चिखलातून उगवणारे सुंदर फुल म्हणजे कमळ. कमळा सारखेच दिसणारे कुमुद ह्यालाही आपण कमळच म्हणतो.
काही दिवसांपूर्वी सगुणा बागेत जाण्याचा योग आला. तिथे कमळे, कुमुद व त्याबद्दल माहीती सांगणार्या पाट्या दिसल्या. पाट्यांमुळे माझे टायपिंगचे श्रम वाचले :हाहा:
२)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
१३)
कमळाचे फळ त्यात बिया आहेत त्यांना मखाणे म्हणतात. बाकी माहीती वरच्या तक्त्यात आहेच.
१४)
प्रतिक्रिया
14 Jun 2012 - 3:58 pm | गणपा
नीळं जांभळ कमळ जास्त आवडलं.
14 Jun 2012 - 4:01 pm | ५० फक्त
धन्यवाद निसर्गसखी, पुन्हा एकदा धन्यवाद.
14 Jun 2012 - 4:05 pm | पियुशा
छान :)
14 Jun 2012 - 4:54 pm | sneharani
मस्त ग!
:)
14 Jun 2012 - 4:58 pm | अमृत
प्रथमच बघतो आहे. सगळे फोटो मस्त.
अमृत
14 Jun 2012 - 5:07 pm | कवटी
मला वाटले कमळ नावाच्या माश्याची पाकृ असेल.... निदान गेला बाजार कमळाच्या देठांची सुकट घालून केलेली पाकृ तरी असेल... पण जागुतै नी फुलांचे फोटो टाकून आमचा हिर्मोड केला....
असो...
फोटो बाकी सुरेखच आले आहेत...
14 Jun 2012 - 5:18 pm | नाना चेंगट
अच्छा हे कमळ ! मला वाटले थत्तेचाचांचे आवडते कमळ की काय ! ;)
14 Jun 2012 - 5:35 pm | मनिम्याऊ
जागु ताई,
हस्तक्षेपाबद्दल क्षमा मागते.. पण १ ते १२ चित्रात 'कमळ' नसुन 'कमलिनी' आहेत.
मिपावरील एका धाग्यावर मी दोन्ही प्रकरच्या फुलांची प्रकाशचित्रे टाकली आहेत (देवपुष्प धागा http://www.misalpav.com/node/21769 ). त्यांमधे आपल्याला दोघांमधील फरक दिसुन येतो.
14 Jun 2012 - 7:04 pm | सूड
फूलांचे फोटो छान, पण न जाणो का ते फळ जाम कीळसवाणं दिसतंय.
14 Jun 2012 - 7:21 pm | रेवती
छान फोटो.
14 Jun 2012 - 7:41 pm | बिपिन कार्यकर्ते
नेहमीप्रमाणे उत्तमच! :)
14 Jun 2012 - 8:53 pm | जाई.
छान फोटोज
14 Jun 2012 - 9:34 pm | अत्रुप्त आत्मा
ग्रेट...! :-)
शेवटी त्या कमळाच्या बियांना मखाणे या नावाप्रमाणेच कमलाक्षही म्हणतात,त्याची माळ गळ्यात घातली जाते.काही आध्यात्मिक उपासनांमधे तसेच आयुर्वेदा नुसार कमलाक्ष शीतलता देतो,म्हणुनही ह्यांची माळ घालतात... :-)
14 Jun 2012 - 10:41 pm | मदनबाण
आयला... कमळ फळ असे असते काय ! ह्म्म... :)
बाकी ११वा फोटु पाहुन मला या ओळी आठवल्या... मिटता कमलदल होई बंदी भृंग । तरि सोडिना ध्यास, गुंजनात दंग
तै हा व्हिडीयो फक्त तुझ्यासाठी...
14 Jun 2012 - 11:24 pm | शिल्पा ब
आवडलं. कमळ पाण्याच्या शुद्धीकरणासाठी वापरतात म्हणजे कसं?
14 Jun 2012 - 11:26 pm | जागु
मनिम्याउ बरोबर आहे तुझे. मला वाटत ते गुलाबी मोठ कमळ असाव. बाकी वॉटर लिलीज आहेत. म्हणुनच मी नमुद नाही केले कुठल्याच फोटोला की हे कुमुद आणि हे कमळ.
गणपा, ५०, पियुषा, स्नेहा अमृत, नाना, सुड, रेवती, बिपीन, जाई, अतृप्त आत्मा, मदनबाण धन्यवाद.
कवटी तसे मखाणे शिजवता येतात त्यामुळे ते सुकटीत घालून पहायला हरकत नाही.
15 Jun 2012 - 1:45 am | तर्री
भारतीयांना कमळ अती प्रिय आहे. त्याचे विलोभनीय दर्शन झाले.
त्याच्या चिखलातून उगावान्याला जसा अर्थ आहे तसाच आद्यदेवता लक्ष्मी मुळेही हया फुलला अनन्य साधारण महत्व आहे.
चांगल्या बातम्यांप्रमाणेच चांगले धागेही खपत नाहीत.
जाऊ दे , गुणवत्ता की संख्या ...तर गुणवत्ता इतकेच.
अवांतर:
जनता पक्षातून अंग काढून नवा जेंव्हा भारतीय जनता पक्षाने आपले "कमळ" हे चिन्ह निवडले तेंव्हा ते सामान्य भारतीयांना "अपील" होणार नाही असा एक प्रवाद होता. ( तेंव्हाचा प्रघात हा शेतीशी निगडीत चिन्हांचा होता). परंतु अटलजीनी कमळ आपलेसे केले.
15 Jun 2012 - 2:49 am | विकास
फोटो आवडले.
मला देखील येथे नितिनरावांचा प्रतिसाद अपेक्षित होता. ;)
बाकी अजून एक आठवण झाली म्हणजे, "बबन कमळ बघ", "कमल नमन कर" या मराठी शिकतानाच्या बालवाडी/पहीलीतील धड्यांची :-)
15 Jun 2012 - 8:40 am | प्रचेतस
अतिशय सुंदर.