून ते संस्कृती पर्यंत, पहिले सहा महिने तुलना करण्यातच गेले. पुढचे सहा अमेरिका समजण्यात आणि त्यानंतरचे अमेरिकेच्या प्रेमात गेले. ज्या-ज्या गोष्टींबद्दल मत प्रतिकूल होतं, वा ज्या-ज्या गोष्टींचा तिरस्कार होता त्याची जागा प्रेमाने घेतली गेली. बहुतेकांच्या बाबतीत असंच होत असावं कारण त्यांचं तिथल्या मातीत मिसळून जाणं. भारतात परतल्यावर द्वंद्व उभंच ठाकलं! आतापर्यंत जे-जे चुकीचं समजत होतो ते अगदीच चुकीच नाही आणि जे-जे एकदम बरोबर समजत होतो ते सगळंच अगदी बरोबर नाही हे उलगडून चुकलं. अगदी खाद्य संस्कृती पासून ते व्यक्तिस्वातंत्र्यापर्यंत. पण लवकरच माझ्या सुदैवाने मला कळून चुकलं की जग विशाल आहे. परमेश्वर म्हणा, नाहीतर कुठलीशी शक्ती म्हणा, यांनी असा काही धागा विणलाय अशी काही माया उभी केलीए, की एका टोकाला एक तर दुसर्या टोकाला विरुद्ध गोष्टी आपापल्या ठिकाणी नांदताना दिसतात. ज्याला हे समजून चुकतं, जो हा विरोधाभासाचा आघात सहन करू शकतो, तो मग, ज्या आनंदाने इथल्या पुठपाथवरल्या भैय्याकडचं व्हेज सँ"ड"विच (ड चा पूर्ण उच्चार करून) खातो त्याच आनंदाने परदेशात व्हाईट कॅसल मधले हॅमबर्गर्स (बीफ), "सॅविचेस" खातो. नाहीतर तुम्ही म्हणता त्याच्या अगदी उलट, तिथे अगदी ७-८ वर्ष राहून पण त्यांच्या खाद्यसंस्कृती म्हणा वा इतर काही गोष्टीवर म्हणा यावर नाकं मुरडणारी माणसं मी पाहिली आहेत.
असो, असं फर्स्ट हेट अॅण्ड देन लव असं बर्याच बाबतीत होतं. वर कुणी तरी पुणं आणि पुण्याबाहेरलं जग अशी तुलना केली होती, अगदी तसंच, गिरणगाववाल्यांच, लालबागची चाळ संस्कृती आणि उपनगरातली फ्लॅट संस्कृती बाबत होताना दिसतं.
बाकी दुसरं म्हणजे उगाचच भारतीय ब्रँडना कमी लेखणं, विंग्रजीला अतिमहत्त्व देणं वगरै वगरै..याला त्या व्यक्तीच ते अज्ञान आहे असं म्हणून सोडून द्यायचं.
16 Jun 2012 - 10:46 am | प्रभाकर पेठकर
पेठकर काका म्हणतात तसे ईंग्रजी भाषेला इतक्या उच्चपदावर कुणी नेऊन बसवले हाही प्रश्नच आहे. कारण बहुतांश ठिकाणी आपण ईंग्रजी बोलणार्याला हाय-फाय समजतो.
अगदी मिपावरसुद्धा मराठीचा आग्रह धरणार्याला 'जुने खोंड', 'मागची पिढी' असे म्हणत, इतर भाषेतील शब्द अंगिकारूनच भाषा 'समृद्ध' होते अशा नवविचारांचे बाळकडू पाजले जाते. कधी कोणाच्या चुका दाखविल्याच तर लक्षात ठेऊन सूड उगविला जातो. आपल्या मातृभाषेलाच 'कार्ट' ठरवायला निघालेले काही जणं 'आपला देश' वगैरे व्यापक विचार काय करणार? त्यामुळे ह्याला आवर न बसता 'इंग्रजी बाळ्या आणि देशी कार्ट' ही वृत्ती वाढीस लागणारच.
16 Jun 2012 - 1:21 pm | शिल्पा ब
हा घ्या १००वा.